लैराईदेवी जत्रा चेंगराचेंगरी

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
4 May 2025 - 10:26 am

हिंदुस्थानात सर्वात स्वस्त गोष्ट
माणसाचा जीव.
रोज मरताहेत अकाली
कशी करावी कीव?

गोवा,शिरगाव येथील लैराईदेवी जत्रा
जमले होते 40 हजार नऊ शे सतरा.

गेले होते आशीर्वाद घेण्या,
मिरवणुकीत सहभाग देण्या.
करण्या कुटुंबाची हौस
आणि मुलांची थोडी मौज.

मिरवणुकीदरम्यान,
एका ठिकाणी उतार,
लोकांना नाही कळले
ना रांग, नाही कतार

गोंधळात लोक पडले,
काही जोरात ओरडले
एकमेकांवर लागले पडू
बायका,मुले लागले रडू

झाली भयानक चेंगराचेंगरी,
7 जण जागीच मेले, जशी मेंढरी
80 जण जखमी झाले
त्यांना हॉस्पिटल नेले.

संयोजकांचा आहेच दोष,
तसेच भक्तांचा उन्माद जोश.

मागे मांढरादेवी च्या जत्रेत
मेले अनेक,
कोर्ट शोधू शकले नाही
कारण एक.

आता काय बोलायचे
'हे असेच चालायचे....'

कविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2025 - 2:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ता कवितेच्या माध्यमातून लैरादेवीच्या दुर्घटनेची बातमी पाहिली.
दुर्दैवी सगळं.

अनेकदा अशा गर्दींची चर्चा होते. लोक विसरुन जातात आणि अशा दुर्घटना घडतात.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

4 May 2025 - 2:20 pm | अमरेंद्र बाहुबली

अशीच चेंगराचेंगरी गणपतीत दगडूशेठ होणार आहे. लिहून ठेवा!