✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पापा की परी

स
साहना यांनी
Wed, 05/24/2023 - 10:51  ·  लेख
लेख
सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. कुटुंबातील अनेक १५-२५ वर्षांच्या मुलींची भेट झाली आणि एकूणच मुलींच्या पालन पोषणात आणि संस्कारात कमालीचा बदल झाला आहे असे दिसून आले. त्याशिवाय हल्लीच कुटुंबात ३-४ घटस्फोट पहिले आहेत. माझ्या ओळखीच्या ३० अश्या जोडप्यांत पहिले तर एकूण ९ घटस्फोट आहेत. ४० वयोगटन्ट ६ घटस्फोट आहेत. टोकाचे अपवाद सोडले तर काही लग्ने तुटण्यात मुलींची भूमिका आणि आडमुठेपणा होता असे तरी प्रथमदर्शनी दिसून आले. आधी पापा कि परी इफेक्त्त पाहू : १. १७ वर्षांची एक मुलगी. वडील प्रचंड श्रीमंत (५०-१०० कोटी नेट वर्थ). आधी दिसायला गोंडस होती. दर रोज फास्ट फूड खाणे, फक्त AC गाडीतून फिरणे, शून्य फिटनेस, शून्य शरीराची देखभाल इत्यादींमुले ४० वर्षांची आंटी असावी अशी सुटली आहे. मुख्य म्हणजे आईवडिलांना ह्यांत काहीही चुकीचे वाटत नाही. अजून तिला घरी "बाळ" म्हटले जाते. २. २३ वर्षांची मुलगी. वडील बऱ्यापैकी श्रीमंत आहेत. शिक्षणात हुशार असून सुद्धा आई वडिलांपासून दूर नको म्हणून चांगल्या संधी सोडल्या. दुपारी ११ वाजता उठणे. नेटफ्लिक्स पाहणे, झोमॅटो वरून वाट्टेल ते ऑर्डर करून खाणे. दार शनीवारी रविवारी ३०-४० हजर रुपये मॉल मध्ये उडवणे. पण हिशोब येत नाही. गणितांत चांगले मार्क पडले तरी सध्या पेट्रोल चे भाव काय ते ठाऊक नाही आणि साधारण टॅक्सीला अमुक ठिकाणी जायला किती खर्च येईल हा हिशोब येत नाही. अमुक वस्तूचा योग्य भाव काय असावा ह्याची जाणीव शून्य. ३. २७ वर्षांची मुलगी. मध्यमवर्गीय परिवार. चांगली नोकरी आहे पण सेविंग्स हि संकल्पना ठाऊक नाही. आई गाडीने नोकरीच्या ठिकाणी पोचवते आणि घरी आणते. स्वतःला काहीही चालवायला येत नाही शिकायची इच्छा नाही. अश्या घरांत लग्न व्हावे तिथे ड्रायव्हर असावा हि अपेक्षा. काहीही पदार्थ बनवायला येत नाही. गॅस आयुष्यांत फक्त एकदा चालू केला होता म्हणे. नोकरी सुद्धा नको आहे कारण तिला खूप पैसे पाहिजेत. ४. १३ वर्षांची मुलगी. घरी झोमॅटोवरून अमुकच पाहिजे हा हट्ट. आईने १००० रुपये खर्चून ऑर्डर केला. एक घास घेऊन चव आवडली नाही म्हणून थेट कचऱ्याच्या डब्यांत फेकला आणि दुसरी डिश ऑर्डर केली. हि झाली पापा कि परी ची उदाहरणे. लोकांच्या मुलांना काय संस्कार असावेत हि माझी समस्या नाही. त्यामुळे मी फक्त माझे निरीक्षण व्यक्त करते. १. पैश्यांची किंमत हि गोष्ट बहुतेक तरुण मुलींना आई वडील शिकवत नाही असे दिसून आले. तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी विनाकारण पैसे नष्ट करू नयेत, तारतम्य बाळगावे हे आमचे जुने संस्कार गायब झाले आहेत. २. मुलीला काहीही "बोलण्यास" पालक घाबरत आहेत आणि तिने डोळ्यातून अश्रू काढले तर सरळ शरणागती पत्करत आहेत. ३. चार चौघांत कसे वागावे, कश्या प्रकारे संभाषण करावे, "भान कसे ठेवावे" ह्या गोष्टी ज्या एके काली मुलींसाठी महत्वाच्या होत्या त्या गायब झाल्या आहेत. वाट्टेल ठिकाणी पाय वर घेऊन बसणे, आपल्या आजूबाजूला काय लोक आहेत आणि कोण काय ऐकत आहे हे "प्रसंग सावधान" अजिबात नाही आणि आई वडील सुद्धा शिकवत नाहीत. उदा अपिरिचित लोक आजू बाजूला असताना फोन वरून आज मी घरी एकटी असेल असे मोठ्याने बोलणे. ४. रस्ता कसा पार करावा, दुकानात जाऊन सामान कसे आणावे, घरकामात मदत कशी करावी, घरखर्चात कसा आपला सहभाग असावा ह्या सर्वांचे ज्ञान बहुतेक मुलींना शून्य होते. ५. एका मुलीसोबत मी बाहेर गेले. जाताना तिला म्हणे पाण्याची बाटली बरोबर लागतेच. आम्ही बरेच अंतर चालून गेलो कि तिच्या लक्षांत आले कि तिने बाटली आणली नाही. ती बाटली तिच्याकडे यावी हि तिची अपेक्षा. तिला अपेक्षित होते कि मी पुन्हा माघारी अर्धा किलोमीटर जाऊन बाटली आणावी. मी साफ नकार दिला. त्यावर तिने आईला फोन करून सांगितले मग आई सर्व काम सोडून बाटली घेऊन आली. ६. काही मुली ह्या aspergers वाल्या असाव्यात अशी शंका मला आहे. -- हे सर्व ठराविक अनुभव झाले. ह्याचा अर्थ सर्वच मुली अश्या आहेत असे नाही. वाचकांनी आपल्या कुटुंबातील मुलींबद्दल सांगावे. -- घटस्फोट बऱ्याच पापा कि परी आता कायमच्या पापा च्या घरी आल्या आहेत. नवऱ्यावर प्रचंड पैश्यांचा दावा ठोकला आहेच पण मानसिक आणि शारीरिक छळाच्या पूर्णतः खोट्या कंप्लेन सुद्धा घातल्या आहेत. बहुतेक वेळा आपण काहीही तडजोड करणार नाही आणि सर्व तडजोड नवऱ्याने करावी असली अवास्तव अपेक्षा कारणीभूत आहे असे दिसून येते. एके ठिकाणी तर मुलीने पहिल्याच महिन्यात सासू सासऱ्यांची संपत्ती आपल्या नावावर करण्याची मागणी केली. ह्या संपत्तीवर तिच्या नवऱ्याचा सुद्धा अधिकार नव्हता. नवऱ्याला अजिबात आदर न देणे, तो जणू काही नोकर आहे आणि फक्त पैश्यांचे ATM आहे अश्या प्रकारे त्याला वागवणे. आर्थिक जबाबदारीचा पूर्णता अभाव इत्यादी गोष्टी मला ठळक पणे विविध मुलीत दिसून आला. कर किंवा बँकिंग विषयाचे ज्ञान तर जवळ जवळ शून्य होते. काहींची लग्ने तुटली नसली तरी पती मानसिक दृष्ट्या त्या रिलेशन मधून कधीच बाहेर पडला आहे असे दिसून आले. एक तर त्यांनी इतर मित्र आणि इतर हॉबी निर्माण केल्या आहेत नाहीतर आणखीन कुणाबरोबर संबंध निर्माण केले आहेत. चुकून एखादा व्यसनाच्या अधीन सुद्धा दिसून येतो. हल्ली घटस्फोट जास्त होत आहे असे लोक बोंबलत असले तरी चुकीच्या माणसाबरोबर संसारांत पडण्यापेक्षा घटस्फोट चांगला आहे असे वाटते. अश्या परित्यक्ता मुलींकडे आणि त्यांच्या भविष्यातील ससेहोलपटीकडे पाहून तरी त्याच्या पुढील पिढी कदाचित सुधारेल असे वाटते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26318 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

लेख

प्रदीप
Fri, 05/26/2023 - 09:36 नवीन
आवडला व त्यांतील विचार पटले. लेखांत तुम्ही घटस्फोटाचा उल्लेख केला आहे. भारतीय समाजातील काही प्रकरणे ह्याहून पुढे गेलेली आहेत. म्हणजे, ह्या 'पापा क्या पर्‍या' पैशासाठी पुरूषांशी॑ संबंध ठेवतात अथवा लग्न करतात. मग त्या पुरुषावर व घरांतील इतर पुरूषांवर बलात्काराचे आरोप ठेवतात. आपल्या येथील ह्यासंबंधातील कायदा नक्की काय आहे हे मला ठाऊक नाही, पण एखाद्या स्त्रीने हे आरोप केल्यावर त्या पुरुषाला तात्काळ अटक केली जाते. त्याचे स्वतःचे व त्याच्या कुटुंबियांचे जीवन उध्वस्त होऊन जाते. अनेकदा पैसे देऊन ह्यांतून सुटका करून घेणे हा एकमेव मार्ग त्यांच्यापुढे रहातो. तसे केले तरीही डाग रहातोच! ट्वीटरवर दीपिका नारायण भारद्वाज @DeepikaBhardwaj ही स्त्री अशा अनेक केसेसचा स्वतःहून पाठपुरावा करते. ह्या प्रत्येक केसची सविस्तर माहिती ती तिच्या ट्वीट्सवरून देत असते. ह्यांत, केवळ पैशासाठी श्रीमंत व्यक्तिशी लग्न करून मग त्या व्यक्तिवर तसेच त्याच्या वडिलांवरही घृणास्पद आरोप केले जातात. -- इथपासून, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध ठेऊन नंतर त्यांच्यावर बलात्काराचे आरोप करणे-- इथपर्यंत अनेक केसेस त्यांनी रीपोर्ट केल्या आहेत. त्या स्वतः ह्यांतील शक्यतो बर्‍याच केसेसचा पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा करतात. ह्या दुसर्‍या प्रकारांतील काही केसेस थक्क करणार्‍या आहेत-- उदा. एका स्त्रीने दोनेक वर्षांत ६ ते ७ पुरुषांवर बलात्काराचे गुन्हे दाखल करणे!! हे सर्व करतांना, अर्थात, त्यांना अनेक, तथाकथित स्त्रीवादी 'अ‍ॅक्टिव्हिस्टां"कडून शिव्या खाव्या लागतात. पण त्यांनी आपले कार्य नेटाने सुरू ठेवलेले आहे. त्यांना ट्वीटरवर 'फॉलो' केल्यास थक्क करणार्‍या केसेस दिसून येतात.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. उत्तम माहिती.

Trump
Fri, 05/26/2023 - 11:24 नवीन
धन्यवाद. उत्तम माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

एक ताजे उदाहरण

प्रदीप
Sat, 05/27/2023 - 23:33 नवीन
इथे पहावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

अजून काही

प्रदीप
Wed, 06/07/2023 - 19:47 नवीन
दीपीका भारद्वाज ह्यांच्या प्रयत्नांमुळे गुरगांव पोलिसांनी काही स्त्रीयांना अटक केलेली आहे. ह्या स्त्रीया, अनेक पुरुषांवर, बलात्काराच्या एकाहून अधिक केसेस दाखल करीत होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

येथेही पाहा

प्रदीप
गुरुवार, 06/08/2023 - 23:30 नवीन
https://twitter.com/DeepikaBhardwaj/status/1666830443000520709
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

आमच्या मिसेसची मैत्रीण आहे

इपित्तर इतिहासकार
Fri, 05/26/2023 - 10:30 नवीन
ती मटार सोलले की आईला फोन करते "काय करू ह्याचे?" "फ्रीज मध्ये ठेव हवाबंद डब्यात" असा प्रतिसाद आला की ओके होतो मग कार्यक्रम. अजून राजाराणी सुखात आहेत पण हे लैच विचित्र वाटले होते. असो, बरे व्हावे बिचाऱ्यांचे हीच सदिच्छा. पाश्चात्य संस्कृती म्हणजे वीकेंड कल्चर आत्मसात करायचे आहे लोकांना. श्रमप्रतिष्ठा वगैरे नाही. असे काहीसे वाटते.
  • Log in or register to post comments

साहनाजी....

इपित्तर इतिहासकार
Fri, 05/26/2023 - 10:39 नवीन
सामाजिक प्रश्न आहे तुम्ही मांडलेला त्यामुळे मी त्यावर विचारलेला प्रश्न पण सामाजिक दृष्टीने पहावा असा डिस्क्लेमर आधीच देतो. तर प्रश्न असा की १. आपली जात काय ?? विचारण्याचे कारण - आपण जात न मानण्याचा स्तुत्य निर्णय घेतला असेल तर हिंदुहितार्थ आपले अभिनंदन आहे, पण समाजात एकंदरीत अजूनही जात चालते. तुम्ही जे सांगितले आहे की "मी अमुक क्ष क्ष (आकड्यात) घटस्फोट जवळच्या नातलगत बघितले आहेत म्हणून हा प्रश्न पडला. आणि अर्थात माझ्याकडे सध्या विदा उपलब्ध नाही पण घटस्फोट होण्यात आर्थिक स्थिती, पोरी (अन् पोरांचे पण) पालनपोषण, शिक्षण यांच्यासोबत जात सुद्धा महत्वाची असावी. काही जातींत घटस्फोट जास्त होतात असा आपला माझा एक समज होय. त्यामागची कारणमीमांसा मला समजून घ्यायची आहे जर माझे परसेपशन बरोबर असले तर ??
  • Log in or register to post comments

> १. आपली जात काय ??

साहना
Sat, 05/27/2023 - 02:29 नवीन
> १. आपली जात काय ?? गौड सारस्वत ब्राह्मण ! मी जातीभेद मानत नाही पण स्वतःची जात आणि जाती विषयक कार्यक्रम तसेच एकीकरणात भाग घेते. घटस्फोटांत जात महत्वाची आहे का ? ह्याचे उत्तर होय आणि नाही असे दोन्ही आहे. कारण आकडेवारीत १००% तुम्हाला जात आणि घटस्फोट ह्यांच्यात कोरिलेशन सापडेल पण ते थेट असण्यापेक्षा इतर घटकांवर अवलंबून आहेत जे सुद्धा जातीवर अवलंबून असू शकतात. आकडे पाहू. मी स्वतः GSB असल्याने माझे नातलग सुद्धा तसेच असतात आणि त्यामुळे तो बायस इथे आढळेल. १. घटस्फोट १ - दोन्ही GSB, मुलगा आणि मुलगी उच्चशिक्षित, मुलगा श्रीमंत मुलगी मध्यमवर्गीय. चूक : मुलीची ! २. घटस्फोट २ : मुलगा लिंगायत, मुलगी मराठा - दोन्ही उच्चशिक्षित आणि श्रीमंत - चूक : ५०-५० ३. घटस्फोट ३ : दोन्ही GSB , दोन्ही मध्यमवर्गीय उच्चशिक्षित चूक १००% मुलीची. ४. घटस्फोट ४: दोन्ही GSB, मुलगी घटस्फोट ३ मधलीच. दोन्ही मध्यमवर्गीय उच्चशिक्षित. चूक १००% मुलीची. ५. घटस्फोट ५: मुलगी GSB, मुलगा बंगाली ब्राम्हण - मुलगी उच्चमध्यम, मुलगा अतिश्रीमंत दोन्ही उच्चशिक्षित - चूक १००% मुलाची. ६. घटस्फोट ६: मुलगी तामिळ ब्राह्मण, मुलगा तामिळ ब्राम्हण - दोन्ही मध्यम उच्चशिक्षित - चूक मुलीची १००%. ६. घटस्फोट ६: दोन्ही कोकणस्थ मध्यम वर्गीय उच्चशिक्षित - चूक ५०-५०. ७. घटस्फोट ७ : दोन्ही गरीब, जातींने साधारण कोळी जातीचे. चूक ठाऊक नाही. शिक्षण दहावी पास. ८. घटस्फोट ८: तांत्रिक दृष्ट्या घटस्फोट नाही कारण पतीला पत्नी आपल्या प्रियकरासोबत ओयो मध्ये सापडली. हिंसा झाली. (जास्त बोलत नाही कारण प्रकरण कोर्टांत आहे) दोन्ही उच्चशिक्षित ९. घटस्फोट ८: GSB मुलगी, मराठा अमेरिकन स्थायिक मुलगा. मुलीला मारहाण झाली त्यामुळे माझ्या मदतीने पळून भारतात परत आली. उच्चशिक्षित १०. घटस्फोट १०: दोन्ही GSB मध्यम वर्गीय, मुलगी डोक्याने ठीक नाही. उच्चशिक्षित ११. घटस्फोट ११: मुलगी GSB, मुलगा चित्पावन. - डिटेल्स ठाऊक नाही. उच्चशिक्षित १२: घटस्फोट १२ : दोन्ही एकुलते एक अति श्रीमंत GSB दोन्ही सुमार शिक्षण माझ्या मते प्रमुख घटक : १. मुलगी एकुलती एक असणे किंवा घरची परिस्थिती भक्कम असणे. २. दोघांपैकी एक उच्च शिक्षित असणे (पदवीधर व्यावसायिक किंवा पदव्युत्तर). ३. अन्याय/जाच सहन करण्याची क्षमता कमी असणे. ४. मुलीच्या आईवडिलांचा गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप. ५. सासू सासर्यांनी बरोबर राहणे. ६. अति धार्मिकता. ७. हिंसा. - बहुतेक वेळा स्त्री जास्त हिंसा करते असे ऐकून आहे. जात हे मूळ कारण कुठेही असेल असे जाणवत नाही. पण जात आणि आर्थिक व्यवस्था, शिक्षण आणि आई वडिलांची मुलीला घरी बोलवून घेण्याची आर्थिक क्षमता ह्याचा संबंध आहे असे असू शकते. जात आणि घरगुती हिंसा ह्यांच्यावर डेटा उपलब्ध आहे : तथाकथित दलित महिलांना सर्वाधिक हिंसेला सामोरे जावे लागते. पण दलित समाजांत लग्नविस्च्छेद जास्त होत असेल वाटत नाही. कारण हिंसेचे समर्थन सुद्धा दलित समाजांत जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इपित्तर इतिहासकार

श्री युसुत्सु यांनी यासंदर्भात मिपावर बरेच लेखन केले आहे.

Trump
Fri, 05/26/2023 - 11:32 नवीन
श्री युसुत्सु यांनी यासंदर्भात मिपावर बरेच लेखन केले आहे. या छ्ळवाद्यांचे काय करायचे? https://www.misalpav.com/node/18319 पुरुषांचा छळ आणि आत्महत्या : ताजी बातमी https://www.misalpav.com/node/14624 कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात? https://www.misalpav.com/node/14287 अजुन खुप काही लिहिले आहे, अभ्यासु लोकांनी येथे उत्खनन करावे. https://www.misalpav.com/user/425/track
  • Log in or register to post comments

बऱ्याच प्रतिसादकांच्या मतांचे

श्रीगुरुजी
Fri, 05/26/2023 - 19:04 नवीन
बऱ्याच प्रतिसादकांच्या मतांचे सार - १) सद्यकालातील मुली अत्यंत लाडावलेल्या असून त्यांच्या अपेक्षा अतोनात आहेत. २) लग्नानंतर विवाह मोडण्यास मुलीच उत्तरदायी आहेत. ३) मुलांना स्वत:चे मत नाही व निर्णयक्षमता नाही. ४) हुंडा घेणे/देणे योग्य आहे. ५) लग्नापूर्वी शरीरसंबंध असले तरी चालले पाहिजे. ६) आईवडीलांनी मुला-मुलीचे लग्न ठरविण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांचे त्यांना ठरवू दे. __________________________________ माझे मत - १) सर्वच मुली लाडावलेल्या नाहीत व अतोनात अपेक्षा असलेल्या नाहीत. काही मुली अपवाद आहेत. लाडावलेली व अतोनात अपेक्षा असलेली अनेक मुले सुद्धा पाहिली आहेत व पाय जमिनीवर असलेली मुले सुद्धा पाहण्यात आहेत. २) फसवणूक दोन्ही बाजूंकडून झालेली अनेक उदाहरणे पाहण्यात आहेत. विवाह मोडण्यात मुले सुद्धा उत्तरदायी आहेत. ३) स्वतःची मते व निर्णयक्षमता असलेली व नसलैली सुद्धा अनेक मुले-मुली पाहण्यात आहेत. ४) हुंडा देणे/घेणे पूर्णपणे अयोग्य असून अकायदेशीर आहे. ५) लग्नापूर्वी शरीरसंबंध अजिबात नसावे. ६) जर अनुरूप सारख्या संस्थेतून ठरवून लग्न करायचं असेल किंवा अगदी प्रेमविवाह असेल तरीही आईवडीलांचा अनुभव व मत महत्त्वाचे आहे.
  • Log in or register to post comments

श्री श्रीगुरुजी यांचा प्रतिसाद व्यवहारिक आणि समतोल आहे.

Trump
Sat, 05/27/2023 - 12:56 नवीन
श्री श्रीगुरुजी यांचा प्रतिसाद व्यवहारिक आणि समतोल आहे.
५) लग्नापूर्वी शरीरसंबंध अजिबात नसावे.
अतिशय सहमत, त्यामुळे लग्नासाठीची इच्छा, जोडीदारा/रीणीविषयीची उत्सुकता, एकमेकांविषयी असलेला प्रामाणिकपणा हेच संपुन जाते. माझ्या पहाण्यात अशी काही जोडपी आहेत की ज्यांचे एकमेकाबरोबर पटत नाही, पण ते एकमेकांना फसवणार नाहीत याची खात्री आहे. त्यामुळे त्यांचे मतभेद काही दिवसांच्या अबोल्यानंतर संपतात. पण अशी एकमेकाबद्दल आदर आणि खात्री असलेली जोडपी तयार होणे जास्त आवश्यक आहे. जर सगळ्या गरजा बाहेर भागायला लागल्या तर लग्नाची गरज काय असे वाटणे सहाजिकच आहे. -- नोकरी, धंदा सगळे चांगले चालले आहे, कोणाला मोठा आजार नाही, आव्हानात्मक असे काही करायचे नाही, फक्त मौजमज्जा करायची आहे, कोणतीही बंधने नकोत, ओरडणे नको अश्या वेळी लग्न म्हणजे एक अडगळ वाटु शकते. लग्न म्हणजे एक प्रकारची सुख दु:खातील भागिदारी, कशात अडले-दुखले तर कोणी तरी काळजी घेणारे, विश्वासाचे असावे, भावनिक आधार देण्यासाठी घरी कोणी तरी आहे. कोणतेही मोठे अवघड काम हाती घेताना माझ्या पाठीमागे कोणीतरी खंबीरपणे आहे ही भावना खुप आश्वासक ठरते आणि पाठबळ देते. जेव्हा कोणत्याही आव्हाणात्मक परिस्थितीमध्ये अशा माणसांचे मुल्य आणि महती दिसुन येते. आई - बाप कितीही चांगले आणि प्रेमळ असले तरी ते काही आयुष्यभर मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याबरोबर जिवाला जीव देणार्‍या, प्रसंगी चार समजुतीच्या गोष्टी सांगणारे आप्त, मित्र आणि कुटुंबिय मिळणे खुप मोठी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

उत्तम विषय....

मुक्त विहारि
Sat, 05/27/2023 - 00:03 नवीन
आणि तार्किक प्रतिसाद..... वाचत आहे...
  • Log in or register to post comments

बरेच प्रतिसाद वाचलेत . एकूण

निपा
गुरुवार, 06/01/2023 - 13:02 नवीन
बरेच प्रतिसाद वाचलेत . एकूण असं जाणवतं कि ; १. घटस्फोट जास्त होतात आणि प्रामुख्याने मुलींच्या चुकीने . २. मुलींचा फार लाड होतो आणि त्या financially काहीही काँट्रीब्युट नाही करत ३. मुलींना नवरा त्याच्या पेक्षा चांगलाच लागतो . उंच , जास्त शिकलेला आणि जास्त कमावणारा वैगेरे ४. लग्नात आई वडिलांची भूमिका काय असावी ५. हुंडा कधी अयोग्य / योग्य आहे मला असं वाटतं कि : १. घटस्फोट होणं हि काही वाईट नाही . घटस्फोट खूप सोपे नाही अजूनही . जर पटत नसेल तर वेगळे होणे बरे . लग्नाच्या कालावधी मध्ये दोघांनी मिळून कमावलेली संपत्ती दोघांना समप्रमाणात वाटून घ्यावे. माझ्या बघण्यात मुलींना फार काही हिस्सा मिळत नाही . बरेचदा प्रॉपर्टी आई वडील भाऊ मित्र आदी च्या नाव करून मुलींचा हिस्सा टाळला जातो . २. आपल्याकडे मुलं २५-३० वर्ष्याच्ये होत पर्यन्त पालकांकडे राहतात. काहीही न कमवता सुद्धा . अशा मुलांना नेगेटिव्ह टॅक्स क्रेडिट्स किंवा inheritance टॅक्स लावला पाहिजे . ३. Generally arrange marraige मध्ये फार जास्त ऑपशन्स असल्यामुळे हे सुरु झाले आहे . स्वतः जर शोधायला गेलं कि बरोबर कळतं कि आपली "औकात " काय आहे :-D ४. पालकांनी मदत करावी , आणि चॉईस आणि decision घेण्याची क्षमता बिल्ड करावी . दबाव टाकू नये. ५. हुंडा बेकायदा आहे , फार चर्चा करण्यात अर्थ नाही . विशेष म्हणजे आमची आई marriage bureau मध्ये होती - २०-२५ वर्ष . बरेच जुडवले , त्यापेक्षा जास्त नकार कळवले . अजूनही घटस्फोटाचा टक्का ५% पण नाही . जवळपास सर्व घटस्फोटाच्या केसेस मध्ये छळ हेच एक कारण आहे . महार असल्यामुळे हुंडा फार कमी - म्हणजे नाहीच . जवळपास सर्व उच्चशिक्षित - private नौकरी वाले. काही केसेस मध्ये डिप्रेशन , मानसिक प्रॉब्लेम्स मुळे पण . पण मुलीच्या लालसे मुले घटस्फोट क्वचित. बऱ्याच खळखळ करणाऱ्या मुली / मुले चे लग्नाचं जुळत नाही आणि वय वाढले कि मग कुना सोबत पण settle होतात.
  • Log in or register to post comments

आता मुलगे/मुली फार अटी घालत असतील तर . .

कंजूस
गुरुवार, 06/01/2023 - 19:20 नवीन
किंवा लग्नानंतर भांडणं होऊन वेगळे होत असतील तर त्यांचे ते दुर्दैवी किंवा दोषी असतील. त्यांचे पालकही दुर्दैवी. वाद घालून काही साध्य होणार नाही.
  • Log in or register to post comments

मुली फार अटी घालत असतील तर . .

नरेन.
Mon, 06/05/2023 - 13:09 नवीन
मुली फार अटी घालत असतील तर . .
  • Log in or register to post comments

आठ वर्षांची पापा की परी

प्रदीप
Sat, 06/17/2023 - 08:34 नवीन
ह्या मुलीच्या कॅज्युअल मूर्खपणामुळे बंगलूरमध्ये, एका फूड- डिलीव्हरी करणार्‍या गरीब माणसावर आफत ओढवली. ती मुलगी, तिचे आईवडील घरांत नसतांना, स्वतः घराच्या गच्चीवर खेळावयास गेली होती. तितक्यांत पालक घरी परतले, व त्यांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. तेव्हा ती गच्चीवर एकटीच खेळतांना सापडली. बिल्डींगमधे फूड- डिलीव्हरी करण्यास आलेल्या एका तरूणाने आपणांस खेचून गच्चीवर नेले, असा आरोप तिने केला. तिने त्या व्यक्तिचा निर्देशही केला. अशा परिस्थितीत, इतर कुठलीही शहानिशा न करतां त्या पालकांनी व आजूबाजूच्या इतरांनी त्या डिलीव्हरी माणसास भरपूर बदडले, कोंडून ठेवले व पोलिसांना बोलावले. पोलीस चौकशीत तेथील एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत ती मुलगी स्वतःहून, एकटीच गच्चीवर जातांना आढळली. अर्थात पोलिसांनी त्या माणसास सोडून दिले, व त्यास हवे तर त तो मुलीव्र्फ उलटी तक्रार दाखल करू शकतो असे सांगितले. पण आता तो तरूण त्या शहरांत रहाण्यास तयार नव्हता. 'आपण आता, आपल्या घराकडे, आसामांत परतत आहोत' असे त्याने पोलिसांना सांगितले. एक तरूण आयुष्य संपूर्ण उध्वस्त होताहोता वाचले. पण त्याच्या आयुष्याची उलथापालथ झालीच, वास्तविक, पोलीसांनी अशा केसमधे स्वतःहून केस दाखल केली पाहिजे. कायदा प्रक्रिया तशी नसेल तर ती बदलली पाहिजे.
  • Log in or register to post comments

आई वडील क्लासच्या वेळेत

गवि
Sat, 06/17/2023 - 09:11 नवीन
आई वडील क्लासच्या वेळेत गच्चीत खेळायला गेल्यावरुन रागावतील या भीतीने तिने त्या माणसाचे नाव घेतल्याचे कबूल केले असे बातमीत आहे. CCTV नसता तर त्या डिलिव्हरी बॉयचे आयुष्य पुरते उध्वस्त झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

... तरी आठ वर्षांच्या मुलीला

गवि
Sat, 06/17/2023 - 09:13 नवीन
... तरी आठ वर्षांच्या मुलीला ही असली सबब कशी सुचली हेही आश्चर्य आहे. मुले खोटे कारण सांगतात तेव्हा त्यांना इतर अनेक साधे ऑप्शन्स असतात की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लहान मुले भवताली असताना टीव्ही बघणे हे एक कारण

चित्रगुप्त
Sat, 06/17/2023 - 21:54 नवीन
आठ वर्षांच्या मुलीला ही असली सबब कशी सुचली हेही आश्चर्य
लहान मुले भवताली असताना टीव्ही (विशेषतः क्राईम पॅट्रॉलादि) बघणे हे एक कारण असू शकते. अनेक घरात हे होत असेल. लहान वयात नको त्या गोष्टी बघणे, कानावर पडणे याचा खोल परिणाम होत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

श्री दर्शना पवार आणि पापाकी परी यांच्यामधील कहानी:

Trump
Sat, 07/08/2023 - 00:07 नवीन
श्री दर्शना पवार आणि पापाकी परी यांच्यामधील कहानी: श्री ज्योती मौर्या यांना त्याच्या नवर्‍याने स्वतःचे पैसे खर्च करुन, कर्ज काढुन नागरी अधिकारी बनवले. त्यांनी अधिकारी होताच दुसर्या माणसाबरोबर अनैतिक संबध प्रस्तापित केले. नवर्याला सुगावा लागल्याच्या लक्षात आल्यावर त्याच्यवर पोलिसामध्ये तक्रार दाखल केली. https://www.indiatoday.in/india/story/jyoti-maurya-viral-video-sdm-uttar-pradesh-bihar-man-buxar-stops-wife-coaching-2402294-2023-07-06
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा