एक खूप गरीब माणूस सायकलवरुन पाव (ब्रेड) विकत असे. टोकाच्या गरीबीमुळे त्याच्याकडील पाव ठेवण्याची पिशवी अगदी फाटलेली असते व त्यातुन पाव जमीनीवर कधी पडून जात हे त्याला बिचाऱ्याला सायकल चालवतांना कळतही नसे.
त्याची दया येऊन एकजण त्याला एक नवी कोरीकरकरीत पिशवी देतो. त्यामुळे त्यापिशवीतुन पाव घेऊन विकतांना साहजिकच त्याचे नुकसान टळते व तो खुशीत येऊन गाणे म्हणू लागतो-
"आज कल पाव जमींपर नही पडते मेरे"..
असे प्रसंग व त्यावरुन आधारलेली गाणी तुम्हाला माहित असतील तर सांगा!
प्रतिक्रिया
10 Apr 2009 - 4:25 pm | अमृतांजन
एक प्रेमी युगल जिन्यावर बसुन गप्पा मारत असतात व एका क्षणी ते एकमेकाच्या डोळ्यात बघतात आणि अचानक तेथे वाळवंट होऊन जाते; कारण?
आखोही आखो मे इशारा हो गया
बैठेबैठे जिनेका सहारा हो गया
10 Apr 2009 - 4:40 pm | धमाल मुलगा
ओ अमृतांजन,
थोडं अमृतांजन द्या ना मलापण...डोक्याला लावेन म्हणतो. :)
आयला, कस्सले डुचके टाकले राव दोन्हीही जोक्स!!!
चालु द्या. येऊ द्या अजुनही.. (आता हे जोक्स वापरायला बकरा/री शोधायला हवा/वी)
@सूहास,
गाणं नाय बदलायचं! फाऊल केलास तू. अमृतांजनशेठनी बघ गाणं तसंच उचललंय पण त्यासोबतचा प्रसंग त्या गाण्याचा अर्थ बदलवतोय.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
10 Apr 2009 - 4:42 pm | सूहास (not verified)
>>गाणं नाय बदलायचं! फाऊल केलास तू. अमृतांजनशेठनी बघ गाणं तसंच उचललंय पण त्यासोबतचा प्रसंग त्या गाण्याचा अर्थ बदलवतोय.>>
ओ अस॑ आहे का ...आता जरा जास्त विचार करावा लागेल..फाऊल मान्य..
सुहास
" जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..
10 Apr 2009 - 8:52 pm | मराठमोळा
देव आनंद आणी वाहिदा रेहमान यांच्यावर चित्रित झालेल्या "गाता रहे मेरा दिल" या गाण्यात वाहिदा रेहमान ने पुर्ण गाण्यात साडी बदलली नाही असे का?
तर या गाण्यात एक कडवे आहे ज्यात देव आनंद म्हणतो
"ओ मेरे हमराही मेरी बाह थामे चलना.
बदले दुनिया "SAREE" तुम ना बदलना"
त्यामुळे ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
10 Apr 2009 - 10:17 pm | chipatakhdumdum
भैय्या दूध काढताना म्हैस लाथ मारते... का???
छोड दो आन्चल, जमाना क्या कहेगा???
10 Apr 2009 - 10:21 pm | chipatakhdumdum
मगरीण पौर्णिमेला दुखा:ने गाण म्हणणार,
चान्द फिर निकला, मगर तुम ना आये.............
पीजे पीजे पीजे पीजे
10 Apr 2009 - 10:31 pm | अमृतांजन
एकतर्फी प्रेमात आंधळा:
"जिस गली में तेरा घर ना हो बालमा, उस गलीसे हमे तो गुजरना नहीं"
बालमाच्या भावांनी बदडून काढल्यावर-
"तेरी गलीयोंमें ना रख्खेंगे कदम, आजके बाद"
10 Apr 2009 - 11:25 pm | टारझन
आवरा !!!
10 Apr 2009 - 11:56 pm | मिसळभोक्ता
आनंदी नावाच्या मुलीने सेक्सचेन्ज केल्यावर ती कोणते गाणे म्हणेल ?
किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला
-- मिसळभोक्ता
21 May 2009 - 6:39 am | लवंगी
चहा पिता पिता वाचत होते, हसता हसता फुर्रकन चहा सगळा उडला =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
3 Jul 2009 - 2:22 pm | अमृतांजन
सर्वोच्च न्यायालयाच्या "त्या" निवाड्यानंतर आनंदीला आता आनंद व्हायची गरज राहणार नाही बहुधा.
14 Apr 2009 - 10:59 am | बबलु
आनंदी नावाच्या मुलीने सेक्सचेन्ज केल्यावर ती कोणते गाणे म्हणेल ?
किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला
हसून हसून हसून खुर्चीवरून पडायचा बाकी होतो. मिसळभोक्ताजी... सह्ही है. लगे रहो.
....बबलु
3 Jul 2009 - 2:38 pm | अमृतांजन
+१
हेच म्हणायचे आहे मला.
14 Apr 2009 - 11:34 am | पाषाणभेद
ठार मेलो. ऑफिसात सगळे बघु राहीलेत माझ्याकडे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
13 May 2009 - 1:34 am | मस्त कलंदर
एकदा मगर, वाघ आणि मुंगळे असे तीन मित्रा सहलीला घारापुरीला जातात.. परतीच्या वाटेवर मुंगळे हारबर ट्रेन पकड्तात.... आणि.. वाघ चर्च गेट ला जातात... पण मगर त्या दोघाना काहीच बोलत नाहीत..
का???
मगर क्या करे अपनी राहें जुदा हैं.... :P
आणखी एकः
एका मुन्सिपालिटीच्या कार्यालयात एक दीपक नावाचा कर्मचारी रोज रद्दबातल झालेले कागद जाळण्याचे काम करत असतो.. एका दिवशी त्याची रजा असते.. आणि त्याचे काम सूरज करतो.. तेव्हा त्या जळत्या कगदांना पाहून तुम्ही काय म्हणाल????
दीपक बगैर कैसे परवाने जल रहें हैं??...
13 May 2009 - 1:55 am | राजेन्द्र
पायोरिया झालेल्या माणसाला डेन्तिस्ट काय सान्गेल?
सम्झोउता गमोसे करलो.
13 May 2009 - 11:11 am | विश्वेश
एका बागेत एक तळे असते, त्यात एक मगर रहात असते.रोज सन्ध्याकाळी तिथे एक मुलगा मगरीशी खेळायला जात असतो.
एके दिवशी त्याला मगर दिसत नाही, थोडे शोधल्यावर त्याला दिसते मगर कपडे घालुन बाकावर बसली आहे.
हे पाहुन तो मुलगा कोणते गाणे म्हणेल ....
रोज शाम आती थी, मगर ऍसी ना थी ....
13 May 2009 - 11:13 am | विश्वेश
जुलाब झालेला माणुस कोणते गाणे म्हणेल ...
रुक रुक रुक अरे बाबा रुक ....
आणि खडा झालेला माणुस कोणते गाणे म्हणेल ...
आती नही ...आती नही ...
13 May 2009 - 11:27 am | नितिन थत्ते
एकदा झुल्फिकार भुत्तो तुरुंगात असताना बेगम नसरत आणि बेनझीर त्यांना भेटायला जातात.
जनरल झियांच्या आदेशानुसार नसरत यांना बाहेरच थांबवले जाते, भेटू दिले जात नाही. फक्त बेनझीरलाच आत जाऊ दिले जाते.
भुत्तो तिला विचारतात. आई का नाही आली?
बेनझीर उत्तर देते " झिया बेकरार है....'आई' बहार है"
(आई बाहेर आहे)
खराटा
(रंग माझा वेगळा)
13 May 2009 - 4:09 pm | सागर
मेनका विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आलेली असते
आणि इंद्राला मेनकेशिवाय करमत नसते , म्हणून इंद्र गुपचुप मेनकेच्या मागे हरणाचे रुप घेऊन जातो
तेव्हा कळीचा नारद मेनकेला कसा सावध करेन?
"सावध हरिणी सावध गं
करिन कोणीतरी पारध गं" ;)
13 May 2009 - 4:19 pm | सागर
एक प्रियकर आपल्या प्रेयसीला पत्र पाठवायचा विचार करतो
पत्र लिहून होते
पण पाकीट चिकटवायला त्याच्याकडे "गम" (डिंक) कमी असते
तेव्हा आपल्या लाडक्या प्रेयसीला पत्र कसे पोहोचणार या चिंतेने आपोआप नायकाला हे गाणे सुचते
इस दुनिया में कितना गम है
मेरा गम कितना कम है
;)
14 May 2009 - 12:16 am | उदय
देव आनंदच्या घरी स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करताना टिनू आनंद कुठले गाणे म्हणेल?
आनंदाचे डोही आनंद तरंग
21 May 2009 - 12:07 am | अमृतांजन
चिमण्यांचा पोपट करायचा असेल तर-
"या चिमण्यांनो
परत फिरा रे..."
21 May 2009 - 4:42 pm | मन्जिरि
हसुन ह्सुन गडबडा लोळ्ले चालुद्या
21 May 2009 - 4:42 pm | मन्जिरि
हसुन ह्सुन गडबडा लोळ्ले चालुद्या
3 Jul 2009 - 2:39 pm | चिरोटा
पावावरुन आणि एक पी.जे.आठवला.
वर्गात मुले बसलेली असतात्.प्रत्येकाच्या बाकावर पाव ठेवलेला असतो.पावाखाली एक चिठ्ठी असते.त्यावर 'जन्नत' असे लिहिलेले असते. तर मुलांच्या गुरुजींचे नाव काय?
ईश्ककी छाव!
(जिनके सर हो ईश्ककी छाव,पाव के नीचे जन्नत होगी!!)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न