गूढ उपरे पाहुणे

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
16 Sep 2025 - 1:26 pm

गेल्या काही वर्षांपासून खगोलात काही नाविन्यपूर्ण घटना घडत आहेत. म्हणजे आपल्या सूर्यमालेत बाहेरून येणाऱ्या काही वस्तू. २०१७ पासून, आपल्याला फक्त तीनच अशा वस्तू माहीत झाल्या आहेत ज्या दूर अंतराळातून आपल्या सूर्यमालेत आल्या आहेत.

पहिली होती ओउ मुआमुआ एक विचित्र, लांबट वस्तू, (धूमकेतू नव्हता कारण शेपूट नव्हती) जिचे स्वरूप समजून घेणे खगोलशास्त्रज्ञांसाठी एक मोठं आव्हान होतं. दुसरी वस्तू 'बोरिसोव्ह' होती, जी एका सामान्य धूमकेतूसारखीच होती. आणि सर्वात नवीन, ३ आय/अ‍ॅटलस '3I/ATLAS', एक मोठा आणि वेगळा धूमकेतू आहे. या नवीन धूमकेतू - ३ आय/अ‍ॅटलसचा ५८ किमी प्रतिसेकंद हा वेग खूपच जास्त वेग - हा इतका जास्त आहे की तो सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर आहे. याचा अर्थ, तो सूर्याभोवती फिरणार नाही, तर एकदा सूर्यमालेतून गेल्यावर तो पुन्हा कधीही परत येणार नाही. हा वेग आणि त्याचा प्रवासमार्ग यावरून हे स्पष्ट होते की तो आपल्या सूर्यमालेत तयार झालेला नाही, तर खूप दूरच्या आंतर-तारकीय विभागातून आलेला आहे. इतक्या वेगात जाणारी कोणतीही वस्तू मानव अजून बनवू शकलेला नाही. सर्वात वेगाने जाणार्‍या व्हॉयेजरचा वेग ही याच्या निम्माच आहे.

खगोलशास्त्रज्ञांचा मोठा वर्ग या वस्तूंना नैसर्गिकच मानतो, पण त्यांचे वेगळे गुणधर्म आणि प्रवासमार्ग पाहून माझ्यासारख्या अनेकांच्या मनात वेगळेच विचार येत आहेत. हे केवळ नैसर्गिक पदार्थ आहेत की त्यांच्यामागे आणखी काही गूढ कारण आहे? हे एलियन्सनी पाठवलेले यान असू शकते अशी शक्यताही आहे. मला वाटतं, या विषयावर अधिक विचार करायला हवा.

या आंतरतारकीय पाहुण्यांना समजून घेण्यासाठी 'डार्क फॉरेस्ट' (Dark Forest) सिद्धांत मांडला जातो. हा सिद्धांत 'फर्मी विरोधाभास' (Fermi Paradox) सोडवण्याचा प्रयत्न करतो. 'फर्मी विरोधाभास' म्हणजे जर विश्वात एवढ्या संस्कृती आहेत, तर मग आपल्याला त्यांचा संपर्क का होत नाही? 'डार्क फॉरेस्ट' सिद्धांत सांगतो की, या विश्वात प्रत्येक संस्कृती शांत आणि गुप्त राहते. कारण, जसे एका अंधाऱ्या जंगलात शिकारी शांत राहतात, तसे येथे प्रत्येक जण शांत राहतो, कारण कोणाचीही उपस्थिती लक्षात आल्यास आपल्यापेक्षा एक अधिक शक्तिशाली, पण अदृश्य संस्कृती नाश करू शकते किंवा आपल्याला वापरून घेऊ शकते.

या दृष्टिकोनातून विचार केल्यास, ओऊ मुआमुआ आणि ३ आय/अ‍ॅटलस यांचा शोध हा फक्त एक योगायोग नसू शकतो. हे फक्त नैसर्गिक खडक नसून, ते एका प्रगत संस्कृतीने इतर ताऱ्यांच्या प्रणालींचे सर्वेक्षण करण्यासाठी पाठवलेली तांत्रिक याने असू शकतात. या सिद्धांतानुसार, प्रत्येक संस्कृतीचा मुख्य हेतू जगणे आणि विस्तार करणे हा असतो. त्यामुळे, नवीन सापडलेली कोणतीही संस्कृती भविष्यात धोकादायक ठरू शकते.

आता हे परग्रह यान आहेत असे मानले, तर या वस्तूंचा प्रवासमार्ग एक मोठा पुरावा आहे. एक नैसर्गिक धूमकेतू आपल्या मूळ ताऱ्यांच्या प्रणालीतून बाहेर फेकल्यावर त्याचा मार्ग अनियमित असतो. पण एक अंतराळ यान मात्र विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक चालवले जाऊ शकते आणि तरीही ते आपल्यापासून लपून राहू शकते. 'ओउमुआमुआ'चा आकार सिगारेट किंवा सुईसारखा लांबट होता. नैसर्गिकरीत्या अशा आकाराची वस्तू तयार होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. याउलट, रॉकेट सारखी तांत्रिक उपकरणे अशा आकाराची असू शकतात. धूमकेतूची शेपटी (coma) किंवा धूळ-वाफेचा कोणताही मागमूस नव्हता. विचित्र प्रकार म्हणजे सूर्याजवळून जात असताना, ओऊ मुआमुआ चा वेग अचानक वाढला. धूमकेतूंमध्ये असे घडते जेव्हा त्यांच्यातील बर्फ वाफेत रूपांतरित होतो आणि गॅस बाहेर पडतो, ज्यामुळे त्यांना 'धक्का' (thrust) मिळतो. पण 'ओउमुआमुआ'मध्ये अशी कोणतीही क्रिया दिसली नाही. या सर्व गोष्टींमुळे 'ओउमुआमुआ'ला एका प्रगत संस्कृतीने पाठवलेले प्राथमिक सर्वेक्षण यान असावे असे वाटते.

'ओउमुआमुआ' आणि ३ आय/अ‍ॅटलस या दोन्ही वस्तूंनी आपल्या मार्गात पृथ्वीला अचूकपणे टाळले असे दिसते आहे. एका नैसर्गिक वस्तूला आपल्या सूर्यमालेतील सर्वात मनोरंजक ग्रहाला एवढ्या अचूकतेने टाळणे किती शक्य आहे? मला तरी हे नैसर्गिक वाटत नाही. 'डार्क फॉरेस्ट' सिद्धांतानुसार, एक परग्रह यान स्वतःला लपवण्यासाठी पृथ्वीला मुद्दाम बगल देऊ शकते. त्यात आपण तसे रेडियो वापरात भयंकर नॉइझी झालेलो आहोत म्हणजे आपण सर्वांना दिसत आहोत .

३ आय/अ‍ॅटलस आपल्या सर्वात जवळ येत असताना बरोब्बर सूर्याच्या मागे जाईल, ज्यामुळे ते काही काळासाठी आपल्या दृष्टीपासून दूर होईल. ही क्रिया हेतुपुरस्सरपणे केली गेली असावी का? याचा वापर वेगाची दिशा बदलण्यासाठी किंवा लहान आणि गुप्त यानांना निरीक्षण न करता तैनात करण्यासाठी होऊ शकतो. एखाद्या गुप्त मोहिमेसाठी शत्रू पासून अदृश्य होणे ही एक सामान्य रणनीती आहे. सूर्याच्या मागे जाणे एक धूर्त लपण्याचे ठिकाण ठरते.

३ आय/अ‍ॅटलसचा ५८ किमी प्रतिसेकंद हा वेग खूपच जास्त असामान्य वेग आहे. आपल्याकडे या वेगाने जाण्यासाठी कोणतेही तंत्र उपलब्ध नाही. हे वेग जर नैसर्गिक असले तर, काही लोकांच्या मते हा वेग एक हेतुपुरस्सर केलेला उपाय आहे, जेणेकरून आपल्याला हे यान आपल्या सध्याच्या तंत्रज्ञानाने थांबवता येऊ नये किंवा त्याचा अभ्यास करता येऊ नये. म्हणजे रफाल सारखे फायटर जेट जसे जास्त वेगाने जाते आणि परत येते हे तसेच आहे. ओउ मुआमुआच्या प्राथमीक निरीक्षणानंतर पृथ्वीवर कोणतीही प्रतिक्रिया दिसून न आल्याने, दुसऱ्या यानाला अधिक जवळून आणि शांतपणे निरीक्षण करण्याची परवानगी दिली गेली असावी असा तर्क मी नाही अ‍ॅव्ही लोएब यांनी मांडल आहे - मला तो काहीसा पटतो.

बहुतांश खगोलशास्त्रज्ञ या वस्तूंना नैसर्गिक धूमकेतूच मानतात. पण ओउ मुआमुआच्या बाबतीत परग्रहांचे यान असण्याचा सिद्धांत अजूनही पूर्णपणे नाकारला गेलेला नाही! ओउ मुआमुआचा वेगळा आकार, धूमकेतूच्या शेपटीचा अभाव आणि सूर्याला पार केल्यानंतर त्याचा वाढलेला वेग यामुळे काही शास्त्रज्ञांना वाटतं की ते एक सौर पाल किंवा सोलर सेल असू शकतं. ३ आय/अ‍ॅटलसला जरी शेपटी असली तरी त्याचे काही गुणधर्म अजूनही गूढ आहेत. उदा. त्याच्या शेपटीचे रंग बदल आहेत. त्यात लोह नाही आणि सायनाईड आहे.

असो, ३ आय/अ‍ॅटलसने आपल्याला तंत्रज्ञानाच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत.

अधिक माहिती येथे पहा:

विज्ञानविचार

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

16 Sep 2025 - 2:14 pm | सुधीर कांदळकर

आता पुढील बातमीची उत्कंठा लागली आहे. धन्यवाद.

अनन्त्_यात्री's picture

16 Sep 2025 - 2:26 pm | अनन्त्_यात्री

ओउ मुआमुआ यांस. स न वि वि:

A shape unseen, from suns unknown,
You tumbled through our lonely zone.
A visitor, a fleeting guest,
On cosmic currents, you were pressed.

Did you carry sights of distant stars?
Of worlds that know no earthly scars?
Of physics bent and skies unknown,
A different gravity, a different tone?

We chart your path, our senses strain,
A rocky form, a metallic stain.
Or something more, a coded thought?
A message that our planet sought?

You break the mould, a mystery,
A question mark in history.
A sign that we are not alone,
On this small, spinning, pale blue home.

Your journey, an unfinished tale,
Beyond our grasp, beyond the veil.
We send this poem, a fragile plea,
From a small Earth, to you, far free.

निनाद's picture

16 Sep 2025 - 2:54 pm | निनाद

कविता म्हणजे अगदी लेखाचे सार उतरवले आहे असे वाटले.

मस्तच माहिती सांगितली.याबाबत आणखीन माहिती पुढे यायला हवी.