संध्येच्या व्याकूळ छाया
अंधार माखुनी येती
हा डोह अंतरीचा
दुःखाने ढवळून जाती.
मी व्याकूळ होतो जेव्हा
दुःखाने मेघही झरती
अश्रूंनी विझुनी गेल्या
नभीच्या चांदणं ज्योती.
सावली उन्हाची व्हावी
तशीच शीतल माया
गेले प्रहर निघुनी
छळती स्मृतींच्या छाया.
अंधार भारल्या राती
नभी चांदणे झरते
अंधाऱ्या डोही दुःखाच्या
सुख तसे पाझरते.
प्रतिक्रिया
25 Feb 2026 - 2:18 pm | गणेशा
छान... करून...
____________
कल्लोळ माजला येथे
भावनांच्या डोंगरापाशी
निस्तेज जाहला जीव
तेजगोलाच्या अस्तापाशी
--- गणेशा
25 Feb 2026 - 7:07 pm | धर्मराजमुटके
छान ! लिहित रहा
26 Feb 2026 - 2:20 pm | Deepak Pawar
गणेशाजी, धर्मराजमुटकेजी मन:पूर्वक धन्यवाद.
26 Feb 2026 - 3:20 pm | विजुभाऊ
छान लिहीलय. थोडी दुरुस्ती केलीत तर छान घझल होईल
27 Feb 2026 - 8:39 pm | Deepak Pawar
विजुभाऊजी मन:पूर्वक धन्यवाद.
28 Feb 2026 - 2:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर रचना.
-दिलीप बिरुटे
2 Mar 2026 - 12:48 pm | Deepak Pawar
प्रा.डॉ.दिलीप बिरुटेजी मन:पूर्वक धन्यवाद.