पुस्तक खरेदी - काल आणि आज

rahul ghate's picture
rahul ghate in जनातलं, मनातलं
30 Jul 2023 - 9:51 pm

हा लेख अर्धवट लिहून मे मधेच ठेवला होता परंतु आत्ता पूर्ण केला त्यामुळे कदाचित असंबद्ध वाटू शकतो
हा माझा पहिलाच लेख असल्या मुळे लिखाणात व व्याकरणाच्या चुका होऊ शकतात त्यामुळे क्षमस्व

पुस्तक खरेदी - काल आणि आज

काल लेकाच्या शाळेत ( इयत्ता २ री ) पालक सभे साठी बोलावले होते, मी फिरस्ती वर असल्या मुळे सहसा हे खाते आमच्या कडे आमचे गृह खात च सांभाळते , वेळ असल्या मुळे ह्या वेळी मी गेलो .
शाळेत गेलो तर इतर काही सूचना व मार्गदर्शना नंतर मूळ मुद्दा आला कि पुस्तक विक्रेता शाळेत हजर असून पुस्तके २ दिवसात घेऊन टाका, त्या नंतर पुस्तक विक्रेत्या कडे जाऊन आणावी लागतील.
मग काय सूचना मिळताच पुस्तकाच्या दुकान समोर ( शाळेतच १ खोलीत त्याने दुकान मांडले होते ) पालकांची रांग लागली. FOMO च्या भीती ने व असा पण आज ना उद्या घ्यावीच लागतील असं म्हणून मी पण रांगेत लागलो, ५ मिनिट मध्ये माझा नंबर आला त्याला इयत्ता सांगितली , त्याने १ वह्या पुस्तकाचा गठ्ठा पुढ्यात ठेवला व किंमत सांगितली, UPI ने पैसे न दिले व गठ्ठा घेऊन निघालॊ.
घरी येताना माझं मन भूतकाळात गेले व माझी शालेय पुस्तक खरेदी आठवली. कुठल्या हि शाळकरी मुला साठी हि खरेदी एखाद्या सण उत्सवा पेक्षा कमी नसायची .
हा उत्सव बरेच दिवस चालायचा , पण ह्याची सुरवात व्हायची ते शाळा सुरु झाल्या वर २-३ दिवसांनी. शाळेत पहिले १५ दिवस फक्त १ रफ वही नेली तरी चालायचे . आधी मागच्या इयत्ते चे पुस्तके विकावी लागायची ( अर्थात लहान भावंडं त्या इयत्ते मध्ये नसतील तर ) . वर्ष भर जपून वापरलेली पुस्तके त्याच कव्हर काढताना वाईट वाटायचे पण कव्हर काढल्या वर ते नवीन दिसणार पुस्तक बघून अभिमान वाटायचा , अश्या पुस्तकांची किंमत पण थोडी जास्त भेटत असे.
आधी शेजारी -पाजारी किंवा परिसरातील कोणाला हि पुस्तक विकत हवी का ह्याची चौकशी व्हायची व गिर्हाईक भेटला तर थोड्या चांगल्या भावात जागेवर च पुस्तके विकली जात. नाही तर पुस्तके घेऊन जुना बाजार ची वारी करावी लागायची
शाळा उघडण्या च्या काळात ( सत्र सुरु होण्याला असेच म्हणत ) जुन्या बाजारात जत्रा च भरायची व खूप चिव चिवट असे , त्यामुळे च ह्या बाजाराला चिव चिव बाजार म्हणत.

CHIW CHIW BAJAR

चिव चिव बाजारात दुकानदार आधी पुस्तके उलटू पालटून चालायचा, कुठे पेन पेन्सिल चे मार्किंग असेल ते ३०% -४० % पैसे सांगायचं . चांगले दिसणारे स्वछ पुस्तके ५०% किमतीत घ्यायचा व विकताना ६० तो ७० % ने विकायचा. माझी पुस्तके दर वर्षी ५०% ने विकली जायची.
एकदा जुनी पुस्तके विकली की वेध लागायचे नवीन पुस्तकांचे , परंतु ते लगेच मिळत नसत . आता सारखी क्रेडिट कार्ड नसल्या मुळे हि खरेदी आप आपल्या वडलांच्या पगारा च्या तारखे नुसार होत असे. त्या मुळे शिक्षक पण ह्या बाबत जास्त कठोर होत नसत .
वाट पाहून पाहून एकदाचा तो पगाराचा दिवस उजाडे व आमची स्वारी सुभाष स्टोअर्स कडे वळे . वर्षभर सुस्त असलेले हे दुकान पण जून जुलै मध्ये कात टाकून (खरं तर बाहेर १ पलंग टाकून ) विद्यार्थ्यांची वाट पाहत असे.
शाळे कडून पुस्तकांची लिस्ट , वह्या चे १०० प्रकार असे काही नसे , दुकानात जाऊन फक्त इयत्ता सांगितली कि तो सगळे पुस्तक काढून समोर ठेवी , त्यात हि जर पैश्या ची काही अडचण असेल तर आवश्यक तेच पुस्तक घेतली जात व बाकी नंतर आनली जात. वह्या तर जेव्हा लागेल व जश्या लागेल तश्या १-१ आणल्या जात ( तोवर रफ वही जिंदाबाद ) , बर हि रफ वही म्हणजे पण वही नसे , तर मागच्या वर्षी च्या वह्यांचे उरलेले कोरे पान फाडून त्यांना शिवून १ वही तय्यार केली असे.
पुस्तके घरी आली कि महत्वाचे काम म्हणजे त्यांना कव्हर लावणे . खाकी कव्हर विकत घेणे परवडत नसे त्यामुळे घरच्या रद्दी पेपर ची नेमणूक ह्या कमी होत असे , त्यात पण रंगीत पुरवणी चे पान भाव खाऊन जाई . प्रत्येक कव्हर वेगळे असल्या मुळे नाव टाकायची पण गरज राहत नसे .

कव्हर लावण्या सोबत च ह्या वार्षिक उत्सवाची सांगता होत असे .
हे सगळं आठवत आठवत घर आल आणि मी ह्या नॉस्टॅल्जिया ( मराठी पर्यायी शब्द माहित नाही ) मधून बाहेर आलो .
आमच्या काळात शालेय पुस्तक खरेदी ही टेस्ट क्रिकेट सारखी धेर्याची परीक्षा घेणारी होती तर आता T-२० सारखी झटपट आहे , पण ह्या T-२० ला टेस्ट म्याच ची मजा नाही गड्या ...

रेखाटनस्थिरचित्रप्रकटन

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

31 Jul 2023 - 6:33 am | कर्नलतपस्वी

दुकानात जाऊन फक्त इयत्ता सांगितली कि तो सगळे पुस्तक काढून समोर ठेवी

१९६०च्या काळात घेऊन गेलात. आमच्याच वर्गातील मित्र गावातील एकमेव पुस्तक दुकानदाराचा मुलगा. हेवा वाटायचा. बहुतेक खरेदी उधारीवरच असायची.

पहिल्यांदाच जरी लिहीले असेल तरी प्रवाही आहे. थोडा आणखीन फुलवता आला असता.

rahul ghate's picture

1 Aug 2023 - 6:49 pm | rahul ghate

धन्यवाद ! मला पण नंतर जाणवला कि ह्याला अजून फुलवता आला असता , पुढील प्रयत्नात नक्की करेल .

लेखनाचा पहिलाच प्रयत्न चांगला आहे.
मराठीत लिहीताना हिंदीप्रमाणे 'फिरस्ती वर' ---'असल्या मुळे' ... 'मार्गदर्शना नंतर' -- 'कुठल्या हि' -- 'मुला साठी' असे दोन शब्द वेगवेगळे न लिहीता ते एकत्र लिहीण्याची पद्धत आहे. जसे: 'फिरस्तीवर' ---'असल्यामुळे' ... 'मार्गदर्शनानंतर' -- 'कुठल्याही' -- 'मुलासाठी' वगैरे.
तसेच "सहसा हे खाते आमच्या कडे आमचे गृह खात च सांभाळते" .... या वाक्यात 'खाते' आणि 'खात' (खात खात जाणे... सारखा अर्थ) चा जरा घोळ झालेला आहे. लेख प्रकाशित करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा सूक्ष्मपणे 'पूर्वपरिक्षण' करून आवश्यक त्या सुधारणा करणे बरे.

घरी येताना माझं मन भूतकाळात गेले व माझी शालेय पुस्तक खरेदी आठवली

सदर लेख आयुष्यातील प्रत्यक्ष घटनांवर आधारित असल्याने त्यातले जास्त बारकावे दिले तर वाचकास त्यांचे आकलन जास्त चांगल्या प्रकारे होणास मदत होते. उदाहरणार्थ वरील वाक्यातला 'भूतकाळ' म्हणजे नेमके किती साल वा कोणते दशक ? 'चिव चिव बाजार' हा कोणत्या गावात वा शहरात असायचा? आता 'लेकाची शाळा' त्याच शहरात आहे किंवा कसे, वगैरे. वाटल्यास प्रतिसादात ही माहिती द्यावी. शहराचे नाव, बालपणाचा काळ वगैरे दिल्यास अन्य मिपाकरांशी प्रत्यक्ष मैत्री होण्याची शक्यता पण वाढते, जे हल्लीच्या 'सबकुछ ऑनलाईन'च्या काळात जास्तच महत्वाचे झालेले आहे.
असो. पहिल्याच लेखाबद्दल अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.

rahul ghate's picture

1 Aug 2023 - 6:53 pm | rahul ghate

धन्यवाद ...एकत्र शब्द असायला पाहिजे होते. गाव/ साल मात्र मुद्दाम टाकले नव्हते जेणे करून प्रत्येक जण आपल्या परीने relate करू शकेल अस मला वाटलं.

अथांग आकाश's picture

1 Aug 2023 - 8:11 pm | अथांग आकाश

छान! लेख आवडला!!
शाळेचे दिवस आठवले!!!
0

सिरुसेरि's picture

1 Aug 2023 - 9:22 pm | सिरुसेरि

सुरेख आठवणी . या लेखामुळे सांगलीतील ताम्हनकर , तानवडे यांचबरोबर संकपाळ बूक डेपो आठवले . संकपाळ बूक डेपो मधे जुन्या पुस्तकांचीही खरेदी विक्री होत असल्यामुळे अनेकदा शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा तिकडेच कल असे .

रामचंद्र's picture

1 Aug 2023 - 11:48 pm | रामचंद्र

आज ऑनलाईन खरेदीच अंगवळणी पडलेल्या युवा पिढीला एका वेगळ्याच आनंदाची ओळख होईल. अशा प्रतिसादांमुळे स्थानिक इतिहासालाही (लोकल हिस्टरी) अल्पशी मदत होते. आताच्या काळात दोन पिढ्यांमधला संदर्भ-दुवे झपाट्याने निखळू लागले असताना याचं महत्त्व विशेष आहे.

विवेकपटाईत's picture

2 Aug 2023 - 12:41 pm | विवेकपटाईत

दिल्लीत ११ बोर्डाची पुस्तके १९७७ पर्यंत पुस्तके बदलल्या गेली नाही. ८ वी पर्यंत मला नेहमी च माझ्या पूर्वी सहा-सात मुलांनी वापरलेली पुस्तके मिळायची. त्यावेळी नववी दहावी अकरावी तिन्ही वर्षांचा कोर्स बोर्ड मध्ये यायचा आणि पुस्तके जाडजूड असायची. एकच पुस्तक तिन्ही वर्षांच्या कामी यायचे. मी माझी मोठी बहीण आणि एक शेजारीण एकच पुस्तक वापरात असू.

श्वेता व्यास's picture

3 Aug 2023 - 11:30 am | श्वेता व्यास

छान लिहिले आहे, पुस्तकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
साधारण पाचवी सहावीनंतर नवीन पुस्तक आणले की आधी मराठीचे पुस्तक उघडून काही धडे कथास्वरूपात वाचून काढले जायचे.
सगळी पुस्तकं चाळून व्हायची पण भूगोलाचं पुस्तक शाळेतच तासाला पहिल्यांदा उघडलं जायचं :)
एक मात्र कायम वाईट वाटलं की माझ्या अभ्यासक्रमाची आमची दर वर्षी शेवटची बॅच असायची, नंतरच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलत असल्याने पुस्तके खूप चांगल्या अवस्थेत असूनही कोणा गरजूला देता आली नाही.

मस्त! शालेय जीवनातील वह्या-पुस्तके, युनिफॉर्म, दप्तर आणि गमबूट-रेनकोटची खरेदी फ्लॅशबॅक प्रमाणे डोळ्यांसमोर तरळून गेली.
नविन पुस्तकांचा तो हवाहवासा वाटणारा सुवास तर अविस्मरणीय!
लिहिते रहा 👍

आंद्रे वडापाव's picture

3 Aug 2023 - 2:19 pm | आंद्रे वडापाव

b