ताज्या घडामोडी जून २०२३

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
13 Jun 2023 - 9:28 pm

उत्तर प्रदेशात मिर्झापूर जिल्ह्यात एके ठिकाणी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची स्तुती केली म्हणून संतापून जाऊन अमजद खान या टॅक्सी ड्रायव्हरने राजेश दुबे या व्यक्तीची हत्या केली आहे. त्याबद्दल अमजद खानला पोलिसांनी अटक केली आहे.

https://www.newindianexpress.com/nation/2023/jun/13/taxi-driver-held-for...

समजा हीच परिस्थिती उलटी असती तर काय झाले असते? समजा मोदींवर टीका केली (किंवा राहुल, केजरीवाल, ममता वगैरेंची स्तुती केली म्हणून) कोणी एखाद्याला ठार मारले असते तर प्रचंड गदारोळ उडाला असता हीच शक्यता जास्त. भारतात असहिष्णुता किती वाढली आहे म्हणून जगभर बोंब मारली गेली असती. मोदी सत्तेत आल्यानंतर माणसामाणसातले संबंध कसे बिघडले आहेत यावर कोणीकोणी फेसबुक पोस्ट लिहिल्या असत्या. शेवटी मोदींनी राजीनामा द्यावा असती मागणी झाली असती. पण कोणा अमजद खानने राजेश दुबेला मोदी आणि योगी यांची स्तुती केली म्हणून ठार मारले आहे. मग काय? चिडिचूप शांतता.

प्रतिक्रिया

डँबिस००७'s picture

15 Jun 2023 - 12:43 am | डँबिस००७

कोणी कानात येऊन सांगीतल ?
BBC ला निर्दोष ठरवण्याचा अट्टहास का ?
भाजपा सरकारने BBC वर केसच टाकलीय ना ? पण ह्या अगोदर भारतात अस झालेलच नाही अस म्हणण असेल तर ते चुक आहे कारण कॉग्रेसने BBCला चक्क दोन वर्षांसाठी बँन केलेल होत. ते सुद्धा ईमरजेंसी नसताना.
BBC ने कर चोरी केली आहे हे भारताच्या IT Deptच म्हणण आहे.
BBC ने टँक्स चोरी केलेलीच नाही अस म्हंटल तरीही BBC काही निर्दोष ठरणार नाही. BBC वर कायदेशीर कारवाई होणारच.
Wion News :
Media giant British Broadcasting Corporation (BBC) has acknowledged it may have paid lower taxes in India, a report by Hindustan Times has claimed. Two officials from the Central Board of Direct Taxes (CBDT) said BBC paid lower taxes than its actual liability, said the report.

BBC ला निर्दोष ठरवण्याचा अट्टहास का ?

चचच. उलटे झाले. मी दोषी किंवा निर्दोश ठरवत नाहीच आहे. तुम्हीच दोषी आहे असे म्हणून मोकळे झाला. WION ची बातमी नक्की आहे का सांगता टेट नाही. कारण नंतर दुसऱ्या it ऑफिसर ने हे रिपोर्ट खरे नसल्याचे सांगितले आहे. वर सुबोध खरेंना प्रतिसाद दिलाय तो वाचा.

डँबिस००७'s picture

15 Jun 2023 - 12:43 am | डँबिस००७

कोणी कानात येऊन सांगीतल ?
BBC ला निर्दोष ठरवण्याचा अट्टहास का ?
भाजपा सरकारने BBC वर केसच टाकलीय ना ? पण ह्या अगोदर भारतात अस झालेलच नाही अस म्हणण असेल तर ते चुक आहे कारण कॉग्रेसने BBCला चक्क दोन वर्षांसाठी बँन केलेल होत. ते सुद्धा ईमरजेंसी नसताना.
BBC ने कर चोरी केली आहे हे भारताच्या IT Deptच म्हणण आहे.
BBC ने टँक्स चोरी केलेलीच नाही अस म्हंटल तरीही BBC काही निर्दोष ठरणार नाही. BBC वर कायदेशीर कारवाई होणारच.
Wion News :
Media giant British Broadcasting Corporation (BBC) has acknowledged it may have paid lower taxes in India, a report by Hindustan Times has claimed. Two officials from the Central Board of Direct Taxes (CBDT) said BBC paid lower taxes than its actual liability, said the report.

विवेकपटाईत's picture

15 Jun 2023 - 8:21 am | विवेकपटाईत

आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या मीपावचे ज्येष्ठ सदस्य श्री विवेक पटाईत पंधरा दिवसांपूर्वी सकाळी उठताना खाली पडले होते. एक्स-रे आणि एमआरआय केल्यानंतर कळले. त्यांच्या पेल्विस मध्ये हेअर लाईन फ्रॅक्चर झाले. L४ आणि L५ मधली नस दबल्या गेली. ते बेड रेस्ट वर आहे. खुर्चीवर बसून टंकन करण्यासाठी किमान महिनाभर अजून लागेल. तूर्त मीपाव त्यांचा प्रतिगामी आणि बूर्जवा विचारांपासून वंचित आहे याचे त्यांना भयंकर दुःख होत आहे. लवकरच पुन्हा येईल.

काळजी घ्या सर.. लवकर बरे होऊन पुन्हा लिहा.

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Jun 2023 - 9:05 am | चंद्रसूर्यकुमार

काळजी घ्या काका. लवकर बरे व्हा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2023 - 9:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काळजी घ्या. लवकर बरे व्हाल. मिपावर काही दिवस वाचनमात्रच राहा, लिहावे वाटलेच व्हाइस मेसेज करून प्रतिसाद लिहा. तब्यतीत लवकर लवकर सुधारणा होईल...!:)

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

15 Jun 2023 - 10:24 am | मुक्त विहारि

लवकर बरे व्हाल

वामन देशमुख's picture

15 Jun 2023 - 11:08 am | वामन देशमुख

काळजी घ्या व लवकर बरे व्हा.

कपिलमुनी's picture

15 Jun 2023 - 1:01 pm | कपिलमुनी

उत्तम दीर्घारोग्यासाठी शुभेच्छा

चित्रगुप्त's picture

15 Jun 2023 - 6:56 pm | चित्रगुप्त

बापरे. उठताना खाली पडणे हे जरा अश्चर्याचे वाटले. काळजी घ्या आणि लवकर बरे होऊन लिहायला लागा.

कंजूस's picture

17 Jun 2023 - 12:59 pm | कंजूस

निर्गुंडी पाल्याचा गरम शेक द्या. सूज आणि वातनाशक औषधी.

श्रीगुरुजी's picture

15 Jun 2023 - 6:04 pm | श्रीगुरुजी

सुरक्षा मिळविण्यासाठी बनाव रचला

संजय राऊतला तुरूंगात टाकल्यानंतर सरकारी सुरक्षा काढून घेण्यात आली होती. तुरूंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर सुरक्षा पूर्ववत करण्यात आली नाही. त्यामुळे सुरक्षा परत मिळावी यासाठी फोनवरून धमकी देण्याचा बनाव रचण्यात आला. धमकी देणारा संजय राऊतचा निकटवर्तीय असून राष्ट्रवादी काँग्रेसचेआ कार्यकर्ता असल्याचे उघड झाले आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Jun 2023 - 9:26 pm | चंद्रसूर्यकुमार

खलिस्तान नेता अवतारसिंग खांडावर परवा लंडनमध्ये कोणा अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केला. त्यानंतर तो व्हेंटिलेटरवर होता. काल तो तिथेच वर पोचला. लंडनमध्ये भारतीय दूतावासावर निदर्शने करून तिरंगा उतरविण्यात त्याचा हात होता. अमृतपालसिंगचाही तो साथीदार होता. https://www.thehindu.com/news/national/panjwars-killing-in-lahore-remini...

मागच्या महिन्यात लाहोरमध्ये खलिस्तान कमांडो फोर्सचा परमजीत सिंग पंजवारचीही कोणा अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. २०२० मध्ये खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या हरमित सिंगचीही लाहोरमध्ये कोणा अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती त्याच पध्दतीने परमजीतसिंग पंजवारची हत्या केली गेली. मार्च २०२२ मध्ये कंदाहार अपहरण प्रकरणातील झहूर मिस्त्रीची कोणा अज्ञात व्यक्तींनी कराचीत गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याच हरामखोराने मधुचंद्रावरून परत येणार्‍या रूपीन कट्यालला गळा चिरून ठार मारले होते.

एकूणच या अज्ञात व्यक्ती भलत्याच 'क्युट' दिसतात.

रात्रीचे चांदणे's picture

16 Jun 2023 - 9:57 pm | रात्रीचे चांदणे

म्हणूनच २०२४ ला मोदीच परत पाहिजे

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Jun 2023 - 11:15 am | चंद्रसूर्यकुमार

आणखी एक खलिस्तानी नेता आणि भारत सरकारने 'मोस्ट वॉन्टेड' जाहीर केलेला दहशतवादी हरदीपसिंग निज्जारला कॅनडात ब्रिटिश कोलंबियामध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून ठार मारले आहे. https://www.indiatoday.in/world/story/khalistani-terrorist-hardeep-singh... या अज्ञात व्यक्ती भलत्याच आवडतात बघा.

आग्या१९९०'s picture

17 Jun 2023 - 12:38 am | आग्या१९९०

दाभोलकर, पानसरेंचे खुनी कधी ढगात घालवणार?

श्रीगुरुजी's picture

17 Jun 2023 - 7:05 am | श्रीगुरुजी

खरे खुनी सापडल्यानंतर.

वामन देशमुख's picture

17 Jun 2023 - 9:45 am | वामन देशमुख

दाभोलकर, पानसरेंचे खुनी कधी ढगात घालवणार?

तुम्हाला माहित आहेत का खुनी?

श्रीगुरुजी's picture

17 Jun 2023 - 9:50 am | श्रीगुरुजी

दाभोळकरांच्या खुनानंतर तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने तपास भरकवटून चुकीच्या दिशेने नेऊन खुन्यांना सुखरूप पळून जाण्यास मदत केली होती. आता १० वर्षांनंतर खरे खुनी सापडणे अशक्य आहे.

वामन देशमुख's picture

17 Jun 2023 - 1:34 pm | वामन देशमुख

---

मोदी सरकारची कामगिरी

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी मोठी माहिती समोर येत असून, गेल्या पाच महिन्यांत मराठवाड्यातील तब्बल 391 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे मार्चपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देण्यात येणारी एक लाख रुपयांची मदत मिळत नसल्याचे समोर आले आहेत. तर या मदतीसाठी प्रशासनाने आता सरकारकडे निधीची मागणी केली आहे. मार्चपासून निधीच न मिळाल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना छदामही मिळालेला नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jun 2023 - 9:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या भाजपा खासदार ब्रीजभूषणांवरचा 'पोक्सो' चा गुन्हा रद्द झाला आणि इतर गुन्ह्याबाबत पोलीस चौकशी करणार वगैरे सोपस्कार. महिला कुस्तीपटूंनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर, न्यायालयीन सुनावणीनंतर दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता.

आता व्यवस्थेच्या हालचाली पाहिल्यावर पूर्वीच्या पाच पन्नास गुन्हे असलेल्या ब्रीजभूषण यांच्यावर अजून चार-पाच गुन्ह्यांची भर पडली इतकाच तो अर्थ. सरकारात वजनाबरोबर, भरमसाठ संपत्ती, आणि लोकांचं पाठबळही असलं पाहिजे की अक्षम्य गुन्हे जरी केले तरी व्यवस्थेने माफ़ केले पाहिजे. भाजपाची येत्या नव्या निवडणूकीत खासदारांची यादी यायची आहे पण ब्रीजभूषण यांनी आपण कैसरजंगमधून निवड्णूक लढविणार असल्याची घोषणाही करुन टाकली.

महिलांना-युवतींना येनकेन निमित्ताने स्पर्श करणारे अनेक विकृत आहेत. शोषण करणारे आहेत, सर्व त्रास सहन करणा-या देशात कित्येक स्त्रीया असतील. काहींनी अशांना विरोध केला असेल, काहींना वठणीवर आणले असेल. काहींनी ते सहन केले असेल. आपण अशा नालायकांच्या विरोधात लढणा-यांना पाठबळ देत राहू.

पोलीस ब्रिजभूषणला तेव्हाच रोखू शकले असते!

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

18 Jun 2023 - 1:30 pm | श्रीगुरुजी

ब्रिजभूषणला शिक्षा झालीच पाहिजे. आपण वारंवार मिपाकर याविषयी लिहिता याबद्दल अभिनंदन.

एका महिलेला खांद्याला धरून ढकलून देणारा एक टपोरी गुंड व एका महिलेला आईबहिणीवरून अर्वाच्य शिव्या देणारा एक दुसरा गुंड यांच्याविषयी आपण कधी लिहिणार?

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Jun 2023 - 10:06 am | चंद्रसूर्यकुमार

आज १९ जून. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी विधानपरिषद निवडणूक झाली होती आणि त्यात सेनेची मते फुटून मविआ उमेदवाराचा पराभव झाला होता. त्याच्याच दुसर्‍या दिवशी म्हणजे २० जून रोजी एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सुरवातीला सुरतला आणि तिथून गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे उबाठासेना २० जून हा जागतिक गद्दारदिन म्हणून मानणार आहे.

मी शाळेत असताना मित्रांबरोबर आमच्या बिल्डींगच्या गच्चीत अंडरआर्म क्रिकेट खेळायचो. बर्‍याचदा आमच्या टीमने वर्ल्ड कपही जिंकला होता.

या दोन गोष्टींचा दुरान्वयानेही संबंध नाही बरं का. वाटल्यास तो योगायोग समजावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2023 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> २० जून हा जागतिक गद्दारदिन म्हणून मानणार आहे.

गद्दारी, फंदाफितुरी, याबाबत देशाच्या इतिहासात असंख्य घटना नोंदी आहेत. जागतिक 'गद्दारदिना' ऐवजी जागतिक 'खोकेदिन' म्हणून वीस जून साजरा झाला पाहिजे, कारण या दिवसांपासून 'खोक्यांचे' महत्व वाढले आहे.

-दिलीप बिरुटे

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Jun 2023 - 3:52 pm | चंद्रसूर्यकुमार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांची संयुक्त आघाडी बनविण्याच्या दृष्टीने २३ जूनला पाटण्यामध्ये विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. त्या बैठकीच्या आधीच काँग्रेस विरूध्द आप आणि काँग्रेस विरूध्द तृणमूल अशी कुस्ती बघायला मिळत आहे.

आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी काँग्रेसला ऑफर दिली आहे की काँग्रेसने दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणुक लढवू नये. त्याबदल्यात त्यांचा पक्ष मध्य प्रदेश, राजस्थान अशा राज्यांमध्ये निवडणुक लढविणार नाही आणि काँग्रेसला पाठिंबा देईल. हा मुद्दा मी मागे पण मांडला होता. या स्थानिक नेत्यांना आपापल्या राज्यात आपल्या पक्षाला मोकळे रान हवे आहे आणि ते काँग्रेसला आपल्या क्षेत्रात सामावून घ्यायला तयार नाहीत. मागे ममतांनी पण हेच म्हटले होते. काँग्रेसने बंगालमध्ये निवडणुक लढवू नये. त्या बदल्यात त्या इतर राज्यात काँग्रेसला पाठिंबा देतील. आपने मध्य प्रदेश वगैरे राज्यांमध्ये काँग्रेसला पाठिंबा देणे, तृणमूलने दुसर्‍या कोणत्या राज्यात (उदाहरणार्थ कर्नाटक) काँग्रेसला पाठिंबा देणे याचा नक्की कितपत उपयोग आहे?त्यांची राज्ये सोडली तर या नेत्यांची क्षमता इतर राज्यात किती मते फिरवायची आहे? मग या नेत्यांनी इतर कोणत्याही राज्यात कोणालाही पाठिंबा दिला काय आणि दिला नाही काय त्याचा कितपत फरक पडणार आहे? आपच्या या ऑफरवर काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ म्हणाले की सौरभ भारद्वाजांनी नैराश्यातून हे वक्तव्य केले आहे. https://www.abplive.com/news/india/congress-leader-gaurav-vallabh-attack...

आज केजरीवालांची राजस्थानात श्रीगंगानगरला सभा होती. तिथे जायच्या रस्त्यावर काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची पोस्टर लावली होती. हा केजरीवालांची सभा अपयशी व्हावी यासाठी गेहलोतांनी केलेला प्रयत्न आहे आणि ही एक 'नीच हरकत' आहे असा हल्ला केजरीवालांनी गेहलोतांवर केला. केंद्र सरकारने दिल्ली सरकारच्या अधिकारांवर मर्यादा आणणारा अध्यादेश काहीही झाले तरी राज्यसभेत पाडायचा यासाठी केजरीवाल कंबर कसून उभे आहेत. अशावेळेस त्यांना काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. तेव्हाच काँग्रेसबरोबर ही फ्रीस्टाईल कुस्ती होत आहे हे विशेष.

बंगाल विधानसभेत काँग्रेसचा एकमेव आमदार होता. सागरदिही विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत तो जिंकला होता. ही फार जुनी गोष्ट नाही. चारेक महिने त्या पोटनिवडणुकीला झाले असावेत. आपली जागा काँग्रेसने जिंकल्याने ममता खवळल्या होत्या. आता तोच आमदार तृणमूलमध्ये सामील झाला आहे. म्हणजेच काय तर भविष्यात दोन पक्षांमध्ये सहकार्य व्हावे यासाठी जागा मोकळी ठेवायची असेल तर त्याच पक्षाच्या आमदारांना फोडू नये हे पण भान ममतांकडे नव्हते. असे म्हणायचे की ममतांना काँग्रेसबरोबर सहकार्य नकोच आहे असे म्हणायचे? ममतांनी काँग्रेसबरोबर आघाडीची शक्यता नाकारली आहे पण राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस सोडून इतर विरोधी पक्षांच्या आघाडीचा भाग व्हायला तृणमूल तयार आहे असेही म्हटले. https://www.livemint.com/news/india/congress-aligned-with-bjp-in-bengal-...

बघू २३ तारखेला काय होते ते.

सुबोध खरे's picture

19 Jun 2023 - 8:04 pm | सुबोध खरे

हायला

हे तर जगजाहीर आहे तुम्ही नवीन कोणता शोध लावला?

मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांच्या नेतृत्वात काम करतात - आशिष देशमुख

१०५ एके काळी "घरी बसलेले" आमदार कुणाचे आहेत? शिवसेनेचे कि भाजपचे?

मग मोठा नेता कोण?