ताज्या घडामोडी जून २०२३

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
13 Jun 2023 - 9:28 pm

उत्तर प्रदेशात मिर्झापूर जिल्ह्यात एके ठिकाणी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची स्तुती केली म्हणून संतापून जाऊन अमजद खान या टॅक्सी ड्रायव्हरने राजेश दुबे या व्यक्तीची हत्या केली आहे. त्याबद्दल अमजद खानला पोलिसांनी अटक केली आहे.

https://www.newindianexpress.com/nation/2023/jun/13/taxi-driver-held-for...

समजा हीच परिस्थिती उलटी असती तर काय झाले असते? समजा मोदींवर टीका केली (किंवा राहुल, केजरीवाल, ममता वगैरेंची स्तुती केली म्हणून) कोणी एखाद्याला ठार मारले असते तर प्रचंड गदारोळ उडाला असता हीच शक्यता जास्त. भारतात असहिष्णुता किती वाढली आहे म्हणून जगभर बोंब मारली गेली असती. मोदी सत्तेत आल्यानंतर माणसामाणसातले संबंध कसे बिघडले आहेत यावर कोणीकोणी फेसबुक पोस्ट लिहिल्या असत्या. शेवटी मोदींनी राजीनामा द्यावा असती मागणी झाली असती. पण कोणा अमजद खानने राजेश दुबेला मोदी आणि योगी यांची स्तुती केली म्हणून ठार मारले आहे. मग काय? चिडिचूप शांतता.

प्रतिक्रिया

बावडी बिल्डर's picture

13 Jun 2023 - 9:55 pm | बावडी बिल्डर

जाहीरातीवरून भाजप नी शिवसेनेत जूंपलीय. एकनाथ शिंदेच पूढील मामू हवेत असं जाहीरात सांगतेय. जाहीरातीत बाळासाहेब नी फडणवीस नाहीत. एकनाथ शिंदे दिल्लीशी दोस्ती करून राज्य भाजपला शह देताहेत. शिंदेंच्या चाली फडणवीसांनी कळत नाहीयेत किंवा कळूनही शिंदेंवर दिल्लीचा असलेला आशिर्वाद त्याना काही करू देत नाहीये. एकंदरीत शिंदे मोशाना खूश करून राज्यात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या प्रयत्नात दिसताहेत. फडणवीस कधीहा शिंदेंचा खडसे, बावनकूळे, तावडे करू शकतात हे शिंदे जाणून आहेत. पाहूयात पूढे काय होतं ते.

वामन देशमुख's picture

13 Jun 2023 - 10:29 pm | वामन देशमुख

चिडिचूप शांतता.

यासंबंधात / हे बदलण्यासाठी -

वर्षानुवर्षे पूर्ण बहुमतात असलेल्या संघप्रणित भाजप सरकारने काय केले आहे?

काय करायला हवे होते तुमच्या मते ?

वामन देशमुख's picture

13 Jun 2023 - 10:51 pm | वामन देशमुख

काय करायला हवे होते तुमच्या मते ?

भाजप समर्थकांवर

समजा मोदींवर टीका केली (किंवा राहुल, केजरीवाल, ममता वगैरेंची स्तुती केली म्हणून) कोणी एखाद्याला ठार मारले असते तर प्रचंड गदारोळ उडाला असता हीच शक्यता जास्त. भारतात असहिष्णुता किती वाढली आहे म्हणून जगभर बोंब मारली गेली असती. मोदी सत्तेत आल्यानंतर माणसामाणसातले संबंध कसे बिघडले आहेत यावर कोणीकोणी फेसबुक पोस्ट लिहिल्या असत्या. शेवटी मोदींनी राजीनामा द्यावा असती मागणी झाली असती. पण कोणा अमजद खानने राजेश दुबेला मोदी आणि योगी यांची स्तुती केली म्हणून ठार मारले आहे. मग काय?

असे लिहिण्याची पाळी येऊ नये इतके तरी करायला हवे होते.

अर्थात, माझे भाजपाला / काँग्रेसला समर्थन आहे असे नाही / नाही असे नाही, पण वर्षानुवर्षे पूर्ण बहुमतातील सरकार हातात असूनही जर आपल्या समर्थकांवर असे रडगाणे गाण्याची पाळी येत असेल तर मग वर्षानुवर्षे पूर्ण बहुमतातील सरकार हातात असण्यात काय अर्थ आहे?

बावडी बिल्डर's picture

13 Jun 2023 - 11:10 pm | बावडी बिल्डर

+१
अश्या घटनांचं भाढवल करून मते कशी मागनार मग?

कॉमी's picture

14 Jun 2023 - 9:05 am | कॉमी

नाही, तुम्हाला काही सुचते आहे का त्यांनी करण्यासारखे ? नाही, म्हणजे गुन्हे होऊ नयेत असे काहीतरी करावे हे म्हणणे तर सगळ्यांना मान्यच असणार. पण काय ?

गवि's picture

14 Jun 2023 - 9:15 am | गवि

:-)

वामन देशमुख's picture

14 Jun 2023 - 9:37 am | वामन देशमुख

तुम्हाला काही सुचते आहे का त्यांनी करण्यासारखे ?

हो, सुचतंय.

१. राजदीप सरदेसाई यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात एका ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या मृत्यूची साफ दिशाभूल करणारी बातमी दिली होती. राजदीप सरदेसाई यांच्या कंपनीने त्यांना काही काळ निलंबित केले होते. पण सरकारने राजदीप सरदेसाई यांच्यावर काहीही कारवाही केली नाही. अफवा पसरवण्याबद्धल किंवा इतर तत्सम गुन्हयांबद्धल सरकारने त्यांना कायदेशीर मार्गाने शिक्षा द्यायला होती.

२. मुश्रीफ नामक एका सरकारी अधिकाऱ्यांनी , "२००८ चा मुंबई हल्ला रा स्व सं ने घडवून आणला" अश्या आशयाचे पुस्तक लिहिले होते ते आजही बाजारात उपलब्ध आहे. त्यांनी तशा आशयाची अनेक भाषणेही दिली होती. सादर आशय भारतातील कायदेशीर प्रक्रियेतून निघालेल्या निष्कर्षाशी पूर्णतः विरुद्ध होता. हा हल्ला पाकिस्तानने घडवून आणला होता. पण सरकारने मुश्रीफ यांच्यावर काहीही कारवाही केली नाही. अफवा पसरवण्याबद्धल किंवा इतर तत्सम गुन्हयांबद्धल सरकारने त्यांना कायदेशीर मार्गाने शिक्षा द्यायला होती.

वामन देशमुख's picture

14 Jun 2023 - 9:38 am | वामन देशमुख

कायदेशीर मार्गाने शिक्षा द्यायला होती.

कायदेशीर मार्गाने शिक्षा द्यायला हवी होती.

असे वाचा.

कायदा बनवताना काही तत्वानुसार बनवावा लागतो. एकोळी घटनेवर नाही. चुकीची बातमी चालवणे हा गुन्हा आहे का ? का जाणूनबुजून चुकीची बातमी चालवणे हा गुन्हा आहे ?

मग फक्त बातमीच का ? सिनेमा मध्ये चुकीचे आकडे दाखवणे हा सुद्धा त्या कायद्यात गुन्हा होणार का ? व्हॉट्स ॲप वर चुकीचे मेसेज पसरवणे हा पण गुन्हा होणार का ?

आणि, सदर ड्रायव्हर घटनेचा राजदीप किंवा मुश्रीफ ह्यांच्याशी काय संबंध हे सुद्धा समजले नाही.

वामन देशमुख's picture

14 Jun 2023 - 11:03 am | वामन देशमुख

हे फारच सुलभीकरण झाले असे मला वाटते.

मला तसे वाटत नाही.

डँबिस००७'s picture

13 Jun 2023 - 11:29 pm | डँबिस००७

तथाकथीत "पप्पु" भारत सरकारच्या तोंडचे पाणी पळवत आहे.

अमेरिकेच्या यशस्वी दौर्यानंतर राहुल गांधींची व्हाईट हाउस मध्ये गोपनीय मिटींग झाली. ह्या मिटींग मध्ये रिजीम चेंज फेम "डोनाल्ड लु" होते. मोदी सरकारला उलथवुन कॉग्रेस सरकार आणण्यासाठी राजकुमारानी कंबर कसलेली आहे.

मोदी व शहांच्या सरकारला ह्या पप्पु राजकुमाराने मोठे आव्हान दिलेले आहे

श्रीगुरुजी's picture

14 Jun 2023 - 12:31 am | श्रीगुरुजी

कसलं आव्हान?

अम्मा पकोडा की डेमोक्रसी खतरे मे?
https://www.youtube.com/watch?v=-eg5GblP6dE

डँबिस००७'s picture

14 Jun 2023 - 10:56 pm | डँबिस००७

डोंबलाच आव्हान !

राहुल गांधीची पाठ राखण करायला,
जॅक डॉरसी लगेच बिळातुन बाहेर आला !

एका बाजूला धूर दिसला की दुसरीकडे उड्या मारणे सुरू. एकीकडे आग तर दुसरीकडे उकळ्या फुटतात. आणि सध्या वारे जोरात वाहात आहेत.

सर टोबी's picture

14 Jun 2023 - 2:33 am | सर टोबी

कि काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा धागा. गेले काही महिने आरती ओवाळण्यासारखं काही घडत नाही म्हणून हे मोदी सहस्त्र नामाचे धागे अनियमित झाले आहेत. आणि राजकारणातले जाणकार समजले जाणारे अशा पोरकट तर्काचा आधार घेऊन भारतातली सहिष्णुता अबाधित आहे असा निष्कर्ष काढत आहेत.

तिकडे योगी अगदी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाली नाही असे सांगून जेव्हा मुसलमानांची घरे बेचिराख करतात तेव्हा कोण मोदींवर सार्वजनिक ठिकाणी टीका करणार आहे?

वामन देशमुख's picture

14 Jun 2023 - 5:44 am | वामन देशमुख

तिकडे योगी अगदी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाली नाही असे सांगून जेव्हा मुसलमानांची घरे बेचिराख करतात तेव्हा कोण मोदींवर सार्वजनिक ठिकाणी टीका करणार आहे?

नक्की?

माझ्या माहितीप्रमाणे, योगी हे गुन्हेगारांमध्ये धर्माधारित भेदभाव करत नाहीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jun 2023 - 9:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्वीटरचे सहसंस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डार्सी यांनी दोन वर्षापूर्वी झालेल्या शेतक-याच्या आंदोलनासंबंधी मजकूर न हटवल्यास भारतातील भारतातील ट्वीटर कार्यालये बंद करण्याचा इशारा भारत सरकारने दिल्याचा दावा केला तर, डार्सी हे खोटं बोलत असल्याचे प्रतिक्रिया केंद्राने दिली. (लोकसत्ता)

-दिलीप बिरुटे

ह्यात काहीही अविश्वसनीय वाटत नाही. २०२१ मध्ये सरकारने समाजमध्यामांचा "माध्यम (intermediary)" दर्जा काढून टाकणार असे पसरले होते. तसे झाले नाही, कारण दिलेल्या वेळेत समाजमाध्यमानी नियम पाळले. पण ही माध्यमे काही दिवसात भारतात बंद होतील अशी परिस्थिती आली होती.

डॉक. काढली त्यानंतर लगेच BBC वर धाड पडली हे पण पाहिले आहे. त्यामुळे ट्विटर कर्मचाऱ्यांवर रेड टाकू असे म्हणणे सुद्धा काय फार अविश्वसनीय नाही.

श्रीगुरुजी's picture

14 Jun 2023 - 10:34 am | श्रीगुरुजी

According to Jack Dorsey, during the farmers’ protest, India asked Twitter to take down nearly 1,200 accounts for alleged links to the “Khalistan” movement, a decades-long and often violent campaign for a separate Sikh homeland.

At the height of the farmers' protests against a series of agriculture reform laws, the government had asked Twitter to remove tweets it believed that had used an incendiary hashtag, and accounts it alleged were used by Pakistan-backed Sikh separatist groups.

The request came after the largely peaceful protest had been jolted by violence on 26 January 2021, which left one person dead and hundreds of policemen injured.

जर सरकारने अशी विनंती केली असेल तर तो अत्यंत योग्य निर्णय होता. देश पेटविणाऱ्यांना रोखायचे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली देशद्रोह्यांना देश पेटवून द्यायचा? एखाद्या शहरात दंगल पेटली असेल तर अफवा पसरून वातावरण अजून चिघळू नये यासाठी आंतरजाल सेवा काही काळासाठी बंद केली जाते, संचारबंदी लावली जाते. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला, संचारस्वातंत्र्याची गळचेपी, दडपशाही असा आरडाओरडा होतो का? मग ट्विटरसंबंधात कांगावा का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jun 2023 - 10:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

’आकाशवाणी पुणे, मृदुला घोडके प्रादेशिक बातम्या देत आहे’ अशी सुरुवात असलेल्या पुणे केंद्राच्या आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्या कितीतरी वर्ष नियमित ऐकल्या आहेत. बातम्या ऐकणारे कितीतरी श्रोते असतील. आता काळाच्या ओघात सध्याही चोवीस लाख श्रोते असलेल्या पुणे केंद्राची स्थापना १९५३ ला झाली. चाळीस वर्षापासून नियमित्र बातम्यांचं प्रसारण व्हायचं तो प्रादेशिक वृत्त विभाग आता बंद होत आहे. भारतीय सेवेचा माहिती अधिकारी नाही म्हणून वृत्त विभाग बंद होत आहे. आता या बातम्या छत्रपती संभाजीनगरहून दिल्या जातील असे वृत्त आहे.

आकाशवाणी पुणे
तर फ़ेसबूकवर आकाशवाणी वृत्त इथे.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2023 - 11:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आकाशवाणी पुणेचा प्रादेशिक वृत्त विभागा बंद करण्याच्या निर्णयाला माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली त्यामुळे या पुढेही आकाशवाणी पुणे केंद्रावरुन दिले जाणारे प्रादेशिक वृत्त पुढेही सुरु राहील. धन्यवाद.

बंद करण्याच्या निर्णयावरुन अनेक मराठी माणसांनी, नेत्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. असंख्य मराठी प्रेमी नेत्यांनी पाठपुरावा केला होता. त्याबाबतही श्रेयवादाचे सूर दिसत होते. असं, सगळं असलं तरी एक उत्तम निर्णय झाला.

निर्णयाचा आनंद वाटला. !

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

14 Jun 2023 - 10:40 am | सुबोध खरे

डॉक. काढली त्यानंतर लगेच BBC वर धाड पडली

BBC 'accepts' evading taxes in India, underreporting ₹40 crore income | Details

https://www.hindustantimes.com/videos/world-news/bbc-accepts-evading-tax...

योगायोग आहे ना?

किंवा

बी बी सी वाले कदाचित विसरले असतील कि आता भारत स्वातंत्र झाला आहे आणि आपल्याला आयकर लागू होतो.

बाकी चालू द्या

कॉमी's picture

14 Jun 2023 - 10:54 am | कॉमी

OpIndia वाल्यांनी तर ४० करोड उत्पन्न underreport झाले असे नाही, तर ४० करोड रुपये सरकारला देणार असे छापले. हाहाहा.
https://www.opindia.com/2023/06/bbc-admits-tax-evasion-india-agrees-to-p...

सुबोध खरे's picture

15 Jun 2023 - 6:36 pm | सुबोध खरे

कॉमी साहेब

आपण पाठवलेला दुवा आपण स्वतःचा नीट वाचलेला नाही असे स्पष्ट दिसते आहे.

असे केल्यास आपली विश्वासार्हता धोक्यात येईल असे मी आपणास नम्रपणे सुचवू इच्छितो.

केवळ शीर्षक वाचून आपला गैरसमज झालेला दिसतो. (आपलाच दुवा आपण पूर्ण वाचल्यास बी बी सी ची चोरगिरी लक्षात येईल)

The income tax department had conducted a three-day survey of BBC offices in Delhi and Mumbai in February, which revealed the income of its various group entities was not commensurate with the scale of operations in India. As per the official, BBC filing a revised return will not help as one can file it only for the last financial year.

“The tax concealment can be for over a year. So, filing revised returns won’t help.

बीबीसी ने काहीही मान्य केले नाहीये इतकेच म्हणणे आहे.

सुबोध खरे's picture

16 Jun 2023 - 9:44 am | सुबोध खरे

बीबीसी ने काहीही मान्य केले नाहीये इतकेच म्हणणे आहे.

हेही सत्य नाही.

आपलेच दुवे पूर्णपणे वाचावेत आणि शहानिशा सुद्धा करून घ्यावी हि विनंती

BBC admits to underreporting Rs 40 crore income tax in India

https://www.newindianexpress.com/nation/2023/jun/06/bbc-admits-to-underr...

https://www.livemint.com/news/india/bbc-acknowledges-it-paid-lower-taxes...

https://timesofindia.indiatimes.com/videos/news/bbc-admits-tax-evasion-i...

अजून किती दुवे हवेत?

ह्या सगळ्या रिपोर्ट नंतर इन्कम टॅक्स ऑफिसरचे स्टेटमेंट आले की बीबीसी ने कबूली दिली असे काही नाही.

सुबोध खरे's picture

16 Jun 2023 - 10:26 am | सुबोध खरे

परत तेच

आयकर अधिकाऱ्याने एवढेच सांगितले आहे कि अशी कबुली देणे कि ना देणे याने केस मध्ये फरक पडत नाही. एक वर्ष झाले असल्याने नियमानुसार त्यांच्यावर कार्यवाही होईल आणि जो काही कर आणि त्यावर दंड त्यांना भरावाच लागेल.

आयकर अधिकारी "बी बी सी ने अशी कबुली दिली आहे" हे सार्वजनिक न्यासावर मान्य करणे शक्यच नाही कारण तो गोपनीयतेचा भंग ठरेल. आणि तसा त्याला अधिकारच नाही. सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही अधिकारी अशी माहिती पत्रकारांना पुरवणे हा गोपनीयतेचा भंग असतो.

सरकारी खात्याचा जनसंपर्क अधिकारी या साठीच नेमलेला असतो ( सरकारच्या परवानगीशिवाय तो सुद्धा अशी माहिती पुरवू शकत नाही).

हे आपल्याला माहितीच नसेल तर बोलणं संपलं

बाकी आपल्याला एकच तुणतुणं लावून धरायचं असेल तर धरा.

कॉमी's picture

15 Jun 2023 - 7:42 pm | कॉमी

सरकारने सुद्धा सदर सर्व्हे नंतर त्यांना काही दंड केल्याची किंवा नोटीस पाठवली आहे असे सुद्धा वाचले नाही. अर्थात, अजून फार दिवस झाले नाहीत, पुढे येणारच नाही असे नाही. येईल पण.
आता, असे छातीठोकपणे मी सांगू शकत नाही की हा सर्व्हे झाला तो राजकीय कारणांसाठीच झाला. आणि असे बहुतेक वेळेस सांगता येत नसतेच, सरकार कडे देण्यासाठी कारणे असतातच . मात्र, वेळ संशयास्पद होती हे मान्य असावे. युके लेबर पक्षाने सुद्धा ह्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

सुबोध खरे's picture

16 Jun 2023 - 9:46 am | सुबोध खरे

अजून फार दिवस झाले नाहीत, पुढे येणारच नाही

पुढे येऊन फार दिवस झालेले आहेत.

कपिलमुनी's picture

14 Jun 2023 - 3:18 pm | कपिलमुनी

कायद्याचे राज्य राज्यात, देशात आले पण सुशांत सिंग राजपूत चे काय झाले ??
मिपावर पण काहीजण उर बडवून कळफलक बडवत होते.

ते पण सध्या थंडावले आहे. सीबीआय चौकशी वगैरे नाटके करून झाली ..

या सगळ्या सुशांत प्रेमी ना बरोबर इलेक्शन अगोदर जाग येणार आणि खोटे आरोप - अटक होणार

विभोर आनंद वैगरे टुकार लोकांनी ह्या SSR प्रकरणात चांगले हात धुऊन घेतले खरं. OpIndia सारख्या स्वतः अर्धे वेडसर असलेल्या वृत्तपत्राला त्याच्याबद्दल "विभोर आनंद : मूर्ख, फ्रॉड का पूर्णपणे वेडा ?" असा लेख लिहावा वाटला म्हणजे बघा. तरी कितीतरी लोक त्याचे म्हणणे खरे मानून कशावरही विश्वास ठेवत होते. खरेतर कसलाही आधार न देता बडबड करणारा हा माणूस. ह्याचे नाव ह्यापूर्वी कुणी ऐकले पण नव्हते.

आपल्याकडे पण एक मोठा धागा आहे त्यात सगळे ह्या वीभोर आनंदचे व्हिडिओ खच्चून भरले आहेत.

बावडी बिल्डर's picture

14 Jun 2023 - 6:08 pm | बावडी बिल्डर

सूशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंना अडकवायते किंवा बदनाम करायचे अनेक प्रयत्न झाले. पण बदनाम करनारे तोंडावर आपटले.

डँबिस००७'s picture

14 Jun 2023 - 5:06 pm | डँबिस००७

कट्टर ईमानदार श्री केजरीवालच्या आप पक्षाच्या नावावर अजुन एका घोटाळ्याची नोंद झालेली आहे.
काल दिल्लीतील भाजपा नेत्यांनी हा घोटाळा उघड केलेला आहे,
"पँनिक बटन" नावाच्या ह्या घोटाळ्याच्या आड आप पक्षाने तब्बल ८०० कोटीचा घोटाळा केलेला आहे असा दावा केलेला आहे. वेगवेगळ्या कठीण परीस्थीतीत घोटाळ्यासाठी उत्तम संधी आप वाले शोधत असतात.
दिल्लीतील महीला सुरक्षीत नाहीत म्हणुन आप सरकारने "पँनिक बटन" योजना सुरु केली. दिल्लीतील प्रत्येक टँक्सी व बस मध्ये "पँनिक बटन" लावणे आवश्यक झाले. "पँनिक बटन" साठी प्रत्येक टँक्सीवर रु९००० / साल तर बसवर रु २२०००/साल गेले कित्येक वर्षे आप सरकार आकारत आलेली आहे.
"पँनिक बटन" दाबुनही कोणतीही मदत येत नाही हे भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परीषदेत पुरुव्यासकट सिद्ध केले.
ईतक होउनही ही बातमी फक्त एकाद दुसर्या चँनेलनी दाखवलेली आहे.

बावडी बिल्डर's picture

14 Jun 2023 - 6:12 pm | बावडी बिल्डर

एसटीच्या वर्धापन दिनाचा आणखी एक कार्यक्रम फडणवीसांनी टाळलाय. एकंदरीत मामूपद नी फडणवीस ह्यात कुणीही आडवं आलं की फडणवीसांना राग येतो असं वाटतंय. शिंदे आणी फडणवीस ह्यांच्यात ठिणगी पडलीय एवढं नक्की. आज सारवासारव जाहीरात आलीय वृत्तपत्रांच्या पहील्या पानावर त्यात पार अब्दूल सत्तार ते दादा भूसे असे ९ जणांचे फोटो आहेत.आता ईतर फूटलेल्या आमदारांनी त्यांचे फोटो नाहीत म्हणून नाराज व्हावे का? :)

फाटक्यात पाय's picture

14 Jun 2023 - 7:24 pm | फाटक्यात पाय

यांच्यात बेबनाव व्हावा म्हणून काही मंडळी देव पाण्यात बुडवून बसली आहेत.
ते मोठ्या पवारांनी , धाकल्या पवारांच्या(धरणाचे पाणीफेम) बुडाखाली बत्ती लावली त्याची काय बातमी नाय बघा!

बावडी बिल्डर's picture

14 Jun 2023 - 7:46 pm | बावडी बिल्डर

+१

बावडी बिल्डर's picture

14 Jun 2023 - 9:06 pm | बावडी बिल्डर

बुडाखाली बत्ती लावली त्याची काय बातमी नाय बघा! व्वा. छान भाषा. अशीच भाषा वापरा नी मिपा समृध्द करा.
बाकी शिंदे नी फडणवीस एकत्र लढले किंवा वेगळे तरी “कसबा”च होनारे.

फाटक्यात पाय's picture

14 Jun 2023 - 10:07 pm | फाटक्यात पाय

चला एका इच्छुकाचा पत्ता लागला.
बाकी तुम्ही नक्की कुणिकडंच?
उबाठाचं, धरणांतलं की रागाचं?
नाय ते टिकीट वाटायला आल्यावर पानिपत होणारच हाये, म्हणूनश्यान ईचारलं
आता केजरीवाल, ममता असं काय बोलू नका, लोकं झिट येऊन पडतील

बावडी बिल्डर's picture

14 Jun 2023 - 10:49 pm | बावडी बिल्डर

उबाठाचं, धरणांतलं की रागाचं?
एवढेच पर्याय काय? नकली डिग्रीवाल्याचं? तडीपाराचं? की खोकेवाल्याचं? हे नाय ता?

डँबिस००७'s picture

14 Jun 2023 - 11:17 pm | डँबिस००७

+++ डॉक. काढली त्यानंतर लगेच BBC वर धाड पडली हे पण पाहिले आहे. +++++

ब्रिटीश राज जाऊन ७५ वर्षे झाली तरीही BBC वर धाडी पडल्या की काहींच्या अंगाची लाही होते.
भारतात कर चोरी करणार्या BBCला सरळ करण्या ऐवजी त्यांची मनधरणी करायची ?
मोदी द्बेषात आपण किती खोलात जातआहोत ह्याचा काही विचार कराल ?

बावडी बिल्डर's picture

14 Jun 2023 - 11:28 pm | बावडी बिल्डर

कंगनाचं अतिक्रमनातील घर तोडलं तेव्हाही काहींच्या अंगाची लाही होत होती.

डँबिस००७'s picture

14 Jun 2023 - 11:49 pm | डँबिस००७

कंगनाला "खाड देंगें " म्हणणार्याच्या
बापाने कष्टाने उभा केलेला पक्ष, पक्ष चिन्ह व पक्षाची प्रतिष्ठा धुळी ला मिळवली तरी सुद्धा ह्यांना शूद्ध नाही !!

बावडी बिल्डर's picture

15 Jun 2023 - 12:53 am | बावडी बिल्डर

असं फक्त भाजप समर्थकांना वाटतं कारण १०५ घरी बसवले. :)

सुबोध खरे's picture

15 Jun 2023 - 7:00 pm | सुबोध खरे

भुजबळ आपलं जुनंच १०५ घरी बसवल्याचं तुणतुणं वाजवत आहेत.

ते घरून लाल दिव्याच्या गाड्यातून फिरायला लागून एक वर्ष व्हायला आलं सुद्धा

फाटक्यात पाय's picture

15 Jun 2023 - 12:34 am | फाटक्यात पाय

नंतर काही नुकसानभरपाई दिल्याची पण बातमी होती.
स्वखुशीने वा पश्चाताप झाल्यावर नाही तर कोर्टाने आसूड दाखवल्यावर!

भारतात कर चोरी करणार्या BBCला

हे तुमच्या कानात येऊन कोणी सांगितले ?