इकडचं-तिकडचं
भारतात गोरक्षण हा सध्या कळीचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच माझ्या आवडत्या DW-TV
वर एक बातमी येऊन थडकली आहे.
डेन्मार्क या छोट्या देशातील शेतकर्यानी गाईंच्या ढेकरातून होणार्या मिथेन वायूच्या प्रदूषणासाठी कर देणे मान्य केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=_s0dBrXJXuo
भारतामध्ये ही कल्पना रूजेल का?
मग मिथेन वाय़ू आणि हवामानबदल यात भारत कुठे आहे हे शोधण्यासाठी नासाचे हे कल्पनाचित्र बघितले आणि भारताचं गोवंशाकडून होणारं योगदान लक्षणीय आहे असे कळले.
https://www.youtube.com/watch?v=74_8SIkx3nA
कालच आणखी एक माहितीपट बघत असताना एक गोष्ट ठळकपणे जाणवली. भारतात कधी पर्यावरण, प्रदूषण यावर मोठी जन-आंदोलने होताना दिसत नाहीत.
https://www.dw.com/en/india-why-some-states-want-people-to-have-more-chi...
आणखी एक अचंबित करणारी बातमी. भारतात दक्षिणेत प्रजननाचा दर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. वास्तविक ज्या प्रदेशात आणि ज्या समाजामुळे हे शक्य झालं आहे, त्यांना पाठीवर थाप देऊन, शक्य असल्यास कर सवलती देऊन कौतूक केलं पाहिजे. पण इथे चंद्राबाबू नायडू वेगळाच सूर आळवत आहेत आणि मला ते चिंताजनक वाटते.
"Nara Chandrababu Naidu, the chief minister of the southern state of Andhra Pradesh, recently shifted his focus from promoting population control to encouraging families to have more children.
He even proposed a law that would allow only those with two or more children to run for local elections.
A few days later, another chief minister, M.K. Stalin, from the neighboring state of Tamil Nadu, echoed similar thoughts and also urged people there to have more children. "
https://www.dw.com/en/india-why-some-states-want-people-to-have-more-chi...
प्रतिक्रिया
12 Nov 2024 - 10:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> डेन्मार्क या छोट्या देशातील शेतकर्यानी गाईंच्या ढेकरातून होणार्या मिथेन वायूच्या प्रदूषणासाठी कर देणे मान्य केले आहे.
भारतामध्ये ही कल्पना रूजेल का?
हे राम..! असे काहीही भारत देशात शक्य नाही. गोबर संप्रदायीं सॉरी गाईबद्दल इकडे मान्यता अशी आहे की, आपल्याकडे गाईला देवाचे स्थान देण्यात आले आहे. कामधेनु गोमातेचे पूजन केले जाते. गायीच्या पोटात तेहेतीस कोटी देवतांचा वास असल्याची समजूत अगदी प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे दिसून येते, त्यामुळे तिच्यातून जे जे बाहेर पड़ते ते पवित्र मानल्या जाते. कोणत्याही प्रकारचा वास ढेकर अथवा, गोबर, गोमुत्र वगैरे यावर कर लागणार नाही असे वाटते. उलट वरील गोष्टी नाकारणा-यांवर देशात अशीच परिस्थिती राहिली तर, कर लागू शकतो असे आमचे आमचे मत आहे.
>>>भारतात कधी पर्यावरण, प्रदूषण यावर मोठी जन-आंदोलने होताना दिसत नाहीत.
पर्यावरण,प्रदूषण याविषयी न सरकार न जनता जागृत आहे, सरकारच स्वत:च्या हितचिंतकांचे हीत जपण्यासाठी पूर्वीच्या सरकारांनी केलेले कायदे जसे, वन्यजीव संरक्षण कायदा, प्रदूषणविषयक सरकारने केलेले संरक्षण कायदे, इको सिस्टिम झोन यांना उद्योगपतीच्या सोयीसाठी प्रतिबंधित अशा अनेक कायद्यांची मोडतोड़ करुन आधुनिकीकरणाच्या नावाखाली खासगी उद्योगपतींना राखीव जागा त्यांना ख़िरापती वाटाव्यात तशा वाटत आहेत. अनेक प्रकल्पांवर सामाजिक चळवळींनी संस्थांनी आक्षेप घेऊन अनेक प्रकल्पांना
न्यायालयात नेले आहे. सरकार नियम बनवते आणि कायदे त्याची अंमलबजावणी करतात पण ही सर्व राखीव् क्षेत्रे, नैसर्गिक जी क्षेत्रे आहेत तिथे ती सर्व क्षेत्रे उद्योगपतींना दिल्या जातात प्रदूषण वाढते, वाट लागते. मोठा विषय आहे.
आपल्याला सरकार फक्त झाडे लावा झाडे जगवा असा सन्देश देऊन नादी लावत असते.
-दिलीप बिरुटे
( इकडचा तिकडचा )
13 Nov 2024 - 10:45 am | युयुत्सु
आपल्याला सरकार फक्त झाडे लावा झाडे जगवा असा सन्देश देऊन नादी लावत असते.
बरोबर आहे, नंतर आपण लावलेल्या झाडांनी सोडलेला प्राणवायू सगळ्याना उपभोगायचा असतो पण वेळवेळच्या वेळी पालापाचोळा उचलायची जबाबदारी पण सरकारला घ्यायची नसते.
५ ट्रिलीअन इकॉनॉमीची पर्यावरणीय किंमत काय याचा विचार करायची क्षमता कुणामध्येच नाहीये.
13 Nov 2024 - 12:31 pm | चंद्रसूर्यकुमार
तो युट्यूब व्हिडिओ मी बघितलेला नाही आणि बघायची इच्छाही नाही. तरीही नैसर्गिक प्रक्रीयेवर कर आकारणे आणि तो कर द्यायला तयार होणे हे दोन्ही पराकोटीचा मूर्खपणा झाला. असले खुळचट प्रकार युरोपिअन लोकांनाच सुचावेत. गाई (खरं तर मनुष्य वगळता इतर सगळे प्राणी) निसर्गाने त्यांना जसे बनवले आहे तसेच ते राहतात आणि त्याच गोष्टी करतात. त्यामुळे गाई चारा खाणार आणि गाईच्या शरीरातील पचनसंस्थेतील प्रक्रीयेमुळे गाईला ढेकर येणार. त्यात कर आकारायचा संबंध येतोच कुठे? माणूस कारखाने वगैरे काढून त्यात कोणत्या कोणत्या प्रक्रीया करून कृत्रिमपणे असा मिथेन किंवा अन्य हानीकारक वायू बनवू शकतो आणि बनवितोही. ती गोष्ट वेगळी. त्यावर कर जरूर लावावा. पण केवळ आणि केवळ नैसर्गिक उर्मीने राहणार्या प्राण्याच्या बाबतीत असले कर लावणे हे अजब तर्कट झाले.
दुसरे म्हणजे मिथेन हा वायू कार्बनच्या एक आणि हायड्रोजनच्या चार अणुंपासून बनतो ना? तो अणुंचा संयोग गाईच्या पोटातच होतो का? म्हणजे गाईने जो चारा खाल्ला तो खाल्ला नसता आणि तो जमिनीवर तसाच राहिला असता तर त्यातून मिथेन वायू बनणे अशक्य होते का? मग त्या परिस्थितीत कोणाकडून कर वसूल करणार?
तिसरी गोष्ट म्हणजे चारा खाणारा प्राणी गाय हा एकच नाही. इतरही शाकाहारी प्राणी आहेत. त्यात हरणांपासून इतर अनेकांचा समावेश होतो. ते पण सस्तन प्राणीच असल्याने त्यांची पचनसंस्थाही गाईप्रमाणेच असणार आणि त्यांच्या ढेकरेतूनही मिथेनच बाहेर येणार. बहुदा ते प्राणी जंगलातच असतात आणि ते कोणी पाळत असेल असे वाटत नाही. मग त्यांच्या ढेकरेमधून आलेल्या मिथेन वायूवर कोणाकडून कर वसूल करणार?
चौथी म्हणजे गाय आपल्या मालकाना हंबरून 'मी ढेकर देते आहे रे' असे सांगते का? मग गाय नक्की किती वेळा ढेकर देते आणि नक्की किती मिथेन वायू बाहेर पडतो याचे ऑब्जेक्टिव्ह मेजर कोणते? की मालकाने कामधंदा सोडून आपली गाय (खरं तर गायी कारण डेन्मार्कसारख्या दुग्धजन्य पदार्थात आघाडीच्या देशात शेतकर्यांकडे एकापेक्षा जास्त गायी असणे अस्वाभाविक अजिबात नाही) किती वेळा ढेकर देते यावर लक्ष ठेवायचे?
पाचवी गोष्ट म्हणजे जी गोष्ट ढेकर देणे या नैसर्गिक प्रक्रीयेविषयी ज्या गोष्टी लागू आहेत त्याच इतरही काही नैसर्गिक प्रक्रीयांविषयी लागू होतील. उदाहरणार्थ पादणे. त्या प्रक्रीयेतून कदाचित मिथेन वायू बाहेर पडत नसेल पण दुसरा वायू बाहेर पड्त असेल. मग त्यावरही कर लावणार का? बरं गायीच का? माणसेही पादू शकतात. मग दरवर्षी इनकम टॅक्स भरताना 'मागच्या वर्षी तुम्ही किती वेळा पादलात' या प्रश्नाचे उत्तर देणे बंधनकारक करायचे का?
सांगायचा मुद्दा म्हणजे खुळेपणा करत राहिल्यास त्याला अंत नसतो.
नासाच्या नावावर वाटेल त्या गोष्टी पूर्वी केवळ संस्कृतीरक्षक खपवायचे. त्याला आता इतरही स्पर्धा करत आहेत का? प्रदूषण करायला कारणीभूत घटकांमध्ये मोठे कारखाने, वाहने, पंजाब-हरियाणात होते त्याप्रमाणे शेतात पालापाचोळा जाळणे आणि तत्सम गोष्टींपुढे गायींचे ढेकर देणे लक्षणीय असेल हे कल्पनाशक्ती कितीही ताणली तरी मला तरी शक्य नाही. इतर मिपाकरांचे माहित नाही.
13 Nov 2024 - 1:00 pm | गवि
तुमच्या प्रश्नांत आणखी भर. येणेप्रमाणें:
कर आकारल्यास खालीलपैकी काय होईल? (एकाहून अधिक पर्याय निवडण्यास मुभा).
अ. गायीच्या ढेकरा कमी होतील.
ब. प्रति ढेकरेतील मिथेनचे प्रमाण कमी होईल.
क. गायीच कमी होतील
ड. मिथेन सौम्य होऊन त्याची हरितगृह परिणाम क्षमता कमी होईल.
ई. दूध महाग होईल.
फ. करसंकलन झाल्यावर त्यातून खर्च करून काही फवारे हवेत मारल्यास हवेतील मिथेन नष्ट पावेल.
(शेवटी समस्या सुटली पाहिजे)
13 Nov 2024 - 1:19 pm | टर्मीनेटर
ह्यापैकी 'ई. दूध महाग होईल.' आणि वर नसलेला एक पर्याय म्हणजे बीफ, पोर्क आणि मेंढ्याचे मांस महाग होईल कारण हा कर गाई, डुकरे आणि मेंढी पालकांवरही लागू होण्याचे प्रस्तावित आहे 😀
हा भंपक कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना 60% आयकर सवलतही देण्याचे प्रस्तावित आहे म्हणे... भारतात शेतकऱ्यांना 100% आयकर माफी आहे हा भाग वेगळा 😂
अवांतर: महाराष्ट्रातले काही शेतकरी एखाद दोन एकरात वांगी पिकावून पण कोट्यावधी कमावतात असेही ऐकून आहे!
13 Nov 2024 - 1:30 pm | टर्मीनेटर
"बीफ, पोर्क आणि मेंढ्याचे मांसही महाग होईल" पण लेखकाचा उद्देश काही विविक्षित हेतू मनात बाळगून फक्त 'गोवंश' टार्गेट करण्या पुरता मर्यादित असावा असे वाटते... हा भाग वेगळा 😀
असो...
13 Nov 2024 - 12:53 pm | टर्मीनेटर
बघू पण नका! जून महिन्यातल्या शिळ्या बातमीवर त्यांच्या आवडत्या DW-TV वर नोव्हेंबर मध्ये 'एक बातमी येऊन थडकली' असेल तर ती दाखवणारे एक धन्य आणि त्यावर धागा काढणारे दुसरे धन्य!
मुळात 2030 मध्ये लागू करण्याचा जो खुळचट विचार/विधेयक मांडले गेले आहे ते अजून संसदेत पास झलेले नाही. त्याला तिथल्या शेतकरी संघटनेने विरोधही केला आहे अशाही बातम्या आहेत.
पण साक्षात प्रा. डॉ. ह्यांनी दखल घेतली असल्याने 'नक्कीच काहीतरी शेतकरी विरोधी डाव असावा' असे वाटल्याने ह्या धाग्यावर फिरकलो आणि हे ब्राम्हज्ञान वाचायला मिळाले 😀
14 Nov 2024 - 8:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> पण साक्षात प्रा. डॉ. ह्यांनी दखल घेतली असल्याने...
गाय आणि मीथेन वायु याचा जो कार्यकारण भाव आहे, त्या कड़े धागा लेखक वाचकांचे लक्ष वेधु इच्छितो आणि वाचकांचे दुर्लक्ष होत आहे असे वाटले तसंही आपल्या देशात आपले सर्वांचे लाडके विश्वगुरु यांनी यापूर्वीच गटारीतून गॅसचं संशोधन केलेले आहे.
आपल्या देशात गाई सांभाळण्याची प्राचीन परंपरा आहे. गोकुळात गाई राखणा-या गवळ्याचं पोर ते आजच्या काळातील सरकार पुरस्कृत गो शाळा आहेत. तसंही आपल्याकडे आता कोणत्याच गोष्टीवर tax लावायचा बाकी राहिलेला नाही. अशा वेळी गाईच्या ढेकरातून निघणा-
वायुरूपातील मिथेनचा उपयोग वस्त्रोद्योग,कागदनिर्मिती,अन्नप्रक्रिया उद्योग,पेट्रोल उद्योगांमध्ये होतो. घरगुती वापरामध्ये इंधन म्हणून वापर होतो. इथेनॉल,मेथाईल क्लोराईड ई.च्या निर्मितीमध्ये मिथेनचा उपयोग होतो.
तेव्हा कल्पनेला गोबरभक्तांनी आणि भारतीयांनी पाठिंबा द्यायला हरकत नाही, असे वाटले म्हणून प्रतिसाद प्रपंच.
-दिलीप बिरुटे
13 Nov 2024 - 4:22 pm | युयुत्सु
गायी आणि मिथेन यांच्यातील कार्यकारणभावाला जो काहीसा भावनिक विरोध होत आहे, त्याचे फारसे आश्चर्य वाटले नाही. गेल्या काही वर्षात पश्चिमेतील ज्ञानाबद्दल जे विष पसरवले गेले आहे, ते बघता नवल वाटत नाही.
या विषयाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यावर ए०आय० कदून पुढील माहिती मिळाली (ए० आय० चे मराठीचे ज्ञान अचंबित करते) -
"गायींमुळे निर्माण होणारा मिथेन हा गंभीर चिंतेचा विषय आहे:
हरितगृह वायू: मिथेन हा एक प्रबळ हरितगृह वायू आहे. 100 वर्षांच्या कालावधीत त्याची ग्लोबल वॉर्मिंगची क्षमता कार्बन डायऑक्साइडपेक्षा (CO2) सुमारे 28 पट जास्त आहे. याचा अर्थ, कमी प्रमाणातील मिथेनसुद्धा ग्लोबल वॉर्मिंगवर मोठा प्रभाव करू शकतो.
थोडा पण तीव्र प्रभाव: मिथेनचा वायुमंडळातील जीवनकाळ (सुमारे 12 वर्षे) CO2 पेक्षा कमी आहे, परंतु त्याचा अल्पकालीन प्रभाव खूप तीव्र आहे. वायुमंडळात असताना मिथेन उष्णता फार प्रभावीपणे पकडतो, ज्यामुळे हवामान बदल घडतो.
बायोजेनिक कार्बन सायकल: गायींमुळे निर्माण होणारा मिथेन हा बायोजेनिक कार्बन सायकलचा भाग आहे. हा वायुमंडलीय कार्बन (जसे CO2) पासून निर्माण होतो आणि ऑक्सिडाईज झाल्यावर पुन्हा वायुमंडलात CO2 म्हणून परत जातो. तथापि, पाळीव प्राण्यांमधून मिथेनची सततची वाढ ही संतुलन बिघडवू शकते आणि अधिक तापमान वाढवू शकते.
कृषी स्त्रोत: गायी हा जगभरातील हरितगृह वायूंचा नंबर 1 कृषी स्त्रोत आहे. प्रत्येक गाय दरवर्षी सुमारे 220 पाउंड मिथेन निर्माण करू शकते, हा त्यांच्या पाचन प्रक्रियेचा नैसर्गिक भाग आहे.
हवामान बदलाचा प्रभाव: पाळीव प्राण्यांमधून निर्माण होणारा मिथेन हा हवामान बदलास कारणीभूत ठरतो, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढणे, अधिक तीव्र हवामान घटना, आणि वनस्पती व प्राण्यांच्या लोकसंख्येत बदल होणे असे परिणाम होतात.
गायींमधून मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी आहार व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन सुधारणा, आणि आनुवंशिक निवड यांसारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. हा विषय हाताळणे हवामान बदल कमी करण्यासाठी आणि पर्यावरणीय टिकाऊपणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे."
यात CO2 आणि मिथेन यांचे पर्यावरणाच्या हानीच्या दृष्टीने महत्त्व कळते. मग प्रश्न उरतो तो भारतीयांच्या शेपटीवर पाय देणारा हा "जावईशोध" कुणी लावला. तेव्हा ए०आय० पुढे टाकलेल्या लिंका तपासल्या. त्यात प्रतिष्ठित विद्यापिठाचे नाव पुढे आल्याने माझे तरी समाधान झाले आहे. कारण सूर्यावर थूंकायची हिंमत माझ्यात तरी नाही-
० https://www.ucdavis.edu/food/news/making-cattle-more-sustainable?form=MG...
० https://clear.ucdavis.edu/explainers/why-do-cattle-produce-methane-and-w...
० https://link.springer.com/article/10.1007/s10668-024-04939-1?form=MG0AV3
हे संशोधन नाकारणारे आणि कोपर्निकसला जाळून मारणारे यांच्या मनोवृत्तीमध्ये मूलत: फरक नाही, असेच म्हणावे लागते.
चंद्रसूर्यकुमार यांचा पुढील युक्तीवाद मला अतिशय बालीश वाटतो -
"दुसरे म्हणजे मिथेन हा वायू कार्बनच्या एक आणि हायड्रोजनच्या चार अणुंपासून बनतो ना? तो अणुंचा संयोग गाईच्या पोटातच होतो का? म्हणजे गाईने जो चारा खाल्ला, तो खाल्ला नसता आणि तो जमिनीवर तसाच राहिला असता तर त्यातून मिथेन वायू बनणे अशक्य होते का? मग त्या परिस्थितीत कोणाकडून कर वसूल करणार?"
गाईच्या पोटातले वितंचक आणी संप्रेरक (एन्झाईम्स आणि हॉर्मोन्स) ज्या कार्यक्षमतेने मिथेनची निर्मिती करतात त्याच कार्यक्षमतेने जमिनीवर पडलेल्या गवतावर प्रक्रिया होते का?
13 Nov 2024 - 4:38 pm | गवि
कर लावण्याच्या उपायामुळे गंभीर समस्येत काय सुधारणा होईल यावर काय मत आहे? मी तरी तेवढाच मुद्दा उपस्थित केला. व्यावसायिक लोक गायींची पैदास कमी करतील की दूध महाग करतील?
13 Nov 2024 - 4:48 pm | युयुत्सु
नुसता कर लावून कायम स्वरूपी उपाय सापडेल असे वाटत नाही. पण कर वाढवत नेला की गाईंची पैदास करणे कमी होऊ शकते. वर दिलेल्या एका दुव्यात बिफ चे उत्पादन कमी होणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. ते कर लादल्याने नक्कीच साध्य होईल.
14 Nov 2024 - 11:33 am | सुबोध खरे
ण कर वाढवत नेला की गाईंची पैदास करणे कमी होऊ शकते. वर दिलेल्या एका दुव्यात बिफ चे उत्पादन कमी होणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. ते कर लादल्याने नक्कीच साध्य होईल.
खालील उद्धृत काही वेगळेच सांगते आहे
Cattle and other ruminant animals account for about 4% of U.S. greenhouse gas emissions, according to the U.S. Environment Protection Agency (EPA).
In comparison, our transportation system — including cars, planes and more — accounts for more than 25.3 percent of U.S. greenhouse gas emissions.
Even extreme dietary changes — such as switching to a vegan, all-plant diet — won’t have much impact on climate change and global temperatures, Place explains.
Research shows that removing all livestock and poultry from the U.S. food system would only reduce global greenhouse gas emissions by 0.36%, she notes.
13 Nov 2024 - 8:50 pm | चंद्रसूर्यकुमार
गाईच्या पचनसंस्थेचा माझा अभ्यास नाही आणि तो करायची इच्छाही नाही. तरीही माझ्यातील कॉमन सेन्स सांगतो की गायीची ढेकर जितके प्रदूषण करेल (जर का केलेच तर) ते प्रदूषणाची इतर महत्वाची कारणे आहेत- वाहने, कारखाने वगैरेंपेक्षा कमी असेल.
२०२२ मध्ये नितीन गडकरी म्हणाले होते की भारतात एकूण ७ कोटी चारचाकी आणि त्यावरील (म्हणजे बहुदा ट्रक, टेंपो, बस वगैरे असतील) वाहने आहेत. तसेच २१ कोटी दुचाकी आहेत. दुचाकी सुध्दा प्रदूषण करतात. https://economictimes.indiatimes.com/industry/auto/two-wheelers-three-wh.... भारतात सात कोटी गायी आहेत असे धरले तरी सगळ्या गायी बारा महिने बत्तीस काळ सतत ढेकराच देत असतात का? कारण ढेकरांमधून मिथेन वायू निघतो असा दावा आहे. मला स्वतःला दोन चार महिन्यांतून आली तर एखादी ढेकर येते. गाय हा माणसापासून वेगळा प्राणी आहे त्यामुळे गायीला अगदी दर तासाला (म्हणजे माणसाच्या कित्येक शे पटींनी जास्त) ढेकर येत असेल असे धरले तरी एका गायीच्या एका ढेकरेपासून होईल त्यापेक्षा जास्त प्रदूषण अगदी दुचाकी एक तास तरी चालली तरी अधिक प्रदूषण करेल असे मला पामराला तरी वाटते. अगदी दुचाकीमधून आलेला धूर आपल्याला दिसतो. तितका मिथेन प्रत्येक गाय सतत बाहेर टाकत असते का?
काय सांगता? तुम्ही माझ्याच म्हणण्याला समर्थन देत आहात की एक चारचाकी गायीपेक्षा जास्त प्रदूषण करते. अमेरिकेच्याच पर्यावरणाच्या एजन्सीने (ईपीए) म्हटले आहे की प्रत्येक प्रवासी वाहन सरासरी ४.६ मेट्रीक टन कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते. https://www.epa.gov/greenvehicles/greenhouse-gas-emissions-typical-passe... ४.६ मेट्रीक टन म्हणजे ४६०० किलो. त्याला २८ ने भागले तर उत्तर येते १६४ किलो. म्हणजे प्रत्येक गाडी वर्षात १६४ किलो मिथेन इक्विव्हॅलंट प्रदूषण करते तर गाय २२० पाऊंड म्हणजे १०० किलो.
कोविडमुळे भारतात कोट्यावधी लोक मरतील अशी भाकिते प्रतिष्ठित विद्यापीठांमध्येच केली गेली होती ना?
14 Nov 2024 - 10:15 am | सुबोध खरे
About 40% of methane emissions come from natural sources, such as wetlands and termites. Wetlands account for about 20–30% of atmospheric methane emissions.
Here are some other sources of methane:
Agriculture
The largest anthropogenic source of methane, responsible for about one quarter of emissions. This includes emissions from livestock rearing, animal manure, and rice production.
Fossil fuels
Responsible for about 35% of methane emissions, including leakage from natural gas and oil production and distribution systems, and coal mines.
Waste
Responsible for about 20% of methane emissions, from food and other organic materials left in landfills, open dumps, and wastewater.
14 Nov 2024 - 10:17 am | सुबोध खरे
Rice production accounts for 10–12% of global methane emissions
हे भात बिर्याणी पुलाव खाणे ताबडतोब बंद करा -- इति सर्वज्ञ
14 Nov 2024 - 10:19 am | सुबोध खरे
In the US, livestock is the second-largest source of methane emissions, after the combined energy sector that relies on fossil fuels
प्रतिष्ठित विद्यापीठांना सांगा कि अमेरिकेत बीफला बंदी करावी यासाठी एक जागतिक चळवळ उभारा म्हणून
14 Nov 2024 - 10:19 am | युयुत्सु
हे भात बिर्याणी पुलाव खाणे ताबडतोब बंद करा -- इति सर्वज्ञ
मी असं म्हटलेले नाही पण बंद करायला हरकत नाही! नाहीतरी भारतीय कर्बोदके अवाजवी खातात...
13 Nov 2024 - 4:51 pm | टर्मीनेटर
ते ज्ञान तुम्हाला किती अचंबित करते?
तुम्ही असले भंपक धागे काढण्यातून स्वतःला 'कोपर्निकस' वगैरे समजत आहात का?
फालतुगिरी सोडा आणि तथ्यावर काही बोलता आले तर बघा...
13 Nov 2024 - 5:03 pm | युयुत्सु
गायी आणि मिथेन यांचा संबंध मी लावलेला नाही ("मी शेंगा खाल्ल्या नाहीत" या चालीवर) त्यामुळे मी स्वत:ला
कोपर्निकस समजायचा प्रश्न येत नाही. :)
13 Nov 2024 - 5:16 pm | टर्मीनेटर
मग असला भंपक धागा काढण्या मागचे प्रयोजन काय? हा प्रश्न उरतोच की...
कारण जे झालेले नाही, आणि होण्याची शक्यता नाही अशा गोष्टीचा हवाला देऊन उगाच असला धागा काढण्याचे नक्की प्रयोजन काय?
13 Nov 2024 - 5:25 pm | युयुत्सु
तुमच्या दृष्टीने हा धागा "भंपक" असला तरी माझ्यासाठी नाही. जागतिक तापमान १ अंशाने जरी वाढले तरी भारतात काय हाहाकार उडेल हे जाणून घ्यायची क्षमता माझ्यात आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीला हातभार लावणारे सर्व घटक (त्यात गाय़ी आणि मिथेन आलेच) माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
अशा धाग्याच्या प्रतिसादातून सामान्य जनतेचे या विषयांचे आकलन किती आहे ते समजते.
13 Nov 2024 - 5:31 pm | टर्मीनेटर
आणि अशा धाग्यांच्या माध्यमातून लेखकाचे एखाद्या विषयाचे आकलन किती आहे ते समजते.
14 Nov 2024 - 9:41 am | सुबोध खरे
काही लोक सर्वज्ञ असतात. त्यांच्याशी कोणत्याही विषयात वाद घालणे हे चूक आहे.
कारण त्यांनी कोणती पदवी कोणत्या संस्थेतून मिळवली हे जास्त महत्त्वाचे असते. मग ती दिलेल्या विषयाशी संबंधित असलीच पाहिजे असे नाही.
जोवर तुम्ही अशा संस्थेतून पदवी प्राप्त करत नाही तोवर असा वाद घालण्याचा आपल्याला अधिकार नाही हे आपण जाणून असावे.
14 Nov 2024 - 10:01 am | युयुत्सु
हा हा हा हा! चीडचीड आणि सात्विक संताप समजला...
मानवी आयुष्य़ एकदाच आहे. जितके शक्य असेल तितके भरभरून जगावे. असते कुणाकुणाची प्रतिभा बहुगामी, बहुआयामी. अशा लोकांचा तिरस्कार करण्यात काय हशील आहे?
मागे काही वर्षापूर्वी मी स्वत:च्या इसीजीचे स्वत: निदान करून वेळीच हॉस्पिटल गाठले आणि स्वत:ला पुढील गुंतागुतीपासून वाचवले, तेव्हा काही डॉ० नी नाक मुरडले आणि काही डॉ० नी माझे कौतूक केले. नाक मुरडणारे बहुतेक भारतीय डॉ० होते, ज्याना सहसा हुशार पेशंट आवडत नाहीत. कौतूक करणारे बहुतेक परदेशी डॉ० होते.
सांगायचे तात्पर्य अनेक विषयात गती असणं यात वावगं, अनैतिक किंवा बेकायदेशीर काहीही नाही.
14 Nov 2024 - 10:08 am | सुबोध खरे
भारतीय डॉक्टरांनी नाक का मुरडले हे समजले
ते म्हणाले असतील कि स्वत:च्या इसीजीचे स्वत: निदान करून वेळीच हॉस्पिटल गाठले त्यापेक्षा स्वतःच घरी इलाज करायचा आणि पैसे हि वाचवायचे
हा का ना का
उगाच डोक्याला ताप कशाला
अनेक विषयात गती असणं यात वावगं, अनैतिक किंवा बेकायदेशीर काहीही नाही.
पण आपल्यालाच गती आहे आणि इतरांना नाही हे समजणे यात काही वावगं नाही असेही काही लोकांना वाटते.
असो
ताण घेउ नका. हृदयासाठी चांगला नसतो. ( आता तुमचा इ सी जी बरोबर नाही असे तुम्हीच लिहिलंय म्हणून काळजीमुळे सांगतो)
14 Nov 2024 - 10:13 am | युयुत्सु
"आता तुमचा इ सी जी बरोबर नाही असे तुम्हीच लिहिलंय म्हणून काळजीमुळे सांगतो"
माझा इसीजी ठणठणीत आहे! कारण प्रो-अॅक्टीव्ह उपाय वेळच्यावेळी योजले आहेत. "इ सी जी बरोबर नाही " हा खोडसाळपणा तुमचा आहे, त्यात मला आता नवीन काही नाही.
जे लिहीलेले नाही ते वाचायचे आणि धूळ उडवत बसायचे आणि स्वतःचे हसे करून घ्यायची तुमची घाणेरडी सवय कधी जाणार?
14 Nov 2024 - 10:28 am | सुबोध खरे
हायला
मी स्वत:च्या इसीजीचे स्वत: निदान करून वेळीच हॉस्पिटल गाठले.
मग हॉस्पिटल कशाला गाठले?
भारतीय डॉक्टरांची अक्कल तपासायला कि परदेशी डॉक्टरांना सर्टिफिकेट द्यायला
माझा इसीजी ठणठणीत आहे.
हे वाचून बरं वाटलं.
पण हो हृदय ठणठणीत आहे ना?
the PPV (positive predictive value) of an exercise ECG for patients with stable chest pain and a low pre-test probability of significant coronary artery disease was 28.6%
14 Nov 2024 - 10:34 am | युयुत्सु
"पण हो हृदय ठणठणीत आहे ना?"
तुम्ही माझी काळजी करू नका... तुम्ही तुमचा खोडसाळ पणा चालू ठेवा.
14 Nov 2024 - 10:37 am | युयुत्सु
"भारतीय डॉक्टरांची अक्कल तपासायला कि परदेशी डॉक्टरांना सर्टिफिकेट द्यायला"
विकृत विचार करायची यांची सवय कधी जाणार?
14 Nov 2024 - 10:43 am | सुबोध खरे
मी स्वत:च्या इसीजीचे स्वत: निदान करून वेळीच हॉस्पिटल गाठले.
माझा इसीजी ठणठणीत आहे.
यात सत्य काय?
इ सी जी ठणठणीत आहे मग हॉस्पिटल कशाला गाठले?
याचं उत्तर द्याल का?
14 Nov 2024 - 10:46 am | सुबोध खरे
World-famous yoga guru Sharath Jois dies by heart attack in US at age 53 yesterday,
प्रोऍक्टिव्ह गोष्टी उत्तम असतात पण १०० % सुरक्षित नसतात
यासाठी काळजी वाटते
14 Nov 2024 - 10:47 am | युयुत्सु
<याचं उत्तर द्याल का?>
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
14 Nov 2024 - 11:08 am | सुबोध खरे
हॅ हॅ हॅ
तुमची तब्येत तुम्हीच स्वतः लक्ष घालताय म्हणजे सर्वात उत्तमच असणारच
आम्ही पामर कोण त्यात लक्ष घालणार?
पण तुम्ही हॉस्पिटल मध्ये का गेलात ते समजलं नाही.
म्हणजे नक्की उत्तर नसेल तर राहू द्या.
14 Nov 2024 - 11:18 am | युयुत्सु
पण तुम्ही हॉस्पिटल मध्ये का गेलात ते समजलं नाही.
विकृत विचार करणा-या व्यक्तीकडे कॉमन्सेन्स नसणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्हाला आणखी वैरण टाकू इच्छित नाही. जे झालं त्याला ९-१० वर्षे होऊन गेली आहेत आणि मी स्वतःची काळजी "सर्वज्ञ" रितीने घेतल्याने ठणठणीत आहे.
14 Nov 2024 - 11:27 am | सुबोध खरे
मी स्वत:च्या इसीजीचे स्वत: निदान करून वेळीच हॉस्पिटल गाठले.
जर इ सी जी व्यवस्थित होता तर "निदान" केले म्हणजे काय?
आणि व्यवस्थित नव्हता तर ठणठणीत कसा?
14 Nov 2024 - 11:33 am | युयुत्सु
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
तुमच्या सारख्या खोडसाळ आणि विकृत विचार करणार्या व्यक्तीबरोबर माझ्या तब्येतीची चर्चा करू इच्छित नाही.
14 Nov 2024 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण सर्वसामान्य लेखक वाचकांनी आपण सर्वज्ञ नसलो आणि इतरांसारखे उच्च कोटीचं आकलन वगैरे आणि सर्वज्ञ नसलो तरी, आपण आपल्या सामान्य वकुबाप्रमाणे लिहिते-बोलते राहिले पाहिजे.
तेव्हा,बिंधास्त लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
13 Nov 2024 - 6:58 pm | वामन देशमुख
काहीतरी अजबच!
13 Nov 2024 - 7:25 pm | टर्मीनेटर
डाव्या विचारसरणीच्या लोकांचे सगळे अजबच असते की हो...
😀
13 Nov 2024 - 9:56 pm | वामन देशमुख
टर्मी भौ,
मी ते contentबद्धल लिहिलंय; writerबद्धल नाही. अर्थात, धाग्याच्या आशयाशी मी सहमत नाहीच; पण युयुत्सु हे डाव्या विचारसरणीचे आहेत असे मला तरी वाटत नाही.
---
युयुत्सु यांची आणि माझी विशेषतः शेअर बाजाराबद्धलची मते खूप बऱ्याच अंशी जुळतात. किमान त्यावरुन तरी ते डावे वाटत नाहीत. ते काय ते स्पष्टीकरण देतील अशी अपेक्षा.
13 Nov 2024 - 10:22 pm | टर्मीनेटर
नाही हो... मी थेट त्यांना डावे म्हंटलय, त्यात तुमच्या परसेप्शनचा संबंध नाही... कारण असले मुद्दे कोण काढत असतात आणि का काढत असतात हे आता अजिबात लपुन राहिलेले नाही 😀
ईश्वर कृपेने मला थोडा फावला वेळ मिळो असल्या शेंडा ना बुडखा छाप धागे काढणाऱ्या लोकांना पेलायला...
13 Nov 2024 - 10:30 pm | चंद्रसूर्यकुमार
धागालेखक डावे आहेत का हे मला माहित नाही आणि ते माहित करण्यात अजिबात रस मला नाही. तरीही शेअर बाजारात ट्रेड/इन्व्हेस्ट करत असणारा मनुष्य डावा असू शकत नाही हे गृहितक असेल तर ते चुकीचे आहे. मोठ्या बी-स्कूलच्या कॅम्पसवर अनेक विद्यार्थी डावे असतात. जिथे प्रोफेसरच डावे असतील तिथे विद्यार्थी डावे असले तर आश्चर्य वाटायला नको. सगळे नाही- पण किमान काही तरी. असे विद्यार्थी इन्व्हेस्टमेंट बँकांमध्ये जाऊन क्लाएंटला भांडवल (हो तेच भांडवल ज्याला सगळ्या समस्यांचे मूळ त्या लोकांची विचारसरणी मानते) उभे करायला मदतही करतात. आणि तरीही विचारांनी डावे राहतात. लठ्ठ पगाराचे पॅकेज दिसले की मग विचारसरणी वगैरे जाते तेल लावत. त्यामुळे शेअर बाजारात कोणी असेल तर ती व्यक्ती डावी नाही हे म्हणण्यासाठी गरजेची आणि पुरेशी अट नाही.
13 Nov 2024 - 8:25 pm | चंद्रसूर्यकुमार
पूर्वीचे मिपा असते तर तुमच्या एका अजब शब्दामुळे हा धागा पूर्ण हायजॅक झाला असता. इतके सामर्थ्य त्या शब्दात आहे. उदाहरणार्थ अजब हा शब्द ऐकला की मला लगेच दोन गोष्टी आठवतात- उद्धवा अजब तुझे सरकार हे गाणे आणि ओम शांती ओम या दिपीकाच्या पहिल्या चित्रपटातील- आखोंमे तेरी अजब सी अजब सी... हे गाणे. पूर्वीचे मिपा असते तर कोणीतरी 'युयुत्सु अजब तुझे सरकार' असे काहीतरी विडंबन करून टाकले असते किंवा दिपीकाच्या गाण्यावरून काहीतरी टवाळी केली असती. खरं तर हा धागा तसा हायजॅक व्हावा असे मटेरिअल राखून आहे पण हायजॅक करणारे लोक नाहीत.
आता पूर्वीचे मिपा राहिले नाही असेच उसासे टाकत म्हणावेसे वाटते :)
13 Nov 2024 - 8:43 pm | टर्मीनेटर
पूर्वीचे मिपा राहिले नाही तेच बरे आहे.. तेव्हा मी जर (कल्पना विलास बरं का) जर इथे असतो तर... जाऊदेत चार लोकांत बोलण्या सारखे नाही ते 😀
13 Nov 2024 - 9:56 pm | वामन देशमुख
पूर्वीचे मिपाचे दिवस परत आलेत असे काही अंशी तरी वाटावे म्हणून मी एक धागा काढलाय. बघूया, थोडीफार तरी टवाळकी, मौजमजा मिपाखरे करतीलच.
बाकी, धागे हायजॅक करणे हा पूर्वीपासून चालत आलेला प्रकार काही बंद पडलेला नाहीय.
13 Nov 2024 - 8:01 pm | कंजूस
याबद्दल इंटरनेटवर शोधलं....
तेव्हा
कोणता पदार्थ हवेतला मिथेन शोषून घेतो?
एक प्रकारची माती आहे ती वापरता येईल.
13 Nov 2024 - 8:40 pm | अकिलिज
चंद्राबाबू पण आहेत त्यात. त्यावर बोला काहीतरी.
धागा बर्याच विषयांना हात घालतो. त्या अनुषंगाने बिरुटेसरांनी दखल घेतली असावी.
13 Nov 2024 - 9:52 pm | कर्नलतपस्वी
काही दिवसांपूर्वीच सामंत मनोरंजन करून गेले.
आणी आता.....
सध्याच्या तणावपूर्ण जिवनात मनोरंजन फार महत्वाचे.
13 Nov 2024 - 9:57 pm | महिरावण
मनुष्य दिवसाला अर्धा लिटर पादतो असे संशोधन सांगते. म्हणजे वर्षाला 180 लिटर इतका पाद एक मनुष्य उत्सर्जित करतो. आता जगाची लोकसंख्या 8 अब्ज यापेक्षा अधिक इतकी आहे, तरी आपण ती सध्या 8 अब्जच मानू.
गणित करून बघितल्यास जगाची सर्व लोकसंख्या दरवर्षी1440 अब्ज लिटर इतका वायू केवळ पादून बाहेर टाकत असेल हे पाहून शरमेने आमचे मन भरून गेले आहे. ग्रीनहाऊस गॅसेस वाढवल्याबद्दल मनुष्यावर प्रचंड कर लागला पाहिजे असे आता वाटत आहे.
13 Nov 2024 - 10:25 pm | टर्मीनेटर
लावलाच पाहिजे... अचरटपणा करणे ही फक्त डेन्मार्कची मक्तेदारी नाही... 😀
13 Nov 2024 - 10:01 pm | रानरेडा
गाय आणि म्हैस सारखेच मिथेन उत्सर्जन करीत असेल का ?
13 Nov 2024 - 10:03 pm | महिरावण
तुम्ही रानरेडा असूनही तुम्हाला माहित नाही म्हणजे कमाल आहे.
14 Nov 2024 - 9:45 am | सुबोध खरे
त्यांना आपल्या लाडक्या भुऱ्या म्हशीबद्दल प्रेम आहे
त्यातून त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय.
यावर तुमचे असे वाकडे प्रश्न?
तुम्ही स्वतःला सर्वज्ञ समजताय का ?
14 Nov 2024 - 9:52 am | सुबोध खरे
What can be done to reduce methane emissions?
Researchers are developing ways to reduce methane emissions from cows, including:
Blocking microbes: Researchers are developing tools to block the microbes in a cow's gut from creating methane.
Feed additives and probiotics: Japanese researchers are developing feed additives and probiotics to reduce methane emissions.
Changing diet: Changing a cow's diet might help it release less methane.
Improving productivity: Improving productivity could reduce emissions by 10% to 15% or more.
हे कृत्रिम बुद्धिमत्तेने मिथेन कमी करण्याचे उपाय सुचवलेले आहेत.
पण मुळात मानव हा दांभिक आहे. आम्ही हवे तितके इंधन जाळून उष्णता, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायॉकसाईड, सल्फर डायॉक्साईड निर्माण करणार आणि गायीच्या आहारात बदली करणार तिच्या पोटातील जिवाणू रचना बदलण्याचा प्रयत्न करणार.
हे म्हणजे आम्ही बटर चिकन आणि शाही पनीर माखनी खायचा आणि कॅलरी कमी करण्यासाठी डाएट कोक पिण्यासारखेच आहे.
म्हणतात ना कृत्रिम बुद्धिमत्ता ही नैसर्गिक मूर्खपणा पुढे किस झाड कि पत्ती आहे.
14 Nov 2024 - 10:19 am | गवि
अजून एक उदाहरण.
एटीएम मध्ये पैसे काढताना..
त्या खोलीत भरमसाठ वीज वापरून आणि बाहेर उष्णता फेकत असणारे तिथे बसवलेले एक किंवा दोन एसी. खुद्द ATM यंत्राला लागणारी वीज, हे सर्व मुख्यतः औष्णिक विद्युत प्रकल्पाद्वारे, म्हणजे कोळसा जाळून प्रदूषण. बाहेर बँकेचा ब्रँड ठळक उजळ व्हावा म्हणून लखलखणारा साईन बोर्ड. दिवसरात्र आत दिवे चालू, कॅश आणून त्यात भरण्यासाठी डिझेलच्या गाड्या रोज धूर ओकत रस्त्यांवर फिरवणे अशी सर्व पर्यावरणीय उधळपट्टी करताना तिथेच ग्राहकाकडून काय अपेक्षा असते??..
टीचभर रिसीट मात्र मागू नका, कागदाचा वापर टाळा, त्याद्वारे झाडे वाचवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा असा डोस पाजतात स्क्रीनवर.
14 Nov 2024 - 10:21 am | सुबोध खरे
तुमची डिग्री प्रतिष्ठित विद्यापीठातून आहे का?
नसल्यास असे प्रतिसाद टाकण्याचा तुम्हाला हक्क नाही.
(असल्यास माझा प्रतिसाद मागे घेऊन मी बिनशर्त माफी मागतो)
14 Nov 2024 - 10:03 am | सुबोध खरे
CO2 accounts for about 76 percent of total greenhouse gas emissions. Methane, primarily from agriculture, contributes 16 percent of greenhouse gas emissions and nitrous oxide, mostly from industry and agriculture, contributes 6 percent to global emissions.
During 2019, about 60% (360 million tons) of methane released globally was from human activities, while natural sources contributed about 40% (230 million tons)
Since the Industrial Revolution, concentrations of methane in the atmosphere have more than doubled, and about 20 percent of the warming the planet has experienced can be attributed to the gas.[36] About one-third (33%) of anthropogenic emissions are from gas release during the extraction and delivery of fossil fuels; mostly due to gas venting and gas leaks from both active fossil fuel infrastructure and orphan wells
Aquatic ecosystems, including lakes, rivers, streams, wetlands, and reservoirs, are estimated to contribute between 41% and 53% of the world's methane emissions:
Animal agriculture is a similarly large source (30%); primarily because of enteric fermentation by ruminant livestock such as cattle and sheep.
हे हि वाचून घ्या.
हा विषय इतका प्रचंड आणि विस्तृत आहे.
समुद्रकिनाऱ्यावर एक सुंदर शिंपला मिळाल्यावर एखाद्या मुलाला असा वाटतं कि जगातील सर्वात सुंदर भेटवस्तू आपल्याकडेच आहे ती कुणाकडेच नाही.
14 Nov 2024 - 11:14 am | कंजूस
गोठ्यामध्ये गायींना डांबून, गवत आणि त्याज्य पदार्थ ( अभक्षण मांसाहारसुद्धा खायला घालतात अमैरिकेत असं वाचलं आहे) खायला घालून, शिवाय दूध वाढवायची इंजेक्शने देऊन त्यांचं एक यंत्र करून मिथेन वाढवत असतील. मग रानात फिरून चरणाऱ्या गायीचं दूध चौपट महाग विकतात. हे मात्र सांगता नाहीत.
14 Nov 2024 - 11:08 am | कंजूस
Us च्या गायींना अपचन होते असेल आणि गॅसेस फार होत असतील.
आता पुराणात शोध घ्यायचा तर गाय मुखाकडून अपवित्र आणि पुच्छाडून पवित्र समजतात. म्हणजे तिथपर्यंत मिथेन पोहोचत नसावा.
14 Nov 2024 - 11:12 am | सुबोध खरे
Cattle and other ruminant animals account for about 4% of U.S. greenhouse gas emissions, according to the U.S. Environment Protection Agency (EPA).
In comparison, our transportation system — including cars, planes and more — accounts for more than 25.3 percent of U.S. greenhouse gas emissions.
Even extreme dietary changes — such as switching to a vegan, all-plant diet — won’t have much impact on climate change and global temperatures, Place explains.
Research shows that removing all livestock and poultry from the U.S. food system would only reduce global greenhouse gas emissions by 0.36%, she notes.