.container-v {
position: relative;
width: 100%;
overflow: hidden;
padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */
}
.responsive-iframe {
position: absolute;
top: 0;
left: 0;
bottom: 0;
right: 0;
width: 100%;
height: 100%;
border: none;
}
'प्रेरणा'....
गाथा - अनन्त्_यात्री
विडंबनाची 'प्रेरणा' फक्त शीर्षकावरून मिळाली आहे. संतश्रेष्ठ, क्षमाशील तुकाराम महाराजांचा, समस्त भक्तगणांचा व मिपा कविवर्यांचा क्षमाप्रार्थी आहे.
मिपावरील संतसाहित्याचा गाढा व्यासंग बघून भारावून गेलो. वाटले, आपणसुद्धा ही वाट चोखाळून बघावी. विसाव्याच्या क्षणी भंजाळलेल्या डोक्यात काही कवडसे पडतात का पाहावे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
मन, बहु चंचल चपळ।
जाता-येता न लगे वेळ।।
कबीरदासजी म्हणतात, 'मन पाण्यापेक्षा पातळ, वार्यापेक्षा वेगवान, लालची आणि आळशी'.
'पाणी ही तै पतला, धुवां ही तै झीण ।
पवनां बेगि उतावला, सो दोसत `कबीर’ कीन्ह॥'
कबीर यह मन लालची, समझै नहिं गंवार।
भजन करन को आलसी, खाने को तैयार।।
गाथा वाचताना अगदी बेतुक्याची अशीच आवस्था झाली. मन सारखे भरकटत होते आणि एक बेतुकी रचना मनात प्रकटली.
गाथ्याकूट....
अ. क्र. १
बेतुक्या, ठार वेडा, अविचारी |
बडबड फार करी, जनामाजी || १ ||
हा नोहे माझ्या बुद्धीचा प्रकार l
मांडला निरा शब्दांचा व्यापार || २ ||
लावी ट ला ट, ते माझे कवित्व l
शोधतो देवत्व काजव्यातळी || ३ ||
फुटले धुमारे, झाली उपरती l
मांडला प्रपंच सांजवेळी || ४ ||
आधी वंदू कमळापती l
तयाचिये कृपे चाले मती || ५ ||
मग वंदू लक्ष्मी आणि नारायण (मतदार) l
जे सत्ताप्राप्तीचे कारण || ६ ||
अंती वंदू भक्तांसी l
त्यांचेविना नाही गती....|| ७ ||
अ.क्र. २ ते २०२३
XXXXX.....
अ.क्र-2024
वेढा वेढा रे K-जरी |
मोर्चे (ED) लावा यमुनातिरी || १ ||
चला चला पंतजन |
बांधू लोकांशी संधान || २ ||
लुटा लुटा हस्तिनापूर |
चला घेरू या भगवंत || ३ ||
बेतुक्या म्हणे बाहेर काढा |
घोटाळ्यांचा वाचा पाढा || ४ ||
पेटवा C B I ची धुनी |
चेतवा S I T चा वन्ही || ५ ||
शब्दे करुनी तोडाफोडी |
K-जरी पायी घाला बेडी || ६ ||
हात धरुनिया कमळापती |
करू सकलांची प्रगती || ७ ||
(सबका साथ सबका विकास)
वेढा वेढा रे K-जरी......
- बेतुक्या
तळटीप-:
मूळ अभंग - 'वेढा वेढा रे पंढरी'. महाराज म्या पामराला नक्कीच क्षमा करतील.
कोणालाच दुखवण्याचा हेतू नाही, उलट चेहर्यावरील असंख्य स्नायूंना व्यायाम आणि सांसारिक कटकटींपासून क्षणभर दूर जाता यावे, हाच एकमेव उद्देश आणि गोड मानून घ्याल हीच अपेक्षा.
विश्वजीत बोरवणकर यांनी हा अभंग खूपच सुंदर गायला आहे.
प्रतिक्रिया
28 Feb 2023 - 7:18 pm | राजेंद्र मेहेंदळे
अतिशय उच्चं प्रतीचा लेख आहे. पुन्हा पुन्हा वाचला. कुठे तुकाराम कुठे केजरी !! वा वा!!
बादवे अतिशय /अत्यंत हे शब्द मिपावर लिहिता येत नाहीत. काय कारण असावे?
1 Mar 2023 - 1:06 pm | टर्मीनेटर
सहसा टेक्स्ट एडिटर हे जावास्क्रिप्ट बेस्ड असल्याने हि समस्या उद्भवते! त्यामुळे टेक्स्ट बॉक्स मध्ये at टाईप केले कि लगेच इनबिल्ट ऑटोकम्प्लिट ट्रिगर होऊन
function at() {
[native code]
}
असा मजकूर उमटतो आणि ही समस्या मिपावरच नाही तर मायबोलीवरही उद्भवते (अन्य मराठी संस्थाळांवर पण येते कि नाही ह्याची माझा तिथे वावर नसल्याने कल्पना नाही).
मी गुगल इनपुट टूल्स वापरून मराठीत टाईप करत असल्याने मिपाचा मराठी टेक्स्ट एडिटर वापरायची वेळ सहसा येत नाही पण क्वचित प्रसंगी तो वापरावा लागल्यास एक बाळबोध उपाय म्हणून मी अ (स्पेस) त्यंत' किंवा अ (स्पेस) तिशय असे टाईप करून मग अ आणि पुढच्या अक्षरांमधली स्पेस काढून टाकतो 😀
28 Feb 2023 - 8:12 pm | प्रचेतस
अतीव सुंदर. खूप आवडले.
1 Mar 2023 - 12:06 am | nutanm
अतिशय, अत्यंत
1 Mar 2023 - 10:22 am | Bhakti
द र्जे दा र !
1 Mar 2023 - 12:39 pm | टर्मीनेटर
आमचाही ट ला 'ट' लावण्याचा केविलवाणा प्रयत्न 😀
K-जरी आला उध्दवाचे भेटी!
एकंदरीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवरच्या ह्या समर्पक लेखनाला मी विडंबनापेक्षा 'सुडंबन' म्हणेन 👍
बाकी 'बेतुक्या' फॉर्मात... मिपाकर कोमात 😂
1 Mar 2023 - 7:24 pm | कर्नलतपस्वी
राजेंद्र भौ,भक्ती ताई,प्रचेतसभौ,टर्मिनेटर भौ,नुतनम सर्वांचे आभार.
भाजप्पा आणी आप मधे सध्या चालू असलेल्या राजकीय कुस्ती बद्दल डोक्यात एका कप्प्यात विचार चालू असताना पंडित विश्वनाथ बोरवणकर यांनी गायलेला " वेढा वेढा रे पंढरी"हा अभंग ऐकताना पंढरी च्या जागी केजरी हा शब्द सुचला. मा. मनिष शिसोदिया यांची भ्रष्टाचाराचे आरोपावरून चौकशी चालू, यातूनच हे विडंबन सुचले.
4 Mar 2023 - 1:03 pm | तुषार काळभोर
कर्नल साहेब तुमच्यात एक अत्यंत प्रतिभावान कवी आणि अध्यात्मिक प्रवचनकार लपलेला आहे. तुमची दीक्षा घ्यावी म्हणतो!
5 Mar 2023 - 9:26 am | कर्नलतपस्वी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद.
18 Mar 2023 - 12:38 pm | विवेकपटाईत
जॉर्ज सोरेसी 100 बिलियन डॉलर
पाकी चीनी नी युएस फार्मा माफिया
जोडूनी सर्वांची हो मोट
सामंतांची उभारू सेना मोठी,
जिंकू दिल्लीची गादी.
21 Mar 2024 - 9:58 pm | कर्नलतपस्वी
२७-२-२०२३ रोजी केलेले बेतुकयाचे चर्हाट आज खरे ठरले.
नवलच आहे.