एचडीएफसी बॅंक-सावधान!
=================
लोक हो,
एचडीएफसी बॅंकेचे ग्राहक असाल तर सेवा घेताना अत्यंत सावध रहा! या बॅंकेकडून केले जाणार्या गैरव्यवहारांबद्दल समाज-माध्यमांबद्दल अधूनमधून जे वाचायला मिळायचे ते चिंताजनक होतेच पण मला आलेल्या अनेक अनुभवांमुळे आता मला उघड पणे बोलावे लागत आहे.
मी नुकतीच बॅंकेच्या छळाला(*) कंटाळून १८ ऑगस्ट रोजी एक एफडी केली. ही एफ़डी करताना Mode of operation : Either or survivor अशी स्पष्ट सूचना दिली होती. तशी नोंद मला बॅंकेकडून मिळालेल्या पोचपावतीच्या पीडीएफ़ मध्ये आहे. ग्राहकाने त्याच्या पैशाविषयी दिलेल्या सूचना जशाच्या तशा बॅंकेने पालन करणे अपेक्षित आहे. पण बॅंकेने स्वत: परस्पर एफडीची Mode of operation सूचना Joint and First अशी केल्याने मला प्रचंड मन:स्ताप आणि अडचण त्रास सहन करावा लागत आहे.
सदर सूचना बदलण्याचे पत्र बॅंकेने स्वीकारले नाहीच पण अत्यंत बेपर्वा आणि दिशाभूल करणारी उत्तरे दिली. माझ्या मते Either or survivor आणि Joint and First या दोन वेगवेगळ्या सूचना आणि त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. बॅंक अशा तर्हेने परस्पर खात्याच्या सूचना बदलणार असेल तर बॅंकेच्या एचडीएफसी विश्वासार्हतेबद्दल मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होते.
बॅंकेने केलेला छळ - बॅंकेने मला अचानक माझ्या खात्यात आवश्यक असलेली किमान रक्कम काही लाखांपर्यंत वाढवली आणि माझे खाते अपग्रेड केल्याचे कळवले. बरं हे करताना त्यांनी माझी संमती घेणे आवश्यक होते, ती पण घेतली नाही. मग आमच्याकडे एफडी ठेवा तेव्हा तुमचे खाते नो फ्रिल अकाउंट म्हणून डाऊन्ग्रेड होईल असे सांगितले.
तेव्हा एचडीएफसी शी व्यवहार करताना सावध रहा.
-राजीव उपाध्ये
प्रतिक्रिया
8 Oct 2025 - 5:18 pm | गामा पैलवान
युयुत्सु,
सावध केल्याबद्दल आभार. अचानक खाते श्रेणीवर्धित ( = अपग्रेड ) करणे व त्याकरिता शुल्क आकाराने हे दरोड्यासम आहे. राखीव पेढी ( = रिझर्व्ह बँक ) ने याची तातडीने दाखल घ्यायला हवी.
किमान रकमेचा स्पष्ट निर्देश जालखातेपानावर ( = ऑनलाईन वेबपेज वर ) व्हायला हवा. तसेच खातेरक्कम किमान पातळीखाली गेल्यास तशा अर्थाची सूचना ग्राहकास संपत्र, सानसंदेश, इत्यादि मार्गांनी पाठवावयास हवी. ती पूर्ववत करण्यासाठी काही दिवसांच्या अवधीही द्यायला हवा.
आ.न.,
-गा.पै.
8 Oct 2025 - 5:28 pm | युयुत्सु
नैतिक पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य वेळी रिझर्व बँकेला याबद्दल कळवणार आहेच.
दुर्दैवाची गोष्ट अशी की हा एक अनुभव नाही असे संतापचनक आणखी अनुभव आहेत.
8 Oct 2025 - 9:02 pm | अमरेंद्र बाहुबली
परवाच ३४२ रुपये कापल्याचा मेसेज आयडीबीआय ह्या पेढीने पाठवला, खाते तपासल्यावर कळले की pmjb अंतर्गत कट केले असे कळले, pmjb ही काय बला आहे, हे शोधल्यावर कळले की “ “प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना”, हे पाहून डोकेच फिरले तडक आयडीबीआय ला माझ्या परवानगी विना ही योजना माझ्या खात्यात लागू केलीच कशी रे माकडानो? म्हणून जाब विचारला, त्यांनी तातडीने माझ्या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत केले!
8 Oct 2025 - 9:51 pm | युयुत्सु
बापरे सगळं कठीणच आहे
9 Oct 2025 - 12:50 pm | कंजूस
प्रत्येक बँकेला मेसेज येतो की एवढी खाती जोडलीच पाहिजेत. बाकीचे काही बोलत नाहीत/ नकार देत नाहीत ती राहतात.
9 Oct 2025 - 1:08 pm | चौथा कोनाडा
आजच्या संगणक युगातील आर्थिक / अनागोंदीची दरोडेखोरीच ही ....
माझा ही अनुभव :
केवायसी, एक बँकानुभव
9 Oct 2025 - 11:33 pm | असंका
??
मंजे नक्की काय? फर्स्ट वाल्याने दोनदा सही करायची? आधी जॉइंट म्हणून आणि मग फर्स्ट म्हणून?
की आपल्याला फर्स्ट ऑर जॉइंट म्हणायचंय?
10 Oct 2025 - 12:32 am | असंका
आपण बॅंकेकडे या संदर्भात तक्रार केली का? त्याचा काय निकाल लागला?
तुम्ही इथे फक्त तुमची बाजु तीही अगदी आक्रमक पद्धतीत मांडली आहे.
एक शक्यता म्हणून असं झालं असेल का, की आपल्या मुळ खात्यावर परवानगी असलेल्या व्यवहारांची संख्या, शिल्लकेची मर्यादा इ. बाबी आपल्याच कडून ओलांडल्या गेल्या असतील, ज्यामुळे नियमानुसार आपले खाते "सर्व साधारण" खात्यात राहणे शक्य होत नसेल? आणि एक पर्याय आपल्याला सुचवला गेला असेल की मर्यादेत राहील एवढी शिल्लक खात्यावर ठेवून उर्वरित रकमेची मुदत ठेव करावी, जेणेकरून नियमानुसार आपले खाते परत एकदा, एक सर्व साधारण खाते म्हणून वर्गीकृत करता येउ शकेल?
10 Oct 2025 - 8:57 am | युयुत्सु
श्री० असंका
१. माझ्या मनातल्या बॅंकेबद्दलच्या भावना, व्यक्त झालेल्या भावनांच्या १०० पट तीव्र आहेत. तो आतापर्यंत आलेल्या अनेक अनुभवांचा साठलेला/एकत्रित परिणाम आहे. परवाचा अनुभव गवताची शेवटची काडी ठरली...
२. बॅंकेच्या दोन वेगवेगळ्या डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळ्या नोंदी का? याचं लेखी उत्तर मला अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही. तसेच यापूर्वी माझ्या परवानगीशिवाय खात्याचे अपग्रेडेशन कसे केले, या प्रश्नाचेही उत्तर मला मिळालेले नाही.
३. माझं ऑफिशियल कम्युनिकेशन बॅंकेने स्वीकारले नसल्याने मी एफ्डी मोडायचा निर्णय घेतला, काल माझ्या खात्यात मुद्दल आणि थोडे व्याज जमा झाल्याने माझ्यासाठी हा विषय संपला आहे. यापुढे मी एक छ्दाम कोणत्याही बॅंकेत एफ़डी म्हणून ठेवायचा नाही असे ठरवले आहे.
४. चौथा कोनाडा यांचा केवायसी अनुभव संतापजनक आहेच. हॉस्पीटल्सच्या असंवेदनशील कारभारामुळे जसा जनतेचा क्षोभ होतो, तसं जर बॅंकांच्या बाबतीत झालं तर बॅंका थोड्याफार सुधारतील. एरव्ही देशाचे भवितव्य कठीण असल्याचे पूर्वी बनलेले मत आता अधिकच तीव्र बनले आहे.
10 Oct 2025 - 9:24 am | असंका
माझ्या आयडी व्यतिरीक्त माझ्या प्रतिसादातील एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही.
10 Oct 2025 - 9:28 am | युयुत्सु
एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली आपल्या प्रतिसादातून दिसून येत नाही.
होय. हा विषय माझ्यासाठी संपला असल्याने आणि मी एफडी परत करायची नाही असा निर्णय घेतला असल्याने मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही.
10 Oct 2025 - 10:17 am | असंका
माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, की उत्तर देणं अडचणीचं आहे?
हा विषय आपण मिपावर मांडलेला आहेत. अर्धवट स्वरुपात मांडलेला आहेत. तरीदेखिल विषय स्पष्ट व्हावा म्हणून, आणि जेणेकरून नक्की काय झालंय ते समजावं म्हणून, आपल्याला कमीत कमी मेहेनतीत केवळ 'होय /नाही स्वरुपात' उत्तर देता येतील, असा प्रश्न तयार करून, माझा काही संबंध नसताना मी इथे मेहेनत घेतली आणि आता आपण एकदम म्हणता विषय संपला? विषय संपलाच होता तर इथे मांडलाच कशाला?
वर म्हणताय "मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही?" ही काय बिनकामाची चर्चा आहे का? तुम्ही एका संस्थेपासून जनतेला सावध करायचं म्हणताय ना? नक्की कशापासून सावध रहायचं ते समजायला नको?
10 Oct 2025 - 10:36 am | युयुत्सु
श्री० असंका,
तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ लावायला मोकळे आहात. मी विचारलेल्या प्रश्नांना बँक कोणतेही लेखी उत्तर देणार नाही, मी दिलेले पत्र स्वीकारणार नाही आणि मी मात्र उत्तरे देत बसायचे हा एकतर्फी न्याय मला मान्य नाही.
असे अर्धवट आणि खोडसाळ निष्कर्ष जेव्हा काढले जातात तेव्हा माझा चर्चा न करण्याचा किती योग्य आहे हे पटते.
10 Oct 2025 - 11:46 am | असंका
मला सोईचा अर्थ? मी म्हणजे काय एच डी एफ सी बॅंक आहे का? माझी काय सोय गैर सोय असणार आहे त्यात? तुम्हालाच काही मदत करता आली तर पहावं म्हणून विचारत होतो.
पत्र घेउन गेला होतात तुम्ही बँकेत, तर हेच मी आधी विचारत होतो ना, की तक्रार केली होतीत का? तुमच्या लेखात कुठे म्हणलं होतं तुम्ही की तुम्ही पत्र घेउन गेला होतात? आता इतक्या शेवटी पहिल्यांदा कळलं की तुम्ही काही एक पत्र घेउन गेला होतात. मग त्यांनी ते घेतलं नाही म्हणजे नक्की काय केलं? तुम्ही ईमेल का नाही केली? रजिस्टर पोस्टाने का नाही पाठवलं?
आणि
हे काय आहे?
तुम्ही प्रश्न कसे विचारले होते? लेखी? की तोंडी? लेखी प्रश्नांना लेखी उत्तर आणि तोंडी प्रश्नांना तोंडी उत्तर हा सामान्य व्यवहार आहे.
मी जे लिहिलंय तो प्रश्न आहे. निष्कर्ष नाही.
आणि विषय संपला हा निष्कर्ष असेल, तर ते तुम्हीच लिहिलंय. तेव्हा खोडसाळपणा जर असेल तर तो कोणाचा आहे ते उघड आहे.
अपशद्ब न वापरणे आणि अपमानास्पद न बोलणे, ही माझी व्यक्तिगत मर्यादा आहे. धन्यवाद.
10 Oct 2025 - 10:11 am | सुबोध खरे
मला कसलीही चर्चा करण्यात स्वारस्य नाही.
मग हा लेख केवळ लोकांना सावधान करण्यासाठी लिहिला आहे का?
कि
आपल्याला होणारी जळजळ कुठेतरी बाहेर काढण्यासाठी?
कारण असे अनुभव सर्वच बँकांकडून जगभर सर्वाना येत असतात.
त्यासाठीचे उपाय काय याची चर्चा लोकांना जास्त उपयुक्त ठरली असती.
10 Oct 2025 - 10:32 am | असंका
+१.
लेखाचं प्रयोजन काय हाच प्रश्न पडतोय.
कारण इथे समस्या नक्की काय हे कळलं तर योग्य ती उपाय योजना शोधायला, सुचवायला अनेक वाचक मदत करु शकतील.
10 Oct 2025 - 2:00 pm | आग्या१९९०
एका बड्या सरकारी बँकेने KYC साठी कागदपत्रे सादर करण्यास SMS केला. बँकेत जाऊन कागदपत्रे दिली. पाच मिनिटात KYC झाल्याचा SMS आला.
तीन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरसाठी बुक केले असता कंपनीकडून बुकिंग नंबर sms आला. दुसऱ्यादिवशी डिलिवरी मेसेज आला पण प्रत्यक्षात डिलिवरी दिली नाही, म्हणून चौकशी करायला गेलो तर KYC अपडेट नसल्याने डिलिवरी होणार नाही असे सांगितले. त्यांच्याकडील मोबाईलने माझ्या डोळ्याचे स्कॅन केले, लगेच मोबाईलवर OTP आला. तो त्यांनी टाकला . कुठलेही कागदपत्र न मागता झाले एका मिनिटात KYC. तासाभरात गॅस सिलेंडर दारात हजर.
बँकांना हे तंत्रज्ञान का वापरत नाही?
10 Oct 2025 - 2:06 pm | युयुत्सु
मुळात केवायसी ही प्रक्रिया 1760 वेळा करावी लागता कामा नये. केवायसी एकदा केलं की सगळीकडे त्याचा परिणाम दिसायला हवा.
10 Oct 2025 - 2:20 pm | आग्या१९९०
एखाद्याचा मृत्यूचा दाखला काढला की त्याचे आधारकार्ड आपोआप बाद होते. त्याच्या बँक खात्यात सरकारी योजनेतून मिळणारे लाभ बंद व्हायला हवे. परंतु तसे होताना दिसत नाही. बऱ्याच हयात नसलेल्या व्यक्तींचे आधारकार्ड बाद होत नाही. सरकारी डिजिटल भोंगळ कारभार ह्याला कारणीभूत आहे. आधारकार्ड बाद झाले की त्याला लिंक केलेले निवडणूक एपिक कार्ड बाद होऊन मतदार यादीतून नाव वगळले गेले पाहिजे. परंतु तसे का होत नाही समजत नाही.
10 Oct 2025 - 2:09 pm | अमरेंद्र बाहुबली
जगातली सगळ्यात हरा*** बँक, एक्सिस बँक माझे दरमहा १५० रुपये काहीही कारण न देत कापत होती, अनेक तक्रारी, खेटे घालूनही काही उपयोग झाला नाही, नंतर ग्राहक तक्रार मंचात एकामागे एक अनेक तक्रारी टाकल्या, इतक्या की बँकेने सगळे पैसे परत तर केलेच पण अकाउंट बंद झाल्यानंतर घरी डीडी पाठवून पुन्हा पैसे दिले!
10 Oct 2025 - 3:52 pm | चावटमेला
अॅक्सिस चं काय घेवून बसला आबा, सगळ्याच बँका चोर आहेत
(बँकांच्या मनमानी कारभाराला वैतागलेला) चावटमेला