ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या देशात स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता असा प्रचार ब्रिटीशांनी आणि स्वतंत्रता प्राप्ती नंतर ब्रिटिश धार्जिणी सरकारी तंत्राने ही सतत केला. त्यामागे समाजाला विभाजित करून फूट डालो राज करो हा राजनीतिक उद्देश्य ही होता. पण सत्य कितीही लपविले तरी लपून राहत नाही. आज एआयच्या काळात जुने संदर्भ शोधता येतात आणि सत्य समोर आणता येते. त्याच्याच संदर्भ घेऊन हा लेख उकेरला आहे. सुरुवात वैदिक काळापासून करतो. वैदिक काळात शूद्रांना शिक्षण मिळत होते की नाही.
शूद्रोऽपि विद्वान् भवति यद्यपि शूद्रजातः ।
विद्या हि सर्वं विश्वस्य संनादति ॥
(अथर्ववेद १९.६२.१)
शूद्रजन्म झालेलाही विद्वान होऊ शकतो, कारण विद्या सर्व विश्वात संनाद करते (सर्वांना उपलब्ध आहे).
वैदिक काळात शूद्र आणि अनार्य यांना शिक्षणाचा पूर्ण अधिकार होता, ज्याचे ठोस पुरावे वेदांमध्येच आढळतात- ऋग्वेद ९.११२.३ मध्ये "ब्रह्मराजन्याभ्यां शूद्राय चार्याय च स्वाय चारणाय च" असा उल्लेख करून वेदवाणी शूद्र आणि अनार्य (स्वायचारण) यांच्यासाठीही आहे असे स्पष्ट केले; ऋग्वेद १०.५३.४ मध्ये "यद् विश्वा अश्विना... शूद्राय वा ददथुरार्याय वा" म्हणून शूद्र आणि आर्य यांना ज्ञानयान (शिक्षण) समान दिल्याचे सांगितले; अथर्ववेद १९.६२.१ मध्ये "शूद्रोऽपि विद्वान् भवति... विद्या हि सर्वं विश्वं संनादति" असे म्हणून शूद्रजन्म असलातरी विद्वान होऊ शकतो आणि विद्या सर्व विश्वात संनाद करते हे तत्त्व प्रतिपादित केले; तर यजुर्वेद (वाजसनेयी संहिता) २६.२ मध्ये "शूद्राय च परं ब्रह्म दत्तं भवति" असे सांगून शूद्रालाही परब्रह्मज्ञान प्राप्त होते असे नमूद केले. स्पष्ट आहे, वेदकाळात वर्ण जन्माने नव्हे, विद्येने आणि कर्माने ठरत होते, आणि शूद्र-अनार्य यांना वेदपाठ, यज्ञ, युद्धकला, वैद्यकी व नेतृत्व यांत समान सहभाग होता.
शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम् ।
क्षत्रियात् जातमेवं तु विद्वत्त्वात् सागरादयः ॥
(महाभारत अनुशासनपर्व १४३.४९-५०):
शूद्र ब्राह्मण होऊ शकतो, ब्राह्मण शूद्र होऊ शकतो. क्षत्रिय जन्म असलेलाही विद्वत्ता मिळवून (ब्राह्मण) होऊ शकतो. महाभारताचे रचियता महर्षि व्यास (जन्मानुसार हीन संकर वर्ण) पासून क्षत्रीय धृतराष्ट्र आणि पांडूचा जन्म झाला. शुकदेव ऋषी हे व्यासांचे पुत्र होते. त्यांनी वैदिक शिक्षण व आत्मसाक्षात्कार प्राप्त करून ब्राह्मणत्व प्राप्त केले.
जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते ।
वेदपठात् भवेत् विप्रः ब्रह्म जानाति ब्राह्मणः ॥
(मनुस्मृती १०.४ )
जन्माने सर्व शूद्र असतात म्हणजे जन्माने कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य नसतो; सर्वजण सामान्य मानव म्हणून जन्म घेतात. व्यक्ति संस्काराने द्विज होतो. उपनयन व इतर धार्मिक संस्कारांमुळे तो द्विज (द्वितीय जन्म प्राप्त केलेला) होतो. वेदाध्ययन केल्याने तो विद्वान (विप्र) होतो. ब्रह्मज्ञानाने ब्राह्मण होतो. स्वामी दयानन्द अनुसार आपल्या अधिकान्श ग्रंथांमध्ये भेसळ झाल्याने काही विपरीत श्लौक मनुस्मृतीत मिळतात. भेसळ तपासण्यासाठी पूर्वीच्या ग्रंथांची मदत घेऊन भेसळ सहज ओळखल्या जाते. उदाहरणार्थ वाल्मीकि (शूद्र- रामायणकार ब्राह्मण) आणि विश्वामित्र ही नावे आपल्याला माहीत आहे. अधिक उदाहरणे: गदिवान ऋषी: मत्स्य पुराण (अ. १४५) मध्ये गदिवान (शूद्र जन्म) यांना वेदपाठाचा अधिकार दिला, ते ऋग्वेदाचे विद्वान झाले आणि यज्ञ करून ब्राह्मणत्व प्राप्त केले. जाबाली ऋषी: रामायण (अयोध्या कांड १००-१०८) मध्ये जाबाली (शूद्र/म्लेच्छ जन्म) रामाला नास्तिक दर्शन शिकवतात. महाभारत (शांति पर्व १८०) मध्ये जाबाली सत्यकाम (शूद्र मातेचा पुत्र) गौतम ऋषींचे शिष्य होऊन उपनयन घेऊन ब्राह्मण झाले. वेदव्यास: मत्स्य पुराण (अ. १४५) व महाभारत (आदि पर्व ६३) मध्ये व्यास (कोली/मत्स्यगंधा पुत्री सत्यवती + पराशर) शूद्र/मिश्र जन्म असूनही वेद विभागकर्ते झाले, कृष्णद्वैपायन म्हणून ब्राह्मण ऋषी. त्याकाळी कर्माने वर्ण बदलत होते.
शूद्र हे क्षत्रीय होऊन चक्रवर्ती सम्राट ही झाले उदाहरण- चंद्रगुप्त मौर्य (इ.पू. ३२१-२९७), जो मुरा दासी पुत्र असूनही तक्षशिला विद्यापीठात चाणक्य (कौटिल्य) यांच्याकडून अर्थशास्त्र, राजनीती आणि युद्धकला शिकून मौर्य साम्राज्य स्थापन केले. अर्थात तक्षशीला सारख्या विश्वविद्यालयात शूद्रना शिक्षणाचा अधिकार होता. अजातशत्रू (इ.पू. ४९२-४६०), बिंबिसाराचा दासी पुत्र (बौद्ध ग्रंथ 'महावग्ग' व जैन 'भगवती सूत्र' नुसार शाक्य कुळाने त्याला नीच समजून दासीशी लग्न लावले आणि मगधात हेर्यंका वंशाचा राजा होऊन त्याने कोसल, वैशालीवर विजय मिळवला. महापद्म नंद (इ.पू. ३८२-३२९), शूद्र दासी पुत्र (पुराणांनुसार महानंदीचा पुत्र) याने काशी, कोसल, कलिंग जिंकून नंद साम्राज्य वाढवले आणि चाणक्यसारख्या विद्वानांना आश्रय दिला. पुष्यमित्र शुंग (इ.पू. १८५-१४९), निम्न ब्राह्मण किंवा शूद्र वंशीय (मुद्राराक्षस नाटकात हीन वंशीय सांगितले), अशोकानंतर शुंग वंशाचा संस्थापक होऊन यज्ञ व शिक्षणाला प्रोत्साहन दिले; दिव्या (इ.पू. ५वे शतक), जलिया कैबर्त (निम्न मच्छीमार जाती)चा राजा, अवंती साम्राज्य विस्तारला आणि बौद्ध ग्रंथांमध्ये त्याच्या शिक्षणाचा उल्लेख आहे. अशी उदाहरणे दाखवतात की प्राचीन भारतात जन्म नव्हे, विद्या-कर्माने राज्य मिळत असे.
वैदिककाळापासून ते मुगल येण्यापूर्वी (इ.स. १५२६) भारतात शिक्षणाची समृद्ध परंपरा होती. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी, जगद्दल, सोमपुरी, काशी, नदिया, उज्जैन, मिथिला, तंजावूर, कांचीपुरम, पुष्पगिरी, श्रृंगेरी यांसारख्या ३२ प्रमुख विद्यापीठे आणि लाखो लहान गुरुकुले होती. वेद, बौद्ध-जैन दर्शन, गणित, खगोल, वैद्यक, कला इत्यादींचे शिक्षण सर्व वर्ण-लिंगांसाठी खुले होते. १८व्या शतकात ही ६ लाख+ गुरुकुले अस्तित्वात होती. साहजिकच शूद्र-दलित बहुसंख्य (७५-८०%) होते. गुरुकुलांत ७२ शिल्पकला (लोहारकी, विणकरकी, सुतारकी, कुंभारकी, रंगकाम, चित्रकला, वास्तुशास्त्र, धातुकाम, हस्तिदंतकाम, रत्नकाम, वाद्यनिर्मिती, कृषी यंत्रे, जहाजबांधणी इ.) शिकवल्या जात होत्या, ज्यामुळे गावागावांत स्वावलंबी अर्थव्यवस्था होती.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अहवालांनुसार (मुख्यतः विलियम अॅडमच्या १८३५-३८ च्या बंगाल-बिहार सर्वे आणि जी. डब्ल्यू. लिटनरच्या १८८२ च्या पंजाब सर्वे) आणि धर्मपाल यांच्या "द ब्यूटीफुल ट्री" पुस्तकात (१९८३) यांचा आधार घेऊन, बंगाल आणि बिहारमध्ये सुमारे १,००,००० गुरुकुल किंवा देशी पाठशाळा अस्तित्वात होत्या (प्रत्येक गावात किमान एक, एकूण १,५०,०००+ गावांप्रमाणे) तर पंजाबमध्ये लिटनरनुसार ५,०००+ पाठशाळा होत्या, ज्यात शूद्र व अन्य जातींचे बहुमत (७०%+) होते. प्री-कोलोनियल काळात भारताची जनसंख्या बघता आणि प्रत्येक गावांत एक गुरुकुल असल्याने जवळपास गांवतील सर्वांना प्राथमिक शिक्षण निश्चित मिळत असेल. मग अचानक असे काय झाले की शूद्र समाज शिक्षणापासून वंचित झाला.
1857 नंतर ब्रिटिश सरकारने भारतावर अधिकार केला. दंडुकशाही वापरुन गुरुकुल बंद केले. नवीन मेकाले शिक्षणाला सुरुवात झाल्याने, राजा महाराजा, जमीनदार यांनी ही गावोगावी पसरलेल्या गुरुकुलांना मदत करणे बंद केले. दुसरी कडे ब्रिटिश सरकारने गावो गावी शाळा उघडल्या नाही कारण त्यांना फक्त बाबू पाहिजे होते.
१९०१ मध्ये मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेच्या (इंग्रजी-प्रधान, पाश्चिमात्य अभ्यासक्रमावर आधारित सरकारी व सहाय्यित शाळा) अंतर्गत भारतात सुमारे ९३,६०४ प्राथमिक शाळा आणि ३,५००-४,००० माध्यमिक शाळा अस्तित्वात होत्या, ज्यात एकूण शाळांची संख्या ९७,०००+ होती (ब्रिटिश भारतासाठी, १९०१-०२ च्या आकडेवारीनुसार), जरी पारंपरिक गुरुकुले नष्ट झाल्याने एकूण शाळा पूर्वीच्या ६ लाखांपासून खूप खाली आल्या होत्या. १९०१ च्या ब्रिटिश इंडियन एम्पायरच्या जनगणनेनुसार (ब्रिटिश प्रांत + देशी राज्ये मिळून) भारताची जनसंख्या *२९४,३६१,०५६ ज्यात पुरुष १४९.९५ दशलक्ष आणि स्त्रिया १४४.४० दशलक्ष होते. शिक्षणाचे प्रमाण (साक्षरता दर) एकूण ५.३% (५३ प्रति १,०००) होते, ज्यात पुरुष ९.८% आणि स्त्रिया ०.७% होत्या. पूर्वीच्या (१८व्या शतकातील) १५-२५% शिक्षण प्रसारापासून मोठा घसरण झाली (हे ब्रिटिश आंकडे आहेत. पण देशांत 6 लक्ष गुरुकुल असल्याने प्राथमिक शिक्षण निश्चित 80 ते 90 टक्के असेल). त्यात ही बंगालचे उदाहरण: ब्राह्मण(उच्चवर्ण) साक्षरता ४६७ प्रति १,००० पुरुष, क्षत्रिय/राजपूत ३००-४०० प्रति १,०००, वैश्य/व्यापारी (जसे जैन, बनिया) ३६०-८१८ प्रति १,००० (उच्च), पण शूद्र व अन्य निम्न जाती (जसे चमार, महार, गोंड, कोली) ८-५४ प्रति १,००० (अत्यंत कमी). पूर्वी ७०-८४% शूद्र विद्यार्थी असताना आता १-२% पर्यंत घसरले); अनुसूचित जाती/दलित ८ प्रति १,००० (अनिमिस्ट/अस्पृश्यांसह). याचा अर्थ मेकाले शिक्षण व्यवस्थेने 50 वर्षांत भारतातिल बहुसंख्यक जनतेला अशिक्षित बनविण्याचे कार्य केले. ब्राह्मण समाज शहरांत भिक्षा किंवा दिवस लाऊन जेवण करून शिक्षण घेत होता, ज्यामुळे मॅकॉलेच्या इंग्रजी शिक्षण व्यवस्थेत त्यांना प्रवेश सोपा झाला. ते जास्त साक्षर झाले आणि सरकारी नौकरीत त्यांना जास्त स्थान मिळाले आणि दुसरीकडे दलित वंचित समाज गावांतच राहिला आणि अशिक्षित झाला.
निष्कर्ष: मॅकॉलेच्या धोरणाने उच्चवर्णांना फायदा झाला, तर शूद्र-दलितांचे शिक्षण ७०-८०% घसरले, कारण गावी-गावी गुरुकुले बंद झाली. शाळा शहरी-इंग्रजी झाल्या होत्या. ब्रिटिश शिक्षण व्यवस्थने शूद्रांना शिक्षणापासून वंचित केले, हेच खरे सत्य आहे. बाकी आजमोठ्या प्रमाणात गावोगावी शाळा आहेत आणि शिक्षणात आरक्षण, छात्रवृती इत्यादि मुळे शाळेत जाणार्या आणि दलितांची संख्या पुन्हा वाढली आहे.
जनसंख्या *२९४,३६१,०५६ ???
प्रतिक्रिया
30 Nov 2025 - 9:16 am | युयुत्सु
<जन्माने सर्व शूद्र असतात म्हणजे जन्माने कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य नसतो; सर्वजण सामान्य मानव म्हणून जन्म घेतात.>
मग शंकराचार्यांसारखे हिंदू धर्माचार्य, हिंदू कायदा आणि संघासारखी संघटना यावर ठाम आणि कडक भूमिका का घेत नाही.
4 Dec 2025 - 8:11 am | विवेकपटाईत
संघाशी या लेखाचा काहीही संबंध नाही. ब्रिटिशांनी भारतीयांना आणि दलितांना शिक्षणापासून वंचित केले हा या लेखाचा सार आहे.
बाकी देशात संविधानानुसार कायदे आहे.
भूमिकेबाबत म्हणाल तर काँग्रेस, काम्रेड बहुजन वादी संस्थांना याबाबत विचारावे त्यांची भूमिका काय आहे. कारण यांनी दलितांचा उपयोग फक्त राजनीतीसाठी केला आहे दलितांसाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही. संघाचे म्हणाल तर संघ कधीच जात-पाच मानत नाही. सेवा भारती सारख्या संस्थांचे हजारो प्रकल्प आज दलित वस्तीत चालतात. त हजारो शाळा त्यात शिकणारे अधिकांश मागासवर्गीय वनवासी इत्यादी असतात. हजारो एकल शाळा ते चालवतात. दलित आणि आदिवासी राष्ट्रपती त्यांनी देशाला दिला आहे.
30 Nov 2025 - 9:18 am | युयुत्सु
मी टेक्निकली शूद्र आहे (माझी मुंज झालेली नाही). मला माझ्या शूद्रत्त्वाचे फायदे का नाहीत?
4 Dec 2025 - 8:00 am | विवेकपटाईत
या प्रश्नाचे उत्तर सविधान रचणाऱ्यांना विचारा. बाकी हा लेख ब्रिटिश अधिकाऱ्यांचा सर्वे पर आधारित आहे.
30 Nov 2025 - 9:20 am | युयुत्सु
या पाठशाळामध्ये किती शूद्रांना शिक्षण दिले गेले याची पण आकडेवारी द्या!
1 Dec 2025 - 9:21 am | युयुत्सु
थापेबाजीचा कहर
ज्यात शूद्र व अन्य जातींचे बहुमत (७०%+) होते
कोणत्याही पाठशाळेत मुंज झाल्याशिवाय वेदाध्ययन करू दिले जात नाही. जर शूद्रांना जानव्याचा अधिकारच नव्हता (सं० "शूद्र पूर्वी कोण होते?" -बाबासाहेब आंबेडकर) तर त्यांना प्रवेश देणार्या या पाठशाळा कोणत्या?
मला लहानपणी शाळेत असताना सस्वर वेदपठण ऐकायला खुप आवडायचे (तसे ते अजुनही आवडते). त्यामुळे मला ते शिकायची खुप इच्छा होती. त्यामुळे माझ्या वडिलांनी पुण्यात काही पाठशाळांमध्ये चवकशी केली होती. पण प्रत्येक ठिकाणी माझी मुंज झाली नाही म्हणून मला नाकारले गेले.
सांगायचे तात्पर्य वेदाध्यनासाठी उपनयन संस्कार अनिवार्य होता.
30 Nov 2025 - 9:53 am | कंजूस
रामायण महाभारताचा जो काही काळ( इ पू. सहावे ते दहावे शतक) आहे तेव्हापासून नाही.
30 Nov 2025 - 10:36 am | कॉमी
आदी शंकराचार्य तर शूद्राने नुसते वेदमंत्र ऐकले तरी कानात उकळलेले शिसे ओता म्हणतात.
30 Nov 2025 - 1:55 pm | अमरेंद्र बाहुबली
वाव! व्हॉट ए ग्रेट थिंकिंग! आणी आपण लोकांनी धर्म का सोडला ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत राहतो!
1 Dec 2025 - 2:33 am | गामा पैलवान
अमरेंद्र बाहुबली,
शंकराचार्यांनी वेद ऐकणाऱ्या शूद्राच्या कानांत उकळलेले शिसे ओता वगैरे काहीही म्हंटलेलं नाही. फार काय, कुठल्याही हिंदू धर्मग्रंथात अशी बकवास आज्ञा नाही.
चेंगीजखानाने ख्वाराझमीच्या कोण्या एका राजाला जिंकल्यावर त्याच्या कानांत व डोळ्यांत वितळलेली चांदी ओतली होती. याव्यतिरिक्त मला काहीही वास्तविक संदर्भ सापडला नाही.
आ.न.,
-गा.पै.
1 Dec 2025 - 9:04 am | कॉमी
https://www.wisdomlib.org/hinduism/book/brahma-sutras-thibaut/d/doc63776...
The Śūdras are not qualified for that reason also that Smṛti prohibits their hearing the Veda, their studying the Veda, and their understanding and performing Vedic matters. The prohibition of hearing the Veda is conveyed by the following passages: 'The ears of him who hears the Veda are to be filled with (molten) lead and lac,' and 'For a Śūdra is (like) a cemetery, therefore (the Veda) is not to be read in the vicinity of a Śūdra.' From this latter passage the prohibition of studying the Veda results at once; for how should he study Scripture in whose vicinity it is not even to be read? There is, moreover, an express prohibition (of the Śūdras studying the Veda). 'His tongue is to be slit if he pronounces it; his body is to be cut through if he preserves it.' The prohibitions of hearing and studying the Veda already imply the prohibition of the knowledge and performance of Vedic matters; there are, however, express prohibitions also, such as 'he is not to impart knowledge to the Śūdra,' and 'to the twice-born belong study, sacrifice, and the bestowal of gifts.'--From those Śūdras, however, who, like Vidura and 'the religious hunter,' acquire knowledge in consequence of the after effects of former deeds, the fruit of their knowledge cannot be withheld, since knowledge in all cases brings about its fruit. Smṛti, moreover, declares that all the four castes are qualified for acquiring the knowledge of the itihāsas and purāṇas; compare the passage, 'He is to teach the four castes' (Mahābh.).--It remains, however, a settled point that they do not possess any such qualification with regard to the Veda.
2 Dec 2025 - 12:59 am | गामा पैलवान
कॉमी,
इंग्रजी आमदानीत असल्या पुस्तकांची पैशापासरी पैदास व्हायची. याला कसलाही आधार नाही. गौतम ऋषींनी लिहिलेलं ( वा संकलित केलेलं ) बौधायन धर्मसूत्रात असली काहीशी आज्ञा आहे म्हणून दावा केला जातो. संदर्भ : https://archive.org/details/in.ernet.dli.2015.429882/page/n181/mode/2up
मात्र ही आज्ञा भारतात कुठेही अंमलांत आणल्याचं ऐकिवात नाही. फार काय, शिसे वितळवायचं कुठलंही सर्वतोमुखी तंत्र प्राचीन हिंदूंना अवगत नव्हतं. हा इंग्रजी आमदानीत केलेला घुसडग्रंथी कारभार आहे.
असाच दावा इस्लामच्या बाबतीत कुठल्याश्या हादिथीचा हवाला देऊन केला जातो. म्हणजेच ही आधुनिक काळातली फेकाफेक आहे.
आ.न.,
-गा.पै.
2 Dec 2025 - 4:23 pm | युयुत्सु
श्री० गा०पै०
युक्तीवादाकरता श्री० कॉमी यानी दिलेला संदर्भ निरर्थक आहे असे आपण मान्य करू या. पण तुम्हाला आदि शंकराचार्यांच्या ’चर्पटपञ्जरिका’ या स्तोत्राची गोष्ट माहित असेल अशी अपेक्षा आहे.
वयाच्या कोणत्याही अवस्थेत जसे जमेल तसे, काही ना काही शिकत राहील्याने मेंदूचा र्हास कमी होतो आणि स्मृतीभ्रंशासारखे विकार कमी व्हायची शक्यता निर्माण होते, असे आधुनिक विज्ञान सांगते (हे पण वेदात कुठेना कुठे सांगितलेले असेलच). त्यामुळे गंगेच्या घाटावर व्याकरणसूत्रांची घोकंपट्टी करणार्या वृद्धाला शंकराचार्यांनी उत्तेजन न देता ’भज गोविंदं’ सारखा सल्ला दिला हे काही योग्य केले नाही.
वयाच्या पञ्चाहत्तरीनंतर पीएच्डीसाठी नाव नोंदवून नंतर ती पूर्ण केलेल्यांच्या बातम्या जेव्हा वाचायला मिळतात तेव्हा आणि त्यात शंकराचार्य त्रिकाल ज्ञानी असल्यामुळेया गोष्टीचे गांभीर्य जास्त वाढते.
व्यक्तीच्या अंगभूत गुणांच्या विकासाला जेव्हा समाजाकडून जेव्हा चुकीच्या कल्पनांचा आधार घेऊन अडथळे निर्माण केले जातात तेव्हा तो समा्ज पूर्ण क्षमतेने विकास पावणार कसा?
श्री० पटाईत यांच्याकडून यांच्याकडून या चर्चेला मुद्देसूद उत्तर मिळेल असे वाट्त नाही. ते नेहेमी प्रमाणे ’हास्यास्पद’ हे लेबल लावून हात झटकणार हे निश्चित...
4 Dec 2025 - 8:22 am | विवेकपटाईत
उपनिषद गीता आणि मनुस्मृति अनुसार जन्मतः सर्वशुद्र असतात शिक्षणानंतर क्रमानुसार त्याची जात ठरते. वरील उदाहरण शास्त्र झालेली भेसळ आहे. वास्तविक प्रमाण नाही. ब्रिटिश सर्वेनुसारच मलाबाग जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण जे पूर्णपणे संस्कृत मध्ये होते 70% विद्यार्थी हे शुद्ध होते. वर्धमान जिल्ह्यात सहा शिक्षक तर चांडाल जातीचे होते. स्पष्ट आहे प्रत्यक्षात सर्वांना शिक्षणाचा अधिकार होता आणि तो दिला जात होता. आजही आर्य समाज तर प्रस्थापित गुरुकुलांमध्ये सर्व जातीचे विद्यार्थी वेदांचे शिक्षण घेतात. यादव जातीचे रामदेव बाबा सर्वांना माहीतच आहे.
जन्मानुसार कुल आणि श्रेष्ठ मानणारी लोक त्या काळातील होते आजही होते. आपल्या देशातील अधिकार राजनीती दल ही याच आधारावर देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा ठेवतात.
2 Dec 2025 - 6:00 pm | हणमंतअण्णा शंकर...
दुसरा प्रश्न : दलितांनी किंवा शूद्रांनी वेदमंत्र ऐकले अस्ते किंवा त्यांचे अध्ययन केले अस्ते तर त्यांचा काय झा*चा फायदा झाला असता?
जे रोजच्या जगण्यासाठी धडपडत होते (तेव्हा जवळपास सगळेच) त्यांना मेटाफिजिकल उत्तरे मिळून काय फरक पडला असता असे मला वाटत नाही.
2 Dec 2025 - 8:22 pm | कॉमी
आज ज्याला आपण शिक्षण म्हणतो ते वेदमंत्र नव्हेत.
वेदांच्या संहितांत मेटाफिजिकल उत्तरे ही नसावीत. ती वेदांतात अर्थात उपनिषदात आहेत असे ऐकले आहे. वेदांच्या संहितेत निव्वळ देवांची कवतिके आणि यज्ञ करताना म्हणायचे मंत्र आहेत. आणि शंकराचार्यांचा रोख सुद्धा तिथेच आहे असा अंदाज आहे. शूद्रांना यज्ञ करण्यास परवानगी नसावी. खाखोशंजा.
2 Dec 2025 - 8:41 pm | हणमंतअण्णा शंकर...
रूप कल्पून तेव्हाच्या शि़क्षणव्यवस्थेतल्या जातीय चूका काढणे मला पटतच नाही.
तेव्हा एखादा ब्राह्मण म्हणाला असता मला चप्पल शिवायला शिकवा तेव्हा चांभारांनी त्याला शि़क्षण दिले असते का?
मला या सगळ्या जातिउदग्माच्या थेअरीचा भयानक कंटाळा यायला लागला आहे.
30 Nov 2025 - 1:25 pm | कर्नलतपस्वी
आता शिक्षण सगळ्यांना उपलब्ध आहे.
वेदकाळात शुद्राना शिक्षण दिले किवां नाही? समजा नाही दिले मग आता कुणाला जबाबदार धरणार.....हे असले विषय म्हणजे खाजवून खरूज काढणे आहे.
बरेचजण आपापली गरळ ओकतील आणी काही XXभागवतील. काही डिफेंड करतील पण शेवटी ढाक के तीन पात... ज्या गोष्टी घडून गेल्या त्या ,UNDO,REDO करता येत नाहीत फक्त याद्वारे विष पसरवले जाते.
आता सर्वांना शिक्षण उपलब्ध आहे. बरेच आगडे,पिछडे,दलित समाजाचा प्रत्येक घटक याचा फायदा घेऊन आपली पुढील पिढीचे भविष्य उज्ज्वल करत आहे.
असले विषय मिपावर आणू नयेत असे मी म्हणणारा कोण पण याचा खरच काही उपयोग आहे का?यातून काही सकारात्मक निष्पन्न होणार आहे का याचा विचार करावा.
तसेही ,समाजात जाती,धर्म यावरून वातावरण आगोदरच दुषित झालेले आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे.
ब्रिटीशांचा एजंडा दुसरा होता ,ते आपले उखळ पांढरे करून गेले . आपण मात्र आजुनही मेकाले बाबाला शिव्या घालतोय. पंच्याहत्तर वर्ष झाले बदला की शिक्षण पद्धती ,कोणी अडकाठी केलीय, पण नाही मुडदा जळत राहीला तरच डोंबाचे महत्व....
बाकी तुमचे चालू द्या.
3 Dec 2025 - 11:27 am | Bhakti
आणि जात ,धर्म ,वर्ण यावरची इथलीच काय सोमिवर कुठेही चर्चा वाचली की ही केवळ जळजळ बाहेर पडतेय हे समजते.मुळात संशोधकांनी,अभ्यासकांनी यावर इतकं अभ्यासपूर्ण लिहिलंय की आपल्यासारख्या सामान्यांनी यावर अशी चर्चेची गरचज नाही.अशा चर्चा false positive वाटतात.
30 Nov 2025 - 1:52 pm | अमरेंद्र बाहुबली
दलितांना शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले होते.अर्थातच मनुवाद्यांनी! मनुवाद संपवण्यासाठी नेहरू, गांधी, आंबेडकर, फुले, शाहू, साने गुरुजी, प्रबोधनकार, पवार, ठाकरे, काँग्रेस असंख्य लोक झटले नी झटताहेत! पण संघरूपाने मनुवाद जिवंत ठेवल्या जातोय! मनुवाद्यांना जोपर्यंत मुळापासून ठेचल्या जात नाही तो पर्यंत ही विषवल्ली जिवंत राहील. दलित शिक्षणापासून वंचित राहू द्यायचे नसतील तर मनुवादाचा प्रसार करणारे ठेचले पाहिजेत!
30 Nov 2025 - 11:17 pm | कपिलमुनी
शिक्षण सर्वांना होते असे व्यास वगैरे चे नाव घेऊन लिहिता मग कर्णाचे काय ? शोणाचे काय ? त्याआधी रामायणातल्या शंबूकाचे काय ?
थियरी आणि प्रॅक्टिकल मध्ये फरक आहे आणि अपवाद म्हणजे नियम नव्हेत..
समाजात एखादा आंतरजातीय विवाह होत असेल तर त्याकाळी याला मान्यता होती असे म्हणणे चुकीचे असते
1 Dec 2025 - 1:19 am | रामचंद्र
खरं तर मंत्रानं जर काम होतं तर यंत्राचं कामच काय? सरकारने आता सर्व अभियांत्रिकीवर आधारित उद्योगधंदे बंद करून सत्ययुगातील तंत्रज्ञानाचाच वापर करायला हवा. आधुनिक वैद्यकीय शास्त्र त्यागून मुळ्या, काढे, भस्म, चाटणाधारित आर्यवैद्यकीय चिकित्सापद्धतीचा वापर अनिवार्य केला पाहिजे. पाश्चिमात्य तंत्रज्ञानावर पूर्णपणे बहिष्कार टाकून पूर्णतः सनातन जीवनपद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. हे अजून होताना दिसत नाही यासाठी विद्यमान नेतृत्वाचा निषेध करावा तितका कमीच!
1 Dec 2025 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषयच संपला.
बाय द वे, गोबरसंस्कृती कशी श्रेष्ठ होती यासाठी काही पटाईत लोक रात्रंदिवस त्यावर दळन आणत असतात. प्राचीन ते सर्वश्रेष्ठच होतं, असे काही ते असतं. अशा त्या श्रेष्ठ संस्कृतीचं काम आजच्या काळात तोच विचार आद्य महापुरुष पुढे घेऊन जात आहे, अशी ती मांडणी पडद्याआडून करायची असते. आणि मग पुन्हा लॉर्ड मेकॉलेची शिक्षण पद्धतीने पारंपरिक ज्ञान आणि संस्कृतीकडे कसं दुर्लक्ष केलं. पूर्वीची शिक्षणपद्धती कशी सर्वसमावेशक होती वगैरे सुरु असतं. अर्थात, पूर्वीची शिक्षण पद्धती एका विशिष्ट सामाजिक आणि धार्मिक चौकटीत बांधलेली असल्यामुळे सर्वसमावेशक नव्हती, यात आता काही नवं राहिलेलं नाही
बाकी चालू द्या.
-दिलीप बिरुटे
1 Dec 2025 - 5:05 am | सुक्या
कुणी कुणाला शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले, किंवा शिक्षण कसे सर्वांना उपलब्ध होते ह्या १०० / २०० वर्षापुर्वीच्या बाता आजमितीला करण्यात काहीही हशील नाहीये. माझ्या किंवा माझ्या बापाच्या काळापासुन शिक्षण सर्वांना उपलब्ध आहे. फलाणा जातीचा आहे म्हणुन तुला शिक्षण घेता येणार नाही असे कुठेही घडल्याचे ऐकीवात नाही. जातीवादाची उतरंड बर्यापैकी मोडली आहे. त्यामुळे हा विषय कीतीही चघळला तरी त्यातुन काहीही निष्पंन्न होणार नाही.
1 Dec 2025 - 8:48 am | युयुत्सु
अवांतर
हा दुवा स्वतंत्र चर्चा विषय होऊ शकतो का हे ठरवता येत नव्हते म्हणून इथेच शेअर करतोय.
Everyday Habits That Reveal a Low IQ (Backed by Psychology)
https://www.youtube.com/watch?v=-vVOOB3Bglk
ही मंदबुद्धीत्वाची लक्षणे (Low IQ) एखाद्या मोठ्या समूहात/संघटनेत सापडली तर तो योगायोग अजिबात मानू नये.
2 Dec 2025 - 10:24 am | धर्मराजमुटके
पुर्वीचं सगळं चान चान होतं म्हणणारे आणि मनुस्मुतीचे दहन करणारे या दोघांनाही मनोरंजन मुल्याच्या बाबतीत मी १०० पै़की ११० गुण देतो.