ए० आय० पेक्षा भयानक तंत्रज्ञान येत आहे...

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
1 Jul 2025 - 10:34 am


माझ्या या पोस्ट्मध्ये (https://www.misalpav.com/node/52703) २०२२४ मध्ये एका संघोट्याशी झालेल्या भांडणाची हकीकत लिहीली होती. चीनबद्दल मी जेव्हा ही भूमिका घेतली तेव्हा ब्लूमबर्गने आयोजित केलेल्या एका परिसंवादात केलेल्या भाषणाचा त्याला आधार होता. हा चीनचा प्रतिनिधी मोठ्या अभिमानाने सांगत होता की आमची पॉलिसी डॉक्युमेण्ट वाचा. आमच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीचा दर ८०-८५% टक्के आहे. भविष्यात चिनी अर्थव्यवस्था मुख्यतः ए० आय० आणि कृत्रिम जीवशास्त्र या दोन तंत्रज्ञानामधल्या चीनच्या आघाडीवर अवलंबून असेल.

या चीनी प्रतिनिधीच्या आवेशाने मी स्तब्ध झालो होतो. कृत्रीम जीवशास्त्र या शब्दांनी माझे कान ट्वकारले गेले. मग कृत्रीम जीवशास्त्राबद्दल जेव्हढी मिळेल तेव्हढी माहिती वाचायला, पहायला सुरुवात केली. थोडक्यात सांगायचे तर कृत्रीम जीवशास्त्र म्हणजे निसर्गात लूडबूड करायचे तंत्रज्ञान. हे प्रत्यक्षात यायला अजून वेळ लागेल असा मी माझा समज करून घेतला...

पण आज हे माझ्या कालरेषेवर झळकलं आणि चर्र झालं...माझ्या आकलनानुसार हे तंत्रज्ञान ए०आय० पेक्षा भयानक असेल कारण याचे फायदे सर्वसामान्याना मिळणे मला तरी अवघड वाटते. ज्या राष्ट्रांना हे तंत्रज्ञान मिळेल त्याना अनफेअर आघाडी मिळणार हे निश्चित...

https://www.youtube.com/watch?v=YvEFYWjmuoA

समाज

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Jul 2025 - 10:42 am | माईसाहेब कुरसूंदीकर

काहीतरी भयानक दिसते आहे.
age

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2025 - 10:48 am | अमरेंद्र बाहुबली

आपण भयंकराच्या दारात आहोत.

विवेकपटाईत's picture

3 Jul 2025 - 9:48 am | विवेकपटाईत

काही तरी निश्चित भयंकर घटित होत आहे. आजच एका आणखीन देशाने एका संघोट्याला सर्वोच्च पुरस्कार दिला. आता पर्यन्त बहुतेक 25 देशांनी दिला असेल. ही संख्या आधीच्या सर्व प्रधानमंत्रींना मिळालेल्या सर्वोच्च पुरस्कारांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. मला तर शंका आहे, डीएनए बदल तंत्रज्ञानाचे योगदान यात असण्याची शक्यता आहे. कदाचित 2029 मध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी संघोटे सर्वांचे डीएनए ही बदलतील. (एक तांनाशाह दुसर्‍या तांनाशाहची मदत नक्कीच करणार). सावधान करण्यासाठी लेखकाला धन्यवाद.

युयुत्सु's picture

3 Jul 2025 - 11:44 am | युयुत्सु

<ही संख्या आधीच्या सर्व प्रधानमंत्रींना मिळालेल्या सर्वोच्च पुरस्कारांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. >

हरदासाची कथा मूळ पदावर आली... मोदींना मिळणार्‍या पुरकारांनी देशात पेटंट इकॉनॉमी थोडीच येणार आहे?

विवेकपटाईत's picture

3 Jul 2025 - 3:43 pm | विवेकपटाईत

. मोदी आले आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती झाली ही सत्य नाकारण्यात अर्थ नाही. बाकी गुगल वरून

2014 से 2024 के बीच भारत में लगभग 1 लाख पेटेंट पंजीकृत हुए हैं। 2023-24 में, 41,010 पेटेंट दिए गए, जो एक रिकॉर्ड है. 2013-14 में यह संख्या 4,227 थी.

कृत्रीम जीवशास्त्राची प्रगती

बिजांड आणि शुक्रजंतू शिवाय भ्रूणनिर्मिती
पण या खेपेस केंबिजमधून...
https://www.cam.ac.uk/stories/model-embryo-from-stem-cells

माहितगार's picture

16 Jul 2025 - 6:20 pm | माहितगार

भविष्य चांगलं दिसतयं कि मग, सगळ्यांना हवे ते बॉडी पार्ट्स रिप्लेस करता येतील आणि मुख्य म्हणजे तुमच्या शब्दात कोणी किडके असणार नाही सगळेच सुदृढ!!

युयुत्सु's picture

16 Jul 2025 - 8:10 pm | युयुत्सु

<भविष्य चांगलं दिसतयं कि मग,>

तुम्हाला वाटतं तितक रोझी चित्र नसणार आहे. ए० आय० ने जसं जग नव्या विषमतेमध्ये ढकललं तसंच या नव्या संशोधनाने होईल.

माहितगार's picture

17 Jul 2025 - 8:03 am | माहितगार

विज्ञान विज्ञान असतं, उपयोग चांगला की वाईट करायचा ते प्रत्येक मनुष्य प्रवृत्तीवर आहे. पण ज्या जगात प्रत्येक जण सुविधा संपन्न असेल तिथे कुणाचे वाईट करण्याची गरज सहसा कमी होईल.

पुर्वी जन्माधारीत जातीय उतरंड तयार झाली होती तिचे क्लास उतरंड मध्ये रुपांतरण होत चालले आहे. तुम्ही जनुकीय उतरंडीचा सिद्धांत मांडता आहात आणि प्रत्येकांला समान जनुकीय संधी कशा मिळतील या बद्दल संशोधन करण्या एवजी जनुकीय उतरंडीचा सिद्धांताधारीत वीषमतेच्या शक्यते कडे तुमच्याकडून दुर्लक्ष होत नाही किंवा कसे. जनुकीय उतरंड मेंदुच्या विकासावर आधारीत उतरंड आधारीत वीषमते पेक्षा आरोग्यदायी मेंदु आरोग्यदायी जनुके सर्वांना विनासायास उपलब्ध झाल्यास वीषमता मला तरी कमी होईल असे वाटते .

युयुत्सु's picture

17 Jul 2025 - 10:04 am | युयुत्सु

श्री० माहितगार

<तुम्ही जनुकीय उतरंडीचा सिद्धांत मांडता आहात आणि प्रत्येकांला समान जनुकीय संधी कशा मिळतील या बद्दल संशोधन करण्या एवजी >

आपला थोडासा गोंधळ झाला आहे- मी जनुकीय उतरंडीचा सिद्धान्त मांडत नसून मानवी दुटप्पीपणा कडे दूर्लक्ष करू इच्छितो- मानव इतर जीवांसाठी जे नीति-नियम तयार करतो ते स्वतःसाठी स्वीकारत नाही. मला ही एक प्रकारची लबाडी वाटते. समान जनुकीय संधी ही कल्पना पुढच्या ५० वर्षात अस्तित्त्वात येईल असे वाटत नाही. समानतेची पण एक किंमत असते आणि ती मोजल्याशिवाय समानता येत नाही. नीतिमत्ता धुडकावणार्‍या चीन सारख्या देशांना याचा मोठा फायदा मिळेल आणि भारत मागे जाईल.

आपण "बेल कर्व्ह" या गणितीय कल्पनेचा परिचय करून घेतला तर "उतरंडी" कधीही टाळता येतील असे वाटत नाही.

गामा पैलवान's picture

17 Jul 2025 - 2:28 pm | गामा पैलवान

युयुत्सु,

समानतेची पण एक किंमत असते आणि ती मोजल्याशिवाय समानता येत नाही.

एक तात्विक प्रश्न आहे. समानता म्हणजे काय आणि ती प्राप्त व्हावी म्हणून किंमत मोजण्याइतका अट्टाहास का करायचा? निसर्गात कुठेही समानता आढळून येत नाही.

प्रश्न तात्विक असल्याने हो/नाही असं उत्तर अपेक्षित नाही.

आ.न.,
-गा.पै.