राहुलचे सल्लागार ?? (दिल्ली गुजरात निवडणूक)

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in राजकारण
11 Jan 2023 - 5:48 pm

बऱ्याच महिन्यानंतर शर्माजी(काल्पनिक नाव) बिंदापूरच्या चौकात वर्तमानपत्र वाचताना दिसले. शर्माजीचे वय 80 ते 85च्या मध्ये असेल. जेव्हा मी 1988 मध्ये उत्तम नगर भागात राहावयास आलो तेव्हापासून शर्माजींना पांढऱ्या दाढीचा बघत आलो आहे. शर्माजींचा व्यवसाय प्रॉपर्टी डीलरचा होता. याशिवाय ते काँग्रेसचे खंदे प्रचारक होते. त्यांच्या घरात नेहरू आणि इंद्राजी सोबत त्यांचे अनेक फोटो होते. निवडणुकीच्या काळात तर त्यांचा अंगात भूत संचारत असे. अनेक बूथांची व्यवस्था ते जातीने बघत असे. त्यात ते भरपूर कमिशन ही बनवत असे, असे लोक म्हणतात. ते स्वतः अनेकदा मला म्हणत, जोपर्यंत त्यांच्या अंगात दम होता या भागातून काँग्रेस कधीच हरली नाही. त्यांचे म्हणणे ही खरे होते. मुकेश शर्मा सलग तीन वेळा या भागातून विधायक निवडल्या गेले होते.

औपचारिक विचारपूस झाल्यावर मी त्यांना छेडण्यासाठी म्हणालो आता तर आपने एमसीडी मध्ये ही झाडू लावला. शर्माजी म्हणाले पटाईत, खरे म्हणाल तर यावेळी काँग्रेसला पुन्हा दिल्लीत वापसीचा बढ़िया मौका होता, पण मौका हातचा गेला. मी म्हणालो कश्यावरून?? ते म्हणाले भ्रष्टाचाराच्या आरोपात सत्येंद्र जैन समेंत अनेक आपिये जेल मध्ये आहे. दिल्ली दंग्यात आप नेत्यांनी पुढाकार घेतला होता, त्यात ही अनेक आपिये जेल मध्ये आहे. आपच्या या कृत्यामुळे दंगा ग्रस्त भागातील विशेषकरून मुस्लिम समाज हा आपपासून नाराज आहे. दिल्लीत १५ टक्याहून जास्त मुस्लिम समाज आहे. काँग्रेसचे जिंकणारे ९ पैकी ७ मुस्लिम उम्मीदवार आहेत. अर्थात जिथे काँग्रेसचा थोडा बहुत प्रचार होता तिथे मुस्लिम मते काँग्रेसला मिळाली आहे. भारत जोडो यात्रा ८ डिसेंबर नंतर ही सुरू करता येत होती. लोकसभा निवडणूकीला भरपूर वेळ आहे. त्या ऐवजी राहुल गांधींनी ऑक्टोबर पासून एक महिना दिल्लीत पदयात्रा केली असती आणि रोज फक्त एक सभा घेतली असती तरीही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असता. काँग्रेसचा कार्यकर्ता आणि मतदार पुन्हा परतला असता. विशेषकरून मुस्लिम मते पुन्हा काँग्रेस कडे वळली असती. काँग्रेस जिंकली नसती तरी दुसऱ्या क्रमांकावर निश्चित राहिली असती. ज्या राज्यांत काँग्रेस आणि भाजपात संघर्ष असतो तिथे काँग्रेसला पुन्हा सत्तेत येते. जसे आता हिमाचल आम्ही (जोर देऊन) पुन्हा जिंकला. आपला तिथे 1 टक्का मते ही मिळाली नाही. पण ज्या राज्यांत तिसरी पार्टी सत्तेत येते तिथे भाजप तिथे नंबर दोन होते. काँग्रेसला पुन्हा सत्तेत येणे शक्य होत नाही. जसे उत्तर प्रदेश बिहार आणि बंगाल इत्यादी ठिकाणी झाले. गुजरात मध्ये ही महिनाभर राहुलजी फिरले असते आणि रोज सभा घेतल्या असत्या तर तिथे ही काँग्रेसला ५० हून जास्त जागा मिळाल्या असत्या. आपला तिथे 9 टक्के मते मिळाली नसती. राहुलची २०२४ची दावेदारी ही मजबूत झाली असती. 2024च्या युतीसाठी ही काँग्रेसचे परडे जड झाले असते. राहुलजी मोदींना टक्कर देऊ शकतात हा विश्वास निर्माण झाला असता. शेवटी दोन चार आई बहिणींच्या शिव्या खरेगे इत्यादींना देत, शर्माजी म्हणाले, या संघींनी निवडणुकीचे रणांगण सोडून आमच्या सेनापतीला भारत जोडो यात्रेच्या हनिमून मध्ये पाठवून दिले. काँग्रेसच्या दारुण पराभवाचे शर्माजींना किती दुःख झाले हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शर्माजींच्या बोलण्यातले तथ्य मलाही पटत होते. दिल्ली गुजरातचा मोर्चा लढविणे भारत जोडो यात्रापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण होते हे कॉँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना कळत होते पण सल्लागारांना का कळले नाही, हा प्रश्नचिन्ह आहे. बाकी यात्रेचे म्हणाल तर यात्रा कौरव पांडव पर्यन्त पोहचली आहे. शर्माजींच्या भाषेत राहुलचे भाषण लिहाणारे निश्चित संघी आहेत. बाकी सहज आठवले त्याकाळचे गुजराती अडाणी(सोन्याची द्वारकेचा राजा कृष्ण) पांडव सोबत होते.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

17 Feb 2023 - 4:38 pm | श्रीगुरुजी

दिवसेंदिवस भाजपमध्ये (निदान महाराष्ट्रात तरी) अशा खर्‍याखुर्‍या शर्माजींची संख्या वाढत चालली आहे हे पण खेदाने नमूद करावेसे वाटते.

मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप या दोघांना जवळपास अत्यवस्थ अवस्थेत रूग्णवाहिकेतून पुण्यातून मुंबईत मतदानासाठी नेण्यात आले. काही महिन्यांनंतर दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर पोटनिवडणुकीसाठी जगतापांच्या पत्नीला उमेदवारी दिली, पण टिळक कुटुंबियांना उमेदवारी नाकारली.

अत्यंत गंभीर आजारी असलेल्या गिरीष बापटांना आग्रह करून नाकात प्राणवायूची नळी असलेल्या अवस्थेत प्रचारासाठी आणले गेले. आज त्यांना पुन्हा एकदा मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत तुमच्या कुटुंबियांना उमेदवारी देऊ असे खोटे आश्वासन देऊन त्यांना प्रचारात आणले असावे. अर्थात तशीच वेळ आली तर कुटुंबियांना डावलले जाणार हे नक्की.

जेमतेम दीड वर्ष मुदत शिल्लक असलेल्या विधाधसभेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी फडणवीस कसबा मतदारसंघात अनेक दिवसांपासून तळ ठोकून आहेत व विजयासाठी आटापिटा करीत आहेत. ही एक जागा जिंकल्याने किंवा हरल्याने सरकारला कणभरही धोका नाही. परंतु त्यासाठी बापटांच्या जिवाशी खेळ चालू आहे. सत्तातुराणाम् न भयम् न लज्जा ।