मुकेश चंद्र माथुर

टवाळचिखलू's picture
टवाळचिखलू in जनातलं, मनातलं
22 Jul 2009 - 1:03 pm

आज २२ जुलै, मुकेश चंद्र माथुर म्हणजेच पार्श्वगायक मुकेश यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांची आठवण म्हणुन हा धागा.

त्यांनी गायलेल्या काही गजला इथे उपलब्ध आहेत.

शेवटी असेच म्हणेल ....

ओ जानेवाले हो सके तो लौट के आना ......
....
....

चाहे तु आये न आये ... हम करेंगे इंतजार ....

कलाप्रतिभा

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

22 Jul 2009 - 1:25 pm | दत्ता काळे

टवाळचिखलू ह्यांनी दिलेल्या लिंकवरच्या गझला बघून असे लक्षात आले कि, मुकेशची गाणी हि सगळी गाणी नसून त्यात काही गझला आहेत. वास्तविक पाहता मुकेशची जवळपास सगळीच गाणी हि तर गझलाच असावीत.

मला मुकेशचे यहुदी मधले ' ये मेरा दिवानापन है . . . . आणि संगीतसम्राट तानसेन मधले ' झूमती चली हवा' ( भारतभूषण नावाच्या स्थितप्रज्ञावर चित्रित केलेले ) आणि सारंगा मधले ' सारंगा तेरी यादमे.' ( हे गाणे रात्री 'बेला के फूल'वरंच ऐकावे) हि गाणि/गझला फार आवडतात. .

टवाळचिखलू ,

स्व. मुकेशजींची याद दिलवल्याबद्द्ल शतश : धन्यवाद.

डॉ.प्रसाद दाढे's picture

22 Jul 2009 - 4:31 pm | डॉ.प्रसाद दाढे

मुकेशचं नाव काढलं की कुठंतरी अंतरीची तार छेडली जाते.. काय भाव होता त्या आवाजात्..सुभानअल्ला! चांद आहे भरेगा, मुझको इस रात कि तनहाईयां, ओ जानेवाले हो सके तो, ओ हो रे ताल मिले, सजन रे झूट मत बोलो, दिल तडप तडप के, आसूं भरी हैं, चल अकेला चल अकेला, सारंगा तेरी याद में,.. क्या बात हैं.. नुसत्या सुरावटींच्या आठवणींनीच सर्रकन काटा आला..
आवाजाला मर्यादा निश्चित होत्या, तो सगळ्या प्रकारची गाणी नव्हता म्हणू शकत, पण वर दिलेल्या गाण्यांसाठी मी दुसरा आवाज इमॅजिन करूच शकत नाही. जीव ओतून गाणं ते काय असू शकतं ते मुकेशच्या गाण्यात होतं. आज सकाळी वर्ल्ड स्पेस रेडियोवर मुकेशची पुष्कळ खूबसुरत गाणी ऐकविली.. दिवस कसा छान गेला..पाऊसही डोळ्यांचं पारणं फेडतोय अन मुकेश कानांचं..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jul 2009 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुकेशचं नाव काढलं की कुठंतरी अंतरीची तार छेडली जाते.. काय भाव होता त्या आवाजात्..सुभानअल्ला! चांद आहे भरेगा, मुझको इस रात कि तनहाईयां, ओ जानेवाले हो सके तो, ओ हो रे ताल मिले, सजन रे झूट मत बोलो, दिल तडप तडप के, आसूं भरी हैं, चल अकेला चल अकेला, सारंगा तेरी याद में,.. क्या बात हैं.. नुसत्या सुरावटींच्या आठवणींनीच सर्रकन काटा आला..

डॉ. साहेबांशी सहमत आहे......!

-दिलीप बिरुटे

वेताळ's picture

22 Jul 2009 - 5:57 pm | वेताळ

कॉलेज मध्ये गेल्यावर जितका मायकेल आवडत होता त्या पेक्षा मुकेश खुपच मनाला भिडला होता.त्याची गाणी एकताना खरोखरच माणुस दुसर्‍या विश्वात जातो. तो दर्दभरा स्वर व मदहोश करणारा आवाज.....

वेताळ

बबलु's picture

23 Jul 2009 - 3:35 am | बबलु

डॉक्टरांशी १०० % सहमत.

शिवाय... मुकेशचा आवाज "हटके" होता हे नक्की.

माझी विशेष आवडती गाणी / गझला .....
चल अकेला चल अकेला
चांद आहे भरेगा
सजन रे झूट मत बोलो
सारंगा तेरी याद में
मुझको इस रात कि तनहाईयां,
सबकुछ सिखा हमने
ओ हो रे ताल मिले

(मुकेशच्या "पवन करे सोर" चा फॅन) ....बबलु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jul 2009 - 9:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोयी जब तुम्हारा र्‍ह्दय तोड दे.....या गाण्याने मला कधी तरी..वेड लावलं होतं ! :)

मुकेशची आठवण दिल्याबद्दल धन्यू......!

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

23 Jul 2009 - 5:53 pm | विसोबा खेचर

अत्यत गुणी गायक...

सलाम..

तात्या.

क्रान्ति's picture

23 Jul 2009 - 10:04 pm | क्रान्ति

गैरफिल्मी भजनं देखिल अतिशय सुरेख आहेत. त्यातलं एक अगदी खास लक्षात राहिलेलं म्हणजे "जिनके हृदय श्रीराम बसे उन और को नाम लियो न लियो"
गझलच्या दुव्याबद्दल खूप खूप धन्यवाद! किती वर्षांनंतर त्या ऐकायला मिळाल्या!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी