अलिप्त

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
16 Jul 2009 - 11:09 pm

का अलिप्त जगणे माझे? मी प्रवाहात का नाही?
परिचित वा आप्त कुणीही या जमावात का नाही ?

दु:खाचे फक्त मुखवटे, अन् मोल दिलेले रडणे
आर्तता, शोक, व्याकुळता या विलापात का नाही ?

पातकी, पतित, पथभ्रष्ट, मूर्तिमंत पाप जरी मी,
कोसळताना पहिल्यांदा तू दिला हात का नाही ?

रुतणा-या कंटकवाटा, जखमी पायांनी फिरणे
एकही सुगंधित थांबा या प्रवासात का नाही ?

का उलटे पडती फासे ? का जिंकुनही मी हरते ?
हा डाव रडीचा इथला संपून जात का नाही ?

गझल

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

17 Jul 2009 - 5:20 am | मदनबाण

रुतणा-या कंटकवाटा, जखमी पायांनी फिरणे
एकही सुगंधित थांबा या प्रवासात का नाही ?
जबरदस्त...

का उलटे पडती फासे ? का जिंकुनही मी हरते ?
हा डाव रडीचा इथला संपून जात का नाही ?

व्वा.

(अलिप्त)
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

टुकुल's picture

18 Jul 2009 - 3:36 am | टुकुल

कविता आवडली...

--टुकुल.

अनिल हटेला's picture

18 Jul 2009 - 11:24 pm | अनिल हटेला

मस्तच !!!

आवडली..... :-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

विशाल कुलकर्णी's picture

17 Jul 2009 - 9:55 am | विशाल कुलकर्णी

पातकी, पतित, पथभ्रष्ट, मूर्तिमंत पाप जरी मी,
कोसळताना पहिल्यांदा तू दिला हात का नाही ?

सुरेख! या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने शोधण्याचा प्रयत्न केला तर जगणे किती सोपे होइल नाही? :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

जागु's picture

17 Jul 2009 - 3:45 pm | जागु

अप्रतिम .

प्राजु's picture

17 Jul 2009 - 9:23 pm | प्राजु

अंगावर आली गं गझल ही!!
खूप सुंदर! शब्द योजना अतिशय सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

18 Jul 2009 - 3:19 am | धनंजय

वेगळीच अंतर्मुख रचना.

(ठेका जमायला मात्र कठिण गेला. पण क्रान्ति यांचे वृत्त नेहमीच नेटके असते, म्हणून माझ्या वाचण्यात काही गडबड झाली असावी.)

क्रान्ति's picture

18 Jul 2009 - 11:12 pm | क्रान्ति

तिस-या द्विपदीमध्ये थोडा कठीण होतो आहे. 'पथभ्रष्ट" या शब्दाला ताणून गुरू करावे लागते, पण अर्थासाठी तेवढी सूट घेतली आहे.
प्रतिसादाबद्दल सगळ्या मिपाकरांना धन्यवाद!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

सुबक ठेंगणी's picture

18 Jul 2009 - 5:39 am | सुबक ठेंगणी

का कोण जाणे पण शब्द वाचून ह्या कवितेतली मी म्हणजे कोणीतरी गुन्हेगार, वाईट मार्गाला लागलेली स्त्री आहे आणि आता तिला नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करायची आहे असं वाटून गेलं.
असंच अपेक्षित होतं का क्रांतितैला?

का उलटे पडती फासे ? का जिंकुनही मी हरते ?
हा डाव रडीचा इथला संपून जात का नाही ?

ह्या ओळी सकारात्मक तरीही नकारात्मक म्हणून विशेष आवडल्या. कदाचित अशा परस्पर विरोधी भावनांना एकत्र गुंफणे हे गझल ह्या प्रकाराचंच हे वैशिष्ट्य म्हणावे का?

पद्मश्री चित्रे's picture

18 Jul 2009 - 8:07 pm | पद्मश्री चित्रे

तुमच्या इतर अनेक गझलांप्रमाणे च खुप सुंदर आहे..

सुरेख ..
गझल आवडली !

विसोबा खेचर's picture

19 Jul 2009 - 9:14 am | विसोबा खेचर

वा वा!

तात्या.