साहित्य :
३-४ जुड्या कुरडूची पाने खुडून, धुवून (तिन ते चार पाण्यात धुवावीत)
२ कांदे बारीक चिरुन
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
२-३ मिरच्या चिरुन
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
१ टोमॅटो बारीक चिरुन
पाव वाटी ओल खोबर करडवुन
चवी पुरते मिठ
अर्धा चमचा साखर
२ चमचे तेल
क्रमवार पाककृती:
भांड्यात तेल गरम करुन लसूण, मिरची फोडणीला टाकावी मग हिंग, हळद, कांदा घालून जरा परतवावे. आता लगेच टोमॅटो आणि कुरडूची चिरलेली भाजी टाकावी. मग झाकण ठेउन जरा शिजू द्यावे. थोड्या वेळाने ढवळून त्यात मिठ, साखर घालावी. परत ढवळून ३-४ मिनीटांनी ओल खोबर घालाव व गॅस बंद करावा.
अधिक टिपा:
ही भाजी डोंगरात मिळते. बाजारात कातकरणी घेउन येतात. चव साधारण माठाच्या भाजी प्रमाणेच असते. ह्यात चणाडाळ, मुगडाळ घालुनही ही भाजी करता येते. टोमॅटोच्या ऐवजी अर्धा लिंबूही चालेल.
प्रतिक्रिया
14 Jul 2009 - 12:36 pm | पर्नल नेने मराठे
ही माठाची भाजि आहे का :-?
चुचु
14 Jul 2009 - 12:38 pm | सुनील
मस्त. पावसाळ्यात अशा काही खास गावरान भाज्या मिळतात. अतिशय रुचकर. भारंग्याची भाजीदेखिल त्यातीतल एक.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Jul 2009 - 9:22 pm | अनंत छंदी
भारंगीची भाजी पोटाला उत्तम, चवीला कडवट असली तरी जरूर खावी.
(वैद्यबुवा) अनंत छंदी
================================
तोंडाला पाणी सुटल्याची स्मायली नाही का? का नाही? :?
14 Jul 2009 - 1:30 pm | रामदास
केना कुर्डुची भाजी हीच का ?
अवांतर : अपरात्री तीन वाजता ही भाजी का करायची ?
14 Jul 2009 - 1:38 pm | अवलिया
कावळ्याची नजर आहे रामदासशेटची !
अंमळ हिरवटच दिसतोय म्हातारा :)
अवांतर - पाकृ छान आहे.
--अवलिया
=============================
सत्य आणि भास यात फरक काय?
भासातले सत्य भास असु शकते.
भासातला भास हा सत्य असु शकतो.
सत्यातल्या भासात सत्य असु शकते.
सत्यातले सत्य भास असु शकते.
तेव्हा सत्य आणि भास हे भास आणि सत्य पण होवु शकतात.
14 Jul 2009 - 1:41 pm | विसोबा खेचर
म स्त च!
तात्या.
14 Jul 2009 - 1:53 pm | जागु
मराठे ताई आहो वरती भाजीच नाव लिहलय तरी माठाची का विचारता ? चविला लागते ही माठा सारखी.
रामदास कॅमेरामध्ये टाईम सेट केला नाही म्हणून तो टाईम डिस्प्ले झाला आहे. तशी ही भाजी मी रात्री ८.३० ला केली होती.
सुनिल भारंगीचीही २ दिवसांनी टाकते रेसिपी.
14 Jul 2009 - 2:18 pm | पर्नल नेने मराठे
अगो जागु :T २रे नाव असु शक्ते ना
चुचु
14 Jul 2009 - 2:24 pm | जागु
मराठे, नाही ग ही भाजी डोंगरात मिळते. कातकरी आणतात ही भाजी विकायला. त्याला कुरडूच म्हणतात.
14 Jul 2009 - 2:05 pm | अनंत छंदी
ही भाजी आयुर्वेदियदृष्ट्याही चांगली आहे. ही खाल्ल्याने मूत्रविकारांना आळा बसतो. :$
(वैद्यबुवा) अनंत छंदी
14 Jul 2009 - 2:10 pm | वेताळ
अशीच तांदळीची भाजी पण मस्त लागते शिळ्या भाकरी बरोबर खायला. तांदळी जराशी पोकळ्यासारखी दिसते.उसात आमच्या इकडे खुप उगवते.
वेताळ
14 Jul 2009 - 8:56 pm | प्राजु
तांदळीची पानेही अशीच असतात आणि तांदळी आमच्या बागेत खूप यायची. आई खूपदा करायची. ही भाजी थोड्याशा भाताच्या कण्या घालून, लसूण मिरचीच्या फोडणीमध्ये मस्त होते. त्याबरोबर ताजी भाकरी आणि तळलेली मिरची असेल तर....!!!!!!!!!
जाऊदे.. स्वप्नरंजन पुरे!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Jul 2009 - 2:32 pm | विंजिनेर
कर्टूल्याची अशीच एक जीवघेणी भाजी! करायला एकदम सोपी पण अफलातून!!
मुंबई-पुणे डेक्कनक्विन मधे विकायला येते या दिवसात...
नुसत्या आठवणीनेच बादलीभर लाळ जमा झाली आहे
अवांतरः गुजरातेत ह्याचे लोणचे पण घालतात म्हणे
बाकी वेताळ्बुवांनी सांगितलेला तांदुळका तर मस्तच!
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
14 Jul 2009 - 9:10 pm | चतुरंग
कर्टुलं कसलं भन्नाट लागतं! श्या..जेवायच्या वेळेला असलं काही आठवून नका देत जाऊ बॉ! मी लोणचंही खाल्लंय कर्टुल्याचं!
(कर्टुलं)चतुरंग
14 Jul 2009 - 4:56 pm | सूहास (not verified)
एकदा भर पावसात्..घनगरा॑च्या पालावर खाल्ली होती..नावच आठवत नव्हत्...धन्स...
<<भारंगीचीही २ दिवसांनी टाकते रेसिपि..>>
लवकर टाका...
सुहास
14 Jul 2009 - 5:17 pm | स्वाती२
आईग! कुरडू, भारंगी ,शेवळं वगैरे भाज्यांच्या आता फक्त आठवणी राहील्यात. १५-१६ वर्ष झाली या भाज्या खाल्ल्याला.
14 Jul 2009 - 10:25 pm | लवंगी
:(
14 Jul 2009 - 5:39 pm | आशिष सुर्वे
गावची आठवण आली जागु ताय...
असेच कोकणात उडत जावेसे वाटतेय
-
कोकणी फणस
14 Jul 2009 - 6:07 pm | रेवती
अरे वा! मस्त दिसतीये भाजी.
पूर्वी श्रावणात कहाण्या वाचताना त्यात केनी कुरडूच्या भाजीचा उल्लेख आल्याचे आठवते. ती काल्पनीक भाजी असावी असा समज झाला होता कारण एरवी ही भाजी इतर भाज्यांसारखी सर्रास दिसत नाही. खर्या भाजीचा (कच्ची) फोटू चढवल्याबद्दल धन्यवाद!
रेवती
14 Jul 2009 - 9:07 pm | चतुरंग
काय मस्त दिसते आहे ही ताजी भाजी!
मी कधी खाल्लेली नाही. लाल माठ, हिरवा माठ खाऊनही कित्ती दिवस झालेत?
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या भारतवारीत मिळेल का रे खायला ही भाजी? :?)
(माठ)चतुरंग
14 Jul 2009 - 9:25 pm | llपुण्याचे पेशवेll
भारतवारीला चाल्लाय वाटते? कधीपर्यंत आहात तिथे?
(इथला-तिथला)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
14 Jul 2009 - 9:16 pm | अनंत छंदी
कुड्याच्या शेंगाचीही भाजी करतात पीठ पेरून कुणाला शक्य असेल तर ती पाकृही टाका
15 Jul 2009 - 11:14 am | पाषाणभेद
एकूणच शहरात राहून ग्रामीण भागातली आठवण ठेवणारे पण आहेत म्हटल.
मस्त लागते ही भाजी.
माझा चुलत भाऊ लहाणपणी (६ वर्षाचा) आजारी होता. डॉ. नी दिलेल्या अॅलोपॅथीचा काही उपयोग होत नव्हता.
माझ्या वडीलांनी आमचे एक ओळखीचे आयुर्वेदिक डॉ. नां दाखवले. त्यांनी दोन दिवस पालकाची भाजी खाऊ देण्यास सांगीतले. दोन दिवसात तो उठूनच बसला आजारातून.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
15 Jul 2009 - 12:30 pm | जागु
मी हळू हळू मला ज्या मिळतील त्या रानभाज्या इथे टाकणार आहे.