निर्णय चुकतात, चुकू द्यावे
श्रेय हुकतात, हुकू द्यावे
जगता जगता आयुष्याकडून
जुगारातले दान घ्यावे.
बंध सुटतात,सुटू द्यावे
माणसं तुटतात, तुटू द्यावे
जगता जगता नात्याकडून
आपुलकीचे फुल घ्यावे.
मार्ग चुकतात, चुकू द्यावे
रस्ते सरतात, सरु द्यावे
चालता चालता रस्त्याकडून
सावलीचे दान घ्यावे.
प्रश्न पडतात, पडू द्यावे
उत्तरं चुकतात,चुकू द्यावे
सोडवता सोडवता उत्तराकडून
ज्ञानाचे कण घ्यावे.
ध्येय हुकतात, हुकू द्यावे
अनुभव मुकतात, मुकू द्यावे
जगता जगता अनुभवाकडून
स्वत्वाचे भान घ्यावे.
------ अभय बापट
०५/०८/२०२३
प्रतिक्रिया
10 Aug 2023 - 7:23 am | कुमार१
उत्तम.
11 Aug 2023 - 7:53 pm | सागरसाथी
धन्यवाद
10 Aug 2023 - 10:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
11 Aug 2023 - 7:53 pm | सागरसाथी
धन्यवाद
10 Aug 2023 - 11:13 am | चौथा कोनाडा
खुप सुंदर रचना !
सगळंच कव्हर करणारे स्वगत वजा निश्चय उत्तमरित्या व्यक्त झालेला आहे !
11 Aug 2023 - 7:54 pm | सागरसाथी
धन्यवाद
10 Aug 2023 - 7:50 pm | मदनबाण
सु रे ख . . .
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Imagine Dragons - Bones (Official Music Video)
11 Aug 2023 - 7:54 pm | सागरसाथी
धन्यवाद
11 Aug 2023 - 1:01 am | प्रसाद गोडबोले
सुंदर कच्चा माल !
कॉलिंग @पैजारबुवा !
11 Aug 2023 - 7:55 pm | सागरसाथी
धन्यवाद
11 Aug 2023 - 9:02 pm | सुरिया
लैच जिंदगीची देवघेव करुन टाकली राव.
हे घ्यावे ते द्यावे.
इसरुन चालत राहावे
मनाशी बोलावे आपल्याच
पन ईतकं नाय लिव्हावे