मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
30 Apr 2024 - 5:03 pm
गाभा: 

गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा. मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स. हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान केंद्र स्थापित केले गेले होते.

सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत मतदरांमुळे शक्य झाले. असे म्हणता येईल.

देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे? खरे तर सर्वात जास्त मतदान शिक्षित मध्यम वर्गाने केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते.

पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो. मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही.

जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

13 May 2024 - 2:09 pm | अहिरावण

जाऊ द्या ! त्यांचं आपलं कुडमुड्या जोतिषांसारखं आहे... एवढे दिवस जाऊ द्या मग बघा !

२०१४ जाऊद्या २०१९ ला निवडणूक होणार नाही

२०१९ जाऊद्या २०२४ ला निवडणूक होणार नाही

२०२४ जाऊद्या २०२९ ला निवडणूक होणार नाही

२०२९ जाऊद्या २०३४ ला निवडणूक होणार नाही

चालूच राहील..... =))

नक्की काय घडले नाही २०१९ ला आणि आता घडणार आहे ?
काय भाकीत काय भाकीत लै भारी २०१९ साली न्हाय पण २०२४ साली आणि ते पण घडले नाही आणि २९ साली घडले कि हे सांगायला मोकळे १० वर्षांपूर्वी सांगितले होते
अरे आम्ही पण आज सांगतो कधीतरी भाजप सत्तातून हरेल .. हाय काय आणि न्हाय काय धरता आमचं पाय कि घेताय पायाचे तीर्थ ?

चौकस२१२'s picture

13 May 2024 - 4:22 pm | चौकस२१२

हहे आग्या यानां उद्देशून होते

चौकस२१२'s picture

13 May 2024 - 10:09 am | चौकस२१२

ध्रुव बाळाला जर्मनीत राहून एवढीं अचूक माहिती कशी काय मिळते बुवा?????

अमरेंद्र बाहुबली's picture

13 May 2024 - 10:12 am | अमरेंद्र बाहुबली

त्याची रिसर्च टीम आहे. तो एक मोठा यूट्यूबर आहे.

आग्या१९९०'s picture

13 May 2024 - 1:21 pm | आग्या१९९०

त्यांना रिसर्च काय चीज आहे हे कसे माहीत असेल? सगळे वरतून आले की ढकलायचे हेच माहित.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 May 2024 - 6:18 pm | अमरेंद्र बाहुबली

हाहाहा. खरे आहे.

तुम्हाला ऑस्ट्रेलियात बसून कसे कळते तसेच की ! अहो बातम्या पब्लिक असतात, कोणीही वाचू शकते.

चौकस२१२'s picture

13 May 2024 - 4:15 pm | चौकस२१२

हो पण मी त्या दउप रव राठी सारखा मत व्यक्त करून पैका मिळवण्याच्या पाठी नाही

मिळवा की जमत असेल तर, त्यात सांगण्यासारखे काय आहे ?

सर टोबी's picture

13 May 2024 - 5:13 pm | सर टोबी

वाईट कसं आहे ते सांगा. आणि मोदींचे स्तूतीपाठक जे पैसे मिळवतात ते चांगले का? म्हणजे आपले अर्णव, नाविका कुमार, रुबिका लियाकत, पाल्की शर्मा हे सगळे चांगले नाही का?

अमरेंद्र बाहुबली's picture

13 May 2024 - 6:19 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
भाऊ टोचरेकर राहिले.

चौकस२१२'s picture

13 May 2024 - 4:17 pm | चौकस२१२

अपेक्षित प्रतिसाद, कौमी , भुजबळ आणि आगलावे , ते राजेश ९९ कुठे गेले कोण जाणे

त्याची ऐसी तैसी लक्तरे झाली असे ऐकले आहे. ४ जून नंतर इथले अनेक जण तिकडे पडीक होतील आणि २०२९ ची तयारी करतील असे जाणकार सांगतात.

सुबोध खरे's picture

13 May 2024 - 9:53 am | सुबोध खरे

नीट न वाचताच प्रतिसाद देणे हा आग्या यांचा स्थायीभाव आहे

पहिल्यांदा कळफलक बडवायचा मग विचार करायचा

त्यामुळे त्यांनी २०१९ वाचलेच नाही

अहिरावण's picture

13 May 2024 - 1:32 pm | अहिरावण

>>>>पहिल्यांदा कळफलक बडवायचा मग विचार करायचा

ठळक शब्दांना आक्षेप. हे असले कृत्य नक्की होत असावे असे तुम्हाला वाटते याबद्दल तुमच निषेध.

नठ्यारा's picture

13 May 2024 - 7:57 pm | नठ्यारा

रात्रीचे चांदणे,

भाऊ आपले म्हणणे संयमपणे मांडतात हे सोडलं तर त्यांच्या व्हिडिओमध्ये बाकी काही नसते.

मला वाटतं की भाऊ तोरसेकर राजकीय परिस्थिती कशी पहावी ते श्रोत्यांना उलगडून सांगतात. निदान श्रोत्यांना स्वत:चं मत कसं बनवावं तेव्हढं तरी समजतं. भले ते भाऊंशी जुळो वा ना जुळो. याउलट इतर तथाकथित पत्रकारांची तथाकथित विश्लेषणं ऐकून श्रोत्यांच्या मनाचा गोंधळ उडतो. त्यांना मत काय बनवायचं हेच समजेनासं होतं. त्यामुळे भाऊ लोकप्रिय आहेत.

-नाठाळ नठ्या

ऐकून श्रोत्यांच्या मनाचा गोंधळ उडतो. हा मुद्दा संदर्भासहित स्पष्ट करणार का? ध्रुव राठीची, भारत हा हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे ही व्हिडिओ क्लिप जवळपास तीन कोटी लोकांनी पाहिली आहे. ती क्लिप डाउनलोड करून शेअर केलेल्यांची गणती वेगळीच. तुम्हाला असं वाटतं लोकांनी का बुवा आपल्याला ही क्लिप समजत नाहीय या भावनेनी ती क्लिप पुनः पुन्हा पहिली आहे?

नठ्यारा's picture

14 May 2024 - 6:00 pm | नठ्यारा

भारत जर हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय, तर मग निवडणुका का होताहेत? वाहिनीवंत इतका घसा फोडून का बोंबलंत आहेत? की ध्रुवबाळास भारतीय लोकशाहीची विश्वासार्हता खुपते आहे? खरं काय? खोटं काय? उडाला की नाही गोंधळ?

-नाठाळ नठ्या

सर टोबी's picture

14 May 2024 - 7:58 pm | सर टोबी

जिथे खात्री पटायला हवी तिथे तशी पटत नसेल त्यासाठी हा वाक्प्रचार आहे ना आपल्याकडे: वेड पांघरून पेडगावला जायचं. आहे काय त्यात एवढं अवघड?

चौकस२१२'s picture

15 May 2024 - 3:10 pm | चौकस२१२

भारत हा हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे
१९७५ ला असा झालं होता म्हणे ,,, सध्या पण तसाच चालू आहे का?
ध्रुव बाळाला जेल मध्ये टाकलाय का? ७५ साली अनेकांना टाकलं होत तसं ? आरे हो तो जर्मनीत असतो ना, त्याचं रीसरच टीम ला टाकलं असेल हा आत

विद्यचारण शुकलांचा पुनर्जन्म झालं कि काय? ( ७५ चे प्रसारमाध्यम मंत्री) अरे आम्हला माहितीच नाय
अरे बापरे

अमरेंद्र बाहुबली's picture

15 May 2024 - 3:37 pm | अमरेंद्र बाहुबली

हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल ही नाव ऐकलीत का? भारतातील आहेत बर का? नाहितर ऑस्ट्रेलियात अस कुणी नाही म्हणाल.

चौकस२१२'s picture

17 May 2024 - 8:45 am | चौकस२१२

१-२ राजकीय व्यक्तींवरील आरोप वेगळे आणि अख्ख्या देशात आणीबाणी जाहीर कारेन सांगेल विरोधी तुरंगात डांबले यात काही फरक दिसत नाही
अर्रे किती खड्डा खणताय स्वतःसाठी

मुक्त विहारि's picture

17 May 2024 - 12:26 pm | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद...

सर टोबी's picture

15 May 2024 - 4:03 pm | सर टोबी

प्रबीर पुरकायस्थ, मोहम्मद झुबेर काय घरात खायची भ्रांत होती म्हणून तुरुंगात गेले होते का?

सुबोध खरे's picture

16 May 2024 - 12:06 pm | सुबोध खरे

त्यांना फुरोगामीत्वाची मूळव्याध झाली होती म्हणून उपचारासाठी तुरुंगात दाखल केलं होतं.

सर टोबी's picture

16 May 2024 - 1:48 pm | सर टोबी

भगेंद्र तज्ञ तुम्हीच असाल!

सुबोध खरे's picture

16 May 2024 - 8:15 pm | सुबोध खरे

मी करेन कि उपचार.

पदवी पण आहे आणि सरकारी अनुज्ञप्ती पण

हा का ना का

फुरोगामी लोकांना झेपेल का?

फुरोगामित्वाची मुळव्याधीच नव्हे तर वैचारिक बद्धकोष्ठ यावर सुद्धा उपचार केला जाईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 May 2024 - 9:22 pm | अमरेंद्र बाहुबली

मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू आहेत?

कांदा लिंबू's picture

16 May 2024 - 9:50 pm | कांदा लिंबू

मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू आहेत

आधी फुरोगाम्यांना तर थोडा आराम पडू द्या.

२०२९ ला अजून पाच वर्षे आहेत!

एकोणाविसाव्या शतकापासून चालू असलेला फुरोगाम्यांचा आजार इतक्या झटकन जाणार नाही. वेळ लागेल. २१०० नंतर बघु काय काय ते

मुक्त विहारि's picture

17 May 2024 - 12:10 am | मुक्त विहारि

खरे हे डॉक्टर आहेत...

असो...

अहिरावण's picture

17 May 2024 - 7:17 am | अहिरावण

खरे हे खरे डॉक्टर आहेत

चौथा कोनाडा's picture

13 May 2024 - 10:15 pm | चौथा कोनाडा

सालं, आमच्या मावळ मतदार संघात सुद्धा फक्त ४८ % मतदान झाल्याच्या बातम्या आहेत !
कमीतकमी ६० % तरी व्हायला हवे !
अवघड आहे बुवा आपल्या लोकशाहीचे !

कर्नलतपस्वी's picture

13 May 2024 - 10:29 pm | कर्नलतपस्वी

४३%

कॉमी's picture

13 May 2024 - 10:21 pm | कॉमी

धागा फारसा पटला नाही. मध्यमवर्गाला अचानक का अनास्था वाटू लागली? १४ आणि १९ मध्ये का सुट्ट्या आणि लाँग विकेंड ह्या संकल्पना अस्तित्वात नव्हत्या ? मग ह्या वेळी वेगळे असे काय झाले ? ह्याची कारणे माहीत नसतील म्हणून लगेच अनास्था असा शिक्का मारणे कितपत योग्य ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 May 2024 - 2:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मतदारसंख्या आणि मतदार बदलत असतात. २०१९ साली १५ हुन अधिक वय असलेली मुले आता प्रथमच मतदान करत आहेत. त्यांची स्वप्ने/आकांक्षा सगळे वेगळे असणार आहे. २०१९ मध्ये ८०च्या घरात असलेली अनेक मंड़ळी निजधमास गेली असणार. तेव्हा सत्तरीत असणारेही आता काही नसतील.

कपिलमुनी's picture

14 May 2024 - 9:52 pm | कपिलमुनी

टॅक्स कमी नाही
टोल कमी नाही
नोकऱ्या नाही
महागाई
गरीब लोकांना फुकट धान्य आणि मध्यम वर्गाने मात्र त्याला दमाड्या मोजायचा

चौकस२१२'s picture

15 May 2024 - 1:50 pm | चौकस२१२

रस्त्याचे जाळे वाढले = फायदा गरिबाला आणि मध्यम वर्गाला दोन्हीला
एअरपोर्ट चे जाळे वाढले = फायदा मध्यम वर्गाला आणि श्रीमंताला , त्यातून व्यापार सुलभ झाला तर सगळ्यांनाच फायदा
डिजिटाईझशन वाढले = फायदा गरिबाला आणि मध्यम वर्गाला दोन्हीला , कला पित्ताशयावर निर्बंध थोडा लाल असले तर त्याचा देशाला फायदाच कि
निर्यात वाढली = फायदा गरिबाला आणि मध्यम वर्गाला दोन्हीला
वेगवेगळे उद्योग अस्तित्वात आले कि जे पूर्वी नवहते = फायदा गरीब , मध्यम वर्गाला आणि श्रीमंताला ( नवीन उद्योग म्हणजे ३डी प्रिंटिंग , खाजगी संरक्षण उत्पादन
एवढे करूनही कितीतरी जण टॅक्स बुडवितात
महागायीचे म्हणाल तर ती जगात सर्वत्र वादहली आहे फक्त भारतात नव्हे मिपावरील जगातील अनेकांना पेट्रोल चे भाव त्यांच्या त्यांचं देशात कसे वाढलेत ते विचारा मग समजेल
भारत हा उत्पादन क्षेत्रात जगात चीन ऐवजी निवडला जातोय त्याची जाणीव ठेवा ...जगातील नामांकित इंजिनीरिंग क्षेत्रातील उद्योगाचे जाळे कुठे कुठे आहे ते बघा,, त्यात भारतात ते बरेच दिसतील .. गांधीजी म्हणले होते ना "कच्चा माल निर्यात करणे आणि पक्का माल आयात करणे " हे आत्मघातकी धोरण आहे .. मग सरकार जर निर्यतीला प्रोत्सहन देत असेल तर हसून स्वागत करा फायदा माध्यम वर्गाला होतोच कि
बर अस समजूयात कि मोदी भाजप फेल झाले .. जादूची कांडी नाही फिरवू शकले... उद्या जर आजचे विरोधक सत्तेत आले तर काय जादूची कांडी फिरणार आहे इंदिरा जिची घोषणा होती गरिबी हटवा ,, हटली?

आग्या१९९०'s picture

15 May 2024 - 2:10 pm | आग्या१९९०

सध्या माझे भाजप समर्थक मित्र आणि नातेवाईकांकडून डिट्टो असले युक्तिवाद केले जात आहेत. त्यांना म्हटलं माझा कांदा, सोयाबीन परदेशात विकून तिकडच्या भावात विकून दाखवा. कुठला जवळचा राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ, बंदर असेल ते वापरा. अर्थात त्यांच्या डोक्यात हे शिरत नाही हा भाग वेगळा. निर्यातबंदी आहे हेही त्यांना माहीत नाही, पण लव्ह जिहादच्या असंख्य केसेस माहीत आहे.वरून आले ढकलले इतकंच त्यांना माहीत बास्स!

चौकस२१२'s picture

15 May 2024 - 3:05 pm | चौकस२१२

माझा कांदा, सोयाबीन परदेशात विकून तिकडच्या भावात विकून दाखवा.
म्हणणं काय आहे तुमचं कि भारतातून शेतीमाल निर्यात होत नाही?
कधी जाऊन बघितलंय बाकी देशात? एकाच दुकानात इथे अनेक राज्यातील पदार्थ मिळतात . एवढया प्रकारची भारतीय लोणची एका ठिकाणी बघायला मिळणार नाहीत
भारतीय पदार्थ तर सोडाच पर्वा एक हालिपिनो मेक्सिकन मिरची हि बाटली घेतली बघतो तर "प्रोडक्त्त ऑफ इंडिया "

निर्यात छोटा शेतकरी स्वतः कसा करू शकेल ? काय वाटेल ते म्हणे माझे कांदे विकून दाखव

आग्या१९९०'s picture

15 May 2024 - 3:16 pm | आग्या१९९०

वर म्हटले होते की डोक्यावरून जाते ह्यांच्या. ढकलगाडीचा हाच प्रॉब्लेम आहे. सरकारने निर्यात धोरणात काय गोंधळ घातला आहे हे जाणून घ्या आणि हो जमल्यास Sarcasm ओळखण्याचा प्रयत्न करा. फारच अपेक्षा करतोय मी ढकल गाडीवाल्यांकडून.

सर टोबी's picture

15 May 2024 - 3:18 pm | सर टोबी

आपण आपलं हसं करून घेत आहोत हेसुद्धा लक्षात येत नाहीय का? नोटाबंदीनंतर पॅन कार्ड धारक वाढले, रिटर्न फाईल करणाऱ्यांची संख्या वाढली हे मारे तावातावाने सांगितले मग आता नेमकं काय झालं कि परत करबुडवे डोकं वर काढायला लागलेत? ३डी प्रिंटर आणि खाजगी शस्त्र निर्मिती हे उद्योग बांधकाम आणि इतर उत्पादकांच्या तुलनेत कोणत्या निकषावर मोठे रोजगार निर्माण करू शकतात? जे रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे त्यातले किती रस्ते थेट गावपाड्यापर्यंत झाले आहेत आणि टोलमुक्त आहेत? आजही पाटस हे हमरस्त्यावरील गाव ते सिद्धटेक हा प्रवास हाडं खिळखिळे करणारा असेल काय तीर मारला रस्त्याचं जाळं वाढवून? लक्षात घ्या, साधी माचिस घेणारा सामान्य माणूस देखील १२ ते १८ पैसे कर सरकारला देत असतो. त्याला अटल सेतू आणि ढिगभरच्या विमानतळांनी काय फायदा झाला?

माझ्या एका प्रतिसादात मी म्हणालो होतो कि सत्ताधारी भारताची प्रतिमा बिघडवत आहेत तर नया भारताच्या एका नायकांनी आम्हाला ठणकावून सांगितले कि परकीयांच्या मतांची किंमत करणं भारताने सोडून दिलंय म्हणून. मग कोणत्या विशेष गुणांच्या आधारे परकीय देश भारतात उत्पादन घेणार आहेत? एलॉन मस्क तर भारताला गुंगारा देऊन चीनला भेट देऊन आले.

तेव्हा उघडा डोळे आणि बघा नीट.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 May 2024 - 3:40 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
चौकस सरांच्या मते अदानी हा सामान्य माणूस असावा, कारण फायदा त्यालाच पोहोचला आहे.

चौकस२१२'s picture

16 May 2024 - 4:05 pm | चौकस२१२

अमरेंद्र बाहुबली अदानि किंवा अंबानी चे गोडवे गायला मी बसलेलो नाही
कुठलाही मोठा उद्योग घ्या प्रतिष्ठित असलेला टाटा उद्योग समुह घ्या. समजा तुमच्या गावात त्यांनी कारखाना काढला तर त्यांची जी प्रत्यक्ष उलाढाल आणि अप्रत्यक्ष उलाढाल याचे मोज माप नाहीच करायचे का/ त्याचे स्थानिकांना काहीच फायदे होनार नाहीत का
बर मग आना कम्युनिझम ... सुपडा साफ एकदाचा

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 May 2024 - 12:50 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

जे रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे त्यातले किती रस्ते थेट गावपाड्यापर्यंत झाले आहेत आणि टोलमुक्त आहेत?

थोडा कालावधी तर हवाच ना टोब्या?. ५०/६० वर्शाचा बॅकलॉग भरुन काढायला वेळ लागणारच.
सरकारतर्फे कामे करण्याचा प्रयत्न चालु आहे की नाही हे महत्वाचे असे आमचे मत.
"We are now opening ethanol pumps," Gadkari further said and added that it would also empower Indian farmers to double up as 'urjadaata' (energy producer) while being 'anndaata' (food producer) as ethanol fuel can be produced from crops like sugarcan... नितिन गडकरी

Read more at: https://www.deccanherald.com/india/indias-road-infrastructure-to-match-u...

विमानतळांची संख्या २०१४ मध्ये ७४ होती ती आता १४८ झाली. आता एखादा "आम्हाला बुवा लाल परीच परवडते' म्हणू शकतो पण आम्ही १२-१५ तास रेल्वे प्रवास करण्यापेक्षा विमानप्रवास पसंत करतो असे म्हणणारेही लाखात आहेत म्हणूनच मुंबई-दिल्ली,दिल्ली-चेन्नई,पुणे-बेंगळूरु वगैरे फ्लाईट्स बहुतेकवेळा सगळ्या भरलेल्या असतात.

सर टोबी's picture

16 May 2024 - 2:08 pm | सर टोबी

घ्यायचाच नाहीय. शिवडी न्हावाशेवा लिंक रोडची रहदारी तब्बल पाच हजार वाहने प्रतिदिन इतकी कमी झालीय. वंदे भारत गाड्या बळेच पळवल्या जात आहेत. त्यांच्यासाठी सामान्य लोकांच्या गाड्यांना कात्री लागते. कोविडच्या काळात मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस जी बंद केली ती अजून सुरु केली नाहीय. आता कोल्हापूरला प्रवासी विमानाने जातात अशी तुमची माहिती आहे का?

विकास करतांना प्राथमिकता नावाचा काही निकष असतो कि नाही? तुम्हाला भले विमानं परवडत असतील पण हवाई चप्पल घालणाऱ्यांचं काय?

चौकस२१२'s picture

16 May 2024 - 3:47 pm | चौकस२१२

तुम्हाला भले विमानं परवडत असतील पण हवाई चप्पल घालणाऱ्यांचं काय?
मग काय रेल्वे पण बंद करून बैलगाड्या आणूयात का
एकूण वंदे भारत गाड्या किती एकूण रेल्वे च्या सर्वसाधारण गाड्या किती काय प्रमाण बघाल कि नाही ?
हवाई चप्पल घालणारे आहेत म्हणून काय विमानतळे वाढवय्याची च नाहीत का? चांगली रेल्वे आणायचीच नाही का? वेग आणि एकूण दळणवळ सुटसुटीत कार्याचेच नाही का ?
काय विचारानचा दळभद्री पणा

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 May 2024 - 4:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

विकास करतांना प्राथमिकता नावाचा काही निकष असतो कि नाही?

मग आय आय टीज, आय आय एम्स, इस्रो हे तरी कशाला हवे होते? अणु प्रकल्प तरी कशाला केले?आय आय टी खरग्पूरसाठी रशियाकढुन कर्ज घेतले होते. आय आय एम अहमदाबाद्साठी हार्वर्ड्/एम आय टीशी बोलणी करुन कर्ज घेतले होते. हाच खर्च तेव्हा प्रथमिक शिक्षणावर केला असता तर परिस्थिती जास्त सुधारली असती ?की नसती?
निवडुन आलेले प्रत्येक सरकार आपली धोरणे ठरवते आणी राबवते.
७०च्या दशकात राजधानी एक्स्प्रेस तरी कशाला चालु केल्या होत्या?मुंबई-दिल्ली साधारण ट्रेन-२५० रुपये तर राजधानी ७५० रुपये(हे ८०च्या दशकातले दर आहेत). ही राजधानी मुंबई सेंट्रल स्थानकावरुन निघाली की मग बोरीवली/विरार गच्च भरलेल्या गाड्यांपेक्षा राजधानीला प्राधान्य दिले जायचे.

सर टोबी's picture

16 May 2024 - 5:12 pm | सर टोबी

इतक्या दिवसांमध्ये मिळवलेली पत एका दिवसात धुळीला मिळवण्याचा चंग बांधला आहे का? तारतम्य नावाची काही गोष्ट असते की नाही?

हायवे, विमानतळ, वंदे भारत गाड्या या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्जाचा बोजा वाढवला आहे. तो हलका करण्यासाठी ज्या प्रमाणात या सुविधा वापरल्या जायला हव्यात त्या प्रमाणात त्या वापरल्या जात नाहीत. याचा परिणाम म्हणजे ज्या सुविधा सहजच उपलब्ध असायला हव्यात त्या तशा मिळू शकत नाहीत. म्हणजे वंदे भारतमधून बाहेर पडलो की बंद पडलेले सरकते जीने, स्टेशनवरचे अस्वच्छ टॉयलेट्स. बरे या सुविधांचा तुम्हाला कल्पना येणार नाही अशा माणसांवर बोजा पडलेला असतो की जे कधी या सुविधा वापरू देखिल शकणार नाहीत.

बाकी शाळा, महाविद्यालयांमध्ये केलेली गुंतवणूक एका समर्थ समाजाच्या निर्मितीमधून दिसून येते. ती एक स्वतःच परतफेड करणारी आणि नविन संसाधने निर्माण करू शकणारी गुंतवणूक असते.

चर्चा करताना तारतम्य असावे अशी अपेक्षा आहे. तशी दिसून न आल्यास हा शेवटचा प्रतिसाद.

सुबोध खरे's picture

16 May 2024 - 7:28 pm | सुबोध खरे

सर जी

दळभद्री कम्युनिस्ट/ समाजवादी विचारसरणी चा हा एक मोठा मानसिक अडथळा असतो.

संगणक आले तेंव्हा त्यांनी धाय मोकलून रडारड केली कि आता यंत्रामुळे हातानं काम मिळणार नाही.

पुढे काय झालं

चिडू काकांनी डिजिटायझेशन बद्दल रडारड केली होती कि गरीब कष्टकरी महिला विक्रेत्यांकडे पैसे घ्यायला इंटरनेट असेल का? डिजिटल पेमेंट सामान्य माणसांना परवडेल का?

आज जगात सर्वात जास्त डिजिटल पेमेंट भारतात होतात. आणि १२ रुपये द्यायचे असले तरी भाजीवाले पेटीएम चा क्यू आर कोड पुढे करतात.

वैचारिक बद्धकोष्ठ नि झापडबंद वृत्ती असल्यामुळे असं होतं.

रेल्वेची पायाभूत साधने रेल्वेमार्ग, रूळ, सिग्नलिंग सिस्टीम १०० वर्षे जुनी झालेली होती त्यामुळे वारंवार बिघडत असे ती बदली करणे आवश्यक होते यासाठी पैसे कुठून येणार होता?

मतांसाठी गरीब पिछडे वर्ग याबद्दलची केवळ रडारड केली जाते. पण रेल्वेचे आधुनिकीकरण झाल्यामुळे वाचणारा वेळ आणि श्रमशक्ती याचे गणित काही वाममार्गी लोकांना करता येत नाही.

त्यामुळे हे डावे लोक कालबाह्य झाले आहेत.

पण ते सुधारणार नाहीतच

रेल्वेचे आधुनिकीकरण झाले नसते तर ती प्रणाली मोडून पडली असती

अमरेंद्र बाहुबली's picture

16 May 2024 - 7:38 pm | अमरेंद्र बाहुबली

संगणक आले तेंव्हा त्यांनी धाय मोकलून रडारड केली कि आता यंत्रामुळे हातानं काम मिळणार नाही. भाजपेयींनी संगणकाला विरोध म्हणून बैलगाडी यात्रा काढली होती ना?? आता भांडवलशाहीचे ठेकेदार बनले.

सुबोध खरे's picture

16 May 2024 - 7:41 pm | सुबोध खरे

भुजबळ बुवा

प्रत्येक ठिकाणी आपण पचकलंच पाहिजे का?

अमरेंद्र बाहुबली's picture

16 May 2024 - 7:59 pm | अमरेंद्र बाहुबली

जिथे जिथे खोट पचकणार, तिथे तिथे आम्ही लिहिणार.

सर टोबी's picture

16 May 2024 - 7:57 pm | सर टोबी

हा सगळा डोलारा कोसळून पडायला जो वेळ लागेल तेव्हडा द्यावा लागेल ना! आणि एखादा विचार पटत नसेल तर द्याना सोडून. कशाला दुसऱ्यांची मानहानी करण्यात भूषण मानता आहात?

सुबोध खरे's picture

16 May 2024 - 7:18 pm | सुबोध खरे

कोविडच्या काळात मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस जी बंद केली ती अजून सुरु केली नाहीय.

हायला

काहीही फेकायचं का?

गेली दोन अडीच वर्षे मी रोज सकाळी कोयना एक्सप्रेस कोल्हापूर कडे जाताना आणि संध्याकाळी परत येताना पाहतोय. रेल्वे रूळ माझ्या दवाखान्याच्या समोरच आहेत

हां, अजूनही तिला डिझेलचं इंजिनचा लावलेलं दिसतंय WDP ४ D.

कदाचित कोल्हापूर पर्यंत विद्युतीकरण पूर्ण झालेला नसावं

११०२९ गुगलून पहा म्हणजे आजची गाडी कुठवर आली (current status) आहे ते सुद्धा स्पष्टपणे कळेल

सुबोध खरे's picture

16 May 2024 - 7:36 pm | सुबोध खरे

०१०२९/०१०३० या क्रमांकाने कोयना एक्सप्रेस कोविड काळातही चालू होती असे स्पष्ट दिसते आहे.

तुमच्या साठी हा व्हिडीओ सुद्धा दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=-HJd_gxI2H4

सर टोबी जरा माहिती तरी अस्सल असू द्या

उगाच नाक्यावर काहीतरी ऐकून इथे फुक्या मारल्या तर तोंडघशी पडायला होतं

सर टोबी's picture

16 May 2024 - 7:50 pm | सर टोबी

हे नाव मला आठवले नाही. हि गाडी अजूनही बंद आहे असे समजते. सर्वसाधारण तपशिल बरोबर असेल तर नेमकं कुणाला काय म्हणायचं आहे हे माणसं समजून घेतात. पण तो सभ्यपणाचा भाग झाला नाही का?

कांदा लिंबू's picture

16 May 2024 - 8:59 pm | कांदा लिंबू

पण तो सभ्यपणाचा भाग झाला नाही का

लिहिण्याच्या आधी विचार करणे
लिहिण्याच्या नंतर विचार करणे
यातला सभ्यपणा कोणता?

सुबोध खरे's picture

17 May 2024 - 9:43 am | सुबोध खरे

सुप्रिया सुळे यांची आई बार मध्ये काम करत असे

राहुल गांधी हे नाव मला आठवले नाही.

सर्वसाधारण तपशिल बरोबर असेल तर नेमकं कुणाला काय म्हणायचं आहे हे माणसं समजून घेतात.

पण तो सभ्यपणाचा भाग झाला नाही का?

मग कोणत्या विशेष गुणांच्या आधारे परकीय देश भारतात उत्पादन घेणार आहेत?
भारतीय ब्रँड : ऑस्ट्रेल्या सारखया छोट्या देशात शुद्ध महिंद्रा आणि टाटा ट्रॅक्टर आणि आता गाड्या विकते
अप्रत्यक्ष निर्यात: ऑस्ट्रेल्या सारखया छोट्या देशात सुझुकी छोटी गाडी मिळत ती मेद इन इंडिया आहे
भारत फोर्ज सारखी कंपनी जगातील उच्च वाहक उत्पादकांना कधी पासून पूर्वतः करीत आहे
कोळपूर मधील हि कंपनी बघा यूरोप ला उत्पादन पाठवते

तुम्हाला सगळे नकारत्मक बघायचे आहे तर कोण काय करणार ,
आणि हो आज जर काँग्रेस सरकार असते आणि त्यांनी धोरणे आखून अश्या निर्यातीला प्रोत्सहन दिले असते तराही माझ्य सारख्याने त्याचे कौतिकचह केले असते

भाजप सोडा बार्हताचं आधीचं सरकारे सुद्धा परदेशी उद्योगांना भारतात प्रवेश देताना " येतेच बनवा" असे धोरण ठेवले होते , सिमेन्स चे उद्धरण घ्या १०० हुन अधिक वर्षे भारत्तात ती उप्त्पादन बनवते
उगाच भाजप आणि मोदी दिवशी म्हणून भारतटाने केलेलया प्रगतीला भारतात बसूनच नावे ठेवायची वाह रे देशभक्त
तेव्हा उघडा डोळे आणि बघा नीट.

टाटा महिंद्रा तर मोठे उद्योग झाले कोल्हापुरातील हे पहा निर्यात करणारे
https://datta.co.in/industries/index.html

संयमित भाषेचा अतिशय उत्तम वापर केला आहात..

अहिरावण's picture

16 May 2024 - 7:19 pm | अहिरावण

उपयोग आहे का संयमित भाषेचा.. लाथों के भुत... बातोंसे नही मानते... :)

कला पित्ताशयावर निर्बंध थोडा लाल असले तर त्याचा देशाला फायदाच कि

टंकलेखन गुगल मराठी मधून करताना असे काही तरी असंबद्ध होते

अहिरावण's picture

15 May 2024 - 7:33 pm | अहिरावण

भुके नंगे रहेंगे ! राहुल जी को जिताएंगे !!

कांदा लिंबू's picture

17 May 2024 - 11:00 am | कांदा लिंबू

भुके नंगे रहेंगे ! राहुल जी को जिताएंगे !!

अरे देवा! त्यांच्यावर आता ही पाळी आलीय? एकेकाळी ते

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

असं म्हणायचे.

भुके नंगे रहेंगे ! राहुल जी को जिताएंगे !!

क्रॉनोलोजी चुकतेय का अगदीच?

अहिरावण's picture

17 May 2024 - 12:52 pm | अहिरावण

क्रोनोलोजी सोडा ! रिदम बघा !!

क्रोनॉलोजी सुधारली म्हणजे वाक्यातील घटनांचा उलट क्रम केला, म्हणजेच कृती आणि परिणाम असा नैसर्गिक क्रम लावला तरी तुमचा रिदम उत्तम टिकतोय.

अहिरावण's picture

17 May 2024 - 1:02 pm | अहिरावण

हां तसे होय हरकत नाही ...

राहुलजी को जिताएंगे ! भुके नंगे रहेंगे !!!

कांदा लिंबू's picture

17 May 2024 - 1:17 pm | कांदा लिंबू

क्रोनोलोजी सोडा ! रिदम बघा !!

काय अहिरावण हे? गविंचं म्हणणं पटकन कळलं नाही तुम्हाला? पहा, रागांच्या नामोच्चाराने कशी भल्या भल्यांची भंबेरी उडते ते!

मला भुके नंगे च्या ऐवजी नंगे भुके असा प्रयोग करा असे वाटले.

गवींचे म्हणणे समजायाला वेळ लागतोच त्यात रागांचा उल्लेख... समजुन घ्या !

आता लक्षात आले ७० वर्षे देश का हळू हळू चालत होता.. कुछ तो बात है की नींद आ ही जाती है !

कांदा लिंबू's picture

17 May 2024 - 1:11 pm | कांदा लिंबू

क्रॉनोलोजी चुकतेय का अगदीच?

येक नंबर, गवि!

अमरेन्द्र बाहुबली,

भाजपेयींनी संगणकाला विरोध म्हणून बैलगाडी यात्रा काढली होती ना?? आता भांडवलशाहीचे ठेकेदार बनले.

मला काहीतरी वेगळंच सापडलं. वाजपेयी पेट्रोल व रॉकेलच्या भडकत्या किंमतींच्या विरोधात रोष प्रदर्शित करण्यासाठी इ.स. १९७३ साली बैलगाडीतनं संसदेत दाखल झाले होते. त्याचा राजीव गांधींच्या संगणकीकरणाशी ( इ.स. १९८५ नंतर ) कसलाही संबंध नाही.

संदर्भ : https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-why-atal-bihari-va...

-नाठाळ नठ्या

रामचंद्र's picture

18 May 2024 - 5:00 am | रामचंद्र

राजीव गांधी बैलगाडीत संगणक घेऊन शेतकऱ्यांच्या भेटीला आलेत असं त्या काळात एक व्यंगचित्र पाहिल्याचं आठवतं.

अवांतर :

माझ्या मते बैलगाडी हे अतिशय उपयुक्त वाहन आहे. शेतकऱ्यास वा शेतमालास नजीकच्या केंद्रावर जाण्यासाठी बरं पडतं. उगीच मोटारवाहन व इंधनावलंबन वाढवायचं कशाला. काम होत असेल तर काय वाईट आहे. मला एकदा अत्याधुनिक बैलगाडीचं आरेखन पाहिल्याचं आठवतं. हे असं काहीतरी ( इंग्रजी दुवा ) : https://www.downtoearth.org.in/coverage/bullock-cart-in-its-new-avatar-1...

-नाठाळ नठ्या

रामचंद्र's picture

18 May 2024 - 7:38 pm | रामचंद्र

सोलापूरच्या अरुण देशपांड्यांनी बैलाला कमीत कमी त्रास होईल अशा रीतीने त्यांच्याकडून काम करून घेणारा 'बैझेल' पॉवर टिलर तयार केल्याचं अवचटांच्या लेखात वाचल्याचं आठवतंय.

गवि's picture

18 May 2024 - 7:47 pm | गवि

+१

अगदी हेच आठवले.

रुरर्बनायझेशन हा शब्द पण.

असे प्रयोग (उदा मिनिमलिझम, स्वावलंबन, खेड्यात जाऊन आधुनिक वस्ती) प्रत्यक्षात बघू जाता एकेका व्यक्तीने किंवा कुटुंबाने आदर्श रित्या केलेले पण स्केलेबल होण्याच्या दृष्टीने बहुतांश वेळा फसलेले दिसतात. खेड्यात स्वतः पुरती शेती आणि राहणे अशी कॉलनी, शहरातील एलिट लोक बुक देखील करतात पण प्रत्यक्षात राहायला कोणी जात नाही.

कारणे शोधणे रोचक ठरेल.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

18 May 2024 - 7:55 pm | हणमंतअण्णा शंकर...

बोरडम. मागासलेपणा. शिस्तीचा अभाव. चोंबडेपणा. अकार्यक्षमता. स्वातंत्र्य. संधी.
यांचे व्यत्यास म्हणून तर शहरे तयार होत असतात नैसर्गिकपणे.
बहुतेक लोकांना सोयी सुविधा नसल्या तरी चालतील पण वर वरील गोष्टींशी डील करणे अवघड जाते. ज्यांना जमते तेच उलटं मायग्रेशन करू शकतात.
उदा. आमच्या रावळगुंडवाडीत भैरोबा एक महिनाभर शिकारीला जातो तेव्हा तो परत येईपर्यंत गावात मटण खात नाहीत.
आयला याला काय लॉजिक आहे काय कुणास ठाऊक. तो गेला तर आपण का खायचे नाही हे काय कळत नाही.
भैरोबा स्वतः शिकारीला जातो. म्हणजे तो नॉनव्हेज असणार. तरीही लिंगायतांनी त्याला पार व्हेजच करून टाकला आहे.

स्वधर्म's picture

20 May 2024 - 7:01 pm | स्वधर्म

आपल्या लहानपणी होतं तसं स्वप्नातलं गांव कुठेही नसतं, हे नीट पचवायला यायला पाहिजे.
आणखी एक कारण म्हणजे खेड्यातील समाजाचा आडमुठेपणा. उदा. आमच्या शेतावर जाण्यासाठी एक दोन किमीचा रस्ता आहे. त्याची वर्षानुवर्षे दुरावस्था आहे. लोकांच्या पाठी आणि गाड्या दोन्ही मोडत आहेत. मंजूरीहि मिळाली आहे. तरी हे होत नाही, कारण सुरूवातीचे दोन तीन शेतकरी त्यांची थोडीशी जागा रस्त्याच्या गटारीसाठी द्यायला तयार नाहीत, जरी रस्त्यासाठी त्यांच्या वाडवडीलांनी दिली आहे. जि. प. गटारासाठी जागा असल्याशिवाय रस्ता करत नाही. परिणामी पुढे घर व शेत असलेल्या पन्नासएक लोकांना तो रस्ता तसाच वापरत रहावे लागते. जे अडवणूक करत आहेत, त्यांची शेत व घरे सुरूवातीलाच आहेत.

रामचंद्र's picture

18 May 2024 - 11:46 pm | रामचंद्र

या बाबतीत एकेकटे पण स्वतंत्र बुद्धीने यशस्वी अशीच उदाहरणे अधिक दिसतात हे खरं आहे. उदा. द बेटर इंडियामधील बहुतांश यशोगाथा. तेच प्रारूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्याची उदाहरणे त्यामानाने नाहीतच. मग या संदर्भात इस्रायली किबुत्झ पद्धत कशी यशस्वी ठरली ते पाहणं उद्बोधक ठरेल. मुळात शेतीआधारित काय किंवा अन्य कुठलाही प्रकल्प हा भक्कम विपणनयंत्रणेशिवाय तोट्यातच जाण्याची शक्यता असते हे स्पष्ट आहे. हे असं का होतं ते काही मिपाकर (बहुधा मुक्त विहारी) स्वानुभवावरून सांगू शकतील. यातही भांडवलशाहीप्रमाणे स्वयंप्रेरणा आणि व्यक्तिगत प्रयत्न हेच यशाला कारणीभूत ठरतात असं वाटतं.