किडकी प्रजा - सायकोपथी

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
28 Jun 2025 - 8:02 am

सायकोपथी हा गुंतागुंतीच्या समाजघातक वर्तनाला कारणीभूत ठरणार्‍या व्यक्तीमत्वातील बिघाडांचा समूह मानला जातो. अशा बिघडलेल्या व्यक्तीमत्त्वाच्या लोकांना सायकोपॅथ अशी संज्ञा आहे. अशा व्यक्तींची ठळक वैशिष्ट्ये अशी असतात-

० अनाठायी आत्मविश्वास,सतत लबाडी आणि काड्या करायची प्रवृत्ती (ability to manipulate)
० स्वत:बद्दल अवाजवी कल्पना, उद्धटपणा
० स्वत:च्या फायद्यासाठी सतत लबाडी आणि फसवेगीरी
० शोषण, गैरफायदा घ्यायची प्रवृत्ती, अपराधीपणाचा अभाव
० जबाबदारी स्वीकारायला नकार

अशा व्यक्तीमत्त्वाच्या लोकांचे आजुबाजुचे वातावरण जर खतपाणी घालत असेल तर हळुहळु गुन्हेगारात रुपांतर होते. भ्रष्टाचार करणार्‍या व्यक्ती सहसा सायकोपॅथच असतात.

सायकोपथी आणि मानवी मेंदूचे आकारमान (घट/क्षय) यांच्या सहसंबंधाचा अभ्यास करणारा एक शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

Pieperhoff, P., Hofhansel, L., Schneider, F. et al. Associations of brain structure with psychopathy. Eur Arch Psychiatry Clin Neurosci (2025). https://doi.org/10.1007/s00406-025-02028-6

मेंदूच्या ज्या भागात हा क्षय दिसला ते भाग या प्रमाणे - subcortical areas such as the basal ganglia, thalamus, and basal forebrain, as well as parts of the brainstem (pons), cerebellum, and cortical areas in the orbitofrontal and insular regions.

महत्त्वाची गोष्ट अशी की मेंदू आक्रसण्यासाठी जे घटक कारणीभूत असतात त्यात आनुवंशिक कारणांशिवाय व्यसने, ताण, चयापयाशी संबंधीत, रक्तदाब मधुमेहा सारख्या व्याधी, विषद्रव्यांचा मारा, कुपोषण इ० मुळे पुढील गोष्टी घडून येतात -चेतापेशींचा मृत्यु, चेतापेशींच्या जोडण्यांचा क्षय, चेतापेशींच्या शाखांचा क्षय, चेता तंतूंचा क्षय, चेतापेशींच्या आवरणाचा क्षय, चेतापेशींचे रक्षण करणार्‍या ग्लाया पेशींचा क्षय इ०

"किडकी प्रजा" या शब्दांनी अपमानित किंवा दु:खी होणार्‍यांना आणखी काय पुरावा हवा आहे? जसंजसं ताजं संशोधन वाचनात येईल तसं लिहायचा प्रयत्न करीनच...

समाज

प्रतिक्रिया

महत्त्वाची गोष्ट अशी की मेंदू आक्रसण्यासाठी जे घटक कारणीभूत असतात त्यात आनुवंशिक कारणांशिवाय व्यसने, ताण, चयापयाशी संबंधीत, रक्तदाब मधुमेहा सारख्या व्याधी, विषद्रव्यांचा मारा, कुपोषण इ० मुळे पुढील गोष्टी घडून येतात -चेतापेशींचा मृत्यु, चेतापेशींच्या जोडण्यांचा क्षय, चेतापेशींच्या शाखांचा क्षय, चेता तंतूंचा क्षय, चेतापेशींच्या आवरणाचा क्षय, चेतापेशींचे रक्षण करणार्‍या ग्लाया पेशींचा क्षय इ०

तुम्ही दिलेल्या लिंक वरील संशोधन प्रबंध वाचला. त्यात जो शेवटी संशोधकांनी निष्कर्ष दिलेला आहे त्यात त्यांनी याच विषयाच्या संदर्भात भविष्यात ज्या प्रश्नांवर संशोधन करण्याची गरज आहे त्यात असे म्हटलेले आहे की वरीलप्रमाणे मेंदूत झालेले बदल हे किती प्रमाणात

1 किती प्रमाणात अनुवंशिकते शी संबंधित आहेत ?
2 किती प्रमाणात सभोवतालच्या पर्यावरणाशी संबंधित आहेत ?

यावर म्हणजे मेंदूतील या बदलात वरील दोन घटकांपैकी कोणाचा वाटा किती हे ठरविण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केलेली आहे.
पण तुमच्या वरील विधानात तुम्ही आनुवंशिक कारणाशिवाय इतर घटक कारणीभूत आहेत असे जे म्हणत आहात त्याचा आधार किमान या तुम्ही इथे दिलेल्या पेपर मध्ये तरी आढळला नाही.

The results of the group comparison tentatively suggest a rather widespread disturbance of brain development in psychopathic subjects. Questions for future studies are e.g., to what degree these structural differences are heritable or associated with e.g. environmental factors.
मला वाटते संशोधकांच्या गतीशी ताळमेळ राखणे गरजेचे आहे. तसेच ते जोपर्यंत ठाम निष्कर्ष काढत नाही तो पर्यंत आपणही त्यांनी वापरलेल्या tentatively शब्दाचा संकोचाचा मान राखला पाहिजे.

युयुत्सु's picture

29 Jun 2025 - 8:14 am | युयुत्सु

श्री० मारवा,

प्रथम प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! तुमचा मुद्दा बरोबर आहे पण एका मर्यादेपर्यंतच ... शोधनिबंधांमध्ये लिटरेचर रिव्ह्यु आणि मेटा-अ‍ॅनालिसिस असे दोन महत्त्वाचे मुख्य प्रकार असतात- ढोबळमानाने असे म्हणता येते की रिव्ह्यु प्रकारातले शोधनिबंध उपलब्ध संशोधानांचे गुणात्मक विश्लेषण करतात तर मेटा-अ‍ॅनालिसिस मध्ये उपलब्ध संशोधानांचे संख्यात्मक विश्लेषण करतात. या दोन अभ्यासांचे निष्कर्ष साधारण पणे असे मांडले जातात -

Literature review:
"Studies show mindfulness reduces anxiety in 60% of trials, though effects vary by population."

Meta-analysis:
*"Pooled data from 40 RCTs (n=5,000) show mindfulness reduces anxiety scores by 1.2 standard units (95% CI: 0.8–1.6)."*

एकच एक अभ्यास विचारात घेतला तर तुम्ही म्हणता ती विधाने महत्त्वाची आहेत. पण तुम्ही मेंदूचे आकारमान आणि वर्तन विकृती
अशा बीजसंज्ञा देऊन शोध घेतला तर शोध-निबंधांचा पाऊस पडलेला दिसेल. त्यात वर दिलेले दोन प्रकारचे अभ्यास शोधले तर आणि कार्यकारणभावाचे जुजबी जरी ज्ञान असले तर पोपट मेला आहे याच्या अधिकृत घोषणेची वाट बघायची गरज उरत नाही.

माझा मुद्दा लक्षात आला असेल अशी अपेक्षा आहे...

युयुत्सु's picture

29 Jun 2025 - 8:38 am | युयुत्सु

एक राहून गेले.

उदा० नेचर मध्ये प्रकाशित झालेला पुढील रिव्ह्यु मेंदूचे आकारमान आणि वर्तन विकृती यावरील जास्तीत उपलब्ध संशोधनाचा आढावा घेतो

Tully, J., Cross, B., Gerrie, B. et al. A systematic review and meta-analysis of brain volume abnormalities in disruptive behaviour disorders, antisocial personality disorder and psychopathy. Nat. Mental Health 1, 163–173 (2023). https://doi.org/10.1038/s44220-023-00032-0

तुमच्या प्रतिसादात literature review आणि meta analysis च्या सहाय्याने निष्कर्ष काढण्याची प्रचलित दिलेली पद्धत शास्त्रीय आणि उत्तम अशीच आहे याच्याशी सहमत आहे.
माझा.specific प्रश्न असा की

1
तुमच्या आता पर्यंतच्या मांडणीत किडकी प्रजा जन्मास येण्याचे प्रमुख कारण तुमच्या मते एकूण बिघडलेले पर्यावरण आहे असे मला समजते.
2
दुसरे कारण अनुवंशिकता हे सुद्धा असू शकते. जेव्हा अनुवंशिकता हा दोष असेल तेव्हा बिघडलेले पर्यावरण हे कारणीभूत नसणार.
3
तर या लेखात दिलेला पेपर तरी म्हणतो की यावर अजून संशोधन करणे गरजेचे आहे की कुठले कारण आहे
4
तर वरील दोन literature review आणि meta analysis या रीतीचा वापर करून असे सिद्ध झालेले आहे का की
बिघडलेले पर्यावरण हे किडकी प्रजा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे ? (अनुवंशिकता नव्हे)
हा वरील specific प्रश्न आहे.

युयुत्सु's picture

29 Jun 2025 - 9:42 am | युयुत्सु

<तुमच्या आता पर्यंतच्या मांडणीत किडकी प्रजा जन्मास येण्याचे प्रमुख कारण तुमच्या मते एकूण बिघडलेले पर्यावरण आहे असे मला समजते.>

पर्यावरणाच्या आघातांनी एका मर्यादेनंतर केंद्रकाम्लाची रचना बिघडते आणि त्यामुळे आनुवंशिक दोष निर्माण होतात. "किडकी प्रजा" ही मी योजलेली संज्ञा आहे. अशी कठोर संज्ञा वापरण्याचा उद्देश समाजाला गदागदा हलवून जागे करणे हा आहे. पर्यावरण हा भारतात एक चेष्टेचा विषय आहे. भारतातील न्यायालये पर्यावरण आणि विकास असा संघर्ष असेल तर विकासाची बाजू घेतात, अशी ऐकीव माहिती आहे.