ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
1 Aug 2025 - 10:01 am
गाभा: 

हिंदी चित्रपटसृष्टीतील असामान्य निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते गुरूदत्त यांची आपल्याबरोबर चित्रपट करावा अशी शेवटची इच्छा होती असा दावा महागुरू सचिन पिळगावकर यांनी केला आहे.

अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywoo... वर.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Aug 2025 - 9:39 pm | अमरेंद्र बाहुबली

निवडणूक आयोगावर टीका झाल्यावर भाजप समर्थक आयोगाच्या समर्थनात का उतरतात?

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Aug 2025 - 9:47 pm | चंद्रसूर्यकुमार

तीच तीच गंजकी टेप वाजविणे बंद करा हो. आरोप आहे भाजपने असा फ्रॉड करून निवडणुक जिंकली. मग उत्तर द्यायला भाजप समर्थक पुढे आले तर नवल काय?

सुबोध खरे's picture

12 Aug 2025 - 10:11 am | सुबोध खरे

तीच तीच गंजकी टेप वाजविणे बंद करा हो

तिसऱ्यांदा भाजप निवडणूक जिंकून सत्तेवर आले यामुळे विरोधक घायकुतीला आलेले आहेत. याचेच प्रतिबिंब मिपावर पडताना दिसते आहे.

इंडी आघाडीच्या नेत्यांत एकवाक्यता नाही, राहुल गांधींसारखा नेता २०२९ पर्यंत आघाडीचा प्रमुख नेता राहिल्यास भाजप परत येणार यात शंका नाही, यामुळे विरोधक बावचळले आहेत.

महाराष्ट्रात फडणवीसांना अतिशय खालच्या पातळीवर शिव्या देऊन झाल्या मी पुनः येईन म्हणत असताना ते पुन्हा सज्जड बहुमताने स्वबळावर आले सुद्धा. इतकेच नव्हे तर ज्या शिवसेनेने दगलबाजी केली होती ती आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात अक्षरशः दुफळी पाडून त्यांना गलितगात्र स्थितीत नेऊन ठेवले आहे.

मोदींना भ्रष्टाचाराचा एकही मुद्दा चिकटवता आलेला नाही किंवा घराणेशाहीचा मुद्दा हि त्यांना चिकटत नाही. हीच स्थिती योगिंची आहे.

त्यातून संसदेवर हल्ला झाला तरी काहीही न करणाऱ्या डॉ मनमोहन सिंह यांच्या तुलनेत ऑपरेशन सिंदूर मध्ये मोदिनी पाकिस्तानला जोरदार हाणल्यामुळे सामान्य माणसांना त्यांच्या बद्दल वाटणारा आदर अधिक वाढलेला आहे

अगोदर इ व्ही एम ला सगळा दोष देऊन झाला पण मग भाजप ला २४० च का मिळाले आणि इंडी आघाडीच्या जागा कशा वाढल्या? याचा ठपका इ व्ही एम वर ठेवता येत नाही

अशा स्थितीत वैफल्यग्रस्त विरोधक काहीतरी करून आपला जीव रमवण्यासाठी निवडणूक आयोगाला दोष देत आहेत. आणि त्यांचे तुणतुणे मिपावरील मोरू लोक वाजवत आहेत.

त्यांना तर्कशुद्ध उत्तर देणे हे गाढवापुढे गीता वाचण्यासारखे आहे.

आग्या१९९०'s picture

12 Aug 2025 - 10:48 am | आग्या१९९०

त्यातून संसदेवर हल्ला झाला तरी काहीही न करणाऱ्या डॉ मनमोहन सिंह यांच्या तुलनेत

संसदेवर हल्ला झाला तेव्हा डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान होते का?

सुबोध खरे's picture

12 Aug 2025 - 10:54 am | सुबोध खरे

क्षमस्व

मुंबईवर दहशतवादी हल्ला लिहायचं होतं.

मुद्दा लक्षात घ्या.

अर्थात तो तुम्हाला लक्षात घ्यायचा नाहीये हे लोकांनी लक्षात घेतलंच आहे

आग्या१९९०'s picture

12 Aug 2025 - 11:06 am | आग्या१९९०

एक अतिरेक्याला जिवंत पकडून फाशी दिली. अर्थात डॉ. मनमोहन सिंग ह्यांनी बरंका !

स्वधर्म's picture

12 Aug 2025 - 3:02 pm | स्वधर्म

फेक नॅरेटीव्ह बरोब्बर पकडले. मनमोहन सिंह यांनी कधीही चमकोगिरी, फोटो शूटस, मनकी बात, विनाकारण कुणाच्या गळ्यात पडणे, खोटी गर्जना करणारी, धार्मिक भावनेला हात घालणारी भाषणे कधी केली नाहीत. फक्त चांगले काम केले.

स्वधर्म's picture

12 Aug 2025 - 3:02 pm | स्वधर्म

फेक नॅरेटीव्ह बरोब्बर पकडले. मनमोहन सिंह यांनी कधीही चमकोगिरी, फोटो शूटस, मनकी बात, विनाकारण कुणाच्या गळ्यात पडणे, खोटी गर्जना करणारी, धार्मिक भावनेला हात घालणारी भाषणे कधी केली नाहीत. फक्त चांगले काम केले.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Aug 2025 - 3:30 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
मनमोहन वाचाळवीर नव्हते.

आग्या१९९०'s picture

10 Aug 2025 - 10:22 pm | आग्या१९९०

अशी नावे मतदारयादीत टाकताना सिटी सर्व्हे नंबर न टाकता घर क्रमांक हा कॉलम मोकळा ठेवला तर सिस्टीम कदाचित शून्य असा क्रमांक घेत असावी. अर्थात हा माझा तर्क.
वडिलांचे/पतीचे नाव tygay, hdyka असल्या प्रकाराचे होत असतील आणि त्याची कारणे माहीत असतील तर इतके दिवस झोपले होते का नडवणुक आयोग? आधार कार्ड वरील नाव जरा कुठे वेगळे दिसले की बुथवर अडवले जाते मतदाराला. हीच काळजी मतदार यादी तयार करताना का घेत नाही? कोणी चुका दाखवल्या तर त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Aug 2025 - 5:43 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

राहुल गांधीनी विचारलेल्या प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तर देण्यापेक्षा उलट प्रश्न करणे,चालढकल करणे ह्यात निवडणूक आयोग गुंतला आहे. आयोग प्रामाणिक असता तर "चौकशी करू. व दोषी अधिकार्यांवर कारवाई करू" असे सरळ सांगितले असते.
आता आयोगाच्या बचावासाठी भाजपाचे नेते पुढे सरसावले.. देवेंद्र फडणवीस ह्यांनी उत्तरे देण्यापेक्षा 'राहुल गांधी ह्यांनी त्यांचा मेंदू तपासला पाहिजे" वगैरे बाष्कळ टीका केली. हे त्यांच्या मातृसंघटनेत जे शिकवले जाते त्याला धरूनच म्हणा: प्रतिवाद करता येत नसेल तर व्यक्तिगत टीका करा.
आता निवड्णूक आयोग राहुल गांधी ह्यांना कोणत्यातरी नियमाच्या कचाट्यात पकडायचा प्रयत्न करेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Aug 2025 - 7:43 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
देशात लोकशाही संपवावी म्हणून भाजप प्रयत्नशील आहे. भारतचा प्रवास उलट दिशेने सुरू झाला आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Aug 2025 - 8:03 pm | अमरेंद्र बाहुबली

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Aug 2025 - 9:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

द लेडीज एंड जन्टलमन आय प्रेझण्ट टू यू माय फ्रांड ये फ्रांड ऑफ़ इंडिया अ ग्रेट अमेरिकन प्रेसिडेंट मिस्टर डोनाल्ड

भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवस झालेल्या लष्करी संघर्षात आपण मध्यस्थी केली असा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. या संघर्षात पाच ते सहा विमाने पाडण्यात आली ( कोणाचे ते नै बोलले ) व्हाइट हाउसमध्ये शुक्रवारी बोलताना त्यांनी ही माहिती ३१ व्या वेळी दिली.

निवडणूक आयोग इकडे शपथपत्र द्या, पुरावे द्या म्हणत असतांना राहुल गांधी यांना नोटीस देऊन मोकळे झाले आणि तिकडे न्यायालयात मात्र निवडणूक आयोग म्हणतो की, सर्वोच्च न्यायालयात बिहार प्रकरणात 'संबंधितांना पूर्वसूचना दिल्याशिवाय, त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय किंवा तर्कशुद्ध नोटीस बजावल्याशिवाय बिहारमधील मसुदा मतदारयादीतून कोणत्याही मतदाराचे नाव वगळले जाणार नाही,' अशी ग्वाही आयोगाने न्यायालयाला दिली.

बिहार मधे थोड़ी थोड़की नव्हे तर, ६५ लाखांहून जास्त नावे वगळण्यात आली आहेत. नावे वगळण्यात आलेल्या व्यक्ती एकतर मरण पावल्या आहेत किंव स्थलांतरित झाल्या आहेत, असा दावा आयोगाने केला आहे. अचानक वादळ आल्यासारखं मरणाचं आणि स्थलांतराचं प्रमाण वाढलं =))

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Aug 2025 - 9:31 am | अमरेंद्र बाहुबली

हाहा! मला वाटते नितीश बांबूचा काटा काढण्यासाठी अडवणूक आयोगाचे हे उद्योग सुरू आहेत, “ज्यांच्या जीवावर वाढा त्यांना संपवा.” ह्या भाजपी धोरणानुसार नितीश बांबूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गान परिषद, अकाली दल, शिवसेना करण्याचा घाट घातला जातोय. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न अडवणूक आयोग करतोय. लोकशाही वगैरे गेली तेल लावत.

आग्या१९९०'s picture

11 Aug 2025 - 9:51 am | आग्या१९९०

आणीबाणीविरुद्ध गळा काढणारे नडवणूक आयोगाविरुद्ध ब्र काढत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Aug 2025 - 12:07 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Aug 2025 - 2:48 pm | अमरेंद्र बाहुबली
युयुत्सु's picture

11 Aug 2025 - 7:08 pm | युयुत्सु

टीप - चित्र फेबुच्या सोजन्याने

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Aug 2025 - 8:46 am | माईसाहेब कुरसूंदीकर

हा हा हा. शिकलेल्या लोकांनाही कसे भरकटवले जाउ शकते त्याचे हे उत्तम उदाहरण होते, करोना काळातले. मग थाळ्यांच्या आवाजाने करोना कसा मरतो..ह्यावरही वॉट्स-अ‍ॅप विद्यापीठात माहिती आली. असो.

शिकलेले लोकही कसे हुकलेले असतात ह्याचे हे उत्तम ऊदाहरण आहे. कोरोना कळात जिवाची पर्वा न करता आपले काम करणार्या लोकांविषयी क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या / घंटा वाजवुन त्यांचे मनोबल वाढवा हा त्यामागे हेतु होता.

असो. ह्यावर जास्त बोलत नाही. मिपा वर हा चाउन चोथा झालेला विषय आहे.

पण काही हुकलेले पुन्हा पुन्हा तीच तीच टेप वाजवत असतात. वॉट्स-अ‍ॅप विद्यापीठात सर्व् ज्ञान मिळते.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Aug 2025 - 9:44 am | अमरेंद्र बाहुबली

कोरोना कळात जिवाची पर्वा न करता आपले काम करणार्या लोकांविषयी क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या / घंटा वाजवुन त्यांचे मनोबल वाढवा हा त्यामागे हेतु होता.
मग त्याना पद्मभूषण पद्मविभूषण देऊन गौरवायला हवे होते, तेव्हा तुम्ही (म्हणज्या तुमच्या लाडक्या मोदी सरकारने) कंगना राणावत ला पुरस्कार दिले आणी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्याना काय टाळ्या नि थाळ्या? म्हणूनच बिरुटे सर आजच्या काळाला “गोबरयुग” म्हणत असावेत का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2025 - 8:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2025 - 8:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकसभा निवडणुकीतील कथित 'मतचोरी' आणि बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरपडताळणीच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीचे खासदार सोमवारी रस्त्यावर उतरले. खासदारांना पोलिसांनी अडवले घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला, पुढे अटक आणि सुटका.

राजकीय डावपेचाच्या लढाईत 'इंडिया' आघाडी घेत आहे, हळुहळु प्रसार माध्यमात बातम्या यायला लागल्या आहेत. लोकसभेत आत आणि बाहेर सत्ताधा-यांची कोंडी केली यापुढील उत्तरे काळ देईल.

मुंबईतील कबुतरखान्यांमध्ये कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. आणि जैन समाज आणि महाराष्ट्र सरकार पुढे काय पाऊल उचलते ते कळेलच.

राज ठाकरे यांच्या मराठी भाषिकांबाबतच्या काही भाषणांच्या विरोधातली याचिका फेटाळली. आणि ७४ वय वर्ष असलेले आदरणीय प.मोदी कोणत्या तरी देशाच्या दौ-यावर रवाना.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Aug 2025 - 9:46 am | अमरेंद्र बाहुबली

७४ वय वर्ष असलेले आदरणीय प.मोदी कोणत्या तरी देशाच्या दौ-यावर रवाना.


पिकनिक ला गेले म्हणा, कारण हाती भोपाळच येणार आहे, युद्ध झाल्यावर कुणीही आपल्या पाठीशी उभे राहत नाही.

स्वधर्म's picture

12 Aug 2025 - 2:56 pm | स्वधर्म

सरकारने तेवढीच संधी साधून काल हे सर्व खासदार संसदेत नसताना चार विधेयके मंजूर करून घेतली. ही सरकारची नेहमीचीच कार्यपध्दती झाली आहे.

आग्या१९९०'s picture

12 Aug 2025 - 9:02 am | आग्या१९९०

१) सध्या जखमी बचाव पथकाने नडवणूक आयोगाला वाऱ्यावर सोडले आहे.

२) एखाद्याच्या डोक्यातील चिप काढणे हे टरबूजातील बिया काढण्याइतके सोपे नसते , हे भारतीय जंता पक्षाच्या एका नेत्याला कळून चुकले आहे.
समाप्त.

आसीम मुनीरानी एक विनोदी भाषन केले आहे. त्यात भारत म्हणजे एक मर्सिडीज आहे तर पाकिस्तान हा एक जुनाट ट्रक आहे. आणि जुन्या ट्रकने मर्सिडीज ला धडक दिली तर नुकसान कोणाचे जास्त होईल असे विचारले आहे.
त्याच भाष्णात त्यानी आणखी एक मुद्दा मांडला आहे जो जरा गंभीर आहे. ते फेल्डमार्शल म्हणतात ही जर पाकिस्तान हरायला लागला तर आम्ही अण्वस्त्रे वापरू आणि निम्मे जग नष्ट करू

Edने ब्लॉक केलेले नव्वद कोटी रु परत मिळवून दाखवावेत . दूध के धुले.
तीन नामांकित सांसदीय वकील आहेत त्यांच्याकडे.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Aug 2025 - 3:51 pm | अमरेंद्र बाहुबली

कायद्याचे राज्य असते तर नक्की मिळाले असते.

आग्या१९९०'s picture

12 Aug 2025 - 5:03 pm | आग्या१९९०

Edने ब्लॉक केलेले नव्वद कोटी रु परत मिळवून दाखवावेत . दूध के धुले.
मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू दानशूर होते, त्यांनी देशाला आपला आनंद महाल भेट दिला. धमक्या देऊन Electoral bond मधून पक्षासाठी पैसा गोळा केला नाही. त्यामुळे काँग्रेसला अडचणीत आणू शकता पण विकत घेऊ शकत नाही.