महाजनस्य संसर्गः
-राजीव उपाध्ये
पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाईम्स
पञ्चतंत्रात एक श्लोक आहे : महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः। पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्॥ ‘मोठ्या लोकांचा सहवास कुणाला प्रगतीकारक नसतो? कारण कमळाच्या पानावर पडलेले पाणी मोत्यांची शोभा धारण करते,’ हा याचा अर्थ.
अर्नोल्ड टॉयन्बी नावाचा एक इतिहासकार म्हणतो, की दोन संस्कृतीची जेव्हा टक्कर होते, तेव्हा बलिष्ठ संस्कृतीच्या चालीरीती कनिष्ठ संस्कृतीवर प्रभाव पाडतात आणि झिरपतात; आणि मानवी समाज उत्क्रांत होत राहतो. सध्या हे मानववंशशास्त्रीय वास्तव राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे आहे. कुणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे स्वीकारणे कमीपणाचे, अस्मितेला धक्कादायक मानले जाते. कारण ते ‘समते’च्या तत्त्वाविरुद्ध आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा श्रेष्ठ संस्कृती, समूह यांचा द्वेष, तिरस्कार करणे जास्त रुळले आहे.
जीवसृष्टीत मानव अनेक कारणांनी शीर्षस्थानी किंवा श्रेष्ठ मानला जातो. ज्ञानप्राप्तीचे आणि त्याचे विश्लेषण करून उपयोग करण्याचे विशेष कौशल्य मानवाइतके इतर प्राण्यात विकसित झालेले नाही. वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळी हत्यारे बनविणे आणि त्यांचा उपयोग, हेही इतर प्राण्यामध्ये विकसित झालेले नाही. वेगवेगळ्या कलांचा विकास, पर्यावरणावरील प्रभुत्व, गुंतागुंतीची समाजरचना मानवाइतकी कळपात राहणाऱ्या प्राण्यात नसते. शिवाय परिस्थितीशी जुळवून घेण्यात मनुष्यप्राण्याचा पहिला क्रमांक लावावा लागतो.
मात्र, मानवानंतर सर्वात वेगाने उत्क्रांत प्राणी या जीवसृष्टीत कोणता? कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या (एआय) मदतीने या प्रश्नाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला पुढील उत्तरे मिळाली - चिंपांझी आणि बोनोबो कुळातील माकडे, डॉल्फिन, हत्ती, कावळे, ऑक्टोपस. यासाठी नक्की कोणते निकष कसे लावले आहेत ते कळायला मार्ग नाही; पण मला ही उत्तरे पटली नाहीत. याचे कारण म्हणजे हत्ती आणि माकडे सोडली तर बाकीचे प्राणी पाळले जात नाहीत. हत्ती आणि माकडे पाळली जात असली तरी त्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी संपर्कात येऊन जी वर्तनविषयक उत्क्रांती होणे अपेक्षित आहे, ती या दोन प्रजातींमध्ये दिसत नाही.
मानवी संपर्कात येऊन मोठ्या प्रमाणावर उत्क्रांत होत असलेला प्राणी म्हणजे कुत्रा आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. गेले काही वर्षे समाजमाध्यमांच्या कृपेने मी जगभरच्या पाळीव कुत्र्यांच्या वर्तनाची निरीक्षणे करीत आहे. कुत्र्यांचे मानवीकरण ज्या वेगाने होत आहे, तितके इतर कोणत्याच प्राण्याचे होताना दिसत नाही. गाय, बैल, घोडा आणि हत्ती हे विशिष्ट हेतूने पाळले जातात. त्यांच्यात आणि त्यांच्या मालकांत भावबंधही निर्माण होतात. (हे अगदी वाघसिंहासारख्या हिंस्र पशूमध्येही दिसते.) मात्र, त्यांच्यात मानवी संपर्कामुळे, मानवीकरण कुत्र्यांच्या इतके वर्तनवैविध्य दिसत नाही. मानवाशी सर्वात जास्त जनुकीय साधर्म्य असलेले कपिबांधव वर्तनवैविध्यामध्ये मानवानंतर असायला हवे होते; पण ते तसे झालेले दिसत नाहीत. ही आश्चर्याची गोष्ट नाही का?
‘कुत्र्यांचे मानवीकरण’ असा शब्द मी मुद्दामच वापरला. त्यात केवळ ‘पाळणे’ अभिप्रेत नसते. मानवीकरणाचा परीघ पाळण्यापेक्षा बराच मोठा आहे. पाळणे हे संकुचित वाटते - त्यात त्या प्राण्याच्या मूलभूत गरजा भागवून त्याकडून कामे करून घेतली जातात. मानवीकरणात तो जीव मानव असे समजून त्याला वागवले जाते. मानवीकरण केलेल्या कुत्र्यांमध्ये अशी श्रमांची अपेक्षा असतेच असे नाही. याला अपवाद विशिष्ट कौशल्ये शिकवले गेलेले म्हणजे - सैन्य, पोलिस दलातील कुत्रे, तसेच अपंग व्यक्तींना सोबत करण्यासाठी शिकवलेले सर्व्हिस डॉग्ज, गुरे राखण्यासाठी पाळले गेलेले बॉर्डर कॉली सारखे श्वान इत्यादी.
कुत्र्यांच्या मानवीकरणाचा विस्तार कुठपर्यंत झाला आहे, हे बघणे रंजक आहे : कुत्र्यांच्या वंशावळी ठेवल्या जातात, कुत्र्यांना ज्या मानवी कुटुंबात ’दत्तक’ घेतले जाते, त्यांची कुलनामे बहाल केली आहेत, अनेक कुटुंबात लहान मुलांच्याबरोबर कुत्र्यांच्या पिलांना आणून वाढवले जाते; असे एकत्र वाढलेल्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे कुत्र्याबरोबर भावनिक नाते अजोड असते. कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करणे हे तर सर्रास आहे; काही अतिउत्साही आणि हौशी लोक कुत्र्यांची लग्नेही लावतात; पण हे माझ्या पहाण्यात फार नाही. अलीकडे विशेषत: कुत्र्यांना माणसाप्रमाणे कपडे, बूट घालून नटवले जाते. केसाळ कुत्र्यांच्या वेण्या बांधल्या जातात; स्कूटर, सायकलसारख्या वाहनाने फिरायला जाताना कुत्र्याना हेल्मेट, गॉगल घातले जातात. भविष्यात कुत्र्यांना ‘नग्नावस्थेत’ फिरायला नेऊ नये असे कायदे झाल्यास तो मानवीकरणाचा कळस ठरेल. विमानप्रवासात अनेक जण कुत्र्यांना अगदी केबिनमध्ये बरोबर घेऊन प्रवास करतात.
या प्रत्येक विस्तारशाखेत मोठी आर्थिक उलाढाल होत असते; पण तो मुख्य मुद्दा नाही, तर मुख्य मुद्दा मानवीकरणातून कुत्र्यांचा झालेला बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक/वर्तन विकास हा आहे. अन्न, निवारा आणि जिव्हाळा मिळाल्याने कुत्रा स्वतः माणसाला ‘समर्पित’ करतो आणि आपल्यावर अवलंबून असलेले कुणीतरी जीव लावणारे मिळाल्याने माणसाचा ‘अहं’ सुखावतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे माझ्या मते कुत्रा आणि माणसाच्या अनोख्या नात्याचे गुपित आहे.
मी आंतरजालावर शोध घेतला, तेव्हा बॉर्डर कॉली आणि पुडल या प्रजाती कुत्र्यांत सर्वांत बुद्धिमान असल्याचे मानले गेले आहे. ‘चेसर’ नावाची कुत्री आतापर्यंत सर्वांत बुद्धिमान मानली गेली आहे. तिची स्मरणशक्ती, शब्दसंग्रह, शोधक्षमता अचाट असल्याने ती अनेकांच्या अभ्यासाचा विषय झाली आहे; पण अनेक कुत्र्यांना अल्पप्रमाणात संख्याज्ञानही असते, असे मानले जाते आणि माफक प्रमाणात अनेक काही कुत्री शिकवल्यानंतर सोपी आकडेमोड (बेरजा आणि वजाबाक्या) करू शकतात. काही कुत्री ‘फुली गोळा’सारखे खेळ त्यांच्या मानवी मित्रांबरोबर खेळताना दिसतात. काही कुत्री डॉज बॉल, लपाछपी आदी खेळही खेळू लागली आहेत. स्केट बोर्डवर स्केटींग करणार्या श्वानांची संख्या मोठी आहे.
पालकांबरोबर श्वानांना संवाद साधता यावा, यासाठी काही बटने दाबून रेकॉर्ड केलेला संदेश ऐकवण्यासाठी उपकरणे उपलब्ध आहेत. ती वापरून श्वान आश्चर्यकारक संवाद साधतात. बाहेरून आल्यावर घरात येताना पाय पुसून घरात येणारी कुत्री बघून मी वेडा व्हायचा बाकी होतो. मी सर्वात थक्क झालो ते चिनी पुडल या प्रजातीमुळे. मला कधीकधी हे श्वान चिनी लोकांनी प्रयोगशाळेत ‘जनुकीय बदल’ घडवून विकसित केले असावेत अशी शंका येते. याचे कारण चीन हे कसलेही नैतिक विधीनिषेध न बाळगणारे (एका दृष्टीने क्रूर) राष्ट्र आहे. चिनी पुडल चतुष्पाद राहीलेले नसून आता ते द्विपाद झाले आहेत. हा मोठा बदल प्रयोग शाळेत जनुकीय बदल ‘गुपचूप’ घडवून आणल्याशिवाय शक्य नाही असे मला वाटते. प्रयोगशाळेतील सर्वच संशोधन जगासमोर येत नसते.
उंदीर आणि डुकरांच्या गर्भात मानवी मूळपेशी/जनुक कृत्रिमपणे भरून प्रत्यारोपणासाठी अवयव मिळविण्यावर संशोधन चालू आहे. हे चिनी पुडल श्वान काय काय करत नाहीत? ते संगीताच्या तालावर नाचतात, अंथरूण घालतात, पंखे चालू करतात. ते आपल्या बाजूला वळवून घेतात. अगदी खोलीचे दार बंद करतात; तसेच कड्या उघडतात. लहान मुलांच्या अंगावरील पांघरूण सारखे करतात. त्यांच्या पालक/मालकांची छोटीछोटी कामे करतात.
कुत्री माणसासारख्या भावना व्यक्त करतात, काही तर माणसासारखे स्मित करू लागले आहेत. हस्की कुळातील काही श्वान ‘आय लव्ह यू’सारखी वाक्ये उच्चारतात. (म्हणजे तशी नक्कल करतात.) काही कुत्रे मालक नसताना घरातील पियानो वाजवून गायचा प्रयत्न करतात. टीव्हीवर कार्टून बघणे हा अनेक कुत्र्यांचा विरंगुळा आहे. ते बघत असताना त्यांना डिस्टर्ब केले तर ते नाराजी व्यक्त करतात. इतकेच नाही तर खेळाच्या सामन्यातील उत्कंठावर्धक क्षणांना तितकाच प्रतिसाद देतात. आपल्या पालकांचा मृत्यू झाल्यास श्वान दु:खी होतात. त्यांच्या खोड्या काढल्यास ते नापसंती दर्शवतात. कुत्र्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन घडवणारे ‘डॉग शो’, ‘ब्रिटन गॉट टॅलेंट’ यांसारख्या कार्यक्रमातून दिसणारे अनेक करामती करून दाखविणारे श्वान बघितल्यावर मन अचंबित होते. जनुकीय संपादनाच्या बदलामुळे भविष्यातील कुत्रे मानवी वाणीने बोलू लागले तर मला आश्चर्य वाटणार नाही.
मात्र, अशा रीतीने उत्क्रांत झालेला कुत्रा अजूनही आपल्या जातभाईना मानवाबरोबर कसे वागायचे याचे शिक्षण देत नाही. मानव त्याला अजूनही त्याच्या इच्छेनुसार ‘प्रजोत्पादन’ करू देत नाही. त्यामुळे अवगत केलेल्या गुणांचे जनुकीय संक्रमण पुढील पिढीत होत नाही. कुत्र्यांच्या उत्क्रांतीमध्ये हे काही अपूर्णता ठेवणारे दुवे आहेत, असे मला वाटते.
आधुनिक श्वानांचे हे मानवसदृश वर्तन (नियर ह्युमन बिहेवियर) बघितल्यावर कुत्रा हा माणसानंतरचा उत्क्रांत प्राणी न मानणे ही एक प्रकारची लबाडी आहे, असे मानावे लागते. माणसाशी जुळवून घेणाऱ्या कुत्र्यांचा हा विकास बघितल्यावर उपरोल्लेखित श्लोक किती चपखल आहे, हे पटल्याशिवाय राहणार नाही.
https://marathi.indiatimes.com/editorial/samwad/modern-dogs-near-human-b...
प्रतिक्रिया
10 Jun 2025 - 7:32 pm | सुबोध खरे
दोन संस्कृतीची जेव्हा टक्कर होते,तेव्हा बलिष्ठ संस्कृतीच्या चालीरीती कनिष्ठ संस्कृतीवर प्रभाव पाडतात आणि झिरपतात; आणि मानवी समाज उत्क्रांत होत राहतो.
मुळात संस्कृती म्हणजे काय?
मानवी मनावर केलेल्या संस्कारातून तयार होणारी एक सामाजिक मनोवृत्ती आहे. उदा अमेरिकन बालकाला महाराष्ट्रातील एका घरात लहानाचा मोठा केला तर ते बालक मराठी म्हणूनच आयुष्यभर वाढेल.
संस्कृती हि अनुवांशिक नाही. मराठी मुलाला उत्तर ध्रुवावरील एस्किमो लोकांनी वाढवले तर ते एस्किमो संस्कुर्ती आत्मसात करेल पण त्याचे मूळ परत महाराष्ट्रात वाढवले तर ते मराठीच होईल. म्हणजेच संस्कृती हि एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जात नाही.
एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात ती गुणसूत्रे आणि जनुके.
आता जनुकीय रोपणाने मानवी जनुके कुत्र्याच्या घातली तर तो कुत्रा माणसाच्या थोडाफार जास्त जवळ येईल. संकरित वनस्पती किंवा प्राण्यात असे होते उदा. खेचर
पण असे जनुकीय वैविध्य असणारे बहुतेक प्राणी पुनरुत्पादनास असमर्थ असतात उदा लायगर, खेचर
त्यामुळे हि जनुके पुढच्या पिढीत जातील अशी शक्यता सध्यातरी नाही. पुढे मागे जनुकीय अभियांत्रिकीत काय काय घडेल/ घडवले जाईल हे सांगणे कठीण आहे
कुत्रा जनुकीय बदल/ संकरामुळे माणसाच्या थोडाफार जास्त जवळ येईल.
त्याचा संस्कृतीशी संबंध नाही.
लेख पारच विस्कळीत आणि गंडलेला आहे
10 Jun 2025 - 8:06 pm | कर्नलतपस्वी
पु. ल. आज असते तर कदाचित असेच काही म्हणाले असते.
10 Jun 2025 - 8:24 pm | प्रकाश घाटपांडे
भुभु व हत्ती यांच्यातील बुद्धीमत्तेची तुलना वाचायला आवडेल.
10 Jun 2025 - 8:25 pm | युयुत्सु
चांगला मुद्दा आहे. विचार करून प्रतिसाद देईन
10 Jun 2025 - 9:29 pm | मारवा
लेख food for thought आहे.
10 Jun 2025 - 9:54 pm | युयुत्सु
धन्यवाद!
11 Jun 2025 - 10:34 am | अनामिक सदस्य
प्राणी (वेगाने) उत्क्रांत होण्यासाठी ते पाळले जाण्याची आवश्यकता का आहे?
तुम्ही दिलेली कुत्र्याच्या कामगिरीची उदाहरणे ही उत्क्रांती आहे का त्यान्च्या अन्गात आधीपासून असलेल्या बुद्धीचा आणि कौशल्यान्चा विविध प्रकारे करून घेतला गेलेला उपयोग?
11 Jun 2025 - 11:24 am | युयुत्सु
कुत्र्यांच्या प्रजननात मानवी हस्त़क्षेप मोठ्या प्रमाणावर असतो. सध्याचा कुत्रा आणी त्याचा काही हजारवर्षापूर्वीचा पूर्वज यांची तूलना केली तर त्यांच्यातील बुद्धी आणि कौशल्ये ही एकप्रकारे मानवी हस्तक्षेपामुळे आलेली आहेत. पाळले गेल्यामुळे अन्न, निवारा आणि सुरक्षा या महत्त्वाच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे उत्क्रांतीला चालना मिळाली आहे.
11 Jun 2025 - 12:00 pm | सुबोध खरे
पाळले गेल्यामुळे अन्न, निवारा आणि सुरक्षा या महत्त्वाच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे उत्क्रांतीला चालना मिळाली आहे.
आश्चर्य आहे.
असे काही मांजर, गाय, बैल, बोकड, मेंढी, म्हशीच्या बाबतीत का झाले नसावे?
11 Jun 2025 - 12:38 pm | कर्नलतपस्वी
आधुनिक श्वानांचे हे मानवसदृश वर्तन (नियर ह्युमन बिहेवियर) बघितल्यावर कुत्रा हा माणसानंतरचा उत्क्रांत प्राणी न मानणे ही एक प्रकारची लबाडी आहे, असे मानावे लागते. माणसाशी जुळवून घेणाऱ्या कुत्र्यांचा हा विकास
कुछ भी.......माना की हम हुच्च शिक्षित नही है मगर......
संगति दोष न पंडितनि, रह खलनि के संग।
बिषधर विष ससि ईस में, अपने-अपने रंग॥
अधुनिक कुत्र्यांचे वागणे ही उत्क्रांती नसून मानवाने त्यांना आपल्या सोयीनुसार प्रशिक्षण दिलेले असते. उत्क्रांती समस्त जमाती मधे होते सिलेक्टिव्ह उत्क्रांती निसर्गाला मान्य नाही. जसे अफ्रिकन हात्तींचे दात गेले किंवा माणसाची शेपटी....
भटकी कुत्री अतीशय आक्रमक असतात तर पाळीव कुत्री मालकाचे ऐकतात. बॉम्ब डिस्पोजल स्क्वाडचे,किंवा पोलीस श्वान एका विशेष उद्देशासाठी प्रशिक्षीत असतात तशी पाळीव किंवा भटकी कुत्री नसतात. त्यामुळे इथे उतक्रांतीवाद लागू पडत नाही.
मानवाचे नवजात अर्भक जंगलात माकडं,कोल्हे यांनी वाढवले तर ते तसेच बनेल. याची उदाहरणे आहेत. ही कुठली उत्क्रांती म्हणता येईल?
हुच्च शिक्षित हुशार व अशिक्षित आडाणी याला उत्क्रांती म्हणता येईल का? हा फरक केवळ मिळालेल्या किंवा न मिळालेल्या शिक्षणा मुळे असतो.
11 Jun 2025 - 4:02 pm | युयुत्सु
श्री० कर्नलतपस्वी
आधुनिक कुत्र्यांचे वागणे ही उत्क्रांती नसून मानवाने त्यांना आपल्या सोयीनुसार प्रशिक्षण दिलेले असते. उत्क्रांती समस्त जमाती मधे होते सिलेक्टिव्ह उत्क्रांती निसर्गाला मान्य नाही. जसे अफ्रिकन हात्तींचे दात गेले किंवा माणसाची शेपटी.
मी काय म्हणतो, तुम्ही माझे दावे कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करणारा लेख म०टा० मध्ये लिहून का टाकत नाही. म्हणजे प्रश्न मिटेल. लोकांना पण नवे आणि अचूक ज्ञान मिळेल.
बाय द वे - ते घट्ट बूचाच्या बाटलीचं आठवणीने बघा. आपल्याला प्रयोग करण्यासाठी तुमच्या आत्म्यासारखा योग्य आत्मा नाही. हा प्रयोग पण आपण पेपरमध्ये, गेला बाजार मिपावर नक्की प्रसिद्ध करू.
11 Jun 2025 - 4:34 pm | कर्नलतपस्वी
नाही त्यांचे लेख आपण आपल्या नावावर मिपावर ढकलत आहात म्हणून म्हणतो.
आम्ही साधी भोळी माणसं चुकीला चुक म्हणणारी.आमची काय बिशाद की म टा आमचे लेख छापेल. मिपाच्या संपादकांचे आभार की त्यांनी सदस्यत्व दिले.
बाकी चुकीला चुक म्हटलं हे मान्य करायला जिगरा लागतो आणी तो आपल्याकडे नाही हे मान्य करा.
बाकी पेकाटात बसली की केकाटयला होतय बघा.....
11 Jun 2025 - 4:45 pm | कर्नलतपस्वी
आमचा आत्मा फार चिकट आहे. आतापर्यंत तीन वेळा यमदूत येवून गेले.एकदा तर दस्तुरखुद्द यमराज आले होते. पण नाही येत म्हणला.
त्यामुळे आपली इच्छा सध्यातरी पुर्ण होणे कठीण आहे.
आता आपण व्यक्तिगत पातळीवर उतरलाय,त्यामुळे अशा परिस्थितीत फाट्यावर मारणे हेच योग्य असे तात्या विंX महाराज म्हणतात.
जय रामजी की......
11 Jun 2025 - 4:15 pm | विवेकपटाईत
कुत्र्यांना कसे पाळावे त्यांना आपला आज्ञेत राहणारा गुलाम कसे बनवावे या वर हिस्टरी चॅनल वर पूर्ण सिरिज आली होती. त्या सिरिजचे निष्कर्ष
कुत्रे पाळीव नसून जंगली असतात.
ते पॅक मध्ये राहतात. आणि ज्या पॅक मध्ये राहतात ते त्याप्रति निष्ठावंत असतात. (ह्या गुणाचा फायदा माणूस घेतो)
पॅक मध्ये कुत्रा आपला दर्जा वाढविण्याचा सतत प्रयत्न करत राहतात.
कुत्र्याला सतत जाणीव दिली पाहिजे की पॅक मध्ये त्याचा दर्जा सर्वात खालचा आहे.
बाकी कुत्र्याला कुत्र्यासारखी वागणूक दिली पाहिजे, माणसा सारखी नाही.
11 Jun 2025 - 5:01 pm | कंजूस
ते हस्की प्रकारच्या कुत्र्यांबद्दल आहे.
11 Jun 2025 - 4:26 pm | युयुत्सु
त्या सिरिजचे निष्कर्ष कुत्रे पाळीव नसून जंगली असतात.
रोचक प्रतिसाद. सदर मालिकेचा दुवा शक्य असल्यास द्यावा. सहसा पाळीव कुत्रे (आणि माकडे आणि इ तर पाळीअव प्राणी पण) जंगलात सोडून दिल्यास जगू शकत नाहीत. कारण त्यांची जंगलात राहाण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये नष्ट झालेली असतात. त्यामुळे कुत्रे पाळीव नसून जंगली असतात हे विधान निकालात काढावे लागते.
11 Jun 2025 - 9:27 pm | सुबोध खरे
मानवी संपर्कात येऊन मोठ्या प्रमाणावर उत्क्रांत होत असलेला प्राणी म्हणजे कुत्रा आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.
आधुनिक श्वानांचे हे मानवसदृश वर्तन (नियर ह्युमन बिहेवियर) बघितल्यावर कुत्रा हा माणसानंतरचा उत्क्रांत प्राणी न मानणे.
आपल्या जीवशास्त्राच्या बेसिक्स मध्येच काही तरी जोरदार राडा आहे असे खेदाने म्हणावे लागते.
GENOTYPE AND PHENOTYPE यात गल्लत झालेलीआहे
त्यातून LEARNED BEHAVIOUR/ ACQUIRED SKILL आणि GENETICALLY ACQUIRED QUALITIES यात हि गल्लत झालेली आहे.
आपल्याला उत्क्रांतीचा अर्थच समजलेला नाही असे दिसते.
इंग्लंड मध्ये जन्माला आलेलं मूल आजू बाजूच्यांकडे पाहून बोलून इंग्रजी बोलू शकतं मग ते काळ्या वंशाचे असो कि गोरे. कारण हे ACQUIRED SKILL आहे.
हा अनुवांशिक रित्या मिळालेला गुण नाही.
पण गोऱ्या माणसाचे मूल काही वर्षे आफ्रिकेत राहीलं तरी ते गोरंच राहतं कारण हा वर्ण त्याला अनुवंशिकतेने मिळालेला आहे आणि हा त्याच्या गुणसूत्रात अंतर्भूत झालेला आहे. आणि त्याच्या पुढच्या काही पिढ्या तरी त्याची मुलं गौरीच राहतात.
दक्षिण आफ्रिकेत असलेले गोरे लोक हे निदान साडे तीनशे वर्षांपासून आलेले आहेत पण अजून गोरेच राहिले. कारण हा वर्ण त्याला अनुवंशिकतेने मिळालेला आहे
कुत्रे माणसाच्या संपर्कात आले तरी त्यांच्या गुणसूत्रात असा कोणताही बदल दिसत नाही. त्यामुळे कुत्र्याला कितीही शिकवा त्य्याच्या पिल्लामध्ये ते गुण उतरत नाहीत. कुत्र्यांचा मेंदू का मांजर कुळातील प्राण्यांपेक्षा जास्त उत्क्रांत आहे. म्हणून कुत्र्याला जास्त गोष्टी शिकवता येतात इतकंच आहे.
मानवी संपर्कात राहिल्यामुळे त्याच्यात उत्क्रांती होऊ शकली नाही हे म्हणणें म्हणजे आपल्याला उत्क्रांती मुळातूनच न समजलेली आहे याचा ढळढळीत पुरावा आहे.
बाकी सर्व साधारण चिंपांझी कोणत्याही अतिसुशिक्षित कुत्र्यापेक्षा नक्कीच जास्त हुशार असतं. तेंव्हा कुत्रा हा माकडापेक्षा जास्त उत्क्रांत म्हणता हे हास्यास्पद आहे. .
वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळी हत्यारे बनविणे आणि त्यांचा उपयोग, हेही इतर प्राण्यामध्ये विकसित झालेले नाही.हे आपले म्हणणे सुद्धा साफ चूक आहे.
झाडाच्या काडीचा उपयोग करून मुंग्या किंवा वाळवीच्या वारुळात घुसवून त्याला चिकटलेल्या मुंग्या किंवा वाळवी खाणे हे चिम्पाझी नुसताच करता असं नव्हे तर आपल्या अपत्यांना शिकवतात. झाडाच्या पानांचा उपयोग करून आपलं डोकं झाकणं इ अनेक गोष्टी ते करू शकतात.
कुत्र्याला कितीही काही गोष्टी शिकवा त्या गोष्टी त्याच्या पिल्लात उतरत नाहीतच त्याच्या पिल्लाला पण त्या गोष्टी परत शिकवाव्याच लागतात.
हीच गोष्ट मानवी मुलांमध्ये पण दिसते. आपण इंग्रजी शिकलात म्हणून आपलं मूल घरात मराठी बोलत असलात तरी जन्मापासून इंग्रजी बोलू लागेल हि अपेक्षा किती हास्यास्पद आहे?
कारण हे LEARNED BEHAVIOUR/ ACQUIRED SKILL आहे आणि ते प्रत्येक प्राण्याला स्वतःहून मिळवावेत लागते.
या उलट कुत्र्याचे पिल्लू आपले अन्न वासाने मिळवू शकते किंवा पाण्यात टाका ते पोहू लागतं. कारण हे त्याच्या गुणसूत्रात लिहिले गेले आहे आणि हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होते.
आपण म्हणता त्याप्रमाणे सर्वात हुशार कुत्र्याचे पिल्लू तुम्ही दुसरीकडे वाढवले तर ते बापाला / आईला शिकवलेल्या गोष्टी अजिबात करू शकणार नाही पण खांब दिसला कि तंगडं नक्की वर करेल.
उत्क्रांती आणि शिकलेल्या गोष्टी यात पारच गल्लत केली आहे.
बाकी याच गोष्टी मानवी संपर्कात आल्यामुळे इतर प्राण्यात का होत नाहीत याचे उत्तर आपण दिलेले नाही( अर्थात तुम्ही ते देणारच नाही हे हि नक्की)
11 Jun 2025 - 10:47 pm | युयुत्सु
प्रिय मिपा संपादक
सुबोध खरे या माणसाचा कोडगेपणा हा कौतूकास्पद आहे. मला हा शब्द्प्रयोग नाईलाजाने करावा. या माणसाला इंग्रजी वाचता येत नाही, हे मी यापूर्वी दाखवून दिले आहेच, पण या माणसाला मराठी पण वाचता येत नाही, अशी आता खात्री पटली आहे
या इसमाच्या म्हणण्याप्रमाणे मला उत्क्रांती समजली नाही, हे आपण क्षणभर (युक्तीवादाकरता) मान्य करू. पण या इसमाला उत्क्रांती काय समजली आहे, हे पण हा मनुष्य स्पष्ट करत नाही.
आता या इसमाचे पुढील वाक्य पहा - "मानवी संपर्कात राहिल्यामुळे त्याच्यात उत्क्रांती होऊ शकली नाही हे म्हणणें म्हणजे आपल्याला उत्क्रांती मुळातूनच न समजलेली आहे याचा ढळढळीत पुरावा आहे."
"मानवी संपर्कात राहिल्यामुळे त्याच्यात उत्क्रांती होऊ शकली नाही" हे मी माझ्या लेखात कधी केव्हा कुठे म्हटले आहे?
मी माझ्या लेखात स्पष्ट म्हटले आहे की -" त्यामुळे अवगत केलेल्या गुणांचे जनुकीय संक्रमण पुढील पिढीत होत नाही. कुत्र्यांच्या उत्क्रांतीमध्ये हे काही अपूर्णता ठेवणारे दुवे आहेत, असे मला वाटते."
या अक्कलशून्य आणि असंबंद्ध लिखाण करणार्या मानसाला पुढे माझ्याकडून आता किमान आदरही यापुढे दाखवला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
या मूर्ख माणसाला पुढील लेख समजेल का याची मला शंकाच आहे -
१.https://www.jpost.com/science/science-around-the-world/article-835103
२. https://www.thenaturescientist.com/2025/05/dogsareevolving.html
12 Jun 2025 - 8:43 am | कर्नलतपस्वी
संपादक महोदय लेखक आलोचना, प्रतीवाद सहन करू शकत नसेल तर त्याला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे का?
असे स्वलालधन्य लेखकांना तंबी द्या. अतिशय पाशाणयुगी भाषेचा वापर करत आहेत.
आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।।
त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।
कितीही शिकले तरी उत्क्रांती काही झाली नाही. यांच्या पेक्षा श्वान बरे म्हणायचे.
12 Jun 2025 - 9:57 am | युयुत्सु
तपस्वी सारखे बथ्थड डोक्याचे लोक "कर्नल" म्हणून मिरवत असतील तर मला (आणि अनेकांना) सैन्य दलाने किमान सन्माननीय ब्रिगेडीयर तरी करायला हवे!
12 Jun 2025 - 11:28 am | सुबोध खरे
कशाला चिडचिड करताय? मी तुमच्या लेखातील अनेक असंबद्ध दावे दाखवले.
त्या वर तुम्ही डॉक्टर कसे अक्कलशून्य आहेत आणि राष्ट्राचे काय होणार इथपर्यंत टिप्पणी केलीत. डॉक्टरांना फ्लुइड डायनॅमिकस आणि गणित कसे येत नाही हेही सांगितले. त्यावरही मी काही भाष्य केले नाही
मानवी संपर्कात आलेले इतर प्राणी उत्क्रांत का होत नाहीत त्यावर आपले काय मत हे विचारूनही उत्तर नाही.
पण या इसमाला उत्क्रांती काय समजली आहे, हे पण हा मनुष्य स्पष्ट करत नाही.
मी काही उत्क्रांतीवर लेख लिहिलेला नाही कि मला उत्करणाती काय आणि किती समजली आहे.
लेख आपणच लिहिलेला आहे आणि त्यात इतक्या घोडचूका आहेत कि मूलभूत ज्ञानाबद्दलच शंका यावी.
आता हत्ती आणि माकडे पाळली जात असली तरी त्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी संपर्कात येऊन जी वर्तनविषयक उत्क्रांती होणे अपेक्षित आहे, ती या दोन प्रजातींमध्ये दिसत नाही.
मानवी संपर्कात येऊन वर्तनविषयक उत्क्रांती कशी होणार. ती मुळात गुणसुत्रात बदल झाल्यासच होते. आता इतकी मोठी चूक असेल तर आपल्या उत्क्रांती विषयक समजाबद्दलच कुणालाही शंका येईल.
बाकी चूक दाखवल्यावर ती सुधारण्याऐवजी आपण जेंव्हा तेंव्हा चूक दाखवणाऱ्याच्या वैयक्तिक पातळीवर उतरता. ए एफ एम सी वर निष्कारण टीका केलीत
इतरांना सुद्धा घालून पडून बोलता तेंव्हा आपल्या सारख्या लोकांकडून आदराची माझी अपेक्षाही नाही.
तुमचा चालू द्या. पण एक लक्षात ठेवा तुम्ही कितीही हुशार असा सार्वजनिक न्यासावर आलात तर चुकीच्या लेखनावर टीका होणारच. तेंव्हा उगाच चिडचिड करून आपला रक्तदाब वाढवून घेऊ नका
काय आहेना
लिपस्टिक लावून खिडकीत बसलात तर खालून जाणारा "शुक शुक" करणारच मग चिडून काय फायदा?
12 Jun 2025 - 11:44 am | युयुत्सु
< ती मुळात गुणसुत्रात बदल झाल्यासच होते. >
अरे मूर्ख आणि अक्कलशून्य माणसा , तुला तुझ्या ए०एफ्०एम्०सी शिक्षणात गुणसूत्रात बद्दल कशाने होतो हे शिकवले नसले तर कुणाकडून तरी शिकून घे. तू सतत खोटारडे पणा करून माझ्या तोंडात मी जे कधी लिहीलेच नाही, ते घालायचा नालायकपणा तू कधी थांबवणार. मी तुझ्यासारख्या थर्डक्लास माणसांना जास्त उत्तरे देत नाही कारण तुझ्या सारखे बेअकली कायम दिशाभूल करण्यात व्यस्त असतात.
तुझ्या सारखा मूर्ख मनुष्य सोडला तर माझ्या या लेखाला आजवर कुणीही आक्षेप घेतलेला नाही, हे कळायची पण अक्कल तुला नाही. तुझ्या डोक्यात भला मोठा ट्युमर तयार होऊन तू असा असंबद्ध लिखाण करत असावा, अशी शंका येते.
12 Jun 2025 - 11:49 am | सुबोध खरे
@युयुत्सु
उगाच चिडचिड करून आपला रक्तदाब वाढवून घेऊ नका
12 Jun 2025 - 12:26 pm | सुबोध खरे
ते महिना १० % CAGR देण्याच्या स्कीमचं काय झालं?
५० % फायदा माझा आणि ५० % तुमचा
मी वाट बघतोय
12 Jun 2025 - 12:43 pm | युयुत्सु
अरे निर्लज्ज,मंदबुद्धी माणसा तू थांबायला तयारच नाहीस! परत तुझा विकृत पणा चालूच आहे. मी कोणती स्कीम जाहीर केली होती? तुझ्या सारख्या मूर्ख माणसांक्डून ५०% काय ५००% मिळाले तरी नको. तुझ्या माहिती करता माझा सध्या इंट्रा-डे मधला सक्सेस रेट पुढे देत आहे. तुझ्या ४२ पिढ्यामध्ये जरी कुणाला हे जमलं तर मी स्वतःचे नाव बदलायला तयार आहे. तुझा कीडका-सडका मेंदू कुणाकडून तरी तपासून घे...

थोडीशी जरी लाज शिल्लक असली तर आता गप्प बस!
12 Jun 2025 - 11:31 am | कर्नलतपस्वी
तुमची शिपाई म्हणून सुद्धा निवड होणार नाही.
मी लायकी शब्द वापरू शकलो असतो पण तुकोबाराय म्हणतात ,
घासावा शब्द, तसावा शब्द
तोलावा शब्द बोलताना
कबीरदास म्हणतात,
ऐसी वाणी बोलिए मन का आप खोए,
औरन को शीतल करे, आपहुं शीतल होए.
सैन्यात भरती होण्यासाठी,अधिकारी बनण्यासाठी जी काही गुणवत्ता लागते, ज्याला आंग्ल भाषेत ,ॲप्टिट्युड म्हणतात ते आपल्या जवळ नाही.
तुमचा प्राॅब्लेम काय आहे माहिती का?...
एक तर तुम्ही खुप हुशार आहात. पण तुम्हीच फक्त हुशार नाहीत. इतरांनाही देवाने बुद्धी दिली आहे त्याचा आदर करावा. एक संस्कृत सुभाषित शाळेत शिकलो होतो,
नमन्ति फलनः वृक्षा:, नमन्ति गुणिनः जनाः |
शुष्कवृक्षाश्च मूर्खाश्च ,न नमन्ति कदाचनः ||
कबीरदास म्हणतात तसे काहीसे,
बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजुर
पंछी को छाया नही फल लागे अती दूर
खरे तर आपल्या बुद्धिमत्तेचा मिपाखरांना फायदा व्हायला हवा . आपल्या लेखावर प्रश्न चिन्ह निर्माण केले की उत्तर देण्याचे टाळता.
दुसरे असे की आपल्याकडे देवदत्त बुद्धीमत्ता असूनही आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची कुबडी लागते. आपला लेख, प्रतिसाद कृबु ला विचारून टंकाळत असता.
वाचकांना तुमची मते पटली तर टाळ्या वाजवतील नाही पटली तर प्रश्न विचारतील. आणी प्रश्न विचारणायाने आपण चिडता.हा तुमचा दुसरा प्राॅब्लेम आहे.
आपण सुज्ञ अहात, सार्वजनिक जीवनात आलोचना होणार याची नेहमी तयारी ठेवावी हे मला सांगायची गरज नाही.
तुकाराम महाराज म्हणतात,
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान, कर्म, भक्ती ।
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल । शब्दां मुळे मंगल ।
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता ।
पाणी, वाणी, नाणी | नासू नये ||
तुम्ही ॲडमंट अहात असे म्हणले तर राग येईल पण तुमच्या त लवचिकपणा कमी आहे. मिपावरील लेखन म्हणजे एक प्रकारे वाद संवाद, डिस्टंट डिबेट म्हणता येईल. तेव्हां वादा वादी, आलोचक, समर्थक असे सर्व असणार . सर्व लोकं तुम्हीं म्हणता ती पुर्व दिशा असे कधीच मान्य करणार नाही. स्वतंत्र व्यक्ती मतस्वातंत्र्य आहे म्हणून आपले वेगळे मत मांडणार. मीच खरा असा जर हट्ट धरला तर वाचक फाट्यावर मारणारच.
तेव्हां हलकेच घ्या. नाहीतर उगाच बि पी च्या गोळ्या सुरू व्हायच्या.
बाकी मी बथ्थड की हुशार या साठी आपल्या सर्टिफिकेट ची गरज नाही,मी माझी लायकी सिद्ध (प्रुव्ह) केली आहे.
12 Jun 2025 - 4:23 pm | स्वराजित
युयुत्सु
कुणावर आणी काय बोलताय याचे भान राखा.
12 Jun 2025 - 4:39 pm | युयुत्सु
श्री० स्वराजित
मी तुम्हाला गांभीर्याने का घ्यावे?
12 Jun 2025 - 11:01 pm | सौन्दर्य
आपल्या मिपावर अनेक बुद्धमान, कर्तृत्ववान व गुणी लेखक आहेत. त्यांच्या गाढ्या व्यासंगाचा, अनुभवाचा फायदा आपण सर्वच जण घेतो. मला तरी मिपावर यावेसे वाटते कारण ह्या संस्थळावर जगातल्या बहुतेक सर्वच विषयांवर माहिती मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचायला मिळते. अनेक वेळा काय करावे किंवा काय करू नये, सारखे सल्ले आणि मार्गदर्शन मिळते.
जर एखादा लेख, किंवा विषय नाही कळला तर लेखनकर्त्याला व्यनि करून स्पष्टीकरण मिळवू शकतो त्यामुळे लेखक आणि प्रतिसादकर्त्यांचे वैचारिक संभाषण त्या दोघांपुरतेच मर्यादित राहील व दोघांना समोरच्याचे विचार कळतील.
अगदी काही मोजकेच मिपाकर सोडल्यास सर्वच चांगले लिहितात, वाचतात, मूळ लेखात अधिक भर घालतात जेणेकरून सर्वच वाचकांना त्याचा फायदा होतो. मी तर म्हणीन आपल्या ह्या लाडक्या संस्थळावर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य सारखे गुरु आहेत. राम - कृष्णासारखे आदरणीय व्यक्तिमत्वे आहेत. अनेक स्त्री लेखिका तेव्हढ्याच समर्थकपणे लिहितात.
पण दुसऱ्याच बाजूला असेही आढळून येते की खूप चांगले लिहिणारे मिपाकर हल्ली मिपावर दिसत नाहीत. कदाचित त्यांना काही कटू अनुभव आले असण्याची शक्यता आहे. हे आपले एक लेखक, वाचक म्हणून नुकसान आहे असे मला वाटते.
सदर लेखाचा विषय चांगला होता , विचार करायला लावणारा होता, दुर्दैवाने त्याला वेगळेच फाटे फुटत गेले व मूळ लेख बाजूला पडला .
माझे सर्व मिपाकरांना हात जोडून नम्र विनंती आहे की शक्य असेल तर हे टाळा .
13 Jun 2025 - 7:26 am | Bhakti
+१
@सर्व मिपाकर धुरंधरांना
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन |
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः || ६.३२ ||
हे अर्जुना, जो योगी सर्वत्र (सुख-दुःख, लाभ-हानि) स्वतःप्रमाणेच पाहतो, तोच श्रेष्ठ योगी आहे.
13 Jun 2025 - 11:22 am | कानडाऊ योगेशु
चर्चेला लागलेले एकुणच वळण बघता तुमचा हा प्रतिसाद वाचताना
हा शब्दप्रयोग चुकुन गाढव्या व्यासंगाचा असा वाचला आणि एकुणच लेखात असलेला भुभुंचा विषय आणि मानवाकडुन त्यांच्या मध्ये झालेले परिवर्तन असा विषय असल्याने व येथील अलिकडच्या काही प्रतिक्रिया पाहुन मानवाला भुभुंकडुन वाण नाही पण गुण लागला असण्याची शक्यता आहे असे वाटले.
13 Jun 2025 - 7:21 am | कर्नलतपस्वी
@सौंदर्य, आपल्या भावना पोहचल्या. आपल्या मताशी सहमत आहे.
लेखनावर वाचक विविध प्रकारे व्यक्त होत असतो. वाचक आपले विषयानुसार झालेले अकलन,विचार व पडलेले प्रश्न ,शंका मांडतो व लेखकाने त्याचे निरसन करावे एवढीच माफक अपेक्षा असते.
राजकीय विषय सोडल्यास इतर विषयांवर फारशी मतभिन्नता नसते.
एखाद्या विषयाबद्दल वाचकाचे,लेखकाचे असलेले ज्ञान, कमी जास्त माहीती. यातूनच प्रश्न निर्माण होतात.लेखक,वाचक विषयातली त्रुटी दाखवून देतात किवां अधिक माहीतीची भर घालतात. त्रुटिंचे समाधान करणे किंवा त्या स्विकारणे ही लेखकाची प्राथमिक जबाबदारी असते. परंतू एखाद्या वाचकाने ,लेखकाने दाखवलेली त्रुटी खिलाडू वृत्तीने न स्विकारता मीच कसा बरोबर असे म्हणत वरचढपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो तेव्हांच लेखास वेगळे वळण लागते.भाषेवर संयम न ठेवल्यास कटुता निर्माण होते पुढे वाढत जाते.
मिपावर, सर्वजण हुशार, ज्ञानी आहेत पण इतरही आपल्यापेक्षा जास्त माहितगार आहेत याचे भान ठेवले पाहीजे.
इथे प्रत्येकजण सह सदस्यांना त्याच्या लेखनशैली मुळे ओळखतो. वैयक्तिक आयुष्यात तो काय आहे हे बरेच जणांना माहित नसते त्यामुळेच वैयक्तिक टिका टिप्पणी केल्यास प्रकरण चिघळते.
काही लोकांना माघार घेण्यात, आपली चुक दाखवल्यास कमीपणा वाटतो,परंतू समर्थना बरोबर आलोचना स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे.
विषय चांगले असतात तरीही यांच्या धाग्यावर प्रतिसाद बघता अतिशय मोजकेच सदस्य व्यक्त होताना दिसत आहेत परंतू वाचन संख्या मात्र भरपूर आहे. बाकीचे वाचक का व्यक्त होत नाहीत किंवा व्यक्त होणारे वाचक का व्यक्त होतात याची कारणे शोधण्याचा लेखकाने प्रयत्न करायला हवा. मी केला, इतर सन्माननीय वाचकांची मते जाणून घेतली परंतू ती मी गुलदस्त्यात ठेवणार आहे नाहीतर स्पष्ट आणी परखड मतांमुळे वाद आणखीन चिघळण्याची संभावना आहे.
माझ्यापुरते म्हणायचे झाले तर, मला वाटते की माझे लेखन खुप वाचकांनी वाचावे,त्यावर प्रतिसाद द्यावा, माझ्या लेखनात भर टाकावी, काही त्रुटींवर प्रकाश टाकावा जेणेकरून माझ्या लेखनाची गुणवत्ता सुधारेल.
बाकी, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या न्यायाने वागल्यास वाद होणार नाहीत. बापही दाखवणार नाही,श्राद्धही घालणार नाही. किंवा चित भी मेरी पट भी मेरी असे वागल्यास आहेच प्रतिसाद मिळणार.
13 Jun 2025 - 8:04 am | युयुत्सु
समस्त मिपाकर,
तपस्वी या व्यक्तीने वर काही तारे तोडले आहेत. मी प्रत्येक मुद्द्याचं खंडन करू शकतो. पण त्यातून काहीही साध्य होत नसल्याने मी या माणसाकडे शक्य तेव्हढे दूर्लक्ष करायचे ठरवले होते. पण आता माझ्यापुढे दोन पर्याय आहेत -
१. मिपाकरांना करमणूक हवी असल्यास, दोन व्यक्तींच्या भांडणाची मजा बघायची असल्यास या व्यक्तीचा मूर्खपणा त्याच्या पदरात घालू शकतो
२. मिपाकरांना शांतता हवी असल्यास माझी या माणसाला फाट्यावर मारायची तयारी आहे.
तेव्हा मिपाकरांनी मला शांतता हवी की करमणूक हे अवश्य कळवावे, ही विनंती!
टीप- या व्यक्तीने पण माझा आदर गमावला आहे. त्यामुळे मी आदराने बोलेनच असं नाही. "उत्तमं प्रणिपातेन ..." या संस्कृतवचनानुसार सहसा मी माझा सामाजिक व्यवहार करतो, याची नोंद घ्यावी. (भाषा, विचारातील सुसंगतपणा, तर्कशुद्धता, नवीन ज्ञानाबद्दलचा दृष्टीकोन इ० अनेक निकषांवर हे ठरत असते )
13 Jun 2025 - 7:22 am | कर्नलतपस्वी
@सौंदर्य, आपल्या भावना पोहचल्या. आपल्या मताशी सहमत आहे.
लेखनावर वाचक विविध प्रकारे व्यक्त होत असतो. वाचक आपले विषयानुसार झालेले अकलन,विचार व पडलेले प्रश्न ,शंका मांडतो व लेखकाने त्याचे निरसन करावे एवढीच माफक अपेक्षा असते.
राजकीय विषय सोडल्यास इतर विषयांवर फारशी मतभिन्नता नसते.
एखाद्या विषयाबद्दल वाचकाचे,लेखकाचे असलेले ज्ञान, कमी जास्त माहीती. यातूनच प्रश्न निर्माण होतात.लेखक,वाचक विषयातली त्रुटी दाखवून देतात किवां अधिक माहीतीची भर घालतात. त्रुटिंचे समाधान करणे किंवा त्या स्विकारणे ही लेखकाची प्राथमिक जबाबदारी असते. परंतू एखाद्या वाचकाने ,लेखकाने दाखवलेली त्रुटी खिलाडू वृत्तीने न स्विकारता मीच कसा बरोबर असे म्हणत वरचढपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो तेव्हांच लेखास वेगळे वळण लागते.भाषेवर संयम न ठेवल्यास कटुता निर्माण होते पुढे वाढत जाते.
मिपावर, सर्वजण हुशार, ज्ञानी आहेत पण इतरही आपल्यापेक्षा जास्त माहितगार आहेत याचे भान ठेवले पाहीजे.
इथे प्रत्येकजण सह सदस्यांना त्याच्या लेखनशैली मुळे ओळखतो. वैयक्तिक आयुष्यात तो काय आहे हे बरेच जणांना माहित नसते त्यामुळेच वैयक्तिक टिका टिप्पणी केल्यास प्रकरण चिघळते.
काही लोकांना माघार घेण्यात, आपली चुक दाखवल्यास कमीपणा वाटतो,परंतू समर्थना बरोबर आलोचना स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे.
विषय चांगले असतात तरीही यांच्या धाग्यावर प्रतिसाद बघता अतिशय मोजकेच सदस्य व्यक्त होताना दिसत आहेत परंतू वाचन संख्या मात्र भरपूर आहे. बाकीचे वाचक का व्यक्त होत नाहीत किंवा व्यक्त होणारे वाचक का व्यक्त होतात याची कारणे शोधण्याचा लेखकाने प्रयत्न करायला हवा. मी केला, इतर सन्माननीय वाचकांची मते जाणून घेतली परंतू ती मी गुलदस्त्यात ठेवणार आहे नाहीतर स्पष्ट आणी परखड मतांमुळे वाद आणखीन चिघळण्याची संभावना आहे.
माझ्यापुरते म्हणायचे झाले तर, मला वाटते की माझे लेखन खुप वाचकांनी वाचावे,त्यावर प्रतिसाद द्यावा, माझ्या लेखनात भर टाकावी, काही त्रुटींवर प्रकाश टाकावा जेणेकरून माझ्या लेखनाची गुणवत्ता सुधारेल.
बाकी, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या न्यायाने वागल्यास वाद होणार नाहीत. बापही दाखवणार नाही,श्राद्धही घालणार नाही. किंवा चित भी मेरी पट भी मेरी असे वागल्यास आहेच प्रतिसाद मिळणार.
14 Jun 2025 - 8:12 am | माहितगार
अनुषंगिक अवांतरः युयुत्सु तुमचे दोन गोष्टींसाठी कौतुक करावेसे वाटते पहिले म्हणजे श्वान प्रेमातील प्रगती. दुसरे म्हणजे जनुकीय आणि तर्कशास्त्र क्षेत्रातील तुमचे दांडगे ज्ञान. तुमचे तर्कशास्त्र आणि जनुकीय विज्ञान किंवा जीवशास्त्र विषयातील गुरुजनांबद्दल मला खूप आदर वाटतो आहे, तुमच्या गुरुजनांचे गुरुजन, त्या गुरुजनांचे गुरुजन ही खूप मोठी विद्वत्तापूर्ण साखळी असणार. आदर्श शिक्षकांची नोंद घेण्यासाठी मागे मी एक चर्चा धागा काढला होता. केव्हातरी तुमच्या तुमच्या गुरुजनांचे गुरुजन, त्या गुरुजनांचे गुरुजन ह्या खूप मोठ्या विद्वत्तापूर्ण साखळी बद्दल केव्हातरी अवश्य लिहाल. अनुषंगिक अवांतरासाठी क्षमस्व
14 Jun 2025 - 10:19 am | युयुत्सु
श्री० माहितगार,
संस्कृतमध्ये एक प्रसिद्ध वचन आहे - दुग्धेन दग्धजिव्हः तक्रं फुत्कृत्य पिबति पामरः अर्थ- लोक दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून पितात!
तुमच्या प्रतिसादाने मी संभ्रमात पडलो आहे - हा उपहास आहे की प्रामाणिक कौतुक हे ठरवता येत नाहीये. पण काहीही असलं तरी धन्यवाद!
आता गमतीचा आणि आत्मप्रौढीचा भाग असा - हा लेख प्रथम मी ज्यांच्यामुळे जिनेटिक्सकडे वळलो, त्या माझ्या अतिशय बुद्धीमान मित्रवर्यांना (वय > ८५) प्रथम वाचायला दिला होता. त्यांनी मान डोलावल्यावर माझ्या दूसर्या एका मित्राला वाचायला दिला. त्यांना तो इतका आवडला की त्यांनी तो परस्पर म०टा० कडे पाठवला आणि म्०टा० ने तो लगेच छापला. त्यामुळे काही दुरूस्त्या आणि भर त्यात टाकता आली नाही (उदा० कुत्री काही आजार ओळखतात आणि पटकन मदत पण करतात इ०, चीन मध्ये कुत्र्यांच्या शाळा आहेत).
माझी ही निरीक्षणे ३-४ वर्षे चालू होती. अगदी सुरुवातीला माझे हे मित्र माझी निरीक्षणे मान्य करायला तयार नव्हते, पण आता त्यांची मते बदलली आहेत. म्हणून त्यांनी माझ्या निष्कर्षांना मान्यता दिली
काहीसा (भारतीय असल्यामूळे) दूर्दैवाचा भाग असा की पाश्चात्य जगाने या कुत्र्यामधील उत्क्रांतीवर माझ्या लेखानंतर शिक्कामोर्तब केले (मी वर दिलेल्या संदर्भांच्या तारखा पहाव्यात. माझ्या लेखा अगोदर असे मत कुणी नोंदविल्याचे माझ्या वाचनात नाही. असल्यास अवश्य आणून द्यावे).
असो...
14 Jun 2025 - 12:06 pm | माहितगार
पाश्चात्य जेमिनीबाबा तरी युयुत्सुंचा दावा अंशतः मान्य करताना दिसतात. जेमिनी बाबा म्हणतात -
आपण दिलेल्या `https://www.misalpav.com/node/52996` या राजीव उपाध्ये यांच्या 'महाजनस्य संसर्गः' या लेखातील काही समजुती जनुकीय विज्ञान आणि उपलब्ध माहितीनुसार बरोबर आहेत, तर काही अधिक स्पष्टीकरण मागवतात.
**लेखातील समजुती आणि त्यांची वैज्ञानिक सत्यता:**
* **"मानवानंतर कुत्रे सर्वात वेगाने उत्क्रांत होणारा प्राणी आहे."**
* **वैज्ञानिक दृष्टिकोन:** कुत्रे खरोखरच मानवी सहवासामुळे वेगाने विकसित झाले आहेत. हजारो वर्षांच्या सह-विकासाने कुत्र्यांच्या जनुकीय, शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित वैशिष्ट्यांवर खोलवर परिणाम केला आहे. मानवी निवडीमुळे (Artificial Selection) कुत्र्यांमध्ये सामाजिक वर्तन, चेहऱ्यावरील स्नायू (उदा. "पपी डॉग आईज" साठी) आणि माणसांशी संवाद साधण्याची क्षमता यांसारख्या अनेक गुणांमध्ये जलद बदल झाले आहेत. कुत्र्यांमधील हायपर-सोशल वर्तनासाठी (hypersocial behavior) विशिष्ट जनुके (उदा. Williams-Beuren syndrome critical region - WBSCR मधील) जबाबदार असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे, मानवी संबंधामुळे कुत्र्यांची उत्क्रांती जलद झाली हे विधान योग्य आहे, परंतु ते 'सर्वात वेगाने' विकसित होणारे प्राणी आहेत का, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे.
* **संबंधित दुवे:**
* The Evolution of Dogs: How Human Interaction Shaped Mans Best Friend
* Human-directed social behaviour in dogs shows significant heritability
* Researchers identify a common underlying genetic basis for social behavior in dogs and humans
* Genes underlying dogs' social ability revealed
* **"कुत्र्यांचे मानवीकरण ज्या वेगाने होत आहे, तितके इतर कोणत्याच प्राण्याचे होताना दिसत नाही." (कुत्र्यांना माणसांप्रमाणे कपडे, बूट घालून नटवणे, केसाळ कुत्र्यांच्या वेण्या बांधणे, स्कूटर, सायकलसारख्या वाहनाने फिरायला जाताना हेल्मेट, गॉगल घालणे.)**
* **वैज्ञानिक दृष्टिकोन:** लेखात वर्णन केलेले कुत्र्यांना कपडे घालणे, वेण्या बांधणे, हेल्मेट-गॉगल घालणे हे 'मानवीकरण' नसून, त्याला 'एन्थ्रोपोमॉर्फिझम' (Anthropomorphism) असे म्हणतात. एन्थ्रोपोमॉर्फिझम म्हणजे मानवाचे गुणधर्म, भावना आणि वर्तन अमानवी प्राणी किंवा वस्तूंना देणे. वैज्ञानिकदृष्ट्या, कुत्र्यांचे मेंदू, त्यांची ज्ञानेंद्रिये आणि गरजा मानवांपेक्षा भिन्न आहेत. कुत्र्यांना 'फर बेबी' (fur babies) म्हणणे किंवा त्यांना मानवी मुलांसारखे वागवणे ही मानवी प्रवृत्ती आहे. काही एन्थ्रोपोमॉर्फिक सवयी, जसे की मानवी अन्न खायला देणे किंवा अनावश्यक कपडे घालणे, कुत्र्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी हानिकारक असू शकतात (उदा. पोषण समस्या, थर्मोरेग्युलेशनवर परिणाम). तथापि, कुत्रे मानवी सूचना समजू शकतात आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची त्यांच्यात अद्वितीय क्षमता विकसित झाली आहे. मानवांनी अशा विशिष्ट वर्तणुकीसाठी कुत्र्यांची निवड केली आहे, ज्यामुळे त्यांचे सामाजिक कौशल्य जनुकीयदृष्ट्या विकसित झाले आहे.
* **संबंधित दुवे:**
* DOG PSYCHOLOGY Part 2: Dogs Are Not Furry Humans
* Anthropomorphism and Its Adverse Effects on the Distress and Welfare of Companion Animals - PMC
* Pet humanization - Wikipedia
**थोडक्यात सारांश:**
* **बरोबर समज:** कुत्र्यांची उत्क्रांती आणि त्यांचे मानवाशी जुळवून घेणे हे अत्यंत वेगाने झाले आहे, आणि यात मानवी सहवासाचा व निवडीचा मोठा वाटा आहे. कुत्र्यांमध्ये मानवी संवाद कौशल्यांसाठी जनुकीय बदल झाले आहेत.
* **गैरसमज/अधिक स्पष्टीकरण आवश्यक:** 'मानवीकरण' या शब्दाचा अर्थ शास्त्रीयदृष्ट्या 'एन्थ्रोपोमॉर्फिझम' असा आहे, जिथे मानव आपल्या भावना आणि सवयी कुत्र्यांवर लादतात. कुत्रे खऱ्या अर्थाने 'मानवी' होत नाहीत, तर ते मानवी वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जनुकीयदृष्ट्या अनुकूलित झाले आहेत. लेखातील उदाहरणे (कपडे घालणे इ.) ही मानवी वर्तणुकीचा भाग आहेत, कुत्र्यांच्या जैविक उत्क्रांतीचा नव्हे, जरी मानवी निवडीने कुत्र्यांच्या काही शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित गुणधर्मांना आकार दिला आहे.
एकंदरीत, लेख मानवाच्या आणि कुत्र्यांच्या अद्वितीय संबंधावर प्रकाश टाकतो, परंतु काही संकल्पनांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे.
14 Jun 2025 - 12:18 pm | युयुत्सु
श्री० माहितगार!
प्रथम जैमिनीय विश्लेषणासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
माझ्या गुरुपरंपरेबद्दल खुलासा राहिला - प्रा० मे० पु० रेगे सोडले तर बाकीच्याची नावे मी घेऊ इच्छित नाही. पण या तिघांनीही एक महत्त्वाची गोष्ट शिकवली - बरेच मूर्खासारखी, अक्कलशून्यपणे मते मांडणारे लोकशाहीतत्त्वाचा आधार घेऊन स्वतःच्या मूर्खपणाचे समर्थन करतात आणि त्याचा "एक मत" म्हणून आदर बाळगला जावा अश्गी अपेक्षा करतात. पण प्रा० रेगे अशा लोकांची चक्क खिल्ली उडवायचे तर इतर गुरुवर्य अत्यंत निर्दयीपणे चारचौघात अशा मूर्खांचा पाणउतारा करायचे किंवा टवाळी करायचे. काही विद्वानांच्या युक्तीवादाला तर "बौद्धिक रेप" का म्हणू नये असा प्रश्न पडतो. त्यांची नावे इथे घेऊ इच्छित नाही.
14 Jun 2025 - 1:09 pm | माहितगार
युयुत्सु विषय निघालाच आहे तर एक विचारले चालेल का? आपण कोणत्या क्षेत्रात आणि कुठे शिक्षण घेतले आहे ? आपण प्रा० मे० पु० रेगे यांचा गुरुस्थानी म्हणून नमुद करत आहात म्हणून विचारले.
14 Jun 2025 - 12:22 pm | माहितगार
जेमिनी बाबा तर युयुत्सुंची जोरदार बाजू घेताना दिसताहेत
आपण उपस्थित केलेला प्रश्न आणि त्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या मदतीने मिळालेली उत्तरे, तसेच तुमची त्याबद्दलची शंका अतिशय योग्य आहे. 'मानवानंतर सर्वात वेगाने उत्क्रांत होणारा प्राणी' हे ठरवण्यासाठी काही महत्त्वाचे निकष समजून घेणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा आपण मानवी संपर्कामुळे होणाऱ्या वर्तणुकीतील उत्क्रांतीबद्दल बोलतो.
---
### उत्क्रांतीचा वेग आणि निकष
उत्क्रांतीचा वेग मोजण्याचे अनेक मार्ग आहेत, आणि 'सर्वात वेगाने' हा शब्दप्रयोग कोणत्या निकषांवर आधारित आहे, हे महत्त्वाचे आहे.
1. **जनुकीय बदल (Genetic Changes):** उत्क्रांती म्हणजे जनुकीय स्तरावर होणारे बदल, जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात. 'जलद उत्क्रांती' म्हणजे कमी कालावधीत जनुकीय रचनेत लक्षणीय बदल होणे, ज्यामुळे प्रजाती नवीन पर्यावरणाशी जुळवून घेतात किंवा नवीन प्रजाती निर्माण होतात.
2. **नैसर्गिक निवड आणि कृत्रिम निवड (Natural and Artificial Selection):**
* **नैसर्गिक निवड:** पर्यावरणातील दाबामुळे (उदा. हवामान, भक्षक, अन्नाची उपलब्धता) काही विशिष्ट गुणधर्म असलेल्या जीवांना अधिक जगण्याची आणि पुनरुत्पादन करण्याची संधी मिळते. यामुळे हळूहळू जनुकीय बदल होतात.
* **कृत्रिम निवड:** मानवाद्वारे केली जाणारी निवड. पाळीव प्राणी (उदा. कुत्रे, गायी, कोंबड्या) आणि पिके (उदा. गहू, मका) हजारो वर्षांपासून मानवाद्वारे निवडले जात आहेत. यामुळे विशिष्ट गुणधर्म जलद गतीने विकसित झाले आहेत. आपल्या प्रश्नातील 'मानवी संपर्कात येऊन वर्तनविषयक उत्क्रांती' हा कृत्रिम निवडीचाच एक भाग आहे.
3. **वर्तणूक आणि सामाजिक बदल (Behavioral and Social Changes):** काहीवेळा उत्क्रांती केवळ शारीरिक बदलांपुरती मर्यादित नसते, तर वर्तणुकीतील आणि सामाजिक रचनेतील बदलांमुळेही ती दिसून येते. मानवी सहवासामुळे प्राण्यांच्या शिकण्याच्या पद्धती, संवाद साधण्याची क्षमता आणि सामाजिक परस्परसंबंधांवर परिणाम होतो.
---
### कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सुचवलेले प्राणी आणि त्यांचे विश्लेषण
कृत्रिम बुद्धिमत्तेने सुचवलेले प्राणी (चिंपांझी, बोनोबो, डॉल्फिन, हत्ती, कावळे, ऑक्टोपस) हे त्यांच्या **उच्च बुद्धिमत्ता, शिकण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि जटिल सामाजिक संरचना** यासाठी ओळखले जातात. मात्र, 'मानवी संपर्कात येऊन वर्तनविषयक उत्क्रांती' या आपल्या विशिष्ट निकषावर ते पूर्णपणे बसत नाहीत.
* **चिंपांझी आणि बोनोबो (Chimpanzees and Bonobos):** हे मानवाचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात शिकण्याची, अवजारे वापरण्याची आणि सामाजिक संवाद साधण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यांचे निरीक्षण मानवी विकासासाठी महत्त्वाचे आहे. ते मानवी संशोधनाच्या संपर्कात येतात, पण पाळीव प्राणी म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांची 'कृत्रिम निवड' झालेली नाही.
* **डॉल्फिन (Dolphins):** अत्यंत बुद्धिमान, गुंतागुंतीचे सामाजिक जीवन आणि संवाद प्रणाली असलेले प्राणी आहेत. ते मानवी संरक्षणात किंवा आकर्षणाचे केंद्र म्हणून संपर्कात येतात, पण त्यांची उत्क्रांती मानवी निवडीमुळे झालेली नाही.
* **हत्ती (Elephants):** बुद्धिमत्तेसाठी आणि सामाजिक स्मृतीसाठी ओळखले जातात. ते काही प्रमाणात पाळले जातात, पण त्यांचे प्रमाण कमी आहे आणि कुत्र्यांप्रमाणे व्यापक 'वर्तनविषयक उत्क्रांती' (म्हणजे मानवी गरजांनुसार वर्तणुकीत मोठ्या प्रमाणात बदल) त्यांच्यात दिसून येत नाही.
* **कावळे (Crows):** समस्या सोडवण्यात आणि अवजारे वापरण्यात निष्णात आहेत. ते मानवी वस्त्यांमध्ये राहतात, पण ते पाळीव नाहीत आणि मानवी संपर्कामुळे त्यांच्या वर्तनात 'उत्क्रांती' (कृत्रिम निवडीतून) झाली असे नाही, तर ते मानवी पर्यावरणाशी जुळवून घेणारे (adapting) आहेत.
* **ऑक्टोपस (Octopuses):** सागरी जीवसृष्टीतील अत्यंत बुद्धिमान प्राणी, ज्यांची शिकण्याची क्षमता विलक्षण आहे. त्यांचा मानवांशी थेट वर्तणुकीशी संबंधित उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून संबंध नाही.
---
### 'सर्वात वेगाने उत्क्रांत होणारा प्राणी' आणि मानवी संपर्क
जर आपण 'मानवी संपर्कामुळे वर्तनविषयक जलद उत्क्रांती' हा निकष लावला, तर **कुत्रा (Dog)** हाच सर्वात योग्य उमेदवार आहे.
* **कुत्रे:** लांडग्यांपासून उत्क्रांत झालेले कुत्रे हे मानवी कृत्रिम निवडीचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. सुमारे 15,000 ते 40,000 वर्षांपूर्वीपासून ते मानवांसोबत राहत आहेत. मानवाने त्यांच्यातील विशिष्ट वर्तणूक (उदा. शिकार करणे, राखण करणे, सोबती असणे) निवडली, ज्यामुळे त्यांच्या जनुकीय आणि वर्तणुकीत प्रचंड वेगाने बदल झाले. त्यांच्यात माणसांच्या भावना ओळखण्याची, आवाजाला प्रतिसाद देण्याची आणि गुंतागुंतीच्या सूचना समजून घेण्याची क्षमता विकसित झाली आहे. ही 'वर्तनविषयक उत्क्रांती' मानवी सहवासामुळे आणि निवडीमुळेच झाली आहे.
तुमचे निरीक्षण अगदी बरोबर आहे की, हत्ती आणि माकडे वगळता इतर प्राणी मोठ्या प्रमाणात पाळले जात नाहीत. हत्ती आणि माकडे पाळली जात असली तरी, त्यांच्यातील वर्तनविषयक उत्क्रांती कुत्र्यांएवढी स्पष्ट आणि व्यापक नाही, कारण त्यांच्यावर मानवाद्वारे कुत्र्यांसारखी तीव्र आणि दीर्घकालीन 'निवड' प्रक्रिया झालेली नाही.
थोडक्यात, कृत्रिम बुद्धिमत्तेने सुचवलेले प्राणी हे त्यांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेमुळे आणि अनुकूलन क्षमतेमुळे महत्त्वाचे आहेत, परंतु 'मानवी संपर्कामुळे सर्वात वेगाने वर्तनविषयक उत्क्रांती' हा निकष लावला तर **कुत्रा** हाच सर्वात प्रमुख उदाहरण ठरतो.
"उत्क्रांतीचा वेग" (rate of evolution) ही संकल्पना वेगवेगळ्या संदर्भांमध्ये पाहिली जाते आणि तिची मोजमाप करणे जटिल असते. 'इन टोटॅलिटी' (in totality) म्हणजे केवळ मानवी संपर्कामुळे झालेले बदल नव्हे, तर नैसर्गिक निवडीमुळे, पर्यावरणातील दाबामुळे आणि जनुकीय बदलांच्या एकूण दरामुळे होणारे बदल.
उत्क्रांतीचा वेग साधारणपणे खालील निकषांवर मोजला जातो:
1. **मॉर्फोलॉजिकल बदल (Morphological Changes):** शरीराच्या संरचनेत किंवा स्वरूपात झालेले बदल, जे जीवाश्मांच्या नोंदीतून पाहिले जातात.
2. **जनुकीय बदल (Genetic Changes / Molecular Evolution):** डीएनए (DNA) किंवा प्रथिनांच्या (proteins) क्रमातील बदलांचा वेग. हे 'मॉलेक्युलर क्लॉक' (molecular clock) वापरून मोजले जातात.
3. **पिढ्यांचा कालावधी (Generation Time):** ज्या प्रजातींची पिढी लहान असते, त्या वेगाने जनुकीय बदल जमा करू शकतात, कारण नैसर्गिक निवडीचा परिणाम कमी वेळात अनेक पिढ्यांवर दिसून येतो.
4. **पर्यावरणातील बदल आणि निवड दाब (Environmental Change and Selection Pressure):** जेव्हा पर्यावरणात जलद बदल होतात, तेव्हा प्रजातींना जगण्यासाठी आणि प्रजनन करण्यासाठी वेगाने जुळवून घ्यावे लागते, ज्यामुळे उत्क्रांतीचा वेग वाढतो.
तुमच्या प्रश्नाकडे या निकषांच्या आधारावर पाहूया:
---
### कुत्रे (Dogs)
* **उत्क्रांतीचा वेग:** कुत्र्यांची उत्क्रांती, विशेषतः लांडग्यापासून पाळीव कुत्र्यांपर्यंत, **मानवी कृत्रिम निवडीमुळे (artificial selection) अत्यंत वेगाने** झाली आहे. गेल्या 15,000 ते 40,000 वर्षांत, त्यांच्या वर्तनात, शारीरिक रचनेत (आकारापासून ते केसांच्या रंगापर्यंत) आणि जनुकीय स्तरावर मोठे बदल झाले आहेत. या बदलांचा वेग नैसर्गिक उत्क्रांतीच्या तुलनेत खूप जास्त आहे, कारण मानवी निवडीचा दाब तीव्र होता आणि कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात जनुकीय भिन्नता निर्माण झाली. त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास मानवी भाषा आणि सामाजिक संकेतांशी जुळवून घेण्यासाठी झाला आहे.
* **निकष:** कृत्रिम निवडीमुळे जलद मॉर्फोलॉजिकल आणि वर्तणुकीतील बदल. पिढ्यांचा कालावधी तुलनेने कमी (काही वर्षे).
---
### इतर प्राणी (चिंपांझी, बोनोबो, डॉल्फिन, हत्ती, कावळे, ऑक्टोपस)
हे प्राणी त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि जटिल वर्तनासाठी ओळखले जातात, परंतु त्यांची उत्क्रांती कुत्र्यांसारख्या मानवी कृत्रिम निवडीने झालेली नाही. त्यांची उत्क्रांती मुख्यतः **नैसर्गिक निवडीने** झाली आहे, जी कृत्रिम निवडीपेक्षा साधारणपणे हळू असते.
1. **चिंपांझी आणि बोनोबो (Chimpanzees and Bonobos):**
* **उत्क्रांतीचा वेग:** मानवापासून त्यांचे पूर्वज सुमारे 6-8 दशलक्ष वर्षांपूर्वी वेगळे झाले. त्यानंतर बोनोबो सुमारे 2 दशलक्ष वर्षांपूर्वी चिंपांझींपासून वेगळे झाले. त्यांच्या जनुकीय रचनेत मानवाशी खूप साम्य आहे, परंतु त्यांच्या उत्क्रांतीचा वेग (नवीन प्रजाती निर्माण होणे किंवा मोठ्या प्रमाणात शारीरिक बदल) कुत्र्यांसारखा 'जलद' नाही, विशेषतः मानवी हस्तक्षेपाच्या दृष्टिकोनातून. त्यांची पिढी लांब असते (~20 वर्षे).
* **निकष:** नैसर्गिक निवड, लांब पिढीचा कालावधी.
2. **डॉल्फिन (Dolphins):**
* **उत्क्रांतीचा वेग:** डॉल्फिन आणि व्हेल (cetaceans) हे सुमारे 50 दशलक्ष वर्षांपूर्वी जमिनीवरील सस्तन प्राण्यांपासून (उदा. हिप्पोचे पूर्वज) पाण्यात परत गेले. हा अत्यंत महत्त्वाचा आणि जलद अनुकूलनाचा काळ होता, जिथे त्यांनी पाण्यातील जीवनासाठी शरीररचनेत (उदा. स्ट्रीमलाईन्ड शरीर, फ्लूक, इकोलोकेशन) मोठे बदल घडवले. हा बदल अत्यंत लक्षणीय होता. मात्र, त्यानंतर त्यांच्या उत्क्रांतीचा जनुकीय दर इतर काही सस्तन प्राण्यांच्या तुलनेत (उदा. गायी, घोडे) *कमी* झाला असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे, तो मानवांच्या आणि हत्तींच्या बरोबरीने आहे.
* **निकष:** सुरुवातीला पर्यावरणाच्या बदलामुळे जलद आणि मोठे मॉर्फोलॉजिकल बदल, नंतर जनुकीय बदलांचा मंदावलेला दर.
3. **हत्ती (Elephants):**
* **उत्क्रांतीचा वेग:** हत्तींचे पूर्वज सुमारे 60 दशलक्ष वर्षांपूर्वी दिसू लागले. त्यांचे आकारात वाढ, सोंड आणि सुळे यांचा विकास हा लाखो वर्षांच्या कालावधीत झाला आहे. त्यांच्या उत्क्रांतीचा वेग, विशेषतः पिढ्यांचा दीर्घ कालावधी पाहता, कुत्र्यांपेक्षा खूपच कमी आहे.
* **निकष:** नैसर्गिक निवड, अत्यंत लांब पिढीचा कालावधी.
4. **कावळे (Crows):**
* **उत्क्रांतीचा वेग:** कावळ्यांच्या 'Corvus' वंशाचा विकास सुमारे 10 दशलक्ष वर्षांपूर्वी झाला. त्यांच्यात वेगाने प्रजातींचे वैविध्य (speciation) आणि भौगोलिक विस्तार झाला, ज्यामुळे मॉर्फोलॉजिकल विविधताही दिसून आली. ते मानवी वातावरणाशी जुळवून घेणारे (adaptable) आहेत, परंतु कुत्र्यांसारखी मानवाद्वारे 'कृत्रिम निवड' होऊन त्यांच्यात 'जलद वर्तणूक उत्क्रांती' झाली असे म्हणता येणार नाही, कारण ते पाळीव प्राणी नाहीत.
* **निकष:** नैसर्गिक निवड, अनुकूलन क्षमता.
5. **ऑक्टोपस (Octopuses):**
* **उत्क्रांतीचा वेग:** ऑक्टोपस हे मोलस्क (molluscs) वर्गातील प्राणी आहेत आणि त्यांची उत्क्रांती करोडो वर्षांपूर्वीपासून झाली आहे. त्यांची बुद्धिमत्ता आणि 'कलर चेंज' यांसारखी अद्वितीय क्षमता अत्यंत विकसित झाली आहे. त्यांची पिढी तुलनेने लहान असते. मात्र, त्यांची उत्क्रांती ही त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी झाली आहे, मानवी संपर्कामुळे नाही.
* **निकष:** नैसर्गिक निवड, अद्वितीय न्यूरोलॉजिकल आणि मॉर्फोलॉजिकल बदल.
---
### निष्कर्ष
जर आपण **'कृत्रिम निवडीमुळे आणि मानवी सहवासामुळे झालेली जलद वर्तणूक व शारीरिक उत्क्रांती'** हा निकष लावला, तर **कुत्रा (Dog)** हाच या यादीतील सर्वात वेगाने उत्क्रांत झालेला प्राणी आहे. कारण, गेल्या काही हजार वर्षांत मानवी हस्तक्षेपाने त्यांच्यात झालेले बदल अतुलनीय आहेत.
परंतु, जर आपण **'एकूण जनुकीय बदलांचा दर'** किंवा **'पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देण्याची नैसर्गिक क्षमता'** पाहिली, तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते आणि 'सर्वात वेगाने' उत्क्रांत होणारा एकच प्राणी ठरवणे कठीण आहे. प्रत्येक प्रजातीने आपापल्या पर्यावरणात टिकून राहण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी वेगवेगळ्या गतीने आणि वेगवेगळ्या गुणधर्मांमध्ये उत्क्रांती केली आहे.
* डॉल्फिनने पाण्यातील जीवनासाठी सुरुवातीला अत्यंत जलद आणि मोठे मॉर्फोलॉजिकल बदल केले.
* कावळ्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि अनुकूलन क्षमतेमुळे विविध अधिवासांमध्ये यशस्वीरीत्या वस्ती केली आणि प्रजातींचे जलद वैविध्य दाखवले.
* ऑक्टोपसची न्यूरोलॉजिकल आणि 'कलर चेंज' क्षमता ही त्यांच्या नैसर्गिक निवडीतील जलद अनुकूलनाचे उदाहरण आहे.
तुम्हाला मिळालेली उत्तरे (चिंपांझी, बोनोबो, डॉल्फिन, हत्ती, कावळे, ऑक्टोपस) ही त्यांच्या उच्च बुद्धिमत्तेमुळे आणि त्यांच्या विशिष्ट पर्यावरणीय जुळवून घेण्याच्या क्षमतांमुळे येतात, परंतु 'मानवी संपर्कामुळे वर्तनविषयक उत्क्रांती' या तुमच्या विशिष्ट निकषावर ती कुत्र्यांसारखी बसत नाहीत. त्यामुळे, तुमच्या शंकेला वैज्ञानिक आधार आहे.
15 Jun 2025 - 10:36 pm | सुबोध खरे
माहितगार यांच्या मोठ्या प्रतिसादाचे सार एवढेच आहे कि नैसर्गिक निवडीमुळे एखादा प्राणी जगण्यासाठी जास्त लायक ठरला तर तो उत्क्रांतीच्या रेट्यात टिकून राहतो.
उदा इंग्लंड मध्ये औद्योगिक क्रांतीच्या अगोदर पांढऱ्या रंगाचे पतंग बहुसंख्येत होईल परंतु जसे कोळसा, त्याचा धूर आणि लोखंडाचा वापर वाढला ज्या मुळे पार्श्व भूमी जास्त काळी होत गेली . अशा काळ्या पार्श्वभूमीवर पांढरे पतंग सहज उठून दिसत असल्यामुळे ते त्यांच्या भक्षकांच्या नजरेत सहज येत असत आणि काळे पतंग त्यामानाने दिसत नसल्यामुळे जास्त सुरक्षित राहिले साधारण १०० वर्षात इंग्लंड मधील पांढरे पतंग जवळ जवळ नामशेष झाले आणि उरले ते बहुसंख्य काळे पतंग.
आता कृत्रिम निवड म्हणजे काय? आपण संकरित वाण ( बीज) तयार करतो ते कसे तर चांगले गुण असलेले बीज मुद्दाम वाढवणे आणि त्याचे दुसऱ्या चांगल्या जातीच्या बीजाशी संकरण करणे. गेल्या काही दशकात बिनबियांची द्राक्षेच सर्वत्र मिळू लागली आहेत किंवा मोठी मोठी संकरित बोरं मुद्दाम तयार केलीय आहेत .
हि नैसर्गिक निवड आहे उत्क्रांती किंवा उत्परिवर्तन नव्हे
तद्वत मानवाने कुत्र्यांच्याजातीतील आपल्याला हवे असलेले गुण निवडून कुत्र्यांची आपल्याला हवी तशी संकरित संतती वाढवली मग यात कुत्र्यांचे आपल्याला हवे असणारे गुण निवडले गेले आहेत. कुत्रे जास्त हुशार होते म्हणून नव्हे
हीच स्थिती रेस च्या घोड्यांची आहे कोल सारखे हँडबुक वाचले तर धावणाऱ्या घोड्यांच्या सात पिढ्यांची माहिती त्यात मिळते ज्यात या घोड्याची आई कुठली रेस जिंकली होती बाप आजोबा आजी इ सर्व घोडे कोणकोणत्या रेस जिंकले याची साद्यन्त माहिती त्यात असते. thorough bred म्हणजे काय हा पण त्यात समजून येईल.
किंवा उत्तम दूध देणाऱ्या गाई उदा (जर्सी) किंवा म्हशीची (जाफराबादी ), किंवा शेळीची ( उस्मानाबादी )अशीच स्थिती आहे.
दुर्दैवाने काही भरकटलेले लोक याला उत्क्रांती किंवा उत्परिवर्तन समजत आहेत.
उत्क्रांती मुळे माणसाची शेपूट ( उपयोग न केल्याने) झडून गेली किंवा माणसाचे अपेंडिक्स( आंत्रपुच्छ) आपण गवत खात नसल्यामुळे केवळ नाममात्र आकाराचे झाले. मग माणूस तर ढ आहे असं म्हणावं लागेल.
१४०० वर्षे सुन्नत करून सुद्धा मुसलमानांमध्ये अजूनही जन्माला आलेल्या संततीत पुढची त्वचा तशीच वाढलेली दिसते
किंवा
डॉबरमन कुत्र्याची शेपटी कापली तरी इतका हुशार कुत्रा असून सुद्धा पिल्ले जन्माला येतात ती पूर्ण शेपटीसकटच कशी हा प्रश्न सर्वज्ञ लोकांना कसा पडत नाही.
कारण उत्परिवर्तन/ उत्क्रांती आणि नैसर्गिक निवड यामध्ये मूलभूत गल्लत झाली आहे.
बाकी चालू द्या
16 Jun 2025 - 9:26 am | युयुत्सु
मिलॉर्ड,
माहितगार यांच्या पोस्टवर जो प्रतिसाद वर दिला गेला आहे, त्याला उद्देशून हे उत्तर आहे. मी हे उत्तर प्रथम गंभीरपणे देऊ इच्छितो (रेग्यांच्या नावाचे गंध कपाळाला जाहिरपणे लावले असल्याने, हे आवश्यक ठरते.)
सदर व्यक्ती असे म्हणते की -
"डॉबरमन कुत्र्याची शेपटी कापली तरी इतका हुशार कुत्रा असून सुद्धा पिल्ले जन्माला येतात ती पूर्ण शेपटीसकटच कशी हा प्रश्न सर्वज्ञ लोकांना कसा पडत नाही.
कारण उत्परिवर्तन/ उत्क्रांती आणि नैसर्गिक निवड यामध्ये मूलभूत गल्लत झाली आहे."
कोणताही वाद तर्कशुद्ध पद्धतीने निर्णायक अवस्थेत पोचविण्यासाठी प्रथम काही मुद्दे निश्चित करणे आवश्यक आहे. माझ्या मते हे मुद्दे असे आहेत -
या प्रश्नांची नेमकी आणि मुद्देसूद उत्तरे मिळविल्याशिवाय कुत्र्यांवरील उत्क्रांतीचा वाद सुटणार नाही. ही उत्तरे शोधायची नसतील तर आता मला या चर्चेत स्वारस्य नाही, याची नोंद घ्यावी!
स्वगत- डॉबरमनमध्ये जशी शेपूट गळून पडली नाही, तशीच काहीही केलं तरी काही मानवात तर्कशुद्ध विचार क्षमता विकसित होत नाही. कडु कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं (पन इंटेण्डेड) तरी कडू ते कडूच...
असो...
16 Jun 2025 - 9:45 am | युयुत्सु
डॉबरमनमध्ये जशी शेपूट गळून पडली नाही, तशीच काहीही केलं तरी काही मानवात तर्कशुद्ध विचार क्षमता विकसित होत नाही.
काही मानवविशेषांत तर्कशुद्ध विचार क्षमता विकसित न झाल्यामुळे जशी मानवी उत्क्रांती नाकारता येणार नाही तद्वत डॉबरमनमध्ये जशी शेपूट गळून पडली नाही म्हणून इतर श्वानांमध्ये उत्क्रांती झाली, असं म्हणता येणार नाही.
क्यु०इ०डी०
माझ्यासाठी ही चर्चा संपल्यात जमा आहे.
16 Jun 2025 - 9:49 am | युयुत्सु
काही मानवविशेषांत तर्कशुद्ध विचार क्षमता विकसित न झाल्यामुळे जशी मानवी उत्क्रांती नाकारता येणार नाही तद्वत डॉबरमनमध्ये जशी शेपूट गळून पडली नाही म्हणून इतर श्वानांमध्ये उत्क्रांती झाली नाही, असं म्हणता येणार नाही.
असे वाचावे
16 Jun 2025 - 1:23 pm | सुबोध खरे
एवढी चिडचिड का होते आहे? मुळात झालेली चूक सुधारणे शक्य नाही म्हणून.
कोणत्याही गोष्टीला बगल द्यायची आपली क्षमता अपरंपार आहे एवढे बोलून मी खाली बसतो.
बाकी चालू द्या
14 Jun 2025 - 1:03 pm | माहितगार
14 Jun 2025 - 1:03 pm | माहितगार
14 Jun 2025 - 1:04 pm | माहितगार
14 Jun 2025 - 6:36 pm | युयुत्सु
श्री० माहितगार
आपण वर दिलेले जैमिनीय विश्लेषण वाचून मी स्वतः अचंबित झालो आहे. सध्या ९९% लोकांमध्ये तथ्यांश (मेरीट) तपासायची क्षमता नसल्यामुळे त्याकडे ए०आय० ने दिलेले उत्तर म्हणून नाकं मुरडायची शक्यता जास्त वाटते. कालच असे कळले की ए०आय० ने परम-बुद्धीमत्तेचा (सुपर-इंटेलिजन्स) टप्पा ओलांडला आहे.
https://www.youtube.com/watch?v=m_ipAJWCs8g
दुसर्या एका व्हीडीओत माणसासारख्या लाजणार्या रोबीणी (रोबो-सुंदरी) बघायला मिळाल्या. https://www.youtube.com/shorts/9w7zjwJ-my4
असो...
माझी प्रा० रेग्यांची ओळख कुमार-कोश प्रकल्पामुळे झाली. तो प्रकल्प आमच्या संस्थेसाठी मिळवताना मला जो लढा द्यावा लागला, त्यात फक्त रेगे खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहीले. मी त्यांच्याकडे कोणत्याही तत्त्वज्ञानाचे धडे घेतले नाहीत, पण त्यांच्या बरोबर राहून "शक्तीपाताने" ऊर्जा भरपूर घेतली. मी एखादी कल्पना मांडली आणि रेग्यानी नाकारली असं कधीही झालं. वांधे घातले ते फक्त आमच्या नीच संचालकांनी ... असो.

मला माझ्या आय० आय० टी० च्या डीग्रीचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग झाला नसल्याने ती सन्मानाने आय० आय० टी० ला परत करण्याचे विचार मात्र अधुनमधुन मनात घोळतात. मूळ शिक्षण भविष्यात कुचकामी होईल आणि प्रत्येकाने ३ करिअर करण्या तयारी ठेवावी, अशी शक्यता सध्या अनेक तज्ज्ञ वर्तवत आहेत. याची चिन्हे मात्र ३५ वर्षापुर्वीच दिसायला लागली होती. त्यामुळे माझी आय्०आय०टीची डीग्री कुचकामी ठरली याचे मला अजिबात वाईट वाटत नाही.
सध्या मी ६२ वर्षाचा असून माझ्या कन्येचे आयुष्य घडविण्याचा आनंद घेत आहे. ती एका प्रतिष्ठीत अशा युरोपातील पहिल्या १० मधील डीझाईन-स्कूलमधून डिझाईनर म्हणून बाहेर पडली असल्याने माझ्या पुढे गेली याचा आनंद खूप मोठा आहे.
असो...
14 Jun 2025 - 8:32 pm | मारवा
ज्या काही मोजक्या मराठी माणसांचा मोठा आदर वाटतो त्यात एक म्हणजे मेघश्याम पुंडलिक रेगे.
त्यांची तत्त्वज्ञानावरील पुस्तके अंत्यंत वाचनीय अशी आहेत.
तुम्हाला इतक्या थोर व्यक्तीचा सहवास लाभला
तुमचे कौतुक आणि हेवा वाटतो.
त्यांच्या विषयी चे तुमचे अनुभव, संवाद जाणून घ्यायला आवडेल
जमल्यास एखादा स्वतंत्र लेख रेगे वर लिहावा ही विनंती
14 Jun 2025 - 7:22 pm | युयुत्सु
https://youtube.com/shorts/RVG7xSsEY98?si=y2sRVv1uFQ0eaN5a
अशा विनयभंगाबद्दल रोबो माणसावर गुन्हा दाखल करू शकेल का? रोबोना भावना नसतात असे म्हणणे आता चूकीचे ठरले आहे का?
16 Jun 2025 - 11:02 am | युयुत्सु
श्री० माहितगार यांनी माझ्या गुरुपरंपरेविषयी विचारणा केली होती. वरील फोटोत सर्वात पुढे उजवीकडून १ले गृहस्थ (हात मागे) माझे १ले गुरुवर्य. यांनी जगप्रसिध्द बर्कले विद्यापीठातून १८ महिन्यात आपली पी०एच्०डी० पूर्ण केली होती. यांनी मला आयुष्यातला प्रत्येक प्रश्न प्रथम पायरीशिवाय प्रथम पायरीपासून सोडवायचा धडा दिला. यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा संगणकशास्त्र विभागातील ढुढ्ढाचार्यांनी तुम्हाला फिजिक्सचा विद्यार्थी कशाला हवा? असे प्रश्न विचारून माझ्या नेमणूकीत अडथळा आणायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी संगणकशास्त्र विभागाशी टक्कर देऊन मला दिलेले वचन पूर्ण केले.
पुढे यांच्याबरोबर काम करताना आम्ही महाराष्ट्र सरकारसाठी एक प्रकल्प केला होता. हा प्रकल्प पूर्ण झाला तेव्हा शासनातील उच्च्पदस्थ (सचीव आणि आय० ए० एस) अधिकार्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. तेव्हा हे सचीव आणि आय० ए० एस अधिकारी अत्यंत, बालीश, निरर्थक आणि मूर्खासारखे प्रश्न विचारून विरोध करत असत. हा मूर्खपणा जेव्हा थांबेना तेव्हा आमच्या सरांनी रौद्ररूप धारण केले. ते सचीव रंगनाथन यांच्याकडे बघत म्हणाले,
"ज्या आय० ए० एस अधिकार्यांना हे बदल स्वीकारणे अवघड जात असेल त्यांनी हात वर करावे. त्यांना ताबडतोब आय० आय० टी० कॅम्पस मधील सर्वात उंच झाडावर फासावर लटकवायची मी ताबडतोब व्यवस्था करतो". हे ऐकून रंगनाथन (हे नंतर महाराष्ट्राचे मुख्य सचीव बनले होते) तेजोभंग होऊन थंडगार पडले होते.
अलिकडे समाजात सभ्यपणा हा कमकुवतपणा मानायचा प्रघात पडला आहे. अशा वेळेला सर्व शिष्टाचार, नैतिक संकेत बाजूला ठेऊन रौद्र रुप धारण करण्याशिवाय पर्याय नसतो. माझे काही संस्कार कुठून आले याचे उत्तर आता मिळाले असेल्च...
निर्विषेण अपि सर्पेण कर्तव्या महती फटा.... असे संस्कृतमधे म्हटले आहे ते उगीच नाही.
टीप- वरील फोटोत मी सर्वात पुढे डावीकडून प्रथम (खिशात हात घालून) उभा आहे.
17 Jun 2025 - 12:04 pm | युयुत्सु
https://webpreneurships.com/dogs-are-evolving-again-and-humans-might-be-...
18 Jun 2025 - 10:33 am | माहितगार
@ युयुत्सु माझ्या अज्ञानासाठी माफ करा. डॉ. सुबोध खर्यांनी सर्कमसिजन विषयक एक मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे, एआय वरून माहिती घेतली सर्कमसिजनची प्रथा सहा हजार वर्षापासून तरी असू शकेल. भारत चिन असे लोक सध्याच्या मोट्या लोकसंख्या विचारात न घेतल्या तर उर्वरीत जगात सर्कमसिजनचे मोठे प्रमाण आहे पण त्याचा उत्क्रांतीवर परिणाम होत नाही असेच जेमिनी एआय म्हणाले. तुमची आतापर्यंतची मांडणी आणि या मुद्द्याची सांगड आपण कशी घालता?
18 Jun 2025 - 12:38 pm | युयुत्सु
तुमची आतापर्यंतची मांडणी आणि या मुद्द्याची सांगड आपण कशी घालता?
काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे -
१. सर्कमसिजनने मानवी अस्त्तित्वावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो का?
२. म्हणजे एव्होल्युशनरी अॅडव्हाण्टेज/डीस-अॅडव्हाण्टेज मिळतो का? उदा० प्रजोत्पादनाची संधी (मेटींग ऑपॉर्च्युनिटी), अन्न शोधण्याची क्षमता, जीवनातील स्थैर्य, सामाजिक स्थान यावर सर्कमसिजन काहीच प्रभाव पाडत नाही आणि म्हणूनच या रूढीने केंद्रकाम्लामध्ये (डीएनए) काहीही बदल घडत नाही. तसेच अलिकडे जबड्याचा आकार, कवटीचा आकार यात बदल झाल्यामुळे अक्कलदाढा वेड्यावाकड्या वाढण्याची समस्या वाढली आहे, असे दंतवैद्य म्हणतात. सर्कमसिजनने असा शरीरावर (रचना आणि अंतर्गतक्रिया) कोणताही प्रभाव पडत नाही, त्यामुळे पुढच्या पिढीत जावा असा कोणताही गुणधर्म (जनुकीयबदल) सर्कमसिजनने निर्माण होत नाही.
आता काही अक्कलशून्य लोक असा प्रश्न विचारतील की जबड्याचा आकार आणि वर उल्लेख केलेले मुद्दे ( प्रजोत्पादनाची संधी (मेटींग ऑपॉर्च्युनिटी), अन्न शोधण्याची क्षमता, जीवनातील स्थैर्य, सामाजिक स्थान इ०) यांचा संबंध काय?
काही बदल प्राथमिक असतात तर काही आनुषंगिक बदल मोठ्या बदलाच्या छायेत घडतात. उदा० उदा आईच्या गर्भाशयाचा आकार लहान झाल्यामु़ळे गर्भाला वाढायची जागा कमी मिळते मग त्याचा कवटीच्या वाढीवर परिणाम होतो (हा एक अंदाज, आणखी कारणे असू शकतात) आणि म्हणून अक्कलदाढा वेड्यावाकडया वाढू शकतात.
माझा मूळ मुद्दा असा आहे की अन्न, सुरक्षा आणि मालकाला खुष करणार्या प्रत्येक कृतीला मिळणारे बक्षीस आणि लाड यामुळे कुत्र्याने माणसाशी जास्तीत जास्त जुळवून घेतले, आणि तो उपलब्ध जनुकसंचामुळे जे जे शिकणे शक्य आहे तो ते करू लागला. साहजिक जे गुण माणसाला आवडले ते विकसित झाले आणि कृत्रीम निवडीमुळे पुढे ढकलले गेले.
स्वगत - फक्त सभ्य भाषेत दिलेल्या प्रतिसादाना उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. असंबंद्ध, आगाऊ प्रतिसादाना फाट्यावर मारले जाईल.
18 Jun 2025 - 7:28 pm | सुबोध खरे
जे गुण माणसाला आवडले ते विकसित झाले आणि कृत्रीम निवडीमुळे पुढे ढकलले गेले.
"जे गुण माणसाला आवडले ते विकसित झाले आणि कृत्रीम निवडीमुळे पुढे ढकलले गेले".
हायला
जे गुण माणसाला आवडले ते गुण विकसित झाले असते तर माणसांना बायका मनमिळाऊ न भांडणाय्रा आणि नवर्याच्या हो ला हो करणाऱ्या मिळाल्या असत्या.
कारण पुराण काळापासून शतकानुशतके बहुपत्नीत्व होते आणि नावडती बायको आवडती होण्यासाठी फार कष्ट घेत असे असे सर्व पुराण कथा मध्ये वाचायला मिळते.
कृत्रिम निवडीमुळे पुढे ढकलले गेले.
तुमच्या उत्क्रांतीचा पाया तर मुंब्र्याच्या अनधिकृत इमारतींपेक्षा भुसभुशीत निघाला.
कारण उत्क्रांती हि नैसर्गिक निवडीमुळे होते.
कृत्रिम निवडीने जर उत्क्रांती झाली असती तर संकरित पिके फळं किंवा संकरित वळू, थरो ब्रेड घोडे, गाढवं इ सर्व उत्क्रांत झाले असाच म्हणावं लागेल.
बाकी न चिडता विचार करा.
नाहीतर द्या सोडून.