माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
14 May 2009 - 12:10 am

राम राम मंडळी,

आजपर्यंत गाण्याबजावण्याच्या दुनियेत खूप मुशाफिरी केली. ती करत असताना अनेक जुनी-दुर्मिळ ध्वनिमुद्रणे, इतिहासाची साक्षिदार असलेली जुनी-दुर्मिळ प्रकाशचित्रे माझ्या संग्रही जमा होत गेली. त्यातली काही प्रकशचित्रे आज इथे देत आहे. ह्या प्रकाशचित्रांचे श्रेय त्या सर्व अज्ञात प्रकाशचित्रकारांना. परंतु त्यावरील शीर्षके-शब्दांकन-टिप्पणी अर्थातच तात्या अभ्यंकरांची..!

१) ॐ भास्कराय नम:
पं भास्करबुवा बखले. संगीताच्या दुनियेत खरोखरच ज्याला भास्कर म्हणावं असा गवई, उतम गुरू. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर या तीन घराण्यांवर हुकुमत. स्वयंवर नाटकात 'नाथ हा माझा', 'स्वकुल तारक सुता', 'सुजन कसा मन चोरी' या सारखी एकापेक्षा एक सुरेख पद देणारा एक खूप महान कलाकार, महान संगीत दिग्दर्शक. आणि मास्तर कृष्णराव, नारायणराव बालगंधर्व यांसारखे शिष्योत्तम घडवणारा एक महान गुरू! भास्करबुवंना सलाम..!

-----------------------------------------------------------------------------------------------

२) रसिला आग्रेवाला!
उस्ताद विलायत हुसेन खासाहेब! आग्रा गायकीचा एक रसिला, रंगीला गवई. एक उत्तम बंदिशकार. आत्ता हे लिहीत असतांना खासाहेबांनी गायलेली 'पवन चलत..' ही परज रागातील बंदिश कानात रुंजी घालत आहे. मस्तच गायचे खासाहेब! :)

-----------------------------------------------------------------------------------------------

३) राजकल्याणाचा बादशहा!
वसंतराव! खास मुडात दिसत आहेत :)
सुरालयीवर जबर हुकुमत असलेला कलाकार. माणूस म्हणूनही तेवढाच जिंदादिल आणि उमदा..!

-----------------------------------------------------------------------------------------------

४) उड जाएगा हंस अकेला..!
कुमार गंधर्व! एक प्रयोगशील आणि विलक्षण प्रतिभावान कलाकार. पारंपारिक घराणेदार गायकीपेक्षा संपूर्णपणे वेगळी अशी स्वत:ची गायकी निर्माण करणारा कलाकार! कबीर, सुरदास आणि मीरेची निर्गुणी भजनं आपल्या चालीत, आपल्या ढंगात गाऊन श्रोत्यांना अंतर्मुख करणारा कलाकार!

कुमारांची मैफल सुरू आहे आणि तालालयीचा बादशहा वसंतखा देशपांडे प्रेमाने, आदराने आपल्या मित्राकरता तबल्याच्या ठेक्याला बसला आहे! संवादिनीच्या साथीला आमचे आप्पा जळगावकर आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------

५) गुणीदास!
पं जगन्नाथबुवा पुरोहित. आमच्या जगन्नाथबुवांबदल काय बोलू? एक आभाळाइतका मोठा माणूस! आग्रा गायकीतली अधिकारी व्यक्ति. स्वत: अतिशय उत्तम बंदिशकार. अतिशय श्रवणीय व गेय अश्या रचना असत जगन्नाथबुवांच्या. जोगकंसासारख्या एका अप्रतीम रागशिल्पाची निर्मिती! एक फार मोठा गुरू. संगीतभूषण पं रामभाऊ मराठे, पं यशवंतबुवा जोशी, माणिक वर्मा, पं जितेंद्र अभिषेकी, पं भाई गायतोंडे अशी जगन्नाथबुवांची शिष्य परंपरा पाहिली की बुवा ही किती असामान्य आसामी आहे हे लक्षात यावं! इतका मोठा गुरू की अभिषेकीबुवा सकाळी सातला तालमीला यायचे असले की बुवा पावणेसातलाच स्वत: सतरंजी वगैरे घालून, तानपुरे गवसणीतून काढून सिद्ध रहात. स्वयंपाक तर अतिशय उत्तम करायचे असे आम्हाला माणिकताई सांगायच्या!

जगन्नाथबुवांना माझा साष्टांग दंडवत!

-----------------------------------------------------------------------------------------------

६) भारतरत्न!
उस्ताद अब्दुल करीम खासाहेबांची झिंजोटी रागातली 'पिया बिन नाही आवत चैन' ही थाळी ऐकली आणि आपल्याला गाणं यायला हवं ते असंच सुरेल यायला हवं असा ध्यास घेऊन जगाची काहीही माहिती नसतांना वयाच्या दहाव्या वर्षी एक ध्येयवेडा मुलगा घरातून पळाला. गाणं शिकण्याकरता गुरुच्या शोधार्थ वणवण फिरला. पहाडी सन्यालच्या घरी हरकाम्या नोकरापासून ते अनेक गुणीजनांकडे कष्ट उपसले, अनेकानेक दिवस उपासमार सहन केली. ग्वाल्हेर, रामपूर, बनारस, लखनऊ, इत्यादी उत्तर हिंदुस्थानातल्या अनेक ठिकाणी उमेदवारी केली, जिथे जे मिळेल ते वेचलं. अखेर कुंदगोळात गुरू सापडला. सवाईंच्या छत्रछायेखाली किराणा गायकीची तालीम सुरू झाली. सवाईंकडेही कष्टाचे डोंगर उपसले तेही मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने! पुण्यात १९४६ साली हिराबागेतल्या जाहीर मैफलीत लोकांनी प्रथमच भीमसेनी स्वर ऐकला. तेव्हापासून आजवर अण्णा गाताहेत आणि लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकताहेत हेच घडत आलेलं आहे! सारे स्वर, सार्‍या शृती हात जोडून पुढ्यात उभ्या! सारी सारी विशेषणं, पदव्या, बिरुदं कमी पडावीत असं दैवी गाणं! नादब्रह्माचा साक्षात्कार!

अगदी तरूण वयातले अण्णा आकशवाणीकरता गातांना-

त्यांची आवडती काका हलवायाकडची साजूक तुपातली जिलेबी घेऊन घरी गेलो होतो. पायांवर डोकं ठेवलं. तो थरथरता हात माझ्या डोक्यावर स्थिरावला! "अण्णा, आपल्याला भारतरत्न मिळालं हे ऐकून अतिशय आनंद वाटला!" असं म्हटलं. तर आमचे अण्णा इतके साधे आणि मिश्किल, की ते एवढंच म्हणाले, "हम्म! भारतरत्न मिळालं खरं! वयाच्या १० व्या वर्षी घरतून पळून गेलो होतो ते अगदीच काही वाया नाही गेलं म्हणायचं इतकंच!" :)

-- तात्या अभ्यंकर.

अजूनही पुष्कळशी प्रकाशचित्रे आहेत त्याबाबत पुन्हा कधितरी! :)

कलाछायाचित्रणमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

विकास's picture

14 May 2009 - 1:07 am | विकास

एकदम झकास फोटू आहेत! विशेष करून पं. वसंतरावांचा फोटो एकदम भारदस्त आहे. तर भिमसेनांना तरूण वयातले पहाताना एकदम वेगळेच वाटले!

समिधा's picture

14 May 2009 - 1:15 am | समिधा

खुपच छान फोटो आहेत आणि आमच्या साठी हे फोटो दुर्मिळच आहे.
आणी प्रत्येक फोटोचे केलेले शब्दांकन तर उत्तमच. =D>

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

यशोधरा's picture

14 May 2009 - 1:15 am | यशोधरा

सही आहेत प्रकाशचित्रं!

केशवसुमार's picture

14 May 2009 - 1:18 am | केशवसुमार

तात्याशेठ
एकदम दुर्मिळ प्रकाशचित्रे.. आणि खुसखुशीत माहिती..
(वाचक)केशवसुमार

बहुगुणी's picture

14 May 2009 - 1:19 am | बहुगुणी

प्रकाशचित्रे उत्तमच, आणि आपण हा दुर्मिळ ठेवा जपलात हेही कौतुकास पात्र. परंतु त्यांवरील 'शीर्षके-शब्दांकन-टिप्पणी' ही देखील अगदी साजेशी. धन्यवाद!

प्राजु's picture

14 May 2009 - 1:46 am | प्राजु

फोटो आणि माहिती दोन्ही छान. उत्तम!!
अनमोल ठेवा आहे हा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वाटाड्या...'s picture

14 May 2009 - 4:36 am | वाटाड्या...

गुरुजनांना साष्टांग दंडवत....

त्यांच्या पायाची धूळ जरी होऊ शकलो तरी जन्म सार्थकी लागला असं म्हणावं अशी "माणसं"...कुमारांच्या साथीला असलेले वसंतराव किती वेगळे दिसत आहेत. आजच उस्ताद अब्दुल करीम खासाहेबांची झिंजोटी रागातली १९०५ सालातली एक चिज ऐकली, शब्द अजुन जुळवतोय, पण करीम खांसाहेबांचा आवाज अतिशय मृदु म्हणावा असाच. अण्णांच तर न बोलण्या पलिकडचं गाणं.

चित्र सुंदर. तात्या बर्‍याच दिवसात असा एखादा लेख आला नाही असं राहुन राहुन वाटु लागलं आहे.

वाटाड्या...

घाटावरचे भट's picture

14 May 2009 - 5:24 am | घाटावरचे भट

मस्त!!

अवलिया's picture

14 May 2009 - 6:31 am | अवलिया

वा ! सुरेख !!

--अवलिया

सहज's picture

14 May 2009 - 6:43 am | सहज

मस्त!

तात्या वरील प्रत्येक दिग्गजाची तुमची आवडती एक ध्वनिफीत असा दुवा दिला असतात तर अजुन मजा आली असती. :-)

स्वाती दिनेश's picture

14 May 2009 - 11:15 am | स्वाती दिनेश

तात्या वरील प्रत्येक दिग्गजाची तुमची आवडती एक ध्वनिफीत असा दुवा दिला असतात तर अजुन मजा आली असती.
सहजरावांशी सहमत आहे,:)
स्वाती

चन्द्रशेखर गोखले's picture

14 May 2009 - 7:08 am | चन्द्रशेखर गोखले

तात्या , हि दुर्मिळ प्रकाशचित्रे दाखवुन एक वेगळाच आनंद मिळाला. गायन क्षेत्रातील आपली मुशाफिरी हि अवर्णनीय अशी आहे. आपली गाण्यावरची निष्ठा, प्रेम ठायी ठायी जाणवत रहाते. या गंधर्व कलेचा आपला अभ्यास याची साक्ष देतो ! आपला प्रत्येक लेख वाचनीय तर असतोच पण तो मनाला एक सात्विक आनंद देतो. जेष्ठ कवि कुसुमाग्रजांवरील लेख सुद्धा खूप आवडला . आपले अभिनंदन !!

प्राची's picture

14 May 2009 - 7:19 am | प्राची

तात्या,खूपच छान. =D>

नीलकांत's picture

14 May 2009 - 8:10 am | नीलकांत

झकास चित्रे आहेत. ज्या लोकांचा उल्लेख वारंवार होतो त्या लोकांना बघायला मिळाले. छान ठेवा दिलात तात्या.

- नीलकांत

ऋषिकेश's picture

14 May 2009 - 9:11 am | ऋषिकेश

झकास चित्रे आहेत. ज्या लोकांचा उल्लेख वारंवार होतो त्या लोकांना बघायला मिळाले. छान ठेवा दिलात तात्या.

असेच म्हणतो

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 8:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख फोटो आणि सुरेख माहिती !

-दिलीप बिरुटे

दिपक's picture

14 May 2009 - 9:14 am | दिपक

हेच म्हणतो
धन्यवाद तात्या.

राघव's picture

14 May 2009 - 9:33 am | राघव

फ़ोटू आणि माहिती दोन्ही छान!
भास्करबुवांची एकही साधी रेकॊर्ड नाही हे पुलंनी लिहिलेले वाचून खूप वाईट वाटले होते. पण बाकीचे कधी कधी ऐकत असतो. जास्त समजत नाही संगीतातले पण सूर आवडतात.

राघव

श्रीयुत संतोष जोशी's picture

14 May 2009 - 9:48 am | श्रीयुत संतोष जोशी

तात्या,
वर्णन करायला शब्द नाहीत......
पण तरीही
" केवळ अप्रतिम "

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

अनंता's picture

14 May 2009 - 9:54 am | अनंता

आपण सांस्कृतीकदृष्ट्या किती श्रीमंत आहात, ते पुन: अनुभवले.
मान्यवरांचे सचित्र वर्णन आवडले. पुढल्या वेळेस दुवे द्यायला विसरू नका!!

स्मिता श्रीपाद's picture

14 May 2009 - 11:19 am | स्मिता श्रीपाद

सुरेख फोटो..सुरेख शब्दांकन...

-स्मिता

परिकथेतील राजकुमार's picture

14 May 2009 - 11:39 am | परिकथेतील राजकुमार

तात्या फोटो आणी माहिती अगदी झपाटुन टाकणारी.
हा अनमोल खजीना आमच्यासमोर आणल्याबद्दल धन्यवाद.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सुमीत भातखंडे's picture

14 May 2009 - 11:46 am | सुमीत भातखंडे

निव्वळ अप्रतिम.
दुसरे शब्दच नाहीच.

हा अनमोल खजीना आमच्यासमोर आणल्याबद्दल धन्यवाद.

असेच म्हणतो.
मनापासून धन्यवाद.

रामदास's picture

14 May 2009 - 11:48 am | रामदास

माहीती आणि फोटो दोन्हीचा छान मेळ घातला आहे.
आभारी आहे.

नंदन's picture

14 May 2009 - 11:52 am | नंदन

आहे, मुखपृष्ठावरच्या जलशाच्या जाहिरातीही मस्तच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शिप्रा's picture

14 May 2009 - 11:50 am | शिप्रा

दुर्मिळ प्रकाशचित्रे दाखवल्याबद्दल धन्यवाद्..पण त्याबरोबरचे शब्दांकन पण सुंदर आहे ..

अनाडि's picture

14 May 2009 - 12:09 pm | अनाडि

हेच म्हणतो,
उत्तम छायाचित्रे. अजून येउ द्यात.

अनाडि
(अब्दुल नारायण डिसुझा)

सुमीत भातखंडे's picture

14 May 2009 - 1:11 pm | सुमीत भातखंडे

अजून काही छायाचित्रं:

१) हिराबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाइ राणे
Hirabai - Saraswatibai

२) बडे गुलाम अली खान
bade gulam ali khan

३) मास्टर कृष्णराव
master krishnarao

४) भास्करबुवा बखले

एका मैफीलीत घेतलेलं छायाचित्रं. सगळ्यात उजव्या बाजूला लोकमान्य टिळक बसले आहेत.

५) वसंतराव देशपांडे यांची आणखी एक भावमुद्रा:
vasantrao deshpande

६) चिदानंद नगरकर (तबल्यावर उस्ताद अल्लारखाँ)

लिखाळ's picture

14 May 2009 - 3:16 pm | लिखाळ

सुमीतराव,
चित्रे आवडली.

चवथ्या चित्रात टिळकांच्या दिशेला दोघे तिघे मान वळवून पाहत असल्याने टिळक कोठे आहेत ते ओळखणे सोपे गेले :)
यावरुन 'दोन्-तीन सारख्या दिसणार्‍या, एकसारखाच पोषख केलेल्या माणसांत खरा राजा कोण' ते बिरबल (की तेनालीराम?) कसा ओळखतो त्या कथेची आठवण झाली :)
-- लिखाळ.

सुमीत भातखंडे's picture

15 May 2009 - 12:24 pm | सुमीत भातखंडे

चवथ्या चित्रात टिळकांच्या दिशेला दोघे तिघे मान वळवून पाहत असल्याने टिळक कोठे आहेत ते ओळखणे सोपे गेले

खरच. माझ्या आधी लक्षात नव्हतं आलं. दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

चतुरंग's picture

14 May 2009 - 7:23 pm | चतुरंग

लोकमान्यांचे मैफिलीतले चित्र अत्यंत दुर्मिळच!
हा खजिना खुला केल्याबद्दल अनेक धन्यवाद! :)

चतुरंग

सुमीत भातखंडे's picture

15 May 2009 - 12:29 pm | सुमीत भातखंडे

खरंय काका.
लोकमान्यांच्या चित्रात तर १-१०-१६ ही तारिख पण स्पष्ट दिसत्ये.

क्रान्ति's picture

14 May 2009 - 2:45 pm | क्रान्ति

सगळी छायाचित्रे [प्रतिसादातली पण] आणि माहिती हा अत्यंत अनमोल खजिना आहे! तो सांभाळून ठेवून आमच्यापर्यंत पोहोचविणा-यांना धन्यवाद.
:) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

दिपक's picture

14 May 2009 - 3:07 pm | दिपक

वसंतराव आणि पु.ल.

लिखाळ's picture

14 May 2009 - 3:11 pm | लिखाळ

वा !
तात्या, दुर्मिळ चित्रे आणि आपली त्यावरची टिप्पणी..दोन्ही खास !
चित्रांबद्दल आभार.
-- लिखाळ.

शाल्मली's picture

14 May 2009 - 3:19 pm | शाल्मली

तात्या, दुर्मिळ चित्रे आणि आपली त्यावरची टिप्पणी..दोन्ही खास !
चित्रांबद्दल आभार.

असंच म्हणते.
वसंतरावांचे चित्र फारच खास!

सुमीत भातखंडे यांनी दिलेली चित्रेही छान आहेत.

--शाल्मली.

सुमीत's picture

14 May 2009 - 4:02 pm | सुमीत

तात्या, परत एकदा अशी दुर्मिळ छायाचित्रे दाखवून आणि थोडी तुमच्या आठवणितली माहिती सांगून खूष केलेत.

वसंतखांचा मुडातला फोटू काळजाच्या तारा छेडून गेला! अतिशय प्रसन्न भावमुद्रा!
पहिल्या फोटोत बुवांच्या चेहेर्‍यावरचा करारीपणा नजरेत भरण्याजोगा!
सर्वच चित्रे अमूल्य. :)

चतुरंग

यशोधरा's picture

14 May 2009 - 9:40 pm | यशोधरा

सुमीत भातखंड्यांनी येथे प्रकाशित केलेली छायाचित्रेही अमूल्य आहेत!

शशिधर केळकर's picture

14 May 2009 - 11:48 pm | शशिधर केळकर

तात्या हा दुवा अतिशय सुंदर आहे. 'जतन करण्याचे पान' आहे.
तुम्ही लिहिलेली माहिती थोडक्यात पण सजवणारी खुलवणारी आहे.
काहीना आयुष्यात नशीबाने खूप काही मिळते. ते मिळाले हे कळणे, त्यावर भाळणे, स्वतः त्या आनंदात डुंबून मग इतरांनाही त्यात सहभागी करून घेणे - सगळेच विलक्षण. या प्रत्येक एकेका पायरीवर माणसाची श्रेष्ठ गुणवत्ता वाढत जाते! तुमच्याबद्दल तसे वाटले.
तुम्ही मागे एकदा गोविंदरावांचे हार्मोनियम ऐकवले होते दुर्मिळ दुवा देऊन. पुढे कधी त्या धर्तीवर लिहिले नाहीत. बहुतेक 'पंचवार्षिक योजना' दिसते!

विसोबा खेचर's picture

15 May 2009 - 12:15 am | विसोबा खेचर

काहीना आयुष्यात नशीबाने खूप काही मिळते. ते मिळाले हे कळणे, त्यावर भाळणे,

लाख बोललात केळकरसाहेब. जे मिळाले त्यावर भाळणे महत्वाचे..!

स्वतः त्या आनंदात डुंबून मग इतरांनाही त्यात सहभागी करून घेणे

हा गुण माझा नव्हे. तो मी माझे गुरुजी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्याकडून शिकलो. ते मला एकदा म्हणाले होते, 'बाबारे, तुला जे भावेल, आवडेल,रुचेल, ते तुझ्या परिने जगालाही सांग. अगदी हातचं काहीही राखून न ठेवता..!'

प्रत्येक एकेका पायरीवर माणसाची श्रेष्ठ गुणवत्ता वाढत जाते! तुमच्याबद्दल तसे वाटले.

मनापासून धन्यवाद केळकरशेठ. आजवर खूप भन्नाट आयुष्य जगलो. तेही अगदी भरपूर आणि मनमुराद. मग एखादं छानसं गाणं असो, की जीव ओवाळून टाकावी अशी कांद्याची भजी असोत, की इंदौर-उज्जैनीची रबडी असो, की एखादी मनमोहक, चित्ताकर्षक ललना असो! मी भाळलो नाही असं कधी झालं नाही!

अर्थात, ललनेच्या बाबतीत बेताबेताने आणि मनातल्या मनात भाळलो हे वेगळं सांगायला नको! ;)

तुम्ही मागे एकदा गोविंदरावांचे हार्मोनियम ऐकवले होते दुर्मिळ दुवा देऊन. पुढे कधी त्या धर्तीवर लिहिले नाहीत. बहुतेक 'पंचवार्षिक योजना' दिसते!

अहो तसं नाही. अलिकडे बर्‍याच दिसांनंतर टाईम भेटला. अजूनही माझ्या संग्रही अनेक दिग्गजांची खूप काही दुर्मिळ ध्वनिमुद्रणे आहेत. इतकी, की त्यावर जर लिहू लागलो तर कित्येक लेख व्हावेत. यात जराही अतिशोयोक्ति नाही. अहो आजपर्यंत ऐकलेल्या नानाविध मैफली, त्यांच्या आठवणी आणि इथून-तिथून जमवलेली एकसे एक दुर्मिळ ध्वनिमुद्रणे एवढीच काय ती या तात्याची आयुष्यातली कमाई आहे. मात्र ती आयुष्यभर पुरेल हे नि:संशय!

आपला,
(भाईकाकांचा शिष्य) तात्या.

विसोबा खेचर's picture

15 May 2009 - 12:32 pm | विसोबा खेचर

एक निवेदन--

मिपाच्या मुखपृष्ठावर येणार्‍या फळं, सँडचिचं किंवा अन्य तत्सम पदार्थ खाणार्‍या बायकांची प्रकाशचित्रेदेखील माझ्या संग्रहातीलच आहेत याची नोंद घ्यावी..

निवेदन संपले! :)

तात्या.

चिगो's picture

9 Feb 2011 - 7:30 pm | चिगो

उपकृत आहे तात्या...
मनापासून आभार..