मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(बेतुक्याचे चऱ्हाट) - मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!

कर्नलतपस्वी ·
.container-v { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */ } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; } 'प्रेरणा'.... गाथा - अनन्त्_यात्री विडंबनाची 'प्रेरणा' फक्त शीर्षकावरून मिळाली आहे. संतश्रेष्ठ, क्षमाशील तुकाराम महाराजांचा, समस्त भक्तगणांचा व मिपा कविवर्यांचा क्षमाप्रार्थी आहे. मिपावरील संतसाहित्याचा गाढा व्यासंग बघून भारावून गेलो.

अतिशय उच्चं प्रतीचा लेख आहे. पुन्हा पुन्हा वाचला. कुठे तुकाराम कुठे केजरी !! वा वा!! बादवे अतिशय /अत्यंत हे शब्द मिपावर लिहिता येत नाहीत. काय कारण असावे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

टर्मीनेटर Wed, 03/01/2023 - 13:06
अतिशय /अत्यंत हे शब्द मिपावर लिहिता येत नाहीत. काय कारण असावे?
सहसा टेक्स्ट एडिटर हे जावास्क्रिप्ट बेस्ड असल्याने हि समस्या उद्भवते! त्यामुळे टेक्स्ट बॉक्स मध्ये at टाईप केले कि लगेच इनबिल्ट ऑटोकम्प्लिट ट्रिगर होऊन function at() { [native code] } असा मजकूर उमटतो आणि ही समस्या मिपावरच नाही तर मायबोलीवरही उद्भवते (अन्य मराठी संस्थाळांवर पण येते कि नाही ह्याची माझा तिथे वावर नसल्याने कल्पना नाही). मी गुगल इनपुट टूल्स वापरून मराठीत टाईप करत असल्याने मिपाचा मराठी टेक्स्ट एडिटर वापरायची वेळ सहसा येत नाही पण क्वचित प्रसंगी तो वापरावा लागल्यास एक बाळबोध उपाय म्हणून मी अ (स्पेस) त्यंत' किंवा अ (स्पेस) तिशय असे टाईप करून मग अ आणि पुढच्या अक्षरांमधली स्पेस काढून टाकतो 😀

टर्मीनेटर Wed, 03/01/2023 - 12:39
आमचाही ट ला 'ट' लावण्याचा केविलवाणा प्रयत्न 😀 K-जरी आला उध्दवाचे भेटी! एकंदरीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवरच्या ह्या समर्पक लेखनाला मी विडंबनापेक्षा 'सुडंबन' म्हणेन 👍

बाकी 'बेतुक्या' फॉर्मात... मिपाकर कोमात 😂

कर्नलतपस्वी Wed, 03/01/2023 - 19:24
राजेंद्र भौ,भक्ती ताई,प्रचेतसभौ,टर्मिनेटर भौ,नुतनम सर्वांचे आभार. भाजप्पा आणी आप मधे सध्या चालू असलेल्या राजकीय कुस्ती बद्दल डोक्यात एका कप्प्यात विचार चालू असताना पंडित विश्वनाथ बोरवणकर यांनी गायलेला " वेढा वेढा रे पंढरी"हा अभंग ऐकताना पंढरी च्या जागी केजरी हा शब्द सुचला. मा. मनिष शिसोदिया यांची भ्रष्टाचाराचे आरोपावरून चौकशी चालू, यातूनच हे विडंबन सुचले.

तुषार काळभोर Sat, 03/04/2023 - 13:03
कर्नल साहेब तुमच्यात एक अत्यंत प्रतिभावान कवी आणि अध्यात्मिक प्रवचनकार लपलेला आहे. तुमची दीक्षा घ्यावी म्हणतो!

विवेकपटाईत Sat, 03/18/2023 - 12:38
जॉर्ज सोरेसी 100 बिलियन डॉलर पाकी चीनी नी युएस फार्मा माफिया जोडूनी सर्वांची हो मोट सामंतांची उभारू सेना मोठी, जिंकू दिल्लीची गादी.

(प्रपोज डे) - मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!

कर्नलतपस्वी ·
प्रेरणा... प्रपोज डे: लघु कथा - विवेकपटाईत (प्रपोज डे) आंग्ल भाषेत फतवा आला पाश्चात्त्य संस्कृतीला खड्ड्यात घाला वालेनटाईन दिन,हग दिन म्हणून पाळा सनातन संस्कृतीचे अधःपतन टाळा बुचकळ्यात पडलो.......मी तर रोजच...... पण मग टिव्हीवर दाखवलं, इंग्रज लई हुश्शार, काऊ हग दिन पाळत्यात आणी होणारे रोग कसे टाळत्यात आमचे शेजारी बी लई हुश्शार, मोक्कार रात्र झाली होती, उद्या विचारू म्हणत घोरू लागलो मुंगेरीलाल ची स्वप्ने बघू लागलो..... शेजारचे शर्माजी स्वप्नात आले हग दिनाला काय करणार म्हणून विचारू लागले, "मुबंईत कुठं भेटेल काऊ? आपण दोघं मिळ

टर्मीनेटर Wed, 03/01/2023 - 13:30
काऊ हग डे ला, भाभीजीला अलिंगन दिलं तर चालल काय.???????".
अय्यय्यो! असे (स्वप्नात) विचारल्यावर शर्माजींचा चेहरा कसा झाला असेल ह्याची कल्पना करुनच बेक्कार हसलो 😂

कर्नलतपस्वी Wed, 03/01/2023 - 19:10
टर्मिनेटर भौ,श्वेता प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. शब्दा शब्दात विडंबन ठासून भरले आहे. गाय दिसल्यावर तिला स्पर्श करणे,वंदन करणे हा आपल्या संस्कृतीचा वारसा आहे. लहानपणी परीक्षेला जाताना जरूर गाईला स्पर्श करून जा म्हणून मोठे लोक सांगायचे. गोग्रास वाढणे व गाईला खाऊ घालणे हा रोजचा नित्यनेम होता. सरकारने हुकुम काढला व त्याचे महत्त्व सांगताना पाश्चिमात्य लोक काऊ हग का करतात हे टिव्हीवर दाखवले. वालेनटाईन दिनाला काऊंटर करण्यासाठी काऊ हग डे चे अवाहन करताना भारतीय संस्कृतीचा कुठल्याच प्रकारे उल्लेख नसणे हे अजब वाटले.

In reply to by कर्नलतपस्वी

तुषार काळभोर Sat, 03/04/2023 - 10:53
तुमच्याकडे ते आहे तर आमच्याकडे हे आहे. तुमचा मदर्स डे तर आमचा मातृदिन.. तुमचा फादर्स डे तर आमचा अख्खा पितृ पक्ष!! असेल विचित्र प्रकार करून (न बुडणारी) संस्कृती बळेच वाचवायचा प्रयोग करून झालेच तर आहे ती संस्कृती सुद्धा अजून खोलात जाईल...

कर्नलतपस्वी Sun, 03/05/2023 - 09:19
मिपावर दमदार विडंबनकार म्हणून मला केशवसुमार,पैजारबुवा यांचे विडंबन लेखन फार आवडले. प्रतिसादक सुद्धा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात हे पण मस्तच. वाचकाच्या चेहर्‍यावर हसू आले असेल गृहीत धरतो.

विवेकपटाईत Tue, 03/07/2023 - 10:00
मस्त वर्षातून एक दिवस ते काऊला हॅग करतात बाकी दिवस तिला पोटात गिळतात.

(पाद रे कधीतरी...) - मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!

गड्डा झब्बू ·
प्रेरणा... लिही रे कधीतरी... - प्राची अश्विनी (पाद रे कधीतरी...) पाद रे कधीतरी. कसंही, अगदी कसंssही चालेल. गडगडाटी, मध्यम, अगदी ढुसकी पण पळेल. पण सुटलेल्या दुर्गंधाला हुंगता आलं पाहिजे. बोटांच्या चिमटीत नाक अस्संss पकडता आलं पाहिजे. मग शुध्द हवेसाठी तिथून लांब लांब पळेन, अत्तराच्या तळ्यात डुबकी मारेन. डिओच्या डोक्यावर हलकी थाप.. बेशुद्ध होण्याआधी लागेल धाप.. शुध्दीवर आल्यावर विचारात पडेन, नक्की कशामुळे बरं मी अजून जिवंत असेन? पण "माझ्यासाठी" पादलास!

टर्मीनेटर Wed, 03/01/2023 - 13:16
भारीच! तुम्ही केलेल्या काटेकोरांटीच्या विडंबनापासून अपेक्षा वाढल्याने तेवढी मजा नाही आली, पण हसू मात्र नक्कीच आले 😂 (नाक चिमटीत घट्ट धरून बसलेला) टर्मीनेटर

In reply to by कर्नलतपस्वी

रंगीला रतन Tue, 03/07/2023 - 02:57
मिपाला कचराकुंडी समजून कायपण फालतू जिलब्या पाडणाऱ्यानी दुसऱ्याच्या धाग्याला कचरा म्हणणे जाम आवडले :=) विडंबनातला वि तरी तुम्हाला समजतो का आजोबा?

(कालवून टाक भात) - मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!

चहाबाज ·
प्रेरणा... सुप्रसिद्ध मराठी गीत - "मालवून टाक दीप... चेतवून अंग अंग" (कालवून टाक भात) कालवून टाक भात चिरडून कर भंग ! राक्षसा, किती भातात कोंबला तू हात थंड ! त्या तिथे उभ्या पिंपात घातले तू दोन्ही हस्त हाय तू मागू नकोस एवढ्यात पिण्या भांग ! गार गार या दह्यात घालुनी बोटे सुखात चाटुनी करून टाक पात्र सर्व शुभ्ररंग ! भुर्र भुर्र आवाजात ढोसला सांबार मस्त सावकाश घे गिळून एक दोन तीन वांगं ! हे तुला कधी कळेल ? कोण उपाशी मरेल ? थांब, का चालू असेच माकडा तुझे हे छंद ? काय हा तुझाच त्रास ? मरगळे, इथे उपवास ! उठ रे हळू, फाटेल तंग विजारीचा बंध !

(बिल्डींगच्या या तळाशी राहशी तू) - मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!

चांदणे संदीप ·
प्रेरणा - काळजाच्या या तळाशी राहशी तू - Deepak Pawar बिल्डींगच्या या तळाशी राहशी तू सारखा शेजारी माझ्या नांदशी तू मागणे ते, "उसणवार देत जावे मी तुला!" कसे सांगू? संयम जणू माझा मागशी तू चव नाही माझ्या मीठाला सांगताना का रे आता? जीभ वेड्या चावशी तू? एवढा आता कसा हा बदलला तू जाऊनी वाटे, माझ्याशी भांडशी तू! आठवू मी का तुला? म्हणतोस आणिक उसणवाराला तरी आता जागशी तू?

टर्मीनेटर Wed, 03/01/2023 - 12:22
कविता एकतर डोक्यावरून जातात (खरंतर लैच डोक्यात जातात) त्यामुळे त्यांच्या वाटेला जात नाही 😂 पण कवितांची विडंबने मात्र चेहऱ्यावर हसू फुलवत असल्याने ती आवर्जून वाचतो! उधार-उसनवारी करणाऱ्या शेजारी/सहवासींवरचे हे विडंबन आवडले 😀

कर्नलतपस्वी Mon, 03/06/2023 - 13:03
मागताना, ताक भांडे किती लपविशील तू दिलेले, पाच हजार परत कधी देशील तू हा हा हा.....

कवितेपासून कवितेपर्यंत....प्रवाह कवितेचा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

पैसा Sat, 03/05/2011 - 20:07
कवितेचा शतकांतून प्रवास मस्त वर्णन केलात सर! 'पंत काव्य' हे नाव मोरोपंतामुळे; तर 'तंत काव्य' हे नाव साथीला असलेल्या तुणतुण्यामुळे आलं असावं का?

In reply to by पैसा

'पंत काव्य' हे नाव मोरोपंतामुळे; तर 'तंत काव्य' हे नाव साथीला असलेल्या तुणतुण्यामुळे आलं असावं का ? अगदी बरोबर...! -दिलीप बिरुटे

"मराठी दिन २०११" मि.पा.वर साजरा करावा ही कल्पना संपादक मंडळाने स्वीकारली आणि श्री.धमाल मुलगा यानी एक छान आवाहन करून ती मूर्त स्वरूपात इथे आणली, त्यातील सर्वात सुंदर पुष्प म्हणजे डॉ.दिलीप बिरुटे सरांचे "कविता" महात्म्य. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनालाही साजेसे असे कवितेवर लिखाण येणे अत्यंत गरजेचे होते आणि ते 'मराठी'च्याच एका प्राध्यापकांनी करावे हे उचितच म्हणावे लागेल. "...कवितेच्या बाबतीत कवितेला अनेकदा विविध आरोपांना सामोरे जावे लागले आहे..." ~ सरांच्या या विधानात तथ्य असले तरी ते प्रामुख्याने कवितेतील नवनवीन प्रयोगांना उद्देश्यून आहेत आणि अगदी 'रविकिरण मंडळा'च्या स्थापनेपासूनच त्या त्या काळातील कवींनी सहन केले आहे. माधव जुलिअनसारख्या संवेदनशील (आणि प्रयोगशीलसुद्धा) कविला अत्रे नावाच्या मुलुखमैदान तोफेपासून झालेला त्रास सर्वश्रुत आहे (त्यातही कवितेच्या प्रयोगांना विरोध म्हणून त्यांच्या खाजगी आयुष्याला वर्तमानपत्री रूप देऊन माधवरावांना पुणे सोडायला लावणे हे देखील नवकवितेवर झालेल्या आरोपाचे फलच होय.) पण हा झाला इतिहास....जो अनेकविध रुपाने मांडता येऊ शकेल...पण कवितेवर होत असलेल्या आरोपांची विकृती दूर होण्यासाठी मराठी वैचारिक प्रज्ञेची मूसच बदलणे आवश्यक आहे. महाविद्यालनीन पातळीवर भाषांच्या क्रमिक पुस्तकांतदेखील कवितेमधील नवीन प्रयोगांना किती स्थान दिले जाते हा तर एक संशोधनाचा विषय होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे फायदे अचाट असतील पण कविता आणि भाषा अभ्यासकांच्या दृष्टीने मोठा तोटा कुठला झाला असेल तर 'सत्यकथा' व्यासपीठाचे निधन. मी 'अकाली' म्हणणार नाही, पण भागवतांनी प्रयोगशील साहित्यिकांचा हक्काचा खटाववाडीचा रस्ता ज्या दिवशी बंद केला त्याचवेळी 'कवितेतील नूतन प्रयोगांचे' दिवे मंदावून गेले, ते कायमचेच. [याला अपवाद असतील, पण ते "नियमाला अपवाद असतात...' हे वचन सिद्ध करण्यापुरतेच.] सरांच्या लेखात "दलित कविते"तून प्रकटलेला वेदनेचा हुंकार आलेला दिसत नाही. ७० च्या आगेमागे पॅन्थरच्या माध्यमातून कवितेतील रम्योत्कटवादी काव्यदृष्टी मराठीतून लुप्त झाली आणि तिला लाभली धगधगीत अशा सामाजिक विषमतेची किनार. त्यामुळे कवितेची सैध्दांतिक तपासणी करायची झाल्यास निव्वळ "संतकाव्य" ते 'रोमँटिसिझम' इतकाच प्रवास अभ्यासकाच्या नजरेत पुरेसा होणार नाही. 'जालिय' कवितेचा उल्लेख लेखात आलेला आहे, आणि त्या धाटणीच्या कवितांचा अभ्यास करण्याची वेळदेखील लवकरच येईल इतके ते विश्व अनुभवसंपन्न झाले आहे. भाषावृद्धी संदर्भात जर विचार करायचा म्हटल्यास इंटरनेटमुळे उद्योगधंद्याला जितके व्यापक व्यासपीठ मिळाले आहे तितके साहित्य संसाराला आजतरी व्यापक म्हणावे असे स्वरूप आले नसल्याने अमुक एकाच्या किंवा एकीच्या कवितेतील अभिव्यक्ती किती सखोल आहे हे (दुर्दैवाने) मर्यादित स्वरूपातच चर्चिले जात आहे. पण आज ना उद्या ही स्थिती बदलण्याची सुचिन्हे दिसत आहेत. त्यामुळे उद्याचे काव्य आणि त्याची समाजाप्रती बदललेली दृष्टी समजण्याची मानसिक तयारी या घडीला झाली आहे, हे जालावर पसरत असलेल्या काव्यप्रतिभेतून निश्चित जाणवते. मराठी भाषा दिनानिमित्य "कविता" या विषयावर इथे चर्चा झाली तर ते भाषेच्या समृद्धीचे प्रतिक मानले जावे. एका अविट गोडीच्या विषयाचा समावेश येथे केल्याबद्दल डॉ.बिरुटेसरांना मनःपूर्वक धन्यवाद ! इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

कवितेच्या प्रवाहाला केवळ 'स्पर्श' करतांना अनेक गोष्टींच्या नोंदी करायच्या राहून गेल्या आहेत. आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाशी मी सहमतच आहे. प्रतिसादाबद्दल धन्यु........! माझ्या लेखनाचे पहिले वाचक आदरणीय श्री प्रमोद देव आणि दुसरे वाचक धमाल मुलगा यांना वरील लेखनात निवडक कवींच्या काही निवडक ओळी हव्या होत्या त्याही मला वेळेअभावी डकवता आल्या नाहीत. -दिलीप बिरुटे

In reply to by इन्द्र्राज पवार

वपाडाव Mon, 03/07/2011 - 12:05
सरांच्या लेखात "दलित कविते"तून प्रकटलेला वेदनेचा हुंकार आलेला दिसत नाही.
नामदेव ढसाळांचा उल्लेख व्हायला हवा होता.

पंगा Sat, 03/05/2011 - 23:33
लेखाची मांडणी आणि एकंदर आढावा आवडला. आता काही बारीक मतभेदाचे मुद्दे.
पंडितांसमोर विशिष्ट असा श्रोतुवर्ग होता. पंडित जरासे पुराणिक पद्धतीचे होते आणि त्यांना धनिकांचा आश्रय होता. राजे रजवाड्यांच्या आश्रय असल्यामुळे पुराणे सांगणे हा त्यांचा व्यवसाय होता जरासा फावला वेळ मिळाला की काव्यरचना करायची. पंडित कवींनी समाजमनाचे रंजन करायचा विडाही जरासा उचलला होता. असे असले तरी पंडितांचे लेखन मात्र संस्कृत महाकाव्यांवर पोसलेले असायचे. संस्कृत साहित्यातील रस,अलंकार,वृत्त यांचा या पंडितांना भारी नाद. उच्चभ्रू समाजातील संस्कृततज्ञ, पंडितवर्ग आणि उच्च अभिरुची असलेल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे काव्य सादर केले. 'प्रगल्भ' लोकांसाठी केलेले साधारणतः त्यांचे लेखन होते. असे म्हटले तर वावगे ठरू नये.
या भागात तथ्यांशाच्या दृष्टीने वस्तुतः मतभेद असण्यासारखे काही नसावे. निदान, माझा या विषयात काही अभ्यास नसल्याने यातील तथ्यांशाच्या बाबतीत याहून वेगळे असे काहीच म्हणू इच्छीत नाही. मात्र एक सामान्य निरीक्षण येथे नोंदवावेसे वाटते. पंडितांसमोर 'विशिष्ट असा श्रोतृवर्ग' होता हे बहुधा पटण्यासारखे आहे. पंडितांचे लेखन संस्कृत महाकाव्यांवर पोसलेले असायचे, आणि संस्कृत साहित्यातील रस,अलंकार,वृत्त यांचा या पंडितांना भारी नाद होता, हे निरीक्षणही बहुधा योग्यच असावे. तसेच, त्यांचे काव्य हे समाजातील तथाकथित उच्चभ्रू वर्गाच्या, पक्षी संस्कृततज्ज्ञ, पंडितवर्ग आणि अन्य तथाकथित उच्च अभिरुची असलेल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम असावे, याबद्दलही वाद घालण्यासारखे काही नसावे. मात्र, पंडितांसमोरील 'विशिष्ट अशा श्रोतृवर्गा'तील सर्वच जण (किंवा बहुतांशसुद्धा) हे संस्कृततज्ज्ञ (किंवा संस्कृतातील जाणकार किंवा संस्कृत थोडेबहुत समजणारे), पंडित, तथाकथित उच्चभ्रू, तथाकथित उच्च अभिरुची असलेले किंवा 'प्रगल्भ' असावेत, याबद्दल साशंक आहे. वैयक्तिक पातळीवर, या 'विशिष्ट अशा श्रोतृवर्गा'बद्दलच्या बालपणीच्या स्वल्पनिरीक्षणाशी आणि बुजुर्गांकडून मौखिक परंपरेने कानावर पडलेल्या गोष्टींशी याचा फारसा मेळ बसत नाही. त्याहीपुढे जाऊन, 'प्रगल्भता' आणि समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गाचे सदस्यत्व (त्यातसुद्धा विशेष करून जन्मसिद्ध सदस्यत्व) यांचा काही आपोआप संबंध असावा असे वाटत नाही. आणि 'अभिरुचीची उच्चता' म्हणजे नेमके काय, याबद्दल बहुधा एकमत नसावे. त्यामुळे, फारतर, या 'विशिष्ट अशा श्रोतृवर्गा'च्या पारंपरिक आवडीनिवडींशी मिळतेजुळते काव्य या पंडितकवींनी केले (आणि त्याहून व्यापक श्रोतृवर्ग त्यांच्या कक्षेबाहेर होता), इथवर म्हटल्यास बहुधा सहमती होऊ शकेल. मात्र त्याचा श्रोतृवर्गाच्या अभिरुचीच्या उच्चतेशी, पांडित्याशी, संस्कृतच्या ज्ञानाशी किंवा प्रगल्भतेशी लावलेला आपोआप संबंध काही पटला नाही. (भ्रूच्या उच्चतेशी संबंधही तितकासा पटला नाही, पण काही अंशी समजू शकतो. शेवटी भ्रू ही काय, जितकी ठेवावी तितकी उच्च किंवा नीच राहू शकते. त्याचा पांडित्य, प्रगल्भता, ज्ञान, अभिरुचीचा प्रकार वगैरेंशी संबंध असण्याची पूर्वअट तर नसतेच, आणि त्यांच्याशी ताळमेळ असण्याची अपेक्षा तर नसतेच नसते. भ्रूची पातळी हा स्वभावतः एक स्वयंघोषित प्रकार आहे.)

In reply to by पंगा

श्रोतुवर्गाच्या मुद्याबद्दल मी तुमच्याशी किंचीत सहमत आहे. सर्वसाधारण श्रोते या पंडितांसमोर अगदी नव्हतेच असे काही समजण्याचे कारण नाही. मोरोपंताचेच उदाहरण देता येईल. बारामतीच्या नाइ़कांनी पंताची गुणवत्ता ओळखून कुटुंबातील मुलाबायकांना पुराण-कथन करण्यासाठी नेमणूक केली. आता हे कथन मराठीतून असले तरी संस्कृतप्रचुर मारा त्यावर असेल आणि तेही कुटुंबं ते कथन समजून घेणारे असावे. आता इथे श्रोतृवर्गाची अभिरुची पाहूनही पंडित कवी कवन करत असतील असे मला वाटते. अजून एका मुद्याकडे आपले लक्ष मला वेधले पाहिजे. कवी हा 'पंडित' म्हणून केव्हा मान्यता मिळवत असे, तर मध्ययुगीन शिक्षण पद्धतीत 'व्युत्त्पन्न' आणि 'पंडित' अशा प्रकारच्या संज्ञा आढळतात. काही प्राचीन ग्रंथाचा अभ्यास झाल्यावर त्याला आपापल्या स्पेशलायझेशन मधून काही प्राचीन काव्य आपापल्या प्रतिभेने लिहून दाखवावे लागे. त्याचबरोबर व्याकरण, न्याय, मिमांसा, वेदांत अभ्यास किंवा एका शास्त्राचा अभ्यास गुरुच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करायचा त्यावर प्रभुत्त्व मिळवणारा तो 'पंडित' समजला जात असे, आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बारा वर्ष लागत होते. [चुभुदेघे] संस्कृत वृत्तात लेखन करणे आणि संस्कृतप्रचुर मराठी लिहिणे हा पंडितांचा आवडता प्रांत होता. त्यामुळे आपण जे शिक्षण घेतले आहे ते शिक्षण दाखविण्यासाठी [पांडित्याचे प्रदर्शन] ते सामान्य श्रोतूवर्गासाठी फार लिहित असतील असे काही वाटत नाही. पंडित कवीच्या अभ्यासकांचे म्हणने आहे की, विद्वान संस्कृततज्ञ आणि तसाच काव्याची अभिरुची असणारा वर्गच पंडित कवींसमोर होता. आणि ते त्यांच्यासाठी प्राचीन ग्रंथातील काही निवडक प्रसंग घेऊन अलंकाराची पेरणी करुन, संस्कृत काव्यशास्त्राच्या आधाराने आपली मांडणी करत असत. तेव्हा फारसे सामान्य श्रोते त्यांच्यासमोर नसावेत असे मला वाटते पंतांची विद्वत्ता पाहून काही शेजारी स्त्रिया त्यांच्याकडे यायच्या आणि म्हणायच्या की आम्हाला काही ओव्या लिहून द्या. मग तेव्हा पंत प्रासादिक अशा मराठी ओव्या त्यांना लिहून देत असेही वाचायला मिळते. तेव्हा सामान्य श्रोतुवर्गासाठी खूप काही लिहिता-बोलता येईल यासाठी असलेली प्रतिभाही त्यांच्याकडे होतीच. प्रतिसादाबद्दल धुन्यु......! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसुनाना Mon, 03/07/2011 - 11:33
मूळ लेख आवडल्याची प्रतिक्रिया खाली दिली आहे. हा प्रतिसादही माहितीपूर्ण आहे. अवांतर - श्रोतृवर्ग हा शब्द आपण काही ठिकाणी श्रोतुवर्ग असा चुकीचा लिहीला आहे . बारामतीचे नाइक हा उल्लेख बारामतीचे नाक असा हवा. तसेच 'बारा वर्ष लागत होते' हा वाक्यखंड 'बारा वर्षे लागत होती' असा हवा.धन्यु चे धुन्यु झाले आहे. खरेतर धन्यवाद असे हवे होते. असो. हा लेख ललितलेख नसल्याने लेखासह त्यावरील प्रतिसादही शुद्धलेखनास धरून असावेत ही अपेक्षा होती इतकेच. राग मानू नये.

In reply to by विसुनाना

"...लेखासह त्यावरील प्रतिसादही शुद्धलेखनास धरून असावेत ही अपेक्षा होती इतकेच...." ~ या अपेक्षेबद्दल श्री.विसुनाना यांना मनःपूर्वक धन्यवाद. डॉ.बिरुटे यांच्यासारख्या 'मराठी' विषयाच्या प्राध्यापकांनी तरी "धन्यु...धुन्यू" असे हास्यास्पद आणि मराठी भाषेची लक्तरे काढणारी रुपे आपल्या लिखाणात वापरू नयेत. "शुद्धलेखन फाट्यावर मारा"...वगैरे प्रतिसाद इथे वारंवार व्यक्त होत असतात, ते खेळकरपणानेच घ्यावेत....त्याची अंमलबजावणी अट्टाहासाने होत राहिली तर तो 'मराठी दिन' संकल्पनेचाच अपमान होईल. असो. सरांना या सूचनेबद्दल राग येणार नाही अशी आशा आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

आजानुकर्ण Mon, 03/07/2011 - 17:39
'मराठी' विषयाच्या प्राध्यापकांनी तरी "धन्यु...धुन्यू" असे हास्यास्पद आणि मराठी भाषेची लक्तरे काढणारी रुपे आपल्या लिखाणात वापरू नयेत.
विसुनाना आणि इन्द्राशी सहमत. चांगल्या लेखात अशा गोष्टींनी रसभंग होतो.

In reply to by आजानुकर्ण

पंगा Mon, 03/07/2011 - 18:28
चांगल्या लेखात अशा गोष्टींनी रसभंग होतो.
अधोरेखिताशी विशेष सहमत.

In reply to by पंगा

प्रतिसादातील धन्यु शब्दामुळे चांगल्या लेखाचा झालेला रसभंग मी समजू शकतो. :) कृपया, ज्यांचा ज्यांचा असा रसभंग झाला आहे, होत आहे, आणि होणार आहे. त्या सर्वांनी माझ्या खरडवहीचा वापर करावा, ही आग्रहाची नम्र विनंती. -दिलीप बिरुटे

In reply to by इन्द्र्राज पवार

डॉ.बिरुटे यांच्यासारख्या 'मराठी' विषयाच्या प्राध्यापकांनी तरी "धन्यु...धुन्यू" असे हास्यास्पद आणि मराठी भाषेची लक्तरे काढणारी रुपे आपल्या लिखाणात वापरू नयेत. 'धन्यु 'हा शब्द मला जालावर वावरतांना लिहायला आवडतो. आपल्या मताचा आदर करुन म्हणतो की, मला तो शब्द अजिबात हास्यास्पद वाटत नाही. जालावरील अनेक शब्द आता मराठी भाषेत रुढ होत आहेत तेव्हा धन्यु शब्द आज तितका रुढ नसेल पण उद्याच्या मराठी भाषेत तो नक्की रुढ झालेलाही असेल. असो, प्रतिसादाबद्दल धन्यु.....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया Mon, 03/07/2011 - 18:43
दिलीप शेटशी सहमत आहे. :) यासंदर्भात माझी आणि इंद्रराज पवारांची काही खरड चर्चा झाली. त्यात मी त्यांना ज्या खरडी केल्या त्या इथे देत आहे.
धन्यवादचे धन्यु तुम्हाला आवडले नाही असे कुठेतरी वाचले. Smile कान हा शब्द कर्ण (संस्कृत) -- कण्ण --- कान असा अपभ्रंश होत आला आहे. कर्ण हा शब्द जसाच्या तसा सुद्धा वापरला जातो आणि कान म्हणुन पण वापरला जातो. जर ते चालते तर धन्यवाद--- धन्यु का चालु नये? धन्यवाद म्हणून माझ्या एखाद्या मित्राला म्हटले तर ते त्याला मैत्रीत ठिक वाटत नाही आणि बस का यार असे म्हणतो पण तेच त्याला पाठीवर थाप मारुन धन्यु रे किंवा फोन वर धन्यु म्हटले तर तितके गैर वाटत नाही Smile शब्द संवाद परिपूर्ण करणारे असावेत त्यासाठी त्यात कालानुरुप बदल व्हायला हवा असे मला वाटते. आणि असे बदल होत असतील तर तो भाषेचा र्‍हास आहे असे मी मानत नाही
आणि
>>>>धन्यु' हे धन्यवादचे आंग्ळाललेले रूप मी इथेच - मि.पा.वर - पाहिले आहे. त्यामुळे मला ते (जरी तुम्ही म्हणता त्याप्रमाने चुकीचे जरी नसले तरी...) खटकते आणि याच हेतूने तिथे तसे मत मांडले होते. मास्टर चे मास्तर.. ट्रे़झरीची तिजोरी... ही इंग्रजी शब्दांची मराठी रुपे आपण मान्य केली मेजाचे टेबल असे थेट शब्द उचल मान्य केली धन्यवादचे थांकुच्या स्वरुपात धन्यु झाले तर उलट मराठी शब्दाचेच रुप बदलून इंग्रजी शब्दाला पर्याय समर्थ पणे आला हे खटकले? बर बर. >>>>'कर्ण=कान' यात अमान्य करण्याचे काहीच कारण नाही. फक्त व्यावहारीक पातळीवर लिहिताना वा बोलताना .....असाही लिखाणात कुणी प्रयोग करीत नाही....जरी भाषेच्या दृष्टीने त्याचा वापर अगदी अचूक असला तरी. दंतवैद्य कर्णरोग अनेक दा़खले देता येतील थांबतो.
बाकी चालू द्या. भाषा शुद्ध ठेवण्याच्या कुठल्याही प्रयत्नाला आमच्या शुभेच्छा या असतातच असतात !! :)

कलंत्री Sun, 03/06/2011 - 12:08
प्रा. साहेबांचा लेख आणि त्यावरील अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया ही खास मेजवानीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खरे तर मिपाचा कट्टा व्हावा असे माझ्या मनात होते आणि हा लेख वाचल्यानंतर हा कट्टा व्हावा आणि मिपा चे एक वेगळेच अंग आपल्या लोकांना दिसावे अशी भावनाही मनात चमकून गेली. अशा प्रस्तावित कट्ट्यावर प्रासाहेब आणि इतर लोकं कविता आणि त्याचा रसास्वाद घेत आहे असे चित्र तरळत आहे. ( स्वप्नाळू आणि काव्यप्रेमी) कलंत्री

"...संगणकीय काळातील शब्दांचा भडीमार असलेल्या कविता, इंग्रजी शब्दांच्या अतिरेक असलेल्या कविता, पाश्चात्य कल्पना, तेच ते दु:खानुभव सांगणारी कविता...." ~ सर, 'कवितेवरील आरोप' यामध्ये तुम्ही वरील छटांना प्राधान्याने स्थान दिले आहे, तरीही "कविते" ची शुद्धता टिकविण्याच्या चारचौघांच्या प्रयत्नांचाच तो एक भाग होता/आहे असे मानले तर हे दिसून येईलच की केवळ 'हौस' वा 'चूष' म्हणून कवितेच्या रचनेत इंग्रजी शब्दांचा आणि भन्नाट उपमांचा अतिरेक कुणी करत असेल तर ते कोणत्या पातळीपर्यंत स्वीकारणीय आहे हा देखील एक वादाचा मुद्दा आहेच आहे. मर्ढेकरांनी काय थोडे प्रयोग केले होते काय? पिपांत मेलेले उंदिर तर सोडूनच द्या, पण "बेकलायटी", "फलाट", 'थ्रू" गाडी, कुल्फीमलईवाला, चिमट बाटल्या...इत्यादी त्या काळी डोक्याला भिरभिरी आणणारे शब्द प्रयोग....इतकेच काय पण 'वाह्यात माझी वावडी..." या अत्यंत गाजलेल्या कवितेत तर ते म्हणतात, "शेत ओकी ढेकळा...." सारखे धगधगीत रूपक वापरून नांगरटीला एक रोखठोक प्रमाण दिले ते किती समकालिकांच्या पचनी पडले असेल? पण त्यांचा जो समाज अभ्यास होता....त्याला आपण मानले तर मग त्यांच्यावर झालेले 'अ‍ॅब्सर्ड्टी' चे आरोप वृथा वाटावेत असेच आहे. दि.पु.चित्रे, मनोहर ओक आणि अरुण कोलटकर यानी काय कमी प्रयोग केलेत? अरुण आणि नामदेवरावांच्यावर तर स्वतंत्र धागे इथे निघणे आवश्यक आहेत, इतकी त्यांची महती आहे. पण म्हणून सरसकट भाषेत आणलेल्या प्रयोगाचे स्वागत केलेच पाहिजे असे नाही. कविच्या भूमिकेशी तादात्म्य पावण्याची प्रक्रिया ही कविता समजून घेण्याचा एक प्रकार आहे....ज्या विषयावर वा ज्या घटनेवर त्या कवितेतील भाषेचे प्रयोजन आहे तो विषय वा घटना तुम्हाला मला परिचित असेल तरच भाषेतील ती तोडमोड वा नवता आपल्या पचनी पडू शकेल. पण इतरांचाही विचार केलाच पाहिजे. 'भोपाळ कांडावर' त्या त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या शेकडो कवितातील मूठभर तर कविता आज आपल्या जवळ आहेत का? नाही, कारण एकच....ती वेदना समजावून सांगण्यासाठी वापरल्या गेलेल्या प्रतिमा इतक्या ठिसूळ होत्या की, कविने कोणत्या उद्देशाने तिचे प्रयोजन आपल्या रचनेत केले असावे असेच सतत वाटत राहते. उदा....त्या कांडावरील दोन ओळी रविवारच्या वर्तमानपत्राच्या ललित आवृत्तीतून....मला आठवतात तशाच देत आहे : "दे श्वास मला ऑक्सिजन, घुटमळत आहे कार्बनमध्ये उद्याचा दिस जरी नाही मजला, पण होप्स ठेवतो कुपीमध्ये..." काय समजते यातून? काय प्रसंग...काय ती घटनेची दाहकता....आणि कशासाठी 'होप्स' ? कसली ती कुपी? ... मग अशावेळी ती कविता (?) भोपाळ वायू दुर्घटनेवर आहे म्हणून डोक्यावर घ्यायची का? असे असेल तर दुर्बोधता + छ्चोरपणा याच्याशिवाय आरोप व्हायचेच असले तर आणखीन किती आणि कुठले होत राहतील? तरीही भिन्न भिन्न स्वरूपाचे त्या त्या काळात आरोप होत गेले म्हणून तर कविता जगत आली आहे असे माझे मत आहे. पु.शि.रेगे यानीदेखील काय कमी प्रयोग केले? पण ज्या ज्या वेळी केले त्या त्या वेळी त्यानी मराठी भाषेला नवनवीन अलंकारांचे आंदण दिले आहे. स्त्रीच्या देहाचे वर्णन करताना ते लिहितात : "सतेज तुझे बोलणे-चालणे सुकुमार खेळे अंगी नव्हाळी.... क्षणभर वाटे अपूर्व जणून हिमसेक हा स्वच्छ, निरागस, तेजाळ, विश्रब्ध..." इथे कविची ना नैतिक ना अनैतिक दृष्टी....त्यांच्यावर असला आरोप होऊच शकत नाही. रेग्यांच्या कविमनातील पुरुष स्त्रीकडे एक 'स्त्री' म्हणूनच पाहतो आणि मग तिथे अश्लिलतेचा आरोप होणे हे त्या कविवर अन्यायकारक ठरते. 'हिमसेक' ची प्रतिमा तर अतुलनिय अशीच आहे. तुम्ही म्हणता तसे संगणकीय घडामोडीमध्ये नवनवीन शब्दांच्या जडणघडणीला खूप वाव आहे, पण म्हणून उगाच "तुझ्या हार्ड डिस्कमध्ये माझ्या दिलाचा प्रोग्राम व्हायरस फ्री राहिल काय?" ही कोणत्या प्रयोगाची जातकुळी?. रेग्यांनी "झनन-झांजरे....ठिबक-ठाकडे....बहर-बावरे" या नादवंत शब्दांना जन्म दिला होता. प्रयोगाच्या दृष्टीने या प्रयोजनाला निश्चित असा अर्थ नसेलही, पण त्यातील गेयता मोहवून टाकते. फार सुंदर आहे हा विषय...!! इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

दलित कवितेचे त्याच त्या अनुभवाबद्दल थोडी चर्चा केली पाहिजे असे वाटते. गेल्या काही वर्षात दलित कविता पाहिल्या की लक्षात येते की, युगानयुगे शोषित माणसाचे अनुभव दलित कवितेतून व्यक्त झालेले दिसते. दलित कविता म्हटले की, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर या कवींची आठवण होते. वरील सर्व कवींची वेदना एकच असली तरी अविष्कारात विविधता आहे. आज दलित कवींची दुसरी-तिसरी पिढी कविता लिहिते आहे. पण अनुभवाच्या एकेरीपणाच्या पुढे ती कविता जात नाही असे मला वाटते. एका कवीपेक्षा दुस-या कवीची कविता खूप-खूप वेगळी असेल पण अनुभव-वेदना मात्र एकच आहे असे वाटायला लागते. असो, विषय खूप मोठा आहे. -दिलीप बिरुटे

विकास Mon, 03/07/2011 - 02:43
मराठी कवितेच्या जन्मापासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासाचा धावता आढावा एकदम आवडला. रे.ना.वा.टिळक, कवी विनायक, बालकवी, गोविंदाग्रज, बी, ते आजच्या नवकवीपर्यंत अनेक कवींची नावे आता टंकावे लागतील. यात राहीले असे म्हणायला म्हणून उद्देश नाही, पण "अशिक्षित" असलेल्या बहिणाबाईंनी देखील स्वत:च्या काव्यातून विचार करायला लावला. या शिवाय अजून एक कवि/कवयत्रींचा प्रकार आहे. त्यांची काव्ये कायम निनावीच आणि मर्यादीत वर्तुळातच राहतात - मंगलाष्टके, डोहाळे आणि पाळणे लिहीणारे. काहीवेळेस जुन्याच काव्यपंक्तीत नावे अक्षरशः "फाइंड अँड रिप्लेस" केलेली असतात. पण काही मंगलाष्टके, डोहाळे आणि पाळणे हे मात्र खरेच स्वतंत्र काव्य प्रकार असतात. जाता जाता एक प्रश्नः शिवछत्रपती, सवाई माधवराव, भाऊसाहेब पेशवे, हे शाहिरांच्या लेखणीचे विषय झाले. यातील सवाई माधवराव शाहीरांच्या लेखणीचे विषय का आणि कसे झाले यासंदर्भात काही माहिती मिळाली तर आवडेल.

In reply to by विकास

"...यातील सवाई माधवराव शाहीरांच्या लेखणीचे विषय ....!" ~ श्री.विकासरावांना पडलेला हा प्रश्न माझ्याही मनी आलाच होता, पण नंतर वाटले की कदाचित सरांना "थोरले माधवराव" अपेक्षित असावेत. "शाहिरी परंपरे"त समस्त पेशव्यांपैकी अमुक एकावर भरभरून पोवाडे आल्याचा दाखला नाही....पानिपतच्या इतिहासावर शाहिरी रचना आहेत. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

शाहिरी परंपरे"त समस्त पेशव्यांपैकी अमुक एकावर भरभरून पोवाडे आल्याचा दाखला नाही काय म्हणता ? :) असो, प्रभाकर या शाहीराने जे काही ऐतिहासिक पोवाडे लिहिले आहेत त्यापैकी दुस-या बाजीरावावर दोन पोवाडे आणि आणि पेशवेवंशावर दोन पोवाडे लिहिले आहेत. पेशवेवंशावरील पोवाड्यात काय काय आहे ते मला काही माहिती नाही. अधिक संदर्भ मिळाले तर लवकरच सादर करतो. होनाजी हा तर पेशव्यांचा आश्रीत शाहीर होता. होनाजीला पेशवेदरबारात खूप मानही होता. होनाजीने जे काही पोवाडे लिहिले त्याबद्दल अधिक माहिती माझ्याजवळ आता नाही. उत्तर पेशवाईतल्या शाहीरांबद्दल काही माहिती मिळाली तर पुढे कधी तरी डकवेन. [डकवेन-डकवणे, हा शब्द जालावर रुढ आहे. त्यावर काथ्याकूट करु नये. धन्यवाद.] -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंगा Mon, 03/07/2011 - 18:21
[डकवेन-डकवणे, हा शब्द जालावर रुढ आहे. त्यावर काथ्याकूट करु नये. धन्यवाद.]
'डकवणे' हा शब्द जालावरच कशाला, जालाबाहेरही रूढ असावा. ('चिकटणे' अशा अर्थी 'डकणे' असा शब्द मोल्सवर्थात सापडतो. तसेच 'डकवणे' अथवा 'डकविणे' याचा अर्थ मोल्सवर्थाने दिलेला नसला, तरी असे क्रियापद असण्याबद्दलची दखल मोल्सवर्थाने घेतलेली दिसते. पहा: 'डकवण' अशा मोल्सवर्थातील नोंदीबरोबरची टीप.)

चित्रा Mon, 03/07/2011 - 05:42
धन्यवाद! आढावा आवडला. काही कवितांवरून बिरुटेसरांनी असेच अधून मधून लिहावे ही विनंती.

विसुनाना Mon, 03/07/2011 - 11:20
मराठी कवितेचा संक्षिप्त आढावा घेणारा लेख आवडला. शिवाय अनेकांचे (विशेषतः इंद्रराज यांचे) प्रतिसादही अभ्यासपूर्ण आहेत. तेही आवडले. प्रयोगाबाबत म्हणाल तर आपल्या शरदिनी (मंदार जोगळेकर-भडकमकर मास्तर-)अभ्यंकर यांची कविता कशी वाटते? :)

गणेशा Mon, 03/07/2011 - 16:42
लेख अतिशय आवडला ... मनापासुन एकदम ... त्यावरील प्रतिक्रिया ही खुपच सुंदर ..अप्रतिम.. विशेष इंद्राजीम्ची पहिली प्रतिक्रीया छानच. अवांतर : सध्याचे नवकवी पाहिले की कधीतरी वाटते येव्हडी प्रतिभा .. येव्हडे शब्दसामर्थ्य क्वचितच मिळते काही जनांना. पण स्पर्धेच्या या जगात हे नवकवी गर्दीत अनोळखीच राहतात .. काही वेळेस त्यांच्या कविता नीट नसतील ही, पण प्रोत्साहनपर आपल्या रिप्लयमधुन नक्कीच त्यांना प्रेरणा मिळेल.. आणि नक्कीच, हे लिखान करणारे भाषा समृद्ध करताना, त्याच्यामध्ये आपल्या पामराचे ही थोडे हातभार लागले आहेत हा आनंद सर्वांना मिळेलच मिळेल ..

नानबाशी सहमत :) प्रा.डॉ. सुरेखच आढावा घेतला आहेत. खुप आवडले. आता लिहिते व्हा ! अवांतर :- आंतरजालावर एका वेगळ्याच विश्वातला सवितेपासून कवितेपर्यंतचा प्रवास आठवला ;)

धनंजय Mon, 03/07/2011 - 23:45
हा धावता आढावा म्हणजे मेजवानीपूर्वीचे क्षुधावर्धक असल्यासारखा. प्रत्येक काळावरती काही कवितांमधील कडवी मासल्यादाखल घालून उत्तम लेखमाला करता येईल. सरांनी आणि काही अन्य चौफेर वाचकांनी मनावर घ्यावे, ही विनंती.

विशेष
मिपावर मराठी दिनानिमित्त विविध उत्तम लेखन वाचायला मिळत आहेत तेव्हा आमचेही दोन शब्द. मराठी कविता म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आवडणा-या कवितांची आठवण होते. आपापल्या आवडत्या कवींच्या कविता डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात. काही कवितेच्या ओळी आठवतात. काही कवितेच्या शब्द, प्रतिमा आठवतात. काही कवितेचे आशय आठवतात तर कधी नुसतीच कवींची आठवण होते. कवितेचा प्रवास सुरु झाला तो ''माझा म‍-हाटिची बोल कौतुके । परि अमृतातेंही पैजा जिंके ॥”म्हणणा-या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरापासून. संत ज्ञानेश्वरापासून सुरु झालेला हा कवितेचा प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे.

हरवली पोर माझी कविता नावाची !

गणेशा ·

गणेशा Fri, 03/04/2011 - 12:32
नको बोलु बाबा काही नको सांगु काही रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई हातानी तुझ्या जेंव्हा मला भरवला घास कामामध्ये असे तुझ्या फक्त माझाच ध्यास कसे विसरेल बाबा तुझी करुण कहानी फाटलेल्या सदर्‍यात विनलेली नाती धुळीमधी माखलेली तुझी जिंदगाणी आधाराची परि माझ्या प्रेमाची सावली अंगणात विसावता मायेची अंगाई वेड्या या पोरीची बाबा तुच विठाई प्राजक्ताच्या सड्यामध्ये होती ओघळली कविता सासराला जाताना तुझी रडवेली बोली फाटक्या या संसाराला ठिगळाची घाई दूराव्याच्या अंतरात जीव जाळीत राहि नको बोलु बाबा काही नको सांगु काही रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई !! - शब्दमेघ ( ४ मार्च २०११)

नगरीनिरंजन Fri, 03/04/2011 - 14:16
काय सांगू कसं सांगू सुरुवात करू कुठून कविता लै हट्टी आमची बसली असंल हटून जवा मी येतो स्वच्छपैकी आंघोळ कधी करून तवा ही येती केस पिंजारत गावभर उंडारून जवा मी म्हण्तो आराम करावा थोडंसं पडून तवा ही बया ओढत म्हण्ती चल डोंगर चढून जवा मी बस्तो लपवत सल कडीकुलूप लावून तवा हळूच जवळ येती अन जाती मलम लावून. काय सांगू कसं सांगू सुरुवात करू कुठून बाहेर जाय्चं म्हण्ल्यावर बघ कशी निघाली नटून.

प्रकाश१११ Wed, 03/09/2011 - 22:13
गणेशा - अप्रतिम कविता कामाच्या ओझ्यामंधी भान हुतं गेल सरुन डोळ्यात टिपुस ना परि ओढ पोरी तुझीच तिथुन कारभारनीच तुकडं काही ग्वॉड लागना शेतांमधी पाटाच काही पाणी वाहिना ह्या कवितेला ,गाण्याला मस्त चाल लावता येयेल. छान गाणे होईल. तुझ्या कवितेचे एक गीत येंकले होते .तसेच हे भन्नाट होईल. बघ त्याना विचारून. नकार नाही मिळणार मित्रा. मला आतून वाटते आहे. शुभेच्छा आहेतच.

प्रस्तावना : ही कविता काव्य विभागात दिलेली होती(http://www.misalpav.com/node/1708). पण कविता टाकल्यानंतर आणि पैसा जीं शी बोलण्या नंतर असे वाटले की या कवितेला अजुनही बोली भाषेत उत्तरे देता येतील, असेच काव्य पुढे लिहिता येइल .. ज्यांना ज्यांना त्यांच्या बोली भाषेत उत्तरे देता येतील त्यांनी तसे प्रयत्न केल्यास छान वाटेल .. थिम : कवी आनि कविता यांच्यामधील संवाद .. सोबतीला खरे खुरे बाप्-मुलगी यांचे मन ही त्यामध्ये दिसले पाहिजे ... ---
कविता १ : काय सांगु कहानी या वेड्या बापाची हरवली पोर माझी कविता नावाची !

बोलकढी

बेसनलाडू ·

सहज Wed, 03/02/2011 - 06:27
स्वादिष्ट, झटका मिसळ!!!!! सही लेख बेला!

स्पंदना Wed, 03/02/2011 - 07:50
या शब्दा वरुन त्या शब्दावर, अन त्या वरुन त्या शब्दावर. याला म्हणतात 'खळखळत' लिखाण! काहीजण ओघवत पण म्हणतात पण या प्रकाराला 'खळखळ' हा शब्द्च मला योग्य वाटला. भारी ओ बेला!__/\__

पैसा Wed, 03/02/2011 - 08:30
बोलकढीवरून आठवलं... तुमची बोलची कढी आणि बोलाचा भात खाऊन तृप्त झाले! सगळे चिमटे, फटके अगदी झक्कास!

छोटा डॉन Wed, 03/02/2011 - 10:38
मस्त शालजोडीतले मारले आहेत, खुमासदार लेख आवडला. लेखनशैलीदां जवाब नहीं हे वे.सां.न.ल. - ( कढी-खिचडी प्रेमी ) छोटा डॉन

धमाल मुलगा Wed, 03/02/2011 - 21:17
एकदम झक्क जमली आहे खिचडी (की खिच्यडी म्हणू? ;) ). :) आशयाशी पुरेसा सहमत नसलो तरी मजा आली वाचायला. :)

रमताराम Wed, 03/02/2011 - 22:46
मस्त जमला आहे पदार्थ. अवांतर: बोलण्यावरून आठवलं. कोणाचा कुठला विषय चांगला आहे या चर्चेत मिनी चिंटूला म्हणते माझी 'भाषा चांगली आहे'. 'साहजिकच आहे, इतर कोणाही पेक्षा तूच जास्त वापरतेस ना ती'-चिंटू. (परिणाम अर्थातच चिंटूची धुलाई हे वे. सां. न. ल.)

नाटक्या गुरुवार, 03/03/2011 - 01:07
पण बोलकढी पेक्षा बोलकडी चांगले वाटले असते. कडी कडी करून साखळी छानच जमवली आहे.... चला बेला लिहीता झाला!!! पुढच्या कट्ट्याला जाहीर वाचन ठेऊया तुझ्या लेखांचे..

मनिष गुरुवार, 03/03/2011 - 10:47
बेला-नंदन-मुसु सारख्यांनी लिहिले, की आम्हाला मेजवानी! लेख एकदम खुसखुशीत..आणि खुसखुशीत वरून आठवले, असे अगदी दिवाळीतल्या भुईनळ्यांसारखे (ईद का चांद ला एक सक्षम मराठी पर्याय, आमची पण थोडी मराठीची सेवा ;)) ४-५ लेख लिहून गायब नका होऊ रे...जरा वरचेवर नियमीतपणे लिहित जा की! :-)

यशोधरा गुरुवार, 03/03/2011 - 11:16
भन्नाट लेख! खूप आवडला! पण खरीखुरी गुलाबी सोलकढी, पांढराशुभ्र फळफळीत भात आणि पापलेटचा गरमागरम तुकडा ताटात हे कोकणीपणाचं लक्षण हो!

In reply to by यशोधरा

प्यारे१ गुरुवार, 03/03/2011 - 12:07
असे सोलकढी आणि पापलेट्ला मराठी कोकणी प्रांतवादात अडकवण्याचं पाप नका करु ताई. हे पदार्थ वैश्विक आहेत आणि असेच असायला हवेत हो...... बाकी लेख म्हण्जे 'एकदम खुसखुशीत क्रिस्पी स्प्रिंग रोल' वाफाळत्या चहा/कॉफीबरोबर खा/वा/चावा असा.

In reply to by प्यारे१

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 03/03/2011 - 14:16
अहो त्यांना कोकणी भाषा नाही, कोकणाचे ते कोकणी या अर्थाने म्हणायचे आहे हो. एखाद्या पदार्थाला किंवा स्वयंपाकाच्या पद्धतीला एखाद्या प्रांताबरोबर निगडीत करणे यात काहीही चूक नाही. आता पांढरा रस्सा म्हटला की मला कोल्हापूर आठवते (आणि हल्ली कोल्हापूर म्हटले की इंद्रा आठवतो), सावजी मटण म्हटले की नागपूर. तसे सोलकढी म्हटले की कोकण आठवणारच हो. अर्थात त्यामुळे ते पदार्थ वैश्विक होण्यात अडचण नाही काही. (स्पाघेती म्हटले की इटली, सुशी म्हटले की जपान आणि शेजवान म्हटले की चीन पण आठवतो, पण ते पदार्थ अनेक देशात मिळतात)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बबलु Fri, 03/04/2011 - 06:45
असेच म्हणतो. एकातून दुसरा विषय काढण्याची शैली फारच आवडली. ( तसेही आम्ही वाटेल त्या विषयातून कुठलाही विषय काढण्यात पटाईत असल्यामुळे ही शैली जवळची वाटली. काय मेहेंदळे बरोबर ना ? ) ;) ;)

In reply to by बबलु

>>तसेही आम्ही वाटेल त्या विषयातून कुठलाही विषय काढण्यात पटाईत असल्यामुळे ही शैली जवळची वाटली. काय मेहेंदळे बरोबर ना ? तुमचे कुठलेही लेखन वाचले नसल्याने तुम्ही यात पटाईत आहात की नाही हे सांगू शकत नाही. (तो एक मोर्स कोड मधला एक ओळीचा शत्रुत्ववाला प्रतिसाद सोडून :-) ) तो newtracker पण चालत नाही सध्या, त्यामुळे तुमचे आधीचे लेखन नाही वाचू शकत.

प्रदीप Fri, 03/04/2011 - 13:02
अगदी एकाद्या मान्यवराच्या सदरास शोभून दिसेल असे! खूप आवडले. असे लिखाण वरचेवर येथे करीत रहा (त्यासाठी जा. म. दि. ची आवश्यकता नाही) असे वर अनेकांनी लिहीले आहे, त्यात अजून एकाची भर घालतो.

धक्के बसतच असतात आयुष्यात. या ना त्या कारणाने. शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक, सामाजिक - कसेही! कॅलिफोर्नियातल्या दुकानात चितळ्यांची बाकरवडी 'क्रिस्पी स्पायसी स्प्रिंग रोल्स' म्हणून आणि बेडेकरांची थालीपीठ भाजणी 'ठेपले का आटा' म्हणून ठेवलेली दिसली तेव्हा बसलेला सांस्कृतिक धक्का; मिसळ, साबुदाणा वडा, थालीपीठ यांचा जोडीला दादरच्या प्रकाशमध्ये डोसा किंवा तत्सम दाक्षिणात्य पदार्थ मेन्यूकार्डावर दिसले तेव्हा, साक्षात सिंहगडाच्या पायथ्याशी चाललेल्या नंग्यानाचाची बातमी वाचली तेव्हा, रायगडावरच्या दारूपार्टीची पेपरात छापून आलेली छायाचित्रे पाहिली तेव्हा बसलेला सामाजिक धक्का इत्यादी इत्यादी इत्यादी.

आवतन! -कोंबडी वडा

स्पंदना ·

श्रावण मोडक Tue, 03/01/2011 - 22:57
अगं ए... आवर. तुझं नाव पाहून शीर्षक न वाचता धागा उघडला तर बोंब... मला वाटलं, कालच्यावानी काही असेल. तर हितं येगळंच. त्यात ते फटूंची लिंक अख्ख्या मजकुराला. च्यायला, एक तर कोल्हापुरास्नं लांब आहे. त्यात हे असलं लिही. तू भेटच. नाही पाठीत धपाटे घातले तर पहा. :)

In reply to by श्रावण मोडक

स्पंदना Wed, 03/02/2011 - 07:22
आर धपाट घाल खर, तुझा हाक्कच हाय त्यो, पर पयला ऐकुन तर घे सळ्ळ! आर या भागाच सगळच्या सगळ 'न्याट ' गुतपाळलय आस त्यो येजंट सांगत हुता. आर काल पासन किती बी नेट लावला तरी त्या न्याटावर काय चडना बी आन उतरना बी. आता ह्यात्न बी म्या हीत पत्तुर आलो. आलो कीनी? त्ये म्हत्वाच का न्हाय सांग बगु? न्हाय सांगच मला!

In reply to by स्पंदना

श्रावण मोडक Wed, 03/02/2011 - 14:51
तुझ्या या भाषासामर्थ्याला दंडवत. धपाटे घालण्याचा निर्धार मागे. शिकवणी लावायची आहे. जुन्या बेळगावी आणि कोल्लापुरी भाषेच्या आठवणी ताज्या करण्यासाठी. तिच शिक्षा या उत्तम पाकृद्वारे मला चिडवल्याबद्दल. :)

पिवळा डांबिस Tue, 03/01/2011 - 23:12
हाण तिच्या मा**!! ह्येला म्हंतात रेशिपी!!! शेमलं आभाळात उडीवलंत की वो!! आंबाबाई भलं करो पघा तुमचं!!!! :) आता या रविवारच्याला घरामंदे कोंबडं-वडंच! आजच कारभारणीला सांगून ठिवतो!! या जिवायला रविवारच्याला!!! :)

In reply to by रेवती

टारझन Wed, 03/02/2011 - 11:50
प्रत्येक जण मनातुन "णॉणव्हेज" असतो , असा माझा पुर्वीपासुन दावा आहे .. वर वर सगळेच आपण "व्हेज" आहोत असे दाखवतात :) - (णॉणव्हेज जोक प्रेमी) टारु श्रीवास्तव

स्पंदना Wed, 03/02/2011 - 07:26
प्राजु, सुहास, रेवती अन 'पैसा' धन्यवाद! आमच्या भागच नेट खरच गंडलय त्यामुळे इव्हन हा प्रतिसाद मी तीन चार दा लिहिला आहे. तसेच वरील ही.

प्यारे१ Wed, 03/02/2011 - 09:32
अग्गागागागागा.... तायडे, पाक येड पळिवलंस की समद्याचं. ए दोन शीट कोल्लापुर हाय का कोल्लापुर. निगाली निगाली ह्ये गाडी..... जरा घ्या दाबून वाईच.(म्हन्जे सरकून. उगा चुकीचा गैरसमज नको. काय???) अजून ३ शीटा बस्त्याल पावनं. च्यामारी धरुन फटाक्क. घ्या वाडून. आलोच. तवर रस्सा द्ये लोकास्नी.

अपर्णे....आगं आपल्या कोल्लापुरात माह्या मायंदाळ झाल्याती....त्याची आवताणं खिशात घालून्श्यान आमी फिरतोय न्हवं आजकाल...परवा तुझ्या गावाजवळच्या हिटणी...गडहिंग्लज तालुक्यातील जाली. लई भारी....तेवढ्यात कागलातून फटफटीवरून तिघं द्वाड आली, त्यातला येक हुता हामीदवाडीचा....त्या लेकालाही म्हाईती न्हाई तिथं समाधी कुनाची हाय ती....पण गडी खारे शेंगदाणे खाऊन टर्र झाल्यानं मी पन त्याला जादा ढुसला नाहीच. तुझ्या कोंबडीवड्याकडं बघतच हिंडत्योय असं म्हटलंस तरी चाललं ! लई मज्जा आणलीस तू... कोल्हापूरी रस्सा...नाद खुळा ! इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मस्त कलंदर Wed, 03/02/2011 - 20:17
आता कोल्लापुरकरास्नी बी कोल्लापुरी यीssना का काय? आजकाल,तेवढ्यात, कागलातून,त्या लेकालाही ,पण,झाल्यानं असलं कोल्लापुरी भासंत नसल्यालं का म्हून लिवावं वो? तवर/तवरका, कागलातनं, त्येलाबी/ त्या लेकालाबी, पर/पन असलं कैतरी सादं सोपं लिवायचं सोडूsssन उगंs आपलं बुक लिवल्यावाणी सुद लिव्हलंय त्ये. @अपर्णा: मी शाकाहारी असल्याने पाकृला फक्त चान चान म्हणू शकते. :-) बाकी मराठी दिनाच्या वेळेस असं काहीतरी वेगळं करण्याची आणि लिहिण्याची तुझी कल्पना आवडली गं..

In reply to by मस्त कलंदर

आवो गुळमाट (तुमच्या पुण्याच्या-ठाण्याच्या भाषेत ज्याला शाकाहारी म्हणतात...) खाणार्‍या मकीबाई, वाईच माझी गाडी घसरली कोल्हापूरीच्या पट्ट्यावरून....तेवढं मनावर घेऊ नका. माझ्या मनी लई असतं तसलं लिवायचं पण झालंय असं की, माझ्या बोटास्नी सुदलेखनाचं असं काय वंगाळ वळण बसलंय, ते हटाला तय्यारच न्हाय. ती बावना की भावना तेवढीच घ्या त्या मोडक्यातोडक्या मजकुरातंन ! सुदारतो मी. इन्द्रा

In reply to by मस्त कलंदर

वपाडाव गुरुवार, 03/03/2011 - 17:52
@अपर्णा: मी शाकाहारी असल्याने पाकृला फक्त चान चान म्हणू शकते. बाकी मराठी दिनाच्या वेळेस असं काहीतरी वेगळं करण्याची आणि लिहिण्याची तुझी कल्पना आवडली गं..
+१ पहिला व्हेज प्रतिसाद पाहुन बरं वाटलं. प्रसन्न यकदम. आमीबी खंप्लिट येजिटेर्यन मानुस. (कोंबडी पळ्वुन लावणारा) -वपाडाव

In reply to by वपाडाव

स्पंदना Fri, 03/04/2011 - 10:05
आर ये वप्पाडाव! आर वरतीच लिव्हलय नव्ह म्या ' शाकारी माणासांसाठन सोयाबीन्च्या वडया आन बट्टाट्यात ह्योच मसाला घालुन सांबाराऽ केलया म्हनुन' वाचल न्हाय का? आँ! हितन कुनी बी उपाशी तापाशी जावु नगासा रं!

In reply to by पर्नल नेने मराठे

चिंतामणी Wed, 03/02/2011 - 14:07
कुठे फेडणार ही पापे?? बाकी फोटोबघूनच मेलो. ठार मेलो. कोल्हापुरात येणे होते वरचे वर. पुढच्यावेळी वेळ काढुन येतो आणि आधी संपर्क साधतो.

In reply to by चिंतामणी

नगरीनिरंजन Fri, 03/04/2011 - 10:16
ओ चिंतामणी भौ, अपर्णातैंकडचे कोंबडीवडे खायाला कोल्हापुरला जायाचं म्हन्ता? कात्रज घाटातून जावं लाग्तं तिकडं जाय्ला हे ध्यानात ठिवा.

In reply to by नगरीनिरंजन

चिंतामणी Fri, 03/04/2011 - 22:46
भौ, तुला बी संग घेउन जाइन. ;;) (खरे तर सिंहगड रस्त्यावरून नवीन बोगद्यातुन जाणे फारच सोपे आहे. पण तुला नक्की घेउन जाणार. तेवढ्यासाठी वाट वाकडी करीन.) ;)

सखी Wed, 03/02/2011 - 19:58
क ड क. तुझ्या भाषासामर्थ्याला दंडवत!!

धमाल मुलगा Wed, 03/02/2011 - 21:00
झक्क मारलो न धागा वाचायला घ्येटलो! गप शिवाजीपुतळ्याच्या हितं लोणीडोसा खायला ग्येलो अस्तो तर बरं झालं असतं! फोटु बघून तर डायरेक खटक्यावर बोट..आमचा लाकूडबाबाच झाला न्हवं का. काय लिव्हलंय, क्काय लिव्हलंय, मायला.... आता ज्येवाय कधी बलावती त्येवडं सांग :)
की थेट हित्त युन , हात वल्ल करुन जायाच. अगदी शाकारी लोकांसाठन बी मीन त्योच मसाला वापरुन सोयाबीन्च्या वड्या आन बटाट घालुन्श्यान सांबारऽ बनीवलय. त्येवड खायाच आन मग काय सीमा लढा , त्ये कुठ कोकणी , कुठ कविता, मोडी आस काय बाय करत फिरा वाट्टल त्येव्हढ! काय खर हाय न्हव्ह? न्हाय कुटलबी काम कराया पयला पोटाला आदार पायजे , व्हय कनी? काय खोट बोलतुया काय म्या?
बास बास बास!! आक्षी कोल्लापूरात पोचलो. हक्काचा आग्रव, आन "बसा ओ...आला पाव्हणा जेवल्याबिगर जातो व्हय? लाज काडाय लागलासा व्हय आमची?" असा पक्का कोल्लापूरी पाहुणचार आठिवला.

मुंबईत कोकणी किंवा आगरी भाषा माहित होती .कोल्हापुरी भाषेचे सुंदर दर्शन घडवले . बाकी आणि काय विशेष लिहू. ही अशी काही पाक कृती पहिली कि वाटते . ''जिंदगीमे कूच पानें के लिये कूच खोना पडता है''( हा शिनेमाचा डायालोग आयुष्याचे ब्रीद वाक्य बनले ) ''आता वाटते कितना पाया और कितना खोया ''. आणि एक गाणे मुझको दिलसे येही शिकायत हे जो नही दिलको मिल सकता दिलको उसीकी चाहत हे आभसी जगतात का होईना आपले जेवण म्हणजे( महाराष्ट्रीयन) पहिले की मन तृप्त होते .

In reply to by निनाद मुक्काम …

नगरीनिरंजन Sun, 03/06/2011 - 10:29
>>''जिंदगीमे कूच पानें के लिये कूच खोना पडता है'' अश्लील भाषा वापरून चुकीच्या माहितीचा प्रसार करणार्‍या या प्रतिसादाचा सौम्य निषेध.

अरुण मनोहर Sat, 03/12/2011 - 12:28
खूप दिवसांनी प्रतिक्रीया दिली, कारण इतके दिवस उपास होता. आता उपास संपल्यावर लेख वाचला आणि हळहळ वाटली. उपासातच वाचला असता तर कोंबडी वाचली नसती. बाकी अपर्णाची कोल्हापुरी म्हणजे एका झटक्यात माणसाला गार करणारी. स्स! हाय! करता करता बोलती बंद!

पयल्या झुठलाच सांगुन ठिवतु , म्या कोंबडी वडा म्हंटल म्हनुन इथ्थ कोंबडी वडायला नक्का येउ! उगा सांगाया ग्येल म्हुन टांगाया न्हेयाच काम न्हाय! आदीच सांगतो ! ह्यो परदार्थ हाय. आमच्या कोलापुराकडचा.तसा बाकी ठीकानास्नी बी मिळतुया पर हित्त म्या कोलापुराची, म्हुनशान ह्ये जेवान बी कोलापुरीच! काय? आता इचारा ह्ये आवतन कशासाठन? न्हाय इचारा की. इचारा ! इचारा ! तर सांगतो. अगदी बैजवार सांगतो. टाइम हाय न्हव? मग बसा हिथ जरा. खांड हाय का सुपारी बिप्पारीच? काढा काढा. हांगश्शी! तर मला सांगा,आता दोन दिस झाल तुम्ही ह्या मराठी दिनात वणवण फिरायला लागलायसा, कुनी तुमच्या पोटा पान्याच काय इचारल? इचारल ?

मोडीलिपीची ओळख

जिप्सी ·

पैसा Tue, 03/01/2011 - 16:26
मोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तकं उपलब्ध आहेत. ती साधारण मॅजेस्टिकच्या पुस्तक प्रदर्शनात असतातच. मी घेतली आहेत, पण अजून नीट पाहिली नाहीत. आता नक्की बघेन.

स्पंदना Tue, 03/01/2011 - 16:48
अभ्यास पुर्ण लेख, उगा खायची बाब नव्हे मोडी बद्दल लिहिण म्हणजे. अभिनंदन जिप्सी! माझ्या माहेरी आहेत मोडी तली काही पुस्तके. मी तर बसुन एकदा ती अंकलपी शिकले होते अन मग काही कागद पत्रे वाचायचा खटाटोप केला होता. छान दिसते मोडी देवनागरी पेक्षा अस माझ वैयक्तीक मत आहे. एक धडा वाचायचे मी त्या पुस्तकातला. बाकी जिप्सी खुप दिवसांनी दर्शन झाल . बर वाटल भेटुन .

५० फक्त Tue, 03/01/2011 - 17:35
जिप्सि बाबा, ब-याच दिवसांनी आलात. खुप माहितीपुर्ण लेख घेउन आला आहात त्याबद्दल धन्यवाद. असेच येत रहा, लिहित रहा, आम्ही वाचत राहु. हर्षद.

धमाल मुलगा Tue, 03/01/2011 - 18:42
मोडीलिपी आमची एकदम आवडती. :) माझ्या आजोबांची सही मोडीत असायची. बँकेचे चेक, शेअर्सचे डिलिव्हरी चलन वगैरेंवरही मोडीतच सही असायची. त्यांच्याकडून माझी सही तयार करुन घेतली होती खरी. पण आता मात्र विसरलो ते विसरलोच. मोडीतला मला आवडणारा प्रकार म्हणजे आधी एक लांबलंचक रेघ ओढायची आणि नंतर एकेक लफ्फेदार, झोकदार अक्षर बोरु/शाईपेन न उचलता कागदावर उतरवताना बघायचं! कोणी जाणकार मोडी लिहिताना पाहणं हे सुध्दा एक झकास अनुभव देतं. वर पैसाताईनं ढवळे प्रकाशनच्या १ ते५ भाग असलेल्या अंकलिपी आणि पुस्तकांबद्दल सांगितलं आहेच. त्याशिवाय 'डायमंड पब्लिकेशन'चं 'तुम्हीच मोडी शिका' नावाचं पुस्तक गेल्या २ महिन्यांखाली अगदी अपघातानंच सापडलं.ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे निरनिराळे मोडी दस्ताऐवज छापलेले आहेत. एकदा मोडीतली अक्षरं लागायला लागली, की ह्या पुस्तकातलं एकेक पत्र वाचून पाहण्यात आणि अर्थ लावण्यात मस्त वेळ जातो. :) मिष्टर जिप्सी, मोडीच्या माहितीबद्दल मंडळ आपलं आभारी आहे. :)

In reply to by धमाल मुलगा

चिंतामणी Sun, 03/06/2011 - 01:17
ह्या लेखाबद्दल आणि............................................................................................................................................................................................................................................................................................. . . . . . . . . . . . . .. तुझ्या साध्या आणि निर्मळ प्रतिक्रीयेबद्दल.

In reply to by धमाल मुलगा

मालोजीराव Mon, 03/07/2011 - 18:51
माझ्या आजोबांची सही मोडीत असायची
माझ्यापण....आजोबा,पणजोबा पाटील होते...त्यामुळे त्यांच्याकडची कागदपत्र बघितलेली,कळत काई नव्हतं पण बघायला छान वाटायचं. तशी पुणेकर मिपाकरांना चांगली संधी आहे मोडी शिकायची....भारत इतिहास संशोधक मंडळात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मोडी वर्ग आहेत...जमेल त्यांनी लाभ घ्या. मोडी लिपीचा नमुना - हे पत्र सवाई माधवराव पेशवे यांनी सेनापती महादजी शिंदे यांस ३०-१२-१७८४ रोजी लिहिले होते (पत्र साभार- wikipedia)

पुष्करिणी Wed, 03/02/2011 - 01:53
माहितीपूर्ण लेख. मोडी ही शॉर्टहँड लिपी आहे, एका ओळीत लिहिताना कमीत कमी वेळा हात उचलावा लागतो. एकच वेलांटी आणि उकार, मोडीतली अक्षरं चक्रकार ( circular ) असतात, काना खालून वर देतात (म्हणजे पुढचं अक्षर पटकन लिहायला सोपं ), प्रत्येक अक्षराची सुरूवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते ..सध्या इतकंच आठवतय.

पंगा Sun, 03/06/2011 - 01:53
त्यामुळे शब्द / वाक्य कुठे तोडायचे हे सरावाने आणि तत्कालीन भाषेच्या अभ्यासाने कळू लागते. नविनच मोडी वाचणार्‍यांच्या संदर्भात एक विनोद नेहमी सांगितला जातो. "रस्त्यातनाचतमासेचाललेहोते" हे वाक्य नवशिका हमखास "रस्त्यात नाचत मासे चालले होते" असे वाचतो. मुळात ह्या वाक्याचा अर्थ "रस्त्यात नाच, तमासे चालले होते" असा असतो.
इतिहाससंशोधनासाठी मोडी वाचता येणे हे अगदी महत्वाचे आहे.
मोडी एकदा वाचायला येऊ लागली की आप्ल्यापुढें ५००-६०० वर्षांचा इतिहासच उघड होतो.
यावरून आठवले. मोडीत 'लो' आणि 'के' ही अक्षरे म्हणे एकसारखी लिहिली जातात. (ऐकीव माहिती. पडताळून पाहिलेली नाही.) तर कोणत्याशा बखरीत कोणत्याशा लढाईच्या संदर्भात कोणत्याशा सरदाराने '५०० लोकांचा फडशा पाडला' हे वाक्य एका हौशी इतिहासतज्ज्ञाने '५०० केकांचा फडशा पाडला' असे वाचून, त्यावरून 'त्या काळातसुद्धा केक खाण्याची पद्धत होती' असे अनुमान काढल्याबद्दलची किंवदंता ऐकण्यात आलेली आहे. (प्रस्तुत सरदाराने मारी आंत्वानेतच्या विधानातून स्फूर्ती घेतली असावी अथवा ते विधान फारच गंभीरपणे घेतले असावे अथवा यांपैकी कोणतेही एक अथवा दोन्ही, अशी आमची अटकळ आहे. चूभूद्याघ्या.)

आनंदयात्री Sun, 03/06/2011 - 22:23
छान. भाषेची ओळख अत्यंत आवडली. तुम्ही पण प्रीत मोहर सारखे मोडीचे क्लासेस सुरु करावे असे म्हणतो :)

मनिम्याऊ Sun, 03/06/2011 - 23:29
महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाद्वारे मोडीलिपी प्रशिक्षणाच्या ८ ते १५ दिवसीय कार्यशाळा दरवर्षी उन्हाळ्यात राबवण्यात येतात. या कार्यशाळांमध्ये मोडीलिपी लेखन-वाचन तसेच शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यवहार पदधतीची माहिती (कागद पत्रांचे वाचन करण्यासाठी आवश्यक संदर्भ) देण्यात येते. तसेच शेवटी परीक्षा असुन प्रमाणपत्र देखील देण्यात येते. एच्छुकांनी जरुर या योजनेचा लाभ घ्यावा. मोडीलिपीचा एक नमुना खाली देत आहे.

In reply to by मनिम्याऊ

नितिन थत्ते Mon, 03/07/2011 - 00:10
यातील ई व ज ही अक्षरे तंतोतंत सध्या गुजरातीत वापरली जाणार्‍या अक्षरांसारखीच आहेत. बरीच अक्षरे मराठीतल्या सध्याच्या (देवनागरी) अक्षरांपेक्षा इतकी वेगळी दिसतात की ही मराठीची कर्सिव्ह लिपी आहे की दुसर्‍याच भाषेची लिपी आहे असा प्रश्न पडावा. (इंग्रजी कर्सिव्ह लिपी जवळजवळ रोमन लिपीसारखीच असते). यावरून मनात आलेला प्रश्न: सध्या ज्या मराठेतर भाषा देवनागरी लिपी वापरतात त्यांपैकी कुठली भाषा मोडी लिपी वापरून लिहिली जाते का?

In reply to by नितिन थत्ते

पंगा Mon, 03/07/2011 - 03:40
बरीच अक्षरे मराठीतल्या सध्याच्या (देवनागरी) अक्षरांपेक्षा इतकी वेगळी दिसतात की ही मराठीची कर्सिव्ह लिपी आहे की दुसर्‍याच भाषेची लिपी आहे असा प्रश्न पडावा. (इंग्रजी कर्सिव्ह लिपी जवळजवळ रोमन लिपीसारखीच असते).
भाषा आणि लिपी यांचा काही अन्योन्यसंबंध असावा किंवा असायलाच हवा असे वाटत नाही. एकच कोंकणी भाषा (किंवा तिची प्रादेशिक रूपे) ही देवनागरी, रोमन, कन्नड आणि बहुधा मलयाळी लिपीसुद्धा वापरून लिहिली जाते, एकच सिंधी भाषा ही देवनागरी आणि अरबी लिपी वापरून लिहिली जाते, आणि एकच पंजाबी भाषा ही गुरुमुखी, देवनागरी आणि उर्दू लिपी वापरून लिहिली जाते, यावरून हे लक्षात यावे. (बहुधा पूर्व युरोप, भूतपूर्व सोविएत संघाचे काही भाग आणि मंगोलिया येथील काही भाषांचीही अशीच काहीशी परिस्थिती आहे असे वाटते. फार कशाला, माझ्या कॉलेजच्या दिवसांतील एक पिढ्यानपिढ्या तमिळनाडूस्थित मित्र आपल्या घरी 'मराठी' म्हणवली जाणारी परंतु कोणाही महाराष्ट्रवासीयास न समजण्यासारखी एक अगम्य भाषा - ही बहुधा तंजावर मराठी असावी असा कयास आहे - बोलत असे, तो घरी पत्रे लिहिताना या मराठीत परंतु तमिळ लिपी वापरून लिहीत असे, असे आठवते.) त्यामुळे, केवळ 'देवनागरी अक्षरांपेक्षा मोडीची अक्षरे दिसावयास वेगळी आहेत' या कारणास्तव मोडी ही मराठीकरिता कर्सिव लिपी म्हणून कोणे एके काळी आयुक्त होण्यास काहीही प्रत्यवाय दिसत नाही. बहुसंख्य तत्कालीन मराठी लेखकांनी 'एक सोय' या कारणास्तव तीस स्वीकृती देणे आणि तीस अंगीकारणे एवढेच त्याकरिता पुरेसे आहे. (तसेही, मोडीचा अपवाद वगळता मराठी ही नेहमी देवनागरीतच लिहिली जात होती किंवा कसे, याबद्दलही निश्चित कल्पना नाही.)

In reply to by पंगा

नितिन थत्ते Mon, 03/07/2011 - 10:09
इ आणि ई सध्याच्या गुजरातीत पण नाहीत. व्यंजनांसह येणार्‍या ई या स्वरांत र्‍हस्व आणि दीर्घ असतात. उदा. विजय, तेवीस (उच्चार त्रेवी) परंतु नुसता स्वर म्हणून येणार्‍या अक्षरांत एकच स्वर असतो. उदा. इदडा व मुंबई या दोन्हीत एकच ई असते. उच्चार मात्र र्‍हस्व आणिदीर्घ असतात. [अवांतर शंका : दासबोधात देवनागरी (बाळबोध) लेखन करण्याची भलामण आहे का?]

In reply to by नितिन थत्ते

पंगा Wed, 03/09/2011 - 10:21
[अवांतर शंका : दासबोधात देवनागरी (बाळबोध) लेखन करण्याची भलामण आहे का?]
याबद्दल निश्चित कल्पना नाही. मात्र तशी ती असल्यास, 'बाळबोध लिप्या या क्लिष्ट काव्यग्रंथादि प्रगल्भ रचनांकरिता सर्वस्वी असमर्थ' हे काही आधुनिक तज्ज्ञांचे मत वाचनात आलेले आहे, ते लक्षात घेता, याचा दोन दृष्टिकोनांतून विचार करता येईल. क्लिष्ट काव्यग्रंथादि रचना या ऐकायलावाचायला जरी कितीही भारदस्त वाटत असल्या, तरी त्या जर मुळात कोणाला कळल्या नाहीत, तर त्यांचा खरोखर काही उपयोग असतो काय? 'इट्स लाइक शेक्स्पियर. साउंड्ज़ ग्रेट, बट डज़ नॉट मीन अ थिंग.' ही उपमा पी.जी वुडहाउस यांनी ठिकठिकाणी वापरली आहे. (शेक्स्पियर बहुधा कर्सिव - आणि तेही अतिशय घाणेरड्या हस्ताक्षरात - लिहीत असावा, अशी आमची अटकळ आहे. अन्यथा, रोमन ही तशी बर्‍यापैकी बाळबोध लिपी आहे, असे वाटते. सबब, एवढी क्लिष्ट रचना त्या लिपीत होऊ नये.) निदान मराठी काव्यग्रंथादि रचनांबद्दल तरी पुढेमागे कोणी असे म्हणू नये, या उदात्त हेतूनेच समर्थांनी तशी सुचवण केली असू शकेल काय? मुळात लिपीच जर बाळबोध वापरली, तर कवीने किंवा ग्रंथकर्त्याने कितीही म्हटले, तरी तो क्लिष्ट रचना कशी काय करू शकणार? जे आडातच नाही, ते पोहर्‍यात येणे नाही. किंवा, वंशच खुंटला, तर वेणुवादनावरील निर्बंध हे आपोआप सुनिश्चित. त्यामुळे, समर्थांची ही दूरदृष्टी आणि पुढील पिढ्यानपिढ्यांतील मराठी रसिकांबद्दलची तळमळ ही वाखाणण्यासारखी आहे, हे मान्य करावेच लागेल. उलटपक्षी, दुसर्‍या बाजूने विचार करावयाचा झाल्यास, रचनेची क्लिष्टता आणि प्रगल्भता यांचा अन्योन्यसंबंध विसरून चालणार नाही. रचना जितकी क्लिष्ट, तितकी ती दुर्बोध, आणि जितक्या कमी लोकांना ती कळते, तितका तिचा वाचकवर्ग हा अधिक विरळ (किंवा, आजमितीस प्रचलित असलेल्या मराठीत व्यक्त करावयाचे झाल्यास, अधिक एक्स्क्लूज़िव), पर्यायाने रचना तितकी अधिक प्रगल्भ, हे समीकरण सर्वपरिचित असावे. तेव्हा, बाळबोध लिपीच्या समर्थनातून मराठी वाङ्मयाच्या क्लिष्टतेचे पंख छाटून तिची प्रगल्भतेकडे होणारी गरुडभरारी मुळातच रोखण्याच्या पापाचे समर्थ हे गुन्हेगार ठरतात. समर्थांच्या समर्थनामुळे मराठी आपल्या प्रगल्भतेची अपेक्षित उंची कदाचित कधीच गाठू शकणार नाही. मराठीप्रेमींच्या पिढ्या समर्थांना याबद्दल कधीही क्षमा करू शकणार नाहीत. (रचना नुसत्याच समजून काय चाटावयाच्या आहेत? त्यांवर प्रगल्भतेचे शिक्कामोर्तब झाल्याशिवाय काय उपयोग?) अतिअवांतर: जगात चिनी लिपी हीच काय ती सर्व क्लिष्ट, गहन, वैचारिक, प्रगल्भ एवंगुणविशिष्ट रचनांसाठी एकमेव समर्थ लिपी आहे, असे आजकाल आमचे प्रांजळ मत झाले आहे. बाकीच्या सर्व (तुलनेने खूपच बाळबोध) लिप्या या फार फार तर 'लहान माझी बाहुली' किंवा 'बा बा ब्ल्याक शीप' (किंवा फारच झाले तर 'फ्रेरऽ ज्याकऽ') इतपत रचनांसाठी ठीक.

In reply to by पंगा

धमाल मुलगा Mon, 03/07/2011 - 19:13
मोडीलिपीमध्ये र्‍हस्व दिर्घाचा फरक केला जात नसे/नाही. तसेच, मोडीमध्ये वाक्य सलग लिहिले जाते. कुठे तोडायचे ते वाचणाराने अंदाजाने/अभ्यासाने ठरवायचे.

चित्रा Mon, 03/07/2011 - 05:54
माहिती आणि प्रतिसादही उत्तम आहेत. धन्यवाद. ही लिपी काही अक्षरांबाबतीत अगदी सध्याच्या अक्षरांशी जुळते. मोडी लिपी का मागे पडली असावी असा प्रश्न पडला. हे ब्रिटिशांनी केले का हळूहळू मराठीसाठी देवनागरी लिपीच प्रमाण झाली? किंबहुना एखादी लिपी का मागे पडत असावी?

In reply to by चित्रा

पंगा Mon, 03/07/2011 - 07:57
हे ब्रिटिशांनी केले का हळूहळू मराठीसाठी देवनागरी लिपीच प्रमाण झाली?
ब्रिटिशांनी बहुधा केले नसावे. कारण ब्रिटिश जमान्यात वाढलेल्या पिढीस पावकी, निमकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि अकरकीप्रमाणेच मोडी लेखनवाचन (किमान कित्ता गिरवण्याइतपत परिचयापुरतेतरी) हेदेखील प्राथमिक अभ्यासक्रमात असावे, असे वाटते. (खात्री नाही.) हे सगळे प्रकार बहुधा स्वातंत्र्योत्तर काळात बंद झाले असावेत, अशी शंका आहे. (लहानपणी पुण्यात - आणि नक्की आठवत नाही, पण बहुधा मुंबईत गिरगांवात किंवा दादरलासुद्धा - एखादी अपवादात्मक का होईना, पण मोडी लिपीतली दुकानावरची पाटी पाहिल्याचे आठवते. बहुधा जुन्या पिढीतला उरलासुरला दुकानदार असावा. 'फेमस राजापुरी पंचे' अशी काहीतरी पाटी होती. मला अर्थातच वाचता येण्याचा प्रश्न नव्हता, पण विचारणा केल्यावर आईने वाचून दाखवली होती, असे आठवते.) (अतिअवांतर: 'दुकानाच्या पाट्या मराठीत असल्याच पाहिजेत'च्या राज्यात मोडी लिपीतील पाट्या चालून जाव्यात काय?)

पैसा Mon, 03/07/2011 - 20:31
मी आंजावर वाचलेलं/आई आजीकडून ऐकलेलं दोन्हीची सरमिसळ करून काही लिहितेय इथे. पूर्वी देवनागरीला "बालबोध" असं नाव महाराष्ट्रात होतं. म्हणजेच मोडी शिकणं हे बहुतेक काही कौशल्याचं काम समजलं जात होतं. नागरी लिपी हा मोडी आणि गुजराती दोन्ही लिप्यांचा उगम असल्यामुळे त्यांच्यात् साम्य दिसतं का? देवनागरी हे नागरी लिपीचं उत्क्रांत स्वरूप आहे असं विकीवर वाचलं होतं. देवनागरी वापरात येण्यापूर्वीच बहुतेक मोडी वापरात असावी. त्यामुळे मोडी ही देवनागरी लिपीची रनिंग लिपी एवढ्याच अर्थाने असावी की कागदावर लिहायला हात टेकला की वाक्य संपेपर्यंत उचलावा लागत नाही. वर उल्लेख केलेले पावकी, निमकी, पाउणकी, अडीचकी वगैरे पाढे आमच्या अंकलिपीत सुद्धा होते. अगदी १९७२ साली. पण मोडी त्याच्या आधीच वापरातून हद्दपार झाली. याचं कारण बहुधा छापील लिखाणात वाढ हे असावं. म्हणजे असं की शिळाप्रेसच्या काळात मोडीचा ब्लॉक करणं शक्य होतं. पण नंतर खिळे जुळवणीच्या छापखान्यांमधे मोडी खिळे वापरणं शक्य नव्हतं, ते त्याच्या स्वर-व्यंजन आणि जोडाक्षर जोडणीमुळे. मोडीत वेगेवेगळ्या अक्षरांसाठी या जोडण्या वेगेवेगळ्या प्रकारे येतात असं दिसतंय. आंजावर उपलब्ध मोडी फॉण्ट च्या कर्त्याने सुद्धा या फॉण्टच्या वापराला मर्यादा आहेत असं लिहिलेलं आठवतंय. पण ऊर्दू, गुजराती यांचे फॉण्ट्स जसे उपलब्ध आहेत तसे कोणीतरी मोडीचे निर्दोष फॉण्ट्स तयार करू शकेल का? त्यामुळे निदान काही लोक तरी मोडी परत शिकतील!

धनंजय Mon, 03/07/2011 - 20:52
छान! केशव भिकाजी ढवळे यांच्या पुस्तकमालेतील पहिली तीन नुकतीच वाचायला मिळाली. आवडली. काही अक्षरांचे गुजरातीशी साम्य आहे खरे. यापैकी काही समांतर उत्क्रांतीसुद्धा असावी. उदाहरणार्थ अक्षरांची दांडी वरून-खाली ऐवजी खालून वर नेण्याचा निर्णय केला, की "ज" आणि "न" यांची रूपे तयार होतातच. मात्र यांच्यापैकी "ज"चा हा आकार गुजरातीमध्ये दिसतो, "न"चा नाही. मोडीत एकदा का "खालून-वर-दांडी" वगैरे नियम केला, तर जितक्या अक्षरांना लागू होईल, तितक्यांना लागू होतो. ("भ"ला लागू नाही, कारण त्याची दांडी खालून वर नेली तर "ना"सारखा दिसतो. असे अपवाद सोडून.) हेमाडपंतांनी मोडी लिपी बनवली, असे म्हणतात. त्या काळात बाळबोध लिपी कशी दिसत असे? आजच्या देवनागरीसारखी नसणार. आजच्या देवनागरी आणि गुजरातीची ती जी काय पूर्वज लिपी होती, ती यादवांच्या शिलालेखांत सापडू शकेल.

नितिन थत्ते Mon, 03/07/2011 - 21:53
मोडी लिपीची ओळख करून दिल्याबद्दल जिप्सी यांचे आभार. मोडी लिपी जुन्या कागदपत्रांच्या अभ्यासासाठी शिकणे गरजेचे आहे. तसा अभ्यास ज्यांना करायचा आहे ते शिकतीलच. उगाच आपले सगळ्यांनी मोडी शिकावी आणि वापरावी याला काही अर्थ नाही. संस्कृत टिकवण्याच्या प्रयत्नांसारखाच जुनं आहे ते टिकलं पाहिजे असा प्रकार आहे. मग ब्राह्मी आणि खरोष्टी लिपी का नाही शिकायची? बरेच शिलालेख ब्राह्मी लिपीत असावेत. @पैसा >>कोणीतरी मोडीचे निर्दोष फॉण्ट्स तयार करू शकेल का? त्यामुळे निदान काही लोक तरी मोडी परत शिकतील! हे वाक्य मोडीच्या मूळ उद्देशाशी विसंगत नाही का? म्हणजे हाताने भराभर लिहिणे. संगणकावर मोडीमधून कशाला लिहायचे? [स्वगत : गारगोटीवर गारगोटी आपटून विस्तव कसा पेटवावा याचे क्लास काढावे का? नाहीतरी तोही आपला मानवजातीचा जुना ठेवा आहे.]

In reply to by अवलिया

नितिन थत्ते Wed, 03/09/2011 - 11:04
येताय का गारगोटीने विस्तव कसा पेटवावा हे शिकायला? ज्योक्स अपार्ट.... जुन्या कागदपत्रांच्या अभ्यासाखेरीज आज मोडी लिपी सर्वांनी का शिकायची हे कळले तर बरे होईल. केवळ जुन्याचे प्रेम याखेरीज सर्वांनी मोडी शिकावी असे म्हणण्यास किंवा आज लोक मोडी शिकत नाहीत म्हणून दु:ख करण्यास काहीही कारण दिसत नाही.

In reply to by नितिन थत्ते

अवलिया Wed, 03/09/2011 - 12:11
धागा मोडीचा असतांना संस्कृत मधे आणले त्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा! मोडी ही एक लिपी आहे. आणि जबरदस्तीने तिला १९५० पासुन बंद पाडले. तत्पुर्वी मोडीलिपीच्या विशिष्ट अशा र्‍हस्व दिर्घ विरहित (उकार आणि इकार) स्वरुपामुळे मराठी लेखनात केवळ वेलांटी आणि उकार वेगळे आहेत म्हणून लेखन गौण मानले जात नव्हते. जो प्रकार हल्ली हल्ली अनेक स्वयंघोषित वैयाकरणी करत असतात. तो टाळण्यासाठी मोडी सारखी लिपी प्रचलित असती तर अनेकांना मराठी विषयात शाळेत अधिक गुण मिळाले असते आणि मराठीची गोडी वाढली असती. विषय मोठा आहे, माझी मती सामान्य आहे. असो.

In reply to by अवलिया

नितिन थत्ते Wed, 03/09/2011 - 13:07
>>जबरदस्तीने तिला १९५० पासुन बंद पाडले ठीक आहे त्याने काही तोटा होण्याची शक्यता वाटत नाही. >>तत्पुर्वी मोडीलिपीच्या विशिष्ट अशा र्‍हस्व दिर्घ विरहित (उकार आणि इकार) स्वरुपामुळे मराठी लेखनात केवळ वेलांटी आणि उकार वेगळे आहेत म्हणून लेखन गौण मानले जात नव्हते. तसे र्‍हस्व दीर्घाबाबत सैल असलेले नियम देवनागरीतही अंमलात आणले जाऊ शकतात. >>जो प्रकार हल्ली हल्ली अनेक स्वयंघोषित वैयाकरणी करत असतात. त्यांचा निषेध. :) * >>तो टाळण्यासाठी मोडी सारखी लिपी प्रचलित असती तर अनेकांना मराठी विषयात शाळेत अधिक गुण मिळाले असते आणि मराठीची गोडी वाढली असती. असहमत. माझे लेखन वैयाकरण लोकांच्या दृष्टीने शुद्धच असे. पण त्याच्या जोरावर मला चांगले गुण कधीही मिळाले नाहीत. :( मराठीच्या पेपरात गुण मिळवण्यासाठी एक किंवा तीन ओळीत लिहिता येणारे उत्तर २० ते २५ ओळींएवढे लिहिण्याचे कौशल्य लागते. :( ते ज्यांना जमते त्यांना जास्त गुण मिळतात. (येथे तसे गिगाबायटी लिहू शकणारी अनेक मंडळी आहेत) ;) शुद्धलेखन ही मार्क मिळण्यास आडकाठी करणारी बाब नाही. *शुद्ध (प्रमाणरूपात) लिहिले जावे** असे माझे मत आहे आणि मी स्वतः शक्य तितके शुद्ध (प्रमाणरूपात) लिहितो. ** पानी हे पाणीपेक्षा शुद्ध आहे आणि "म्या केले" हे "मी केले" यापेक्षा शुद्ध आहे असे माझे मत आहे.

In reply to by नितिन थत्ते

अवलिया Wed, 03/09/2011 - 13:51
>>>>ठीक आहे त्याने काही तोटा होण्याची शक्यता वाटत नाही. तुमच्या मताचा आदर आहेच. >>>तसे र्‍हस्व दीर्घाबाबत सैल असलेले नियम देवनागरीतही अंमलात आणले जाऊ शकतात. तसे होतांना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस हे असेच लिहा ते तसेच लिहा असे शुद्धलेखन नियमावलींची बाडे मराठीच्या संवर्धनासाठी या गोंडस नावाखाली आदळली जात आहेत. >>>शुद्धलेखन ही मार्क मिळण्यास आडकाठी करणारी बाब नाही. तुमच्या मताचा आदर आहेच.

In reply to by नितिन थत्ते

पंगा Wed, 08/03/2011 - 21:28
असहमत. माझे लेखन वैयाकरण लोकांच्या दृष्टीने शुद्धच असे. पण त्याच्या जोरावर मला चांगले गुण कधीही मिळाले नाहीत. Sad मराठीच्या पेपरात गुण मिळवण्यासाठी एक किंवा तीन ओळीत लिहिता येणारे उत्तर २० ते २५ ओळींएवढे लिहिण्याचे कौशल्य लागते. Sad ते ज्यांना जमते त्यांना जास्त गुण मिळतात. (येथे तसे गिगाबायटी लिहू शकणारी अनेक मंडळी आहेत) Wink शुद्धलेखन ही मार्क मिळण्यास आडकाठी करणारी बाब नाही.
'मराठीच्या पेपरात गुण मिळवण्यासाठी एक किंवा तीन ओळीत लिहिता येणारे उत्तर २० ते २५ ओळींएवढे लिहिण्याचे कौशल्य लागते' या भागाशी सहमत आहे. मात्र, त्याच संदर्भात 'शुद्धलेखन ही मार्क मिळण्यास आडकाठी करणारी बाब नाही' याबाबत साशंक आहे. मराठीच्या पेपरात गिगाबायटी उत्तरे वाक्यावाक्यागणीक शुद्धलेखनाच्या धडधडीत चुकांसहित लिहून पहावीत. पेपरतपासनिसास मराठीत ज्याला 'कॉन्शन्स' म्हणतात ते ('सदसद्विवेकबुद्धी' हा शब्द येथे चपखल बसेलच, याबद्दल खात्री नाही. 'कॉन्शन्स' हा शब्द येथे 'मनाला खाणारी एक वस्तू' अशा अर्थी घ्यावा.) आणि मराठी शुद्धलेखनाबद्दलचे ज्ञान, या दोन्ही गोष्टी असल्यास गुण तरीही - आणि भरपूर प्रमाणात - कापले जावेत, असे वाटते. (निदान मी शाळेत असताना आमच्या मास्तरमंडळींनी तरी कापले असते, असे वाटते. अर्थात, शुद्धलेखनाबद्दलच्या वाढत्या अनास्थेच्या - आणि (बहुधा) टेंप्लेटवार तपासणीच्या - आजच्या काळात वरील दोन्ही गोष्टी तपासनिसाठायी सापडणे उत्तरोत्तर अधिकाधिक दुरापास्त वाटते, सबब आजच्या काळात आपल्या म्हणण्यात तथ्य असू शकेलही. चूभूद्याघ्या.)

In reply to by नितिन थत्ते

"....[स्वगत : गारगोटीवर गारगोटी आपटून विस्तव कसा पेटवावा याचे क्लास काढावे का? नाहीतरी तोही आपला मानवजातीचा जुना ठेवा आहे.]..." ~ झटक्यात "कडेमणी कम्पाऊंड, माळमड्डी रोख, धारवाड' येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य केलेले 'स्वामी' आठवले. त्यानी एक ठिकाणी म्हटले होते.....त्यांच्या एका विद्यार्थिनीने आयत्या वेळी स्पेशलला 'मराठी' हा विषय न घेता अन्य घेतल्याचे समजल्यावरून त्या ग्रुपला स्टाफ रूममध्ये बोलाविले होते. मराठी सोडून तो दुसरा 'किराणा-भुसारी' विषय निवडण्याचे कारण विचारल्यावर त्या मुलीने सांगितले, "तो विषय स्कोरिंगला चांगला आहे...". ते ऐकून जी.ए. सात्विक संतापाने उद्गारले, "व्वा ! म्हणजे उद्या विद्यापीठाने कोंबडीची पिसे मोजण्याचा विषय ठेवला तर तो स्कोरिंगला चांगला म्हणून निवडणार की काय?" गारगोटी....ग्रेट इन्द्रा

In reply to by नितिन थत्ते

पंगा Tue, 08/09/2011 - 01:41
इतिहासाच्या अभ्यासाबद्दल असेच म्हणता येईल का? बसू देत ज्यांना आपटायचेय त्यांना गारगोटीवर गारगोटी आपटत नि विस्तव पेटवत...

rajeshkhilari Wed, 08/03/2011 - 01:29
मोडी लिपी विषयी ताज्या घडामोडींकरीता या समूहास नियमीत भेट द्या - https://www.facebook.com/groups/123786634305930/?ap=1

सुशान्त Wed, 08/03/2011 - 16:55
मोडी लिपीचा वापर हा प्रामुख्याने प्रशासकीय व्यवहारात होत असलेला आढळतो. हिशोब लिहिणे, करारपत्रं, आज्ञापत्रं, अशा औपचारिक व्यवहारासाठी ही लिपी महाराष्ट्रात वापरण्यात येत होती. मोडीचा शोध हेमाडपंत ह्या यादवराजांच्या प्रधानाने लावला असं सांगण्यात येत असलं तरी यादवकाळात मोडी लिपीचा वापर किती होता ह्याविषयी शंका आहे. यादवकाळातच महानुभाव संप्रदायाचं विपुल साहित्य लिहिलं गेलं. ते पंथीयांपुरतं मर्यादित ठेवण्यासाठी त्यांनी काही कूट लिप्या तयार केल्या. त्या लिप्या देवनागरी चिन्हांनाच वेगळे उच्चारसंकेत देऊन रचल्या होत्या. उदा. द = क ह्याप्रमाणे. मोडी लिपीचा वापर यादवकाळानंतरच खऱ्या अर्थी वाढलेला आढळतो. मोडीतला शिवकालापूर्वीचा शिलालेख उपलब्ध आहे का हे माहीत नाही. रायगडावर 'सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटलकर' असा लेख जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीत कोरलेला आढळतो. पण इतर काही शिलालेख आहेत का हे मला माहीत नाही. शिवकालातही काव्यरचनेसाठी मोडी लिपीचा वापर होत नसावा. "मराठा प्रांतात व्यावसायाशी संबंधित लेखनात मोडी लिपीचा सर्वत्र वापर होतो पण विद्वानांत (umong men of learning) देवनागरी सर्वात प्रसिद्ध आहे" असं विल्यम केरीने आपल्या इंग्रजीतून लिहिलेल्या मराठी व्याकरणाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे. (केरी, विल्यम; ग्रामर ऑफ द मराठा लॅंग्वेज; श्रीरामपूर; १८०५). सध्या मोडी लिपी शिकणाऱ्यांपैकी बरेचजण उत्पन्नाचं एक साधन म्हणूनही मोडी लिपी शिकतात असं आढळतं. इंग्रजांच्या काळातही बरीचशी कागदपत्रं (विशेषतः मालमत्तेसंबंधीची कागदपत्रं) ही मोडी लिपीतून लिहिलेली आहेत. त्यामुळे मालमत्तेसंबंधी काही वाद उद्भवल्यास पुरावा म्हणून ह्या कागदांचा वापर होतो. त्यासाठी मोडीतला मजकूर मराठीत लिप्यंतरणारे लोक लागतात. ते त्यासाठी घसघशीत पैसे आकारतात. पण हे कौशल्य कमावण्यासाठी अर्थातच कष्टही तितकेच आहेत. शिवकालीन मोडी वाचण्यासाठी त्या काळातील भाषेचा, त्यातही परिभाषेचा (विशिष्ट संकेतांचा), संज्ञांचा चांगला परिचय असावा लागतो. कारण मोडी लिपीत पदं सलग लिहिलेली असल्याने पद कुठे तोडायचं हे कळत नाही. तसंच लिहिण्यातली वेगवेगळी वळणं (उदा. लपेटी) परिचयाची असावी लागतात. वर संक्षेपांचा उल्लेख आला आहेच. ते संक्षेप संदर्भाने उलगड़ावे लागतात. हीच गोष्ट वेगवेगळ्या काळातील मजकुरासंबंधी आहे. मोडी लिपीचा टंक निर्माण व्हावा ही इच्छा मोडीच्या मूळ उद्देशाशी विसंगत का वाटावी? तसं पाहता सर्वच लिप्या ह्या हाताने लिहिण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. मग त्यांचे टंकही मूळ उद्देशाशी विसंगत मानायचे का? इंग्रजीसाठीही कर्सिव्ह वळणाच्या अक्षरांचे टंक आहेत. मोडीसाठी टंक उपलब्ध असेल तर मोडी शिकण्या-शिकवण्याचा उद्देश असणाऱ्यांची सोयच होणार आहे. देवनागरीतील ऱ्हस्वदीर्घाला कंटाळलेल्या लोकांना मोडी बरी वाटते. अलीकडे श्री. शुभानन गांगल हे मोडी लिपीची बरीच भलावण करताना आढळतात ह्याचं मुख्य कारण मोडी लिपीत (इकार-उकारांच्या) ऱ्हस्व आणि दीर्घ ह्या भेदासाठी वेगवेगळी चिन्हं नाहीत हेच आहे. मराठी लिहिताना देवनागरीत अशी वेगवेगळी चिन्हं असू नयेत असं मत जुनंच आहे. वि. भि. कोलते, सदाशिव आठवले ह्या मंडळींनी अशा सूचना केलेल्या आहेत. शुद्धलेखनाचे शून्य नियम सांगणाऱ्या गांगलांनीही सगळे इकार दीर्घ आणि सगळे उकार ऱ्हस्व लिहावेत असा प्रस्ताव मांड़ला आहे. पण मग वृत्तबद्ध कवितांत येणाऱ्या ऱ्हस्व-दीर्घ इकार-उकारांसाठी वेगळी लिपिचिन्हं वापरायची का? लिपीतील काही संकेतांचा भाग हा काही लोकांना सोयीचा तर काहींना गैर सोयीचा वाटतच राहतो.

सुनील गुरुवार, 08/04/2011 - 10:44
चांगली माहिती. अवांतर - रायगडावर 'सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटलकर' असा लेख जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीत कोरलेला आढळतो अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या दाराशी 'सेवेचे ठाई तत्पर पाटील प्रभाकर', असा देवनागरी लिपीतील बोर्ड काही वर्षांपूर्वीपर्यंत होता. आता आहे किंवा नाही हे ठाऊक नाही. (अति अवांतर - प्रभाकर पाटील हे रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष होते!).

इंग्रजी भाषेला ज्याप्रमाणे जलद लिहिण्याची स्वतंत्र लिपी आहे, ज्याला आपण 'कर्सिव्ह' म्हणतो त्या प्रमाणेच मराठीलादेखील देवनागरीशिवाय मोडी ही एक स्वतंत्र लिपी आहे. मोडी लिपीला सुमारे ८०० वर्षांचा इतिहास आहे. यादवांचा प्रधान हेमाडपंत ह्याच्या काळात या लिपीचा उगम झाला असा एक सर्वसाधारण ठोकताळा आहे, पण मोडीलिपी त्याहीपेक्षा जुनी असण्याचा संभव नाकारता येत नाही. परंतु हेमाडपंतांच्या काळापासून म्हणजेच यादवांच्या राजवटीत मोडीलिपीचा वापर सरकारी दप्तरात होऊ लागला. हळूहळू सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातसुध्दा मोडी आली.देवनागरी म्हणजेच बाळबोध पेक्षा मोडीत भराभर लिहीता येते.