परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
7 Jul 2009 - 11:50 am

परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची
(काही सत्य घटनांवर आधारीत)

शेवटी एकदाचा मॉन्सुन येऊन ठेपला आणि मला विद्यापीठात चालायला जायची हूक्की
आली. गाडी काढली आणि विद्यापीठ गाठले. छत्रपतींच्या पुतळ्याजवळ गाडी पार्क करून
बाहेर पडलो आणि बारीक तुषार अंगावर येण्यास सुरुवात झाली होती.

तोंडाने मल्हारच्या सुरांचे नोम-तोम आळवत चालायला सुरुवात केली. पुणे
विद्यापीठाविषयी मला तसे काही फारसे प्रेम किंवा अभिमान नाही, पण शुद्धहवेची
हमी देणार्‍या ज्या काही थोड्याफार पुण्यात जागा आहेत त्यातली एक जागा एवढेच
माझ्यादृष्टीने त्या परिसराचे महत्त्व.

चालता चालता मुख्य-इमारतीपाशी येऊन पोचलो आणि पुढे आयुका पर्यंत जावे आणि
आकाशगंगेतले तारे मोजून परत फिरावे असा विचार केला. मल्हार गुणगुणत चालता
चालता काही वर्षापूर्वी म्हणजे १९९१ साली घडलेला एक किस्सा आठवला. तोंडाने चालू
असलेला मल्हार बंद पडला आणि एकदम हसू फुटले.

असेच पावसाचे दिवस होते. मी तेव्हा संगणकशास्त्र विभागात नोकरी करत होतो.
दुपारी जेवायला एमबीए कॅन्टीन किंवा ओल्ड कॅन्टीनला जायचे असा नेम होता.
तेवढ्यात समोरून एक मोठा ट्रक बांधकामाचे साहित्य घेउन हळूहळू चालला होता.
विद्यापीठातील विद्येच्या उजेडाने त्या बिचार्‍या ट्रकवाल्याचे डोळे दिपले
असावेत आणि त्यामुळे तो रस्ता चुकला असावा.

मी विरुद्ध दिशेने येत असल्याचे बघून तो ट्रक माझ्यापाशी येऊन थांबला आणि
जागेवरूनच ड्रायव्हरने विचारले,

"साब, यहाँ होटल किदर है?"

"होटल? कौनसा होटल? यहाँ तो कोई होटल नही हैं". मी उत्तरलो.

त्यावर त्याने खिशातून एक कागद काढला आणि हात बाहेर काढून माझ्यासमोर धरला.
त्या कागदावर लिहिलेला पत्ता वाचून मी खोखो हसायला लागलो. तो पत्ता असा होता-

होटल आयुका
पुना युनिव्हर्सिटी कॅंपस
मेन बिल्डींग के आगे
पिन ४११००७

मी का हसत होतो ते त्या ट्र्कवाल्याला काही कळणे शक्य नव्हते. आकाशगंगेतल्या
समस्त ता‍र्‍याना मात्र ते कळले असावे कारण ते काही क्षण चमकायचे थांबले असा
मला भास झाला. मी त्याला हॉटेल आयुकाची दिशा सांगितली आणि पोटपुजेसाठी भरभर
पावले उचलायला सुरुवात केली.

हळु हळु दिवस जात होते. 'होटल आयुका' धीम्या गतीने उभे राहत होते. मी वरील
प्रसंग विसरून गेलो होतो. एक दिवस माझ्या आयायटीतल्या एका मित्राचा मला अचानक
फोन आला. आम्ही दोघे एकाच होस्टेल आणि डिपार्टमेंट्चे. फक्त मी त्याला बराच
सीनियर होतो. मित्राने मला सांगितले की तो कसल्याशा सिम्पोझियमसाठी तो 'आयुका'त
आला होता. त्याला थोडा वेळ होता म्हणून त्याने मला फोन करून बोलावले होते. मी
हातातलं काम टाकून
आयुकाच्या दिशेने निघालो.

बर्‍याच वर्षानी भेटत असल्यामुळे सुरुवातीच्या गप्पाटप्पा होस्टेलच्या
आठवणीभोवती रंगल्या. मी हळुच त्याला प्रश्न विचारला.

"तू, या सिम्पोझियममध्ये काय करतोय"

"काही नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वचवच ऐकायची"

"आणि मग?" - मी

"Some lucky souls find here their scientific husbands and scientific wives"

"what next?"

"here you 'mate'(!) with your scientific
husbands or scientific wives and have fun... "

"इथेच?" - मी चक्रावून विचारले

"हो तर. देन वी प्रोड्युस न्यु थिअरीज"

मला 'होटल आयुका' शोधणार्‍या ट्रक ड्रायव्हरची आठवण झाली. मी तो किस्सा
मित्राला सांगितला तेव्हा तो पण खळखळून हसला. यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला
आणि निघालो.

पावसाची रिपरिप वाढली तशी माझी पावले भरभर पडायला सुरुवात झाली. आयुकाच्या
अभेद्य तटबंदीजवळ मी येउन पोचलो होतो. तिथे आडोशाला दोन कुत्री उभी होती. पाउस
कमी झाल्यावर पुढे चालावे असा विचार करून मीपण चंद्र्शेखर ऑडिटोरियमजवळ आसरा
शोधला आणि पाउस कमी व्हायची वाट बघत उभा राहीलो.

आजुबाजुला फारसे कोणी नव्हते. तेवढ्यात ती दोन कुत्री माझ्या दिशेने आली आणि
जोरजोरात भूंकू लागली. सुरुवातीला मी दूर्लक्ष केले, पण त्यांचे भूंकणे काही
थांबेना म्हणून जवळ पडलेला दगड मी त्यांना मारण्यासाठी भिरकावणार एवढ्यात
लांबून एक वॉचमन ओरडला -

"साब! उनको पत्थर मत मारो!"

"क्यूं. काटेंगे तो आपके साब दवा पानी करेंगे क्या?" मी चिडून विचारले.

एकाच वेळेला वॉचमन आणि ती कुत्री भूंकत माझ्याकडे यायला सुरुवात झाली. वॉचमन
जवळ आला आणि माझ्या कपाळावरच्या आठ्या बघून मला म्हणाला,

"साहेब, रागवू नका पण एक विचारू का?

मी मानेनेच हो म्हटले.

"तुम्ही ज्योतिषी आहात का?"

कुत्री अचानक भूंकायची थांबली.

"हो! का?"

"काही नाही. इथली कुत्री ज्योतिषांवर खूप खवळतात."

"का? काय झालं"

"मागे इथल्या काही साहेब लोकांनी ज्योतिषाची टेस्ट घेतली आणि त्यात ज्योतिषी
फेल झाल्याच त्यांनी एकतर्फी जाहिर केलं तेव्हापासून इथल्या कुत्र्यांना
ज्योतिषांचा जरा देखिल वास लागला तरी ती खवळतात."

ते ऐकून मी पण चिडलो.

"ज्योतिषांची टेस्ट घ्यायला तुमचे साहेब कोण लागून गेले" - मी पण आता खवळलो
होतो.

कुत्री जोरजोरात भूंकायला लागली.

"आंतरराष्ट्रीयकीर्तीचे शास्त्रज्ञ". वॉचमनने भाषांतर केले...

"मग मी पण सांगेन ती टेस्ट करणार का"

कुत्र्यांनी प्रश्नार्थक शेपूट हलवली.

"तुमच्याच लायब्ररीमधली गेल्या दहा वर्षात प्रसिद्ध झालेली कोणतीही १०० पुस्तके
डोळे मिटून उचला आणि किती पुस्तकात तुमच्या साहेबांचे नाव सापडते ते नीट मोजून
सांगा"

आता वॉचमन प्रश्नार्थक नजरेने कुत्र्यांकडे बघू लागला. कुत्र्यांना माझा प्रयोग
पटला की नाही ते माहित नाही पण शेपूट पायात घालून त्या सारमेयांनी घूमजाव केले.

पाउस थांबला होता. मी पण घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली...

कथा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

7 Jul 2009 - 12:06 pm | श्रावण मोडक

बाण एकाचवेळी उडाले आहेत. लक्ष्यं कोणती आहेत हे बघावे लागेल... :)

दशानन's picture

8 Jul 2009 - 11:36 pm | दशानन

हेच म्हणतो आहे... समजायला जरा वेळ लागेल... लिहीत रहा आम्ही समजण्याचा प्रयत्न करुच ;)

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

अवलिया's picture

7 Jul 2009 - 1:53 pm | अवलिया

वा! मस्त !!
अनुभव कथन आवडले :)

--अवलिया

काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!

Nile's picture

8 Jul 2009 - 11:12 am | Nile

अरे रे! तुमचा त्या दोन कुत्र्यांनी केलेला अपमान फारच लागलेला दिसतोय तुम्हाला? ;)

मिसळभोक्ता's picture

9 Jul 2009 - 2:09 am | मिसळभोक्ता

अख्खी लायब्ररीतील पुस्तके उचला. त्यात राजीव उपाध्ये हे नाव किती पुस्तकांत दिसते हे सांगा.

मगच नारळीकरांवर टीका करा.

असेच म्हणायचे आहे ना, उपाध्ये ?

-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

नितिन थत्ते's picture

9 Jul 2009 - 11:47 am | नितिन थत्ते

ही आणि हि लेखन वाटले.
शास्त्रज्ञांना काही कळत नाही असे म्हणायला काही हरकत नाही. ते वैयक्तिक मत आहे.

पण mate with scientific husbands or scientific wives वगैरे हिणकस. (लेखन 'विनोद' आणि 'विरंगुळा' या प्रकारचे म्हणून लिहिलेले नाही)

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

काय? तुम्ही आज राजकारण्यांना शिव्या घातल्या नाहीत? लोकशाहीच्या नावानी बोटे मोडली नाहीत? तुम्हाला सुशिक्षित कसं म्हणायचं?

महेश हतोळकर's picture

9 Jul 2009 - 11:50 am | महेश हतोळकर

ह्म्म्म. मागील पानावरून पुढे चालू! चालू देत.
http://mr.upakram.org/node/1286

---------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
---------------------------------------------------