शेतात रोज उन्हाळी वातावरण पाहून,कंटाळा आल्यासारखं होतं. आणि ढगाळ पावसाळी
वातावरणाची आठवण येत राहते. ढगाळ दिवसांत शेतावर काम करत असल्याची अनुभवून गेलेली आठवण,मी माझ्या वहीत एकदा कधी लिहून ठेवली होती ती वाचत होतो.
“कधीकधी मला ढगाळ दिवस पण आवडतात त्यांचं सौंदर्य मला मोहित करतं. सर्वसाधारणपणे बरेच लोक उन्हाळी दिवसांचं कौतुक करताना दिसतात.आनंद आणि उच्च उत्साह मिळतो असं त्यांना वाटत असतं.
निळ्या आकाशात आनंद निर्माण होतो असं वाटणं स्वाभाविक असू शकतं, परंतु माझ्यासाठी ते अगदी उलट आहे: जेव्हा सूर्य ढगाळ पडद्याआड सुरक्षितपणे दूर जातो तेव्हा मी सर्वात समाधानी असतो.
कुणी माझी थट्टा करत असलं तरी, हरकत नाही.
कल्पना करा की लोक हवामान नसलेल्या वातावरणात वाढले आहेत; सूर्य, ढग, आकाश, काहीही नाही. धूसर आकाश उदास असतं हे त्यांना कोण सांगणार?
आणि ढगाळ दिवस इतर कोणत्याही दिवसापेक्षा अधिक आश्चर्य आणि सौंदर्याने भरलेला नसतो असं कसं सांगणार?
ढगांचा गडगडाट पक्ष्यांच्या गाण्यासारखा संगीतमय नसतो का?
मला असं वाटतं की जर लोकांना त्यांच्या स्वतःच्या मर्जीवर सोडलं गेलं असतं, तर वादळी आकाशाकडे लोकांचा नकारात्मक दृष्टीकोन खूपच कमी झाला असता.ढगांनी भरलेल्या आकाशावर कवींनी खूप कविता लिहिल्या आहेत.
मधूनच अंड्याच्या कवचासारखी पांढरी छटा असलेलं आणि मधूनच राखाडी ढगांमुळे भरलेलं मोहक आणि सुंदर. आकाश माझ्यासाठी, प्रेरणा देतं.
मला असं वाटतं की दररोज ढगांची संख्या सूर्याच्या किरणांपेक्षा जास्त असावी,
मी वादळी हवामानाबद्दल भरपूर काही सांगू शकतो.
आकाश ढगाळ असलं काय की निळंभोर असलं काय ज्याला जे वातावरण आनंदी करतं ते त्याचं भलं करू देत,माझे विचार इतकेच आहेत की, उन्हाळ्याच्या आणि ढगाळ दिवसांमध्ये मी माझ्या विरोधाभासाशी भावना व्यक्त करताना इतरांवर त्याचा परिणाम होत नसेल तर मला काही फरक पडत नाही.
मला इतकंच माहित आहे की, जेव्हा आकाशात वादळ निर्माण होतं तेव्हा जग आनंदात असतं आणि त्यांना काळजीही असते.”
प्रतिक्रिया
19 May 2024 - 7:57 am | विजुभाऊ
वेलकम बॅक सामंतकाका.
बरेच वर्षांनंतर दर्शन दिलेत
19 May 2024 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहाहा ! ढग भरुन आलेत की, सर्वत्र जे निळंभोर आकाश दिसतं त्याचं सौंदर्य क्या कहने नंबर एक.
पाऊस पडायचा आहे, त्याचं भरुन येणं अहाहा. अशा वेळी मनात वादळं उमटतात हेही तितकंच खरं आहे.
-दिलीप बिरुटे
20 May 2024 - 9:39 am | सुबोध खरे
मिपाच्या सध्याच्या वातावरणाला गढूळ वातावरण म्हणता येईल का?
20 May 2024 - 2:19 pm | अमरेंद्र बाहुबली
ho
20 May 2024 - 4:42 pm | मुक्त विहारि
मिपाचे वातावरण, निखळ हसते-खेळतेच आहे...
20 May 2024 - 5:13 pm | कर्नलतपस्वी
अबा आणी डाॅ खरे यांचे एकमत.....
हल्के घ्या.
मलापण वाटते वातावरण नुसतेच गढूळ नाही तर साहित्यिक दहशतवाद पसरवला जातोय का काय अशी शंका वाटते.
20 May 2024 - 4:42 pm | मुक्त विहारि
अजीबात नाही...
20 May 2024 - 6:34 pm | चौथा कोनाडा
अग्गोबाई ढग्गोबाई
लागली कळ
मिपाला श्रीसांची
केवढी झळ
थोडी न् थोडकी लागली फार,
मिपाकरांच्या डोळ्याला पाण्याची धार
(पुढ्चं कुणाला माहीत असेल तर पुर्ण करा प्लिज)