नक्षत्रांचे देणे होते
द्यायचे राहिले
जगण्याच्या वाटेवर
काटेच भेटले
नक्षत्रांनी अव्हेरून
उल्का पाठविली
काट्यांशीच केली मैत्री
फुले त्यांची झाली
एकेका फुलाचे रंग
आठवत होतो
निर्माल्य फुलांचे झाले
-बेसावध होतो
निर्माल्य होताना फुले
नि:शब्द म्हणाली,
"खत होणे हेच थोर
भाग्य आम्हा भाळी
सृजनाच्या मृदेवर
आमुची पाखर
निर्मितीची उर्मी गाठो
एक नवा स्तर
पीक विलक्षणाचेच
येईल, तोवरी
नक्षत्रांनो थांबा,आज
रिक्त देणेकरी"
प्रतिक्रिया
20 Jul 2025 - 9:52 am | प्रसाद गोडबोले
का ?
21 Aug 2025 - 2:54 pm | निनाद
विषय छान आहे.
नक्षत्रांनी अव्हेरून
उल्का पाठविली
काट्यांशीच केली मैत्री
फुले त्यांची झाली
चमत्कृती आहे,
गझल होऊ शकेल.
24 Aug 2025 - 9:46 am | गणेशा
नक्षत्रांचे देणे होते
द्यायचे राहिले
जगण्याच्या वाटेवर
काटेच भेटले
छान...
पहिल्या दोन ओळींवरुन.. जगायचं राहिलं ह्या ओळी सुचल्या.. नंतर कधी post करेल
24 Aug 2025 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान लिहिते राहा. पुढील काव्य रचनेस शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे