अवयव दान

टीपीके's picture
टीपीके in जनातलं, मनातलं
20 Sep 2024 - 10:10 am

गेले दोन आठवडे वडिलांच्या आजारपणामुळे ICU बाहेर वेळ काढणे चालू आहे. इथे माझ्यासारखे अनेक नातेवाईक बाहेर बसलेले आहेत. इथे अनेक जण आपल्या आप्तांसाठी कोणी अवयव दाता मिळेल का याची वाट बघत, आशेवर बसलेले आहेत. या वेळात काहींचे आप्त दाता भेटल्याने बरे होउन घरी जाताना, तर काहींचा दात्यची वाट बघता बघता मृत्यू होताना, तर काहींसाठी वाट बघताना जे उपचार द्यावे लागतात त्या मधे पैशांचा प्रचंड चुराडा होताना बघतो आहे. काही लोकं पर राज्यतून येउन महिनोंमहीने दात्याची वाट बघत आहेत.

माणूस जिवंतपणी सुद्धा आणि मेल्यावर पण अवयव दान करू शकतो.

दान

ऑगस्ट २०२३ च्या महितीप्रमाणे सुमारे ३ लाख रूग्ण अवयव दात्याची वाट बघत आहेत. भारतात रोज सुमारे २६ हजार मृत्यू होतात. फक्त ३ % लोकांनी जरी अवयव दान केले तरी अनेक रुग्णांची आणि कुटुंबांची आपण त्रासातून आपण सुटका करू शकतो.

भारतात सुमारे ३० लाख लोकं डोळ्यांच्या दात्याची वाट बघत आहेत, त्यातील सुमारे ६० % रुग्ण १२ वर्षाखालील आहेत.

आपण अनेक वेळा बातम्या, चित्रपटांमधून अवयव तस्करांबद्दल ऐकतो. मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमूळे तस्करीचा आणि गुन्हेगारीचा जन्म होतो आणि अनेक गरीब, असहाय्य लोकांचा यात बळी पडतो. जर पुरेश्या लोकांनी अवयव दान केले तर समाजातली ही घाणही स्वच्छ होऊ शकते.

भारतात आता अवयव दान खुप सोपे झाले आहे. तुम्ही या (https://notto.abdm.gov.in/) संकेत स्थळावर जाऊन तुम्हाला जे अवयव दान करायचे आहेत त्याची सहजपणे नोंदणी करू शकता.

आपल्या मिसळपाववर अनेक डॉक्टर्स आहेत, वरील माहीतीत काही चुका असतील तर कृपया दाखवून द्या किंवा जमल्यास भरही टाका.

मी अवयव दानासाठी नोंदणी केली आहे, या लेखातून (किंवा इतरही काही कारणाने) आपण प्रेरणा घेउन नोंदणी केली असल्यास नक्की सांगा आणि इतरांनाही प्रेरीत करा. इतरांना प्रेरीत करण्यासाठी काही कल्पना असतील तर त्याही सुचवा. (Can there be a widget, badge in social media profiles which can indicate registered organ donor which people can flaunt?)

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एकाने सांगितले की रुग्णाचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक बोलावतात. यांची इच्छा होती डोळे द्यायची. त्याप्रमाणे जाऊन घेऊन येतो. पण काही उपयोग होत नाही.
इथे डोळ्यांसाठी सात दिवसांचा अवधी दिला आहे. तर काय अडचण येत असावी. वयाचा प्रश्न येत असावा. डोळ्यांचा चित्र दिसणारा पडदा(रेटिना) बदलता येत असेल तरच दृष्टी येते. पण ते अशक्य असावे. बाकी खोटा डोळा लावल्याने काही उपयोग नाही.

केली नोंदणी. करायची करायची म्हणून नेहमी राहून जायची. आता लिंक आयती समोर आल्यावर करून टाकली.

टीपीके's picture

20 Sep 2024 - 7:22 pm | टीपीके

धन्यवाद :)

चौथा कोनाडा's picture

21 Sep 2024 - 5:27 pm | चौथा कोनाडा

आजच्या काळातील महत्वाची गरज
छान माहिती ! धन्यवाद !

फक्तः
मुत्रपिंड ( वृक्क ) : किडनी
मुत्राशय : ब्लॅडर अ थ वा युरीनरी ब्लॅडर

Nitin Palkar's picture

26 Sep 2024 - 8:14 pm | Nitin Palkar

अवयव दान आणि देहदान याबाबत अद्याप अनेक गैरसमज समाजात आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे अवयव दान हे मेंदू मृत रुग्णाचेच करता येते.

मृत्यू पश्चात अवयव दान हे फक्त डोळे व त्वचा यांचेच करता येते.

आज अनेक रुग्ण अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत हे खरे आहे परंतु अवयव दानाची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची राज्य शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच केंद्र शासकीय रुग्णालयांमध्ये प्रतीक्षा सूची तयार केलेली असते. अवयव दान अपेक्षीत रुग्णांनी तिथे नोंदणी करणे गरजेचे असते.

अवयव दान संदर्भात राज्य शासनाने तसेच केन्द्र शासनाने Regional Organ and Tissue Transplant Organization (ROTTO) is one of the three tiers of the National Organ and Tissue Transplant Programme (NOTP) रोटो, नोटो आदी समित्या स्थापन केलेल्या आहेत. अवयव दानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांनी या इथे नोंदणी करावी लागते. या समित्यांची कार्यालय सर्व सरकारी रुग्णालये अथवा महापालिका रुग्णालये येथे असतात.

कोणीही मृत्यू झाल्यानंतर यांच्या हृदय किंवा मूत्रपिंड यांचे दान करू असे म्हणून दान करता येत नाही

अपघातामध्ये जेव्हा एखादा रुग्ण मेंदू मृत म्हणजे (Brain dead) घोषित केला जातो अशाच रुग्णाचे हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत आदी अवयव दान करता येतात त्यासाठी अनेक चाचण्या आहेत प्रत्येक रुग्णाचे अवयव दान करता येतातच असे नव्हे

अवयव दानाच्या बाबतीत मेंदू मृत रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणे आवश्यक असते, हा निर्णय रुग्णाच्या नातेवाईकांनी घ्यायचा असतो.

अन्य बाबतीत संपूर्ण मृतदेहाचे दान करणे हा एक चांगला मार्ग उपलब्ध असतो. यामध्ये मृतदेह नजीकच्या वैद्यकीय रुग्णालयामध्ये न्यावा लागतो. आणि हे काम मृताच्या नातेवाईकांनी करावयाचे असते या बाबतीत समनवयन करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत.

अवयव दानासंबंधी अधिक महिती साठी पुढील क्रमांकावर WhatsApp करू शकता

नितीन पालकर 98691 95901.

चौथा कोनाडा's picture

29 Sep 2024 - 10:08 pm | चौथा कोनाडा

मोलाची माहिती !
धन्यवाद, नितिन पालकर