ट-२० विश्वचषक अंतिम सामना

सौंदाळा's picture
सौंदाळा in जनातलं, मनातलं
28 Jun 2024 - 11:24 am

कालच इग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना ६८ धावांनी जिंकून भारतीय संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. २०२२ मधे उपांत्य फेरीत इग्लंडविरुद्ध झालेल्या एकतर्फी पराभवाची भारताने परतफेड केली. आता शनिवारी भारताची गाठ दक्षिण आफ्रिका संघाशी पडेल.
यंदाची विश्वकरंडक स्पर्धा बर्‍याच अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. तब्बल २० संघांचा सहभाग, अमेरीकेत झालेले साखळी सामन्यांचे आयोजन, तिकडची बॉलिंग फ्रेंडली पिचेस, सामन्यांची महागडी तिकिटे वगैरे. अमेरीकेतल्या लोकांशी बोलणे झाले तेव्हा त्यांना या विश्वकरंडकाबद्दल माहिती नव्हते. अमेरीकेने पाकीस्तानला धूळ चारली आणि नंतर सुपर एटमधे प्रवेश केला तेव्हा माध्यमातून थोडीफार चर्चा झाली. अमेरीकन्स फुटबॉल, बेसबॉल, बास्केटबॉल आवडीने बघतात, अमेरीकेतच त्याच्या स्पर्धा भरवून त्याला विश्वकरंडकासारखे प्रोजेक्ट करतात. अमेरीकेत क्रिकेटचा प्रवास येत्या काही वर्षात कसा होतो हे बघणे रोचक असेल. भारतीय, पाकिस्तानी, ब्रिटीश, साऊथ आफ्रिकन, कॅरेबियन लोक अमेरीकेत आहेत आणि वाढत चालले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या प्रसारावर आणि अर्थातच अमेरीकेतील मोठ्या अर्थकारणावर आयसीसीचा डोळा आहेच.
भारतासाठी संघ म्हणून आतापर्यंतची स्पर्धा छानच गेली. भारतीय संघ कधीच दडपणाखाली वाटला नाही. सर्व गोलंदाज जबरदस्त फॉर्ममधे आहेत. मात्र विराट कोहली, शिवम दुबेचा खराब फॉर्म, क्षेत्ररक्शकांनी सोडलेले सोप्पे झेल ही थोडी चिंतेची गोष्ट आहे. आफ्रिका संघ आयसीसी विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच आला आहे. संघ सर्व आघाड्यांवर पूर्ण बहारात आहे. त्यामुळे भारताला सर्वोत्तम खेळ करायला लागेल. रोहीत आणि विराटची कदाचित शेवटची विश्वकरंडक स्पर्धा असेल त्यामुळे ते पूर्ण झोकून प्रयत्न करतीलच.
दोन्ही चांगले संघ अंतिम सामन्यात आले आहेत मात्र भारताचे पारडे तुलनेने किंचित जड आहे असे वाटत आहे. उद्या सामना बघायला मज्जा येणार आहे.

क्रीडामत

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2024 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंतिम सामना भारतीय संघ जिंकणार इतक्या मजबूत स्थितीत भारतीय संघ आहे, कोहल्याचा बॅड प्याच सुरु आहे, कुठंही काहीही फटका खेळला तर, फोकलीचा तंबूत परतलेला असतो. रोहीत फार्मात आहे, आपण त्यांच्याकडून आज चांगल्या खेळीची अपेक्षा करू शकतो.

समजा आज तो ढेपाळला तर, पंत, सूर्यकुमार, पांड्या, पंत, जड्डू सगळं देवभरोसे वाटतं. बूमबूम बुमराची गोलंदाजी चांगली व्हावी. अजुन काही खरडावे वाटले की धाग्यावर येईन, शनवारी फूल टाइम धाग्यावर पडिक राहु.

-दिलीप बिरुटे

भारतीय संघ जिंकणार ह्यात संशय नाही. तुलनात्मक विचार करायचा म्हटले तर (माझ्या मते) दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी जास्त सरस आहे तर त्याला उत्तर म्हणून भारतीय फलंदाजी. बघुया सामना कसा रंगतोय ते.

अथांग आकाश's picture

28 Jun 2024 - 3:28 pm | अथांग आकाश

सहमत आहे!

आंद्रे वडापाव's picture

30 Jun 2024 - 6:43 am | आंद्रे वडापाव

भारतीय संघाचे अभिनंदन.

बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

आंद्रे वडापाव's picture

30 Jun 2024 - 7:10 am | आंद्रे वडापाव

योगायोग..
जेव्हा जेव्हां बीजेपिला सिंगल ह्यांडेड मेजॉरीटि असतें...
भारत विश्वचषक नाही जिंकत...

भागो's picture

28 Jun 2024 - 3:37 pm | भागो

सौंदाळा सर
लेख समयोचित आहे पण,
T-20 साठी ट-२० ? कुछ जम्या नही. कुणाच्या काही सूचना?

सौंदाळा's picture

28 Jun 2024 - 4:04 pm | सौंदाळा

सर-बिर नको हो
ट-२० हा मिपावर ज्यांनी क्रिकेटचे भरपूर लेख लिहिले आहेत त्या 'श्रीगुरुजी' या जुन्या मिपा सदस्याकडून उचलला आहे.
बाकी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होतील का?
मला तरी वाटत नाही.
पण बरेच नेटकरी दुबेच्याऐवजी जयस्वालला घ्यावे आणि त्याला सलामीला पाठवून कोहलीला तीन नंबरवर पाठवावे असे म्हणत आहेत.
काहीजण तर कोहली आणि दुबेला वगळून अनुक्रमे जयस्वाल आणि रिंकूला घ्यावे म्हणत आहेत.

मला वाटत संघाच्या जडण घडणीत ऐन वेळी बदल करू नयेत. जयस्वाल आणि रिंकू ह्याना आधीच घ्यायला पाहिजे होते. आता नको. काय म्हणताय?

rahul ghate's picture

29 Jun 2024 - 11:47 am | rahul ghate

अंतिम सामन्या वर पावसाचे सावट असून सामन्याचा दिवस व राखीव दिवस असे २ हि दिवस ७०-८० टक्के पावसाची शक्यता आहे .

भारताने टॉस जिंकून फलंदाजी घेतली. सुरवात तर छान झाली आहे.

सौंदाळा's picture

29 Jun 2024 - 8:30 pm | सौंदाळा

तीन फलंदाज बाद,
कोहली आणि अक्षर. आज कोहली खेळतोय वाटत.

प्रचेतस's picture

29 Jun 2024 - 8:43 pm | प्रचेतस

दोघेही चांगले खेळत आहे, किमान160 रन्स तरी हवेत.

सौंदाळा's picture

29 Jun 2024 - 8:46 pm | सौंदाळा

१० षटक ७५/३
कोहली आणि अक्षरने डाव सावरला आहे. अक्षरने दोन षटकार सुध्दा मारले आहेत. त्याला काय सूचना दिल्या आहेत आता पुढील ५-६ षटके महत्त्वाची आहेत.

प्रचेतस's picture

29 Jun 2024 - 9:11 pm | प्रचेतस

नेमका स्वताच्याच चुकीच्या कॉलने धावबाद झाला. दुबे बेभरवशाचा.

सौंदाळा's picture

29 Jun 2024 - 9:39 pm | सौंदाळा

आज कोहली आणि दुबे चांगले खेळले. आतापर्यंतचा विश्वचषक अंतिम सामन्याचा सर्वात चांगला स्कोर.
आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७७ धावांचे आव्हान. भारत जिंकायला पाहिजे.

बुमराने अप्रतिम चेंडू टाकला, आणि आता आर्षदीपने मार्करमला पण परतावले,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2024 - 10:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीय संघ सुरुवातीच्या पडझडीनंतर सावरला १७७ चं आव्हान तसं चांगलं आहे, आफ़्रीकीची २ बाद १२ आणि तिसरं षटकं सुरु आहे, अजुन दोन विकेट्स पडल्या तर सामना आपल्या दृष्टीने आपण विजयाकडे जाऊ...

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

29 Jun 2024 - 10:06 pm | प्रचेतस

पंतने रिव्ह्यू वाया घालवला.

सौंदाळा's picture

29 Jun 2024 - 10:27 pm | सौंदाळा

स्टब्ज बाद, मोठी विकेट

प्रचेतस's picture

29 Jun 2024 - 11:00 pm | प्रचेतस

गेली मॅच आता

हो, कलासेंची अफलातून फटकेबाजी.
झोपा आता

प्रचेतस's picture

29 Jun 2024 - 11:22 pm | प्रचेतस

गेलेली मॅच बुमरा आणि आर्शदिपच्या टिच्चून केलेल्या बॉलिंगमुळे एकदम रंगात आली.

सौंदाळा's picture

29 Jun 2024 - 11:23 pm | सौंदाळा

पंड्या शेवटचे षटक, १६ जिंकायला
बघू

प्रचेतस's picture

29 Jun 2024 - 11:26 pm | प्रचेतस

सूर्याचा भन्नाट कॅच

प्रचेतस's picture

29 Jun 2024 - 11:29 pm | प्रचेतस

२ मध्ये ९

पांड्या पुन्हा हिरो, १ मध्ये ९

सौंदाळा's picture

29 Jun 2024 - 11:34 pm | सौंदाळा

जिंकली
खूप हेलकावे खाल्ले पण जिंकली
कोहली, दुबे, बुमरा, अर्शदीप, पंड्या आणि सूर्याचा भन्नाट कॅच
अभिनंदन टीम इंडिया

प्रचेतस's picture

29 Jun 2024 - 11:36 pm | प्रचेतस

जबरदस्त विजय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2024 - 11:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूर्यकुमारने मॅच जिंकून दिला... भन्नाट कॅच.

-दिलीप बिरुटे

गवि's picture

29 Jun 2024 - 11:39 pm | गवि

गेली मॅच आता

निगेटिव्ह थिंकिंग टाळण्यासाठी प्रयत्न करा. जमेल.

प्रचेतस's picture

29 Jun 2024 - 11:43 pm | प्रचेतस

तुमची झोप झालेली दिसतेय.

भारताच्या विजयाच्या अद्भुत क्षणात सामील होण्यासाठी पूर्ण उत्साहाने आणि सकारात्मक मनाने आम्ही सामना अवलोकित केला. काही लोकांसारखे (सुमारे एक मिपासदस्य) यांच्यासारखे नकारात्मक कॉमेंट्स न टाकता. कारण आमचा टीम भारतवर गाढ विश्वास होता. तुम्ही जावा तिकडे पाकिस्तानात.

तुमचा निर्देश खफकडे दिसतोय :)

उत्तम खेळ केला आपल्या संघाने. हॅट्स ऑफ टीम इंडिया.

आमचा निर्देश केवळ तुमच्याकडे आहे.

प्रचेतस's picture

30 Jun 2024 - 12:05 am | प्रचेतस

ओहह नो, झोपा आता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2024 - 11:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टी -२० विजयी भारत.....

-दिलीप बिरुटे

आंद्रे वडापाव's picture

30 Jun 2024 - 6:44 am | आंद्रे वडापाव

भारतीय संघाचे अभिनंदन.

बरं झालं "पनौती" फायनल बघायला स्टेडियम मधे उपस्थित नव्हती... नाही तर वन डे वर्ल्ड कप फायनल सारखं .. झालं असतं.. मागच्या वेळे सारखं...

आंद्रे वडापाव's picture

30 Jun 2024 - 7:10 am | आंद्रे वडापाव

योगायोग..
जेव्हा जेव्हां बीजेपिला सिंगल ह्यांडेड मेजॉरीटि असतें...
भारत विश्वचषक नाही जिंकत...

रात्रीचे चांदणे's picture

30 Jun 2024 - 11:07 am | रात्रीचे चांदणे

अख्खा देश भरताच्या विजयामुळे खुश आहे पण काहीना मात्र खाता पिता झोपता एकच चेहरा दिसतोय.

योगी९००'s picture

1 Jul 2024 - 11:03 am | योगी९००

अख्खा देश भरताच्या विजयामुळे खुश आहे पण काहीना मात्र खाता पिता झोपता एकच चेहरा दिसतोय.
बरोबर...त्याशिवाय अन्न पचत नाही व झोपही लागत नाही. जळी स्थळी केलेल्या निंदेने भाजपाच्या काही सिटा कमी झाल्या ह्याचेही त्यांना समाधान नाही. गंमत म्हणजे एरवी हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला अंधश्रद्धा म्हणणारे हे लोकं, मोदींना पनवती म्हणतात. त्यावेळी हे म्हणताना त्यात त्यांना अंधश्रद्धा दिसत नाही.

पॅट्रीक जेड's picture

6 Jul 2024 - 12:30 pm | पॅट्रीक जेड

३० बॉल ३० रन करायचे होते आफ्रिकेला. भारतीय बॉलर काय लायकीचे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. तरीही आफ्रिका मॅच हरतेय. मॅच फिक्स असल्याशिवाय हे शक्य नाही.

पॅट्रीक जेड's picture

6 Jul 2024 - 12:31 pm | पॅट्रीक जेड

ह्या बीसीसीआय च्या संघावर ( हा अधिकृत भारतीय देशाचा संघ नाही) आमचे टॅक्स चे करोडो रुपये उधळायचा हक्क शिंदे सरकारला कुणी दिला?

मुक्त विहारि's picture

6 Jul 2024 - 8:08 pm | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

पॅट्रीक जेड's picture

6 Jul 2024 - 8:56 pm | पॅट्रीक जेड

तुम्ही सुधारण्यापलीकडे गेला आहात.

मुक्त विहारि's picture

7 Jul 2024 - 8:27 pm | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

मुद्दा नसला की वैयक्तिक पातळीवर उतरणे, साहजिकच आहे....

पॅट्रीक जेड's picture

7 Jul 2024 - 10:31 pm | पॅट्रीक जेड

तुम्ही सुधारण्यापलीकडे गेला आहात. (२)

मुक्त विहारि's picture

7 Jul 2024 - 11:45 pm | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

खास आपल्यासाठी एक लिंक...

https://misalpav.com/node/36614

मुक्त विहारि, अगदी अगदी आपले म्हणणे पटले , एक " अ . बा " म्हणून होते त्यांचे पण तसेच ... आणि एक विद्वानांना तर मुद्द्दा मिळाला नाही कि हगीनदारी काढायची किंवा "तुमच्या देशांत असेच असते का हो" वैगरे असले निरर्थक काहीतरी चिकटवत राहायचे

मुक्त विहारि's picture

8 Jul 2024 - 8:34 am | मुक्त विहारि

मिपा म्हणजे, डू-आयडी, हे समीकरण झाले आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jul 2024 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारत देशात टी ट्वेन्टीनंतर, मुंबैत रसिकांनी जे उत्स्फ़ुर्त स्वागत केलं त्याला तोड नाही. मजा आगया. क्रिकेट खेळ असा आहे की, त्यात रममाण झालो की त्या खेळाचा पूर्ण आनंद घेता येतो. क्रिकेटचं वेड आम्हाला लहानपणापासून. क्रिकेट खेळलो. पंचगिरी केली. वगैरे. क्रिकेट फिक्सींग, क्रिकेट हा देशाचा संघ नाही, वगैरे हे सगळे वाद असले तरी, क्रिकेटचा आनंद देहभान विसरुन घेता येतो. अन्य खेळाबाबतही थोड्या फार फरकाने आमचं असंच आहे.

बाय द वे, आपल्या देशात कसा असतो क्रिकेटचा विजय साजरा करणे ? क्रिकेट सामने पाहणे ? आपल्या देशात एखाद्या खेळात विजय मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान संघाच्या सर्व खेळाडुबरोबर गोल रिंगन करुन गप्पा-टप्पा करतात का ? हार्दीक पांड्याच्या पहिल्याच चेंडुवर कॅच पकडल्यावर 'त्याला तु काय म्हणालास ?' असे प्रश्न विचारुन आत्मीय संवाद करतात का ? आमच्याकडे अशा प्रश्न आणि आत्मीय संवादाने डोळ्यातून पाण्याचे ओघळ यायला लागतात. दोन-ह्जार तेवीसला विजयाची संधी गेली होती, तरी भारतीय संघांतील खेळाडुंचं जे सांत्वन मा. पंतप्रधान यांनी केलं होतं ते आठवलं की अजूनही गदगदून येतं. ''दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे''.ती गळाभेट, हातात हात घेणे, खेळाडुंचे खिशातून हात काढून आपल्या हातात घेणे, हा जो आत्मीय स्पर्श असतो त्याने आपले रोम रोम फुलतात. डोळ्यातून पाण्याचे ओघळ वाहु लागतात.

आपल्या देशात असे ओघळ येतात काय ? सॉरी असं खेळ प्रेम असतं का ? आमचे प्रश्न निरर्थक वाटल्यास दुर्लक्ष करा. उत्सुकता आहे.

-दिलीप बिरुटे
(क्रिकेटप्रेमी )

पॅट्रीक जेड's picture

8 Jul 2024 - 10:11 am | पॅट्रीक जेड

हाहाहा. :)
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असे महत्त्वाचे काम सोडून फालतू प्रशासकीय कामे करत असावेत बहुतेक. :)

धनावडे's picture

8 Jul 2024 - 1:28 pm | धनावडे

ASHES हरल्याच्या चर्चा ऑस्ट्रेलियाच्या संसदेत होतात हे माहित आहे का? की उगाच नेहमी सारखी बडबड.

मुक्त विहारि's picture

8 Jul 2024 - 9:22 pm | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद...

चौकस२१२'s picture

8 Jul 2024 - 6:54 pm | चौकस२१२

मुद्दा नसला की वैयक्तिक पातळीवर उतरणे, साहजिकच आहे....
पॅट्रीक जेड अनि प्रो, यन्नि परत सिध्ह केला....
हे राम .........

मुक्त विहारि's picture

8 Jul 2024 - 9:23 pm | मुक्त विहारि

ज्याचे त्याचे आत्मज्ञान...