पापा की परी

साहना's picture
साहना in काथ्याकूट
24 May 2023 - 10:51 am
गाभा: 

सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. कुटुंबातील अनेक १५-२५ वर्षांच्या मुलींची भेट झाली आणि एकूणच मुलींच्या पालन पोषणात आणि संस्कारात कमालीचा बदल झाला आहे असे दिसून आले. त्याशिवाय हल्लीच कुटुंबात ३-४ घटस्फोट पहिले आहेत. माझ्या ओळखीच्या < ३० अश्या जोडप्यांत पहिले तर एकूण ९ घटस्फोट आहेत. <४० वयोगटन्ट ६ घटस्फोट आहेत. टोकाचे अपवाद सोडले तर काही लग्ने तुटण्यात मुलींची भूमिका आणि आडमुठेपणा होता असे तरी प्रथमदर्शनी दिसून आले.

आधी पापा कि परी इफेक्त्त पाहू :

१. १७ वर्षांची एक मुलगी. वडील प्रचंड श्रीमंत (५०-१०० कोटी नेट वर्थ). आधी दिसायला गोंडस होती. दर रोज फास्ट फूड खाणे, फक्त AC गाडीतून फिरणे, शून्य फिटनेस, शून्य शरीराची देखभाल इत्यादींमुले ४० वर्षांची आंटी असावी अशी सुटली आहे. मुख्य म्हणजे आईवडिलांना ह्यांत काहीही चुकीचे वाटत नाही. अजून तिला घरी "बाळ" म्हटले जाते.

२. २३ वर्षांची मुलगी. वडील बऱ्यापैकी श्रीमंत आहेत. शिक्षणात हुशार असून सुद्धा आई वडिलांपासून दूर नको म्हणून चांगल्या संधी सोडल्या. दुपारी ११ वाजता उठणे. नेटफ्लिक्स पाहणे, झोमॅटो वरून वाट्टेल ते ऑर्डर करून खाणे. दार शनीवारी रविवारी ३०-४० हजर रुपये मॉल मध्ये उडवणे. पण हिशोब येत नाही. गणितांत चांगले मार्क पडले तरी सध्या पेट्रोल चे भाव काय ते ठाऊक नाही आणि साधारण टॅक्सीला अमुक ठिकाणी जायला किती खर्च येईल हा हिशोब येत नाही. अमुक वस्तूचा योग्य भाव काय असावा ह्याची जाणीव शून्य.

३. २७ वर्षांची मुलगी. मध्यमवर्गीय परिवार. चांगली नोकरी आहे पण सेविंग्स हि संकल्पना ठाऊक नाही. आई गाडीने नोकरीच्या ठिकाणी पोचवते आणि घरी आणते. स्वतःला काहीही चालवायला येत नाही शिकायची इच्छा नाही. अश्या घरांत लग्न व्हावे तिथे ड्रायव्हर असावा हि अपेक्षा. काहीही पदार्थ बनवायला येत नाही. गॅस आयुष्यांत फक्त एकदा चालू केला होता म्हणे. नोकरी सुद्धा नको आहे कारण तिला खूप पैसे पाहिजेत.

४. १३ वर्षांची मुलगी. घरी झोमॅटोवरून अमुकच पाहिजे हा हट्ट. आईने १००० रुपये खर्चून ऑर्डर केला. एक घास घेऊन चव आवडली नाही म्हणून थेट कचऱ्याच्या डब्यांत फेकला आणि दुसरी डिश ऑर्डर केली.

हि झाली पापा कि परी ची उदाहरणे. लोकांच्या मुलांना काय संस्कार असावेत हि माझी समस्या नाही. त्यामुळे मी फक्त माझे निरीक्षण व्यक्त करते.

१. पैश्यांची किंमत हि गोष्ट बहुतेक तरुण मुलींना आई वडील शिकवत नाही असे दिसून आले. तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी विनाकारण पैसे नष्ट करू नयेत, तारतम्य बाळगावे हे आमचे जुने संस्कार गायब झाले आहेत.

२. मुलीला काहीही "बोलण्यास" पालक घाबरत आहेत आणि तिने डोळ्यातून अश्रू काढले तर सरळ शरणागती पत्करत आहेत.

३. चार चौघांत कसे वागावे, कश्या प्रकारे संभाषण करावे, "भान कसे ठेवावे" ह्या गोष्टी ज्या एके काली मुलींसाठी महत्वाच्या होत्या त्या गायब झाल्या आहेत. वाट्टेल ठिकाणी पाय वर घेऊन बसणे, आपल्या आजूबाजूला काय लोक आहेत आणि कोण काय ऐकत आहे हे "प्रसंग सावधान" अजिबात नाही आणि आई वडील सुद्धा शिकवत नाहीत. उदा अपिरिचित लोक आजू बाजूला असताना फोन वरून आज मी घरी एकटी असेल असे मोठ्याने बोलणे.

४. रस्ता कसा पार करावा, दुकानात जाऊन सामान कसे आणावे, घरकामात मदत कशी करावी, घरखर्चात कसा आपला सहभाग असावा ह्या सर्वांचे ज्ञान बहुतेक मुलींना शून्य होते.

५. एका मुलीसोबत मी बाहेर गेले. जाताना तिला म्हणे पाण्याची बाटली बरोबर लागतेच. आम्ही बरेच अंतर चालून गेलो कि तिच्या लक्षांत आले कि तिने बाटली आणली नाही. ती बाटली तिच्याकडे यावी हि तिची अपेक्षा. तिला अपेक्षित होते कि मी पुन्हा माघारी अर्धा किलोमीटर जाऊन बाटली आणावी. मी साफ नकार दिला. त्यावर तिने आईला फोन करून सांगितले मग आई सर्व काम सोडून बाटली घेऊन आली.

६. काही मुली ह्या aspergers वाल्या असाव्यात अशी शंका मला आहे.

--
हे सर्व ठराविक अनुभव झाले. ह्याचा अर्थ सर्वच मुली अश्या आहेत असे नाही. वाचकांनी आपल्या कुटुंबातील मुलींबद्दल सांगावे.

--
घटस्फोट

बऱ्याच पापा कि परी आता कायमच्या पापा च्या घरी आल्या आहेत. नवऱ्यावर प्रचंड पैश्यांचा दावा ठोकला आहेच पण मानसिक आणि शारीरिक छळाच्या पूर्णतः खोट्या कंप्लेन सुद्धा घातल्या आहेत. बहुतेक वेळा आपण काहीही तडजोड करणार नाही आणि सर्व तडजोड नवऱ्याने करावी असली अवास्तव अपेक्षा कारणीभूत आहे असे दिसून येते. एके ठिकाणी तर मुलीने पहिल्याच महिन्यात सासू सासऱ्यांची संपत्ती आपल्या नावावर करण्याची मागणी केली. ह्या संपत्तीवर तिच्या नवऱ्याचा सुद्धा अधिकार नव्हता.

नवऱ्याला अजिबात आदर न देणे, तो जणू काही नोकर आहे आणि फक्त पैश्यांचे ATM आहे अश्या प्रकारे त्याला वागवणे. आर्थिक जबाबदारीचा पूर्णता अभाव इत्यादी गोष्टी मला ठळक पणे विविध मुलीत दिसून आला. कर किंवा बँकिंग विषयाचे ज्ञान तर जवळ जवळ शून्य होते.

काहींची लग्ने तुटली नसली तरी पती मानसिक दृष्ट्या त्या रिलेशन मधून कधीच बाहेर पडला आहे असे दिसून आले. एक तर त्यांनी इतर मित्र आणि इतर हॉबी निर्माण केल्या आहेत नाहीतर आणखीन कुणाबरोबर संबंध निर्माण केले आहेत. चुकून एखादा व्यसनाच्या अधीन सुद्धा दिसून येतो.

हल्ली घटस्फोट जास्त होत आहे असे लोक बोंबलत असले तरी चुकीच्या माणसाबरोबर संसारांत पडण्यापेक्षा घटस्फोट चांगला आहे असे वाटते. अश्या परित्यक्ता मुलींकडे आणि त्यांच्या भविष्यातील ससेहोलपटीकडे पाहून तरी त्याच्या पुढील पिढी कदाचित सुधारेल असे वाटते.

प्रतिक्रिया

श्री साहना, तुमचे लेखन वाचुन आनंद झाला. असेच लिहीत रहा.

ही समस्या मोठी आहे. बरेचदा मुळ कारण हे संस्कारांचा अभाव, माझा बाप कोण आहे माहीती आहे का ही विचारसरणी ही आहेत.
भारतात कोणत्याही माणसाची पारख करताना, त्याचे आई-वडील कोण ह्यावरुन त्याचा दर्जा ठरवला जातो. त्यामुळे ह्या मुलींमध्ये जर असाच माज असेल तर ते उचितच ठरेल.
बरेचसे भारतीय पालक आपण कसे मॉडर्ण आहोत ते दाखवण्याच्या नादात खोटी पाश्यात्य संस्कृती अंगिकारण्याचा प्रयत्न करतात.
स्त्री ही कायम अबला आहे. त्यामुळे एकदा स्त्रीने आरोप केला की पुरुष कायम चुकीचाच असतो असा प्रकारचा सामाजिक दृष्टीकोण आणि तत्सम कायदे असे बरेच काही आहे. त्याबद्दल बरेच काही लिहिता येऊ शकते.
श्री ट्रंप याच्याबरोबर श्री स्टॉर्मी डॅनियन यांनी मज्जा केली, मोबदला उकळला आणि शेवटी श्री ट्रंप यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

---
श्री सोनाली कुळकर्णी यांनीसुध्दा असेच त्याबाबत विचार मांडले आहेत.

“मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?” लग्नासाठी अवाजवी अटी ठेवणाऱ्या मुलींना सोनाली कुलकर्णीने सुनावलं; म्हणाली, “ऐशोआराम पाहिजे तर…”
https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/3523974/sonali-kul...

सोनाली कुलकर्णी तिच्या व्हिडीओमध्ये म्हणते, “भारतात खूप साऱ्या मुली आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो, ज्याच्याकडे चांगली नोकरी, घर असेल, पगार वाढण्याची खात्री असेल. पण त्या मुलीत इतकी हिंमत नसते की ती एखाद्या मुलाला म्हणू शकेल की तू माझ्याशी लग्न केल्यावर मी काय करेन.”
सोनालीने एका मैत्रिणीचा किस्सा सांगितला. मैत्रीण लग्नासाठी मुलगा शोधत होती आणि ५० हजारांपेक्षा कमी पगाराचा मुलगा नकोच, एकटा राहत असेल तर खूपच उत्तम, सासू सासरेही नको आणि त्याच्याकडे कार असावी, असं तिचं म्हणणं होतं.
“मी तिला म्हटलं की तू काय मॉलमध्ये आली आहेस का? तुला मुलगा हवाय की ऑफर हवी आहे. हे खरंच खूप अपमानास्पद आहे,” असं मत सोनालीने मांडलं.
मुलं १८ वर्षांची झाल्यावर त्यांना पैसे कमावण्याचा दबाव असतो. कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी येते. हे पाहून मला माझ्या या भावांसाठी रडायला येतं. दुसरीकडे मुली मात्र २५-२७ वर्षांच्या होईपर्यंत फक्त विचारच करत असतात.

पाश्चात्य संस्कृतीला दोष देऊन फायदा नाही. पाशात्य संस्कृतीत १५ वर्षांच्या मुलींनी काही काम करून पैसे कामवावेत हि अपेक्षा असते आणि १६ वर्षे झाली कि गाडी चालवायला शिकतात. बहुतेक भारतीय मुलींना हे शक्य नाही. व्यवहार ज्ञानाचा पूर्ण अभाव हि कुठलीच संस्कृती नाही.

सोनाली कुलकर्णी ह्यांचे मत १००% बरोबर आहे.

ट्रम्प ह्यांच्या प्रमाणेच भारतीय मुलांनी सुद्धा कायद्याच्या दृष्टिकोनातून आपले रक्षण केले पाहिजे.

- लग्नाच्या आधी शारीरिक संबंध बनवत असाल तर ते संमतीने होते ह्याचा पुरावा.
- लग्नाच्या आधी आईवडिलांकडून लोन घ्यावे आणि बहुतेक पगार हा त्यांना EMI म्हणून द्यावा.
- घर, बिसिनेस इत्यादी आईवडिलांच्या नावाने ठेवावे आणि इस्टेट प्लॅनिंग करून ठेवावे.
- सोन्यावर कमीच खर्च करावा कारण ते शेवटी स्त्री धन म्हणून मुलीला जाते.
- बिसिनेस असेल तर बिसिनेस आईवडिलांच्या नावावर ठेवून स्वतः ५-६ हजार पगारावर काम करावे.
- थोडी जरी कुरबुर झाली तर तात्काळ फॅमिली लॉयर चा सल्ला घ्यावा. घरांत शक्य असेल तिथे CCTV ठेवावेत.

बँक खाती इत्यादींची माहिती शक्यतो पत्नीला किमान पहिली २-३ वर्षे तरी देऊ नये. टॅक्स रिटर्न्स वेगवेगळा भरावा.

पाश्चात्य संस्कृतीला दोष देऊन फायदा नाही. पाशात्य संस्कृतीत १५ वर्षांच्या मुलींनी काही काम करून पैसे कामवावेत हि अपेक्षा असते आणि १६ वर्षे झाली कि गाडी चालवायला शिकतात. बहुतेक भारतीय मुलींना हे शक्य नाही. व्यवहार ज्ञानाचा पूर्ण अभाव हि कुठलीच संस्कृती नाही.

सहमत. त्यासाठीच मी 'खोटी' हे विशेषण वापरले. पाश्यात्य संस्कृतीमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्याला खुप महत्वाचे आहे.

भागो's picture

25 May 2023 - 8:33 am | भागो

वाचलंं .
अश्या पतीला पत्नीने फाट्यावर मारून ठेचायला पाहिजे.

" गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधौ ।
करुणाविमुखेन मृत्युना हरता त्वां बत किं न मे ह्रतम " ।।
( रघुवंशम् )
------------------------------------------------------------------------------------
*अर्थ*----
प्रिय पत्नी इंदुमती के मृत्यु के कारण विलाप करते समय अज कह रहा है ---- " तेरे और मेरे कितने रिश्ते है ! तुम मेरी गृहिणी थी,
मेरी सचिव थी , अनन्य सखी थी , जोडीदार थी । संगीत , नृत्यादि , ललितकला क्षेत्र में प्रियशिष्या थी । किन्तु हाय ! उस निष्करुण क्रुर काल तुम्हे ले गया । उसने तुम्हे नही तो मेरा सर्वस्व हरण किया है !

हे कुठे आणि वरचा प्रतिसाद कुठे!

रघुवंश, मेघदूतां इत्यादी काव्य आहे. तुम्ही राम बनू शकत नाही आणि तुमची पत्नी सीता असू शकत नाही. के रोमँटिक स्तरावर हे सगळे बरोबर आहे वाचून आनंद घ्यावा उगाच हि रोमँटिक नोशन प्रत्यक्ष जीवनात शोधू नयेत वैफल्य सोडून आणखीन काही हाती लागणार नाही.

चौकस२१२'s picture

25 May 2023 - 12:31 pm | चौकस२१२

साहना , बहुतेक मुद्दे पटले पण "घरांत शक्य असेल तिथे CCTV ठेवावेत. " हे टोकाचे.

घरात CCTV हे साधे भाडे तत्वावर राहणारे पण मान्य करणार नाहीत तुम्ही लग्न झालेल्यांना हे सांगताय?

लिविंग रूम, गॅलरी इत्यादीत सुरक्षेच्या नावाखाली कॅमेरा ठेवावेत. कामवाली बाईवर विश्वास नाही वगैरे कारणे द्यावीत. विडिओ नाहीतर किमान ऑडिओ तरी प्रूफ असणे गरजेचे आहे.

श्री ट्रंप याच्याबरोबर श्री स्टॉर्मी डॅनियन यांनी मज्जा केली, मोबदला उकळला आणि शेवटी श्री ट्रंप यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.>>>
मी इथे दुवा देतोय. वाचा आणि २०२३ मध्ये परत या.
https://www.bbc.com/news/world-us-canada-64920037
"Grab ’em by the pussy"
याच मराठी भाषांतर तुम्हीच करा. माझ्या चाने नाही होणार.
https://www.vox.com/2016/10/7/13205842/trump-secret-recording-women
हा "श्री ट्रंप" तुमचा आदर्श दिसतो आहे.
हे वाचून श्री ट्रंप खुश हुआ. आता श्री ट्रंप यांच्या आय टी सेल इंडिया चे कंट्री मनेजर म्हणून तुमची नेमणूक निश्चित!

हे वाचून श्री ट्रंप खुश हुआ. आता श्री ट्रंप यांच्या आय टी सेल इंडिया चे कंट्री मनेजर म्हणून तुमची नेमणूक निश्चित!

तुम्हाला अजुन श्री ट्रंप यांची महती समजलीच नाही, असो. तुमचे अज्ञान तुम्हालाचा लभ्य...

जी समजली ती मी वर दिली आहे. ह्या पेक्षा जास्त "महती" असेल तर येऊ द्या.
"स्त्री चे काय ते पकडा" असा श्री ट्रंप तुम्हाला भावाला असणार!

"स्त्री चे काय ते पकडा" असा श्री ट्रंप तुम्हाला भावाला असणार!

ते पकडणारा आणि पकडुन देणारी बघुन घेतील, तुम्ही कशाला त्रास करुन घेताय ? ते पकडल्यामुळे तुमच्यावर काही परीणाम नाही ना झाला?

जी समजली ती मी वर दिली आहे. ह्या पेक्षा जास्त "महती" असेल तर येऊ द्या.

तुमच्यासाठी पुर्ण आंतरजाला उपलब्ध आहे. काही सुचना: फक्त तुलनात्मक शोध घ्या, मुळ स्त्रोत बघा. डाव्यांचा प्रचार ताडुन बघा. मिपावरही बरेच काही सापडेल.

चलत मुसाफिर's picture

5 Jun 2023 - 3:21 pm | चलत मुसाफिर

साहना या श्री नसून श्रीमती असाव्यात असा कयास त्यांचा एक पूर्वीचा लेख वाचून बांधला होता. खरेखोटे देव जाणे. त्यांचे लेख मात्र दर्जेदार व वाचनीय असतात यात शंका नाही.

माझे काही लिखाण हे इतरांच्या लिखाणावरून आधारित होते, काही लेखन हे इतरांच्या लेखांचे रूपांतरण होते (मूळ लेखक मंडळींना प्रसिद्धीलोलुपता नव्हती त्यामुळे मला फेर फार करून माझ्या नावानेच लिहिण्याची विनंती केली होती) त्यामुळे काही लोकांनी माझ्या नक्की लिंग ओळखीवरून प्रश्न निर्माण केले होते. थोडक्यांत काय फरक पडतो ? वाचून आवडले के झाले !

साहना या श्री नसून श्रीमती असाव्यात असा कयास त्यांचा एक पूर्वीचा लेख वाचून बांधला होता.

मी श्री हे संबोधन स्त्री, पुरुष आणि इतर सर्वांना वापरतो. ज्याला / जीला इच्छेप्रमाणे त्याप्रमाणे श्रीयुत, श्रीमती, श्रीमान इ. असा हवा तो अर्थ घेऊ शकतो.

चावटमेला's picture

24 May 2023 - 2:06 pm | चावटमेला

छान लेख

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 May 2023 - 2:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

लग्नाच्या बाजारात तडजोड करायची तयारी असेल तरच उतरावे. तिकडे आई-बापाची संपत्ती कामी येत नाही.
लग्न ही पूर्ण तयारीनिशी (शारीरीक/मानसिक्/आर्थिक) करण्याची गोष्ट आहे.

नाहीतर आपले डेटिंग अ‍ॅप् वर काम भागवावे. एखादा लिव्ह ईन जुगाड जमला तर ठीक नाहीतर आहेच रोज नवीन.

सर्वसाक्षी's picture

24 May 2023 - 3:37 pm | सर्वसाक्षी

चिरंजीवांकरीता संशोधन सुरू आहे आणि अनेक अनुभव येत आहेत. बहुतेक आई वडिलांना आपल्या मुलीने लग्न करून सुखी व्हावे (आणि आम्हाला सुखी करावे) असे वाटत असते मात्र मुलींना तितकेसे स्वारस्य नसते. जेव्हा आमच्याशी संपर्क साधतात तेव्हा ते उत्सुक दिसतात व्यवस्थित बोलतात. काही मातापिते तर मुलं एकमेकांशी बोलतीलंच, पण आपणही भेटुया, काही जण तर यंदा नक्की करायचं ना? असंही विचारतात. मात्र असं लक्षात आलं आहे की बहुतेक वेळा आई वडिलांनी मुलीशी न बोलता परस्पर संपर्क साधलेला असतो. मुलगा जेव्हा मुलींशी बोलतो तेव्हा अनेकदा त्या काहीशा अलिप्त वाटतात असं मुलाचं म्हणणं आहे.
बरेच वेळा आई वडिलांकडून विशेषतः आईकडून " माझ्या बेबीला नाही ऐकायला लागता कामा नये" असा अट्टाहास असतो. यामुळे ते मुलीशी न बोलता परस्पर संपर्क साधतात, जर आमच्या कडून सकृतदर्शनी एकदा बोलून पाहायला हरकत नाही असं दिसलं तर लगेच तुमच्या मुलाला आमच्या बेबीला मेसेज टाकायला सांगा असं सुचवतात. आमच्या दृष्टीने यात काही कमीपणा वगैरे नाही पण एकूण असं लक्षात आलं आहे की मुलीशी चर्चा सोडा, पण आम्ही संपर्क केला होता हे सुद्धा सांगितले जात नाही तर उलट ' बेबी अगं समोरून निरोप आला आहे तर एकदा बोल ना' असा मुलीचा इगो चुचकारतात. आजकाल आम्ही भीड संकोच सोडून कुणीही संपर्क साधला तरी पहिलं विचारून घेतो की मुलीने प्रोफाइल पाहिला आहे का आणि तिची पुढे जायची इच्छा आहे का
आपली मुलगी आपल्याला लहान वाटत असली तरी ती मोठी आहे, सुशिक्षित आहे, जबाबदारीचे पद सांभाळत आहे, आपले निर्णय घेत आहे तेव्हा तिचं मत लक्षात घेतलं पाहिजे हे आई वडिलांना का समजत नाही? आणि मुलींना काही कारणाने लग्न करण्यात स्वारस्य नसेल तर त्या विवाह संस्था मध्ये नाव का घालतात?
दुसरा न पटणारा पण फोफावलेला प्रकार म्हणजे 'जेंडर इक्वालिटी '. एक किस्सा आठवला. एका कम्युनिस्ट नेत्याच्या मुलाने आपल्या वडिलांना विचारले की बाबा, I think communism means sharing wealth with neighbours यावर वडिलांनी त्याच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाले ' idiot, communism means sharing neighbours' wealth '
मुली ठणकावून सांगतात की जागा घ्यायची औकात नाही तर मुलांनी लग्नाला उभं राहू नये आणि मुलांच्या आया म्हणतात की आमची बेबी दुसऱ्यांच्या घराचे इ एम या फेडणार नाही. म्हणजे मुलाने किमान दिडेक कोटी उभे करायचे! मुलगी साधारण विद्यापीठाची बी ई असली तरी मुलगा एम एस एम टेक एम डी एम बी एक असावा ही किमान अपेक्षा. चला एम एस नाही तर नाही पण आय आय टी किंवा बिट्स चा असावा. किमान सिनियर मॅनेजमेंटमध्ये असावा. मुलगी उंचीला ५, २" असली तर मुलगा ५,५ ते ५'८ असावा...... म्हणजे आपला जीवनसाथी आर्थिक, बौद्धिक, शारीरिक सर्व प्रकारे आपल्या पेक्षा खूप वरचढ असावा मात्र लग्नानंतर त्यांनी जेंडर इक्वालिटी मान्य केली पाहिजे!
खरी जेंडर इक्वालिटी मी माझ्या घरात पाहिली आहे. मी आणि बहीण लहान असताना आई नोकरी सांभाळून एम ए करत होती. जेव्हा आईला उशीर होईल असे दिसायचे तेव्हा वडील भात, बटाटे असा कुकर लावून ठेवायचे. रविवारी लेक्चर्स असली तर आपला रविवार आम्हाला सांभाळण्यात, फिरायला नेण्यात घालवायचे. विनातक्रार. कधीही उपकाराची भाषा न करता. पुढे आईचे आई वडील उतार वयात आमच्या कडे होते पण वडिलांनी कधीच नाखुषी दाखवली नाही.
मुलींच्या दृष्टीने जेंडर इक्वालिटी म्हणजे तिनं स्वयंपाक केला तर त्यानें भांडी घासायला हवीत! एक पेरेंट मीटिंग तिने अटेंड केली तर दुसरी त्याने केली पाहिजे. पण मग बरोबरीच्या मुलांशी लग्न करायची तयारी हवी. उच्च शिक्षित , उच्च पदस्थ आपल्या दुप्पट कमावणारा आणि घरचं चांगलं असलेला मुलगाच का हवा?
एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये शिकवणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीने तिच्या वर्गातील मुलिंना जेंडर इक्वालिटी कोणाला हवी असं विचारलं तेव्हा सर्व मुलिंनी हात वर केले. मात्र जेव्हा तिने विचारले की तुमच्या पेक्षा कमी पगार असलेल्या मुलाशी लग्न कराल का? तर एकही हात वर आला नाही
एकीकडे आमच्या मुलीला फॅमिली आणि एक्स्टेंडेड फॅमिली आवडते असं सांगितलं जातं. माझ्या मित्राच्या मुलाला एका मुलीने भेटीत स्पष्ट विचारलं की घरात डस्ट बीन किती आहेत

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 May 2023 - 5:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

चीन मध्ये माओ च्या "एकच मूल" पॉलिसी मुळे सध्या मुलींचा तुटवडा आहे म्हणे.लग्नाच्या बाजारात मुले हातात स्वतःची माहीती लिहिलेला फलक घेउन उभे राहतात आणि मुली आई वडिलांबरोबर "शॉपिंग" केल्या सारखे "नवरा" शोधत फिरतात (कारण त्यांना चॉईस आहे, मुलांना नाही) असे ऐकुन आहे.

भारतातही काही राज्यात पर राज्यातुन मुली आणाव्या लागतात, हे म्हणजे सून विकत घेण्या सारखेच आहे.

पण ते जाउंदे, किमान सुशिक्षित वर्गाने तरी अशा अपेक्षा का ठेवाव्यात की मुलाचा पगार १.५ लाख आणि स्वतःचा फ्लॅट पाहीजे? मुलगी जशी २५ वर्षे शिकुन आत्ता कुठे कमावती झालेली असते तसाच मुलगाही. मग अचानक फ्लॅट आणि गाडी कुठुन येणार? त्यात मुंबईत सेंट्र्ल ची मुलगी वेस्टर्न लाइन ला आणि वेस्टर्न ची सेंट्रल ला नको म्हणते. ठाणे/दादर ची मुलगी कल्याण्/अंबरनाथ/टिटवाळा डाउन मार्केट म्हणते. खाजगी नोकरी वाली ला सरकारी नोकरी वाला पाहीजे, पत्रिका,रुपरंग कसे काय आणि कधी जमायचे हे सगळे?

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 May 2023 - 5:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
सर्वसाक्षी's picture

24 May 2023 - 5:34 pm | सर्वसाक्षी

फार झालं, काही तर फक्त बॅण्ड्रा टू अंधेरी

जुळवून आणलेला विवाह (अ‍ॅरंज्ड मॅरेज) - त्यातही पारंपारिक पद्धतीने म्हणजे आधी स्थळाची माहिती पालक घेणार, पालक आपसांत बोलणार मग मुलीकडचे (स्वतः मुलगी सोडून) मुलाला बघणार वा मुलगा आणि वरपक्ष मुलगी बघणार ही सगळी पद्धत आता कालबाह्य होत आहे किंवा केली पाहिजे. पालकांनी मुलांची ओझी वाहणं बंद करावं. अपत्य लहान असल्यापासून त्याची/तिची निर्णयक्षमता विकसित करण्याचे प्रयत्न करावेत आणि स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी स्वतःला घेता आली पाहिजे अशी त्याची मानसिकता बनवावी. पण योग्य त्या वयात त्याचे निर्णय त्यालाच घ्यायला द्यावे
आपल्या अपत्याचा प्रेमविवाह होत असेल तर ठीक नाही तर "तुझं स्थळ तु स्वतः शोध. मग मॅट्रिमोनी वेबसाईट असो किंवा वधू-वर सूचक मंडळ, तुझं प्रोफाईल तु स्वतः हाताळ आणि स्वतःच निवड कर" असं आई वडीलांनी आपल्या अपत्याला स्पष्टपणे सांगायला हवे. मग त्याच्या /तिच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या पुर्ण होतात किंवा कशा आणि तडजोड करायची असेल तर किती व कशी हे सगळे निर्णय त्या अपत्याला (बाळ/बेबी जे कुणी असेल) घेवू देत. झालंच तर एकत्र कुटूंब पद्धतीचाही भावनिक आग्रह नको. "वाटलं तर रहा सोबत नाहीतर वेगळे रहा आणि आम्हाला वाटलं तुमची सोबत त्रासदायक ठरतेय तर आम्हीही तुम्हाला घराबाहेर निघायला सांगू शकतो. दोन -तीन महिन्याच्या सूचनेवर बाहेर निघायचीही तयारी ठेवा" असं मुलाच्या लग्नानंतर पालकांनी मुलाला स्पष्ट सांगावं. काही कुणाचं कुणावाचून अडत नाही. आत्मनिर्भर होवून जगावं सगळ्यांनीच.

तर्कवादी's picture

24 May 2023 - 8:59 pm | तर्कवादी

"तुझं स्थळ तु स्वतः शोध. मग मॅट्रिमोनी वेबसाईट असो किंवा वधू-वर सूचक मंडळ, तुझं प्रोफाईल तु स्वतः हाताळ आणि स्वतःच निवड कर" असं आई वडीलांनी आपल्या अपत्याला स्पष्टपणे सांगायला हवे.

याबरोबरच पालकांनी आपल्या गधे पंचविशी ओलांडलेल्या अविवाहित अपत्यांना सरळच सांगावे की "तुझं लग्न होवो अगर न होवो आम्ही त्याची चिंता करणार नाही. आणि आमच्या सोबत राहून तुझा आम्हाला त्रास होवू लागला तर तुला घराबाहेर काढायला आम्ही मागे पुढे बघणार नाही. तेव्हा तु लग्न कर वा नको करुस पण स्वतःची जबाबदारी स्वतः घे"
थोडक्यात काय तर आई वडिलांनी अपत्यांना "सुखी करुन सोडण्याचा" जो चंग बांधलाय तो सोडून द्यावा. योग्य वयापर्यंत तुम्ही जे काही केलंत ते ठीक पण एका विशिष्ट वयानंतर त्या अपत्याने स्वतःच्या सुख दु:खाची जबाबदारी स्वतः घ्यावी. पालकांनी फक्त गरजेपुरती मदत करावी, सारं काही उरावर घेवू नये. तसंही तुम्ही कोणत्याही व्यक्तीला "सुखी करण्याचा" कितीही प्रयत्न केलात तरी त्या व्यक्तीच्या अपेक्षा व तक्रारी संपत नाहीतच.
आणि वर सांगितली तशी रोखठोक भूमिका पालकांनी घेतली तर अपत्ये जबाबदारपणे वागतील आणि त्यांच्या अपेक्षाही जमिनीवरच्या असतील.

> गधे पंचविशी ओलांडलेल्या अविवाहित अपत्यांना

हे संस्कार आधीपासूनच आपल्या मुलांवर करून त्यांना मर्द केल्यास हि परिस्थिती अजिबात येत नाही. आधीपासूनच आपल्या बाब्याच्या प्रत्येक हालचालीवर कंट्रोल ठेवला तर नंतर हा रिमोट बायकोच्या हाती जाण्यास वेळ लागत नाही. मग बोंबलून फायदा नाही. कॉलेज मध्ये फक्त परीक्षा आणि नोकरी वर फोकस करणारे पुरुष नंतर गड़बड्तात. चांगली बायको मिळाली नाहीतर नशीब नाहीतर अगदी निर्व्यसनी अमोल पालेकर छाप मुलांचे आयुष्य चुकीच्या मुलीमुळे उध्वस्त होते.

तुम्ही मध्यमवर्गीय असाल तर उगाच मुलाला सेटल वगैरे करण्याच्या भानगडीत स्वतःच्या स्वप्नावर पाणी फेकू नका. कारण अर्थव्यवस्था अशी आहे कि आपल्या आयुष्यभराची कमाई आणखीन ३० वर्षांनी चिल्लर बनेल.

संस्कार आधीपासूनच आपल्या मुलांवर करून त्यांना मर्द केल्यास हि परिस्थिती अजिबात येत नाही. आधीपासूनच आपल्या बाब्याच्या प्रत्येक हालचालीवर कंट्रोल ठेवला तर >>>
हे पेट कुत्र्याला तंतोतंत लागू पडते. गळ्यात पट्टा आई बापाने बांधला काय किंवा बायकोने बांधला काय.

> चिरंजीवांकरीता संशोधन सुरू आहे आणि अनेक अनुभव येत आहेत. बहुतेक आई वडिलांना आपल्या मुलीने लग्न करून सुखी व्हावे (आणि आम्हाला सुखी करावे) असे वाटत असते मात्र मुलींना तितकेसे स्वारस्य नसते

वधू संशोधनासाठी शुभेच्छा.

अवांतर कमेंट :

भारतीय वाढू अत्यंत स्वार्थी आहेत ह्यांत शंकाच नाही उलट मध्यमवर्गीय लोकांनी विविएकबुद्धी सोडून असल्या गोष्टींचे समर्थन करून ठेवले आहे. आपली कुवत नसताना वराच्या फॅमिलीची संपत्ती हडप करायची हि अपेक्षा. आधी हुंडा हि पद्धती होती त्यामुळे आपोआप असल्या प्रकाराला आळा बसायचा. (मी हुंडा पद्धतीची, किंबहुना हुंडा घेण्याच्या स्वातंत्र्ण्याची १००% पाठराखण करते) . आता हल्ली पोरगी सुंदर नाही, शिक्षण नाही, हुंडा देणार नाही पण तुमचे घबाड पाहिजे अशी सिस्टम निर्माण झाली आहे.

मध्यमवर्गीय मुलांचे सुद्धा चुकते. आईवडिलांनी त्यांचे आधीच खच्चीकरण करून ठेवले आहे. तारुण्याची वर्षे फक्त परीक्षा आणि नोकरीत जातात. गर्लफ्रेन्ड नसतेच. करणाच्याची कुवत सुद्धा नसते. प्रयत्न केलाच तर आईवडील डोळे वटारतात. त्यामुळे खाली वेळ पॉर्न नाहीतर इतर साईट वर "फ्रांड" request पाठविण्यात जातो. मुलींशी कसे बोलायचे, कसे मुलींची पारख घ्यायची इत्यादी ज्ञान असत नाही. त्यामुळे अरेंज पद्धतीत साधारण दिसणाऱ्या मुलीने सुद्धा बोलायला सुरुवात केली कि ह्यांना भान उरत नाही. मग तिलाच "परी" बनवून डोक्यावर चढवतात.

माझ्या मते :

मुलांनी मुलींत कुठले गुण शोधावेत :
- लग्नाच्या बाबतीत सर्वांत महत्वाचा गन म्हणजे काटकसर. पैसे सांभाळू शकणारी बायको म्हणजे अक्षरशः लॉटरी आहे.
- ऍनिमिक आणि मानसिक रोग असू नयेत. हे आधी कळणे कठीण आहे पण काही संभाषणातून साधारण अंदाज येतो.

मुलींनी मुलांत कुठले गुण शोधावेत.
- जेनेटिक्स. चांगली उंची, स्थूलतेचा अभाव (त्याच्यांत आणि त्याच्या आईवडिलांत), मधुमेह फॅमिलीत नसणे, हृदयविकार नसणे इत्यादी.
- कर्तव्यदक्षता. ह्या माणसाला तुमच्यात प्रेम नसेल तरी सुद्धा कर्तव्य म्हणून हि व्यक्ती तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेईल.

(मी हुंडा पद्धतीची, किंबहुना हुंडा घेण्याच्या स्वातंत्र्ण्याची १००% पाठराखण करते) >>
छी. disgusting. अरे बापरे. हुंडा देणे घेणे हा गुन्हा आहे याची जाणीव ठेवा.
आणि कोणी अवाक्षरही काढत नाही.
Now I feel ashemed that I am member here.
मालक माझा आय डी उडवा. प्लीज.
माझ्या हातात असत तर मी केव्हाच निघून गेलो असतो.

साहना's picture

25 May 2023 - 10:10 am | साहना

ह्यांत डिस्गस्टिंग वाटण्यासारखे काय आहे ? मतभेद असू शकतात किंवा माझे मत अजिबात मान्य नाही असे असू शकते पण किळस येण्यासारखे काय आहे ? जाणून घ्यायला आवडेल.

अनेक बेकायदेशीर गोष्टींचे समर्थन मी ह्या ठिकाणी ह्या आधी केले आहे त्यामुळे त्यांत नवीन काहीच नाही. बेकायदेशीर गोष्टी सुद्धा १००% नैतिक असू शकतात आणि कायदे करणारे लोक मूर्ख, डांबिस आणि अनैतिक असू शकतात, किंबहुना तसेच लोक कायदे करतात.

भागो's picture

25 May 2023 - 11:00 am | भागो

ह्यांत डिस्गस्टिंग वाटण्यासारखे काय आहे ?>>>
काही नाही. माझ चुकले. अजून येऊ द्या. सतीची चाल, केशवपन, हुंडा बळी ... ते पण त्यातही बरेच फायदे आहेत.

श्रीगुरुजी's picture

25 May 2023 - 12:15 am | श्रीगुरुजी

आधी हुंडा हि पद्धती होती त्यामुळे आपोआप असल्या प्रकाराला आळा बसायचा. (मी हुंडा पद्धतीची, किंबहुना हुंडा घेण्याच्या स्वातंत्र्ण्याची १००% पाठराखण करते) .

पराकोटीचा मूर्खपणा आहे हा.

कदाचित श्री साहना यांना काहीतरी वेगळेच म्हणायचे असेल, त्यांनी अयोग्य शब्दरचना केली असण्याची शक्यता आहे.

सर्वसाक्षी's picture

25 May 2023 - 7:39 am | सर्वसाक्षी

हुंडा म्हणजे एकप्रकारे हक्काने भीक मागणे किंवा खंडणी मागणे
दुसऱ्या कडे काही मागताना लाज कशी वाटत नाही!

लेखिकेला नक्की काय म्हणायचे आहे ते त्यांच्या कडून ऐकायला आवडेल

श्रीगुरुजी आणि सर्वसाक्षी
आवाज उठवल्या बद्दल अनेकानेक आभार.
अश्या घरात मुलगी देणे म्हणजे हुंडाबळी साठी तयार रहाणे.

हुंडा मागणे भीक नाही. भीक मागताना भिकारी तुम्हाला आशीर्वाद सोडून काहीही देत नाही. हुंडा पद्धतीनं तुमच्या मुलीला आणि तिच्या पोरांना पतीची संपूर्ण संपत्ती आणि तो हुंडा सुद्धा वारसा हक्काने मिळतो. त्याशिवाय मुलीचे वैगुण्य आणि इतर दोष दुर्लक्षिले जातात. त्यामुळे हुंडा पद्धती बिसनेस करारा प्रमाणे आहे. त्याशिवाय बहुतेक हिंदू कुटुंबात मुलीला वडिलोपार्जित संपत्तीतून बेदखल केले जाते, ती संपत्ती सुद्धा हुंडा पद्धतीने मुलीला upफ्रंट मिळते.

> खंडणी मागणे

खंडणीत "पैसे द्या नाहीतर ...." अशी धमकी असते. हुंडा पद्धतीत कुठे आहे धमकि ? मान्य नसेल तर पोरीने दुसऱ्या पोराकडे स्थळ न्यावे.

----

हुंडा हि पुरुषांनी निर्माण केलेली पद्धती नसून वधू पित्यानी निर्माण केलेली संस्था आहे. कारण त्यांना श्रीमंत घरात आपली मुलगी लोटायची असते. हुंडा पद्धतीत सुद्धा आपल्या अपेक्षा कमी करून मुली बिना हुंडा लग्न करू शकतात पण प्रत्यक्षांत अश्या पोराकडे मुली ढुंकून सुद्धा पाहत नाहीत. उलट हुंडा देऊन जास्तीत जास्त श्रीमंत पोरगा कसा पटवावा ह्याच कडे वधुपित्यांचे लक्ष असते.

--

ह्याच संकेत स्थळावर चर्चा चालली आहे कि मुलींच्या अपेक्षा कश्या अवास्तव आहेत. हा सुद्धा "हुंडाच" आहे आहे फक्त विरुद्ध दिशेने आहे.

---

लग्नाच्या ***आधी*** (नंतर नव्हे) लग्न आपण कुठल्या निकषावर करावे ह्याचे संपूर्ण स्वातंत्र्य जोडप्याला असणे आवश्यक आहे. त्यांत आर्थिक संबंध सुद्धा असले किंवा पैश्यांची देवाण घेवाण असली तरी त्यांत काहीही गैर नाही. त्यांचा खाजगी मामला आहे. मुलाकडे फ्लॅट असावा, अमुक पगार असावा इत्यादी मुलीच्या अपेक्षा हुंडा नाहीत का ?

-

हुंडा पद्धतीवर भडक चित्रपट, काही गुन्ह्याची अवास्तव चर्चा आणि तारतम्य सोडून केलेला सरकारी प्रोपागंडा ह्यामुळे बहुतेक जनतेची तर्कबुद्धी शेण खायला गेली आहे त्यामुळे नक्की मूलभूत तत्वे काय आहेत ह्यावर विचार ना करता आपले विचार बनवले जातात.

टीप: लोकांना स्वातंत्र्य असावे ह्याचा अर्थ ते स्वातंत्र्य प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे असे माझे म्हणणे नाही. कुणाला वैयक्तिक स्तरावर हुंडा चुकीचा वाटत असेल तर ती सुद्धा भूमिका रास्त आहे.

श्रीगुरुजी's picture

25 May 2023 - 1:04 pm | श्रीगुरुजी

बापरे, एक महिला सदस्यनाम असलेला/ली सदस्य हुंडा या अत्यंत वाईट व अकायदेशीर प्रथेचे समर्थन करीत आहे.

दुर्दैव आहे.

खंडणीत "पैसे द्या नाहीतर ...." अशी धमकी असते. हुंडा पद्धतीत कुठे आहे धमकि ? मान्य नसेल तर पोरीने दुसऱ्या पोराकडे स्थळ न्यावे.

ह्या मताबरोबर मी सहमत नाही. देण्याघेण्यावरुन लग्न मोडल्याचे मला माहिती आहे. उत्तरेकडे प्रत्येक प्रकारच्या (उदा. सरकारी नोकर, अभियंता, वैद्य इ.) इच्छुक नवरदेवाचे दर ठरलेले असतात.
मी कोणत्यातरी पुस्तकात (बहुतेक अनिल अवचटांचे पुस्तक, नाव आठवत नाही.) दक्षिण भारतातील युवती हुंड्यामुळे लग्न होत नसल्याने कुमारी राहील्याचे, काही वैश्याव्यवसायात आल्याचे वाचले आहे.

सर्वसाक्षी's picture

25 May 2023 - 5:18 pm | सर्वसाक्षी

भीक नाही तर काय? तुम्ही भिकारी आशीर्वाद देतो म्हणालात पण पण ते देण्याआधी झोळी भरून घेतो.
जे आपलं नाही पण आपल्याला हवंच आहे, ते मागणं म्हणजे भीक. हुंडा न मिळाल्यास लग्न होणार नाही ही धमकी देऊन हुंडा म्हणजे खंडणीच
लालसा हे एकच कारण. मनगटात ताकद असेल तर स्वतः मिळवावं!
हुंडा मुलीला मिळतो हे विधान हास्यास्पद आहे, वारसा हक्क कसला? मुलिच्या आई वडिलांची संपत्ती वडिलोपार्जित असेल तरच मुला मुलींच्या हक्काची बात. जर स्वकष्टाने मिळवलेली असेल तर आई वडील संपत्तीचा विनियोग मनाप्रमाणे करु शकतात.
त्यापेक्षा मुलगी निवडताना अवाजवी अपेक्षा नसणारी निवडावी

हुंडा मुलीला मिळतो हे विधान हास्यास्पद आहे, वारसा हक्क कसला?

स्त्रीधन आणि वरदक्षिणा ह्यात गल्लत झाली आहे.
स्त्रीधन - वधुला मिळालेल्या वस्तु, मालमत्ता
वरदक्षिणा - नवर्‍यामुलाला मिळेलेल्या भेटवस्तु, मालमत्ता

हुंडा न मिळाल्यास लग्न होणार नाही ही धमकी देऊन हुंडा म्हणजे खंडणीच

असे म्हणता येणार नाही. लग्न ठरवायच्या आधी हुंडा मागितला तर तो खंडणी होऊ शकत नाही. पण लग्न ठरल्यावर / झाल्यावर हुंडा मागितल्यास तो खंडणी होऊ शकतो.
(माझे हुंडाप्रथेला समर्थन नाही)

कॉमी's picture

25 May 2023 - 11:13 pm | कॉमी

१००% अँड्र्यू टेट

चौकस२१२'s picture

7 Jun 2023 - 11:52 am | चौकस२१२

हुंडा हि पुरुषांनी निर्माण केलेली पद्धती नसून वधू पित्यानी निर्माण केलेली संस्था आहे. कारण त्यांना श्रीमंत घरात आपली मुलगी लोटायची असते.

प्रत्येक बाबतीत हे असेच असेल असे नाही ...
आणि हे बेकायदेशीर का केले याचा पण साहना जरा विचार करा आपण ,
तोला मोलाने ( निदान रूपाने आणि शिक्षनाणे ) अनुरूप असून सुद्धा वरा कडच्यानकडून मुलीला हुंडा यावरून अनेक ठिकाणी त्रास दिला जातो आपल्या समाजात हे वर्षनुवर्षे दिसते म्हणून असा कायदा केला असावा असे नाही का वाटत तुम्हाला ?

स्वखुशीने आपणहून आई वडिलांनी जोडप्याला नवीन संसारासाठी मदत करणे वेगळे आणि हुंडा पाहिजेच याचा आग्रह हे वेगळे

आपला तर्क जरी विचारात घेण्यासारखा असला तरी सरसकट त्याचे समर्थन करणे अवघड आहे

शेवटी लग्न हे वयहार आणि मानसिक भावना आणि गरजा यांचे मिश्रण आहे .. फक्त बिझिनेस नाही होऊ शकत पण व्यव्हारी दृष्टिकोन ठेवावा हे मात्र पटते

असो तर भाडीपाच्या कांदे पोहे पाहायःची वेळ झाली .. या पोट्टीचे लागण हुंडया शिव्वय होणार कि कसे पाहूया तरी
https://www.youtube.com/watch?v=aGo4dFaMoYk&list=PLGxC7Cf-m6Y9-_JcwXwlWw...

प्रसाद गोडबोले's picture

25 May 2023 - 2:18 am | प्रसाद गोडबोले

आधी हुंडा हि पद्धती होती त्यामुळे आपोआप असल्या प्रकाराला आळा बसायचा. (मी हुंडा पद्धतीची, किंबहुना हुंडा घेण्याच्या स्वातंत्र्ण्याची १००% पाठराखण करते)

ह्यावर जोरदार अनुमोदन ! मला तुमची बहुतांश मते कशी काय पटतात ह्याचे मला फार आश्चर्य वाटते !

तुमची खालील विषयांवर मते जाणुन घ्यायला आवडेल
१. मुलींचे लग्नाचे वय २१ करणे , मुलांचे लग्नाचे वय २१ असणे
२. बहुपत्नीत्व, बहुपतीत्व
३. पी-नॅप्च्युअल अ‍ॅग्रीमेन्ट वि हुंडा पध्दती
४. हिंदु विवाह संस्था वि. जुडियो ख्रिश्चन / इस्लामिक विवाह संस्था (अर्थात सात जन्मांचे नाते वि. सोशल कॉन्ट्रॅक्ट )
५. अ‍ॅलिमोनी
६. प्रो-लाईफ वि. प्रो-चॉईस ( अर्थात स्त्रियांना त्यांच्या मर्जीने अ‍ॅबोर्शन करण्याचा हक्क असावा का? )
७. लग्नाशिवाय म्युचुअल अंडर्सँडिंग असेल अन त्यातुन मुले होत असतील, तर काय हरकत आहे ?

धन्यवाद!

पण मुलींमुळे लग्ने तुटतात ह्या मताला मात्र थोडीशी हरकत आहे.:
लग्नसंस्थेतील पुरुषांनी पोझिशन ऑफ पॉवर सरंडर केल्याने ती जागा स्त्रीयांनी व्यापली आहे , आणि स्त्रीयांना पुरुषांच्या तुलनेत दूर दृष्टी नसल्याने डायव्होर्स हा ऑब्व्हियस चॉईस आहे ! पण म्हणुन दोष मुलींना देता येणार नाही , दोष मुलांचाच आहे. मुलांनी लग्नाच्या डयनॅमिक्स मध्ये स्वत:ची पॉवर कमी केली नाही , कायम खंबीरपणे पुरुषत्वाने वागत राहिले तर कदाचित घटास्फोट होणार नाहीत.
मी स्त्रीमुक्तीवादी वगैरे आहे असा कृप्या गैरसमज करुन घेऊ नका , मी इतकेच म्हणत आहे की पुरुषांनी त्यांचे नॅचरल मॅस्क्युलीन ट्रेट्स विसरल्यामुळे त्यांची पोझिशन कमकुवत झाली आहे , आणि तसेच स्त्रीयांनी ते मॅस्क्युलीन ट्रेट्स म्हणजेच स्त्रीपुरुष समानता असा काहीसा गैरसमज करुन घेतल्याने डायव्होर्स होत असावेत असे माझे मत आहे.

अवांतर १: माझ्या एका मित्राचा सध्या डायव्होर्स कांड चालु आहे. मी दोन्ही बाजु व्यवस्थित ऐकल्या आहेत आणि त्यात मुलगा आणि त्याची बाजु अक्षरशः च्युतिया आहे, असे माझे स्पष्ट मत बनले आहे. त्याचं स्वत:चं लफडं चालु आहे अन चक्क त्या पोरीसोबत जाऊन रहात आहे, सख्ख्या बायकोला अन पोराला सोडुन दिले आहे. एकवेळ बायकोला फाट्यावर मार , पण स्वतःच्या पोराला कसे सोडु शकतो च्यु साला. सन्स बिलाँग टू फादर . सन्स आर ओन्ड बाय द फादर . A man is in debt of his father until his son gives him a grandson!

अवांतर २: बाकी घटस्फोट प्रत्येक वेळीस वाईटच असतो असे काही नाही. फक्त योग्यवेळी तो योग साधता आला पाहिजे. माझ्यामते पोराबाळांची लग्ने लाऊन दिली अन नातवाचे तोंड पाहिले की परस्पर साम़ंजस्याने सहसंमतीने डायव्होर्स घ्यायला हरकत नसावी.

सर्वसाक्षी's picture

25 May 2023 - 7:45 am | सर्वसाक्षी

<माझ्यामते पोराबाळांची लग्ने लाऊन दिली अन नातवाचे तोंड पाहिले की परस्पर साम़ंजस्याने सहसंमतीने डायव्होर्स घ्यायला हरकत नसावी.>
हे म्हणजे दोन्ही बाजूंचा दारूगोळा संपला, शिपाई धारातीर्थी पडले, खजिना रिता झाला की युद्धबंदी जाहीर करण्यासारखे आहे.
उलटपक्षी जर आयुष्यभर एकमेकांना झेललं तर उतारवयात सोडून जाण्यात काही अर्थ नाही. तशीही वयपरत्वे धार कमी झालेली असते आणि सामंजस्य व सहनशीलता वाढलेली असते

तुमची खालील विषयांवर मते जाणुन घ्यायला आवडेल
१. मुलींचे लग्नाचे वय २१ करणे , मुलांचे लग्नाचे वय २१ असणे

लोकसंख्या वाढीच्या बागुबूव्याला घाबरून भारतीय सरकारने असले मूर्खपणाचे निर्णय घेतले आहेत. नक्की वय काय असावे ह्यावर वाद होऊ शकतो पण माझ्या मते हे वर साधारण १८ च्या जवळपास असावे.

२. बहुपत्नीत्व, बहुपतीत्व

खुशाल बहुपत्नी आणि बहूपती आणि वाट्टेल ते परमुटेशन कॉम्बिनेशन ठेवावे. कॉन्सेंटिन्ग ऍडल्टस असणे महत्वाचे.

३. पी-नॅप्च्युअल अ‍ॅग्रीमेन्ट वि हुंडा पध्दती

माझ्या माहितीप्रमाणे प्री-नप भारतांत एन्फोर्सब्ल नाही. तरी सुद्धा सुखवस्तु तरुण लोकांनी लग्नाच्या आधी कायदेतज्ज्ञाचा सल्ला घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करावे.

लग्न लोकांनी कसे करावे, त्यांत त्यांचे काय निकष असावेत हि खासगी बाब आहे. ह्यांत पैश्यांची देवाण घेवाण सुद्धा होत असेल तर ती सुद्धा खाजगी बाब आहे. माझ्या माहीत असंख्य दक्षिण भारतीय मुली हुंडा देऊन लग्न झाल्या आहेत आणि अत्यंत सुखी सुद्धा आहेत.

मुलाची किमंत = मुलीची किंमत + हुंडा !

हुंडा पद्धती हि मुलींच्या बापांच्या पराकोटीच्या स्वार्थाने निर्माण झाली आहे. मुलीची लायकी नसताना सुद्धा भरपूर पैसे असलेल्या घरांत मुलीचे लग्न करावे म्हणजे तिच्या मुलांना आयते धन मिळावे हि हुंडा पद्धतीची खरी बाजू आहे. कमी धन असलेला वर बिनधास्त हुंडा न घेता लग्न झाला असता, पण त्यांना ते नको. त्यामुळे आपल्या मुलीचे वैगुण्य लपविण्यासाठी मुलींचे वडील हुंडा देऊन आपल्या लायकीपेक्षा चांगल्या घरांत मुलीला लोटतात आणि वर आपणच व्हिक्टीम असल्याचा आव आणतात तो वेगळा.

तरी सुद्धा ह्यांत गैर काही नाही. काही मुली लठ्ठ असतात, कुरूप असतात, अपंग असतात. काही पुरुष कर्तृत्वान असतात पण कॅपिटल नसते. अश्यांत हुंडा पद्धतीने दोन्ही लोकांचे भले होऊ शकते. वीर सावरकर हे चांगले उदाहरण होते. त्यांना लग्न करायचे नव्हते पण विदेशांत शिक्षणाचा खर्च केल्यास आपण लग्न करू ह्या अटीवर त्यांनी हुंडा घेऊन लग्न केले. सावरकर ह्यांचे त्यांत भले झालेच पण पत्नीचे नाव सुद्धा अमर झाले. त्याशिवाय दोघांत प्रेम सुद्धा होते.

लग्नानंतर आणखीन पैश्यांसाठी मुलीचा छळ वगैरे करणे हे प्रकार फ्रॉड मध्ये मोडतात. त्यामुळे त्याचे इथे समर्थन नाही.

४. हिंदु विवाह संस्था वि. जुडियो ख्रिश्चन / इस्लामिक विवाह संस्था (अर्थात सात जन्मांचे नाते वि. सोशल कॉन्ट्रॅक्ट )

माझ्या माहिती प्रमाणे वैदिक विवाह पद्धती सुद्धा करार आहे.

५. अ‍ॅलिमोनी

सध्यातरी काही मत नाही.

६. प्रो-लाईफ वि. प्रो-चॉईस ( अर्थात स्त्रियांना त्यांच्या मर्जीने अ‍ॅबोर्शन करण्याचा हक्क असावा का? )

कठीण प्रश्न आहे. माझे वैयक्तिक तत्व NAP, नॉन एग्रेशन प्रिन्सिपल आहे. त्याच्या अंतर्गत न जन्मलेल्या बाळाला जीवनाचा अधिकार असला तरी त्या बाळाचे जीवन सुकर करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करता येत नाही त्यामुळे ऍबॉर्शन विषयावर पराकोटीची भूमिका मी घेत नाही. किमान काही महिने पर्यंत स्त्रीला अधिकार असावा.

७. लग्नाशिवाय म्युचुअल अंडर्सँडिंग असेल अन त्यातुन मुले होत असतील, तर काय हरकत आहे ?

काहीही हरकत नाही. सुशिक्षित, उच्च मध्यमवर्गीय लोकांनी जास्तीत जास्त मुले निर्माण करणे गरजेचे आहे.

> मुलांनी लग्नाच्या डयनॅमिक्स मध्ये स्वत:ची पॉवर कमी केली नाही , कायम खंबीरपणे पुरुषत्वाने वागत राहिले तर कदाचित घटास्फोट होणार नाहीत.

मान्य आहे. पण हा मोठा आणि वेगळा विषय आहे.

प्रसाद गोडबोले's picture

25 May 2023 - 11:15 am | प्रसाद गोडबोले

बहुतांश मते पटली !

माझा जेवढा धार्मिक अभ्यास आहे त्यावरुन तरी वैदिक धर्मात करार पध्दती नाही. लग्न हा एक पवित्र संस्था आहे. मॅरेज इज सॅक्रोसॅन्क्ट. आणि ह्यामुळेच हिंदुंची विषेश गोची झालेली आहे.

अ‍ॅलिमोनी हा एक भयंकर प्रकार आहे , हे म्हणजे सरळ सरळ पुरुषाला आर्थिक गुलामगिरीत ढकलण्याचा प्रकार आहे . (कोणी स्त्री नवर्‍याला अ‍ॅलिमोनी देत असल्याचे किमान माझ्या तरी पाहण्यात नाही. )

सुशिक्षित लोकांनी जास्त मुले निर्माण करआण्याची गरज आहे ह्यावर देखील जोरदार अनुमोदन. पण अथक प्रयत्न करुनही आम्हांस हे मत पटवुन देण्यात यश लाभलेले नाही. काही ऑटसोर्सिंग करावे अशी फार इच्छा आहे, पण हा सगळा प्रकार भलताच कॉम्प्लिकेट आहे .

बाकी विषय मोठ्ठा आहे ह्यात शंका नाही. प्री-नप्चुअल भारतात लीगली एन्फोर्सिबल नाही हे मलाही नुकतेच कळाले, थोडक्यात काय तर पुरुष हताश आहेत एकुणच लग्नाच्या मार्केट मध्ये ! खंबीरपणे पौरुष्त्वाने वागले तरच विवाहित पुरुषांचे काहीतरी चांगले होऊ शकेल.

तर्कवादी's picture

25 May 2023 - 11:44 am | तर्कवादी

कोणी स्त्री नवर्‍याला अ‍ॅलिमोनी देत असल्याचे किमान माझ्या तरी पाहण्यात नाही.

हे घ्या : पुणे: उच्चशिक्षित पत्नीकडून पतीला कायमस्वरूपी पोटगी - ती ही पन्नास हजार रुपये महिना !!

स्त्रियांना सुद्धा पोटगी द्यावी लागते. मुलगा बिसिनेस आणि मुलगी नोकरी करत असेल तर असे होऊ शकते.

१. मुलींचे लग्नाचे वय २१ करणे , मुलांचे लग्नाचे वय २१ असणे
२. बहुपत्नीत्व, बहुपतीत्व

कमीत कमी भारतात तरी ह्या गोष्टींमध्ये हिंदुना सवलत मिळाली पाहिजे. तरच 'शांतताप्रेमी'पासुन आपले रक्षण होऊ शकते.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 May 2023 - 11:30 pm | चंद्रसूर्यकुमार

बहुपत्नीत्व

कमीत कमी भारतात तरी ह्या गोष्टींमध्ये हिंदुना सवलत मिळाली पाहिजे. तरच 'शांतताप्रेमी'पासुन आपले रक्षण होऊ शकते.

बहुपत्नीत्व ठेऊन लोकसंख्या वाढू शकणार नाही. निसर्गाच्या नियमांप्रमाणे मूल हे स्त्रीलाच होऊ शकते. त्यामुळे बहुपत्नीत्व ठेवले आणि एका पुरूषाने समजा राम जेठमलानींप्रमाणे २ लग्ने केली तर दुसरा कोणीतरी पुरूष असेल ज्याला लग्न करायला बायको मिळणार नाही. त्यामुळे या घरी लोकसंख्या वाढली तरी त्या घरी वाढणार नाही. त्यामुळे एकूण लोकसंख्येवर परिणाम होणार नाही. त्यामुळे पाहिजे तो परिणाम साधणे या उपायामुळे शक्य नाही.

धन्यवाद श्री चंद्रसूर्यकुमार, तुमच्या मतांबरोबर अंशतः सहमत आहे.
तुमचे मी अजुन काही गोष्टींकडे लक्ष वेधु इच्छतो.
१. भारतामध्ये मध्यमवर्गीय समाजात स्त्रीयांची लग्ने २८ - ३२ वर्षे ह्या वयोगटात होतात. स्त्रीला पहीले मुले लग्नानंतर साधारणतः २९ - ३३ वर्षे ह्या वयोगटात होतात. त्यानंतर ते मुल कळते होई पर्यंत साधारणतः ५ वर्षे लागतात. त्यानंतर त्या स्त्रीचे वय ३५ च्या पुढे जाते. त्या वयामध्ये पुन्हा गर्भधारणा मुश्कील होते. त्यामुळे दुसर्‍या मुलाची इच्छा आणि सांभाळण्यची आर्थिक क्षमता असुनही ती अशक्य होऊन जाते. स्त्रीला पुनरुत्पादनासाठी निसर्गाने कमी वेळा दिला आहे, त्यामानाने पुरुषावर अधिक कृपा केली आहे.
२. लव जिहादच्या बर्याच केसमध्ये असे दिसते की, मुस्लीम पुरुष एक पहिले मुस्लीम स्त्रीबरोबर लग्न झालेले असते, त्यानंतरची प्रकरणे मात्र काफिर स्त्रीयांबरोबर असतात. त्याचे अनुकरण हिंदु धर्मीय करु शकतात. हिंदु पुरुष मुख्य स्त्री (पहिली हिंदु बायको) बरोबर अश्या काही स्त्रीया कायदेशीरपणे आणि उघडपणे ठेऊ शकतात. त्या स्त्रीयांना रखेलीच्या ऐवजी अधिक चांगला सामाजिक दर्जा मिळु शकेल.
३. बरेचदा लग्नामध्ये पुरुषाला मुलांची इच्छा असते, पण बायकोला नसते. पण आहे ते लग्न मोडणे योग्य वाटत नसते, त्यामुळे त्या इच्छेला मुरड घालवी लागते. अश्या वेळी बहुपत्नीत्व उपयोगी ठरु शकते.
४. एका पेक्षा अधिक स्त्रीया घरात असल्याने त्यांच्यात स्पर्धा निर्माण होऊन, पुरुषाला अधिक चांगली सेवा मिळु शकते. उदा. एका स्त्रीला मुल झाल्यास दुसर्या स्त्रीला सवतीमत्सरामुळे मुलाची इच्छा होऊ शकते.

> ४. एका पेक्षा अधिक स्त्रीया घरात असल्याने त्यांच्यात स्पर्धा निर्माण होऊन, पुरुषाला अधिक चांगली सेवा मिळु शकते. उदा. एका स्त्रीला मुल झाल्यास दुसर्या स्त्रीला सवतीमत्सरामुळे मुलाची इच्छा होऊ शकते.

विश्वगुरू सरकारने आपली संस्कृती नाही म्हणून सरोगसी वर बहुतांशी बंदी आणली आहे. नाहीतर माझ्या दोन मित्रांनी विना पत्नी दोन मुले निर्माण करून घेतली होती. पवई मध्ये हा धंदा चांगला चालू होता.

दोन पत्नींचा खर्च करून मुले निर्माण करणे किंवा "सेवा" मिळविणे ह्या पेक्षा कंत्राटी पद्धतीवर मुली ठेवणे स्वस्त आणि सोपे ठरू शकते. ह्या बाबतीत लिऑनरो पासून पुरुषांनी धडा घेतला पाहिजे.

धन्यवाद.
थोडेसे अवांतर: परगर्भधारणा (सरोगसी ) कायदा म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याविषयी तारखा चालु आहेत. सरकारने केलेले युक्तिवाद आणि बचाव बालिश आणि अपुरे आहेत.

श्री साहना यांच्या प्रतिसादामुळे हे सापडले.
येथे नवरा आणि बायकोला मुलाची इच्छा आहे, पण लग्न मोडायचे नाही. त्यामुळे कोर्टकचेर्या चालु आहेत. जर तोच जर मुस्लीम असता तर बिनधास्त मध्ये दुसरे लग्न केले असते आणि नंतर हवे तर नवीन बायकोला इस्लामी कायद्यानुसार घटस्फोट दिला असता.

“My family doesn’t know about my wife’s cancer. I fear they will push me for a second marriage if they learn that my wife cannot conceive a child,” he said.
https://theprint.in/judiciary/govt-tells-sc-why-it-wont-change-surrogacy...

सर्वसाक्षी's picture

24 May 2023 - 5:36 pm | सर्वसाक्षी

एका मुलीने तिच्या अपेक्षांचा समारोप करताना लिहिलं होतं:
.., किमान वार्षिक उत्पन्न वीस लाख,

सरकारी अधिकारी असल्यास उत्पन्नाची अट नाही

चौथा कोनाडा's picture

24 May 2023 - 5:55 pm | चौथा कोनाडा

वास्तव परिस्थिती लिहिलीय ... आजुबाजूला काही कुटूंबात ही परिस्थिती दिसून येत आहे.

सौंदाळा's picture

24 May 2023 - 7:26 pm | सौंदाळा

माझ्या बघण्यात एका मुलीला चालायला लागल्यापासून बसायला छोटी खुर्ची, कार मधे बेबी सीट, जेवण्यासाठी वेगळी खूर्ची होती. जेव्हा तिचा प्लेग्रुपचा पहिला दिवस होता (अडीच-तीन वर्षांची असताना) तेव्हा तिला खाली मांडी घालून बसताच येत नव्हते. आता बोला
असो लग्नाच्या बाबतीत बोलायचे तर १५-२० वर्षापुर्वीपर्यंत मुलांचे दिवस होते आता मुलींचे दिवस आलेत. पन्नास पन्नास मुली बघितलेले पण माहितीतले आहेत.
एकुलत्या एक मुला-मुलींमुळे लाडावण्याचे प्रमाण बेसुमार वाढले आहे आणि अश्या कटकटी निर्माण होत आहेत. काहीही असले तरी मुला-मुलींच्या अपेक्षा व्यवहार्य पाहिजेत आणि संस्कार चांगले पाहिजेत.

सस्नेह's picture

24 May 2023 - 7:35 pm | सस्नेह

खरोखर ज्वलंत समस्या आहे.
मुलींपेक्षा त्यांचे आईवडील चुकत आहेत हे नक्की.

श्रीगुरुजी's picture

24 May 2023 - 8:34 pm | श्रीगुरुजी

येथे पूर्ण दोष मुलींना दिला जातोय. लग्नाळू मुलांचेही मुलीकडच्यांना अनेक विचित्र अनुभव येतात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 May 2023 - 9:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

ईथे कोणी मुलीकडचे असतील तर अनुभव लिहावेत

श्रीगुरुजी's picture

24 May 2023 - 9:49 pm | श्रीगुरुजी

बरेच चांगले-वाईट अनुभव आलेत.

विज्ञानाच्या वेगवान प्रगती बरोबरच, गेल्या दहा पंधरा वर्षातील झपाट्याने होणारे जीवनशैलीतील बदल हे विस्मय चकीत करणारे आहेत.
घटस्फोटांचे वाढते प्रमाण हे त्याचेच एक फळ आहे.
नजीकच्या बघण्यातील काही उदाहरणे देतो.
सुमारे वीस वर्षांपूर्वी माझ्या भावाच्या बाबतीत घडलेला किस्सा, घटस्फोटाचा नाही पण वधुपित्यांच्या बदललेल्या मानसिकतेचा. भाऊ एम् एस्सी नंतर केमिस्ट्री मधील एक पदविका करून एका चांगल्या कंपनीत केमिस्टच्या पदावर नोकरी करत होता. डोंबिवलीत स्वतःची नवीन जागा घेतली होती. आमचे वडील गेले होते, आई माझ्याकडे रहात होती, कोणत्याही कौटुंबिक जबाबदाऱ्या नव्हत्या. डोंबिवलीतीलच एक स्थळ सांगून आले, दोघांनीही एकमेकांना बघून, दोन वेळा भेटून पसंत केले. प्राथमिक बोलणी होऊन मुहूर्त ठरवू या इथपर्यंत आले. आणि एका दिवशी वधुपित्यांचा मला (मोठा भाऊ) फोन आला, 'येऊन जाल का, काही बोलायचे आहे'. मी गेल्यावर जुजबी बोलणी झाल्यानंतर त्यांनी विचारले, 'मुलाने स्वतःची जागा घेतली आहे ती कर्ज काढून घेतली आहे का'? 'हो', असे मी उत्तरताच ते म्हणाले, 'म्हणजे संसाराची उमेदीची वर्षे कर्ज फेडण्यात जातील, मुलं हौस मौज केव्हा करणार'?
मी म्हणालो,'तुमची मुलगीही पदवीधर आहे, तीही नोकरी करून संसाराला हातभार लावू शकेल'. यावर ते थोडे विचारात पडल्यासारखे दिसले व म्हणाले, ' ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला'. आणि त्यांनी दोन दिवसांनी नकार कळवला.
(भावाचे दुसऱ्या मुलीशी लग्न होऊन, लग्नानंतर दोनच वर्षात त्याने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि सहा वर्षात ती जागा सोडून डोंबिवलीतच स्वतःचे रो हाऊस बांधले).

दुसरा किस्सा: मुलगा मुलगी दोघेही मध्यम वर्गीय. मुलगा इंजिनिअर, मुलगी पदवीधर नोकरी न करणारी. रीतसर बघून, ठरवून लग्न. मुलगा, मुलगी दोघेही एकुलते एक. मुलगा, मुलाचे वडील दोघेही चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते. सासू होम मेकर.
लग्नानंतर चौथ्या पाचव्या महिन्यात मुलीचे वडील भेटले, मी सहजच मुलीची चौकशी केली, विचारलं,'जयू मजेत आहे ना'?
ते म्हणाले, 'नाही हो, फसलो आम्ही'. मी विचारलं, 'काय झालं'? 'महिना झाला, जयू परत आलीय, आणि परत जाणार नाही म्हणतेय'. 'काय झालं'? ते म्हणाले,'रोज जयूला भाजी आण, किराणा आण अशी कामे सांगतात'. मी विचारलं, घरची धुणी, भांडी'? 'नाही, वरच्या सगळ्या कामाला बाई आहे, स्वयंपाक सगळा सासू करते. आम्ही आमच्या मुलीला कधी कोथिंबिरीची काडी आणायला बाहेर पाठवलं नाही'. यथावकाश घटस्फोट झाला. (त्या वेळेस स्वीगी इंस्टामार्ट, बिग बझार नव्हते).
किस्सा तिसरा: हा ही बघून, ठरवून केलेला विवाह. मुलगा कुठल्यातरी बँकेत उच्च पदावर, मुलगीही बी कॉम, बँकेत नोकरीला. मुलगा एकुलता एक, मुलाच्या वडलांचा नवी मुंबई येथे तीन बेडरूमचा फ्लॅट. लग्नानंतर वर्षभरात मुलीने 'आपण वेगळं राहू या' असा धोषा लावला. मुलीच्या आईने तिला विचारले, सासू जाच करते का, सासरे काही बोलतात का'? 'नाही, पण मला वेगळं राहायचंय,' दरम्यान मुलीला दिवस गेले, बाळंतपणासाठी मुलगी माहेरी आली, तिला मुलगी झाली, 'परत त्या घरी जाणार नाही' हा हेका धरून बसली. शेवटी घटस्फोट झाला.
दुर्दैवाने या तिन्ही ठिकाणी मुलगी/ मुलीच्या घरचे दोषी आहेत असं दिसतंय.

> आम्ही आमच्या मुलीला कधी कोथिंबिरीची काडी आणायला बाहेर पाठवलं नाही'

जबर आहे ! माझ्या माहितीतील अनेक मुली जयूच्या पावलांवर पाऊल ठेवून मार्गक्रमण करत आहेत असे दिसते !

इथे तर मला व्हाट'स अंकल आणि आंटींंचा मेळावा भरला आहे असे दिसतेय.
अजून "हमारे जमानेमे " वाले आलेले दिसत नाहीयेत. ते पण येतील.

श्रीगुरुजी's picture

24 May 2023 - 9:46 pm | श्रीगुरुजी

फक्त मुला-मुलीवर स्वविवाह जमविण्याची कामगिरी सोपविणे उचित नाही. मुला-मुलींचा एक दृष्टिकोन असतो, तसेच आईवडीलांचाही वेगळा अनुभवी दृष्टिकोन असतो. दुसऱ्या बाजूचे जे सांगतात त्यात तथ्य किती आहे, भविष्यात दोघांचे एकमेकांशी किती जमू शकेल, मुला-मुलीच्या सद्यपरिस्थितीवरून भविष्यात काय होऊ शकेल हे आईवडीलांच्या अनुभवी नजरेला समजू शकते. आईवडील व लग्नाळू मुलगी/मुलगा या दोघांचेही दृष्टिकोन एकसमान असल्यास विवाह यशस्वी ठरण्याची शक्यता बरीच जास्त असते.

बरेच अनुभव गाठीशी आहेत.

Bhakti's picture

25 May 2023 - 8:52 am | Bhakti

+१

चंद्रसूर्यकुमार's picture

25 May 2023 - 10:37 am | चंद्रसूर्यकुमार

या बाबतीत माझ्या स्वतःच्याच उदाहरणावरून तितकासा सहमत नाही.

आपल्याकडे म्हणतात की लग्नाच्या गाठी वर बांधलेल्या असतात ते अगदी पूर्ण पटते. आज माझे माझ्या बायकोबरोबर अगदी उत्तम चालले आहे. आम्ही आधी तीन-साडेतीन वर्षे चॅट करून लग्नाचा निर्णय जवळपास पक्का केलाच होता. तेव्हा मी अमेरिकेत होतो आणि ती मुंबईत. त्याकाळी व्हिडिओ चॅटसाठी लागणारा वेबकॅम सगळीकडे असायचाच असे नाही. त्यामुळे व्हिडिओ चॅटही फार वेळा झाला नसावा. मी भारतात परतल्यावर आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि पाच दिवसात साखरपुडाही झाला :) आता जाणवते की गध्देसत्ताविशीत घेतलेली ती मोठी जोखिम होती पण नंतर कसलाही त्रास झाला नाही. या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. खरं तर माझी आणि बायकोची गाठ अन्यथा पडलीही नसती. ती गाठ पडावी म्हणूनच मी अमेरिकेला गेलो होतो की काय असा प्रश्नही मला अनेकदा पडतो.

दुसरे म्हणजे माझी बायको मला चॅटवर भेटलीच नसती आणि जर पालकांवर लग्नाचा निर्णय सोडला असता तर माझे लग्न होणेच अशक्य झाले असते. मी अमेरिकेतून भारतात अपयशी होऊन परतलो होतो हे मी मिपावर अन्यत्र लिहिलेही आहे. पहिले वर्षभर मिळाली ती नोकरी मी केली होती. त्यानंतर दोन वर्षे मी शिकत होतो. त्याच दोन वर्षात बायकोही पुढचे शिक्षण मुंबईत घेत होती. मी अमेरिकेत असताना खास मराठी मध्यमवर्गीय स्वभावामुळे अंथरूण पाहून पाय पसरावे, उगीच व्यर्थ खर्च करू नये अशा सवयींमुळे पैसे साठवले होते ते बायकोच्या फी साठी आणि आमच्या दोघांच्या दोन वेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी दोन वर्षात संपले. माझे शिक्षण संपले लग्नानंतर तीन वर्षांनी. तेव्हा आणखी डोक्यावर शिक्षणकर्ज साठले होते आणि मला नोकरी लागल्यावर मुंबईत पहिले भाड्याने घर घ्यायचे होते तेव्हा डिपॉझिट जमवायला मारामार झाली होती. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की लग्नानंतर तीन वर्षांपर्यंत माझे स्वतःचेच काही धड चालू नव्हते. अशा कोणाबरोबर कोणत्या मुलीच्या पालकांनी लग्न करून दिले असते?

तिसरे म्हणजे आमच्या ओळखीतील एक गोष्ट आहे. ते लग्न पालकांनी बघून, सगळ्या गोष्टींचा विचार करून करून दिले होते. पत्रिकेतही गुण ३६ पैकी ३२ जुळत होते. पण कुठचे काय. गेली कित्येक वर्षे ते दोघे भांडत आहेत. वरकरणी दिसायला सगळे ठीक चालू आहे असे कोणाला वाटेल पण खरं काय चालू आहे हे थोड्या लोकांनाच माहित आहे. एकदा माझ्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त रात्री १२ वाजता कापायला म्हणून केक मागवला होता. तो केक रात्री दहाच्या सुमारास घरी आल्यावर केकचा फोटो मी आमच्या ग्रुपवर टाकला आणि म्हटले- "बायकोच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू होत आहे. अजून फक्त ११५ मिनिटे बाकी आहेत". त्याविषयी त्या व्यक्तीने नंतर मला म्हटले की त्यांच्याकडे असा काऊंटडाऊन भांडायचा असतो :(

स्वतः लग्न जमविणारे काही आनंदात राहतात तसेच पालकांनी ठरवून लग्न केलेले काहीही आनंदात राहतात. त्याचप्रमाणे स्वतः लग्न जमविणारे काही भांडत राहतात तसेच पालकांनी लग्न जमविलेले काहीही तसेच भांडत राहतात. तेव्हा लग्नाच्या गाठी वर बांधलेल्या असतात हेच मला पटते. खरं सांगायचं तर ती एक अंधारात मारलेली उडी असते. नशीब चांगले असेल तर आपली नौका तरून जाते नाहीतर बुडते.

Bhakti's picture

25 May 2023 - 10:54 am | Bhakti

+१
वाह!
मुळात लग्नाचा बेस प्रेम आहे, बाकी सब मायाजाल है :)

नचिकेत जवखेडकर's picture

25 May 2023 - 6:41 am | नचिकेत जवखेडकर

वर सौंदाळा यांनी म्हटल्याप्रमाणे, मुलामुलींना बेसुमार लाडावून ठेवण्याची वृत्ती वाढली आहे. त्यातून, `जो मैं अपनी जवानी में कर ना सका, वो मेरा बेटा/बेटी करेगी` छाप बॉलीवूडी मनोवृत्ती पण वाढीस लागलेली असू शकते. जितक्या लवकर मुलामुलींना रिऍलिटी चेक देता येईल तितक्या लवकर ते जास्त विचारपूर्वक वर्तन करू शकतील. बाकी कोथिंबिरीची काडी पण आणायला कधी पाठवलं नाही टाईप्स विचार असतील तर त्यांना म्हणो तुम्ही लग्न तरी का करून दिलं मग.

माझी मुलगी आत्ताशी ४ वर्षांची आहे पण हे सगळे अनुभव ऐकून, पालक म्हणून लक्ष देणं किती गरजेचं आहे हे अजून जास्त कळालं :)

कॉमी's picture

25 May 2023 - 7:39 am | कॉमी

मीपा Andrew Tate. एकाच बाजूचे दोष दाखवणारा लेख.

भागो's picture

25 May 2023 - 9:10 am | भागो

मीपा Andrew Tate. एकाच बाजूचे दोष दाखवणारा लेख.>>> +१ अगदी अगदी.

Andrew Tate says women belong in the home, can’t drive, and are a man’s property.
He also thinks rape victims must “bear responsibility” for their attacks and dates women aged 18–19 because he can “make an imprint” on them, according to videos posted online.

अँड्रू टेट ,जॉर्डन पीटरसन इत्यादी मंडळी फ्रॉड आहेत. ह्या लोकावंर तालेब ह्यांचे मत वाचावे.

बीटा मेल मंडळींना (जयंत बहुसंख्य भारतीय पुरुष आले) आपली पुस्तके आणि प्रोपागंडा विकून पैसे कमावणे हे ह्यांचे ध्येय आहे.

पुणे, मुंबईत अजूनही अरेंज मॅरेज होतात? ;)
पापाच्या परीने एकतर नोकरी करून सगळ्या कामांना मदतनीस लावावी , मस्त शांती मिळेल.नोकरी नसेल करायची तर कोणत्याही एका कामाची मदतनीस कमी करावी (हाकानाका).

श्रीगुरुजी's picture

25 May 2023 - 9:54 am | श्रीगुरुजी

पुणे, मुंबईत अजूनही अरेंज मॅरेज होतात? ;)

हो, बहुसंख्य विवाह ठरवून होतात.

या लेखात बहुतांशी मुलींना दोष दिला असून मुले पापभीरू दाखविली आहेत. प्रत्यक्षात दोन्ही बाजू समसमान आहेत.

मुलीने विवाह करण्यापूर्वी खालील मुद्दे पहावे.

१) मुलगा किमान आपल्याएवढा तरी शिक्षित असावा व किमान आपल्याएवढा तरी कमावता असावा. अन्यथा मुलीला भविष्यात न्यूनगंडातून निर्माण झालेल्या पुरूषी अहंकाराचा त्रास होऊ शकतो.

२) मुलगा पूर्ण निर्व्यसनी असावा. नेहमी नाही, कधीतरीच मित्रांबरोबर अपेयपान करतो असे सांगितले असल्यास विवाह टाळावा कारण कधीतरीची वारंवारता भविष्यात (विशेषतः चाळीशीनंतर मोठ्या प्रमाणात वाढते).

३) लग्न न करणारी किंवा घटस्फोट होऊन माहेरी आलेली किंवा नवऱ्याशी पटत नसल्याने माहेरी राहणारी बहीण मुलास असल्यास विवाह टाळावा कारण अशी बहीण असूयेतून किंवा नैराश्यातून भावाच्या प्रपंचात हस्तक्षेप करते.

४) आपली गुंतवणूक किती, आईवडीलांकडे किती संपत्ती आहे, आईवडीलांनी आपल्या नावावर काय ठेवले आहे याची माहिती मुलीनं विवाहानंतर काही वर्षे तरी नवऱ्यास देऊ नये. नवऱ्याच्या स्वभावाचा अंदाज आल्यानंतरच आवश्यक वाटल्यास सांगावे.

५) मुलीने आपले आर्थिक व्यवहार स्वत:च करावे. सर्व काही नवऱ्याच्या हातात देऊ नये.

६) विवाह ठरल्यानंतर विवाहापूर्वगच्या काळात नवऱ्याच्या स्वभावाचा अंदाज घ्यावा. तो धरसोड वृत्तीचा आहे का, व्यसने लपविली आहेत का, काही भानगडी होत्या/आहेत का, पैशामागे आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. यातील काही गोष्टी आढळल्यास विवाह टाळावा.

हे सर्व मुद्दे मुलांकरिता सुद्धा लागू आहेत.

अजून एक -

लग्नानंतर लगेच किंवा लग्नापूर्वीच शक्य असल्यास मुलाच्या आईवडीलांनी आपल्या मुलाचा संसार वेगळा थाटून द्यावा. भविष्यात मतभेद होऊन कटु मनाने वेगळे होण्यापेक्षा लग्न होतानाच आनंदाने वेगळे राहिल्यास कटुता निर्माण होण्याची शक्यता कमी असते व दोन्ही जोडप्यांना स्वातंत्र्य उपभोगता येते. तसेच लग्नानंतर दोन्ही बाजूच्या आईवडीलांनी मुलामुलीच्या प्रपंचात हस्तक्षेप टाळावा.

Bhakti's picture

25 May 2023 - 10:56 am | Bhakti

वाह,
आताच हा प्रतिसाद सेव्ह करणे.२० वर्षांनी गरज पडेल कदाचित.

मिपा म्हणजे फ्रस्टेेटेड म्हाताऱ्यांंचे विरंगुळा केंद्र झाले आहे. मालक,चालक, पालक मिपा मधे जरा नवचैतन्य इंफ्युस करा.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 May 2023 - 11:12 am | चंद्रसूर्यकुमार

बऱ्याच पापा कि परी आता कायमच्या पापा च्या घरी आल्या आहेत. नवऱ्यावर प्रचंड पैश्यांचा दावा ठोकला आहेच पण मानसिक आणि शारीरिक छळाच्या पूर्णतः खोट्या कंप्लेन सुद्धा घातल्या आहेत.

हा सगळ्यात हलकट प्रकार असतो. एक प्रकार ओळखीत बघितला आहे. संबंधित स्त्रीचे वय आता ६० च्या आसपास असावे. १५ वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर ५-७ वर्षात कॅनडातील एका विधुर मराठी माणसाला तिने गटवले. आम्हा सगळ्यांना तिने सांगितले की तिला कॅनडाचे इमिग्रेशन मिळाले आहे म्हणून ती तिथे जात आहे. तेव्हाच प्रश्न पडला होता वयाच्या पन्नाशीनंतर इमिग्रेशनसाठीचे पॉईंट्स तिला मिळालेच कुठून? नवरा अनेक वर्षे कॅनडात वास्तव्याला आणि कॅनडाचा नागरिक होता. कॅनडाच्या नागरिकाशी लग्न केले म्हणून तिला बहुदा व्हिसा मिळायला काही अडचण आली नसावी. तिथे गेल्यानंतर तिने त्याला अगदी ठरवून त्रास द्यायला सुरवात केली. डोमेस्टिक हिंसेची खोटी तक्रार दाखल करेन अशी धमकी देऊन त्याला अगदी आपल्या तालावर नाचवले. शेवटी नवरा मानसिक छळ करतो या नावावर त्याच्याकडून घटस्फोट मिळवला. मला वाटते कॅनडातील कायद्याप्रमाणे घटस्फोट झाल्यास नवर्‍याने बायकोला घर देणे बंधनकारक असते (चुभूदेघे). तसे घर तिने त्याच्याकडून उकळले. पोटगी म्हणूनही बरीच रक्कम तिला मिळत आहे आणि ती आता कॅनडात काहीही न करता आरामात राहात आहे. तिचा भाऊ पण कॅनडात असतो. त्याच्याकडून हे सगळे कळले. म्हणजे किती नालायकपणा आहे हा.

अजून दुसरा प्रकार असतो खोटी सेक्शुअल हॅरॅसमेंटची तक्रार द्यायची धमकी देणे. आमच्या कॉलेजमधील तीन वर्षे सिनिअरबरोबर हा प्रकार घडला आहे. तो मुंबईत एका बँकेत नोकरीला आहे. त्याच्या टीममधील एका मुलीला तो कामावरून काही बोलला तर तिने सरळ एच.आर कडे ती तक्रार करेन अशी धमकी दिली. मग त्याची पाचावर धारण बसली. असली तक्रार केली असती तर नुसती नोकरीच गेली असती असे नाही तर तुरूंगात जावे लागले असते. समाजात नाचक्की झाली असती ती गोष्ट वेगळीच. मग ती कधी एकदा सोडून जाते याची वाट बघत राहिला. तिचे काम चांगले नसूनही तो तिला चांगले रेटिंग द्यायचा आणि तिला कधीही भेटायचाही नाही. Appraisal चे बोलणे कसे काय व्हायचे काय माहित. शेवटी लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी १५-२० दिवस ती बया एकदाची सोडून गेली आणि त्याचा जीव भांड्यात पडला. सगळे कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत त्याचा सरळसरळ गैरफायदा घेणे झाले. फेसबुकवर दिपीका नारायण भारद्वाज अशा मुलींच्या हलकटपणाविषयी लिहित असते. अनेकदा कोणत्या कोणत्या लॉजमध्ये जाऊन वेगवेगळे प्रकार करायचे आणि मग बलात्काराची तक्रार दाखल करेन म्हणून सरळ ब्लॅकमेल करायचे असले प्रकारही अनेक होतात. त्याविषयीही दिपीका नारायण भारद्वाज लिहिते. असल्या नालायक मुली स्त्रियांचेच जास्त नुकसान करत असतात. असे प्रकार अधिक प्रमाणात व्हायला लागले तर ज्या ठिकाणी स्त्रियांना खरोखरच अशा प्रकारांना सामोरे जावे लागते ते प्रकारही असेच खोटे आहेत असे वाटायला लागायचा संभव जास्त आहे.

नचिकेत जवखेडकर's picture

25 May 2023 - 11:42 am | नचिकेत जवखेडकर

दुसऱ्या प्रसंगात तुम्ही खोटं सांगताय असा मला म्हणायचं नाही पण मला नाही वाटत की फक्त धमकी दिल्यावर एच आर नी मान्य केलं असतं. केवळ एक मुलगी म्हणतीये म्हणून पुरुषाला कंपनीतून काढून नाही टाकणार. कंपन्यांमध्ये POSH कमिटी असते. त्यांच्याकडे केस गेली तर सर्व पुरावे असतील तरच इतकी कडक कारवाई केली जाते. हां, आता तो पुरुष सहकारी जर का खूप मोकळेपणे(म्हणजे साधारणपणे ऐतराज मधल्या अक्षय कुमार च्या पात्रासारखा) स्त्री कर्मचाऱ्यांशी वागत असेल तर हा मुद्दा कोण कसा उचलून धरेल सांगता येत नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 May 2023 - 12:00 pm | चंद्रसूर्यकुमार

हे बोलणे तांत्रिकदृष्ट्या मान्य आहे. पण अशी धमकी मिळाल्यावर त्याची मानसिक अवस्था नक्की काय झाली असेल याची कल्पना अशा प्रसंगातून न गेलेल्या कोणाला करता येणार नाही. अशा वेळेस तर्कशुध्द किंवा लॉजिकल वर्तणुक होईलच याची खात्री कशी देता येईल?

नचिकेत जवखेडकर's picture

25 May 2023 - 12:41 pm | नचिकेत जवखेडकर

अर्थातच, मानसिकदृष्ट्या खचून जाणं स्वाभाविक आहे आणि इथे त्या स्त्री कर्मचाऱ्याला अनुमोदन नाहीचे. कृपया गैरसमज नसावा.

अजून दुसरा प्रकार असतो खोटी सेक्शुअल हॅरॅसमेंटची तक्रार द्यायची धमकी देणे. आमच्या कॉलेजमधील तीन वर्षे सिनिअरबरोबर हा प्रकार घडला आहे. तो मुंबईत एका बँकेत नोकरीला आहे. त्याच्या टीममधील एका मुलीला तो कामावरून काही बोलला तर तिने सरळ एच.आर कडे ती तक्रार करेन अशी धमकी दिली

दुसऱ्या प्रसंगात तुम्ही खोटं सांगताय असा मला म्हणायचं नाही पण मला नाही वाटत की फक्त धमकी दिल्यावर एच आर नी मान्य केलं असतं.

बरेचदा अश्या गोष्टींचे पुरावे नसतात. आणि एच आर आणि व्यवस्थापन नेहमी तटस्थ असेलच असे नाही. (ते अंतर्गत राजकारणावर अवलंबुन असेल.), त्यामुली कडे काही पुरावे नसले तरी, तीला साथ देणारे कोणी (स्त्री असेल तर अधिकच उत्तम) असेल त्या पुरुषाची सद्दी संपलीच असे समजायचे. एच आर आणि व्यवस्थापनाची बांधिलकी ही कंपनीबरोबर असते, एकदा त्यांना समजले की त्या पुरुषाला साथ देऊन कंपनीचे नुकसान होईल तर ते लगेच त्या पुरुषाची साथ सोडतील.

भारतात तरी स्त्रीने एकदा तक्रार केली आहे असे दिसले की पुरुषाकडे लोक संशयाने बघतात, एकादा पापभिरु असेल तर त्याचे जगणे मुश्कील होत जाते.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 May 2023 - 12:19 pm | चंद्रसूर्यकुमार

आता तर तो कोणा मुलीला/स्त्रीला इंटरव्ह्यूसाठी पण बोलावत नाही. आपल्या टीममध्ये एकही मुलगी/स्त्री नको असे त्याला वाटायला लागले असेल तर त्यात त्याचे काय चुकले? जोपर्यंत सगळे कायदे स्त्रियांच्याच बाजूचे आहेत आणि असा गैरफायदा घ्यायचे प्रकार चालू आहेत तोपर्यंत अशी दुसरी टोकाची प्रतिक्रिया आली तर नवल वाटू नये.

हीच गोष्ट दुर्दैवाने SC/ST ची आहे. SC/ST कायद्यामुळे बहुसंख्य छोटे उद्योग ह्या लोकांना दूरच ठेवत आहेत. हल्ली हाऊसिंग सोसायटी मध्ये सुद्धा शांतताप्रिय समाजाप्रमाणे ह्यांना जागा न देण्याची परंपरा सुरु होत आहे. चुकीच्या पार्किंग मध्ये ठेवलेली गाडी हलवायला सांगितली म्हणून Sc/ST कायद्याची धमकी दिली, आपल्या गॅलरीतून केबल नेण्याची परवानगी नाकारली म्हणून कायद्याची धमकी दिली असल्या गोष्टी सर्रास घडत आहेत.

लैंगिक आत्याचाराची खोटी तक्रार...
हा प्रकार अगदी जवळून बघितलेला आहे.
माझ्या मित्राचा मुलगा, जो माझ्या मुलाचा वर्गमित्र देखील आहे. त्याच्या बाबतीत घडलेला हा किस्सा.
तो आणि त्याची एक स्त्री सहकर्मचारी कंपनीच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेले होते. राहण्याची व्यवस्था कंपनीनेच चांगल्या हॉटेलमध्ये केलेली होती. ही स्त्री सह कर्मचारी कंपनीने दिलेले काम कारण्याऐवजी भटकण्यात आणि शॉपिंग करण्यात वेळ घालवत होती. मित्राचा मुलगा थोडासा सेवाज्येष्ठ असल्याने त्याने तिला हटकले.
तिथून परतण्याच्या आदल्या दिवशी ती मुलगी त्या मुलाला म्हणाली ,'आज मी तुला ट्रीट देते'. ते दोघे हॉटेलात एकत्र जेवायला गेले. त्या मुलीने मित्राच्या मुलाला बियर किंवा ड्रिंक घेण्याचा आग्रह केला, तो मुलगा काही घेत नसल्याने त्याने सौम्य शब्दात नकार दिला. ती मुलगी मात्र बियर प्याली. हॉटेलवर परतल्यावर ती म्हणाली,'अरे, दोन मिनिटे माझ्या रूमवर येतोस का'? ते रूममध्ये शिरल्यावर ती मूलगीच त्याच्या अंगचटीस येऊ लागली. त्यावर सावध होऊन तो मुलगा तिच्या रूमवरून निघून आपल्या रूम मध्ये गेला.
परत आल्यावर त्या मुलीने सह कर्मचाऱ्याबद्दल लैंगिक आत्याचाराची तक्रार केली. त्या सर्व प्रकरणात त्या मुलाला अतिशय मानसिक त्रास झाला. अखेर कोणताही धब्बा न लागता तो सुटला.
त्या मुलाचा मानसिक त्रास अगदी जवळून बघितला आहे. त्याने लवकरच ती नोकरी बदलली.

साहना's picture

25 May 2023 - 9:54 pm | साहना

एका मित्राची पत्नी कुटुंबियांच्या चिथवण्यावरून त्याला सोडून गेली. पार येण्यासाठी पैसे मागू लागली. त्याने साफ नकार दिला. मग नंतर घरी आली, पतीची माफी मागितली आणि त्याच दिवशी सेक्स ची मागणी केली. सुदैवाने हा मुलगा चतुर होता त्याने तिला सरळ घराबाहेर हाकलले. मॅरिटल रेप ची केस बनविण्यासाठी मुलीच्या वकिलाने तिला घरी शिकवून पाठविले होते. मुलगा जर बळी पडला असता तर ताबडतोप सरकारी दवाखान्यात तपासणीची वगैरे व्यवस्था वकिलांनी करून ठेवली होती.

तर्कवादी's picture

25 May 2023 - 10:17 pm | तर्कवादी

मॅरिटल रेप ची केस बनविण्यासाठी मुलीच्या वकिलाने तिला घरी शिकवून पाठविले होते

मॅरिटल रेपचा कायदा कधी झाला भारतात ?

मग नंतर घरी आली, पतीची माफी मागितली आणि त्याच दिवशी सेक्स ची मागणी केली.

सेक्स = शरीरसबंध, संभोग, प्रणयराधना
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार स्वत:च्या स्त्रीबरोबर शरीरसबंध ठेवणे हा पुरुषाचा हक्क आहे. त्यामुळे तो गुन्हा होऊ शकत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

26 May 2023 - 11:55 am | कानडाऊ योगेशु

मग ते बच्चन साहेबांनी नो मीन्स नो असे गुरगुरत म्हटले ते कशाबद्दल होते?

Trump's picture

26 May 2023 - 12:09 pm | Trump

The Supreme Court of India is set to hear petitions about the constitutionality of the ‘marital rape exemption’ on May 9, 2023.

As of 2019, marital rape has been criminalized in 150 countries, but marital rape under the Indian Penal Code (IPC) only applies in the situation of “non-consensual intercourse with a wife who is aged between 12 and 15 years”. Where the exception does not apply, the IPC (Section 375) states that “sexual intercourse by a man with his own wife, the wife not being under fifteen years of age, is not rape.

https://www.equalitynow.org/news_and_insights/a-ruling-on-marital-rape-i...

-------------------

https://www.indiatoday.in/law/story/law-that-says-sexual-intercourse-bet...
Law that says sexual intercourse between man and wife isn't rape even if by force
Chhattisgarh High Court today held that sexual intercourse by a man with his wife is not rape, even if it was by force or against her wish. The High Court, on the basis of this reasoning, discharged a man for the offence of rape while at the same time upholding the charges against him for unnatural sex.

साहना's picture

25 May 2023 - 11:15 am | साहना

आमच्या अत्यंत जवळच्या मित्राची गोष्ट आहे. अत्यंत गरीब परिस्थितून वर आला, IIT शिक्षण, अत्यंत बुद्धीमान इत्यादी. घराची परिस्थिती इतकी गरीब कि साधारण एकूण नेट वर्थ १,००,००० पेक्षा कमी असावे. मी साधारण त्याच्याच वयाची आणि त्याच्यासोबत फिरणे वगैरे होत असे. (दूरचे रिलेशन असल्याने आमचे नाते शक्य नव्हते). एका आंटीने माझ्यावर दबाव टाकला कि ह्या पोराला आत्ताच अमुक मुली सोबत साखरपुडा करायला सांग. त्याने फक्त हो म्हणावे मी १० दिवसात सर्व करते. ५ रुपये खर्च करण्याची गरज नाही.

मी म्हटले कि मुलगी कोण ? तर एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याची (डायरेक्टर ऑफ समथिंग) एकुलती एक पोरगी. मी म्हटले मग तो ह्याला कशाला देईल पोरगी ? पण आंटी मानेना. मी सहज मित्राला म्हटले. त्याला इंटरेस्त नव्हता कारण त्याला इंग्लंड मध्ये शिष्यवृत्ती मिळत होती पण तारुण्य सुलभ कुतूहलाने आम्ही म्हटले हि मुलगी पाहून तरी घेऊया.

त्यामुळे आम्ही पत्ता काढला आणि त्या सरकारी अधिकाऱ्याच्या भल्या मोठया बंगल्यापुढे गाडी पार्क करून नजर ठेवली. हि मुलगी फेसबुक वगैरेवर नव्हती. शेवटी आम्हाला दिसली. साधारण म्हस आणि रानडुक्कर ह्यांच्या सारखी दिसणारी आणि किमान ३०० पाऊंड तरी वजन असेल. म्हणजे हि रिक्षा वैगैरेत मावणे शक्यच नव्हते.

मी माझ्या आंटीला बरेच फैलावर घेतले. ती वरून म्हणते कि बापाने जावयासाठी बंगला, गाडी आणि इतर अनेक असेट्स ठेवले आहेत. शेवटी माझ्या मित्रानेही थेट हिच्या सोबत लग्न करण्यापेक्षा मी सन्यास घेईन असे सांगून अँटीचें तोंड बंद केले. नंतर ह्या मुलीचे लग्न झाले आणि २ महिन्यात मुलगी घरी परत.

मी मुद्दाम आंटीला फोन करून कारण विचारले. तर म्हणजे जावयाला सासर्याने ह्युंदाई वेर्णा गाडी दिली. एक दिवस गर्दीतून गाडी चालवत असताना कुठे तरी लागली. त्यावर मुलीने पतीला सुनावले, माझ्या बापाची गाडी आहे, सांभाळून चालाव इत्यादी. गाडी आणि पापा कि परी ह्या दोन्हांची रवानगी पतीने घरी केली.

धाग्याचा मुख्य विषय हुंडा हा नाही. पण त्यावरही चर्चा झाली आहे. त्यामुळे त्याबद्दल मी काही मत मांडतो.
हुंड्याकरिता ऐनवेळी अडून बसणे, लग्नानंतर विविध तर्हेने अधिकचा हुंडा मागणे , त्याकरिता वधूचा छळ मांडणे ह्या गोष्टी निश्चितच निंदाजनक आहेत.
पण दुसरीकडे असे बघा की एखादा बीए वा बी कॉम उत्तीर्ण झालेला, कुठेतरी साधीशी-कमी पगाराची नोकरी करणारा मुलगा आणि उच्चशिक्षित, सुंदर , चांगली नोकरी करणारी मुलगी यांचा विवाह ( त्यातही नियोजनपूर्वक / अ‍ॅरेंज्ड) होवू शकतो काय ? अगदी हजारांत एखादा अपवाद असेल तर तो बाजूला ठेवून ढोबळ मानाने सांगा ... पण तेच सामन्य रुपाची किंबहूना कुरुप सुद्धा , साधारण शिक्षण असलेली मुलगी व उच्चशिक्षित / उत्तम नोकरी असणारा मुलगा यांचा विवाह ही फार सामान्य गोष्ट आहे. हे शक्य होते ते हुंड्यामुळेच ना ? याला हुंडा न म्हणता खरे तर तडजोड मुल्य म्हणायला हवे. तडजोड कोणत्याही स्वरुपात असू शकते. हुंडा हा त्यातला एक रोखठोक प्रकार. पुर्वी साटेलोटे (मुलाच्या बहिणीचे लग्न मुलीच्या भावासोबत जुळवणे) पद्धत होती, ती ही बहुधा अशा प्रकारच्या तडजोडीचे एक स्वरुप असावे. "दम लगा के हाएशा" हा चित्रपट आपण पाहिला असेल तर त्यात दहावी अनुत्तीर्ण , फारसे उत्पन्न नसलेला पण रुपाने देखणा कनिष्ठ मध्यमवर्गीय नायक (आयुष्मान खुराणा) अभ्यासात हुशार, स्पर्धा परिक्षेची तयारी करत करिअर घडवू पाहणारी पण आकाराने अवाढव्य व त्यामुळे रुपाच्या खात्यात शून्य (की उणे ) गुण असलेली नायिका (भूमी पेडणेकर) यांचा विवाह होतो. माझ्या आठवणीप्रमाणे यात हुंड्याची देवाणघेवाण दाखवलेली नाही. पण नायकाचे शिक्षण / करिअर /उत्पन्न याबाबतीत नायिकेने केलेली तडजोड हा एक प्रकारचा हुंडाच आहे.
आपण आयुष्यात तडजोडी करुन जगू नये असे प्रत्येकालाच वाटते. पण अशा विविध तडजोडी होतात हे सत्य आहे. उच्चशिक्षित मुलाने घेतलेला हुंडा म्हणजे भीक वा खंडणी नव्हे पण त्याने स्वीकारलेल्या तडजोडीचे ते मुल्य आहे. ते मुल्य म्हणजे १०-१५-२५ लाख वगैरे रुपये हे पैशाच्या स्वरुपात उघड दिसून येते. पण मुलाने केलेली तडजोड काय / त्याचे मुल्य काय ते नेहमीच उघडपणे दिसून येत नाही. (ज्या मुलाला तडजोड स्वीकारुन मन मारत जगायचे नाही तो हुंड्याची अपेक्षा करत नाही, किंबहूना वधुपित्याने स्वेच्छेने दिलेल्या भेटीसुद्धा स्वाभिमानाने नाकारतो.)
मुलाच्या पालकांनी मिळणार्‍या हुंड्याकरिता मुलाला त्याचे मन मारायला लावणे (त्याला आवडेल अशा मुलीशी त्याचे लग्न न लावता केवळ अधिक हुंडा देणार्‍या मुलीशी त्याचे लग्न लावून देणे) चुकीचे. तसेच मुलीच्या पालकांनी मुलीला अर्थिकडृष्ट्या स्वावलंबी बनवण्याकरिता प्रयत्न करणे, स्वतःच्या आरोग्याची, फिटनेसची तिने काळजी घ्यावी अशी तिला सवय लावणे हे न करता पैशाच्या जोरावर जो मुलगा केवळ तडजोड म्हणून मुलीला स्वीकारायला तयार झाला आहे त्याच्या गळ्यात बांधणे हेसुद्धा चुक. त्यामुळे दोघांच्या जीवनात प्रेम, ओढ न राहता केवळ तडजोड्/व्यवहार शिल्ल्लक राहतो (बहुधा).
मुलीच्या पालकांनी मुलीला अर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यावर भर दिला पाहिजे
तसेच आपल्या अपत्याचे लग्न झालेच पाहिजे हा अट्टहास मनातून काढून टाकायला हवा. एखादी मुलगी सुशिक्षित / स्वावलंबी असूनही तिच्या रुपामुळे तिचे लग्न होत नसेल तर ते सत्य स्वीकारावे. एखाद्या मुलाने तडजोड म्हणून तिला स्वीकारावे यापेक्षा तिचे लग्न नाही झाले हे वास्तव कमी क्लेषकारक असेल.
मुलगा वा मुलगी कुणीही आपला जोडीदार आपल्याला आवडला/ली असल्यासच (आणि आपणही त्याला /तिला पसंत आहोत याची खात्री झाल्यावर) लग्न करावे. लग्नात प्रेम व ओढ (पॅशन) असावी , तडजोड नाही.
एक प्रसिद्ध वाक्य इथे उद्धृत करतो "You don’t marry someone you can live with, you marry the person who you cannot live without.” "

> हुंड्याकरिता ऐनवेळी अडून बसणे, लग्नानंतर विविध तर्हेने अधिकचा हुंडा मागणे , त्याकरिता वधूचा छळ मांडणे ह्या गोष्टी निश्चितच निंदाजनक आहेत.

बरोबर. हुंडा आहे ह्याचा अर्थ ह्या प्रकारचं निंदनीय घटना घडतीलच असे नाही. आज सुद्धा देशांत असंख्य लागेन हुंड्याच्या जोरावर होतात पण ह्या निंदनीय गोष्टी घडत नाहीत. हुंड्यासाठी छळ मांडणारे कुटुंबीय कायद्याला घाबरत नाहीत, कायदा काहीही असू अश्या घरात पोरगी लोटणे म्हणजे तिला संकटात फेकण्यासारखेच आहे. पण अशामुळे संपूर्ण हुंडा प्रथेला अनैतिक ठरविणे चुकीचे आहे. सरकारी नोकरी असलेल्या अधू मुलीने बेरोजगार तरुणाकडे लग्न करावे हा सुद्धा हुंडाच आहे, इथे चेक आधीच फाडला जात नाही तर हप्त्या हप्त्याने फाडला जातो.

आज सुद्धा देशांत असंख्य लागेन हुंड्याच्या जोरावर होतात

नाही त्या वरदक्षिणा म्हणातात.

चौकस२१२'s picture

27 May 2023 - 10:40 am | चौकस२१२

हुंडा म्हणजे फक्त मुलीकडच्यांनी लग्न जुळावे म्हणून देणे आणि त्याची अपेक्षा मूला कडच्यांनी ठेवणे आणि तो स्वीकारणे हि व्याख्या जर असले तर ते चुकीचे आणि कायद्यात बसत नाहीच
मग राहिला काय तर नवीन संसाराला मदत म्हणून दोन्ही कडच्यांनी समान मदत करणे यात लग्नाच्या खरचा पासून ते इतर भेट वस्तू पैसे सगळे आले हे देणे याचा पाठपुरावा होऊ शकतो

चौकस२१२'s picture

27 May 2023 - 10:41 am | चौकस२१२

हुंडा म्हणजे फक्त मुलीकडच्यांनी लग्न जुळावे म्हणून देणे आणि त्याची अपेक्षा मूला कडच्यांनी ठेवणे आणि तो स्वीकारणे हि व्याख्या जर असले तर ते चुकीचे आणि कायद्यात बसत नाहीच
मग राहिला काय तर नवीन संसाराला मदत म्हणून दोन्ही कडच्यांनी समान मदत करणे यात लग्नाच्या खरचा पासून ते इतर भेट वस्तू पैसे सगळे आले हे देणे याचा पाठपुरावा होऊ शकतो

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 May 2023 - 7:19 pm | हणमंतअण्णा शंकर...

एकंदरीतच मौज आहे.

एकंदरीतच दहा-एक हजार वर्षांचे उट्टे आजकालच्या मुली पैतृक समाजव्यवस्थेवर काढत आहेत हे पाहून गंमत वाटली.

बाकी, बाकी म्हणाल तर धागाकर्ती/कर्ते जरा माणसांत मिसळल्या/ले तर सँपल सेट अजून वास्तविक झाला असता.

बाकी काय, तालेब बिलेब वाचीत राहा, उधळण्या ज्ञानकण साठवित राहा, घेतला वसा टाकू नका एवढी माफक अपेक्षा.

Bhakti's picture

26 May 2023 - 12:23 pm | Bhakti

एकंदरीतच दहा-एक हजार वर्षांचे उट्टे आजकालच्या मुली पैतृक समाजव्यवस्थेवर काढत आहेत हे पाहून गंमत वाटली.
मीनव्हाईल लग्नाळू मुले ;)
https://www.instagram.com/reel/CsbgQzbOTlV/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

Bhakti's picture

26 May 2023 - 12:23 pm | Bhakti

एकंदरीतच दहा-एक हजार वर्षांचे उट्टे आजकालच्या मुली पैतृक समाजव्यवस्थेवर काढत आहेत हे पाहून गंमत वाटली.
मीनव्हाईल लग्नाळू मुले ;)
https://www.instagram.com/reel/CsbgQzbOTlV/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 May 2023 - 7:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

मुलगा वा मुलगी कुणीही आपला जोडीदार आपल्याला आवडला/ली असल्यासच (आणि आपणही त्याला /तिला पसंत आहोत याची खात्री झाल्यावर) लग्न करावे. लग्नात प्रेम व ओढ (पॅशन) असावी , तडजोड नाही.

अ‍ॅरेंज मॅरेज मधे बर्‍याच गोष्टी लग्नानंतरच समजुन येतात. १०-२० वर्षात जे समजत नाही ते १०-२० दिवसात कसे समजणार? शिवाय बरीचशी अ‍ॅरेंज मॅरेज ही "घरचे म्हणतात म्हणुन" होतात. नवरा/नवरीला तेव्हा तितकीशी अक्कल नसते.(मरतंय आता :) पळा).

अजुन एक म्हणजे पहीले काही दिवस नखरे करुन "हे नको/ते नको" केल्यावर थोडी अक्कल येऊन अपेक्षा कमी कमी होत जातात आणि "काहीही चालेल" पर्यंत मजल जाते. जन्मभर एकटे रहाण्याची तयारी असणारे थोडेच असतात, मग तडजोड्च पर्याय उरतो.

अजुन एक म्हणजे या सगळ्यात आपण वर/वधू शिकलेले, हातीपायी धड(अव्यंग) वगैरे अध्याह्रुत धरले आहे. तसे नसल्यास तडजोड करावीच लागणार ना?

आमच्या नात्यात एक पायाने अधू, पण सरकारी नोकरी असणारी मुलगी होती. चाळीशी आली पण लग्न जमेना. मग एक कमी शिकलेला मुलगा मिळाला, स्थिर नोकरी नाही. पण सामोपचाराने लग्न झाले, संसार झाला, मुलगा झाला. मुलाचे शिक्षण वगैरेही झाले. सगळे घर जन्मभर तिनेच चालवले. अर्थात सगळे काही आलबेल नव्हते, पण पार पडले. म्हातारपणी तिने आई वडीलांनाही नवर्याच्या मदतीने सांभाळले. त्यानी सुखाने डोळे मिटले. तडजोड न करता हे झाले असते का?

तर्कवादी's picture

25 May 2023 - 10:14 pm | तर्कवादी

पण पार पडले

पार पडणं हेच एकमेव उद्दिष्ट होवून जातं आयुष्याचं...
तडजोड न करता हे झाले असते का?
आयुष्यात सगळं काही असेल पण जोडीदारबद्दल प्रेम / ओढ नसेल तर अशी तडजोड असू नये इतकंच मला वाटतं.. बाकी शिक्षण, उंची , पगार ई तडजोडी दुय्यम आहेत..अर्थात ज्याचा त्याचा विचार आणि दृष्टीकोन..
पण तडजोडी होतात हे वास्तव आहेच...तडजोडी झाल्याच नसत्या तर कदाचित हा प्रतिसाद लिहायला मी अस्तित्वात नसतो किंवा वाचायला तुम्ही (कृपया व्यक्तिशः घेवु नका)

शिवाय बरीचशी अ‍ॅरेंज मॅरेज ही "घरचे म्हणतात म्हणुन" होतात

अ‍ॅरेंज मॅरेज ही संकल्पना मोडीत काढायला हवी.. किमानपक्षी पहिली पायरी म्हणून घरच्यांनी बाळासाठी/बेबीसाठी स्थळ बघणे, पारखणे, छाननी करणे व निर्णयप्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणे हे तरी बंद करावं. (वरच्या एका प्रतिसादात मी हेच म्हंटलंय)

Bhakti's picture

26 May 2023 - 9:24 am | Bhakti

+१
तडजोडीचा पाया जर शारीरिक व्यंग ,रंग,वजन,उंची,अधूपणा,काही स्किन इश्यु,हेअर इश्यु इत्यादी असेल तर त्यातून ही तडजोड न्यूनगंड म्हणून कायम राहणार नाही का?
शेवटी लग्न हेच सर्वस्व नाही हे निदान आजच्या पिढीने तरी ओळखावे.
एक मुलगी आहे.ती कमालीची हुशार आहे.पण एक शुल्लक समस्या आहे.पण मुलगी म्हणून तिला तिचा न्यूनगंड नाही.करीयरच्या बाबतीत तिने काही चुका केल्या आहेत.त्या सुधारणा करूनच लग्न करेन असं ठरवलं आहे.कोणी आपल्यावर उपकार करू नये ,प्रेमानेच स्वीकार करावा असा मानस आहे (finger r crossed :))

तर्कवादी's picture

26 May 2023 - 3:54 pm | तर्कवादी

शेवटी लग्न हेच सर्वस्व नाही हे निदान आजच्या पिढीने तरी ओळखावे.
अगदी. आणि त्याबरोबर लनाआधी शरीरसंबंध असणे हे काही पाप नाही.

प्रदीप's picture

26 May 2023 - 9:36 am | प्रदीप

आवडला व त्यांतील विचार पटले.

लेखांत तुम्ही घटस्फोटाचा उल्लेख केला आहे. भारतीय समाजातील काही प्रकरणे ह्याहून पुढे गेलेली आहेत. म्हणजे, ह्या 'पापा क्या पर्‍या' पैशासाठी पुरूषांशी॑ संबंध ठेवतात अथवा लग्न करतात. मग त्या पुरुषावर व घरांतील इतर पुरूषांवर बलात्काराचे आरोप ठेवतात. आपल्या येथील ह्यासंबंधातील कायदा नक्की काय आहे हे मला ठाऊक नाही, पण एखाद्या स्त्रीने हे आरोप केल्यावर त्या पुरुषाला तात्काळ अटक केली जाते. त्याचे स्वतःचे व त्याच्या कुटुंबियांचे जीवन उध्वस्त होऊन जाते. अनेकदा पैसे देऊन ह्यांतून सुटका करून घेणे हा एकमेव मार्ग त्यांच्यापुढे रहातो. तसे केले तरीही डाग रहातोच!

ट्वीटरवर दीपिका नारायण भारद्वाज @DeepikaBhardwaj ही स्त्री अशा अनेक केसेसचा स्वतःहून पाठपुरावा करते. ह्या प्रत्येक केसची सविस्तर माहिती ती तिच्या ट्वीट्सवरून देत असते. ह्यांत, केवळ पैशासाठी श्रीमंत व्यक्तिशी लग्न करून मग त्या व्यक्तिवर तसेच त्याच्या वडिलांवरही घृणास्पद आरोप केले जातात. -- इथपासून, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध ठेऊन नंतर त्यांच्यावर बलात्काराचे आरोप करणे-- इथपर्यंत अनेक केसेस त्यांनी रीपोर्ट केल्या आहेत. त्या स्वतः ह्यांतील शक्यतो बर्‍याच केसेसचा पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा करतात. ह्या दुसर्‍या प्रकारांतील काही केसेस थक्क करणार्‍या आहेत-- उदा. एका स्त्रीने दोनेक वर्षांत ६ ते ७ पुरुषांवर बलात्काराचे गुन्हे दाखल करणे!!

हे सर्व करतांना, अर्थात, त्यांना अनेक, तथाकथित स्त्रीवादी 'अ‍ॅक्टिव्हिस्टां"कडून शिव्या खाव्या लागतात. पण त्यांनी आपले कार्य नेटाने सुरू ठेवलेले आहे. त्यांना ट्वीटरवर 'फॉलो' केल्यास थक्क करणार्‍या केसेस दिसून येतात.

धन्यवाद. उत्तम माहिती.

प्रदीप's picture

27 May 2023 - 11:33 pm | प्रदीप
प्रदीप's picture

7 Jun 2023 - 7:47 pm | प्रदीप

दीपीका भारद्वाज ह्यांच्या प्रयत्नांमुळे गुरगांव पोलिसांनी काही स्त्रीयांना अटक केलेली आहे. ह्या स्त्रीया, अनेक पुरुषांवर, बलात्काराच्या एकाहून अधिक केसेस दाखल करीत होत्या.

इपित्तर इतिहासकार's picture

26 May 2023 - 10:30 am | इपित्तर इतिहासकार

ती मटार सोलले की आईला फोन करते

"काय करू ह्याचे?"

"फ्रीज मध्ये ठेव हवाबंद डब्यात"

असा प्रतिसाद आला की ओके होतो मग कार्यक्रम.

अजून राजाराणी सुखात आहेत पण हे लैच विचित्र वाटले होते.

असो, बरे व्हावे बिचाऱ्यांचे हीच सदिच्छा.

पाश्चात्य संस्कृती म्हणजे वीकेंड कल्चर आत्मसात करायचे आहे लोकांना. श्रमप्रतिष्ठा वगैरे नाही. असे काहीसे वाटते.

इपित्तर इतिहासकार's picture

26 May 2023 - 10:39 am | इपित्तर इतिहासकार

सामाजिक प्रश्न आहे तुम्ही मांडलेला त्यामुळे मी त्यावर विचारलेला प्रश्न पण सामाजिक दृष्टीने पहावा असा डिस्क्लेमर आधीच देतो.

तर प्रश्न असा की

१. आपली जात काय ??

विचारण्याचे कारण - आपण जात न मानण्याचा स्तुत्य निर्णय घेतला असेल तर हिंदुहितार्थ आपले अभिनंदन आहे, पण समाजात एकंदरीत अजूनही जात चालते.

तुम्ही जे सांगितले आहे की "मी अमुक क्ष क्ष (आकड्यात) घटस्फोट जवळच्या नातलगत बघितले आहेत म्हणून हा प्रश्न पडला.

आणि अर्थात माझ्याकडे सध्या विदा उपलब्ध नाही पण घटस्फोट होण्यात आर्थिक स्थिती, पोरी (अन् पोरांचे पण) पालनपोषण, शिक्षण यांच्यासोबत जात सुद्धा महत्वाची असावी. काही जातींत घटस्फोट जास्त होतात असा आपला माझा एक समज होय. त्यामागची कारणमीमांसा मला समजून घ्यायची आहे

जर माझे परसेपशन बरोबर असले तर ??

साहना's picture

27 May 2023 - 2:29 am | साहना

> १. आपली जात काय ??

गौड सारस्वत ब्राह्मण ! मी जातीभेद मानत नाही पण स्वतःची जात आणि जाती विषयक कार्यक्रम तसेच एकीकरणात भाग घेते.

घटस्फोटांत जात महत्वाची आहे का ? ह्याचे उत्तर होय आणि नाही असे दोन्ही आहे. कारण आकडेवारीत १००% तुम्हाला जात आणि घटस्फोट ह्यांच्यात कोरिलेशन सापडेल पण ते थेट असण्यापेक्षा इतर घटकांवर अवलंबून आहेत जे सुद्धा जातीवर अवलंबून असू शकतात.

आकडे पाहू. मी स्वतः GSB असल्याने माझे नातलग सुद्धा तसेच असतात आणि त्यामुळे तो बायस इथे आढळेल.

१. घटस्फोट १ - दोन्ही GSB, मुलगा आणि मुलगी उच्चशिक्षित, मुलगा श्रीमंत मुलगी मध्यमवर्गीय. चूक : मुलीची !
२. घटस्फोट २ : मुलगा लिंगायत, मुलगी मराठा - दोन्ही उच्चशिक्षित आणि श्रीमंत - चूक : ५०-५०
३. घटस्फोट ३ : दोन्ही GSB , दोन्ही मध्यमवर्गीय उच्चशिक्षित चूक १००% मुलीची.
४. घटस्फोट ४: दोन्ही GSB, मुलगी घटस्फोट ३ मधलीच. दोन्ही मध्यमवर्गीय उच्चशिक्षित. चूक १००% मुलीची.
५. घटस्फोट ५: मुलगी GSB, मुलगा बंगाली ब्राम्हण - मुलगी उच्चमध्यम, मुलगा अतिश्रीमंत दोन्ही उच्चशिक्षित - चूक १००% मुलाची.
६. घटस्फोट ६: मुलगी तामिळ ब्राह्मण, मुलगा तामिळ ब्राम्हण - दोन्ही मध्यम उच्चशिक्षित - चूक मुलीची १००%.
६. घटस्फोट ६: दोन्ही कोकणस्थ मध्यम वर्गीय उच्चशिक्षित - चूक ५०-५०.
७. घटस्फोट ७ : दोन्ही गरीब, जातींने साधारण कोळी जातीचे. चूक ठाऊक नाही. शिक्षण दहावी पास.
८. घटस्फोट ८: तांत्रिक दृष्ट्या घटस्फोट नाही कारण पतीला पत्नी आपल्या प्रियकरासोबत ओयो मध्ये सापडली. हिंसा झाली. (जास्त बोलत नाही कारण प्रकरण कोर्टांत आहे) दोन्ही उच्चशिक्षित
९. घटस्फोट ८: GSB मुलगी, मराठा अमेरिकन स्थायिक मुलगा. मुलीला मारहाण झाली त्यामुळे माझ्या मदतीने पळून भारतात परत आली. उच्चशिक्षित
१०. घटस्फोट १०: दोन्ही GSB मध्यम वर्गीय, मुलगी डोक्याने ठीक नाही. उच्चशिक्षित
११. घटस्फोट ११: मुलगी GSB, मुलगा चित्पावन. - डिटेल्स ठाऊक नाही. उच्चशिक्षित
१२: घटस्फोट १२ : दोन्ही एकुलते एक अति श्रीमंत GSB दोन्ही सुमार शिक्षण

माझ्या मते प्रमुख घटक :

१. मुलगी एकुलती एक असणे किंवा घरची परिस्थिती भक्कम असणे.
२. दोघांपैकी एक उच्च शिक्षित असणे (पदवीधर व्यावसायिक किंवा पदव्युत्तर).
३. अन्याय/जाच सहन करण्याची क्षमता कमी असणे.
४. मुलीच्या आईवडिलांचा गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप.
५. सासू सासर्यांनी बरोबर राहणे.
६. अति धार्मिकता.
७. हिंसा. - बहुतेक वेळा स्त्री जास्त हिंसा करते असे ऐकून आहे.

जात हे मूळ कारण कुठेही असेल असे जाणवत नाही. पण जात आणि आर्थिक व्यवस्था, शिक्षण आणि आई वडिलांची मुलीला घरी बोलवून घेण्याची आर्थिक क्षमता ह्याचा संबंध आहे असे असू शकते.

जात आणि घरगुती हिंसा ह्यांच्यावर डेटा उपलब्ध आहे :

तथाकथित दलित महिलांना सर्वाधिक हिंसेला सामोरे जावे लागते. पण दलित समाजांत लग्नविस्च्छेद जास्त होत असेल वाटत नाही. कारण हिंसेचे समर्थन सुद्धा दलित समाजांत जास्त आहे.

श्री युसुत्सु यांनी यासंदर्भात मिपावर बरेच लेखन केले आहे.
या छ्ळवाद्यांचे काय करायचे? https://www.misalpav.com/node/18319
पुरुषांचा छळ आणि आत्महत्या : ताजी बातमी https://www.misalpav.com/node/14624
कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात? https://www.misalpav.com/node/14287
अजुन खुप काही लिहिले आहे, अभ्यासु लोकांनी येथे उत्खनन करावे. https://www.misalpav.com/user/425/track

श्रीगुरुजी's picture

26 May 2023 - 7:04 pm | श्रीगुरुजी

बऱ्याच प्रतिसादकांच्या मतांचे सार -

१) सद्यकालातील मुली अत्यंत लाडावलेल्या असून त्यांच्या अपेक्षा अतोनात आहेत.

२) लग्नानंतर विवाह मोडण्यास मुलीच उत्तरदायी आहेत.

३) मुलांना स्वत:चे मत नाही व निर्णयक्षमता नाही.

४) हुंडा घेणे/देणे योग्य आहे.

५) लग्नापूर्वी शरीरसंबंध असले तरी चालले पाहिजे.

६) आईवडीलांनी मुला-मुलीचे लग्न ठरविण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांचे त्यांना ठरवू दे.

__________________________________

माझे मत -

१) सर्वच मुली लाडावलेल्या नाहीत व अतोनात अपेक्षा असलेल्या नाहीत. काही मुली अपवाद आहेत. लाडावलेली व अतोनात अपेक्षा असलेली अनेक मुले सुद्धा पाहिली आहेत व पाय जमिनीवर असलेली मुले सुद्धा पाहण्यात आहेत.

२) फसवणूक दोन्ही बाजूंकडून झालेली अनेक उदाहरणे पाहण्यात आहेत. विवाह मोडण्यात मुले सुद्धा उत्तरदायी आहेत.

३) स्वतःची मते व निर्णयक्षमता असलेली व नसलैली सुद्धा अनेक मुले-मुली पाहण्यात आहेत.

४) हुंडा देणे/घेणे पूर्णपणे अयोग्य असून अकायदेशीर आहे.

५) लग्नापूर्वी शरीरसंबंध अजिबात नसावे.

६) जर अनुरूप सारख्या संस्थेतून ठरवून लग्न करायचं असेल किंवा अगदी प्रेमविवाह असेल तरीही आईवडीलांचा अनुभव व मत महत्त्वाचे आहे.

श्री श्रीगुरुजी यांचा प्रतिसाद व्यवहारिक आणि समतोल आहे.

५) लग्नापूर्वी शरीरसंबंध अजिबात नसावे.

अतिशय सहमत, त्यामुळे लग्नासाठीची इच्छा, जोडीदारा/रीणीविषयीची उत्सुकता, एकमेकांविषयी असलेला प्रामाणिकपणा हेच संपुन जाते.
माझ्या पहाण्यात अशी काही जोडपी आहेत की ज्यांचे एकमेकाबरोबर पटत नाही, पण ते एकमेकांना फसवणार नाहीत याची खात्री आहे. त्यामुळे त्यांचे मतभेद काही दिवसांच्या अबोल्यानंतर संपतात. पण अशी एकमेकाबद्दल आदर आणि खात्री असलेली जोडपी तयार होणे जास्त आवश्यक आहे.
जर सगळ्या गरजा बाहेर भागायला लागल्या तर लग्नाची गरज काय असे वाटणे सहाजिकच आहे.
--
नोकरी, धंदा सगळे चांगले चालले आहे, कोणाला मोठा आजार नाही, आव्हानात्मक असे काही करायचे नाही, फक्त मौजमज्जा करायची आहे, कोणतीही बंधने नकोत, ओरडणे नको अश्या वेळी लग्न म्हणजे एक अडगळ वाटु शकते.
लग्न म्हणजे एक प्रकारची सुख दु:खातील भागिदारी, कशात अडले-दुखले तर कोणी तरी काळजी घेणारे, विश्वासाचे असावे, भावनिक आधार देण्यासाठी घरी कोणी तरी आहे. कोणतेही मोठे अवघड काम हाती घेताना माझ्या पाठीमागे कोणीतरी खंबीरपणे आहे ही भावना खुप आश्वासक ठरते आणि पाठबळ देते.
जेव्हा कोणत्याही आव्हाणात्मक परिस्थितीमध्ये अशा माणसांचे मुल्य आणि महती दिसुन येते. आई - बाप कितीही चांगले आणि प्रेमळ असले तरी ते काही आयुष्यभर मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याबरोबर जिवाला जीव देणार्‍या, प्रसंगी चार समजुतीच्या गोष्टी सांगणारे आप्त, मित्र आणि कुटुंबिय मिळणे खुप मोठी गोष्ट आहे.

मुक्त विहारि's picture

27 May 2023 - 12:03 am | मुक्त विहारि

आणि तार्किक प्रतिसाद.....

वाचत आहे...

बरेच प्रतिसाद वाचलेत . एकूण असं जाणवतं कि ;
१. घटस्फोट जास्त होतात आणि प्रामुख्याने मुलींच्या चुकीने .
२. मुलींचा फार लाड होतो आणि त्या financially काहीही काँट्रीब्युट नाही करत
३. मुलींना नवरा त्याच्या पेक्षा चांगलाच लागतो . उंच , जास्त शिकलेला आणि जास्त कमावणारा वैगेरे
४. लग्नात आई वडिलांची भूमिका काय असावी
५. हुंडा कधी अयोग्य / योग्य आहे

मला असं वाटतं कि :
१. घटस्फोट होणं हि काही वाईट नाही . घटस्फोट खूप सोपे नाही अजूनही . जर पटत नसेल तर वेगळे होणे बरे . लग्नाच्या कालावधी मध्ये दोघांनी मिळून कमावलेली संपत्ती दोघांना समप्रमाणात वाटून घ्यावे. माझ्या बघण्यात मुलींना फार काही हिस्सा मिळत नाही . बरेचदा प्रॉपर्टी आई वडील भाऊ मित्र आदी च्या नाव करून मुलींचा हिस्सा टाळला जातो .
२. आपल्याकडे मुलं २५-३० वर्ष्याच्ये होत पर्यन्त पालकांकडे राहतात. काहीही न कमवता सुद्धा . अशा मुलांना नेगेटिव्ह टॅक्स क्रेडिट्स किंवा inheritance टॅक्स लावला पाहिजे .
३. Generally arrange marraige मध्ये फार जास्त ऑपशन्स असल्यामुळे हे सुरु झाले आहे . स्वतः जर शोधायला गेलं कि बरोबर कळतं कि आपली "औकात " काय आहे :-D
४. पालकांनी मदत करावी , आणि चॉईस आणि decision घेण्याची क्षमता बिल्ड करावी . दबाव टाकू नये.
५. हुंडा बेकायदा आहे , फार चर्चा करण्यात अर्थ नाही .

विशेष म्हणजे आमची आई marriage bureau मध्ये होती - २०-२५ वर्ष . बरेच जुडवले , त्यापेक्षा जास्त नकार कळवले . अजूनही घटस्फोटाचा टक्का ५% पण नाही . जवळपास सर्व घटस्फोटाच्या केसेस मध्ये छळ हेच एक कारण आहे .
महार असल्यामुळे हुंडा फार कमी - म्हणजे नाहीच . जवळपास सर्व उच्चशिक्षित - private नौकरी वाले. काही केसेस मध्ये डिप्रेशन , मानसिक प्रॉब्लेम्स मुळे पण . पण मुलीच्या लालसे मुले घटस्फोट क्वचित. बऱ्याच खळखळ करणाऱ्या मुली / मुले चे लग्नाचं जुळत नाही आणि वय वाढले कि मग कुना सोबत पण settle होतात.

किंवा लग्नानंतर भांडणं होऊन वेगळे होत असतील तर त्यांचे ते दुर्दैवी किंवा दोषी असतील. त्यांचे पालकही दुर्दैवी.
वाद घालून काही साध्य होणार नाही.

प्रदीप's picture

17 Jun 2023 - 8:34 am | प्रदीप

ह्या मुलीच्या कॅज्युअल मूर्खपणामुळे बंगलूरमध्ये, एका फूड- डिलीव्हरी करणार्‍या गरीब माणसावर आफत ओढवली. ती मुलगी, तिचे आईवडील घरांत नसतांना, स्वतः घराच्या गच्चीवर खेळावयास गेली होती. तितक्यांत पालक घरी परतले, व त्यांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. तेव्हा ती गच्चीवर एकटीच खेळतांना सापडली. बिल्डींगमधे फूड- डिलीव्हरी करण्यास आलेल्या एका तरूणाने आपणांस खेचून गच्चीवर नेले, असा आरोप तिने केला. तिने त्या व्यक्तिचा निर्देशही केला. अशा परिस्थितीत, इतर कुठलीही शहानिशा न करतां त्या पालकांनी व आजूबाजूच्या इतरांनी त्या डिलीव्हरी माणसास भरपूर बदडले, कोंडून ठेवले व पोलिसांना बोलावले.

पोलीस चौकशीत तेथील एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत ती मुलगी स्वतःहून, एकटीच गच्चीवर जातांना आढळली. अर्थात पोलिसांनी त्या माणसास सोडून दिले, व त्यास हवे तर त तो मुलीव्र्फ उलटी तक्रार दाखल करू शकतो असे सांगितले. पण आता तो तरूण त्या शहरांत रहाण्यास तयार नव्हता. 'आपण आता, आपल्या घराकडे, आसामांत परतत आहोत' असे त्याने पोलिसांना सांगितले. एक तरूण आयुष्य संपूर्ण उध्वस्त होताहोता वाचले. पण त्याच्या आयुष्याची उलथापालथ झालीच,

वास्तविक, पोलीसांनी अशा केसमधे स्वतःहून केस दाखल केली पाहिजे. कायदा प्रक्रिया तशी नसेल तर ती बदलली पाहिजे.

आई वडील क्लासच्या वेळेत गच्चीत खेळायला गेल्यावरुन रागावतील या भीतीने तिने त्या माणसाचे नाव घेतल्याचे कबूल केले असे बातमीत आहे. CCTV नसता तर त्या डिलिव्हरी बॉयचे आयुष्य पुरते उध्वस्त झाले असते.

... तरी आठ वर्षांच्या मुलीला ही असली सबब कशी सुचली हेही आश्चर्य आहे. मुले खोटे कारण सांगतात तेव्हा त्यांना इतर अनेक साधे ऑप्शन्स असतात की.

आठ वर्षांच्या मुलीला ही असली सबब कशी सुचली हेही आश्चर्य

लहान मुले भवताली असताना टीव्ही (विशेषतः क्राईम पॅट्रॉलादि) बघणे हे एक कारण असू शकते. अनेक घरात हे होत असेल. लहान वयात नको त्या गोष्टी बघणे, कानावर पडणे याचा खोल परिणाम होत असतो.

श्री दर्शना पवार आणि पापाकी परी यांच्यामधील कहानी:
श्री ज्योती मौर्या यांना त्याच्या नवर्‍याने स्वतःचे पैसे खर्च करुन, कर्ज काढुन नागरी अधिकारी बनवले. त्यांनी अधिकारी होताच दुसर्या माणसाबरोबर अनैतिक संबध प्रस्तापित केले. नवर्याला सुगावा लागल्याच्या लक्षात आल्यावर त्याच्यवर पोलिसामध्ये तक्रार दाखल केली.

https://www.indiatoday.in/india/story/jyoti-maurya-viral-video-sdm-uttar...