टिपूर पौर्णिमेची रात्र होती, मुसळधार पाऊस कोसळत होता. सगळे बेडूक आपापल्या बेडकीला रिझवायला आपला रियाझ जोरकसपणे सादर करत होते.
आपल्या मधु-चंद्राचा सोहळा साजरा करायला आलेले ती दोघं त्या रोमांची वातावरणात मिलनोत्सुक नजरेने एकमेकांकडे बघत होते. त्याच वेळी आकाशात वीज कडाडली आणि तो तिच्याकडे झेपावला त्याच्या ह्या पावित्र्याने ती लाजली आणि तिची पाठ त्याच्याकडे फिरली. त्याला तिच्या कंचुकीच्या लटकनच्या मागे दडलेला तिच्या पाठीवरील नितंबाजवळचा तीळ त्याला खुणावू लागला (ही तर पद्मिनी जातीची स्त्री, (Ref. कुठ, कुठ शोधू मी तुला)), त्याने लगोलग तिला आपल्या कडे खेचले, तिच्या कंचुकीच्या लटकनची गाठ एका झटक्यात सोडली, आणि..........................
“Disk Read Error!!!”
गणेशाने वैतागून पेन ड्रायव्हला हात लावला, तर तो चांगलाच तापला होता. मग त्याच्या लक्षात आले कि अरे बापरे, हा तर नवीन हुच्च यु. एस. बी. ३.० प्रतीचा पेन ड्रायव्ह आहे आणि आपल्या संगणकामध्ये सगळे यु. एस. बी. २.० प्रतीचे खाचे आहेत. आता करायचे बरं करावे??
तर आपल्या कथेचा नायक “गणेशा”, त्याच्या आई वडीलांचे हे दुसरे अपत्य. त्याला एक मोठी बहीण होती तिचे लग्न झाले होते. गणेशाच लहानपणी मुलांच्या शाळेत, पुढे महाविद्यालयात मग त्याही पुढे मास्टर्स शिक्षण पूर्ण केल्यावर एका नावाजलेल्या कंपनीत नोकरी, असा सरळसोट हिशेब. नोकरीत कायम झाल्यावर त्याच्या आई वडीलांनी त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू केले. तब्बल १०० मुलींच्या पत्रिका पाहून १०१व्या मुलीला बघायचा कार्यक्रम नक्की केला. बरं या सगळ्या १०० मुली पत्रिका पातळी परीक्षेत नापास झाल्यामुळे गणेशासाठी तांत्रिक दृष्ट्या बघायचा कार्यक्रम तो पहिलाच होता.
आता मुली विषयी थोडे, मुलीचे नाव कविता, कविताला एक भाऊ जो दूर परदेशात कामानिमित्त असायचा. कविताच देखील मास्टर्स होती. आणि हो, ती देखील एका नामांकित कंपनीत नोकरीला होती.
अशा रीतीने शेवटी वर – वधूचा बघायचा कार्यक्रम पार पडला, पसंती झाली, बैठक झाली आणि लगोलग साखरपुडापण झाला. लग्नासाठी कविताच्या मोठ्या भावाची आणि गणेशाच्या मोठ्या बहिणीची उपस्थिति आवश्यक असल्याने आणि त्यांना लगेच येता येणे शक्य नसल्याने, दोन्हीकडच्या मंडळींनी लग्नाची तारीख थोडी लांबची ठरवली.
गणेशा आणि कविताचे साखरपुड्यानंतर एकमेकांना भेटणे सुरू झाले होते. रोज संध्याकाळी कामावरून सुटल्यावर गणेशा कविताला भेटत असे. त्यानंतर तो आपल्या गाडीतून तिला तिच्या घरी सोडायला जात असे.
सुरुवातीला दोन फुट अंतर ठेवून चालणार्या त्या दोघांना त्यांच्यातलं अंतर हळूहळू कधी कमी होत गेल कळलंच नाही. या भेटी दरम्यान दोघंही रोज एकमेकांच्या नवीन स्पर्शांची गंमत अनुभवत होते. गणेशाला पहिल्यापासूनच चुंबन या प्रकाराचे फार आकर्षण होते. त्याने बरीच पीत-पत्रक अभ्यासली होती, त्या जोडीला आता त्याने नील-फितींचा अभ्यास सुरू केला होता. या सगळ्यांचा परिणाम म्हणून तो त्याच्या होणाऱ्या बायकोच पहिलं चुंबन घ्यायला फारच उताविळ झाला होता.
मुळात मास्टर्स असल्यामुळे, गणेशाने चुंबन या विषयाची Case Analysis मांडायला सुरुवात केली. त्याने नोंदवलेली निरीक्षणं खालील प्रमाणे: -
Case 1.
बऱ्याच वेळी कविता, त्याला तिने केलेली शॉपिंग दाखवत असे, हे माझे नवीन घड्याळ, हे नवीन कानातले, या नवीन बांगड्या इ. इ. आणि तो देखील एखाद्या तज्ञाप्रमाणे त्या गोष्टी निरखून पाहत असे. त्याच धर्तीवर जर आपण जर तिला सांगितले कि “आज मी एक खास नवीन परफ्युम लावला आहे, त्याचा वास कसा वाटतो बघतेस का?” आणि जेव्हा ती वास घ्यायला आपल्या खांद्याजवळ येईल तेव्हा आपला कार्यभाग साधून घ्यावा का?
Case 2.
रोज कविता गाडीत बसताना आपली Bag मागच्या सीटवर ठेवत असे. नेहमी प्रमाणे गाडीतून उतरताना जेव्हा ती मागे वळेल आणि ज्यावेळी तीच पूर्ण लक्ष तिच्या Bag कडे असेल तेव्हा आपण आपला कार्यभाग साधावा का?
आणि अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी गणेशाची इच्छा फळली. ती कशी फळली, हे आम्ही चाणाक्ष वाचकांच्या इच्छा-शक्तीवर सोडतो. या मिषाने जर कोणाला आपापल्या अर्ध्या अंगाला दिलेले किंवा मिळालेले पहिले चुंबन आठवत असेल तर त्याची त्रोटक कथा येथे जरूर नोंदवावी. तेवढ्याच अजून cases अभ्यासासाठी उपलब्ध राहतील.
प्रतिक्रिया
15 Nov 2020 - 5:13 pm | टवाळ कार्टा
एक टेक्निकल चूक आहे लेखात...."कुठे कुठे..." मध्ये जातिजळ होता (स्त्रीच्या मांडीवरचा तीळ), लेखात नितंबाजवळचा तीळ आहे त्यामुळे रेफरन्स गंडलाय
15 Nov 2020 - 5:14 pm | टवाळ कार्टा
जतिजळ असे लिहायच्या ऐवजी जातिजळ झालेय ते सासं दुरुस्त करून देतील का?
16 Nov 2020 - 9:30 am | माईसाहेब कुरसूंदीकर
मास्टर्स करून नावाजलेल्या कंपनीत काम करणार्या लोकाना 'हे सगळे' करायला वेळ मिळतो हे वाचून गंमत वाटली. असो. कोणत्या केसेस येथे येतात ते बघुया.
16 Nov 2020 - 4:36 pm | शेर भाई
टवाळG तांत्रिक चूक सुधारून दिल्या बद्दल धन्यवाद. फक्त एक शंका नितंब म्हणजे नक्की कुठला अवयव?
माईसाहेबG , मुळात मास्टर्स केलेलेच अशा पद्धतीचे तार्किक विश्लेषण करत असावेत कदाचित.
17 Nov 2020 - 2:35 am | टवाळ कार्टा
नितंब म्हणजे तश्रीफ =))
17 Nov 2020 - 10:20 pm | शेर भाई
तार्कीकदृष्ट्या लटकनची लटकण्याची जागा आणि लेखातला संदर्भ एकदम बरोबर बसतात. (Just for sake of debate)
का कुणास ठाऊक पण इथे जसपाल भट्टीच्या उल्टा पुल्टा मधल्या टी व्ही प्रोड्युसर च्या एपिसोडची आठवण आली. हमने बनाया क्या था, पण गल्लीच चुकली..................
17 Nov 2020 - 6:35 am | चामुंडराय
:)
5 Dec 2020 - 4:54 pm | शेर भाई
या हॉटेलात एक से एक सुगरण लेखक, लेखिका असून देखील, गणेशाची केस स्टडी २ शक्यतांवरच का थांबली?
5 Dec 2020 - 5:41 pm | अथांग आकाश
प्रतिभा आटली नसावी! तुमची वेळ चुकली!!मिपाकर भारी चोखंदळ आहेत साहेब!!!
दिवाळी अंकाची बहुरंगी खाद्यजत्रा चालू असताना तुमची प्लेट हॉटेलात आली!!!
18 May 2023 - 5:40 pm | शेर भाई
मेरा टाईम आयेगा ??
8 Dec 2020 - 12:57 am | शेर भाई
१०००+ वाचने होऊन सुद्धा अस का म्हणावे?
"वाचने" बरोबर आकडे दर्शवितात अस मानल आहे.
3 Jan 2021 - 11:11 am | मदनबाण
मुळात मास्टर्स असल्यामुळे, गणेशाने चुंबन या विषयाची Case Analysis मांडायला सुरुवात केली.
चुंबन घ्यायला मास्टर्स असण्याची गरज नसुन, पाखराला कवेत घेण्याची मास्टरी अवगत असणे महत्वाचे असते ! :)))
एकच चुंबन देखील असं घ्याव की पाखराची नुसती फडफड फडफड झाली पाहिजे... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chabidar Chabi | Girlz | Praful-Swapnil | Sagar Das | Naren Kumar | Vishal Devrukhkar
7 Jan 2021 - 12:28 am | शेर भाई
कदाचित आपल्या होणार्या सहचारिणीला तो पाखरू न समजता भाव भावना असणारी व्यक्ती समजत असावा आणि म्हणूनच त्याला Analysis करावा अस वाटलं असाव.
आणि, तसही तुम्ही कार्यानुभवाच्या पायऱ्या आणि टप्पे सांगणे टाळले आहे. त्यासाठी इतकच म्हणेन कि वाटण्याने ज्ञान वाढते, त्यामुळे वाटताना सगळं सविस्तरपणे वाटावे.
18 May 2023 - 8:57 pm | राजेंद्र मेहेंदळे
जास्त शिक्षणाचे तोटे असे असतात बघा!!
गणेशाने थिअरीमधे वेळ न घालवता प्रॅक्टीकल मधे लक्ष घालावे असे सुचवतो.
22 May 2023 - 7:34 pm | शेर भाई
थोड इस्कटून सांगाल का ?
8 Aug 2023 - 1:31 pm | विजुभाऊ
पुढे काय झाले ?
कथा पुढे सरकली की नाही?
की मग उद्या पहाटे दुसर्या वाटा दुज्या गावचा वारा ...... अशी भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी झाली गणेशाची?
9 Aug 2023 - 8:11 pm | शेर भाई
कथा सरकण्यासाठी तुमच्यातल्या गणेशने काय केले असते.
10 Aug 2023 - 7:01 pm | चौथा कोनाडा
मास्टर्स, केस स्टडी, Case Analysis या शब्दांमुळे धाग्याला भारदस्तपणा आल्याचे जाणवले !
उत्सुकता : पुढे काय झाले ?
पुभाप्र
15 Aug 2023 - 12:05 am | शेर भाई
Imagination do you have it in you? मग आम्ही का म्हणाव वाचक चाणाक्ष ?