निळूभाऊंकरता प्रार्थना..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
9 Jul 2009 - 5:43 pm

आपल्या सहजसुंदर अभिनय कौशल्याने गेली अनेक दशकं तमाम मराठी रसिकांची मनं जिंकलेले, आणि उत्तम कलेसोबतच संवेदनशील सामाजिक जाणीव असलेले गुणी कलाकार, एक अत्यंत सर्जनशील, सहृदय व्यक्तिमत्व निळू फुले म्हणजेच तुम्हा-आम्हा सर्वांचे लाडके निळूभाऊ गेले काही दिवस आजारी आहेत..

त्यांना श्वसननलिकेच्या कर्करोगाने ग्रासलेले असून सध्या ते रुग्णालयातील अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या यातना कमी व्हाव्यात आणि त्यांच्या प्रकृतीस लौकरात लौकर आराम वाटावा हीच ईश्वरचरणी सार्‍या मिपा परिवारातर्फे प्रार्थना...!

तात्या.

कलाप्रकटनसद्भावनाबातमी

प्रतिक्रिया

आपला अभिजित's picture

9 Jul 2009 - 6:04 pm | आपला अभिजित

ते अतिशय आवडते अभिनेते. एकदा त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योगही आला. अतिशय निगर्वी, साधेसुधे व्यक्तिमत्त्व. एवढा मोठा काळ गाजवलेला माणूस, पण ते त्यांच्या वागण्याबोलण्यातून कधीही जाणवू देत नाहीत!
ते लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jul 2009 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निळूभाऊ लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा.....!!!

-दिलीप बिरुटे

सहज's picture

9 Jul 2009 - 6:09 pm | सहज

हीच सदिच्छा!

दशानन's picture

9 Jul 2009 - 8:10 pm | दशानन

हीच सदिच्छा!

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

विसुनाना's picture

9 Jul 2009 - 6:17 pm | विसुनाना

सदिच्छा.
परवाच अश्विनी भावेचा 'कदाचित'पाहिला. त्यात पाहुणा कलाकार म्हणून निळूभाऊंनी एक छोटीशी भूमिका केलीये. अवघ्या दोन-चार मिनिटात निळू फुले म्हणजे काय चीज आहे ते समजतं.
त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो हीच मनापासून इच्छा.

चतुरंग's picture

9 Jul 2009 - 8:30 pm | चतुरंग

घड्याळजीची भूमिका करणारे निळूभाऊ लाजवाब आहेत.
अवघ्या काही मिनिटातच त्यांची भूमिका मनात ठसते आणि ती कितीतरी काळ रेंगाळत रहाते! जातिवंत अभिनय!

चतुरंग

यशोधरा's picture

9 Jul 2009 - 6:39 pm | यशोधरा

माझ्याही सदिच्छा.

दिपाली पाटिल's picture

9 Jul 2009 - 8:21 pm | दिपाली पाटिल

माझ्याही सदिच्छा.

दिपाली :)

नीलकांत's picture

9 Jul 2009 - 6:56 pm | नीलकांत

निळूभाऊ लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा.....!!!

-- नीलकांत

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jul 2009 - 7:10 pm | परिकथेतील राजकुमार

निळूभाऊ लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा.....!!!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

टारझन's picture

9 Jul 2009 - 8:00 pm | टारझन

आत्ता ही बातमी वाचून अंमळ धक्का बसला .... 'सात च्या आत घरात" ह्या चित्रपटातली त्यांची सात मिनिटांची जबरदस्त अदाकारी अजुनही त्यांच्यात दम आहे असे दाखवते. लहानपणी मी निळू फुलेंना जबरदस्त घाबरायचो ,,, तो एक अत्तिशय वाईट माणूस आहे अशी बालीश समजूत होती ..
निळूभाउ एक उत्तम कलाकार आहेत ~! देव त्यांना दिर्घायुष्य देवो

(तुम्ही अ‍ॅक्सेप्ट करा न करा) आपलाच
- अचानक पाठलाग
प्रतिसादांचा लवलेशही नसावा
वाचनांचा स्पर्शही नसावा
असा निबंध मारावा कि वाचनारा मंदच व्हावा......

घाशीराम कोतवाल १.२'s picture

10 Jul 2009 - 11:25 am | घाशीराम कोतवाल १.२

टार्याशी सहमत
निळूभाउ एक उत्तम कलाकार आहेत ~! देव त्यांना दिर्घायुष्य देवो

**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

रेवती's picture

9 Jul 2009 - 7:57 pm | रेवती

निळूभाऊंना बरे वाटू दे अशी देवाकडे प्रार्थना!

रेवती

स्वाती२'s picture

9 Jul 2009 - 8:13 pm | स्वाती२

माझीही परमेश्वराकडे प्रार्थना.

(चाहता)चतुरंग

आर्य's picture

9 Jul 2009 - 8:42 pm | आर्य

निळूभाऊ लवकर बरे व्हावेत, ही मनापासुन सदिच्छा.....!!!

यांच्या चेरमन, रावसाहेब, गुलाबराव या आणि अशा त्यांच्या भूमीका आपल्या फेवरेट बरंका........, तिरपी नजर करडा आवाज आणि कोल्हापुरी चप्पल- धोतर टोपीला राजकारणीच महाराष्ट्राचा खरा नायक आहे.
आर्य

नितिन थत्ते's picture

9 Jul 2009 - 9:00 pm | नितिन थत्ते

सेमच म्हणतो.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

मदनबाण's picture

10 Jul 2009 - 5:50 am | मदनबाण

निळूभाऊ लवकर बरे व्हावेत, अशी देवाकडे प्रार्थना करतो...

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

घाटावरचे भट's picture

10 Jul 2009 - 6:19 am | घाटावरचे भट

माझ्याही सदिच्छा.

प्रियाली's picture

10 Jul 2009 - 6:38 am | प्रियाली

निळूभाऊंच्या तोडीचा दुसरा कलाकार मिळणे कठिण. माझ्याही सदिच्छा!

निळूभाऊ ह्या आजारातुन लवकर बरे व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना. खडखडीत बरे होऊन हिंदुराव धोंडे पाटलासारख्या सशक्त भुमिका आम्हाला परत पाहल्या मिळाव्यात. ही सदिच्छा!

अश्विनि३३७९'s picture

10 Jul 2009 - 10:28 am | अश्विनि३३७९

निळूभाऊ ना लवकर बरं वाटू दे हिच सदिच्छा....

पाषाणभेद's picture

10 Jul 2009 - 10:44 am | पाषाणभेद

निळूभाऊ ह्या आजारातुन लवकर बरे व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

अनंत छंदी's picture

10 Jul 2009 - 10:44 am | अनंत छंदी

निळूभाऊ लवकर बरे व्हावेत ही सदिच्छा!

निळूभाऊ लवकर बरे व्हावेत, ही मनापासुन सदिच्छा.....!!!

सुहास
(मारुती का॑बळेच काय झाल ? ह्या प्रश्नाला नुसत मुठ आवळुन "मास्तर " म्हणणार्‍या अजरामर अभिनयाला सलाम...)

सुनील's picture

13 Jul 2009 - 6:57 am | सुनील

निळू फुले यांचे आज पहाटे दोन वाजता (भा.प्र.वे.) निधन झाले.

त्यांना विनम्र श्रद्धांजली!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मिसळभोक्ता's picture

13 Jul 2009 - 7:26 am | मिसळभोक्ता

निळूभाऊंना भेटायची वेळ एकदाच आली होती. पण सगळे फ्यान भेटतात तशी नव्हे. ह्या भेटीत "तुमचे मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीवर किती उपकार आहेत," वगैरे भंकस बडबड काहीही नव्हती. सध्या सिग्नेचर श्रेष्ठ का ? देशी हल्ली जमत नाही. खेडेगावात नाटकांचे प्रयोग होतात तेव्हा, तिथले ऑर्गनायझर्स कसल्या "सोयी" करतात, ह्याविषयी दोन पेगांनंतर जसे मनमोकळे डिस्कशन होते, तसे.

आता कर्वे रोड वर "प्रेम" मध्ये बाजूचा तो टेबल रिकामा रिकामा राहील. पंच्याहत्तरीतले ते चार तरुण चाळीशीतल्या आम्हा म्हातार्‍यांना जीवनोन्नतीतले सहा सोपान (आणि सातवा: सिग्नेचर) सांगणार नाहीत.

निळूभाऊ, वरती मजा करा. एखादा कानडी शेट्टी तिकडेही चित्रगुप्ताच्या मदतीने बार उघडून बसला असेलच. चीयर्स.

-- मिसळभोक्ता