गाभा:
हिंदी चित्रपटसृष्टीतील असामान्य निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते गुरूदत्त यांची आपल्याबरोबर चित्रपट करावा अशी शेवटची इच्छा होती असा दावा महागुरू सचिन पिळगावकर यांनी केला आहे.
अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywoo... वर.
प्रतिक्रिया
1 Aug 2025 - 11:28 am | विजुभाऊ
जे महागुरू शोले सिनेमाचे दिग्दर्शन करू शकतात. संजीव कुमारला त्यांची सही घरी येऊन घ्यावीशी वाटते. त्यांच्याबद्दल काय बोलावे.
त्याना सगल्या विषयातले सगळे काही समजते. इतकेच काय तर त्यानी ते शोधून काढलेले असते.
1 Aug 2025 - 11:30 am | विजुभाऊ
ट्रंप त्यात्यानी जे टेरीइफ लावले आहे त्याचा परिणाम म्हणजे आपले एक्स्पोर्ट कमी होईल असे वाटते.
पण सरकार त्यावर ठाम आहे. बहुतेक सरकारच्या हातात काही कळीचे मुद्दे असावेत.
चीन ने रेअर अर्थ मटेरीयल चे हत्यार ट्रेड डील साठी वापरले.
भारताकडे कोणते हत्यार आहे हे अजून उघड व्हायचे आहे
1 Aug 2025 - 12:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'महागुरु आणि विश्वगुरु' या चालू वर्तमानकाळातील अद्भुत,साहसी आणि मनोरंजनात्मक कल्पना आहेत. 'महागुरु आणि विश्वगुरु' हे केवळ शब्द नाहीत, ही एक जैविक प्रक्रियाही नाही. थेट 'परमेश्वराची विशेष 'कलाकृती' आहे, असे मानल्या जाते. परमेश्वराच्या कलाकृतीची चिकित्सा म्हणजे पाप असते. विषय संपला.
डिस्क्लेमर : वरील संपूर्ण प्रतिसाद काल्पनिक आहे, प्रतिसादाचा जिवित अथवा मृत व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-दिलीप बिरुटे
1 Aug 2025 - 12:05 pm | अमरेंद्र बाहुबली
:)
1 Aug 2025 - 12:18 pm | आग्या१९९०
अजैविक विश्वगुरूला ह्या विश्वात एकही जैविक शिष्य नाही.
1 Aug 2025 - 12:34 pm | कंजूस
हे असं का होतं?
.
तुलनेसाठी इतर कलाकारच नाहीत.
1 Aug 2025 - 12:37 pm | विजुभाऊ
एक विश्वप्रवक्ते देखील आहेत.
1 Aug 2025 - 12:38 pm | कंजूस
मद्रासमध्ये सिनेकलाकार राजकारणात जाऊन स्मारकं उभारली गेली. इकडे कुणी तसा प्रयत्न केला नाही. उलट राजकारणीही कलाकार झाले नाहीत. नैतर महाग्रू स्मारक झाले असते.
1 Aug 2025 - 5:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रम्प ह्यांना काही समजत नाही, लोकप्रियतेसाठी ते सर्व करत आहेत असे सुरूवातीला अनेकजण म्हणत होते. 'येतील नंतर लायनीवर' असे वाटले होते. पण ह्यांचे सध्याचे निर्णय पाहता सगळे काही विचारपूर्वक चालु आहे आणि ट्रम्प ह्यांना सल्ले देणारे बोलवते धनी पडद्याआड आहेत असे दिसतय.
“We have just concluded a Deal with the Country of Pakistan, whereby Pakistan and the United States will work together on developing their massive Oil Reserves,” Trump wrote.
“We are in the process of choosing the Oil Company that will lead this Partnership. Who knows, maybe they’ll be selling Oil to India some day!”
हा एवढा आत्मविश्वास येतोय कुठुन? आणी भारताबद्दल असे कुत्सित बोलायचे कारण काय?
https://www.dawn.com/news/1927725
आपले परराष्ट्र धोरण काहीतरी चुकतय ? की पाकिस्ताच्या राजकीय नेत्यांनी पडद्यामागे खेळी करुन मोठी बाजी मारलीय?
1 Aug 2025 - 7:07 pm | आग्या१९९०
अंबानीला कदाचीत ऑइल पार्टनर करणार असतील ट्रम्प. तसे झाले तर आपले सरकार आपण छान रांगतो हे दाखवून देईल.
1 Aug 2025 - 7:21 pm | चंद्रसूर्यकुमार
कृत्रिम बुध्दीमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स) च्या युगात पालकांपुढे कोणती आव्हाने आहेत याविषयी अभिनेत्री सोहा अली खानने बहुमूल्य मार्गदर्शन केले आहे. ते आजच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या होमपेजवर https://timesofindia.indiatimes.com/videos/spotlight/soha-ali-khan-opens... वर बघता येईल.
1 Aug 2025 - 7:41 pm | कंजूस
उपराष्ट्रपती कोणाला करणार?
शरद पवारांना करता येईल काय? ते होतील काय? आणि त्यातून फुली गोळाचा मोठाच खेळ होईल.
1 Aug 2025 - 7:55 pm | चंद्रसूर्यकुमार
अभिजीत बिचुकलेंचे राष्ट्रपतीपदाचे तिकिट दोनदा कापले गेले होते. तेव्हा फार वाईट वाटले होते. राष्ट्रपती नाही तरी त्यांना उपराष्ट्रपती तरी केले जावे अशी फार इच्छा आहे.
2 Aug 2025 - 4:06 am | सुक्या
आपले ह्यांना भयंकर अनुमोदन. ईतके दिवस प्रयत्न करत आहेत. काहीतरी मिळावे त्यांना. त्यात ते डॉ. पण आहेत. त्यांनी पी एच डी कशात केली आहे ते एकदा समजाउन सांगितले होते. पण मल ते काही समजले नाही. पुन्हा सांगता का असे विचारल्यावर अंगावर आले होते.
जर डॉ साहेबांना राष्ट्रपतीच व्हायचे असेल तर मी उपराष्ट्रपती या पदासाठी श्री डॉली चायवाला यांचे नाव सुचवतो. अगदी तळागाळातला माणुस आहे. जसे प्रतिभा पाटील यांना केवळ मराठी आहे म्हणुन पाठिंबा दिला होता तसे यांना पण देउ.
1 Aug 2025 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> उपराष्ट्रपती कोणाला करणार ?
कंजूस काका, गोबरयुगात कोणतीही गोष्ट तशी अशक्य नाही. पक्ष, निष्ठा, तत्वे, न्याय वगैरे या गोष्टी राजकारणात तशा चारित्र्याच्या राहिल्या नाहीत.
आपण पहाटे डोळे उघडले की, आश्चर्य वाटावा असा शपथविधी पाहिला. आपण गुहाटीला गद्दारांचा चोरलेले पक्ष पाहिला. चोरलेली चिन्ह, पक्षांतरे, पाहिली. न्यायदेवतेची वेगवेगळी भोवळ येऊन पडावीत असे 'सर्वोच्च' निर्णय पाहिले त्यामुळे उद्या कोणीही अनपेक्षित त्या पदावर विराजमान पाहिला तर आश्चर्य अजिबात वाटणार नाही.
-दिलीप बिरुटे
2 Aug 2025 - 11:49 am | अमरेंद्र बाहुबली
गोबरयुगात कोणतीही गोष्ट तशी अशक्य नाही.
:)ज्यांना इंग्रजी बोलता येये त्याना स्वतची लाज वाटणार आहे. :)
3 Aug 2025 - 10:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रज्ज्वल रेवण्णा यास विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत शनिवारी जन्मठेपेच्या शिक्षेसह आर्थिक दंड ठोठावला.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत थोरामोठ्यांनी त्याच्यासहित प्रचार केला होता. ती आठवण झाली.
देशाला तीसरी क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवायची असेल तर स्वदेशीचा मंत्र आवश्यक - प.मोदीजी.
एखाद्या प्रकल्पाविरोधात बोलल्यास शहरी नक्षली ठरवणार असाल, तर अटक करूनच दाखवा,' राज ठाकरे.
भारत- इंग्लंड क्रिकेट कसोटी रंगतदार अवस्थेत, इंग्लंडसमोर विक्रमी लक्ष्य गाठण्याचे आव्हान.
-दिलीप बिरुटे
5 Aug 2025 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतावरील आयातशुल्कात लक्षणीय वाढ करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी जाहीर केले. भारताने रशियाकडून तेलाची खरेदी सुरु ठेवली असून भारत नफेखोरी करीत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.
माय फ्रांड डोलांड, अब की बार ट्रम्प की सरकार, असे जरी आम्ही बोललो असलो. आपल्या आगमनाप्रित्यर्थ आम्ही भले आमची गरिबी लपवत तुमचं गुजरात मधे स्वागत केलं आणि त्याची जाणीव आपल्याला नसेल आणि आपण आम्हाला कायम धमकावत असता हे काही बरं नाही, आम्ही आमच्या जुन्या मित्रांना सोडणार नाही. आम्ही आपल्या कोणत्याही शुल्क वाढीच्या धमकीला भिक घालणार नाही. :)
-दिलीप बिरुटे
5 Aug 2025 - 11:26 am | चंद्रसूर्यकुमार
बिरूटे मास्तर, एक गोष्ट लक्षात आली आहे का? भारतावर टॅरीफ लावू, भारताने रशियाकडून तेल घेऊ नये, भारत ही डेड इकॉनॉमी आहे, आम्ही भारतावर आणखी टॅरीफ लावू हे सगळे स्वतः ट्रम्प बोलत आहेत- म्हणजे अमेरिकेच्या अगदी सर्वोच्च पातळीवरून ही बडबड चालू आहे. मोदी तर त्या बडबडीकडे ढुंकूनही बघत नाहीयेत. आपल्याकडून जे काही थोडेफार उत्तर त्या बडबडीला दिले जाते आहे ते आपल्या परराष्ट्रमंत्रालयाकडून जारी केलेल्या एखाद्या प्रसिध्दीपत्रकातून किंवा एखाद्या प्रवक्त्याकडून- म्हणजे अध्यक्ष-पंतप्रधान यांच्यापेक्षा कितीतरी कनिष्ठ पातळीवर. ट्रम्पने धमकावल्यानंतर युरोपिअन युनियन व्यापार करार करायला धावले मात्र आपण तर त्या धमकावण्याची दखल सुध्दा घेत नाही आहोत, असे करू नका आमचे नुकसान होईल अशी मोदींनी आर्जवे करावी, रदबदली करावी अशी अपेक्षा तात्यांची अपेक्षा असेल तर तसे काहीही झालेले नाही. ट्रम्पतात्यांचा अगदी तीळपापड त्यातून होत असेल इतका इगो त्यांच्यात भरलेला आहे आणि त्यावर भर म्हणजे ते त्या पदावर जाऊन बसले आहेत- म्हणजे आणखी इगो.
जे मोदी अमेरिकेच्या अध्यक्षांना भीक घालत नाहीत त्यांच्यापुढे तुमच्यासारखे लोक अगदी चिरकूट आहेत- खरं तर चिरकूटही नाहीत. त्यामुळे बोला किती बोलायचे ते. गेली ११ वर्षे तेच करत आहात. आणखी काही वर्षे करा. हाकानाका
5 Aug 2025 - 11:47 am | अमरेंद्र बाहुबली
बोलायला काहीतरी अभ्यासही लागेल ना? काय बोलणार मोदीजी?
5 Aug 2025 - 12:08 pm | आग्या१९९०
सरड्याची धाव ' टेलीप्रॉम्प्टर ' पर्यंत, अभ्यास दूरची गोष्ट. गप्प बसून राहण्याशिवाय पर्याय नाही. तोंड उघडले तर अज्ञानाचा ( अदान्याचा? ) पँडोरा बॉक्स उघडा होईल.
5 Aug 2025 - 1:20 pm | अमरेंद्र बाहुबली
खो! खो!
5 Aug 2025 - 2:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
भ्क्तांना फेकाफेकीची उर्जा कुठून मिळते याचं कायम आश्चर्य वाटतं.
गेली अकरा वर्षाच्या काळात दहा वेळेस अमेरिका भेटीचा आपलाच
एक मोठा रेकॉर्ड असावा. परराष्ट्रीय धोरणात मैत्रीचे पर्व वगैरे.
भले आपल्याला निमंत्रण दिलं नसेल शपथविधीचं. पण
आपण गळ्यात पडणे, मिठ्या मारणे, अब की बार ट्रम्प की सरकार
कोणतीही कसर सोडली नाही. आणि म्हणे भिक घालत नाही.
चालू द्या.
-दिलीप बिरुटे
5 Aug 2025 - 3:15 pm | अभ्या..
हीहीही
भाडीपातला आई, मी आणि मधला एक अजरामर सीन आठवला.
.
आई : काय चाललेय अनि?
अनि: अग मी पबजी खेळतोय. ह्यात मारायचे असते एकमेकांना, जो शेवटी जिवंत राहतो त्याला डिनर मिळते.
आई: मग, दाब ना बटन, कर काहीतरी..
अनि : अग, माझी स्ट्रॅटेजी आहे, मी किनई एका कोपर्यात शांत लपून झोपून जातो. सगळे एकमेकाशी लढतात अन मरुन जातात. मला काहीच करावं लागत नाही.
आई: स्ट्रॅटेजी नाही, त्याला आळस म्हणतात, आळस.
.
.
सध्या आळसाला आणि कर्तुत्वशुन्यतेलाच मास्टरस्ट्रोक म्हणतात बहुधा...
5 Aug 2025 - 3:18 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क! भारी. :)
5 Aug 2025 - 4:19 pm | चंद्रसूर्यकुमार
आणि ऐसीच्या खरडफळ्यावर तो सदस्य तिथे नसताना त्याच्याविषयी गॉसिप करण्याला काय म्हणतात रे अभ्या..? एकदम कर्तबगारीच की नाही?
बादवे त्या टी शर्ट्सचे काय झाले?
5 Aug 2025 - 4:33 pm | अभ्या..
ऐसीच्या खरडफळ्यावर तो सदस्य तिथे नसताना त्याच्याविषयी गॉसिप करण्याला काय म्हणतात रे अभ्या..? एकदम कर्तबगारीच की नाही?
या की तिकडं. सांगतो काय म्हणतात ते.
.
बादवे त्या टी शर्ट्सचे काय झाले?
तुमचं काय होतं काय त्यात?
.
आणि स्पश्ट सांगतो एकदाच. इथे ज्याच्यावर लिहिताय तेच लिहा. पर्सनल जायचे नाही.
वैयक्तिक काय मिटवायचे फिटवायचे असेल तर बाहेर. जिथल्या तिथे. कुणी अडवले नाही तिथे.
5 Aug 2025 - 4:35 pm | चंद्रसूर्यकुमार
दहशतवाद करणे वाईट आहे-- इति ओसामा बिन लादेन
बरंच झालं असल्या माणसाच्या मागे लागावे लागले नाही.
5 Aug 2025 - 4:39 pm | अभ्या..
बरंच झालं असल्या माणसाच्या मागे लागावे लागले नाही.
बरंच झालं माझंपण.
5 Aug 2025 - 4:44 pm | चंद्रसूर्यकुमार
हे एकदा काही कारण नसताना माझ्यावर दोषारोप करायच्या आधी बोलायचे,.. म्हणजे ३१ जानेवारी २०१८ पूर्वी त्यानंतर नाही.
अभ्या या माणसाने माझ्याविरूध्द विनाकारण असले काही ऐसीच्या खरडफळ्यावर लिहिले होते. ते दोन दिवसात माझ्यापर्यंत आले.
असो.
5 Aug 2025 - 4:50 pm | अभ्या..
हायला.
बरोबर होतं की मग.
.
लिस्ट वाढवायला पाहिजे आता.
आणि इथंच.
.
आणि मुख्य म्हणजे ते आयडीवरच आहे ना?
पर्सनल कोण गेलं?
5 Aug 2025 - 4:55 pm | अभ्या..
आणि अशा लै ग्रुपातले, व्हाटसापावरचे, फेस्बुकाचे स्क्रीनशॉटस आहेत माझ्याकडे. पण फुकटच्या माहीतीच्या भांडाराची मातब्बरी सांगत कण्हत बसायची सवय नाही.
आठ वर्षाने मोट्ठे झालाच आहात. अजून व्हा.
5 Aug 2025 - 4:58 pm | चंद्रसूर्यकुमार
या माणसामुळे मिपावरील अनेक चांगले सदस्य लिहिणे बंद झाले. एकेकाळी दर्जेदार असलेल्या मिपाची रया बरीच गेली त्यात या माणसाचा हात आहे हे मालकांना अनेकदा सांगूनही त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. आता मिपाची अशी रया जावी अशी त्यांचीच तशी इच्छा असेल तर इतर सदस्य बापुडे काय करणार?
5 Aug 2025 - 5:10 pm | अभ्या..
या माणसामुळे मिपावरील अनेक चांगले सदस्य लिहिणे बंद झाले.
माझ्यामुळे गेली ह्याची फक्त तीन पुराव्यासहीत उदाहरणे द्या प्लीज, तुम्ही सोडून (कारण तुम्ही आहात अजून)
.
एकेकाळी दर्जेदार असलेल्या मिपाची रया बरीच गेली.
तुम्ही नव्हतात त्या एकेकाळी.
.
आता मिपाची अशी रया जावी अशी त्यांचीच तशी इच्छा असेल तर इतर सदस्य बापुडे काय करणार?
अॅहॅ रे सहानूभूती.. अॅहॅ रे बापुडवाणेपणा.
.
भारीच हं
5 Aug 2025 - 5:26 pm | कपिलमुनी
तुमच्या आणि श्रीगुरुजींच्या आणि एकजण आहे ..त्यांच्या भाजप अजेंडा आणि राजकारणी चिखलामुळे लोक यायचे बंद झाले.. मालकांनी किती वेळा वॉर्निंग दिली पण शेपूट वाकडेच.. शेजारी एक जण उडाला तेव्हा गप झाला..
स्वतःची घाण दुसऱ्याच्या दारात टाकू नका..
5 Aug 2025 - 5:32 pm | चंद्रसूर्यकुमार
बरं.
मी काय करावे आणि नाही हे तुम्हाला कोणी विचारले आहे का? मग कशाला उगीच मधे पचकत आहात?
5 Aug 2025 - 5:52 pm | कपिलमुनी
दुसऱ्यांनी लिहिले की पचकण वगैरे..
आणि तुमचे नाव नसताना शेटजीचे उडते तीर घेऊन वैयक्तिक टीका करायला काय म्हणालं ?
उपटणे ?
5 Aug 2025 - 5:56 pm | अभ्या..
वॉव.
त्याला बापुडवाणे म्हणतात म्हणे...
5 Aug 2025 - 7:46 pm | चंद्रसूर्यकुमार
मोदी (तुमच्या भाषेत शेटजी) भारताचे पंतप्रधान म्हणजे पब्लिक फिगर आहेत. अशा पब्लिक फिगरविषयीच्या चर्चेत कोणीही (समर्थक / विरोधक) सामील होऊ शकतो हा अगदी कॉमन सेन्स झाला. अशा पब्लिक फिगरविषयीच्या चर्चेत काही लिहिणे आणि मिपावरील एका सदस्याने दुसऱ्याला तू असं कर आणि तसे करू नको हे सांगणे एकच? वा वा
5 Aug 2025 - 4:04 pm | चंद्रसूर्यकुमार
जिथून गु लामांना बूट चाटायची उर्जा मिळते तिथून नक्की नाही.
मोर नाचत सुंदर असला तरी नाचताना त्याचा पार्श्वभाग उघडाच असतो. रेकॉर्ड वगैरे काही नाही. मनमोहन दहा वर्षात दहा वेळेला अमेरिकेला गेले होते.
तुम्हाला आणखी काही वर्षे असाच चडफडाट करत राहावा लागणार आहे. तो करत बसा.
सेम टू यू.
5 Aug 2025 - 1:07 pm | चंद्रसूर्यकुमार
बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर खान त्याच्या राहत्या इमारतीचे रिडेव्हलपमेन्ट होणार असल्याने नवी इमारत पूर्ण होईपर्यंत भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे. त्याने चार अपार्टमेंट भाड्याने घेतली असून दरमहा साडेचोवीस लाख भाडे तो भरणार आहे.
अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywoo... वर
5 Aug 2025 - 1:22 pm | अमरेंद्र बाहुबली
वेडारे वेडा! पुण्यात सहकार नगर भागात २ बीएचके २० हजारात सहज मिळाला असत, ४ घेतले असते तर ८० हजार लागले असते जास्तीत जास्ती. २४ लाख घालवले. खिक्क!
5 Aug 2025 - 3:08 pm | चंद्रसूर्यकुमार
त्यापेक्षा सांगलीत विश्रामबागेत २ बीएचके १० हजारात मिळाला असता. जत किंवा कवठे महांकाळमध्ये आणखी स्वस्तात. जाडर बोबलाद, कोंत्याव बोबलाद किंवा माधळमुठीमध्ये त्याहूनही स्वस्तात.
फक्त जाडरबोबलादमध्ये आमिर खान पाच वर्षे राहणार हे चित्रच डोळ्यासमोर उभे राहात नाही :)
5 Aug 2025 - 3:17 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क! ह. ह. पू. वा.
तिकडे धुळ्यात तर २५ हजारात अख्खा बंगला भाड्याने मिळाला असता. वर फावल्या वेळात नकली दारू बनवणे, डांबरचोरी, हायवेला ट्रका अडवून लुटणे, गांजा हेरोइन मध्य प्रदेशातून आणून स्मगल करणे, गुजरातला दारू पुरवणे, गुटख्याचा काळाबाजार असले जोडधंदेही करता आले असते. बंगल्याचे भाडेही निघाले असते वर चार पैसे गाठीशी आले असते. पण हे कळेल तर तो आमिर खान कसला?
10 Aug 2025 - 10:56 am | असंका
आप्ल्याला जाडर बब्लाड माहित आहे!! प्रभू आपण कोण आहात....वरच्या ऐसीच्या लिस्त मधील एक नाव आपले आहे असं दिसतंय. पण त्यातील प्रत्येकाशी माझा कधी ना कधी इथे वाद झालेला आहे. तरी हे कबूल करीतो, की आपल्या ज्ञानाने मी थक्क झालो आहे!!
जाडर बबलाद हे माझ्या आठवणीतील सर्वात रम्य गाव आहे. शब्दशः वाळवंटातील ओअॅसिस....
10 Aug 2025 - 12:07 pm | चंद्रसूर्यकुमार
अरे वा.
मला त्या गावाचे नुसते नावच माहित आहे. अनेकदा वाटायचे की कधीतरी जाऊन ते गाव कसे आहे ते बघावे पण कधीच तिथे जायचा योग आला नाही.
मी काही वर्षे सांगलीत राहायला होतो. तिथल्या स्थानिक पेपरांमधून सांगली (आणि काही प्रमाणात कोल्हापूर) जिल्ह्यातील गावांची एकेक नंबरी नावे कळली. जादर बोबलाद हे त्यातीलच एक. बाकीची येडे निपाणी, येडे मच्छिंद्र, कोंत्याव बोबलाद, माधळमुठी, कवठे पिरान, तालुक्याचे ठिकाण कवठे महांकाळ, गैबी कुडुत्री, सेनापती कापशी वगैरे.
काय राव.. ओळखलं नाही का मला? मी सत्यम. बापूंचा थोरला. अधिक माहितीसाठी https://www.youtube.com/watch?v=eS8a8qor20I हा व्हिडिओ जरूर ऐका ही विनंती.
5 Aug 2025 - 5:28 pm | चंद्रसूर्यकुमार
नवी मुंबईत कोपरखैरणे येथे एका १६ वर्षांच्या वृध्द कुत्र्याला काठीने अमानुष मारहाण करणार्याला तिकडच्या लोकांची बदडून काढले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/uno-reverse-man-beats-elderly-...
लोक कसे इतके निर्दय होतात समजत नाही. बरं झालं त्या माणसाला बदडून काढले गेले. तो माणूस समजा ८० वर्षांपर्यंत राहिला तर तेव्हाही त्याला आणखी एकदा बदडण्यात यावे असे फार वाटते कारण कुत्र्यांमधील १६ वर्षे हे वय हे साधारणपणे माणसांमध्ये ८० वर्षांच्या वृध्दाइतके असते.
5 Aug 2025 - 5:42 pm | कंजूस
Trump च्या धाकदपटशाला आज मोदीने उत्तर दिले आहे. "रशियाकडून तेल घेतल्यास दंड.... "वगैरे असमर्थनीय आहे. ( इंडिया टुडे चानेल.)
१. भारत सरकार जरा नमतं घेण्याचं कारण मला वाटतं की कित्येक भारतीय अमेरिकेत बी१/२ वगैरे विजावर आहेत. आणखीही कारणं असू शकतील. कांग्रेसचे धोरण काय हेसुद्धा कळले पाहिजे. विरोधी पक्ष असले तरी ते भारतातच आहेत.
२. भारतातील निवडणुकांसाठी अमेरिकेची आर्थिक मदत येत होती ती केव्हापासून ते माहीत नाही पण ती आता बंद आहे. ( ती कोणी बंद केली? भारताने की अमेरिकेने?)
३. गूगल आणि मेटा कंपन्यांना भारतात वार्षिक फी आकाराला ट्रंप भाग पाडेल का?
5 Aug 2025 - 8:51 pm | आग्या१९९०
Trump च्या धाकदपटशाला आज मोदीने उत्तर दिले आहे.
नाही दिले. तेव्हढी हिम्मत नाही.
5 Aug 2025 - 8:17 pm | रात्रीचे चांदणे
भारत नमत घेण्याचं कारण म्हणजे अमेरिकेला आपली जेव्हढी गरज आहे त्यापेक्षा आपल्याला त्यांची जास्त गरज आहे. दुसरं म्हणजे आपल्याकडे अमेरिकेची अडवणूक करायला काहीच नाही. चीन कडे rare earth आहेत तसा हुकमी एक्का आपल्याकडे नाही.
आणि महत्वाचं म्हणजे ट्रम मूर्ख माणूस दिसतोय आणि त्याला प्रचंड इगो पण आहे. कसही असला तरी आहे अमेरिकेचा अध्यक्ष. चीन सोडून जवळ जवळ सगळे देश त्याच्यासमोर वाकत आहेत. आपण अजून तरी ताठरतेने उभे आहोत.
बाकी मोदी ट्रम्पच्या वक्तव्याना भीक घालत नाही म्हणणे योग्य वाटत नाही. फक्त ट्रम्प सारखं समाज मध्यमावर व्यक्त होता येत नाही कारण आदीच येडा असलेला ट्रम्प जास्तच चेकळेल. Backdoor ला चर्चा नक्कीच चालू असणार.
सध्याच सरकार नक्कीच मार्ग काढेल अशी आशा आहे.
5 Aug 2025 - 9:38 pm | चंद्रसूर्यकुमार
त्यासाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ भारतात २५ तारखेला येणार आहे ना? आपले शिष्टमंडळ तिथे जाणार नाही तर त्यांचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे- हा फरक मोठा आहे.
असे काही नाही. सगळ्या देशांना एकमेकांची गरज आहे आणि ते समजत नाही ते नेते मूर्ख आहेत.बाकी अडवणूक करायचेच म्हटले तर आपल्याकडेही बरेच काही आहे. एक तर सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आहे की विविध जागतिक संघटना एकमेकांवर वचक ठेवायला वापरल्या जात आहेत. उदाहरणार्थ क्वाड ही संघटना चीनवर वचक ठेवायला तर ब्रिक्स ही संघटना अमेरिकेवर वचक ठेवायला. चीन आधीच खूप मोठा झाला आहे तो अमेरिकेला आणखी मोठा व्हायला नको असेल तर त्या खेळात अमेरिकेला आपली मदत लागेलच. आणि त्या प्रकारात भारतही मोठा व्हायला नको म्हणून अमेरिका पाकिस्तान, बांगलादेश या आपल्या शेजारी प्रदेशांमध्ये काड्या घालून आपल्याला त्रास देत आहे. अर्थात हे सगळे तर्क त्यामुळे याविषयी एकाला एक वाटेल तर दुसर्याला दुसरे.
पण एकदम बिनतोड मुद्दा म्हणजे भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे. १३-१४ मे २०२५ रोजी म्हणजे ऑपरेशन सिंदूर तात्पुरते थांबून ३-४ दिवस झाले असताना गुरगावमध्ये ट्रम्प टॉवरमधील जवळपास ३०० फ्लॅट्स एकाच दिवसात बुक झाले होते. त्या सगळ्यांची मिळून किंमत होती ३००० कोटी+. भारतात जीवनमान उंचावत असल्याने प्रत्येक उत्पन्नाच्या ब्रॅकेटमध्ये कोट्यावधी लोक मिळतील. नुसते विद्यार्थीच म्हटले तर २०-२५ कोटी विद्यार्थी नक्कीच असतील. यापुढील काळात ऑनलाईन शि़क्षण वाढत जाणार आहे त्यामुळे ती खूप मोठी बाजारपेठ आहे. हेच इतर अनेक गोष्टींविषयी. त्यामुळे भारताला दूर लोटणे अमेरिकेलाच परवडणार नाही. तसेच भारतातून मोठ्या प्रमाणावर जेनेरीक औषधे अमेरिकेत निर्यात होतात. चॅटजीपीटी तो आकडा अमेरिकेतील एकूण जेनेरीक औषधांच्या ४०% म्हणत आहे. मग अमेरिकेची अडवणूक करण्यासारखे आपल्याकडे काहीच कसे नाही?
मागे ट्रम्पतात्यांनीच मोदींना 'टफ नेगोशिएटर' म्हटले होते. आणि स्वतः तात्या मोठे बिझनेसमन असल्याने वेगवेगळी शेकडो-हजारो डील त्यांनी आतापर्यंत केली असतील हे नक्की. अशावेळेस थोडे गीव्ह अॅन्ड टेक होते हे तात्यांना कळत असूनही कळत नसल्यासारखे ते करत आहेत की काय समजत नाही. एक तर एकच नाही तर अनेक वेगवेगळी जाहीर वक्तव्ये देऊन तात्यांनी समजा मोदींना तडजोड करायची इच्छा असेल तरी तो मार्ग कठीण करून ठेवला आहे. त्याचे कारण आता मोदी तडजोड करायचे म्हणाले तरी मग मोदींनी मान तुकवली वगैरे गोष्टी बोलल्या जातील आणि राजकीय दृष्ट्या त्यांना ते परवडणार नाही. मी अमेरिकेतील वॉलमार्ट शेवटचे बघितले होते डिसेंबर २००७ मध्ये. तेव्हा अर्ध्याहून जास्त गोष्टी मेड इन चायना असायच्या. मेड इन अमेरिका गोष्टी शोधाव्या लागायच्या. आताची परिस्थिती काय हे माहित नाही पण त्या परिस्थितीत अमेरिकेच्या दृष्टीने काही सुधार झाला आहे असे वाटायला काही आधार आहे असे वाटत नाही. खुळ्यासारखे सगळ्या आयातींवर टॅरीफ लावून त्या गोष्टी आपल्याच नागरीकांसाठी तात्या महाग करत आहेत हे त्यांना समजत नाहीये का?गेल्या ४० वर्षात अमेरिकेतील मॅन्युफॅक्चरींग खूपच कमी झाले आहे. समजा मेक अमेरिका ग्रेट अगेन असे म्हणत टॅरीफ लावत सुटले आणि महाग झालेल्या मेड इन चायना आणि इतर वस्तूंना सब्स्टिट्यूट म्हणून मेड इन अमेरिका वस्तूच नसतील तर अमेरिकन लोकांनाच झक मारत त्याच आयात केलेल्या वस्तू महाग दराने खरेदी कराव्या लागणार आहेत.
समजा अमेरिकेशी ट्रेड डील झाले तरी शेतीसंबंधीत (जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आणि दूधाचे पदार्थ) भारतात येऊ देणार नाही हे आपले धोरण झाले. तसेच तात्यांच्या सांगण्यावरून आपण रशियाकडून तेल घेणे बंद करणार नाही हे पण महत्वाचे धोरण आहे. हे तीन मुद्दे सोडले तर मग कोणत्या वस्तूवर किती टक्के टॅरीफ लावावा वगैरे मुद्द्यांवर चर्चा करायला काहीच हरकत नाही. तसेही टॅरीफ लावून आपल्याच लोकांसाठी आपण वस्तू महाग करत असतो. तसे व्हायला नको. त्यामुळे भारताने टॅरीफ कमी करावा अशी अमेरिकेची अपेक्षा असल्यास त्यात आपल्या दृष्टीनेही फार काही गैर आहे असे वाटत नाही. पण त्या बरोबरच रशियन तेलाचा वेगळाच मुद्दा जोडून आणि त्या मुद्दावर चारचार वेळा भर देऊन तात्यांनी ट्रेड डीलमध्ये प्रगती व्हायची शक्यता खूपच कमी केली आहे. मोदी स्वतःची प्रतिमा एक कणखर नेता म्हणून लोकांपुढे यावी यासाठी प्रयत्न करत असतील तर (ते खरोखरच कणखर नेता आहेत की नाही हा या चर्चेत बाह्य मुद्दा झाला) आता ट्रेड डीलच्या बदल्यात रशियन तेल घेणे बंद करणे मोदींना कसे काय परवडणार आहे?
एकूणच अती बडबड करून आपल्यालाच हवे ते व्हायच्या मार्गात तात्यांनी अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत. एका अर्थी तात्या हे अमेरिकेचे संजय राऊत आहेत असे बर्याच जणांनी सोशल मिडियावर म्हटलेले बघितले ती उपमा अगदी योग्य आहे.
6 Aug 2025 - 10:10 am | चंद्रसूर्यकुमार
ट्रम्पतात्या भारताकडून रशियन तेलाच्या खरेदीवर फुत्कार सोडत आहेत तर मग आपण (म्हणजे अमेरिका) रशियाकडून रसायने आणि खते आयात करतो त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे असा प्रश्न ए.एन.आय च्या एका पत्रकाराने त्यांना विचारल्यावर त्यांचे उत्तर होते- "याविषयी मला काहीही माहित नाही. मला तपासून बघावे लागेल".
https://x.com/undefined/status/1952877566047449426?ref_src=twsrc%5Etfw%7...
हा माणूस दिवसेंदिवस अधिकाधिक हास्यास्पद आणि तितकाच धोकादायकही होत चालला आहे. इतके दिवस तात्यांचा वेडाचार अमेरिकेपुरता मर्यादित होता त्यामुळे माझ्यासारख्यांचे फारसे बिघडत नव्हते. पहिल्या टर्ममध्ये तात्या आपल्यासाठी बर्यापैकी चांगले अध्यक्ष होते. त्यांच्या पहिल्या कारकिर्दीत डोकलाम आणि गलवान हे दोन मोठे संघर्ष चीनविरोधात झाले तरी त्यावेळी तात्यांनी एक चकार शब्द आपल्याविरोधात उच्चारला नव्हता. तसेच पहिल्या टर्ममध्ये अमेरिकेबाहेर फारसे नाक त्यांनी खुपसलेही नव्हते. त्यामुळे त्यांची दुसरी टर्मही आपल्याला अनुकूल असेल असे वाटून अमेरिकेत खुळाचार चालू असला तरी आपल्याला अनुकूल असतील तर मग आपले काय बिघडते असे म्हणत त्यांचे समर्थनही करत होतो. पण आता हा माणूस आपल्या देशालाच नाही तर पूर्ण जगाला त्रासदायक ठरायला लागला आहे. मध्यंतरी रशियाविरूध्द अणुयुध्दाविषयी पण अचाट वक्तव्य त्यांनी केले होते. अणुरेणूंमध्ये प्रचंड इगो भरलेल्या या इसमाला अमेरिकेचे अध्यक्ष या जगासाठी सगळ्यात महत्वाच्या पदावर ठेवणे धोकादायक ठरेल.
हा मनुष्य लवकरात लवकर इम्पिच व्हावा असे वाटते.
6 Aug 2025 - 11:27 am | अमरेंद्र बाहुबली
आपले परराष्ट्र धोरण माती खाते आहे, तात्याला दोष कशाला द्या?
6 Aug 2025 - 12:02 pm | सुबोध खरे
आपले परराष्ट्र धोरण माती खाते आहे, तात्याला दोष कशाला द्या?
भुजबल बुवा
परराष्ट्र धोरण काय आणि कसे हवे ते जरा स्पष्टपणे सांगता काय?
6 Aug 2025 - 3:08 pm | अमरेंद्र बाहुबली
जरा आदर्श घ्या काँग्रेसच्या सरकारचा!
6 Aug 2025 - 6:45 pm | सुबोध खरे
परराष्ट्र धोरण काय आणि कसे हवे ते जरा स्पष्टपणे सांगता काय?
काँग्रेस चा आदर्श म्हणजे नक्की काय ते सांगा कि
रेनकोट घालून अंघोळ कशी करायची कि संसदेवर हल्ला झाला तेंव्हा अतिकडक महाभयंकर आणि महाकड्क अतिभयंकर खलिते पाठवायचे आणि अमेरिकेकडे रडत रडत जायचं?
एकंदर राहुल गांधींचा आदर्श घ्यायचा तर मग दर निवडणुकीनंतर बँकॉक किंवा इटलीला जायचं आणि भारतावर हल्ला झाला कि चीन बरोबर गुप्त समझोता करायचा?
नक्की कसं ते सांगा.
6 Aug 2025 - 6:50 pm | अमरेंद्र बाहुबली
संसदेवर हल्ला झाला तेंव्हा अतिकडक महाभयंकर आणि महाकड्क अतिभयंकर खलिते पाठवायचे
गुडघे टेकून अतिरेकी सोडू नये किंवा गुजरातवर ड्रोनहल्ले झाले म्हणून गांगरून जाऊन सिझफायर करू नये. :)
6 Aug 2025 - 6:58 pm | सुबोध खरे
गुजरातवर ड्रोनहल्ले झाले म्हणून गांगरून जाऊन सिझफायर करू नये
भुजबळ बुवा
याला काही पुरावा?
कि आपला नेहमी सारखं च फुक्या मारणं आणि विचार न करता कळफलक बडवणं?
6 Aug 2025 - 7:03 pm | अमरेंद्र बाहुबली
गुजरातवर ड्रोन हल्ले झाले ह्याचाही पुरावा मीच आणून द्यायचा व्हय? मग तुमच्या हातातल्या लाखाच्या आयफोनचा काय उपयोग?
6 Aug 2025 - 7:16 pm | सुबोध खरे
गुजरातवर ड्रोन हल्ले झाले,
ड्रोन हल्ले सीमेवरच्या सर्वच राज्यात झाले पण त्यामुळे सीझ फायर झालं ह्याचा काही पुरावा आहे ?
कि असं च आपलं (नेहमीसारखं विचार न करता) कळफलक बडवणं?
बाकी आकाश क्षेपणास्त्रे, आकाशतीर प्रणाली, बोफोर्स एल ७० तोफा, तंगूश्का आणि त्याचा वापर याबद्दल एकदा कळफलक बडवून गुगलून पहा.
(S ४०० चा ड्रोन साठी वापर झालेला नाही)
6 Aug 2025 - 7:53 pm | अमरेंद्र बाहुबली
ड्रोन हल्ले सीमेवरच्या सर्वच राज्यात झाले पण त्यामुळे सीझ फायर झालं ह्याचा काही पुरावा आहे ?
जे लोक विमान पाडले गेले हे लपवून ठेवतात, अतिरेक्यांचे खोटे फोटो दाखवतात, अतिरेकी कुठून आले कुठे गेले हे देशापासून लपवून ठेवतात. पुलवामावेळी rdx कुठून आले ते लपवून ठेवतात, सत्यपाल मलिक त्यावर काही बोलू लागले तर इडी सोडून त्याना त्रास देतात ते लोक सिझफायरचे कारण देशाला सांगतील असे तुम्हाला वाटते? इतके भोळे तुम्ही कधीपासून झालात?
6 Aug 2025 - 8:46 pm | सुक्या
नाही नाही .. असे काही झालेच नाही. सगळे खोटे बोलत आहेत. सगळे पुरावे खोटे आहेत. आमचे राहुल म्हणाले ना .. सगले खोटे आहे .. मग सगळे सगळे खोटे आहे.
बाकी मोदी फट्टूस आहेत. पाकीस्तान ने ड्रोन पाठवले तेव्हा सगळे भयभीत झाले. बंकरात लपुन बसले. म्हणुन सिझ्फायर झाले. बाकी आकाश, आकाशतीर, बोफोर्स, तंगूश्का हे सब झुट है.
(कशाला त्यांच्या नादी लागता. "व्हिलेज ईडीयट" काय असते ते माहीत आहे तुम्हाला. उगा आपले श्रम वाया घालवु नका)
7 Aug 2025 - 10:14 am | सुबोध खरे
मला वाटलं भुजबळ नव्या अवतारात सुधारले असतील पण कसलं काय?
जुनी दारू नव्या वेष्टणासहितच आहे.
खांद्याच्या वरच्या अवयवांचा वापरच करायचा नाही असं ठरवलंच असेल तर कोण काय करू शकतं?
सोडूनच द्यायचं आता
7 Aug 2025 - 11:01 am | अमरेंद्र बाहुबली
तुमच्या दृष्टीने सुधारणेचा अर्थ काय? अंधभक्ती करणे म्हणजे सुधारणा? आणी वस्तुस्थिती दाखवून सरकारवर टीका करणे म्हणजे असुधारणा?
खांद्याच्या वरच्या अवयवांचा वापरच करायचा नाही असं ठरवलंच असेल तर कोण काय करू शकतं?
मिपावरील महान डॉक्टर हत्ती धाग्यावर काय म्हणतात पहा.
सार्वजनिक न्यासावर खालच्या पातळीवर टीका करणं हे अत्यन्त हीन मनोवृत्ती दाखवतं. :- :- डॉक्टर सुबोध खरे.
7 Aug 2025 - 11:43 am | सुबोध खरे
एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत
हा आपला प्रतिसाद कुणाबद्दल आहे आणि त्याचा अर्थ काय आहे?
6 Aug 2025 - 10:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट्रम्प तात्याला आपण ज्या पद्धतीने पायघड्या घालत होतो ते आता तरी कपाळावर हात मारुन घेणेच होते. अर्थात सध्याच्या सरकारला तसे परराष्ट्रीय धोरण नावाची काही व्यवस्थाच उरली नाही असे वाटायला लागले आहे. जगातला आता एखादा तरी देश उरला असेल की नाही जिथे आपण गेलो नाही. पण एकही देश वेळ पडते तेव्हा मदतीला आला नाही, हेही आपण पाहिलं.
ट्र्म्प माय फ्रांड ने पुन्हा काल चोवीस तासात भारतावरील आयात शुल्कात वाढविण्याची धमकी दिली. आपण नेहमीप्रमाणे गुळमीळीत उत्तर दिलं. अमेरिकेची आयातशुल्कवाढ ही अन्यायकारक असून अमेरिका आणि युरोपीय महासंघ रशियाशी व्यापार करीत असल्याकडे आपण निर्देश केले. याला म्हणतात मुहतोड जवाब
( अहाहा, वावा, क्या बात है )
रशियाने मात्र, सार्वभौम देशांना त्यांच्या हितानुसार कोणासोबत व्यापार आणि आर्थिक सहकार्य करायचे याची निवड करण्याचा अधिकार आहे अशा शब्दात रशियाने समर्थन केले. माय फ्रांड डोलांडच्या नादात आपण रशियाशी दूर दूर आणि अधिक दूर जात होतो. अर्थात धोरण परराष्ट्रीय धोरणाची वाताहत होते असे वाटत असतांना त्यात अनपेक्षित तसे काही वाटत नाही.
जम्मु-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं काल निधन झालं. निष्ठावान राजकारणी ते सत्ताधा-यांवरच टीकाकार अशी त्यांची भूमिका राहिली. पुलवामा हल्ला सरकारी उदासीनतेचा परिणाम होता अशी टीका त्यांनी केली होती. शेतकरी आंदोलनास उघड पाठींबा दिला आणि सद्य सरकारवर टीका केली. गोव्यातील राज्यसरकारवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. समाजवादी विचारसरणीचे विद्यार्थी, पण पुढे भारतीय क्रांती दल, कॉंग्रेस, जनता दल, भाजप असा त्यांचा प्रवास राहिला.
झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचही काल निधन झालं. तीन वेळा मुख्यमंत्री आठवेळा खासदार राहिले. आदिवासींच्या हक्कासाठी लढ्णारा नेता ही त्यांची ओळख होती.
सत्यपाल मलिक आणि शिबू सोरेने यांना समस्त मिपाकरांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.
-दिलीप बिरुटे
6 Aug 2025 - 11:29 am | अमरेंद्र बाहुबली
ह्या आधीच्या सरकारांनी रशियाशी मैत्री ठेऊनही अमेरिकेला सांभाळले होते, आता मुळात सरकारच अश्या लोकांच्या हातात गेले आहे की ज्यांना लोकशाही, परराष्ट्र धोरण अंधश्रद्धा वाटतात. उगाच नाही “गोबरयुग” ह्या शब्दाचा उदय झाला आहे.
6 Aug 2025 - 11:35 am | आग्या१९९०
रशियाने मात्र, सार्वभौम देशांना त्यांच्या हितानुसार कोणासोबत व्यापार आणि आर्थिक सहकार्य करायचे याची निवड करण्याचा अधिकार आहे अशा शब्दात रशियाने समर्थन केले.
एक्झॅक्टली हे आपल्या सरकारने अमेरिकेला सांगायला हवे होते. अमेरिकेने रशियाकडून काहीही आयात करो वा न करो, आमच्यात लुडबुड करू नका असे ठणकावून सांगायला हवे होते. अमेरिका मोठ्या प्रमाणात व्यापार तूट असल्याचा कांगावा करत आहे त्याला भारत प्रत्युत्तर का देत नाही हेच समजत नाही. आपला देश इतका घाबरट कधीच नव्हता.
6 Aug 2025 - 11:38 am | अमरेंद्र बाहुबली
आपला देश इतका घाबरट कधीच नव्हता.
+१
कारण तेव्हा देशप्रेमी लोक सत्तेत होते अदानीप्रेमी नाही.
6 Aug 2025 - 12:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला देश इतका घाबरट कधीच नव्हता.
+१ सहमत.
-दिलीप बिरुटे
6 Aug 2025 - 12:14 pm | सुबोध खरे
माय फ्रांड डोलांडच्या नादात आपण रशियाशी दूर दूर आणि अधिक दूर जात होतो
बिरुटे मास्तर
भारताने रशिया कडून S ४०० घेतले आहेत ते पण अमेरिकेच्या CAATSA ला (Countering America's Adversaries Through Sanctions Act (CAATSA) फाट्यावर मारून. हे आपण वाचले नाही का? याच S ४०० ने पाकिस्तानचे एक awacs पाडले तेसुद्धा पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर ३५० किमी वर
The AK-203 is the new assault rifle being inducted into the Indian Army, replacing the older INSAS rifles. Manufactured in India under a joint venture with Russia, it's a modernized version of the Kalashnikov AK-series, known as "Sher" in India
याबद्दल आपण वाचलेले दिसत नाही
भारताने आपल्या तेल खरेदी पैकी ४० % पर्यंत तेल रशिया कडून घेतले हेही आपण वाचलेले दिसत नाही आजमितीला आपले ३५ % तेल रशियाकडूनच येते आहे आणि ते सुद्धा अमेरिकेला नाराज करूनच
तात्यांच्या नादाला लागून गेल्या दहा वर्षात एक तरी मोठा खरेदी करार भारताने केल्याचे आपण वाचले आहे का?
तात्यानी आपल्याला त्यांचे F ३५ विकायचा आटोकाट प्रयत्न करून सुद्धा भारताने त्यांना कात्रजचा घाट दाखवला आहे.
श्री अजित डोवाल आज ०६ ऑगस्ट रोजी रशिया ला गेले आहेत.हे वाचलेले दिसत नाही (कदाचित रशियन व्होडका प्यायला गेले असतील आपल्या मते)
केवळ द्वेष करायचा म्हणून केला तर असं होतंय पहा
6 Aug 2025 - 11:35 am | अमरेंद्र बाहुबली
कोथरुडमधील मुलींना मारहाण प्रकरण तापलं,
https://marathi.abplive.com/news/pune/pune-news-kothrud-police-use-alleg...
महाराष्ट्राची शेणपट्टा होण्याकडे वाटचाल जोरात सुरू आहे असे वाटतेय.
6 Aug 2025 - 8:56 pm | स्वधर्म
पोलिसांची बाजू कितीही समजून घ्यायची म्हटली तरी एकूण प्रकार पाहता पोलीसांचे काम शेणपट्टयातील पोलिसांसारखे वाटत आहे.
6 Aug 2025 - 8:46 pm | कपिलमुनी
50 % टेरिफ भारतासाठी लावला आहे.
घ्या अजून अब की बार ट्रम्प सरकार..
6 Aug 2025 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला ‘मास्टर स्ट्रोक’ लैच महागात पडलाय.
गोबरयुगाची फळं तर भोगावीच लागतील.
माय फ्रांड डोलांड हे काही बरोबर नाही.
-दिलीप बिरुटे
6 Aug 2025 - 11:22 pm | अमरेंद्र बाहुबली
गोबरयुगाची फळं तर भोगावीच लागतील.
खरे आहे.7 Aug 2025 - 10:16 am | सुबोध खरे
माय फ्रांड डोलांड
पवार साहेब आमचे गुरु असंही ते म्हणाले होते त्याबद्दल काय म्हणणं आहे बिरुटे मास्तर?
नाही म्हणजे एकच म्हणणं धरून ठेवायचं असेल तर कसं करायचं?
7 Aug 2025 - 2:10 am | कंजूस
Trump अजून साडेचार वर्षे आहे.
7 Aug 2025 - 10:17 am | सुबोध खरे
साडेतीन वर्षं
7 Aug 2025 - 2:16 am | कंजूस
आपण BRICKS देशांच्या गटात आहोत आणि ट्रंपला यांच्यावर फार खुन्नस आहे.
7 Aug 2025 - 8:33 am | माईसाहेब कुरसूंदीकर
वॉशिंगटन सफरचंदे झाली, हार्ले डेव्हिडसन बाईक झाल्या,महाग इंधनही आयात करुन झाले, आणखी काय पाहिजे आहे ट्रम्पास?
सध्या जो काही कर लावणार आहे त्याचा फटका आय.टी. कंपन्यांनाही बसणार आहे. टेक-महिन्द्र ,विप्रो,टाटा एलेक्सी ह्यांचे बर्यापैकी उत्पन्न अमेरिकेवर अवलंबून आहे असे वाचले आहे.
7 Aug 2025 - 8:46 am | अमरेंद्र बाहुबली
तात्याला दोष देऊन काय फायदा माई? आपले लोक ठिकाण्यावर नाहीत.
नाचता येईना अंगण वाकडे.
7 Aug 2025 - 9:03 am | कंजूस
अमेरिकेचं भलं करेन सांगून निवडून आला आहे ट्रंप तेव्हा काही ढिशुव ढिशुव करणारच.
7 Aug 2025 - 10:09 am | अमरेंद्र बाहुबली
अमेरिकेचा शत्रू बनणे धोकादायक आहे पण मित्र बनणे जास्त घातक आहे असे आताच कुठेतरी वाचले, उगाच नाही नेहरूनी अलिप्ततावाद स्वीकारला होता, नेहरूंच्या नावाने संसदेत छाती पिटणाऱ्याना एवढी अक्कल असेल असे वाटत नाही. उगाच नाहाई डॉक. बिरुटेसर आजच्या काळाला “गोबरयुग” म्हणतात.
7 Aug 2025 - 10:35 am | आग्या१९९०
टाचणीच्या माथ्यापेक्षा लहान मेंदूच्या विगुकडून फार मोठ्या अपेक्षा करू नये.
7 Aug 2025 - 10:40 am | सुबोध खरे
टाचणीच्या माथ्यापेक्षा लहान मेंदूच्या विगुकडून फार मोठ्या अपेक्षा करू नये.
तुम्ही तर करूच नका.
नाहीतरी तुम्हाला एवढी जळजळ आहे कि प्रत्येक धाग्यावर प्रतिसादावर ती उफाळून येते तर अपेक्षा करताच कशाला?
ज्यांनी त्यांना भरघोस मते देऊन निवडून आणलाय ते आनंदात आहेत. तुम्ही नका काळजी करू
7 Aug 2025 - 10:54 am | आग्या१९९०
जळजळ नाही हो! वस्तुस्थिती सांगतोय.
7 Aug 2025 - 11:05 am | अमरेंद्र बाहुबली
टाचणीच्या माथ्यापेक्षा लहान मेंदूच्या विगुकडून फार मोठ्या अपेक्षा करू नये.
टाचणीचा माथा? त्या माथ्यावर जे करोडो बॅक्टरिया मावतील त्याच्यातील एका बॅक्टेरियाच्या माथ्यात जेवढी अक्कल असेल त्याचा १ पट अक्कलही विगुला असेल का सांगता येत नाही.
7 Aug 2025 - 11:09 am | आग्या१९९०
अच्छा! आकारमान मोजण्याचे नॅनो पेक्षा लहान नमो युनिट असते हे आज माहित झाले. धन्यवाद!
7 Aug 2025 - 11:12 am | अमरेंद्र बाहुबली
खिक्क! नमो युनिट.
7 Aug 2025 - 11:44 am | सुबोध खरे
किती ती जळजळ?
इनो घ्या आणि बरे व्हा!
7 Aug 2025 - 12:06 pm | आग्या१९९०
आम्ही निवडून दिले नाही म्हणून जळजळ नाही, त्यामुळे अनुदानित व्हॉट्सॲप विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेला नमो योजनेचा Eno घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
7 Aug 2025 - 12:30 pm | आग्या१९९०
चला सरकार अमेरिकेच्या दबावाला झिडकारून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणार हे एकदाचे मुखातून आले. मोगॅन्बो खुश हुवा.
7 Aug 2025 - 1:42 pm | चंद्रसूर्यकुमार
वाटत नाही. मोदी (अनेकांच्या भाषेत शेटजी) कसे शेतकरीविरोधी आहेत हा अपप्रचार करायची संधी गेली म्हणून मोगॅम्बो नाराज झालेला आहे ही शक्यता जास्त.
7 Aug 2025 - 2:41 pm | आग्या१९९०
असा अपप्रचार मी कधी केल्याचे आठवत नाही, जे काही केले असेल ते सत्यकथनच केले आहे. चांगल्याला चांगले म्हणणेही कठीण झाले आहे.
7 Aug 2025 - 9:03 pm | कंजूस
उत्तराखंडांत खूप पाऊस, दरडी कोसळणे, रस्ते नाहीसे होणे; इमारती माणसे,प्राणी वाहून जाणे हे आता काही वर्षे कायमची घटना झाली आहे.
7 Aug 2025 - 10:43 pm | रामचंद्र
पण म्हणून त्यावर तज्ज्ञ जे उपाय सुचवतात, ते करायची कुठल्याच सरकारची तयारी नाही. जसं माधव गाडगीळ समितीचा अहवालावर इतक्या दुर्घटना होऊनही तिथल्याच लोकांना पर्यायाने सरकारला कृती करण्याची इच्छा नाही. किमान सायलेंट व्हॅली प्रकल्प इ. बाबतीत इंदिरा गांधींनी प्रकल्प जाहीर झाल्यानंतरही तज्ज्ञांचा सल्ला मानला तरी होता.
7 Aug 2025 - 11:52 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
राहुल गांधीनी पुराव्यासकट निवड्णुक आयोगाच्या चोरगिरीला अक्षरशः उघडे पाडले आहे.
“They were stolen in five different ways: duplicate voters, fake and invalid addresses, bulk voters in a single address, invalid photos, and misuse of Form 6, which is given to first-time voters for enrolment,” Gandhi said.
https://indianexpress.com/article/india/rahul-gandhi-voter-fraud-lok-sab...
https://www.youtube.com/watch?v=TVEiACVifX4
8 Aug 2025 - 10:20 am | अमरेंद्र बाहुबली
+1
निवडणूक आयोग सरळ सरळ भाजपला जिंकवण्यासाठी मदत करतो असे दिसते. २०२४ चे महाराष्ट्रात झालेले इलेक्शन पूर्णत फ्रॉड होते.
8 Aug 2025 - 10:54 am | आग्या१९९०
भाजपचे नेते जेव्हा निवडणूक आयोगाची बाजू घेऊन बोलू लागतात तेव्हा समजायचे निवडणूक आयोग चुकीचे आहे.
8 Aug 2025 - 12:37 pm | अमरेंद्र बाहुबली
निवडणूक आयोगाने तोंड उघडले तर आपण उघडे पडू ह्या भीतीने त्यांना आयोगाची बाजू घ्यावी लागते.
8 Aug 2025 - 1:05 pm | चंद्रसूर्यकुमार
अगदी याच प्रकारच्या त्रुटी सुधारण्यासाठी एस.आय.आर राबविले जात असेल तर मग त्याविषयीही ते आक्षेप घेतात ते का?
8 Aug 2025 - 1:50 pm | आग्या१९९०
अगदी याच प्रकारच्या त्रुटी सुधारण्यासाठी एस.आय.आर राबविले जात असेल तर मग त्याविषयीही ते आक्षेप घेतात ते का?
हा सेल्फ गोल होतोय हे लक्षात आणून देतो.
बाकी निवडणूक आयोगाने एस. आय.आर. राबवण्यापूर्वी शपथपत्र करावे, जसे राहुल गांधींना सांगितले अगदी तसेच.
8 Aug 2025 - 2:03 pm | चंद्रसूर्यकुमार
मी पण म्हणतो की रागांचा हा सेल्फ गोल आहे. ते एस.आय.आर ला विरोध करत आहेत. त्याचे कारण ते डुप्लिकेट/मृत/अभारतीय मतदार बिहारमध्ये काँग्रेसला मत देतात म्हणून ती नावे हटवायला रागांचा विरोध आहे असे का म्हणू नये?
मतदारयाद्यांमध्ये त्रुटी आहेत हे नक्कीच. इथल्याच एका सदस्याने लोकसभा निवडणुकांपूर्वी लिहिताना मागच्या वर्षी एके ठिकाणी लिहिले होते की त्यांचे नाव दोन ठिकाणच्या मतदारयादीत आहे असे आठवते. त्या त्रुटी दुरूस्त करायलाच हव्यात. तो मुद्दा रागा लावून धरत असतील तर त्यांना या मुद्द्यापुरता पूर्ण पाठिंबा.
8 Aug 2025 - 2:23 pm | आग्या१९९०
मतदार यादी अद्ययावत करण्यास विरोध नाही. घाईघाईत निवडलेली वेळ, आणि कागदपत्रांची मागणी ह्या विरोध आहे. सुधारीत मतदार यादी निर्दोष असेल ह्याची खात्री काय? Rigging केले जाणार ह्याची भीती व्यक्त केली जात आहे. यादी तपासेपर्यंत निवडणुका होऊन जाणार. निवडणूक आयोग पुढे असेच अडेलतट्टूपणा करणार. नंतर कितीही बोंबा मारून उपयोग होणार नाही.
8 Aug 2025 - 1:56 pm | सुक्या
आता एव्हडा अभ्यास करुन निवड्नुक आयोगाला ऊघडा पाडलाच आहे तर जे काय आफेडेविट मागता आहेत ते सही करुन त्यांच्या तोंडावर मारुन कारवाइ करायला भाग पाडावे.
पुढे निवड्नुक आयोग कचाट्यात सापडला की सुप्रीम कोर्टात अर्ज करुन हे प्रकरण तडीस न्यावे. तशिही यांच्याकडे वकीलांची फोउज आहेच. सिब्बल किंवा सिंघवी .
काय म्हणता. बरोबर की नाही?
तसे नसेल तर मग “शब्द बापुडे केवळ वारा“
8 Aug 2025 - 2:10 pm | आग्या१९९०
शपथपत्र हा ट्रॅप आहे. त्याचा वापर चौकशी लांबवण्याकरता होऊ शकतो. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना पुरवलेली कागदपत्रे ही इलेक्ट्रॉनिकली रीडेबल नव्हती, त्यामुळे त्यात फेरफार केला असा १००% कांगावा केला जाणार. पुढे काय होणार हे सांगायची गरज नाही. साधी गोष्ट आहे निवडणूक आयोगाने त्यांच्याकडील मतदार यादीशी पडताळून बघावे. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक फॉरमॅट मध्ये असल्याने फार वेळ लागणार नाही. निवडणूक रोखेच्यावेळी SBI ने असेच नाटक केले होते. सुप्रीम कोर्टाने दरडवल्यावर कसे सगळे रेकॉर्ड आठवड्यात उपलब्ध झाले? डिजिटलचा डांगोरा पिटायचा अंगाशी आले की कागदी रेकॉर्डचा आग्रह करून वेळकाढूपणा करायचा. फट्टू आहेत .
8 Aug 2025 - 2:20 pm | सुक्या
ह्या ह्या ह्या
मी म्हनालो ना “शब्द बापुडे केवळ वारा“
पळवाट आधीच शोधुन ठेवलीय
8 Aug 2025 - 2:28 pm | आग्या१९९०
पळवाट आधीच शोधुन ठेवलीय
ठीक आहे निवडणूक आयोगाने शपथपत्र करून , निवडणुकीचे प्रत्येक बूथचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या तपासण्यास द्याव्यात. आहे का तयार निवडणूक आयोग?
8 Aug 2025 - 2:44 pm | सुक्या
तेच म्हण्तोय मी.
लावा की दवा सुप्रीम कोर्टात. सिब्बल आहे की.
निवड्णुक आयोग काय सुप्रीम कोर्टाच्या वर आहे का?
8 Aug 2025 - 3:03 pm | आग्या१९९०
निवड्णुक आयोग काय सुप्रीम कोर्टाच्या वर आहे का?
निवडणूक आयोग ही संवैधानिक संस्था असल्याने सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध करू शकत नाही.
8 Aug 2025 - 4:46 pm | अमरेंद्र बाहुबली
अभ्यासपूर्ण प्रतिसाद आज्ञा! अर्थात ह्याचे उत्तर नसणारच इथल्या भाजप समर्थकांकडे, वयक्तिक खालच्या पातळीवरील टीकेसाठी तयार रहा.
8 Aug 2025 - 5:06 pm | आग्या१९९०
वयक्तिक खालच्या पातळीवरील टीकेसाठी तयार रहा.
शक्यता कमी आहे. सध्या त्यांना निवडणूक आयोग आणि त्याचा बचाव करणारे सरकार ह्या दोघांसाठी जीभ व्यस्त ठेवावी लागणार आहे. दुभंगलेल्या जिभेला इथे येणे परवडणार नाही.
8 Aug 2025 - 5:10 pm | अमरेंद्र बाहुबली
सध्या त्यांना निवडणूक आयोग आणि त्याचा बचाव करणारे सरकार ह्या दोघांसाठी जीभ व्यस्त ठेवावी लागणार आहे.
आणी बाजूच्या गल्लीत हत्ती पळवनाऱ्या टोळीचेही समर्थन करायचेय. :)
9 Aug 2025 - 5:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या जरी असल्या तरी त्यांचा अभ्यास, पात्रता, वगैरे सगळं पाहूनच न्यायमूर्तीसाठी शिफारस केल्या गेली याचंही समर्थन करायचं आहे. ;)
-दिलीप बिरुटे
8 Aug 2025 - 8:33 am | कंजूस
ट्रंपला हाणला.
https://youtu.be/rWbWl_Khl0s?si=0nsCc_B3TdqfKcBK
8 Aug 2025 - 1:08 pm | विजुभाऊ
इंडी अघाडीच्या बैठकीत ठाकरे ना सहाव्या रांगेत ( शेवटच्या) बसवले गेले.
या वरून आठवले की शिवाजी मराज जेंव्हा आग्र्याला गेले होते तेंव्हा त्याना असेच मागे बसवले गेले होते. त्यावर क्रोधीत होऊन महाराजानी भर दरबारात ओरडून सांगितले होते आणि दरबाराचा त्याग केला होता.
8 Aug 2025 - 1:20 pm | अभ्या..
नाही.
सध्या फॅशन आहे. बोलावले नाही तरी जायचे.
मागे उभे केले तरी हात पकडू पकडू फोटो टाकायचे मिटिंगांचे.
"यू आर अॅक्टीव्ह ऑन एक्स हं, ह्या ह्या ह्या" अशा गंभीर आंतरराष्ट्रीय संवादांचे व्हिडीओ टाकण्याची फॅशन तर फार आवडली मला.
त्यावर क्रोधीत होऊन महाराजानी भर दरबारात ओरडून सांगितले होते आणि दरबाराचा त्याग केला होता.
तुलनेने हे फारच फॅशनेबली ऑऊटडेटेड
8 Aug 2025 - 5:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"यू आर अॅक्टीव्ह ऑन एक्स हं, ह्या ह्या ह्या"
हे सध्या लै जोरात आहे.=))
-दिलीप बिरुटे
8 Aug 2025 - 7:11 pm | कंजूस
राजशी दोस्ती केल्याने इंडिया ब्लॉक त्यांना भाव देत नसेल?
8 Aug 2025 - 2:14 pm | कपिलमुनी
9 Aug 2025 - 10:02 am | अमरेंद्र बाहुबली
प्रतिज्ञापत्र?.. कशाला?
निवडणूक आयोगाने जर जुनी प्रतिज्ञापत्रं उघडली, तर..
पहिल्याच पानावर मोदीजी भेटतील.
2002, 2007, 2012 मध्ये शपथपूर्वक सांगितलं — "मी अविवाहित आहे."
आणि काही वर्षांनी निवडणूक आयोगालाच कळवलं — "हो, माझं लग्न झालंय."
मग आधीची प्रतिज्ञापत्रं काय होती? आधी खोटं, की नंतरचं खरं? की दोन्ही वेळा ‘राजकारण’च खरं?
दुसऱ्या पानावर स्मृती इराणी — पहिल्या निवडणुकीत ग्रॅज्युएट, पुढच्या निवडणुकीत १२वी पास.
वा! असे रिव्हर्स एज्युकेशन फक्त भारतीय राजकारणातच शक्य आहे.
ही फक्त झलक आहे. अशी ‘सत्य वचन’ं असलेली बरीच प्रतिज्ञापत्रं सरकारी फाईलमध्ये धूळ खात पडली आहेत.
आणि कारवाई? अहो, त्या फाईलवरचा पिनही आजवर निघालेली नाही.
मग प्रश्न सरळ आहे..
निवडणूक आयोगाने आजवर अशा खोट्या प्रतिज्ञापत्रांवर काय कारवाई केली?
सत्तेत असलेल्यांवर कधी गुन्हा दाखल झाला का? कधी अपात्र ठरवलं का?
उत्तर — शून्य.
प्रभा मीद्दडी
https://www.facebook.com/share/159wbZsm1VU/
9 Aug 2025 - 10:34 pm | रामचंद्र
खरं तर हे इतके खणखणीत मुद्दे आहेत, यावर कोणीच कसं न्यायालयात गेलं नसावं?
9 Aug 2025 - 10:39 pm | रामचंद्र
<सत्तेत असलेल्यांवर कधी गुन्हा दाखल झाला का? कधी अपात्र ठरवलं का?>
हो, किमान एकदा तरी असं झालं होतं. त्यानंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती. अर्थात १९७१ च्या युद्धानंतर बिघडलेली आर्थिक घडी, देशांतर्गत वाढता असंतोष आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू झालेली सरकारविरोधी आंदोलनं हीसुद्धा कारणं असू शकतील.
10 Aug 2025 - 8:25 am | चंद्रसूर्यकुमार
किती खोटं बोलाल? २०१४ पूर्वी उमेदवारी अर्ज कागदावर द्यायचे त्यात सगळे कॉलम भरणे सक्तीचे नव्हते. त्यात वैवाहिक स्टेटस हा एक कॉलम होता. एखादा कॉलम भरणे सक्तीचे नसेल तर तो मोकळा ठेवायचा ऑप्शन असतो हे वेगळे सांगायला हवे का? त्याप्रमाणे मोदींनी तो कॉलम मोकळा सोडला. त्याचा अर्थ मी अविवाहीत आहे असे मोदींनी शपथेवर सांगितले असे म्हणायला आबांचीच तल्लख बुद्धी हवी.पण २०१४ मध्ये (आणि नंतरही) उमेदवारी अर्ज त्यांच्या सॉफ्टवेअरवरून भरायचा होता त्यात सगळे कॉलम भरणे सक्तीचे होते. तेव्हा मोदींनी विवाहित ही माहिती भरली.
खोटं बोलणार आणि रेटून रेटून बोलणार हा तुम्हा मंडळींचा खाक्या असतो.
9 Aug 2025 - 11:17 am | आग्या१९९०
राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रक दिले तर त्याचा उपयोग मूळ मुद्दा भरकटवून राहुल गांधींना अडचणीत आणण्यासाठी केला जाऊ शकतो आणि तोच प्रयत्न केला जाणार. तसे झाले तर त्यास राहुल गांधीच जबाबदार आहेत. राहुल गांधीच्या टीमने भरपूर परिश्रम घेऊन मतदार यादीतील चुका शोधून काढल्या, ह्यात निवडणूक आयोगाचा १००% हलगर्जीपणा उघडकीस आला. परंतु अतिविश्वासात राहुल गांधींनी त्याचा संबंध निवडून आलेल्या उमेदवाराच्या विजयाशी केला, जो ते खात्रीने सिद्ध करू शकत नाही.मतदार यादीतील ह्या मतदारांनी कशावरून विजयी उमेदवारालाच मतदान केले? ह्यातील सगळ्यांनी मतदान केले ह्याची आकडेवारी कुठे आहे? मतदान चोरीला गेले हे कसे सिद्ध करणार? प्रतिज्ञापत्र जरी केले तरी हे मुद्दे त्यातून गाळावे लागणार ह्याची राहुल गांधींना जाणीव आहे. हे मुद्दे वगळले तर सत्ताधारी पक्ष, गोदी मीडिया आणि निवडणूक आयोग ह्याच मुद्यावर राहुल गांधींना घेरणार. राहुल गांधी अभ्यासू, मेहनती आणि प्रामाणिक आहेत परंतु तितकेच भोळे आणि उतावीळ असल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी पडते. आपण विश्वगुरू नाही की आपल्या चुका आणि प्रतिमा सांभाळायला पक्ष, मातृ संस्था, मिडिया धावून येतील , ह्या वस्तुस्थितीचा राहुल गांधींनी विचार करूनच पाऊले उचलावीत.
9 Aug 2025 - 6:42 pm | कंजूस
आरोप करताना किंवा दावा लावताना एकच विवक्षित मुद्दा आणि योग्य पुरावे द्यावेत. हे बरोबरच.
>>परंतु अतिविश्वासात राहुल गांधींनी त्याचा संबंध निवडून आलेल्या उमेदवाराच्या विजयाशी केला, जो ते खात्रीने सिद्ध करू शकत नाही.मतदार यादीतील ह्या मतदारांनी कशावरून विजयी उमेदवारालाच मतदान केले?>> बरोबर. पसरट दावे करू नयेत.
10 Aug 2025 - 10:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'चौकीदार चोर है' हे जवळ जवळ देशभर मान्य होत चाललं आहे. मागील लोकसभेच्या निवडणूकीत ढकलपास झालेलं सरकार थोडक्यात वाचलं, तेव्हाच काही शंका यायला लागल्या होत्या. पण लोकांचं लक्ष तातडीने 'डायवर्ट' करणे यात भाजपाची पगारी मिडिया भारी पडते. व्यवस्थेविरुद्ध कोणत्याही मुद्द्याने पकड घेतली की नवे विषय आलेले आपल्याला बघायला मिळतील. निवडणूकीच्या काळात माध्यमं आणि निवडणूक आयोगाची फ्री हॅंड मोकळीक यांनी ढकलपास होण्यास सद्य सरकारला हातभार लावला. परवाच्या, पत्रकार परिषदेतील भाजपसोबत निवडणूक आयोग चोरीत सामील असल्याच्या आरोपाचं मुद्याचं तसं कोणाला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. आता पुढील काळात व्यक्तीगत चारित्र्य हनन, न्यायालयात कोणत्या तरी गुन्ह्यात अडकविणे, असे सर्व प्रयोग चालू राहतील.
यावरुन आठवण झाली. अशोका विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक सब्यसाची दास यांच्या २०१९ मधील निवडणुका आणि भाजपच्या अटीतटीच्या जागांवर झालेल्या लढतींमधील विजयावर शंका उपस्थित करणाऱ्या शोधनिबंधावर गदारोळ झाला होता. 'जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये लोकशाहीची पीछेहाट' या निबंधात “भाजप ज्या जागांवर निवडणुकी आधी सत्तेत होती आणि त्यातील ज्या जागांवर अतितटीची लढाई होती त्या जागांवर भाजपनं अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली" कशी केली त्याचं तपशीलवार मुद्दे आणि संदर्भ देत शोधनिबंध सादर केला होता. पुढे, विद्यापीठानं दास यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं. संप आंदोलने झाली. गुप्तचर विभागानेही भेटी दिल्या आणि प्रकरण शांत झाले.
सत्तेची मस्ती कोणत्याही पक्षाला येऊ शकते भाजपा त्याला अपवाद असण्याचे काही कारण नाही. पण लोकशाही व्यवस्थेच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी आपलं पावित्र्य जपणे आवश्यक आहे. आता इस. ७१२ पासून ते २०१४ पर्यंत असं पावित्र्य जपलं होतं का ? असा कांगावा करुन सध्याचं पाप लपवता येऊ शकतं यातही काही शंका नाही.
-दिलीप बिरुटे
10 Aug 2025 - 10:59 am | अमरेंद्र बाहुबली
माझ्या मते निवडणूक आयोग मी इतर सरकारी संस्थेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना शपथ द्यायला हवी की “आम्ही भाजपसाठी कुठलीही फेरफार, घपला, तसेच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष गैरप्रकार करणार नाही व देशाप्रती व भारतीय घटनेप्रती प्रमाणिक राहू.”
अशी शपथ दिली तर निदान नैतिक लाज वाटून तरी आयोगातील लोक प्रामाणिकपणे काम करतील.
10 Aug 2025 - 11:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाजप आणि त्यांच्या पक्षीय कुटुंबाला लाज शरम नैतिकता वगैरे काही नाही. खरं तर, चोरीची सुरुवात झाली ती 'आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्या नेमणुकीच्या समितीतून सरन्यायाधीश हटवून केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करणे' तिथून झाली. कॅन्टीनमध्ये बसलेले, संसदीय समितीच्या मिटिंगमध्ये बसलेले असे मिळून दीडशे खासदार फटक्यात निलंबित केले आणि ते विधयेक घाई घाईने मंजूर केले.
संघानं यंव केल आणि त्यंव केलं. पन्ना प्रमुखांनी रात्रंदिवस यंव केलं आणि त्यंव केल, समर्पितांनी सतरंजी उचलल्या आणि यंव केलं आणि त्यंव केलं. उपाशी तापाशी काम केलं आणि यश मिळालं. या सगळ्या भाकडकथा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सोयीचं सगळं करायला.
-दिलीप बिरुटे
10 Aug 2025 - 12:10 pm | अमरेंद्र बाहुबली
संघानं यंव केल आणि त्यंव केलं. पन्ना प्रमुखांनी रात्रंदिवस यंव केलं आणि त्यंव केल, समर्पितांनी सतरंजी उचलल्या आणि यंव केलं आणि त्यंव केलं. उपाशी तापाशी काम केलं आणि यश मिळालं. या सगळ्या भाकडकथा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सोयीचं सगळं करायला.
+१
10 Aug 2025 - 12:11 pm | चंद्रसूर्यकुमार
वा रे वा. न्यायाधीश लोक आपली नियुक्ती आपल्याच कॉलेजिअमकडून करून घेतात. त्यात इतरांना काहीही 'से' नसतो. पण न्यायाधीशांना मात्र प्रत्येक नियुक्तीमध्ये आपला सहभाग असावा असे वाटते. चित भी मेरी पट भी मेरा की काहीतरी बोलतात ना तसे कसे चालेल?
जोपर्यंत कॉलेजिअम पध्दत आहे तोपर्यंत न्यायाधीशांना कोणत्याही प्रकारच्या नियुक्तीत अजिबात सहभागी करून घेतले जाऊ नये. जर मधे नाक खुपसायला आले तर कायदा करून न्यायाधीशांना तिथून हटवावे.
10 Aug 2025 - 12:12 pm | अमरेंद्र बाहुबली
म्हणजे आपल्या सोयीने निवडणुका मॅनेज करता येतील.
9 Aug 2025 - 12:05 pm | कर्नलतपस्वी
राहुल गांधी अभ्यासू, मेहनती आणि प्रामाणिक आहेत परंतु तितकेच भोळे
जोक ऑफ द मिलेनियम.
राहूल गांधीनी अजीबात ॲफिडेव्हीट देऊ नये. बाकीचे चतूर आहेत त्यानां गोत्यात आणतील. सरळ सुप्रीम कोर्टात केस करावी. निवडणूका रद्द करण्यासाठी केस करून आपल्या आजी बरोबर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यावा.
आणि उतावीळ असल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी पडते.
हे मात्र खरंय बर का.....
मला एक इंग्लिश कवीता आठवते,
"The Pied Piper of Hamelin" -Robert Browining.
The story is often interpreted as a cautionary tale about broken promises.
9 Aug 2025 - 12:31 pm | आग्या१९९०
मला एक इंग्लिश कवीता आठवते,
मला तर शालेय पाठ्यपुस्तकातील " The Man Who Knew Too Much " ह्या धड्याची आठवण येते.
9 Aug 2025 - 12:27 pm | अमरेंद्र बाहुबली
आयला! निवडणूक आयोग घाबरलेले दिसतेय, वेबसाईट बंद करून पळ काढलाय. चोराच्या मनात चांदणे!