अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 18 Jun 2024 - 8:59 pm जटिलाच्या दारावरती दुर्बोध देतसे थाप भेटीत उमजले दोघा, "उभयतांस एकच शाप सद्दीत सुमारांच्या ह्या उ:शाप नसे शापाला अस्वस्थ उद्याची हाक ऐकू ना येई कुणाला" दुर्बोध जटिलसे हसले दुर्बोधून जटिलही गेले अन् विषण्ण होऊनी दोघे आश्रयी कवीच्या गेले :) अनर्थशास्त्रमुक्त कवितामौजमजा प्रतिक्रिया फारच आवडली. नेहमीप्रमाणेच 18 Jun 2024 - 9:41 pm | गवि फारच आवडली. नेहमीप्रमाणेच दर्जेदार... सुमारांची सद्दी 21 Jun 2024 - 7:25 am | तिमा अपूर्णतेच्या अंधारात पूर्णत्वाचे विवर अर्थकाहुर शब्दभांडारात विषण्णतेचे प्रहर पद्यपंक्तिच्या मांडवात् शब्दफुलांची झगमग दुर्बोध रचनांच्या जाळ्यात वाचकांची तगमग सुबोध स्पष्ट विचारांचे अर्थवेत्त्यांना वावडे तिमिरघन मायाजालात रसिकांना शब्दकोडे ! दोन्ही कवीता आवडल्या. 21 Jun 2024 - 8:04 am | कर्नलतपस्वी कुठे जटिल कुठे दुर्बोध शब्दच्छल सारा रसिक अबोध कुठे अपुर्ण कुठे पूर्णत्व कल्पनेचा खेळ शब्दांचे महत्व खेळीया खेळ करतो शब्द बाणांनी रसिका छळतो कवी ग्रेस आठवतात. गवि, तिमा, कर्नल 21 Jun 2024 - 4:54 pm | अनन्त्_यात्री प्रतिसादाबद्दल धन्यवाद सुमारांची वाढ खरंच बेसुमार 4 Jul 2024 - 5:46 pm | मनिष सुमारांची वाढ खरंच बेसुमार झालीयं...
प्रतिक्रिया
18 Jun 2024 - 9:41 pm | गवि
फारच आवडली. नेहमीप्रमाणेच दर्जेदार...
21 Jun 2024 - 7:25 am | तिमा
अपूर्णतेच्या अंधारात
पूर्णत्वाचे विवर
अर्थकाहुर शब्दभांडारात
विषण्णतेचे प्रहर
पद्यपंक्तिच्या मांडवात्
शब्दफुलांची झगमग
दुर्बोध रचनांच्या जाळ्यात
वाचकांची तगमग
सुबोध स्पष्ट विचारांचे
अर्थवेत्त्यांना वावडे
तिमिरघन मायाजालात
रसिकांना शब्दकोडे !
21 Jun 2024 - 8:04 am | कर्नलतपस्वी
कुठे जटिल कुठे दुर्बोध
शब्दच्छल सारा रसिक अबोध
कुठे अपुर्ण कुठे पूर्णत्व
कल्पनेचा खेळ शब्दांचे महत्व
खेळीया खेळ करतो
शब्द बाणांनी रसिका छळतो
कवी ग्रेस आठवतात.
21 Jun 2024 - 4:54 pm | अनन्त्_यात्री
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
4 Jul 2024 - 5:46 pm | मनिष
सुमारांची वाढ खरंच बेसुमार झालीयं...