माझे संशोधन/अविष्कार - WD-40 सारखा spray!

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
3 Nov 2024 - 1:20 pm

नमस्कार मिपाकर,
सरळ मुद्द्यावर येतो. मला फार पुर्वीपासुन म्हणजे २००६, २००७ पासुन रसायनशास्त्रात पी.एचडी करायची होती. फास्ट फोर्वर्ड....ईन शोर्ट, मी खुप हातपाय मारुन मल हव्या त्या मेन्टर(रीसर्च गाईड) कडे त्या लॅबमध्ये प्रवेश ही मिळवला. परत, फास्ट फोर्वर्ड....घाणेरडे अंतर्गत राजकारण, खालच्या दर्जाचे, 'संशोधन' ह्या शब्दाला फाट्यावर मारणारे सो कॉल्ड वैज्ञानिक, नावडता विषय बदलुन न मिळणे, फेलोशिपचे फॉर्म भरुनही, पैसे नावाच साट पण न देणे ह्यामुळे मी १४ ते १५ महीन्यांनी पी.एचडीच्या सर्व स्वप्नांना पुर्णविराम दीला. व तो आध्याय बंद केला.
पण......रसायनशास्त्र हे माझे प्रेम आहे, निर्जीव गोष्टी कधी धोका नाही देत. माझे केमिस्ट्रीचे ज्ञान हे वर्षानु वर्षे तसेच राहीले व वाढतही गेले. आता अजुन शिकायला जास्त काही नाही, असही वाटायला लागल. ते असो. तर मध्ये मला 'एकिकडुन'(ईथे त्या माध्यमाचे नाव मी लिहु ईच्छीत नाही) मला खालील प्रकराचा व्हीडीओ पाठवला गेला. तो व्हिडिओ WD-40 ह्या ख्यातनाम स्प्रेचा होता व मी अगदी सेम स्प्रे 'शोधुन' काढणे अपेक्षित होते. मला साधी सायकल ही चालवता येत नाही, २००३ पासुन काही कारणाने मी बाईक, स्कुटर चालवणे बंद केले आहे. तर मला WD-40 नावाचा स्प्रे असतो हे माहीतीही नव्हते व मी कधी साधे ऐकले ही नव्हते.

https://www.youtube.com/watch?v=QLrtS0dtOn8

युट्युबवर असे खुप व्हीडीओज आहेत, खुप विविध भाषेंमध्ये आहेत. हा एक अत्यंत प्रभावी व तितकाच प्रसिध्द (जगविख्यात) स्प्रे आहे, हे मला नंतर समजले. WD-40 : Water Displacement, 40 means it was the inventor's 40th trail/attempt to reach to this perticular formulation.

ते असो, तर ते सेम formulation मी स्वःता तयार केले आहे. मला जवळजवळ एक महीना लागला. ते formulation मी त्या क्लाईंटला विकले सुध्द्दा, त्यांनी ते अक्सेप्ट केले सुध्दा, त्यांनी मी पाठवलेले सॅपल ट्राय केले सुध्दा, आणि आता बल्क मध्ये बनवत असतील सुध्दा. कोणती कंपनी, काय ब्रँडखाली सर्व चालु आहे, मला काहीही माहीती नाही. हा एक सब-कॉन्ट्रॅक्ट होता.

मी तयार केलेल्या formulation चे डेमो दाखवणारे व्हिडीओज खाली देत आहे.

https://www.youtube.com/shorts/JFRevtUpzO0

https://www.youtube.com/watch?v=1M9LmtuurDQ

https://www.youtube.com/watch?v=GZxwF_RrYxo

https://www.youtube.com/watch?v=0usxamOEQxs

https://www.youtube.com/watch?v=YipxUwp7Jq4&t=7s

मला हा स्प्रे म्हणजे पुर्ण formulation शोधुन काढेपर्यंत खुप मानसिक ताण व ईतर शारीरीक ताण, तंतोतंत तेच केमिकल्स ईथे राहुन मिळवणे व ते आणणे वगैरे खुप त्रास झाला. पण रीझल्ट आवडलाही. सर्वात महत्वाचे की ते formulation त्या क्लाईंटने ट्राय करुन स्विकारले सुध्दा.

माझा हा लेख ईथे लिहण्याचा उद्देश :

मला हाच स्प्रे मार्केटमध्ये माझा स्वःताचा प्रोडक्ट म्हणुन launch करायचा आहे. मी NDA साईन नव्हते केले, तर तो काही प्रॉब्लम नाही. मला ह्या प्रॉडक्टची कॉस्ट कटींग कशी करायची ह्याचे पुर्ण ज्ञान आहे. खुप कॉस्ट कटींग शक्य आहे. मार्केट मध्ये विकताना डिस्ट्रीब्युशन नेटवर्क व तत्सम ज्ञान सोप्पे आहे. ते असो.

मला ईथल्या माहीतीगारांकडुन खालील माहीती हवी आहे :

१) मला ह्या प्रोडक्ट साठी 'फंडींग' चे कुठले पर्याय आहेत? माझे लक्ष ७ ते १० लाख रुपये आहे. प्रत्येक युनिट सेल मागे ४५% प्रॉफीट असेल. ते पुर्ण वेगळे कॅल्क्युलेशन आहे, ते ईथे स्पष्ट करण्यात अर्थ नाही.

२) प्रायव्हेट कींवा सरकारी, प्रयत्न हमखास यशस्वी होतील, अश्या कुठल्या योजनेचा फायदा होऊ शकेल का? अश्या योजना आपल्या माहीतीत आहेत का?

३) एखादी संस्था कींवा व्यक्ती ह्या formulation मध्ये ईंटरेस्ट घेऊन भांडवल उपलब्ध करुन देऊ शकतो का, मी % प्रॉफीट ठरवायला तयार आहे.

तर मला क्रूपया ह्या बाबतीत मार्गदर्शन/मदत अपेक्षित आहे. धन्यवाद.

तंत्रप्रकटन

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

4 Nov 2024 - 10:51 pm | कानडाऊ योगेशु

एम.एस.एम.ई ह्या वेबसाईट वर जाऊन पाहा.सरकार अश्या उद्योगांना प्रोत्साहन देते.

शानबा५१२'s picture

5 Nov 2024 - 7:40 pm | शानबा५१२

मुद्रा लोन वगैरे मिळणे खुप कठीण वाटते. ते प्रत्येकाला सहज उपलब्ध नाही होत, व काहींना फक्त मागयाचा उशीर व मिळते.

सुरुवातीचा थोडाफार सेल, किमान जुजबी, सुरू करून आणि आपले सर्व आकडे चोख तोंडपाठ करून मग शार्क टँक (इंडिया) कार्यक्रमासाठी प्रवेश अर्ज दाखल करा. नशीब जोरावर असेल तर प्रवेश आणि फंडिंग दोन्ही तिथून मिळेल, शिवाय सुरुवातीची प्रसिद्धी आणि उठाव देखील मिळेल. अर्थात अगदीच शून्य स्थितीत, प्री रेव्हेन्यू असताना गेल्यास फारसे बरे डील होणे अवघड. आधी सुरुवात करून काही रेव्हेन्यू / प्रगती दाखवावी लागेल. शार्क टँक एन्ट्री प्रक्रियेबद्दल मला माहिती नाही. मी फक्त तो शो नियमित बघत असतो इतकेच. ऑनलाईन माहिती मिळवावी लागेल.

अभिनंदन आणि शुभेच्छा.

शानबा५१२'s picture

5 Nov 2024 - 7:33 pm | शानबा५१२

" मी गेलो होतो, ५० लाख फंडीग मिळाली, पीच खुप जबरदस्त दीले होते, तयारीही तशीच केली होती,......चेक दीला.....माझ्या भावना अनावर झाल्या.."..........सर्व स्वप्नात!
मला ही ह्या शोची खुप आवड आहे, स्क्रीप्टेड असावे. पण ते जेव्हा 'रीवर्स ईनजिंईरींग' सारखे शब्द वापरतात व त्याचा अर्थ समजतो तेव्हा त्या शोचे महत्व वाढते. थोडक्यात माझी मागणी खुप छोटी आहे, त्या शो मध्ये जाण्याएवढे हे प्रोडक्ट लायक आहे, हे नक्की. Product means 'that specific formulation'.

मन्युफॅक्चरींग अगोदर आणि नंतर विक्री असा उलटा मार्ग का निवडला?

कोणत्या मार्केटमध्ये खप किती आणि तसा प्रॉडक्ट कोण पुरवतो हे माहीत व्हायला हवे.

मन्युफॅक्चरींग अगोदर आणि नंतर विक्री असा उलटा मार्ग का निवडला?

- सॉरी पण मला हे नाही समजले. manufacture करुन नंतरच विक्री करणार ना? अपल्या बोलण्याचा अर्थ असा आहे की, आधी मार्केट शोधा, डीस्ट्रीब्युशन नेट्वर्क बनवा व नंतर manufacture करा, तर हो ते लक्षात/ध्यानात ठेवले आहे.

कोणत्या मार्केटमध्ये खप किती आणि तसा प्रॉडक्ट कोण पुरवतो हे माहीत व्हायला हवे.

डीस्ट्रीब्युशन नेट्वर्क आणि ईतर स्पर्धकांची प्राईस पर युनीट हा आभ्यास केला आहे. माझा फोकस 'फर्स्ट स्टार्ट सेलिंग नंतर........ कॉस्ट कटींग ईन फ्युचर' वर आहे.