एक खूप गरीब मिपावाला मिपावर आनंद मिळवायला (हॅपिनेस) येत असे. टोकाच्या सालसपणामुळे त्याच्याकडील प्रतिसाद देण्याची शैली अगदी सोज्वळ असते व त्यातुन हिन आणी हिणकस काथ्याकुट, लेख डोक्यावर कधी चढुन जात हे त्याला बिचाऱ्याला मिपावर आनंद मिळवताना कळतही नसे.
त्याची दया येऊन एक कंपुबाज त्याला एक नवी कोरीकरकरीत प्रतिक्रिया द्यायची स्टाईल देतो. त्यामुळे प्रतिसादातुन आसुड घेऊन मारताना साहजिकच त्याचे मन आनंदुन जाते व तो खुशीत येऊन गाणे म्हणू लागतो-
"आ देखे जरा किसमे कितना है दम"..
असे प्रसंग व त्यावरुन आधारलेली गाणी तुम्हाला माहित असतील तर सांगा!
प्रतिक्रिया
13 May 2009 - 5:26 pm | अमोल खरे
कंपुत जागा मिळवायला- जरासी दिलमे दे जगह तु.........( जन्नत- हिरॉईन- निरागस व गोड चेहर्याची सोनल चौहान )
कंपुत जागा मिळाल्यावर- एक दुसरेसे करते है प्यार हम........एक दुसरेके वास्ते मरना पडे तो.........है तैय्यार हम........( पिक्चर सांगितला तर पब्लिक मारेल मला पकडुन. )
आणखीन सुचेल तशी टाकतोच.
13 May 2009 - 5:29 pm | सायली पानसे
कंपु वाले राडा करणार हे ऐकुन बाकिचे बापडे मिपा कर...- जाने क्या होगा रामा रे...
;-)
13 May 2009 - 5:29 pm | विनायक प्रभू
कंपूवाल्याने विरुद्ध प्रतिक्रिया दिल्यावर
हमने तो बस कलीयां मांगी
*** हार मीला
13 May 2009 - 5:31 pm | सायली पानसे
दोस्त दोस्त ना रहा...
13 May 2009 - 5:33 pm | विजुभाऊ
एका मिपावाल्याने त्याला होणार्या बद्धकोष्टतेसाठी जालीम उपाय म्हणुन योग्य तसे उच्चार काढत " दिवाने दिवाने दिवाने तो दिवाने है
खीडकी पे आउ न मै बाहर ना जाउ
नजरे मिलाउ तो मै किससे मिलाउ
दिवाने दिवाने दिवाने तो दिवाने है
हे गाणे म्हणुन पाहिले
अनुभव घ्यायचा असेल तर सकाळी हे गाणे मोठ्याने म्हणून पहा. कुंथायची गरच पडणार नाही
13 May 2009 - 5:34 pm | अमोल खरे
कोणाला कोंडीत पकडल्यावर त्याला जेव्हा तो एकटा आहे असं वाटेल- तनहाई..तनहाई..............( दिल चाहता है.......अमिर खान.)
13 May 2009 - 5:43 pm | सायली पानसे
वरिल लेख वाचुन सगळ डोक्यावरुन गेल्यावर आम्ही काही बापडे मिपाकर..... तेरि बाते भुलभुल्लैया आंखे है भुलभुलैया... हरे राम हरे राम... हरे कॄष्ण हरे राम....
13 May 2009 - 5:45 pm | लिखाळ
लै भारी रे परा :)
-- लिखाळ.
13 May 2009 - 5:45 pm | परिकथेतील राजकुमार
आपल्या टुकार हिन आणी हिणकस लेखावर एकही प्रतिक्रीया न आलेला आलेला एक टुकार मिपा लेखक हे गाणे म्हणेल :-
कबसे करे है तेरा इंतजार
कब आयेगी मेरी जाने बहार...
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
13 May 2009 - 5:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पर्यासाठी एक पेस्सल गाणं, त्याच्या कॅफेत कोणी कन्यका आली की ...
जब भी कोई हसीना देखू, मेरे दिल के तार बजे बार बार ...
(संगिताच्या शुद्धलेखनाची खात्री नाही, पण हा सिंबल डब्बल फ्लॅटचा आहे! ;-) )
13 May 2009 - 6:08 pm | निखिल देशपांडे
ऑफिसातुन मिपा साईट नाही उघडत नाही तेव्हा
"जगु कसातुझ्या विणा मी राणी ग"
==निखिल
13 May 2009 - 6:24 pm | सोनम
आणि जर ऑफिसात एखाद्या मिपाकराला मिपा साईट ओपन होत नसेल तर नाईलाजास्तव मिपाकर ऑफिसातील काम मन लावून करेल. त्याला पाहून त्याचा खडूस बॉस हे गाणे म्हणेल
"किती सांगू मी सांगू कोणाला
आज आनंदी आनंद झाला"
13 May 2009 - 6:24 pm | सोनम
आणि जर ऑफिसात एखाद्या मिपाकराला मिपा साईट ओपन होत नसेल तर नाईलाजास्तव मिपाकर ऑफिसातील काम मन लावून करेल. त्याला पाहून त्याचा खडूस बॉस हे गाणे म्हणेल
"किती सांगू मी सांगू कोणाला
आज आनंदी आनंद झाला"
13 May 2009 - 6:12 pm | अनंता
मोकलाया दाहि दिश्या ह्याच गाण्याची निवड करेन.
(देवकाका चाल लावाल ना?)
13 May 2009 - 6:25 pm | मिंटी
=)) =)) =)) =))
13 May 2009 - 7:25 pm | बिपिन कार्यकर्ते
आपण तर ब्वॉ एकदम सुममधे असतो... ;)
आते जाते हुए मै सब पे नजर रखता हूं
नाम अब्दुल है मेरा सबकी खबर रखता हूं
बिपिन कार्यकर्ते
13 May 2009 - 7:41 pm | क्रान्ति
कधीही मिपा उघडलं की पहिलं मनात येणारं गाणं
माझा भाव तुझे चरणी | तुझे रूप माझे नयनी!
मिपाचं चटकन डोळ्यांत भरणारं रंगरूप आणि ग्यानबा-तुकाराम दिसले की मला तर हेच आठवतं!
:) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
13 May 2009 - 8:12 pm | धमाल मुलगा
स्वतःच्याच ड्युप्लिकेट आयडी वापरुन स्वतःलाच हाणायचं आणि परत त्या आयडीवर हल्ला करुन सहानुभुती मिळवायची असे उद्योग करणार्याचं गाणं:
"अरे दिवानों, मुझे पहचानो...मै हुं कौन....
मै हुं..मै हुं...मै हुं डॉन !!!"
नकली आयडी काढून पडद्याआडून हल्ले करताना आयडी बॅन झालेल्याचं गाणं:
"खेळ कुणाला दैवाचा कळला...
मी असो, तू असो..कुणी असो...... "
;)
लेखांना प्रतिसाद न मिळाणार्याचं गाणं:
"कोई अपना होता...
पास नहीं दूर ही होता, लेकीन कोई अपना होता...."
आणि शेकडा-खेकडा मंडळींचं गाणं:
"दुनिया की ठा ठा ठा!!!!! " :D
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
13 May 2009 - 8:50 pm | आनंदयात्री
>>"दुनिया की ठा ठा ठा!!!!! "
=)) =)) =))
लै लै भारी ... भारी !!
14 May 2009 - 3:11 pm | विजुभाऊ
आणि कोणी मिपाकर हे गाणे ऐकायची मनोमन प्रबळ इच्छा करत असतो
सख्या चला बागमंदी...रंग उधळु चला