भारतीय रेल्वे आणि लालु यादव.

मुशाफिर's picture
मुशाफिर in काथ्याकूट
18 May 2009 - 9:40 pm
गाभा: 

आताच एका काथ्याकुटाच्या निमित्ताने लालु यादव आणि भारतीय रेल्वेविषयी चर्चा वाचनात आली. भारतीय रेल्वे फायद्यात आणल्यामुळे लालु यादवना बरीच प्रसिद्धी मिळाली असली, तरी बर्‍याच लोकांमध्ये रेल्वेने नक्कि कोणती धोरणं बदलली आणि कशी ? याविषयी अनभिज्ञता दिसली. म्हणूनच, काही दिवसांपूर्वी वाचनात आलेल्या एका लेखाचा दुवा खाली देत आहे:
http://www.american.com/archive/2009/the-indian-railway-king

हा लेख भारतीय रेल्वेतील गेल्या काही वर्षांतल्या बदलांचा चांगला आढावा घेतो, असं मला वाटतं.

इथे नमूद करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, लालु यादवांनी राबवलेली काही धोरणं नितीश कुमारांच्या कारकिर्दीतच ठरवली गेली होती. पण ती राबवली जाउ शकली नव्हती. तसेच, लालु यादवना कितीही विरोध केला तरी रेल्वे मंत्रालयात कारभार हाकण्यासाठी योग्य व्यक्तिची निवड केल्याबद्दल त्यांना श्रेय द्यावचं लागेल!

याविषयी मि.पा. करांची मतं जाणून घ्यायला आवडेल.

मुशाफिर.

अवांतरः जिज्ञासूंनी खालील दुवाही अभ्यासावा: http://siteresources.worldbank.org/INTSARREGTOPTRANSPORT/2045703-1135664...

प्रतिक्रिया

कुंदन's picture

19 May 2009 - 11:20 am | कुंदन

जर रेल्वेला खरोखरच इतका फायदा झालाय तर , सर्वाधिक महसुल मिळवुन देणार्‍या मुंबईत तरी काही फार बदल जाणवले नाहीत.
उदा.
ठाणे स्थानकावर पुल बांधायला रेल्वे कडे पैसा नाही.
कुर्ला-ठाणे २ अतिरिक्त मार्ग गेली कित्येक वर्षे आहेत त्याच परिस्थित आहेत.
इ. आणि इतर बरीच ....

मुशाफिर's picture

19 May 2009 - 8:33 pm | मुशाफिर

मी लोकांमध्ये असलेली अनभिज्ञता म्हणालो, ते रेल्वेच्या बदललेल्या धोरणांविषयी (ज्यामुळे रेल्वे फायद्यात आली). बाकी, आपण आणि इतर प्रतिक्रियांमध्ये उपस्थित केलेल्या बर्‍याचश्या मुद्द्यांशी उदा. रेल्वे गाड्यांची स्थिती, खानपान सेवा, मुंबई उपनगरी गाड्यांसाठी उपलब्ध न केलेला निधी यांचाशी मीदेखील सहमत आहे.

मला व्यक्तिशः लालु यादव यांच्याबद्दल कोणतेही ममत्व नाही. तसेच, रेल्वे फायद्यात येण्याने मुंबईच्या रेल्वे वाहतुकीत फार मोठा बदल झाला नाही, हेही मला मान्य आहे. पण, बरेचदा टीका करताना नक्की कोणते बदल केले गेले आहेत/होते, हे आपण लक्षात घेत नाही. म्हणून ही माहीती सर्वांपर्यंत पोहचवावी असं वाटलं.

मुशाफिर.

नितिन थत्ते's picture

19 May 2009 - 12:41 pm | नितिन थत्ते

दुव्याबद्दल धन्यवाद.
एकुणात लालू आणि सुधीरकुमार यांची जोडी हिट झाली.

खराटा
(रंग माझा वेगळा)

हेरंब's picture

19 May 2009 - 8:03 pm | हेरंब

रेल्वे जरी फायद्यात आणली तरी,
तत्काल तिकीटे ५ दिवस आधी उपलब्ध करुन त्याचा बाजार केला, त्यामुळे ख‍र्‍या गरजु प्रवाशाला त्याचा काहीच उपयोग राहिला नाही.
तिकीटे रद्द करण्यावर भरमसाट चार्ज लावला .
थ्री टायर डब्यामधे साइड बर्थच्या मधे तिसरा बर्थ घुसवण्याचा आचरट प्रयत्न करुन पाहिला.
गाड्या स्वच्छ राखण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न केले नाहीत.
खानपानसेवा अजिबात सुधारली नाही.
हॉलिडे स्पेशल गाड्यांना पँट्री कार लावलीच जात नाही, त्यामुळे लांबच्या प्रवाशांची अत्यंत गैरसोय होते.

विकास's picture

19 May 2009 - 11:37 pm | विकास

"येन केन प्रकारेण प्रसिद्धी पुरूषो: भवेत" असे जे काही म्हणतात ते लालूंना चांगले जमते. त्यांचे श्रेय वर मुशाफिर यांनी म्हणल्याप्रमाणे योग्य व्यक्तीला जबाबदारी दिली यात जसे आहे तसेच कदाचीत स्वतःच्या पेट्या मिळतात का ह्याची खात्री करून बाकी काही ढवळाढवळ त्यांनी केली नसावी...

वर दिलेल्या दुव्यातील, "The Indian Railway King" हा लेख उडत उडत वाचला. त्यातील काही गोष्टींबद्दल भाष्यः

अवांतरः लेखक Graeme Wood हा "दी ऍटलांटीक" या अंकाचा एक संपादक आहे. हा (लिबरल) अंक (मासिक) खूप माहीतीपूर्ण आणि विविध क्षेत्रातील नेतृत्वाला (विशेष करून राजकीय) माहीती असण्यासंबंधातील असतो आणि त्यात परदेशनिती संबंधात बरेच काही असते.

जरी या लेखात त्याच्या दोन्ही बाजूं बर्र्‍यापैकीदाखवल्या असल्यातरी, अशा लेखकाकडून खालील वाक्ये वाचताना आचंबित व्हायला होते:

  1. Lalu may have been corrupt, but he was also a laugh riot. (म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे?)
  2. Even then, Lalu commanded enough of a following among his coalition of “extremely backward castes” (or, in the wonderful semiofficial abbreviation, “EBCs”) and desperately poor Muslims to secure a role for himself in India’s 2004 Congress Party government. (EBC - म्हणजे extremely backward castes का
  3. economically backward castes?)
  4. ndian Railways was in trouble: in 2001, a report by the BJP—a government dominated by the Brahmins who are Lalu’s permanent foes—predicted it would hemorrhage cash at a rate of $12 billion annually by 2015. ("डॉमिनेटेड बाय ब्राम्हिन्स" - हा काय प्रकार आहे? ते खरे आहे का हा प्रश्न जरी बाजूस ठेवला तरी याचा संबंध काय?)

बाकी बरीच टिका दिसली:

  1. Inside, the conditions do not inspire confidence. The building is big, disordered, and honeycombed with offices that bear stultifying bureaucratic titles (“Manager, Zonal Railways, Deputy”). The hallways all have torn-up ceilings. Some are so dark that I have to use a pocket flashlight to read names on the doors, and inside the offices the level of technology is shockingly low.
  2. Those who do work encounter predictable bureaucratic headaches...

वगैरे वगैरे...

बाकी एक गोष्ट मला वर वर वाचताना दिसल्याचे आठवत नाही. रेल्वेला नफ्यात आणण्यासाठी ज्या काही गोष्टी लालूंनी केल्या त्यात मालवहातुकीवर प्रत्येक डब्यात किती टन वजन असायचे जे रेल्वेच्या सेफ्टी डीझाईनप्रमाणे ठरते ते त्यांनी वाढवले. का तर त्यामुळे जे जास्त वजन घेऊन भष्ट्राचार करत होते त्याला आळा बसला. आणि जास्तीचे वजन (जे आधी बेकायदेशीर होते, ते) कायदेशीर झाले! त्यातून भरपूर पैसा रेल्वेला मिळालाच. तरी देखील हे कसे वाटते?: पाकीटमारांना पोलीस पकडतात आणि त्यांच्याकडून पैसा घेतात, तेंव्हा पाकीटमारी कायदेशीर करा फक्त त्यात मिळालेल्या पैशावर कर भरला म्हणजे झाले. मग गुन्हेगारी कमी आणि भ्रष्टाचार कमी म्हणायला मोकळे!

नितिन थत्ते's picture

20 May 2009 - 11:21 am | नितिन थत्ते

विकास,

आपण लेख वर वर वाचला आहे म्हटले आहे म्हणून तुम्हाला माफ.

नाहीतर....तुम्ही टीका म्हणून जे वर्णन केले आहे ते रेल भवन मधील कार्यालयाचे आहे. त्याचा रेल्वेच्या फायद्याचा तसा काही संबंध नाही.

वॅगनचे अधिकृत भारमान वाढवण्याचा निर्णय/युक्ती तरी नक्कीच लालूची होती. तुम्ही पाकीटमाराचे उदाहरण दिले आहे ते अगदी आचरट उदाहरण आहे. वॅगनच्या भाराचा आणि सुरक्षेचा प्रश्न विचारात घेतला नाही हे तुमचे (सोयीसाठीचे) गृहीतक आहे. लेखामध्ये तो निर्णय घेण्यापूर्वी कधी नव्हे ते सर्व डिपार्ट्मेण्टस मध्ये सुसूत्रपणे काम होऊन रेल्वेपासून अलिप्त असलेल्या कमिशनर ऑफ सेफटी कडून हिरवा कंदील मिळाल्याचे लिहिले आहे.

सुधीरकुमारांनीच म्हटल्याप्रमाणे जर अपयशाला (अतिरिक्त भारामुळे वाढ्लेल्या डिरेलमेण्ट वगैरे) आपण लालूंना जबाबदार धरणार असू तर यशाचे श्रेयही आपण त्यांना द्यायला हवे.

मी दुसर्‍या धाग्यावर म्हटल्याप्रमाणे लालूला चुत्या आणि कानफाट्या ठरवलेले असल्याने त्याला काही श्रेय द्यायला कुणी तयार नाही.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

20 May 2009 - 8:24 pm | विकास

>>>आपण लेख वर वर वाचला आहे म्हटले आहे म्हणून तुम्हाला माफ.

धन्यवाद. नाहीतर छडीसाठी हात पुढे करावा लाग्तो का ओणवे उभे रहावे लागते या विचारात पडलो होतो :-)

>>>तुम्ही टीका म्हणून जे वर्णन केले आहे ते रेल भवन मधील कार्यालयाचे आहे. त्याचा रेल्वेच्या फायद्याचा तसा काही संबंध नाही.<<<

मी कुठे फायद्या-तोट्याबद्दल बोलतोय? मी ते विशेष करून लेखकासंदर्भात लिहीले होते. म्हणून आधी त्या अंकाबद्दलची माहीती दिली होती. एकीकडे Indian Railway King म्हणतो आणि दुसरीकडे असे लिहीतो असे कुठेतरी वाटले.

तरी देखील आपले वरील विधान पटत नाही. कारण सर्व गोष्टींमुळे फायदा-तोटा, वर्कींगस्टाईल, क्वालीटी वगैरे ठरू शकते. जेंव्हा रेलभवनचे कार्यालय चांगले नसते, तेंव्हा तिथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कामाच्या बाबतीत तृप्तता (वर्क सॅटीसफॅक्शन) नसते. मग इतर अनेक भ्रष्ट उद्योग सुचू शकतात. "कार्यालयातील/कामाचे वातावरण" बर्‍याच गोष्टी घडवू अथवा बिघडवू शकते. थोडे वेगळे उदाहरण देतो: काही महीन्यांपुर्वी एका प्रादेशिक विमानाचा न्युयॉर्क राज्यात अपघात होऊन कोसळून सर्व मृत्यूमुखी पडले. वास्तवीक ती विमान कंपनी चांगली होती, विमाने सुरक्षाचाचणीत चांगली होती वगैरे.. पण पायलट्स ना योग्य पगार (तुम्ही कुठे रहाता माहीत नाही, पण विचार करा अमेरिकेत रहाणार्‍या या पायलटचा पगार किती? - $१७,००० वर्षाला!), ना योग्य आराम या (दुसर्‍याकारणा)मुळे त्यांना झोप लागली (पण पहील्या कारणाने एकूण वर्केथिक्स कसे रहाणार?) आणि ऑटोपायलट असले तरी जे लक्ष देणे महत्वाचे असते त्यात दुर्लक्ष झाले. असो.

>>>वॅगनचे अधिकृत भारमान वाढवण्याचा निर्णय/युक्ती तरी नक्कीच लालूची होती. तुम्ही पाकीटमाराचे उदाहरण दिले आहे ते अगदी आचरट उदाहरण आहे. वॅगनच्या भाराचा आणि सुरक्षेचा प्रश्न विचारात घेतला नाही हे तुमचे (सोयीसाठीचे) गृहीतक आहे. लेखामध्ये तो निर्णय घेण्यापूर्वी कधी नव्हे ते सर्व डिपार्ट्मेण्टस मध्ये सुसूत्रपणे काम होऊन रेल्वेपासून अलिप्त असलेल्या कमिशनर ऑफ सेफटी कडून हिरवा कंदील मिळाल्याचे लिहिले आहे.<<<

हे गृहीतक नक्कीच आहे. पण ते, तो लालू आहे म्हणून नाही. अमेरिका आणि भारत यात फॅक्टर ऑफ सेफ्टी मधे बराच फरक असतो. अमेरिकेत तो प्रचंड (अतिच ठेवतात) तर भारतात आणि इतर अनेक ठिकाणी तो इंजिनियरींगचे कौशल्य वापरत जितका हवा तितका ठेवतात. मला भारतातील पद्धत जास्त मान्य आहे. कारणे अवांतर होतील. पण या संदर्भात, त्यामुळे जेंव्हा असे वजन वाढवले जाते तेंव्हा आधीच त्यामानाने आधीच कमी असलेला फॅक्टर ऑफ सेफ्टी अजून कमी झाला हे नक्कीच आहे. बाकी कमिशनर ऑफ सेफ्टी वगैरे एरव्ही काय कामे करतात, किती मनुष्यहानी त्यांच्या निरीक्षणामुळे कमी झाली वगैरे संशोधनाचा विषय आहे.

>>>सुधीरकुमारांनीच म्हटल्याप्रमाणे जर अपयशाला (अतिरिक्त भारामुळे वाढ्लेल्या डिरेलमेण्ट वगैरे) आपण लालूंना जबाबदार धरणार असू तर यशाचे श्रेयही आपण त्यांना द्यायला हवे.<<<

त्यांना जे काही श्रेय देयचे ती माझ्या आधीच्या पहील्या वाक्यात दिले आहे. आपण वाचले नसावे म्हणून परत येथे लिहीतो: "त्यांचे श्रेय वर मुशाफिर यांनी म्हणल्याप्रमाणे योग्य व्यक्तीला जबाबदारी दिली यात जसे आहे तसेच कदाचीत स्वतःच्या पेट्या मिळतात का ह्याची खात्री करून बाकी काही ढवळाढवळ त्यांनी केली नसावी..."

नितिन थत्ते's picture

20 May 2009 - 8:49 pm | नितिन थत्ते

श्रेय वर मुशाफिर यांनी म्हणल्याप्रमाणे योग्य व्यक्तीला जबाबदारी दिली यात जसे आहे तसेच कदाचीत स्वतःच्या पेट्या मिळतात का ह्याची खात्री करून बाकी काही ढवळाढवळ त्यांनी केली नसावी

श्रेय देताना ही मेख मारण्याची काय गरज होती?

खराटा
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

20 May 2009 - 9:15 pm | विकास

>>>श्रेय देताना ही मेख मारण्याची काय गरज होती?

मला वास्तववादी लिहायला आवडते :-)

नितिन थत्ते's picture

21 May 2009 - 11:49 am | नितिन थत्ते

वास्तववादी म्हणजे बायस्ड वाटते. :)

खराटा
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

21 May 2009 - 4:28 pm | विकास

>>>वास्तववादी म्हणजे बायस्ड वाटते.

नाही. जे खरे आहे ते. ते चुकीचे असले (पेट्या घेतच नाहीत वगैरे) तर तसे सांगा. नवीन माहीती कळेल...