नमस्कार मंडळी,
धाग्याचे शीर्षक बघून कदाचित तुम्ही विचार केला असेल की नाटक्याने नेहमीचा 'साकीया..." अस नेहमीचा विषय न निवडता असा गंभीर विषय का निवडला? आणि जरी तो तसा असला तरी आत स्वत:च्या पुस्तकाबद्दल लिहीले असेल तर ते कॉकटेल संबधीचेच असावे. खरं तर मला त्या विषयावर पण पुस्तक लिहायची ऑफर आपल्याचा एका मिपाकरांनी दिली होती. तर ते असो..
मी सध्या एका इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करायला घेतला आहे. मुळ पुस्तकाचे नाव आहे "Physics of the Impossible" (http://www.amazon.com/Physics-Impossible-Scientific-Exploration-Teleport...) आणि लेखक आहेत डॉ. मिचीओ काकू. या पुस्तकात सध्या वैज्ञानिक जगतात सुरू असलेल्या संशोधनाचा आढावा घेण्यात आला असून हे संशोधन आपल्या भविष्यातील तंत्रज्ञानावर कसा प्रभाव टाकू शकेल याचा मागोवा घेते. या मराठी पुस्तकाचे नाव मी सध्या तरी "संभव? असंभव? - भविष्यातील तंत्रज्ञानाचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला वेध" असे ठेवले आहे. पुण्यातील खातनाम मराठी प्रकाशक, मेहता पब्लिशिंग हाऊस याचे प्रकाशन करणार आहेत. बहूदा नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान याचे प्रकाशन होईल असा अंदाज आहे. या पुस्तकाचे मुख्यपृष्ठ कसे असावे या साठी मी काही डिझाईन्स तयार केली आहेत. त्या पैकी कोणते तुम्हाला जास्त आवडते ते कळवलेत तर उत्तम.
या पुस्तकासाठी आपले मिपाकर "३_१४ आदिती" आणि श्री. श्रावण मोडक यांचे बहुमोल सहकार्य मला मिळाले आहे त्या बद्दल त्यांचे शतशः आभार.
या पुस्तकासंबधी काही सुचना/चर्चा करावयची असल्यास त्याचे स्वागतच आहे.
काही मुखपृष्ठाचे नमुचे:
रोबो स्त्री: ही स्त्री रोबो दाखवण्यामागची कल्पना अशी आहे की भविष्यात कदाचित तंत्रज्ञान इतके पुढे जाईल की रोबोला भावना असू शकतील. ही स्त्री विचार करते आहे, तिला लज्जा आहे (कपडे घातले आहेत). कदाचित ती आपल्यासारख्या दुसर्या रोबोला जन्म देऊ शकेल?
रोदाँचा जगप्रसिध्द पुतळा: रोबो एखाद्या तत्वज्ञाप्रमाणे विचार करू शकेल?
भविष्यातील क्वांट्म आणि फोटॉनिक्स वर आधारलेला संगणक
अंतराळातील खेळः आपण स्केटींग/सर्फींग सारखे खेळ खेळतो. तसेच अंतराळात भविष्यात खेळता येतील?
आणखी एक चित्र मला आंतरजालावर शोध घेताना सापडले ते मला जास्त संयुक्तीक वाटले जे भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दलचे चित्रण करते. मला वाटते या चित्रा बद्दल कसल्याही भाष्याची अथवा स्पष्टीकरणाची गरज नाही.
धन्यवाद...
नाटक्या (माधव कर्हाडे)
प्रतिक्रिया
17 Jul 2009 - 5:30 am | नंदन
आगामी पुस्तकाबद्दल शुभेच्छा आणि अभिनंदन! वैज्ञानिक तत्त्वे समजावून सांगणार्या अनेक व्हिडिओंत डॉ. मिचिओ काकूंना पाहिले होते, त्यांचे पुस्तक मराठीत येते आहे हे फारच छान. या मुखपृष्ठांपैकी दुसरे, थिंकरचे मुखपृष्ठ सर्वात अधिक प्रभावी/सूचक वाटले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Jul 2009 - 5:40 am | रेवती
हेच म्हणते. दुसरे चित्र.
आपल्याला शुभेच्छा!
रेवती
17 Jul 2009 - 5:47 am | घाटावरचे भट
दुसरे चित्रच उत्तम. शिवाय आपल्या पुस्तकासाठी हार्दिक शुभेच्छा!!
- भटोबा
17 Jul 2009 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>दुसरे चित्रच उत्तम. शिवाय आपल्या पुस्तकासाठी हार्दिक शुभेच्छा!!
-दिलीप बिरुटे
9 Sep 2010 - 6:09 pm | मराठमोळा
लिहायला गेलो आनि बल्ल्या झाला...
एक पान टंकुन झाल्यावर.. मिपावर "page can not b displayed" चायला...
जाऊ द्या........
अभिनंदन :)
17 Jul 2009 - 5:33 am | बबलु
२ रे, ३ रे आणि ४ थे डिझईन्स बेष्ट.
....बबलु
17 Jul 2009 - 5:34 am | मदनबाण
पुण्यातील खातनाम मराठी प्रकाशक, मेहता पब्लिशिंग हाऊस याचे प्रकाशन करणार आहेत. बहूदा नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान याचे प्रकाशन होईल असा अंदाज आहे.
वॉव. :)
मला ३रे चित्र जास्त आवडले.
(वाचक)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
17 Jul 2009 - 6:01 am | चतुरंग
अशा नवीनतम विषयावरचं पुस्तक तुम्ही अनुवादित करीत आहात ही अतिशय कौतुकाची आणि आनंदाची बाब आहे! :)
उत्तम पुस्तक लवकरात लवकर बाजारत येवो अशा शुभेच्छा!
तुम्ही केलेल्या चित्रांपैकी दुसरे चित्र मला सर्वात जास्त सूचक वाटले.
परंतु अधिक विचाराअंती चौथेसुद्धा चालेल.
(रोबॉट)चतुरंग
17 Jul 2009 - 6:09 am | स्वाती२
अभिनंदन आणि पुस्तकासाठी शुभेच्छा!
मला दुसरे चित्र आवडले.
17 Jul 2009 - 6:28 am | बेसनलाडू
३र्या व ४थ्या चित्राला.
या पुस्तकाच्या भरघोस यशासाठी हार्दिक शुभेच्छा!
(वाचनोत्सुक)बेसनलाडू
17 Jul 2009 - 6:39 am | दिपाली पाटिल
पुस्तकासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा. मला तिसरे आणि चौथे जास्त आवडले, पण +१ चौथ्यासाठी.
दिपाली :)
17 Jul 2009 - 6:55 am | सहज
कर्हाडेसाहेब अभिनंदन. काकूकाकांना डिस्कव्हरी, नॅटजिओ यावर अनेक कार्यक्रमातून पाहीले आहे. एक कॉपी माझ्यासाठी ठेवा नक्की [पैसे कुठे पाठवू?] नाहीतर दुसर्या आवृत्तीपर्यंत वाट पहायला लागायची. :-) अभिनंदन!
मुखपृष्ठ क्रमांक ४ [अंतराळातील खेळः] पसंती. तरुण वाचकांना आवडेल असे वरील एकमेव चित्र.
17 Jul 2009 - 7:17 am | विंजिनेर
पुस्तक प्रकाशनाबद्दल शुभेच्छा!
दुसरे नमुना मुखपृष्ठ आवडले. पण मजकुराचा फाँट विषयाशी अधिक समर्पक निवडला तर आवडेल.
17 Jul 2009 - 8:06 am | नीधप
हेच.. दुसरे आवडले. फाँटवर विचार करावा.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
17 Jul 2009 - 8:05 am | क्रान्ति
पुस्तक प्रकाशनाबद्दल हार्दिक शुभेच्छा. मलाही दुसरे चित्र योग्य वाटते.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
17 Jul 2009 - 8:14 am | प्राजु
अरे वा!!
याच पुस्तकाबद्दल आपण बोललो होतो ना? बरं झालं ..खूप छान!
आपल्या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा!
२ रे चित्र खूप छान आहे कव्हरसाठी. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Jul 2009 - 1:48 pm | जागु
नाटक्या तुमच्या भावी पुस्तकाला मनःपुर्वक शुभेच्छा.
17 Jul 2009 - 8:18 am | प्रमोद देव
कर्हाडे साहेब, मला दुसरे आणि चौथे चित्र योग्य वाटतंय.
तुमच्या ह्या प्रकल्पाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
17 Jul 2009 - 8:39 am | अडाणि
प्रामाणिक मत... पहिले आवडले... ३ व ४ मधे रंगसंगती अशी आहे कि तुमचे नाव ठिक दिसत नाहीये....
कल्पकते वरून ही पहिले चित्र जास्त आवडले... चित्र क्र. २ ईतक्या ठिकाणी बघीतले आहे कि ते आता 'घिसे-पीटे' झाले आहे....
-
अफाट जगातील एक अडाणि.
17 Jul 2009 - 8:56 am | विसोबा खेचर
पहिलं चित्र अधिक कल्पक वाटलं..
माधवशेठ, तुमचं कौतुक वाटतं. प्रकल्पाकरता शुभेच्छा...
तात्या.
17 Jul 2009 - 9:25 am | दिपक
चौथे आवडले. तुमच्याबरोबर श्रावणरांवाचे आणि अदितीताईंचे अभिनंदन आणि तुमच्या ह्या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा :)
17 Jul 2009 - 9:33 am | विशाल कुलकर्णी
पहिलं किंवा तिसरं चित्र जास्त सुट होइल. दुसरं पण ठिक आहे, पण ते खुप ठिकाणी वापरले गेलेय. तिसरं मला जास्त आवडलं. असो..
खुप महत्वाचं कार्य करताय, मनापासुन शुभेच्छा !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
21 Jul 2009 - 12:49 pm | महेश हतोळकर
मला दुसरे चित्र जास्त आवडले. मागणी कुठे नोंदवु?
ता.क.: नवीन टाकलेले पाचवे चित्र नाही आवडले. मानव तंत्रज्ञानावर अवलंबून असलेला नाही आवडत. निसर्गात ढवळाढवळ न करता केलेली नवनिर्मीतीच जास्त भावते.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------
17 Jul 2009 - 9:51 am | निखिल देशपांडे
पुस्तका बद्दल शुभेच्छा आणि अभिनंदन, मला दुसरे व चौथे चित्र चांगले वाटते
==निखिल
17 Jul 2009 - 10:40 am | श्रावण मोडक
क्रमांक ४ चे चित्र.
लेखक - मिचिओ काकू असे नको. पुस्तकाचे शीर्षक, तळवा झाल्यानंतर थेट "मिचिओ काकू" एवढेच नाव आत्तापेक्षा थोड्या मोठ्या आकारात घ्या. "अनुवाद..." आणखी खाली आला तरी चालेल. शीर्षकात केलेला खेळ आवडला. फॉण्ट अर्थातच तुम्ही आत्ता युनिकोडचा मंगल घेतलेला दिसतो. मेहतांकडे गेल्यानंतर तो बदलेलच. श्रीलिपीतील येईल किंवा कदाचित सुलेखनातील येईल.
शुभेच्छा.
17 Jul 2009 - 11:02 am | रवि
३ र मस्तच आहे, त्यानंतर चित्र क्र. २ ........
रवि
अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
एक नजर इकडेही टाका
17 Jul 2009 - 11:11 am | आनंदयात्री
अभिनंदन .. दुसरे किंवा तिसरे यापैकीच एक चित्र निवडावेही आग्रहाची मागणी.
17 Jul 2009 - 11:39 am | स्वाती दिनेश
अभिनंदन आणि पुस्तकासाठी शुभेच्छा!
दुसरे चित्र निवडावेत असे वाटते,
स्वाती
17 Jul 2009 - 12:09 pm | leo nardo di caprio
मला ३रे चित्र आवडले.
४थे चित्र प्रभाव पाडू शकत नाहि,माझ्या मते.
17 Jul 2009 - 12:24 pm | आशिष सुर्वे
तुमच्या पुस्तकासाठी मनापासून शुभेच्छा
माझ्या मते चौथे चित्र हे पुस्तकाबद्दल बर्यापेकी उत्सुकता निर्माण करते..
पुस्तक वाचायला नक्की आवडेल!
-
कोकणी फणस
17 Jul 2009 - 12:29 pm | ऋषिकेश
अरे वा! अभिनंदन! आणि शुभेच्छा!
मला पहिले चित्र आवडले
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
17 Jul 2009 - 2:27 pm | विमुक्त
तीसरा भारि आहे.... १, २ आणि ४ फारच साधी वाटत्यायत..... पण अ वर मारलेलि फुल्लि नीट नाहि वाटत....
17 Jul 2009 - 2:42 pm | शाल्मली
तुमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!
वरील मुखपृष्ठांमध्ये मला दुसरे चित्र आवडले आहे. सुसंगत कल्पना आणि काळ्या पार्श्वभूमीवर पिवळा पुतळा उठून दिसतो आहे.
तुम्ही कोणते मुखपृष्ठ अखेरीस निवडाल ते आम्हाला जरुर सांगा..
--शाल्मली.
17 Jul 2009 - 2:49 pm | बिपिन कार्यकर्ते
वा!!! शुभेच्छा!!! पुस्तक कधी येतंय नक्की ते सांगा. वाचायला आवडेल नक्की.
मुखपृष्ठाबद्दल. माझ्या मते मुखपृष्ठामुळे वाचकाची उत्सुकता चाळवली गेली पाहिजे. त्याला पुस्तकाबद्दल कळावे पण एवढेच की तो ते उचलून उत्सुकतेने हातात घेऊन पानं चाळेल. बास. विकत घेईल की नाही हे ते पुस्तक चाळताना त्याचा दृष्य परिणाम कसा आहे, विषय काय आहे, लेखक कोण आहे वगैरे वर अवलंबून असते. पण मुपृचे काम एवढेच मर्यादित आहे. त्या दृष्टीने विचार करता:
पुस्तकाचे नाव आहे असंभव. अ वर काट मारली आहे. म्हणजे आज जे असंभव आहे ते उद्या संभव होईल नक्की असे म्हणायचे असावे पुस्तकाला. पहिल्या चित्रात जी काही बाई आहे किंवा दुसर्या चित्रातला 'द थिंकर', त्यामुळे हा संभव / असंभव चा रेफरन्स येत नाही ध्यानात पटकन. म्हणून बाद. तिसर्या चित्रात काय म्हणायचे आहे नक्की तेच कळत नाही. फार तर हे पुस्तक काही तरी वैज्ञानिक विषयावर आहे बॉ अशी जाणिव होते पण परत तेच... संभव / असंभव चा रेफ नाही येत. चौथे चित्र पण तसेच. स्पेसवॉक आजकाल रूटिन झाला आहे पब्लिकच्या दृष्टीने.
माझी सूचना: चौथे चित्र थोडेसे बदलावे. ते अंतराळवीर नुसते तरंगताना न दाखवता .... त्यांचा पोषाख अगदी लाईट म्हणजे कमी बल्की आणि ते अंतराळात एखादी नॉर्मल अॅक्टीव्हिटी करत आहेत अथवा काही खेळ खेळत आहेत असे काही दाखवता आले तर? नवीन प्रकारच्या पोषाखामुळे आज अंतराळात वावरताना जो जड पोषाख घालावा लागतो तो लागणार नाही भविष्यात असे सूचित करता येईल आणि एखादा खेळ किंवा अंतराळवीरांच्या हातात हॉकी स्टिक वगैरे दाखवली तर अंताराळात नॉर्मल आयुष्य व्यतीत करता येईल पुढच्या काळात असे सूचित करता येईल.
बिपिन कार्यकर्ते
17 Jul 2009 - 2:56 pm | सूहास (not verified)
सर्वा॑त पहिले अभिन॑दन...
ही माझी काही वैयक्तीक मते..
१) ई॑ग्रजी पुस्तकात रोबोट्स विषयी, केवळ एकच, धडा म्हणा कि॑वा चाप्टर म्हणा, आहे..म्हणुन मला पहिली दोन चित्रे घेण तितकस समर्पक वाटत नाही...मुखपृष्ठावर केवळ रोबोट दिसल्यावर, पुस्तक केवळ त्या विषयावरच आहे असा एक गैरसमज होण्याचा धोका आहे असे मला वाटते..त्यामुळे चित्र क्र॑माक एक वा दोन ला माझे मत मी देत नाही
२) चित्र क्रमा॑क ४, थोडस "कॅज्युवल" वाटत.पुस्तकाच्या विस्तृत "साय-फाय" वातावरणाला ते सुट होईल असे वाटत नाही...
३) चित्र क्र. ३ मात्र तशी वातावरण निर्मीती करु शकते..त्यात ही एक छोटी गोम आहे.."आय, रोबोट" नावाच्या ईग्र॑जी चित्रपटात, असाच पण वर्तुळाकार क्वांट्म आणि फोटॉनिक्स वर आधारलेला संगणक आहे..पण तुर्तास तरी, परिणाम साधण्याकरिता त्याच्या ऊपयोग नक्की होऊ शकतो.
तुमच्या भावी पुस्तकाला मनापासुन शुभेच्छा..
<<<या पुस्तकासाठी आपले मिपाकर "३_१४ आदिती" आणि श्री. श्रावण मोडक यांचे बहुमोल सहकार्य मला मिळाले आहे त्या बद्दल त्यांचे शतशः आभार. >>>
अदितीताई आणी मोडका॑चे ही अभिन॑दन....
सुहास
17 Jul 2009 - 3:16 pm | लिखाळ
सर्वप्रथम आपल्या उपक्रमास अनेकोत्तम शुभेच्छा !!
मला पहिले आणि दुसरे चित्र आवडले. पण पहिल्यामध्ये आपल्याला जे सांगायचे आहे ते आपण चित्रासोबत लिहिलेल्या मजकुरामुळे समजले. दुसरे चित्र मात्र लगेच मनावर ठसले.
माझे मत दुसर्या चित्राला.
एक सुचवणी - पुस्तकाची बांधणी डाव्या बाजूला असते आणि पाने उजव्या बाजूला मोकळी असतात. आपल्या मुखपृष्ठावरचा यंत्रमानवाचा चेहरा जर उजवीकडे येणारा असेल तर मला तो जास्त आकर्षक वाटेल. म्हणजे थिंकरची पाठ डाविकडे (बांधणीकडे).
शुभेच्छा !
-- लिखाळ.
17 Jul 2009 - 7:11 pm | सुबक ठेंगणी
आणि उपक्रमास मनापासून शुभेच्छा!
मुखपृष्ठाच्या बाबतीत लिखाळसाहेबांशी सहमत.
पहिले आणि दुसरे मुखपृष्ठ फक्त विज्ञानाशी संबंधित वाचकच नव्हेत तर माझ्यासारख्या सामान्य वाचकांपर्यंत पोचणारे वाटले.
श्रावण मोडक व अदितीचेही अभिनंदन!
17 Jul 2009 - 3:34 pm | धमाल मुलगा
नाटक्याबुवा, बरीच वेगवेगळी नाटकं करता की! :)
हार्दिक शुभेच्छा!
मुखपृष्ट संरचनेबाबतः
१. माझं मत [भविष्यातील क्वांट्म आणि फोटॉनिक्स वर आधारलेला संगणक] ह्याला.
२. असंभव शब्दामधल्या 'अ'वर जी फुली आहे त्याऐवजी 'नो एंट्री'ची पाटी असते किंवा 'नो स्मोकिंग'ची त्यापध्दतीने एकच तिरपी रेष जरा जाड आकारातली आणि त्याभोवतीचे वर्तुळाची जाडीही त्या रेषेच्या मापाची आले तर जास्त परिणामकारक दिसेल असा माझा अंदाज आहे.
----------------------------------------------------------------------------------------
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
17 Jul 2009 - 3:36 pm | मोहन
माधवराव
आपले अभिनंदन आणि शुभेच्छा.
क्र. ३ चे मुखप्रुष्ठ आवडले.
मिपाकरांकरता प्रकाशनपूर्व सवलत मिळणार काय? :)
मोहन
17 Jul 2009 - 4:02 pm | दशानन
नाटक्या तुमच्या भावी पुस्तकाला मनःपुर्वक शुभेच्छा.
17 Jul 2009 - 4:43 pm | परिकथेतील राजकुमार
महाराज अभिनंदन हो :)
दुसरे चित्र उत्तम आहे.
नाटक्याबुवांचा शिष्य
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
17 Jul 2009 - 8:03 pm | प्रकाश घाटपांडे
दुसरे चित्र अधिक भावले. शीर्षक सुंदर आहे. बाकी पुस्तकामुळे आपल्याविषयी आदरयुक्त दडपण वाढले
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
17 Jul 2009 - 11:35 pm | एक
आयडिया बरेच दिवस घोळत होती अखेर पूर्णत्त्वास नेलीस तर! जबरी..
मला ३ नंबर चं चित्र जास्त आवडलं. चौथं चित्र लहान मुलांसाठी लिहिलेल्या विज्ञान पुस्तकांसारख (बाळ फोंडके, इ.) वाटतं.
१ ल्या नंबरच्या चित्रात तुला जो मेसेज द्यायचा आहे तो मला पहिल्यांदा चित्र बघितलं तेव्हा कळला नाही. आशय वाचला आणि मग ते चित्र पटलं (अर्थात हे माझ्या आकलनशक्तीच्या मर्यादेमुळे झालं असण्याची दाट शक्यता आहे.)
३ रं चित्र १ ल्या किंवा २ र्या सारखा मेसेज देत नाही पण त्यात दिसणार्या समीकरणांमुळे, रंगसंगती, ग्राफिक्स मुळे (जश्या डिस्कव्हरीच्या एपिसोडस मधे वापरले असतात) हे काहीतरी हाय-फाय वैज्ञानिक पुस्तक आहे हा मेसेज पटकन मिळतो.
त्यामुळे आमचं मत ३ र्या ला.!!
-(प्रकाशना नंतर ऑथर-साईन्ड कॉपी मिळेलच याची खात्री असलेला) एक.
18 Jul 2009 - 12:37 am | पक्या
दुसरे आणि चौथे छान वाटत आहे.
पुस्तक प्रकाशनासाठी हार्दिक शुभेच्छा !
18 Jul 2009 - 2:13 am | अश्विनीका
मला पण दुसरे आवडले. पण चित्रावरून पटकन मेसेज मिळत नाहिये.
त्यापेक्षा चौथे योग्य वाटेल.
भावी पुस्तकासाठी शुभेच्छा !
- अश्विनी
18 Jul 2009 - 2:59 am | पिवळा डांबिस
मला #२ अधिक भावलं.
विज्ञानाची जी काही प्रगती आहे ती मानवाने त्याच्या थिंकींगमधून केली आहे या अर्थी...
फक्त धमाल्याने म्हटल्याप्रमाणे त्या अ वरची फुली काढून तिथे नो एन्ट्रीसारखे चिन्ह लावता आहे तर जास्त चांगलं दिसेल...
पुस्तकाबद्दल अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!
एक अनाहूत सल्ला: पुस्तकाच्या गॅलीज स्वतः बारकाईने वाचून पहा. अगदी काना-मात्रा-वेलांटीसकट!!! दुसर्या कुणावरही विसंबून राहू नका. नाहीतर तुमच्या सोन्यासारख्या पुस्तकाची मुद्रक/प्रकाशक वाट लावण्याची शक्यता नाकारता येत नाही....
अनुभवी,
पिवळा डांबिस
19 Jul 2009 - 11:44 am | श्रावण मोडक
सहमत. लय मोलाचा सल्ला.
18 Jul 2009 - 4:49 am | फारएन्ड
प्रथम याबद्दल अभिनंदन. पुस्तक उपलब्ध झाल्यावर वाचण्याची उत्सुकता नक्कीच आहे.
मला दुसरे किंवा चौथे चित्र जास्त आवडले. त्यातही चौथे. ते खूप कुतूहल निर्माण करते.
18 Jul 2009 - 10:42 am | वेताळ
खुपच सुंदर कल्पना आहे तुमची.अशीच सर्वोत्तम पुस्तके मराठी आणण्यासाठी प्रयत्नशील रहा. परत एकदा मनपुर्वक अभिनंदन.तुमच्या पुस्तकाची वाट पहात आहे.
सर्व मुखपृष्ठे एकदम झक्कास आहेत. चीनचा झेंडा काढुन आपल्या भारताचा लावता आला तर खुपच उत्तम.
वेताळ
18 Jul 2009 - 3:22 pm | आबा
खुपच मोठ काम करता आहात तूम्ही,,
विज्ञानवरचि पुस्तके मराठीत फारच कमी आहेत
तुमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!
...मुखपृष्ठाबाबत विचाराल तर मला शेवटची दोन आवडली.
18 Jul 2009 - 3:22 pm | आबा
खुपच मोठ काम करता आहात तूम्ही,,
विज्ञानवरचि पुस्तके मराठीत फारच कमी आहेत
तुमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!
...मुखपृष्ठाबाबत विचाराल तर मला शेवटची दोन आवडली.
18 Jul 2009 - 4:54 pm | सुनील
#३ (वजा चीनचा झेंडा) उत्तम.
पुस्तकाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Jul 2009 - 5:17 pm | नितिन थत्ते
मला दुसरे चित्र समर्पक वाटते.
तिसरे चित्र उगाच जॅझी झाल्यासारखे वाटते. तसेच त्यात फार गणित दिसतंय. वाचकांना घाबरवून रिपेल करू शकेल. चौथ्या चित्रात आपली जी कल्पना आहे अंतराळात खेळ खेळण्याची ती तितकीशी क्लिअर होत नाही.
पहिलं चित्र पटलं नाही.
अर्थात पुस्तकासाठी शुभेच्छा. माझ्या कॉपीची मागणी आत्ताच नोंदवून ठेवतो. किंमत जी असेल ती; पण कितीही पाने असली तरी १५० रु पेक्षा जास्त ठेवू नये असे वाटते.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
23 Jul 2009 - 2:45 pm | JAGOMOHANPYARE
तिसरे छान आहे....
23 Jul 2009 - 5:54 pm | सागर
माधवभाऊ ,
पुस्तकाच्या यशासाठी मनापासून शुभेच्छा...
मेहता पब्लिशिंग हाऊस हे पुस्तक प्रकाशित करणार आहे त्यामुळे पुस्तकाच्या यशाबद्दल पूर्ण खात्री आहे :)
तुमच्याबरोबरच आदिती ताई आणि श्री. श्रावण मोडक साहेब या दोघांचेही खास अभिनंदन की हे पुस्तक आकारास येण्यास या दोघांचे सहकार्य तुम्हांस लाभले.
पुस्तकात देखील या दोघांचा नामोल्लेख असेन याची खात्री वाटते
मनापासून शुभेच्छा
सागर
23 Jul 2009 - 6:17 pm | श्रावण मोडक
आहे ते पुस्तक. नामोल्लेख दुय्यम. एरवीही इथे माझे अभिनंदन झाल्याने संकोच झाला आहेच. मी फार काही करीत नाहीये.
23 Jul 2009 - 5:56 pm | सागर
४ क्रमांकाचे चित्र जास्त योग्य राहिन पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी
अजून पर्याय देणार असाल तर एक सूचना
सगळी चित्रे कौल या सदराखाली द्या
म्हणजे निवड करणे तुम्हालाही सोपे आणि वाचकांनाही सोपे :)
9 Sep 2010 - 2:04 pm | सागर
कृपया माहिती द्या. म्हणजे जिज्ञासूंना घेता / वाचता येईल पुस्तक
9 Sep 2010 - 5:54 pm | विलासराव
३ रे (झेंडा काढुन)
किंवा
४थे बिका म्हण्तात तसा काहीसा बदल करुन.
बाकी आम्ही पुस्तक वाचुच.
1 Oct 2010 - 10:58 pm | डावखुरा
पुस्तकावरची (मुखपृष्ठावर्ची)चर्चा वाचुन पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाटत आहे....
कुठे मिळेल?
कोणत्या प्रकाशनाने प्रकाशित केलय?