✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था

व
विवेकपटाईत यांनी
Tue, 04/30/2024 - 17:03  ·  लेख
लेख
गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा. मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स. हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान केंद्र स्थापित केले गेले होते. सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत मतदरांमुळे शक्य झाले. असे म्हणता येईल. देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे? खरे तर सर्वात जास्त मतदान शिक्षित मध्यम वर्गाने केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते. पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो. मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही. जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49811 वाचन

💬 प्रतिसाद (250)

प्रतिक्रिया

जाऊ द्या ! त्यांचं आपलं

अहिरावण
Mon, 05/13/2024 - 14:09 नवीन
जाऊ द्या ! त्यांचं आपलं कुडमुड्या जोतिषांसारखं आहे... एवढे दिवस जाऊ द्या मग बघा ! २०१४ जाऊद्या २०१९ ला निवडणूक होणार नाही २०१९ जाऊद्या २०२४ ला निवडणूक होणार नाही २०२४ जाऊद्या २०२९ ला निवडणूक होणार नाही २०२९ जाऊद्या २०३४ ला निवडणूक होणार नाही चालूच राहील..... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

नक्की काय घडले नाही २०१९ ला

चौकस२१२
Mon, 05/13/2024 - 16:21 नवीन
नक्की काय घडले नाही २०१९ ला आणि आता घडणार आहे ? काय भाकीत काय भाकीत लै भारी २०१९ साली न्हाय पण २०२४ साली आणि ते पण घडले नाही आणि २९ साली घडले कि हे सांगायला मोकळे १० वर्षांपूर्वी सांगितले होते अरे आम्ही पण आज सांगतो कधीतरी भाजप सत्तातून हरेल .. हाय काय आणि न्हाय काय धरता आमचं पाय कि घेताय पायाचे तीर्थ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हहे आग्या यानां उद्देशून

चौकस२१२
Mon, 05/13/2024 - 16:22 नवीन
हहे आग्या यानां उद्देशून होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

ध्रुव बाळाला जर्मनीत राहून

चौकस२१२
Mon, 05/13/2024 - 10:09 नवीन
ध्रुव बाळाला जर्मनीत राहून एवढीं अचूक माहिती कशी काय मिळते बुवा?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

त्याची रिसर्च टीम आहे. तो एक

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/13/2024 - 10:12 नवीन
त्याची रिसर्च टीम आहे. तो एक मोठा यूट्यूबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

त्यांना रिसर्च काय चीज आहे हे

आग्या१९९०
Mon, 05/13/2024 - 13:21 नवीन
त्यांना रिसर्च काय चीज आहे हे कसे माहीत असेल? सगळे वरतून आले की ढकलायचे हेच माहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हाहाहा. खरे आहे.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/13/2024 - 18:18 नवीन
हाहाहा. खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

तुम्हाला ऑस्ट्रेलियात बसून

कॉमी
Mon, 05/13/2024 - 13:27 नवीन
तुम्हाला ऑस्ट्रेलियात बसून कसे कळते तसेच की ! अहो बातम्या पब्लिक असतात, कोणीही वाचू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

हो पण मी त्या दउप रव राठी

चौकस२१२
Mon, 05/13/2024 - 16:15 नवीन
हो पण मी त्या दउप रव राठी सारखा मत व्यक्त करून पैका मिळवण्याच्या पाठी नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

मिळवा की जमत असेल तर, त्यात

कॉमी
Mon, 05/13/2024 - 16:36 नवीन
मिळवा की जमत असेल तर, त्यात सांगण्यासारखे काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

त्याचं पैसा मिळवणं

सर टोबी
Mon, 05/13/2024 - 17:13 नवीन
वाईट कसं आहे ते सांगा. आणि मोदींचे स्तूतीपाठक जे पैसे मिळवतात ते चांगले का? म्हणजे आपले अर्णव, नाविका कुमार, रुबिका लियाकत, पाल्की शर्मा हे सगळे चांगले नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

+१ भाऊ टोचरेकर राहिले.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/13/2024 - 18:19 नवीन
+१ भाऊ टोचरेकर राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

अपेक्षित प्रतिसाद, कौमी ,

चौकस२१२
Mon, 05/13/2024 - 16:17 नवीन
अपेक्षित प्रतिसाद, कौमी , भुजबळ आणि आगलावे , ते राजेश ९९ कुठे गेले कोण जाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

त्याची ऐसी तैसी लक्तरे झाली

अहिरावण
Mon, 05/13/2024 - 19:27 नवीन
त्याची ऐसी तैसी लक्तरे झाली असे ऐकले आहे. ४ जून नंतर इथले अनेक जण तिकडे पडीक होतील आणि २०२९ ची तयारी करतील असे जाणकार सांगतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

नीट न वाचताच प्रतिसाद देणे हा

सुबोध खरे
Mon, 05/13/2024 - 09:53 नवीन
नीट न वाचताच प्रतिसाद देणे हा आग्या यांचा स्थायीभाव आहे पहिल्यांदा कळफलक बडवायचा मग विचार करायचा त्यामुळे त्यांनी २०१९ वाचलेच नाही
  • Log in or register to post comments

>>>>पहिल्यांदा कळफलक बडवायचा

अहिरावण
Mon, 05/13/2024 - 13:32 नवीन
>>>>पहिल्यांदा कळफलक बडवायचा मग विचार करायचा ठळक शब्दांना आक्षेप. हे असले कृत्य नक्की होत असावे असे तुम्हाला वाटते याबद्दल तुमच निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भाऊ तोरसेकर लोकप्रिय का ....

नठ्यारा
Mon, 05/13/2024 - 19:57 नवीन
रात्रीचे चांदणे,
भाऊ आपले म्हणणे संयमपणे मांडतात हे सोडलं तर त्यांच्या व्हिडिओमध्ये बाकी काही नसते.
मला वाटतं की भाऊ तोरसेकर राजकीय परिस्थिती कशी पहावी ते श्रोत्यांना उलगडून सांगतात. निदान श्रोत्यांना स्वत:चं मत कसं बनवावं तेव्हढं तरी समजतं. भले ते भाऊंशी जुळो वा ना जुळो. याउलट इतर तथाकथित पत्रकारांची तथाकथित विश्लेषणं ऐकून श्रोत्यांच्या मनाचा गोंधळ उडतो. त्यांना मत काय बनवायचं हेच समजेनासं होतं. त्यामुळे भाऊ लोकप्रिय आहेत. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

तथाकथित पत्रकारांची तथाकथित विश्लेषणं

सर टोबी
Mon, 05/13/2024 - 22:07 नवीन
ऐकून श्रोत्यांच्या मनाचा गोंधळ उडतो. हा मुद्दा संदर्भासहित स्पष्ट करणार का? ध्रुव राठीची, भारत हा हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे ही व्हिडिओ क्लिप जवळपास तीन कोटी लोकांनी पाहिली आहे. ती क्लिप डाउनलोड करून शेअर केलेल्यांची गणती वेगळीच. तुम्हाला असं वाटतं लोकांनी का बुवा आपल्याला ही क्लिप समजत नाहीय या भावनेनी ती क्लिप पुनः पुन्हा पहिली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

उडालाच की गोंधळ

नठ्यारा
Tue, 05/14/2024 - 18:00 नवीन
भारत जर हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय, तर मग निवडणुका का होताहेत? वाहिनीवंत इतका घसा फोडून का बोंबलंत आहेत? की ध्रुवबाळास भारतीय लोकशाहीची विश्वासार्हता खुपते आहे? खरं काय? खोटं काय? उडाला की नाही गोंधळ? -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

कशाला गोंधळ उडायला हवा?

सर टोबी
Tue, 05/14/2024 - 19:58 नवीन
जिथे खात्री पटायला हवी तिथे तशी पटत नसेल त्यासाठी हा वाक्प्रचार आहे ना आपल्याकडे: वेड पांघरून पेडगावला जायचं. आहे काय त्यात एवढं अवघड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

भारत हा हुकूमशाहीच्या

चौकस२१२
Wed, 05/15/2024 - 15:10 नवीन
भारत हा हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे १९७५ ला असा झालं होता म्हणे ,,, सध्या पण तसाच चालू आहे का? ध्रुव बाळाला जेल मध्ये टाकलाय का? ७५ साली अनेकांना टाकलं होत तसं ? आरे हो तो जर्मनीत असतो ना, त्याचं रीसरच टीम ला टाकलं असेल हा आत विद्यचारण शुकलांचा पुनर्जन्म झालं कि काय? ( ७५ चे प्रसारमाध्यम मंत्री) अरे आम्हला माहितीच नाय अरे बापरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/15/2024 - 15:37 नवीन
हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल ही नाव ऐकलीत का? भारतातील आहेत बर का? नाहितर ऑस्ट्रेलियात अस कुणी नाही म्हणाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

अरविंद केजरीवाल

चौकस२१२
Fri, 05/17/2024 - 08:45 नवीन
१-२ राजकीय व्यक्तींवरील आरोप वेगळे आणि अख्ख्या देशात आणीबाणी जाहीर कारेन सांगेल विरोधी तुरंगात डांबले यात काही फरक दिसत नाही अर्रे किती खड्डा खणताय स्वतःसाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Fri, 05/17/2024 - 12:26 नवीन
मनोरंजक प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ते

सर टोबी
Wed, 05/15/2024 - 16:03 नवीन
प्रबीर पुरकायस्थ, मोहम्मद झुबेर काय घरात खायची भ्रांत होती म्हणून तुरुंगात गेले होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

त्यांना फुरोगामीत्वाची

सुबोध खरे
गुरुवार, 05/16/2024 - 12:06 नवीन
त्यांना फुरोगामीत्वाची मूळव्याध झाली होती म्हणून उपचारासाठी तुरुंगात दाखल केलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

ओक्के

सर टोबी
गुरुवार, 05/16/2024 - 13:48 नवीन
भगेंद्र तज्ञ तुम्हीच असाल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी करेन कि उपचार.

सुबोध खरे
गुरुवार, 05/16/2024 - 20:15 नवीन
मी करेन कि उपचार. पदवी पण आहे आणि सरकारी अनुज्ञप्ती पण हा का ना का फुरोगामी लोकांना झेपेल का? फुरोगामित्वाची मुळव्याधीच नव्हे तर वैचारिक बद्धकोष्ठ यावर सुद्धा उपचार केला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/16/2024 - 21:22 नवीन
मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू

कांदा लिंबू
गुरुवार, 05/16/2024 - 21:50 नवीन
मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू आहेत
आधी फुरोगाम्यांना तर थोडा आराम पडू द्या. २०२९ ला अजून पाच वर्षे आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

एकोणाविसाव्या शतकापासून चालू

अहिरावण
Fri, 05/17/2024 - 07:17 नवीन
एकोणाविसाव्या शतकापासून चालू असलेला फुरोगाम्यांचा आजार इतक्या झटकन जाणार नाही. वेळ लागेल. २१०० नंतर बघु काय काय ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कांदा लिंबू

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Fri, 05/17/2024 - 00:10 नवीन
खरे हे डॉक्टर आहेत... असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खरे हे खरे डॉक्टर आहेत

अहिरावण
Fri, 05/17/2024 - 07:17 नवीन
खरे हे खरे डॉक्टर आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सालं, आमच्या मावळ मतदार संघात

चौथा कोनाडा
Mon, 05/13/2024 - 22:15 नवीन
सालं, आमच्या मावळ मतदार संघात सुद्धा फक्त ४८ % मतदान झाल्याच्या बातम्या आहेत ! कमीतकमी ६० % तरी व्हायला हवे ! अवघड आहे बुवा आपल्या लोकशाहीचे !
  • Log in or register to post comments

शिरूर मधे

कर्नलतपस्वी
Mon, 05/13/2024 - 22:29 नवीन
४३%
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

धागा फारसा पटला नाही.

कॉमी
Mon, 05/13/2024 - 22:21 नवीन
धागा फारसा पटला नाही. मध्यमवर्गाला अचानक का अनास्था वाटू लागली? १४ आणि १९ मध्ये का सुट्ट्या आणि लाँग विकेंड ह्या संकल्पना अस्तित्वात नव्हत्या ? मग ह्या वेळी वेगळे असे काय झाले ? ह्याची कारणे माहीत नसतील म्हणून लगेच अनास्था असा शिक्का मारणे कितपत योग्य ?
  • Log in or register to post comments

मतदार

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 05/14/2024 - 14:53 नवीन
मतदारसंख्या आणि मतदार बदलत असतात. २०१९ साली १५ हुन अधिक वय असलेली मुले आता प्रथमच मतदान करत आहेत. त्यांची स्वप्ने/आकांक्षा सगळे वेगळे असणार आहे. २०१९ मध्ये ८०च्या घरात असलेली अनेक मंड़ळी निजधमास गेली असणार. तेव्हा सत्तरीत असणारेही आता काही नसतील.
  • Log in or register to post comments

मध्यम वर्गी साठी केलेच काय ?

कपिलमुनी
Tue, 05/14/2024 - 21:52 नवीन
टॅक्स कमी नाही टोल कमी नाही नोकऱ्या नाही महागाई गरीब लोकांना फुकट धान्य आणि मध्यम वर्गाने मात्र त्याला दमाड्या मोजायचा
  • Log in or register to post comments

मध्यम वर्गाने

चौकस२१२
Wed, 05/15/2024 - 13:50 नवीन
रस्त्याचे जाळे वाढले = फायदा गरिबाला आणि मध्यम वर्गाला दोन्हीला एअरपोर्ट चे जाळे वाढले = फायदा मध्यम वर्गाला आणि श्रीमंताला , त्यातून व्यापार सुलभ झाला तर सगळ्यांनाच फायदा डिजिटाईझशन वाढले = फायदा गरिबाला आणि मध्यम वर्गाला दोन्हीला , कला पित्ताशयावर निर्बंध थोडा लाल असले तर त्याचा देशाला फायदाच कि निर्यात वाढली = फायदा गरिबाला आणि मध्यम वर्गाला दोन्हीला वेगवेगळे उद्योग अस्तित्वात आले कि जे पूर्वी नवहते = फायदा गरीब , मध्यम वर्गाला आणि श्रीमंताला ( नवीन उद्योग म्हणजे ३डी प्रिंटिंग , खाजगी संरक्षण उत्पादन एवढे करूनही कितीतरी जण टॅक्स बुडवितात महागायीचे म्हणाल तर ती जगात सर्वत्र वादहली आहे फक्त भारतात नव्हे मिपावरील जगातील अनेकांना पेट्रोल चे भाव त्यांच्या त्यांचं देशात कसे वाढलेत ते विचारा मग समजेल भारत हा उत्पादन क्षेत्रात जगात चीन ऐवजी निवडला जातोय त्याची जाणीव ठेवा ...जगातील नामांकित इंजिनीरिंग क्षेत्रातील उद्योगाचे जाळे कुठे कुठे आहे ते बघा,, त्यात भारतात ते बरेच दिसतील .. गांधीजी म्हणले होते ना "कच्चा माल निर्यात करणे आणि पक्का माल आयात करणे " हे आत्मघातकी धोरण आहे .. मग सरकार जर निर्यतीला प्रोत्सहन देत असेल तर हसून स्वागत करा फायदा माध्यम वर्गाला होतोच कि बर अस समजूयात कि मोदी भाजप फेल झाले .. जादूची कांडी नाही फिरवू शकले... उद्या जर आजचे विरोधक सत्तेत आले तर काय जादूची कांडी फिरणार आहे इंदिरा जिची घोषणा होती गरिबी हटवा ,, हटली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सध्या माझे भाजप समर्थक मित्र

आग्या१९९०
Wed, 05/15/2024 - 14:10 नवीन
सध्या माझे भाजप समर्थक मित्र आणि नातेवाईकांकडून डिट्टो असले युक्तिवाद केले जात आहेत. त्यांना म्हटलं माझा कांदा, सोयाबीन परदेशात विकून तिकडच्या भावात विकून दाखवा. कुठला जवळचा राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ, बंदर असेल ते वापरा. अर्थात त्यांच्या डोक्यात हे शिरत नाही हा भाग वेगळा. निर्यातबंदी आहे हेही त्यांना माहीत नाही, पण लव्ह जिहादच्या असंख्य केसेस माहीत आहे.वरून आले ढकलले इतकंच त्यांना माहीत बास्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

माझे कांदे!

चौकस२१२
Wed, 05/15/2024 - 15:05 नवीन
माझा कांदा, सोयाबीन परदेशात विकून तिकडच्या भावात विकून दाखवा. म्हणणं काय आहे तुमचं कि भारतातून शेतीमाल निर्यात होत नाही? कधी जाऊन बघितलंय बाकी देशात? एकाच दुकानात इथे अनेक राज्यातील पदार्थ मिळतात . एवढया प्रकारची भारतीय लोणची एका ठिकाणी बघायला मिळणार नाहीत भारतीय पदार्थ तर सोडाच पर्वा एक हालिपिनो मेक्सिकन मिरची हि बाटली घेतली बघतो तर "प्रोडक्त्त ऑफ इंडिया " निर्यात छोटा शेतकरी स्वतः कसा करू शकेल ? काय वाटेल ते म्हणे माझे कांदे विकून दाखव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

वर म्हटले होते की डोक्यावरून

आग्या१९९०
Wed, 05/15/2024 - 15:16 नवीन
वर म्हटले होते की डोक्यावरून जाते ह्यांच्या. ढकलगाडीचा हाच प्रॉब्लेम आहे. सरकारने निर्यात धोरणात काय गोंधळ घातला आहे हे जाणून घ्या आणि हो जमल्यास Sarcasm ओळखण्याचा प्रयत्न करा. फारच अपेक्षा करतोय मी ढकल गाडीवाल्यांकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

काही तरी बढाया मारून

सर टोबी
Wed, 05/15/2024 - 15:18 नवीन
आपण आपलं हसं करून घेत आहोत हेसुद्धा लक्षात येत नाहीय का? नोटाबंदीनंतर पॅन कार्ड धारक वाढले, रिटर्न फाईल करणाऱ्यांची संख्या वाढली हे मारे तावातावाने सांगितले मग आता नेमकं काय झालं कि परत करबुडवे डोकं वर काढायला लागलेत? ३डी प्रिंटर आणि खाजगी शस्त्र निर्मिती हे उद्योग बांधकाम आणि इतर उत्पादकांच्या तुलनेत कोणत्या निकषावर मोठे रोजगार निर्माण करू शकतात? जे रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे त्यातले किती रस्ते थेट गावपाड्यापर्यंत झाले आहेत आणि टोलमुक्त आहेत? आजही पाटस हे हमरस्त्यावरील गाव ते सिद्धटेक हा प्रवास हाडं खिळखिळे करणारा असेल काय तीर मारला रस्त्याचं जाळं वाढवून? लक्षात घ्या, साधी माचिस घेणारा सामान्य माणूस देखील १२ ते १८ पैसे कर सरकारला देत असतो. त्याला अटल सेतू आणि ढिगभरच्या विमानतळांनी काय फायदा झाला? माझ्या एका प्रतिसादात मी म्हणालो होतो कि सत्ताधारी भारताची प्रतिमा बिघडवत आहेत तर नया भारताच्या एका नायकांनी आम्हाला ठणकावून सांगितले कि परकीयांच्या मतांची किंमत करणं भारताने सोडून दिलंय म्हणून. मग कोणत्या विशेष गुणांच्या आधारे परकीय देश भारतात उत्पादन घेणार आहेत? एलॉन मस्क तर भारताला गुंगारा देऊन चीनला भेट देऊन आले. तेव्हा उघडा डोळे आणि बघा नीट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/15/2024 - 15:40 नवीन
+१ चौकस सरांच्या मते अदानी हा सामान्य माणूस असावा, कारण फायदा त्यालाच पोहोचला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

आना कम्युनिझम

चौकस२१२
गुरुवार, 05/16/2024 - 16:05 नवीन
अमरेंद्र बाहुबली अदानि किंवा अंबानी चे गोडवे गायला मी बसलेलो नाही कुठलाही मोठा उद्योग घ्या प्रतिष्ठित असलेला टाटा उद्योग समुह घ्या. समजा तुमच्या गावात त्यांनी कारखाना काढला तर त्यांची जी प्रत्यक्ष उलाढाल आणि अप्रत्यक्ष उलाढाल याचे मोज माप नाहीच करायचे का/ त्याचे स्थानिकांना काहीच फायदे होनार नाहीत का बर मग आना कम्युनिझम ... सुपडा साफ एकदाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

थोडा

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 05/16/2024 - 12:50 नवीन
जे रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे त्यातले किती रस्ते थेट गावपाड्यापर्यंत झाले आहेत आणि टोलमुक्त आहेत?
थोडा कालावधी तर हवाच ना टोब्या?. ५०/६० वर्शाचा बॅकलॉग भरुन काढायला वेळ लागणारच. सरकारतर्फे कामे करण्याचा प्रयत्न चालु आहे की नाही हे महत्वाचे असे आमचे मत. "We are now opening ethanol pumps," Gadkari further said and added that it would also empower Indian farmers to double up as 'urjadaata' (energy producer) while being 'anndaata' (food producer) as ethanol fuel can be produced from crops like sugarcan... नितिन गडकरी Read more at: https://www.deccanherald.com/india/indias-road-infrastructure-to-match-us-in-next-5-years-transport-minister-nitin-gadkari-2818886 विमानतळांची संख्या २०१४ मध्ये ७४ होती ती आता १४८ झाली. आता एखादा "आम्हाला बुवा लाल परीच परवडते' म्हणू शकतो पण आम्ही १२-१५ तास रेल्वे प्रवास करण्यापेक्षा विमानप्रवास पसंत करतो असे म्हणणारेही लाखात आहेत म्हणूनच मुंबई-दिल्ली,दिल्ली-चेन्नई,पुणे-बेंगळूरु वगैरे फ्लाईट्स बहुतेकवेळा सगळ्या भरलेल्या असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

तुम्हाला मुद्दा समजावून

सर टोबी
गुरुवार, 05/16/2024 - 14:08 नवीन
घ्यायचाच नाहीय. शिवडी न्हावाशेवा लिंक रोडची रहदारी तब्बल पाच हजार वाहने प्रतिदिन इतकी कमी झालीय. वंदे भारत गाड्या बळेच पळवल्या जात आहेत. त्यांच्यासाठी सामान्य लोकांच्या गाड्यांना कात्री लागते. कोविडच्या काळात मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस जी बंद केली ती अजून सुरु केली नाहीय. आता कोल्हापूरला प्रवासी विमानाने जातात अशी तुमची माहिती आहे का? विकास करतांना प्राथमिकता नावाचा काही निकष असतो कि नाही? तुम्हाला भले विमानं परवडत असतील पण हवाई चप्पल घालणाऱ्यांचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बैलगाड्या !

चौकस२१२
गुरुवार, 05/16/2024 - 15:47 नवीन
तुम्हाला भले विमानं परवडत असतील पण हवाई चप्पल घालणाऱ्यांचं काय? मग काय रेल्वे पण बंद करून बैलगाड्या आणूयात का एकूण वंदे भारत गाड्या किती एकूण रेल्वे च्या सर्वसाधारण गाड्या किती काय प्रमाण बघाल कि नाही ? हवाई चप्पल घालणारे आहेत म्हणून काय विमानतळे वाढवय्याची च नाहीत का? चांगली रेल्वे आणायचीच नाही का? वेग आणि एकूण दळणवळ सुटसुटीत कार्याचेच नाही का ? काय विचारानचा दळभद्री पणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

मग

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 05/16/2024 - 16:21 नवीन
विकास करतांना प्राथमिकता नावाचा काही निकष असतो कि नाही?
मग आय आय टीज, आय आय एम्स, इस्रो हे तरी कशाला हवे होते? अणु प्रकल्प तरी कशाला केले?आय आय टी खरग्पूरसाठी रशियाकढुन कर्ज घेतले होते. आय आय एम अहमदाबाद्साठी हार्वर्ड्/एम आय टीशी बोलणी करुन कर्ज घेतले होते. हाच खर्च तेव्हा प्रथमिक शिक्षणावर केला असता तर परिस्थिती जास्त सुधारली असती ?की नसती? निवडुन आलेले प्रत्येक सरकार आपली धोरणे ठरवते आणी राबवते. ७०च्या दशकात राजधानी एक्स्प्रेस तरी कशाला चालु केल्या होत्या?मुंबई-दिल्ली साधारण ट्रेन-२५० रुपये तर राजधानी ७५० रुपये(हे ८०च्या दशकातले दर आहेत). ही राजधानी मुंबई सेंट्रल स्थानकावरुन निघाली की मग बोरीवली/विरार गच्च भरलेल्या गाड्यांपेक्षा राजधानीला प्राधान्य दिले जायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

काय माई

सर टोबी
गुरुवार, 05/16/2024 - 17:12 नवीन
इतक्या दिवसांमध्ये मिळवलेली पत एका दिवसात धुळीला मिळवण्याचा चंग बांधला आहे का? तारतम्य नावाची काही गोष्ट असते की नाही? हायवे, विमानतळ, वंदे भारत गाड्या या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्जाचा बोजा वाढवला आहे. तो हलका करण्यासाठी ज्या प्रमाणात या सुविधा वापरल्या जायला हव्यात त्या प्रमाणात त्या वापरल्या जात नाहीत. याचा परिणाम म्हणजे ज्या सुविधा सहजच उपलब्ध असायला हव्यात त्या तशा मिळू शकत नाहीत. म्हणजे वंदे भारतमधून बाहेर पडलो की बंद पडलेले सरकते जीने, स्टेशनवरचे अस्वच्छ टॉयलेट्स. बरे या सुविधांचा तुम्हाला कल्पना येणार नाही अशा माणसांवर बोजा पडलेला असतो की जे कधी या सुविधा वापरू देखिल शकणार नाहीत. बाकी शाळा, महाविद्यालयांमध्ये केलेली गुंतवणूक एका समर्थ समाजाच्या निर्मितीमधून दिसून येते. ती एक स्वतःच परतफेड करणारी आणि नविन संसाधने निर्माण करू शकणारी गुंतवणूक असते. चर्चा करताना तारतम्य असावे अशी अपेक्षा आहे. तशी दिसून न आल्यास हा शेवटचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा