रानभाज्या- टाकळा

जागु's picture
जागु in पाककृती
16 Jul 2009 - 12:33 pm

कुरडूची भाजी - http://www.misalpav.com/node/8533
कंटोळी - http://www.misalpav.com/node/8546

लागणारे जिन्नस:
टाकळ्याच्या ३-४ जुड्या (पाने खुडावीत व धुवुन चिरून घ्यावीत)
२ कांदे चिरुन
२-३ मिरच्या
३-४ लसुण पाकळ्या ठेचुन
पाव चमचा हिंग
पाउण चमचा हळद
चवी पुरते मिठ
अर्धा चमचा साखर
पाव वाटी खवलेले ओल खोबर
२ मोठे चमचे तेल.

क्रमवार पाककृती:
तेल गरम करुन त्यात लसूण पाकळ्या व मिरची घालावी. जरा परतवून कांदा घालावा. लगेच हिंग हळद घालून परतवावे व चिरलेला टाकळा घालावा. (हा टाकळा तव्यावर भाजून मग भाजी करण्याची ही पद्धत आहे. पण मी न भाजताच करते) झाकण ठेउन थोडावेळ भाजी शिजू द्यावी. थोड्या वेळाने मिठ व साखर घालावी. जरा परतवून २-३ मिनीटे शिजू द्यावी. नंतर ओल खोबर खालून परतवून गॅस बंद करावा.

अधिक टिपा:
आंबट आवडत असल्यास थोडा लिंबू पिळावा, तसेच ह्यात डाळीही घालता येतात.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

16 Jul 2009 - 12:40 pm | अवलिया

वा ! मस्त !!

--अवलिया
=============================
क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)

चिरोटा's picture

16 Jul 2009 - 12:45 pm | चिरोटा

शाळेत असताना ज्या भाज्या बळजबरीने खायच्या डब्यात दिल्या जायच्या त्यातली ही एक भाजी. ही भाजी गरमच मस्त लागते.थंड झाली की त्यातली मजा संपली.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

सहज's picture

16 Jul 2009 - 12:54 pm | सहज

मेथीच्या भाजी सारखीच दिसते आहे. :-)

धन्यु.

रेवती's picture

16 Jul 2009 - 5:40 pm | रेवती

हेच म्हणते. आधी वाटले की चुकून मेथीच्या भाजीचा फोटू चढवलाय!
कृती एकदम साधी आणि सोपी!

रेवती

प्राजु's picture

16 Jul 2009 - 8:46 pm | प्राजु

मेथीचीच भाजी आहे की काय?
पाकृ छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

16 Jul 2009 - 6:15 pm | मदनबाण

ह्म्म...एका वेगळ्याच नावाची भाजी. :)

(मदनबुवा टाकळीकर)

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jul 2009 - 9:21 pm | बिपिन कार्यकर्ते

जागुताई, पालेभाज्या एकदम वीकपॉइंट आहे हो आमचा... तुम्ही काय काय मस्त नवीन नवीन प्रकार टाकताय!!! धन्यवाद. खायला कधी मिळेल काय माहित. :)

बिपिन कार्यकर्ते

चकली's picture

16 Jul 2009 - 9:48 pm | चकली

एवढ्या छान भाज्यांची ओळख केलीत..धन्यवाद
चकली
http://chakali.blogspot.com

पाले भाज्यांच्या ह्याच कुला मधील " घोळ" नावची पालेभाजी माहित आहे काय ?

हे छायाचित्र / भाजी छानच....

सुनील's picture

17 Jul 2009 - 7:02 am | सुनील

घोळ नावाची पालेभाजीदेखिल असते हे ठाऊक नव्हते. घोळ नावाचा मासा असतो, हे मात्र खरे!

बाकी जागु तुम्ही रानभाजी मालिका चालूच ठेवा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

gaikiakash's picture

16 Jul 2009 - 11:53 pm | gaikiakash

ह्याला ईकडे (us) verdulaga असे नाव आहे. Mexican किवा ethnic stores मध्ये मिळते. विदर्भात ही भाजी उन्हाळ

http://dev.gourmetsleuth.com/Dictionary/V/verdulaga-7047.aspx

पक्या's picture

17 Jul 2009 - 12:32 am | पक्या

छान लेखमाला.
एक 'मायाळू' नावाची पण पालेभाजी असते ना. त्याबद्दल माहित असल्यास ती पण रेसिपी टाका.
आमच्याकडे हरभर्‍याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. बहुतेक वेळा ती भाजी वाळवलेल्या स्वरूपात मिळते. ती पण काय टेस्टी लागते !

जागु's picture

17 Jul 2009 - 10:57 am | जागु

मायाळूची पालेभाजी १२ महिने मिळते. त्याचा भला मोठा वेल पसरतो. त्याची भजी आणि पिठ पेरुन भाजी करतात. मला मिळाल्यावर मी टाकेन रेसिपी.

सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी ही लेखमाला पुढे नेउ शकते.

दिपाली पाटिल's picture

17 Jul 2009 - 3:48 am | दिपाली पाटिल

लागते ही भाजी ,आई तुरडाळ घालुन करायची. आम्ही शिळफाट्या कडच्या डोंगरावर ही भाजी आणायला जायचो तिथे एक सुंदर शंकराचं मंदिर आहे.

घोळी ची भाजी पिठल्यात वापरतात किंवा पिठ पेरुन करतात, खानदेशात एक वड्या करतात, त्यात ही वापरतात, त्यांना आम्ही "भेंडके " म्हणतो, त्यात भिजवलेली तुरडाळ भरड वाटुन ही कापलेली भाजी +कांदा+आलं+लसुण+मिरची + धने-जीरे पावडर +मिठ टाकुन वाफवुन बनवतात. कढीबरोबर मस्त लागतात. घोळी ची भाजी थोडी चिकट आणि किंचित आंबटसर असते पण बरी लागते.

दिपाली :)

आशिष सुर्वे's picture

17 Jul 2009 - 11:42 am | आशिष सुर्वे

जागु ताई,
नेहमीप्रमाणेच झ्याक पाककृती.. आमच्या आईची आवडती भाजी आहे ही!

कवळ्याच्या भाजीची पाककृती पण येऊदेत जमल्यास...
-
कोकणी फणस

जागु's picture

17 Jul 2009 - 11:59 am | जागु

सहज, रेवती ही भाजी मेथीसारखी मिटल्या मुळे दिसते फोटो संध्याकाली काढला त्यामुळे त्याची पाने मिटलेली आहेत. ह्याची पाने संध्याकाळी मिटतात. परत मिळाल्यावर उमललेला फोटो टाकेन.

मराठा कवळयाची भाजी अजुन खुप बारीक आहे. ७-८ दिवसांत येईल तेंव्हा टाकते रेसिपी.

ठकू's picture

17 Jul 2009 - 8:31 pm | ठकू

टाकळ्यात चण्याची भिजलेली डाळ किंवा मुगाची डाळ घालून भाजी बनवली तर खूप चविष्ट लागते.

लहानपणी पावसाळ्यात उपवन येऊरच्या दिशेला फिरायला गेलं की हमखास ही भाजी मिळायची. मी, भाऊ अगदी मजेने ही भाजी खुडायचो. पिशवीभर तरी भाजी आम्ही घरी घेऊन जायचोच.

-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

सूहास's picture

17 Jul 2009 - 8:39 pm | सूहास (not verified)

"चिगुरा"ची ही पाककृती टाकु शकाल ??

सुहास

प्रदीपा's picture

16 Jun 2010 - 2:11 pm | प्रदीपा

घोळाची भाजी,.... जरा जपुन... ती नीट साफ करावी लागते... बारिक नजरेने बघावी म्हणजे त्यात असलेल्या बारिक किडी दिसतात.