बऱ्याच महिन्यानंतर शर्माजी(काल्पनिक नाव) बिंदापूरच्या चौकात वर्तमानपत्र वाचताना दिसले. शर्माजीचे वय 80 ते 85च्या मध्ये असेल. जेव्हा मी 1988 मध्ये उत्तम नगर भागात राहावयास आलो तेव्हापासून शर्माजींना पांढऱ्या दाढीचा बघत आलो आहे. शर्माजींचा व्यवसाय प्रॉपर्टी डीलरचा होता. याशिवाय ते काँग्रेसचे खंदे प्रचारक होते. त्यांच्या घरात नेहरू आणि इंद्राजी सोबत त्यांचे अनेक फोटो होते. निवडणुकीच्या काळात तर त्यांचा अंगात भूत संचारत असे. अनेक बूथांची व्यवस्था ते जातीने बघत असे. त्यात ते भरपूर कमिशन ही बनवत असे, असे लोक म्हणतात. ते स्वतः अनेकदा मला म्हणत, जोपर्यंत त्यांच्या अंगात दम होता या भागातून काँग्रेस कधीच हरली नाही. त्यांचे म्हणणे ही खरे होते. मुकेश शर्मा सलग तीन वेळा या भागातून विधायक निवडल्या गेले होते.
औपचारिक विचारपूस झाल्यावर मी त्यांना छेडण्यासाठी म्हणालो आता तर आपने एमसीडी मध्ये ही झाडू लावला. शर्माजी म्हणाले पटाईत, खरे म्हणाल तर यावेळी काँग्रेसला पुन्हा दिल्लीत वापसीचा बढ़िया मौका होता, पण मौका हातचा गेला. मी म्हणालो कश्यावरून?? ते म्हणाले भ्रष्टाचाराच्या आरोपात सत्येंद्र जैन समेंत अनेक आपिये जेल मध्ये आहे. दिल्ली दंग्यात आप नेत्यांनी पुढाकार घेतला होता, त्यात ही अनेक आपिये जेल मध्ये आहे. आपच्या या कृत्यामुळे दंगा ग्रस्त भागातील विशेषकरून मुस्लिम समाज हा आपपासून नाराज आहे. दिल्लीत १५ टक्याहून जास्त मुस्लिम समाज आहे. काँग्रेसचे जिंकणारे ९ पैकी ७ मुस्लिम उम्मीदवार आहेत. अर्थात जिथे काँग्रेसचा थोडा बहुत प्रचार होता तिथे मुस्लिम मते काँग्रेसला मिळाली आहे. भारत जोडो यात्रा ८ डिसेंबर नंतर ही सुरू करता येत होती. लोकसभा निवडणूकीला भरपूर वेळ आहे. त्या ऐवजी राहुल गांधींनी ऑक्टोबर पासून एक महिना दिल्लीत पदयात्रा केली असती आणि रोज फक्त एक सभा घेतली असती तरीही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असता. काँग्रेसचा कार्यकर्ता आणि मतदार पुन्हा परतला असता. विशेषकरून मुस्लिम मते पुन्हा काँग्रेस कडे वळली असती. काँग्रेस जिंकली नसती तरी दुसऱ्या क्रमांकावर निश्चित राहिली असती. ज्या राज्यांत काँग्रेस आणि भाजपात संघर्ष असतो तिथे काँग्रेसला पुन्हा सत्तेत येते. जसे आता हिमाचल आम्ही (जोर देऊन) पुन्हा जिंकला. आपला तिथे 1 टक्का मते ही मिळाली नाही. पण ज्या राज्यांत तिसरी पार्टी सत्तेत येते तिथे भाजप तिथे नंबर दोन होते. काँग्रेसला पुन्हा सत्तेत येणे शक्य होत नाही. जसे उत्तर प्रदेश बिहार आणि बंगाल इत्यादी ठिकाणी झाले. गुजरात मध्ये ही महिनाभर राहुलजी फिरले असते आणि रोज सभा घेतल्या असत्या तर तिथे ही काँग्रेसला ५० हून जास्त जागा मिळाल्या असत्या. आपला तिथे 9 टक्के मते मिळाली नसती. राहुलची २०२४ची दावेदारी ही मजबूत झाली असती. 2024च्या युतीसाठी ही काँग्रेसचे परडे जड झाले असते. राहुलजी मोदींना टक्कर देऊ शकतात हा विश्वास निर्माण झाला असता. शेवटी दोन चार आई बहिणींच्या शिव्या खरेगे इत्यादींना देत, शर्माजी म्हणाले, या संघींनी निवडणुकीचे रणांगण सोडून आमच्या सेनापतीला भारत जोडो यात्रेच्या हनिमून मध्ये पाठवून दिले. काँग्रेसच्या दारुण पराभवाचे शर्माजींना किती दुःख झाले हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शर्माजींच्या बोलण्यातले तथ्य मलाही पटत होते. दिल्ली गुजरातचा मोर्चा लढविणे भारत जोडो यात्रापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण होते हे कॉँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना कळत होते पण सल्लागारांना का कळले नाही, हा प्रश्नचिन्ह आहे. बाकी यात्रेचे म्हणाल तर यात्रा कौरव पांडव पर्यन्त पोहचली आहे. शर्माजींच्या भाषेत राहुलचे भाषण लिहाणारे निश्चित संघी आहेत. बाकी सहज आठवले त्याकाळचे गुजराती अडाणी(सोन्याची द्वारकेचा राजा कृष्ण) पांडव सोबत होते.
प्रतिक्रिया
12 Jan 2023 - 4:18 pm | चित्रगुप्त
त्या शर्माजींच्या मते कोण आहेत राहुलचे सल्लागार ?
"यात्रा कौरव पांडव पर्यन्त पोहचली आहे"... म्हणजे नक्की काय, हे समजले नाही.
12 Jan 2023 - 9:34 pm | शशिकांत ओक
लहानपणी धडा होता...
बाप लेक आणि गाढव...
वाटेत जे भेटत होते त्यांचा सल्ला ऐकून तसे तसे वागत राहिले. शेवटी गाढव गमावले.
मनापासून विचार करून सारासार विवेक करून ठरवावे. आपल्या आधीच्या लोकांच्या अनुभवातून शिकले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मकेंद्रित विचार सोडून सर्व जनतेचा, देशाचा विचार करून विकास कसा करायचा याची चिंता करायला हवी. बाकी हळूहळू जमा होतील.
12 Jan 2023 - 9:34 pm | शशिकांत ओक
लहानपणी धडा होता...
बाप लेक आणि गाढव...
वाटेत जे भेटत होते त्यांचा सल्ला ऐकून तसे तसे वागत राहिले. शेवटी गाढव गमावले.
मनापासून विचार करून सारासार विवेक करून ठरवावे. आपल्या आधीच्या लोकांच्या अनुभवातून शिकले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मकेंद्रित विचार सोडून सर्व जनतेचा, देशाचा विचार करून विकास कसा करायचा याची चिंता करायला हवी. बाकी हळूहळू जमा होतील.
12 Jan 2023 - 9:34 pm | शशिकांत ओक
लहानपणी धडा होता...
बाप लेक आणि गाढव...
वाटेत जे भेटत होते त्यांचा सल्ला ऐकून तसे तसे वागत राहिले. शेवटी गाढव गमावले.
मनापासून विचार करून सारासार विवेक करून ठरवावे. आपल्या आधीच्या लोकांच्या अनुभवातून शिकले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मकेंद्रित विचार सोडून सर्व जनतेचा, देशाचा विचार करून विकास कसा करायचा याची चिंता करायला हवी. बाकी हळूहळू जमा होतील.
12 Jan 2023 - 9:35 pm | शशिकांत ओक
लहानपणी धडा होता...
बाप लेक आणि गाढव...
वाटेत जे भेटत होते त्यांचा सल्ला ऐकून तसे तसे वागत राहिले. शेवटी गाढव गमावले.
मनापासून विचार करून सारासार विवेक करून ठरवावे. आपल्या आधीच्या लोकांच्या अनुभवातून शिकले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मकेंद्रित विचार सोडून सर्व जनतेचा, देशाचा विचार करून विकास कसा करायचा याची चिंता करायला हवी. बाकी हळूहळू जमा होतील.
12 Jan 2023 - 9:36 pm | शशिकांत ओक
लहानपणी धडा होता...
बाप लेक आणि गाढव...
वाटेत जे भेटत होते त्यांचा सल्ला ऐकून तसे तसे वागत राहिले. शेवटी गाढव गमावले.
मनापासून विचार करून सारासार विवेक करून ठरवावे. आपल्या आधीच्या लोकांच्या अनुभवातून शिकले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मकेंद्रित विचार सोडून सर्व जनतेचा, देशाचा विचार करून विकास कसा करायचा याची चिंता करायला हवी. बाकी हळूहळू जमा होतील.
12 Jan 2023 - 9:37 pm | शशिकांत ओक
लहानपणी धडा होता...
बाप लेक आणि गाढव...
वाटेत जे भेटत होते त्यांचा सल्ला ऐकून तसे तसे वागत राहिले. शेवटी गाढव गमावले.
मनापासून विचार करून सारासार विवेक करून ठरवावे. आपल्या आधीच्या लोकांच्या अनुभवातून शिकले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मकेंद्रित विचार सोडून सर्व जनतेचा, देशाचा विचार करून विकास कसा करायचा याची चिंता करायला हवी. बाकी हळूहळू जमा होतील.
12 Jan 2023 - 9:59 pm | शशिकांत ओक
म्हणून पुन्हा पुन्हा दाबून पाहिले तर ते असे झाले!
12 Jan 2023 - 10:10 pm | चित्रगुप्त
हॅ..हॅ..हॅ.... हे लईच झालं राव. त्ये काय समर्थ रामदासस्वामी हैत का, सारासार विचार-विवेकाची कास धरून "चिंता करितो विश्वाची" म्हणणारे ??? काय तरी सोप्पं, बंटी, मुन्नू, पप्पू, बबली वगैरेंना समजंल, असं सांगा की.
12 Jan 2023 - 11:07 pm | श्रीगुरुजी
राहुलसारखे विद्वान स्वयंभू व स्वयंघोषित असतात. त्यांना कोणत्याही सल्लागाराची गरज नसते. त्यामुळेच राहुलचं आणि कॉंग्रेसचं हे असं झालंय.
13 Jan 2023 - 3:22 am | साहना
माझ्या आईचा एक जुना मिक्सर होता. वापरून वापरून त्याची बटणे पार झिजून गेली होती, प्लास्टिक फुटून गेले होते पण तिला तोच प्रिय. मोटर अनेक वेळा रिपेयर करून आणली होती. मग एक दिवस तो मिक्सर मोडला आणि मोटार रिपेरवाल्याने. "हा मिक्सर फेकून द्यायचा वेळ आला आहे, ह्याला तुम्ही जपान मध्ये नेले तरी हा पुन्हा जिवंत होणे नाही" असे सांगितले आणि शेवटी आम्ही नवीन मिक्सर आणला
राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टी त्या मिक्सर प्रमाणे आहेत. ह्या नाहीतर त्या कारणाने हि पार्टी कशी बशी तग धरून असली तरी यात्रा, प्रचार, सल्ला बदल वगैरे करून त्याला पुन्हा चैतन्य आणणे शक्य नाही.
13 Jan 2023 - 8:14 am | श्रीगुरुजी
अगदी बरोबर. कॉंग्रेसचे आयुष्य संपले आहे. जे मूठभर नेते शिल्लक आहेत त्यातील बहुतांशी वयस्कर व परप्रकाशी आहेत.एखादे पातेले बरीच वर्षे वापरात असले की रोज घासल्याने ते झिजून त्याची चमक जाऊन ते जुनाट व निस्तेज होते. तसेच या पक्षाचे झाले आहे. गांधी कुटुंबीय व राज्याराज्यातील जवळपास सर्व नेते अनेक दशके जनतेसमोर असल्याने ते सर्व झिजून जुनाट व निस्तेज झाले आहेत.
आपल्याला मते का द्यावी हे सांगण्यासाठी मतदारांसमोर कोणताही कार्यक्रम कॉंग्रेसकडे नाही. स्वातंत्र्य चळवळ, चले जाव चळवळ, दांडी यात्रा, इंदिरा गांधी व राजीव गांधींचे तथाकथित बलिदान हेच फक्त कॉंग्रेस नेते सांगतात जे बहुसंख्य मतदारांसाठी निरूपयोगी व अनाकर्षक आहेत. या गोष्टीचा मतदारांवर शून्य प्रभाव पडतो. किंबहुना कॉंग्रेसनेत्यांनी काहीही सांगितले तरी समाज माध्यमांमुळे त्या काळातील सत्य परिस्थिती जनतेसमोर येते व त्यातून कॉग्रेसचे पितळ उघडे पडते. कॉंग्रेसने दडपून ठेवलेला बराचसा इतिहास समाज माध्यमातून लोकांसमोर पोहोचतोय व त्यामुळे कॉंग्रेस अधिकाधिक अडचणीत येतोय. त्यात भर म्हणून सावरकरांचा इतिहास दडपून खोटे आरोप करणे, चीन व पाकिस्तानची भलामण करणे, मुस्लिमांच्या चुकीच्या गोष्टींना पाठिंबा यातून कॉंग्रेसचे मतदार न वाढता कमी होत असतात.
नवीन मतदार मिळण्यासाठी कॉंग्रेसने पूर्णपणे नवीन कार्यक्रम व नवीन नेता जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. गांधी कुटुंबीय, मनमोहन सिंग, खरगे, गेहलोट, थरूर, पृथ्वीराज चव्हाण, सिद्धरामय्या अशांना आता काहीही भवितव्य नाही व कॉंग्रेसकडे कोणताही नवीन कार्यक्रम व चेहरा नाही. ७५-८० वर्षांपूर्वी तुम्ही काय केले, पदयात्रा, प्यार की राजनीति, भारत जोडो अश्या निरूपयोगी प्रकारातून कोणताही नवीन मतदार कॉंग्रेसकडे वळणार नाही. जे आहेत तेच कायम राहतील किंवा कमी होतील, पण नवीन मतदार मिळणार नाहीत.
14 Jan 2023 - 3:12 pm | शशिकांत ओक
पण विचित्र व वाईट वाटते ते त्यांच्या मागे कसे काय राहू शकतात? असे काय त्यांना राहूल गांधी यांच्या पहायला मिळते की त्यांचे नेतृत्व मान्य करतात?
हे कोडे कोण सोडवेल का?
14 Jan 2023 - 5:51 pm | श्रीगुरुजी
जे राहुलच्या मागे उभे आहेत त्यांचे स्वयंकर्तृत्व शून्य आहे. जे थोडेफार स्वयंप्रकाशी आहेत ते पक्ष सोडून जातात (हिंमता बिस्व सर्मा, ज्योतिरादित्य सिंदिया, अमरिंदर सिंह वगैरे) किंवा ते राहुलला जुमानत नाहीत (उदा. गेहलोत).
14 Jan 2023 - 8:14 pm | श्रीगुरुजी
जे राहुलच्या मागे उभे आहेत त्यांचे स्वयंकर्तृत्व शून्य आहे. जे थोडेफार स्वयंप्रकाशी आहेत ते पक्ष सोडून जातात (हिंमता बिस्व सर्मा, ज्योतिरादित्य सिंदिया, अमरिंदर सिंह वगैरे) किंवा ते राहुलला जुमानत नाहीत (उदा. गेहलोत).
15 Jan 2023 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सल्लागारानां वाटत असावं की, राहुल गांधी फेकू, थापाड्या, नाही. खोटी आश्वासने देत नाहीत. परदेशातून काळा पैसा आणुन भारतीयांच्या खात्यात जमा करु असे म्हणत नाही. डिझेल-पेट्रोलचं भाव यंव करु आणि त्यंव करु. इतके रोजगार आणु उभे करु आणि अमूक धमुक करु असे म्हणत नाही. संकटसमयी घंट्या थाळ्या मशाल मोर्चे काढायला सांगत नाही. रात्री-बेरात्री उठून उद्या आठवाजेपासून नळाला पाणी येणार नाही, असे सांगत नाही. आपल्या मंत्रीमंडळातील जवाबदार माणूस मंदिराचं काम करुनच दाखवू असे लोकांचे जगण्या-मरण्याच्या प्रश्नांकडून लक्ष विचलित करणा-या गोष्टी करीत नाहीत. लोकशाहीचा गैरफायदा घेऊन विरोधकांचे बोलणे थांबवत नाही,सुडाने कार्यवाही करीत नाही अशा अनेक कारणांमुळे सल्लागार सपोर्ट करीत असावेत. असे वाटते.
सल्लागारांना वाटतं की, राहुल गांधींच्या 'नफरत छोडो, भारत जोडो यात्रेचं महत्व आता जनतेच्या लक्षात येत आहे. आयटी सेलच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करुन पंडित नेहरु ते राहूल गांधी आणि प्रादेशिक पक्ष ते राष्ट्रीय पक्षांची केवळ प्रतिमा मलीन करण्याचे आणि देशात जात, धर्म, यावर द्वेषाचे काम जे करीत आहेत त्यांच्या विरुद्ध संविधान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश यात्रेच्या माध्यमातून राहूल गांधी आता नव्या उमेदीने देत आहेत म्हणून सल्लागार सपोर्ट करीत असावेत असे वाटते.
सल्लागारांना असेही वाटत असावे की, देशात काँग्रेसचे सरकार लगेचच येणार नाही पण आवश्यक ती पायाभरणी आता राहुल गांधी करीत आहेत. देशात सध्या जे असहिष्णू आणि द्वेषाचे राजकारण लोकसभेपासून ते गल्लीपर्यंत पोहचले आहे ते संपवून देशात सद्भाव, प्रेम, मैत्री, राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रयत्न करणा-यांना सपोर्ट केला पाहिजे असे सल्लागारांना वाटत असावे.
सल्लागारांना वाटते की, भारत जोडो यात्रेची सुरुवात टींगल टवाळी करुन झाली. भारत जोडो यात्रा मिडियापासून दूर राहीली, तरीही यात्रेच्या निमित्ताने हजारो लोक यात्रेत सहभागी होत आहेत, राहुल गांधी आणि जनता संवाद साधत आहेत, लोकांचे मूलभूत प्रश्न नेमके काय आहेत यावर ते बोलत आहेत, लोकांचे पाठबळ लाभत आहे, वाढत आहे, आणि राहुल गांधी पायी फिरुन देश पिंजून काढत आहे आणि भाजपेयी आता निराशेने ग्रस्त होऊन टी-शर्ट कितीचा आहे, असा येडपट प्रश्न विचारायला लागले आहेत, या यशामुळे सल्लागार सपोर्ट करीत असावेत, असे वाटते.
सल्लागारांना असेही वाटत असावे की, सबका साथ सबका विकास हा देशातला सर्वात बकवास कार्यक्रम होता आणि त्यातून लोकांना काहीच मिळत नाही. २०२० मधे महासत्ता होणार होता, बावीस मधे प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळणार होते ते मिळत नाही. देशातल्या जनतेला सदा सर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. फेकाफेकी करणा-या जादुगाराच्या पोतडीत फार काही नाही, असे असे लक्शात आले की लोक जागा सोडायला सुरुवात करतात. एक तरुण भारत भ्रमण करुन देश आणि लोक, लोकांचे प्रश्न समजून घेत आहे, म्हणून कदाचित सल्लागार सपोर्ट करीत असावेत असे वाटते.
सल्लागारांना असेही वाटते की..... (अपूर्ण )
-दिलीप बिरुटे
15 Jan 2023 - 10:59 am | श्रीगुरुजी
आता लक्षात आले की कॉंग्रेसची आणि राहुलची वाट का लागली आहे. असे सल्लागार आणि प्रशंसक असल्यावर फक्त एकच होते व त म्हणजे पूर्ण वाट लागणे. चालू दे.
15 Jan 2023 - 1:19 pm | Trump
नमस्कार सर. एवढा मोठा प्रतिसाद बघुन आनंद झाला.
तुम्ही कॉंग्रेसची शाखा उघडली काय? तुमचा प्रतिसाद म्हणजे प्रचारकी थाटात लिहीलेला आहे.
16 Jan 2023 - 6:11 am | श्रिपाद पणशिकर
क्या चिच्चा तुमने तो पुरा येडीटोरीयल इच लिख डाला ;) येडे के उप्पर
खालि इत्ताइच बोल देते "तपस्वी" तो काम पुर हो जाता यांरो. "तपस्वी" आजकल बोत फैशन में है.
"तपस्वी" राहुल गांधी ने चाहे जो करतबा, करामातें किये हो कन्याकुमारी से पंजाब तक लेकिन उसको रगड रगड के धोया ओवैसी ने...."खुद को मार दिया रे तुने तो फिर ये क्या है जीन्ना हय क्या" " पचास साल का आदमी बोलरा मै ठंडी से नंहि डरता" "एक 'पैदल' इधर से उधर पैदल चले जा रहा है"
भारत की जनसंख्या १४५ करोड रुपये है... हां भई मेरा वजन भई ७७ किलोमीटर रहनेका.
16 Jan 2023 - 1:48 pm | आनन्दा
आता कळलं त्याचे सल्लागार कोण आहेत ते.
मग बरोबर आहे.
16 Jan 2023 - 8:02 pm | वामन देशमुख
>>> परदेशातून काळा पैसा आणुन भारतीयांच्या खात्यात जमा करु असे म्हणत नाही.
याचा संदर्भ कळला नाही. स्पष्ट करून सांगता का?
16 Jan 2023 - 9:24 pm | आग्या१९९०
https://twitter.com/WeThePeople3009/status/1611737296960892933?t=Kk3UcKO...
प्रामाणिक करदात्यांच्या खात्यात बक्षीस म्हणून पैसे बदाबदा पडू लागले.
3 Feb 2023 - 7:45 am | वामन देशमुख
>>> परदेशातून काळा पैसा आणुन भारतीयांच्या खात्यात जमा करु असे म्हणत नाही.
याचा संदर्भ कळला नाही. स्पष्ट करून सांगता का?
4 Feb 2023 - 10:22 am | खटपट्या
सर,
हे मान्य केले की तुम्हाला मोदींची मते मान्य नाहीत,
पण त्यासाठी समर्थन कोणाला देताय? गाढवाला?
गाढवाचा देखील अपमान करतोय मी,
मोदींच्या तोडीसतोड येउदे की कोणी काँग्रेस मध्ये, त्याला सपोर्ट करू,
4 Feb 2023 - 11:49 am | मोदक
खटपट्या शेठ,
हे मान्य केले की तुम्हाला पप्पूप्रेमींची मते मान्य नाहीत,
पण तुम्ही समजवताय कोणाला..?
असो.. मी कोणाचा अपमान करू इच्छीत नाही.
14 Jan 2023 - 8:43 pm | कंजूस
दोनच पक्ष राहतील. कॉन्ग्रेस आणि आइएमएम. त्यांचीच मतं अधिक असतील आणि कोणतीही यात्रा न करता निवडून येतील.
15 Jan 2023 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणीच इथेच सत्तेचा कायम अमरपट्टा बांधुन आलेलं नाही.
-दिलीप बिरुटे
16 Jan 2023 - 6:22 am | श्रिपाद पणशिकर
काका सहमत पण हि कॉन्ग्रेस ती कॉन्ग्रेस नसणार आहे, कारण सदगुण विक्रुति से भरपुर और उच कोटि के सज्जनता से लबालब मास्टर स्ट्रोक वाले चाणक्यों ने भाजपा को २०२७ तक नई काँग्रेस बना देना है.
16 Jan 2023 - 8:30 pm | कॉमी
हे काय ? नक्की काय म्हणायचे आहे बोवा ?
16 Jan 2023 - 2:26 pm | श्रीगुरुजी
"राहुल गांधी केव्हाच मेला. मी माझ्यातील राहुल गांधीला मारून टाकले आहे. आता माझ्यात राहुल गांधी नाही. तुम्हाला, भाजपला वाटते की हा राहुल गांधी आहे. पण राहुल गांधी केव्हाच गेला."
"पांडवांनी महाभारत युद्धात सर्वधर्मीयांना बरोबर घेतले होते."
"पांडवांनी नोटबंदी केली नव्हती आणि चुकीच्या पद्धतीने वसेकची अंमलबजावणी केली नव्हती, कारण ते तपस्वी होते."
ही मुक्ताफळे अत्यंत असंबद्ध व अर्थहीन आहेत, हे राहुलच्या सल्लागारांना सुद्धा समजत नसेल का? सावरकरद्वेषी पिचकाऱ्या मारून कॉंग्रेसला नवीन मते मिळणार नाहीत, हे राहुलच्या सल्लागारांना समजत नसेल का? का ते सुद्धा राहुलसारखे आहेत की त्यांनी राहुलपुढे हात टेकलेत?
16 Jan 2023 - 2:30 pm | श्रीगुरुजी
एकंदरीत मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली राहुलची अर्थहीन, असंबद्ध मुक्ताफळे व सावरकरद्वेष कायम आहे. भारत जोडो यात्रेमुळे शून्य सकारात्मक बदल घडलाय. कदाचित हे ओळखूनच कॉंग्रेसी मिळालेली कॉंग्रेसची उमेदवारी नाकारत आहेत (उदा. सुधीर तांबे).
16 Jan 2023 - 2:31 pm | श्रीगुरुजी
एकंदरीत मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली राहुलची अर्थहीन, असंबद्ध मुक्ताफळे व सावरकरद्वेष कायम आहे. भारत जोडो यात्रेमुळे शून्य सकारात्मक बदल घडलाय. कदाचित हे ओळखूनच कॉंग्रेसी मिळालेली कॉंग्रेसची उमेदवारी नाकारत आहेत (उदा. सुधीर तांबे).
16 Jan 2023 - 3:21 pm | चित्रगुप्त
मनुष्य आशेवर जगतो, असे म्हणतात. 'पूर्वजांच्या पुण्याई' मुळे आज ना उद्या आपण पं.प्र. बनणारच, तोच आपला 'जन्मसिद्ध अधिकार' आहे ही पप्पू 'तपस्वी' यांची खात्रीलायक समजूत असणार.
बाकी एकदा तपस्वी पं.प्र. झाला, की आपल्याला अफाट कुरणे चरायला मिळणार, या आशेवर इतर काँग्रेसी जगत असावेत, असे 'ह्यांचे' म्हणणे.
--- बाईसाहेब उपटसुंभीकर.
16 Jan 2023 - 3:52 pm | श्रिपाद पणशिकर
बेशक १००%. फक्त एक लक्षात असु द्या
Just remember one thing no single party other than Congress could use the unlimited and unaccountable powers of Central Agencies, MHA. Only congress used and they will again use this so called SYSTEM Ruthlessly still Systematically even if they form a Alliance Govt. with Puppet PM. मोंदिं चे, चाणक्य शहांचे वय, ढासळ्णारी तब्येत दुर्लक्ष करुन ते त्यांचा सुड पुर्ण करतील घासत नेतील हाथकड्या घालुन.... कारण काँग्रेस ला भाजपा सारखी बकलोलि ची जरी थोडी फार लागण झाली असली तरी सदगुण विक्रुती चा त्यांना स्पर्श नाहिये. कसे घासत नेले होते अर्णब ला फक्त माईनो चे खरे नाव घेतले म्हणुन, केतकि चितळे..... असो.
17 Jan 2023 - 11:08 pm | चंद्रसूर्यकुमार
रागांनी भारत जोडो यात्रा काढली आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ते चालत गेले, यात्रेत बरीच गर्दी झाली वगैरे सगळे ठीक आहे. पण एक गोष्ट समजत नाही. दिसायला गर्दी कितीही दिसत असली तरी ती मतांमध्ये कितपत दिसून येईल? जे लोक भाजपला आयुष्यात कधीही मत द्यायची सुतराम शक्यता नाही असे माझ्या परिचयातील काही लोक यात्रा महाराष्ट्रात आली होती तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी त्या यात्रेसाठी म्हणून गेले होते. रागांची शेगावला सभा झाली त्या सभेतही त्यातले काही लोक गेले होते. अर्थात माझ्या परिचयातील ४-५ लोकांवरून पूर्ण भारतात काय होईल याचे अनुमान मी नक्कीच काढत नाही पण एक प्रश्न नक्कीच पडतो आणि तो म्हणजे पूर्वी भाजपला मत दिलेले पण आता भ्रमनिरास झालेले किती मतदार या गर्दीत होते की भाजपला अन्यथाही मत दिलेच नसते असे लोक बहुसंख्य होते? जशीजशी यात्रा पुढे गेली त्याप्रमाणे ठिकठिकाणचे भाजप कार्यकर्ते, आजी-माजी आमदार/खासदार/नेते काँग्रेसमध्ये सामील झाले अशी बातमी मी तरी एकदाही वाचली नाही. जे नेते आपल्या भागात मते फिरवू शकतात असे कोणी यात्रेत गेले होते का? यात्रेत सहभागी कोण झाले? तर रघुराम राजन, रॉचे माजी प्रमुख अमरजितसिंग दुलात, स्वरा भास्कर वगैरे लोक. हे लोक नक्की कितीशी मते फिरवू शकतील?
जे लोक यात्रेत सहभागी झाले असते तर २०२४ मध्ये मोदींविरोधात पूर्ण विरोधी पक्ष एकत्र आला आहे असे चित्र उभे राहिले असते (चंद्रशेखर राव, अखिलेश, मायावती, केजरीवाल वगैरे) ते लोक यात्रेपासून दूरच राहिले. कारण सरळ आहे. राहुलच्या यात्रेत सहभागी होणे म्हणजे त्याचे नेतृत्व मान्य करणे आणि २०२४ मध्ये राहुलच विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल याची कबुली देण्यासारखे झाले असते. नेमक्या त्याच गोष्टीला हे विरोधी पक्ष तयार नाहीत असे दिसते. खरी गोम तिथे आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले त्याला पावणेतीन पेक्षा जास्त महिने झाले. गुजरातमध्ये प्रचार करताना मोदींना रावण म्हणणे हे सोडून पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही केल्याचे ऐकिवात नाही- निदान बातम्यांमध्ये तरी तसा उल्लेख झाला नाही. सगळा टीआरपी यात्रेमुळे रागाच खात आहेत. मग या खर्गेंची निवड नक्की कशाकरता केली गेली आहे तेच समजत नाही.
18 Jan 2023 - 7:33 am | आनन्दा
परवा तो म्हणाला नाही का राहुल गांधी मेला म्हणून.
त्याच्यामुळे खरंगेची निवड केली असावी.
19 Jan 2023 - 10:45 am | विवेकपटाईत
प्रतिसाद देणाऱ्यांना धन्यवाद. सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांचे हेच दुखणे आहे की समजा राहुल ला कळत नसेल पण सल्लागार मूर्ख आहेत का की ते जाणून बुजून असे करतात. संशयाला भरपूर जागा आहे.
ए एस दुलत ( मौना सरदार अर्थात पगडी न pघालणारे)हे अतिशय लोकप्रिय अधिकारी होते. वाजपेयी काळात मी त्यांचा पीए होतो.त्यांना राग कधीच येत नसे. अधिकांश वेळी माझ्याशी पंजाबीतच बोलायचे. दक्षिणात्य स्टाफ वर विश्वास नसल्याने अधिकांश महत्वपूर्ण कार्य मीच करत होतो. त्यांनी कश्मीर मध्ये निवडणूक अत्यंत योजना पूर्वक आणि सफलता पूर्वक करून दाखवली होती. त्या काळात भरपूर आतंकवाद्यांचा समाचार ही घेतला होता. पण २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यानंतर त्यांना रोजगार मिळाला नाही. त्याचा राग काढत आहे. २०२४ मध्ये त्यांचे वय ८५ वर्षाचे असेल. त्यांना रोजगार मिळणे शकत नाही.
19 Jan 2023 - 11:15 am | चंद्रसूर्यकुमार
अरे वा. त्या काळाविषयी गोपनीयतेच्या मर्यादा पाळून काही लिहिता येईल का?
ए.एस.दुलात या मनुष्याविषयी माझ्यासारख्या सामान्यांचे मत अती वाईट आहे. त्यांनी लिहिलेल्या Kashmir: The Vajpayee Years या पुस्तकात त्यांनी फारूख अब्दुल्लासारख्यावर अगदी भरभरून स्तुतीसुमने उधळली आहेत. काश्मीर फाईल्स चित्रपट हा प्रोपोगांडा आहे असे त्यांचे मत आहे. मग काश्मीरी पंडित उगीच हौस म्हणून नेसत्या वस्त्रानिशी काश्मीर सोडून पळून आले का याचे ते कधी उत्तर देतील का? म्हणे काश्मीरी पंडित हेच एकमेव टारगेट केलेला समाजगट नव्हता. नसेलही. पण म्हणून काश्मीरी पंडितांबरोबर जे काही झाले त्याची तीव्रता कमी होते का? ३७० कलम काढायला पण त्यांनी विरोध केला होता. त्या निर्णयाला त्यांचा विरोध असेल तर ते समजू शकतो. प्रत्येक भारतीयाला सरकारच्या निर्णयाला विरोध करायचा अधिकार आहे. पण ३७० काढले तर रक्ताचे पाट वाहतील या फारूख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्यांच्या धमक्यांनंतरही त्यांनी त्याविरूध्द काही बोलल्याचे ऐकिवात नाही.
२०१८ मध्ये म्हणजे ३७० कलम काढायच्या एक वर्ष आधी त्याच माणसाने आय.एस.आय चा माजी प्रमुख असद दुर्रानी याच्याबरोबत संयुक्तपणे The Spy Chronicles हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्याला दिल्लीला यायचे होते पण मोदी सरकारने त्याला व्हिसा नाकारला. मग तो व्हिडिओ कॉन्फरन्सवरून पाकिस्तानातून त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी हजर राहिला होता. दिल्लीत प्रकाशनासाठी मनमोहनसिंग, हामीद अन्सारी, फारूख अब्दुल्ला, कपिल सिब्बल, यशवंत सिन्हा वगैरे मंडळी हजर होती आणि पाकिस्तानातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तो असद दुर्रानी.
भारताचे माजी पंतप्रधान, माजी उपराष्ट्रपती, माजी अर्थ-परराष्ट्रमंत्री आय.एस.आयच्या माजी प्रमुखाबरोबर एकाच व्यासपीठावर हजर होते!! किती विलोभनीय दृश्य असेल ना ते? त्याच आय.एस.आयने हजारो भारतीयांना ठार मारले आहे असे आपल्या सरकारचे (मनमोहन पंतप्रधान होण्यापूर्वीपासूनच आणि ते पंतप्रधान असतानाही) मत आहे त्या संस्थेच्या माजी प्रमुखाबरोबर आपले माजी पंतप्रधान? किळस आली तो प्रकार बघून आणि मनमोहनसिंग यांच्याविषयी जो काही थोडाफार आदर होता तो त्या प्रकारानंतर पूर्ण संपला. असला प्रकार कशामुळे झाला? तर तो त्याच ए.एस.दुलात यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे.
या प्रकारांमुळे ए.एस.दुलात या मनुष्याविषयी माझ्यासारख्यांचे मत अगदी वाईट आहे. विशेषतः हामीद अन्सारीसारख्यांच्या संगतीत ते वावरत असतील तर त्यांना 'बेनेफिट ऑफ द डाऊट' देणेही माझ्यासारख्यांना शक्य वाटत नाही. तरी पडद्याआड घडलेल्या काही गोष्टी असतील तर ते वाचायला आवडेल. तेव्हा पंतप्रधान कार्यालयात केलेल्या कामाची गोपनीयता भंग होणार नाही अशाप्रकारे काही लिहिता आले तर जरूर लिहा ही विनंती.
7 Feb 2023 - 1:09 pm | विवेकपटाईत
अधिकांश उच्च पदस्थ व्यक्ती त्यांच्या दृष्टिकोनातून लिहतात. बाकी पदाची लालसा सर्वानाच असते. दुलत साहेब ही अपवाद नाही. प्रधानमंत्री वाजपेयी यांनी सौपविलेले कार्य उत्तम रीतीने केले होते. याशिवाय अधिक काही लिहू शकत नाही आणि योग्य ही नाही.
8 Feb 2023 - 12:59 am | अर्जुन
डिसेंबर 1999 मध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्स IC 814 चे अपहरण केल्याच्या दुलत यांच्या पुस्तकात, RAW अधिकाऱ्याबद्दल एकही शब्द नाही, जो इतर अधिकृत खात्यांनुसार, कंदाहारला अपहरण केलेल्या दुर्दैवी विमानात होता. आणि कोणत्याही पत्रकाराने दुलतला त्याबद्दल प्रश्न विचारला नाही किंवा त्यांच्या सोयीस्कर मौनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही.
माजी रॉ अधिकारी, आर के यादव यांनी, मिशन आर अँड डब्ल्यू (मानस पब्लिकेशन, 543 पृष्ठे) हे एक पुस्तक लिहिले आहे. यादव यांच्या म्हणण्यानुसार, अपहरणाच्या काही दिवस आधी, काठमांडूमधील कनिष्ठ रॉ ऑपरेटिव्ह यू व्ही सिंगने तोमर यांना माहिती दिली की पाकिस्तानी दहशतवादी भारतीय विमानाचे अपहरण करण्याचा विचार करत आहेत. तोमर यांनी सिंगना त्यांच्या अहवालाची सत्यता तपासण्याचे आदेश दिले. जेव्हा सिंग यांनी विश्वासार्हतेची खात्री दिली तेव्हा तोमरने त्यांना फटकारले आणि अफवा पसरवू नका असे सांगितले.
"सिंगचा अहवाल दिल्लीतील RAW मुख्यालयात पाठवला गेला नाही", यादव लिहितात. “पण काही दिवसांनंतर, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले आणि तोमर त्यात उड्डाण करत होते. त्याने आपली ओळख गुप्त ठेवली. अन्यथा त्याला ठार मारले गेले असते.”
तोमरच्या या बेजबाबदार वर्तनाबद्दल जर कोणी राष्ट्राला स्पष्टीकरण देण्यास जबाबदार असेल तर ते दुलत आहेत कारण त्यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळावर पुस्तक लिहिले आहे, IC 814 चे अपहरण झाले तेव्हा त्यांनी RAW चे प्रमुख होते आणि तोमरने तेव्हा RAW साठी काम केले आहे.
1999 च्या अपहरणाची माहीती सर्वांना आहे. 24 डिसेंबर 1999 रोजी दुपारी नाटकाची सुरुवात झाली जेव्हा पाच ISI-समर्थित दहशतवाद्यांनी IC 814 ह्या विमानाचे अपहरण केले, ते काठमांडूहून दिल्लीसाठी निघाले होते आणि 31 डिसेंबर रोजी अफगाणिस्तानातील कंदाहार येथे अपहरण नाट्य संपले,
अनुत्तरीत प्रश्न असा आहे की: तोमर, काठमांडू येथील भारतीय दूतावासात प्रथम सचिव, अपहरण झालेल्या विमानात काय करत होते? मी आतापर्यंत सरकारच्या सर्वोच्च स्तरावर ऐकलेले स्पष्टीकरण म्हणजे तोमर अपहरण झालेल्या विमानात चढले हा “वाईट योगायोग” होता.
अनेकांचा असा विश्वास आहे की,कमांडोना अमृतसरमधील विमानात कार्वाई करण्याची परवानगी दिली गेली नाही कारण तोमर आत होते. कमांडोना पाठवण्याच्या प्रस्तावात अन्य कोणीही नसून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सचिव एन के सिंग यांनीच बदल केला होता. तोमरचे लग्न एन के सिंग यांच्या धाकट्या बहिणीशी झाले आहे. अनेक जण मान्य करतात की सिंगने आपल्या मेव्हण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व बदल केले!
हे सर्वज्ञात आहे की, अमृतसरहून विमानाने लाहोर, दुबईला उड्डाण केले आणि शेवटी कंदाहारला उतरले. अपहरण झालेल्या विमानात तोमरची उपस्थिती हे गुपित ठेवले गेले, जे केवळ भारतीय आस्थापनातील काही निवडक लोकांना माहीत होते. पण ते फार काळ गुपित राहिले नाही.
27 डिसेंबर रोजी, 1C 814 कंदहारमध्ये अडकलेले असताना आणि ओलीसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी सुरू असताना, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते, तारिक अल्ताफ यांनी इस्लामाबादमधील आंतरराष्ट्रीय पत्रकारांसमोर आनंदाने घोषणा केली की RAW अधिकारी एस बी एस तोमर “अपहरण केलेल्या इंडियन एअरलाइन्समध्ये आहेत. विमान आणि तो पाच किंवा सहा अपहरणकर्त्यांना मार्गदर्शन आणि नियंत्रण करत आहे”.
अपहरण झालेल्या विमानात तोमरच्या उपस्थितीला पाकिस्तानने सोयीस्करपणे स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी एक ट्विस्ट दिला. अल्ताफच्या ब्रीफिंगला चांगले कव्हरेज मिळाले, तरीही भारतीय मीडियाने ओलिसांमधील एका रॉ अधिकाऱ्याच्या बातम्या कर्तव्यपूर्वक सेन्सॉर केल्या! तथापि, 22 जानेवारी- 4 फेब्रुवारी 2000 च्या फ्रंटलाइन मासिकातील प्रवीण स्वामींच्या कव्हर स्टोरी, 'कंदहारनंतर काश्मीर'ने उघडकीस आणले.
दुलत यांच्या पुस्तकात तोमरबद्दल काहीही माहीती दिलेली नाही. कदाचीत RAW ला हे अपयश येण्यास कारणीभूत अटलबिहारी वाजपेयी पूर्वीचे सरकार ईंदरकुमार गूजराल [1997–1998] चे धोरण असावे. ३७० कलम काढण्यास विरोध, दुलत यांची मेहर तरार, असद दुर्रानीसारख्यां बरोबरची जवळीक, पाकिस्तानची ISI ही जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तचर यंत्रणा आहे. व मला आयएसआय प्रमुख व्हायला आवडले असते!! हे बोलणे त्यांचा देशप्रेमाबद्द्ल शंका निर्माण करते.
17 Feb 2023 - 4:00 pm | चंद्रसूर्यकुमार
बापरे. हा प्रकार खरोखरच माहित नव्हता. सविस्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद.
हे खरं असेल तर मग वाजपेयींनी एन.के.सिंगांना जाब विचारला का? त्यांना पदावरून काढले का? वाटत नाही.
असल्या घाणेरड्या माणसाला पी.एम.ओ मध्ये मुद्दामून वाजपेयींनी का बोलावून घेतले असावे? असल्या प्रकारांमुळेच वाजपेयींविषयी एकेकाळी वाटत असलेला आदर आता अजिबात वाटत नाही. कधीकधी वाटते की २०१८ मध्ये दुलतच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस वाजपेयी हिंडते फिरते असते आणि आपल्या आजूबाजूला काय चालले आहे हे त्यांना कळत असते तर ते पण गेले असते. त्यांच्याच लाडक्या दुलातने लिहिलेले पुस्तक आणि त्यांच्या मर्जीतले फारूख अब्दुल्ला आणि यशवंत सिन्हा वगैरे लोक तिथे गेले असतील तर वाजपेयी तिथे जायची शक्यता न जायच्या शक्यतेपेक्षा जास्त होती असे मला तरी वाटते (वैयक्तिक मत).
19 Jan 2023 - 1:31 pm | श्रीगुरुजी
3 Feb 2023 - 7:30 pm | mayu4u
ह ह पु वा!
4 Feb 2023 - 12:31 pm | सुबोध खरे
हे असले इरफान हबीब सारखे डावे विचारवंत जे उत्तरध्रुवावरच्या अस्वलांवरच्या पिसवांचे कामजीवन किंवा अर्वाचीन गद्य वाङ्मयाचा इतिहास आणि त्यातील सौंदर्यस्थळे सारख्या भंपक विषयावर ज ने यु मधून पीएच डी करून वर्षानुवर्षे सरकारी रमण्यावर पोसलेले जीव आहेत
त्यांना राहुल गांधी यांच्या अगाध ज्ञानाबद्दल आदर वाटणे साहजिकच आहे.
4 Feb 2023 - 12:25 pm | सुबोध खरे
आजचे ज्ञान
३००० किमी चालल्या मुळे फक्त दाढी वाढते
बुद्धी नाही
4 Feb 2023 - 2:07 pm | मोदक
मोदी लाट, २०१४ चे राक्षसी यश, नंतर नोटबंदीच्या अंमलबजावणीत झालेल्या टाळण्याजोग्या चुका आणि अर्थातच सक्षम लोकशाहीसाठी गरजेचा असलेला सशक्त विरोधी पक्ष.
यामुळे असे वाटले होते की भाजपला पर्याय म्हणून कोणीतरी असले पाहिजे आणि पर्याय म्हटल्यावर डोळ्यासमोर काँग्रेस पक्ष येत असे कारण तोच एक प्रमुख पक्ष होता.
आता परिस्थिती बरीच बदलली आहे.
२०१६ नंतर पप्पूने बरीच मेहनत करून स्वत:ची आणि पक्षाची भारतीय राजकारणातली जागा कमी करवून घेतली आहे.
त्याचे सल्लागार हे कोणीतरी भाजपचे डीप असेट असावेत हीच शक्यता वाटत आहे.
4 Feb 2023 - 2:28 pm | वामन देशमुख
स्स्स्स्स्सहमत!
7 Feb 2023 - 6:14 pm | श्रीगुरुजी
२०१८ पासून पप्पूने राफेल हा न वाजणारा खुळखुळा मे २०१९ पर्यंत वाजविला, पण तो वाजत नाही हे त्याला समजतच नव्हते.
बरोबर ५ वर्षांनंतर त्याने अडाणी हा असाच न वाजणारा खुळखुळा वाजवायला प्रारंभ केलाय. आज लोकसभेत त्याने भाजप व मोदींवर अनेक आरोप केलेत. संसदेतील कोणत्याही वक्तव्याविरूद्ध न्यायालयात जाता येत नाही. त्यामुळे हा मुद्दाम लोकसभेतच आरोप करतोय. मे २०२४ पर्यंत हा खुळखुळा हातात धरून तो हात हलवित वाजवित बसणार.
एखाद्या कारखान्यात नोकरी मिळविण्यासाठी मुलाखतीला गेलेल्या उमेदवाराने आपण या नोकरीसाठी कसे पात्र आहोत व आपल्याला नोकरी दिल्यास आपण कारखान्याचा कसा फायदा करून देऊ हे मुलाखतीत सांगण्याऐवजी कारखान्यात कामाला असलेला दुसरा एखादा कर्मचारी किती कामचुकार आणि नालायक आहे व म्हणून त्याला काढून मला नोकरीवर घ्या असे सांगितल्यावर मुलाखतकार जे करतील तेच जनता पुन्हा एकदा २०२४ मध्ये करणार आहे.
17 Feb 2023 - 10:50 am | विवेकपटाईत
या लेखाचा उद्देश्य ज्या कोंग्रेस कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य पार्टीच्या प्रसारासाठी वेचले त्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न होता. वाचकांपर्यंत त्यांची भावना पोहचली पाहिजे असे मला वाटत होते. प्रतिसाद देणर्या सर्वांचे आभार.
17 Feb 2023 - 3:50 pm | चंद्रसूर्यकुमार
या लेखातील शर्माजी काल्पनिक असले तरी एका खर्याखुर्या शर्माजींविषयी लिहितो. त्या शर्माजींचे नाव होते रामकृष्ण द्विवेदी. त्यांना गांधी परिवाराने दिलेली वागणूक पाहता काँग्रेससाठी कार्यकर्ते (जेवढे आहेत तेवढे) तरी का खपतात हेच समजत नाही. भाजप किंवा कम्युनिस्ट पक्षांप्रमाणे कोणतीही विचारधारा नाही- म्हणजे जरी पक्षनेतृत्वाने वाईट वागणूक दिली तरी विचारधारेला मानून तरी पक्षासाठी काम करतील अशी परिस्थिती नाही. जर फायदा मिळाला तर तो गांधी घराण्याला आणि परिणाम भोगायचे इतरांनी अशी परिस्थिती.
असो. तर त्याचे झाले असे की १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींचा काँग्रेस (आर) आणि इंदिरा विरोधकांचा काँग्रेस (ओ) अशी फूट पडली. ऑक्टोबर १९७० मध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेस (ओ) चे त्रिभुवन नारायण सिंग हे इतर सगळ्या विरोधकांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनले. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य नव्हते त्यामुळे त्यांना एप्रिल १९७१ पूर्वी पोटनिवडणुकीत निवडून जाणे भाग होते. १९६२, १९६७ आणि १९६९ मध्ये गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम विधानसभा मतदारसंघातून उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते महंत अवैद्यनाथ. हे महंत अवैद्यनाथ गोरखपूरच्या गोरखनाथ मठाचे प्रमुख होते (योगी आदित्यनाथ त्यांच्यानंतर मठाचे प्रमुख झाले). तर हे महंत अवैद्यनाथ १९७० मध्ये पोटनिवडणुकीत गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आणि त्यांनी आपली उत्तर प्रदेश विधानसभेतील मनीरामची जागा रिकामी केली. त्या जागेवर पोटनिवडणुक होणार होती जानेवारी १९७१ च्या पहिल्या आठवड्यात. तुम्ही मनीराममध्ये नुसते फॉर्म भरायला या बाकीचे आम्ही बघतो असे आश्वासन अवैद्यनाथांनी मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंगांना दिले. त्याप्रमाणे काँग्रेस (ओ) चे उमेदवार होते मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग. तर विरोधात इंदिरा गांधींनी उमेदवारी दिली होती काँग्रेस (आर) च्या रामकृष्ण द्विवेदींना. हे रामकृष्ण द्विवेदी पत्रकार होते आणि त्यामानाने नवखे उमेदवार मानले जात होते.
पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी प्रचार करू नये अशी पध्दत त्यावेळेस होती आणि बर्यापैकी ती पाळलीही जायची. त्यामुळे स्वतः उमेदवार असले तरी त्रिभुवन नारायण सिंग प्रचाराला गेले नाहीत. त्यांच्या बाजूने वाजपेयींसह सगळ्या विरोधी नेत्यांनी प्रचार केला. हे मतदान व्हायच्या आठवडाभर आधीच लोकसभा बरखास्त झाली होती आणि मार्च १९७१ मध्ये लोकसभेसाठी मध्यावधी निवडणुक होणार होती त्यामुळे या पोटनिवडणुकीला अन्यथा झाले असते त्यापेक्षा जास्त महत्व प्राप्त झाले. रामकृष्ण द्विवेदींच्या बाजूने इंदिरा गांधींनीही प्रचार केला. मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा धक्कादायक निकाल आला. रामकृष्ण द्विवेदींनी मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांच्या दुप्पट मते घेऊन त्यांना पराभूत केले.
हे रामकृष्ण द्विवेदी अगदी हाडाचे काँग्रेसवाले होते. या पोटनिवडणुकीत दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांना हरविले म्हणून त्यांना त्रिभुवन नारायण सिंग यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या कमलापती त्रिपाठींच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळाले. पण त्यानंतर त्यांना कधी उमेदवारीही मिळाली नाही. इंदिरा गांधींसाठी विमान अपहरण करण्यासारखा गंभीर गुन्हा करणार्या भोलानाथ आणि देवेंद्र पांडे या भावांना काँग्रेसने दोन टर्मसाठी आमदार केले होते. त्यापैकी एक भोलानाथ पांडे अगदी २०१४ पर्यंत काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवत होते. असल्या लोकांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती पण आपल्याच हाडाच्या कार्यकर्त्याला मात्र खड्यासारखे बाजूला ठेवले.
तरीही हे रामकृष्ण द्विवेदी पक्षासाठी राबत राहिले. २००४ मध्ये राहुल गांधीने अमेठीतून लोकसभा निवडणुक लढवली तेव्हा 'अमेठीका डंका बेटी प्रियांका' ही घोषणा देणारे हेच रामकृष्ण द्विवेदी होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर त्यांनी आणि इतर काही काँग्रेस नेत्यांनी नेहरू जयंतीच्या कार्यक्रमात राज्यात पक्ष मजबूत करायला काय करता येईल याविषयी चर्चा केली आणि प्रियांका गांधींच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. वयाच्या ८७ व्या वर्षी पक्षात फार मोठे स्थान कधी न भूषविलेला माणूस पक्षविरोधी कारवाया करू शकेल ही शक्यता फारच थोडी. पण त्यांनी प्रियांकांवर नाराजी व्यक्त केल्याने ते गांधी घराण्याच्या मर्जीतून उतरले आणि त्यांना पक्षातून काढण्यात आले. तेव्हा 'मी नक्की कोणत्या पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत हे तरी सांगा' असे डोळ्यात अश्रू आणत द्विवेदी म्हणाले होते. पक्षातून काढताना कारणे दाखवा नोटिस वगैरे काहीही बजावण्यात आली नव्हती तर तडकाफडकी त्यांना पक्षातून काढले गेले. काही दिवसातच त्यांना दुर्घर आजार (बहुदा कॅन्सर) झाला. तेव्हा द्विवेदींना 'मानवीय' आधारावर पक्षात घेण्यात येत आहे असे काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. म्हणजे त्यांना काढण्यात आपली चूक झाली हे मान्य करणे दूरच राहिले अंथरूणाला खिळलेल्या ८७ वर्षांच्या हाडाच्या काँग्रेस कार्यकर्त्याला उपकार केल्याप्रमाणे पक्षात परत घेतले गेले. त्यानंतर २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान त्यांचे निधन झाले.
तर अशी होती या खर्याखुर्या शर्माजींची गोष्ट. तरीही असले लोक पक्षासाठी राबत राहतात आणि त्यांच्या हाती धुपाटणेही येत नाही.
दिवसेंदिवस भाजपमध्ये (निदान महाराष्ट्रात तरी) अशा खर्याखुर्या शर्माजींची संख्या वाढत चालली आहे हे पण खेदाने नमूद करावेसे वाटते.