भाग १ इथे.
नमस्कार रूळगाडी मित्रांनो !
आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार !
या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.
तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... !
प्रतिक्रिया
7 Sep 2022 - 8:16 pm | बोका
शॉकचा धोका कमी असतो. ही प्रणाली शक्यतो अशा ठिकाणी वापरतात जिथे माणसांना मर्यादित प्रवेश असतो, जसे की मेट्रो मार्ग. मेट्रो मार्गावर रेल्वे रूळ ओलांडणारी जनता नसते. फलाटावर आजकाल platform screen doors असतात , त्यामुळे प्रवासी रूळ ओलंडू शकत नाहीत. दुरुस्ती कर्मचारी सुद्धा वीजप्रवाह बंद केल्यावर प्रवेश करु शकतात.
तसेच तीसर्या रुळावर वीजरोधक आवरण असते. वीजप्रवाह खालील किंवा बाजूकडून घेतला जातो.
खालील चित्रात पिवळ्या रंगात वीजरोधक आवरण दिसत आहे.
7 Sep 2022 - 8:29 pm | कुमार१
ओह, मग चांगले आहे.
आभार !
3 Sep 2022 - 9:22 pm | कुमार१
मुंबई-चेन्नई मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण
5 Sep 2022 - 7:54 am | कुमार१
आपल्या राजधानीचे रेल्वेस्थानक अत्याधुनिक करायचे ठरले आहे.
त्याचे प्रारूप रेल्वे मंत्रालयाने जालावर जाहीर केले आहे.
त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत
5 Sep 2022 - 8:11 am | जेम्स वांड
असे 3डी, फोटोशॉप, कोरल ड्रॉ प्लॅन कायमच दिसतात, ग्राउंड वर काही होत नसतं. ते नई दिल्ली रेल्वे स्टेशन बघितल्यावर खात्री पटते त्याची.
हे सगळे चकाचक करण्यास हरकत नाही किंवा उगाच टीका म्हणून टीका नाही पण हे इमले उभे करण्या अगोदर
१. सगळी रेल्वे स्टेशन access controlled करा, स्टेशनवर entry / exit ठरवलेले असतील तितकेच, उगाच "रुळा शेजारून डायरेक्ट नाका" वाटा थेट बंद
२. प्लॅटफॉर्म वगैरे सोबत ड्रेनेज, पावसाळी पाणी निचरा (मुंबई स्पेशल दिवास्वप्न) ह्याची चोख व्यवस्था
३. पाण्याचे / मुताऱ्यांचे गळके नळ अन् अमोनियाच्या वासाने भारलेले ते वातावरण हलके करायला हवे पहिले.
४. नाशिवंत माल ब्रेक व्हॅन मधून नेण्या आणण्यासाठी, लॉजिस्टिक्स पुन्हा work करायला हवेत, मासळीने भरलेले क्रेट्स इत्यादी गळत लळत प्लॅटफॉर्म वर पडलेले असतात ते rectify करा, गाडी पिट लाईन, वॉशिंग लाईन वरून आली की अमुक इतक्या वेळात ते नाशिवंत माल घेऊन यायचा, फ्रोजन ब्रेक व्हॅन मध्ये लोड करण्याची प्रोसीजर व्यवस्थित फॉलो व्हायला हवी.
5 Sep 2022 - 8:21 am | कुमार१
अगदी बरोबर
मूलभूत सुविधांकडे आधी लक्ष दिले पाहिजे.
5 Sep 2022 - 8:25 am | कंजूस
थोडे दिवस दसऱ्यापर्यंतच आहे.
5 Sep 2022 - 8:41 am | निनाद
रेल्वेचे प्रमुख उत्पादन युनिट या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत डबे, चाके, लोकोमोटिव्ह आणि इतर रोलिंग स्टॉकचे उत्पादन उद्दिष्ट पूर्ण करण्यात अनेक कारणांमुळे अयशस्वी ठरले. ७३० डबे तयर करण्याचे लक्ष्य असतांना फक्त ५८ डबे तयार केले गेले.
या आर्थिक वर्षाच्या उर्वरित महिन्यांत यात सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित महिन्यांत, उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.
5 Sep 2022 - 8:53 am | जेम्स वांड
लक्ष्य - ७३० डबे
उत्पादन - ५८ डबे
मग
या आर्थिक वर्षाच्या उर्वरित महिन्यांत यात सुधारणा होण्याची शक्यता आहे
ह्या शक्यतेला बेसिस काय म्हणता ?
8 Sep 2022 - 9:02 am | निनाद
आशादायी असावे. :)
आता या ५८ पेक्षा ही कमी उत्पादन होईल असे तरी कसे म्हणता येईल?
असो,
आधी पुरवठ्याचे अनेक प्रश्न होते. ते प्रश्न सोडवत आणले असावेत म्हणून...
10 Sep 2022 - 11:01 am | कुमार१
भारतीय रेल्वेतून पाळीव प्राणी( कुत्रा व मांजर) नेण्यास परवानगी - फक्त १ एसी या वर्गातून आणि तेसुद्धा संपूर्ण 4 सीट्स आरक्षित करून.
आरक्षण प्रवासाच्या आधी काउंटरवर जाऊन करावे लागणार.
प्राण्याच्या वजनानुसार पैसे आकारणार.
10 Sep 2022 - 11:33 am | कुमार१
वरील माहिती पाळीव प्राणी 'प्रवाशांसोबत' नेण्यासंदर्भात आहे.
13 Sep 2022 - 11:20 am | अनिकेत वैद्य
ह्याच संदर्भातली हि एक अतरंगी बातमी
दुवा १
दुवा २
दुवा ३
13 Sep 2022 - 11:55 am | कुमार१
कठीण आहे !
घोडा मालकाला अटक झाली ते योग्यच
10 Sep 2022 - 12:10 pm | मदनबाण
संदर्भ :- Indian Railways: Third Vande Bharat train completes trial! Likely to run between THESE cities
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron James
12 Sep 2022 - 5:20 pm | कुमार१
आधुनिक सिग्नल आणि संपर्क व्यवस्था असतानाही रेल्वेची एक जुनीपुराणी पद्धत अजून चालू असल्याचे वाचून अचंबा वाटला.
जेव्हा एखादी ट्रेन स्टेशनमध्ये घेण्यास जागा नसते तेव्हा ती मागे काही अंतरावर (होम सिग्नल) उभी करून ठेवतात. जर का असा थांबवून ठेवण्याचा कालावधी 15 मिनिटांपेक्षा जास्त असल्यास गार्डने आपल्या ट्रेनच्या मागे सुमारे 1.2 किलोमीटरपर्यंत जाऊन रुळांवर स्फोटके ठेवायची असतात. जर का मागून एखादी ट्रेन येत असेल तर तिला पहिल्या ट्रेनला पुढे अडथळा आहे हे समजावे म्हणून. ही दुसरी ट्रेन त्या स्फोटकांवरून गेल्यावर ती फुटतात.
आता या जुन्यापुराण्या पद्धतीवर रेल्वे पुनर्विचार करत आहे हे चांगले.
14 Sep 2022 - 7:40 pm | कुमार१
जगातील सर्वात उंचीवरील रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाचे नवे फोटो रेल्वेने प्रसिद्ध केले आहेत.
16 Sep 2022 - 5:28 pm | कुमार१
भारताची हायड्रोजन इंधनावर चालणारी पहिली ट्रेन 2024 मध्ये येणे अपेक्षित आहे.
त्यासाठी विविध उद्योगांमध्ये पूर्वतयारी सुरू झालेली आहे
23 Sep 2022 - 4:23 pm | कुमार१
उद्या अहमदनगर ते आष्टी मार्गावर पहिली प्रवासी रेल्वे धावणार,
26 Sep 2022 - 3:31 pm | कुमार१
दक्षिण आफ्रिकेतील पहिली सौरऊर्जेवर चालणारी ट्रेन तिथल्या 20 पौगंडावस्थेतील मुलांनी मिळून तयार केली आहे. आता तिच्यावर पुढील प्रयोग होतील
<
26 Sep 2022 - 3:32 pm | कुमार१
26 Sep 2022 - 3:33 pm | कुमार१
https://techxplore.com/news/2022-09-safrica-teens-solar-power-commuters....
28 Sep 2022 - 8:39 pm | कुमार१
ओमान ते यु ए इ रेल्वेचा प्रस्ताव
दोनशे किलोमीटरच्या वेगाने ते अंतर 100 मिनिटात कापणार
https://www.thearabianstories.com/2022/09/28/you-can-soon-travel-from-om...
30 Sep 2022 - 4:49 pm | अनिकेत वैद्य
माननीय पंतप्रधान ह्यांच्या हस्ते ह्या नव्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखून उदघाटन करण्यात आले.
ह्यावेळी पंतप्रधानांनी गांधीनगर ते अहमदाबाद असा रेल्वे प्रवासही केला.
30 Sep 2022 - 4:51 pm | अनिकेत वैद्य
ह्यापूर्वी दिल्ली ते वाराणसी आणि दिल्ली ते कटरा ह्या दोन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु असून हि तिसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे.
30 Sep 2022 - 4:56 pm | कुमार१
तिसरी वंदे भारत एक्सप्रेस >>छान !
.......
आता थोडी करमणूक :
हे पहा...
झोपेतून उठवणार उचलून नेणार ??
https://www.maharashtranama.com/business-tourism/irctc-railway-ticket-bo...
"या सुविधेचा फायदा कोणी घेऊ शकतो. यामध्ये रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी वीस मिनिटे आधी तुम्हाला उचलून नेण्यात येणार आहे. यासाठी फक्त तीन रुपये मोजावे लागतील"
(ते फोन करून वीस मिनिट आधी आपल्याला झोपेतून उठवणार आहेत !)
:)))))))
1 Oct 2022 - 3:31 am | कुमार१
.रेल्वे सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर. तीव्र इंधन तुटवडा
संपूर्ण देशात फक्त दोन प्रवासी गाड्या धावत आहेत
26 Oct 2022 - 2:49 pm | कुमार१
नॉर्वेमधील ध्रुवीय प्रकाश पाहण्यासाठी ट्रेन सेवा उपलब्ध
https://www-euronews-com.cdn.ampproject.org/v/s/www.euronews.com/travel/...
30 Oct 2022 - 1:35 pm | कुमार१
स्वित्झर्लंड मधील रेल्वेला 175 वर्षे पूर्ण होत असल्याने ते आता एक विक्रम करीत आहेत.
जगातील सर्वात लांब असलेली प्रवासी ट्रेन (1,910m) त्यांच्याकडे धावणार आहे.
11 Nov 2022 - 8:27 am | कुमार१
भारतीय रेल्वेच्या एकूण ब्रॉडगेज मार्गांपैकी 82 टक्के भागाचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे.
छान
11 Nov 2022 - 8:27 am | कुमार१
भारतीय रेल्वेच्या एकूण ब्रॉडगेज मार्गांपैकी 82 टक्के भागाचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे.
छान
11 Nov 2022 - 9:58 am | कंजूस
हा घाट चढताना घ्यावा लागतो मागे एंजिनं जोडण्यासाठी. पण तो अधिकृत स्टॉप असेलच असे नाही.(इथून तिकिट मिळणार नाही.)
डेक्कन एक्सप्रेस ११००७ चार हा स्टॉप काढला आहे. नेरळचा स्टॉप आहे.
11 Nov 2022 - 1:49 pm | कुमार१
काही महत्त्वाच्या स्थानकांचे नूतनीकरण होणार आहे. तिथल्या रेल्वे मार्गा ंमध्ये पारंपरिक दगडांचा वापर न करता काँक्रीट पद्धतीचे मार्ग बनवले जाणार आहेत.
11 Nov 2022 - 2:15 pm | कंजूस
पण आता बायो टॉइलेट्समुळे गाड्या जिथे बराच वेळ थांबतात त्या स्टेशनांतील रुळांवर जमा होणारी घाण जवळपास नष्ट झाली आहे. उदाहरणार्थ कल्याण,पुणे.
11 Nov 2022 - 2:22 pm | कुमार१
बरोबर
एकेकाळी सकाळच्या वेळी या स्थानकांवर गेले असता दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावूनच हिंडावे लागत असे.
12 Nov 2022 - 6:57 am | कुमार१
मुंबईमध्ये सातवे रेल्वे टर्मिनस लवकरच होणार….
जोगेश्वरीला
https://marathi-hindusthanpost-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.hindus...
12 Nov 2022 - 10:59 am | प्रसाद_१९८२
भारतात सर्वात जास्त अंतर कापणार्या श्रीमाता वेष्णोदेवी कटरा ते कन्याकुमारी, हिमसागर एक्सप्रेसने मी जम्मु ते कन्याकुमारी १४ नोहेंबरला प्रवास करणार आहे. ही ट्रेन ४ दिवसात तीन हजार सातशे नव्वद कि.मी अतंर कापून कन्याकुमारीला पोहचते.
12 Nov 2022 - 11:05 am | कुमार१
तुमच्या या लांबवरच्या प्रवासाला शुभेच्छा !
अनुभव जरूर लिहा
12 Nov 2022 - 11:39 am | सुबोध खरे
https://www.india.com/travel/articles/5-longest-train-journeys-in-india-...
5. Vivek Express – Dibrugarh to Kanyakumari
Vivek Express from Dibrugarh (Assam) to Kanyakumari (Tamil Nadu) is the longest route of the Indian Railways network both in terms of distance and time. This weekly train is currently the longest train route in the Indian Subcontinent. It covers a total distance of 4,286 kilometres with a running time of 80 hours and 15 minutes.
12 Nov 2022 - 11:40 am | सुबोध खरे
Kashmir Himsagar Express – Kanyakumari and Shri Mata Vaishno Devi Katra
Kashmir Himsagar Express is a weekly express train running between Kanyakumari (Tamil Nadu) and Shri Mata Vaishno Devi Katra (Jammu and Kashmir). It is currently the second longest running train in terms of distance and time.
The train covers a distance of 3,787 kilometres in 72hours passing through 12 states.
17 Nov 2022 - 9:17 am | कुमार१
UTS ॲप वापरून जनरल तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना आता स्थानकापासून २० किलोमीटरपर्यंत दूर असताना देखील असे तिकीट काढता येणार आहे. पूर्वी ही मर्यादा दोन किलोमीटर होती.
20 Nov 2022 - 7:13 pm | कुमार१
Airoli and Rabale
रेल्वे स्थानकांच्या नावांमधील घोळामुळे तिकीट आरक्षण करताना प्रवाशांना त्रास
21 Nov 2022 - 11:23 am | कंजूस
जीपीएस आणि इंटरनेट लागतं. ते भरोशाचं नाही.
***********
करोनामधून मुंबईकर सुटले पण रेल्वेच्या मेगा ब्लॉकमध्ये अडकले. रात्री नऊ ते सकाळी नऊ दूर जाणाऱ्या गाड्या पनवेल/पुणे वरून सोडतात/पर्यंतच चालवतात.
21 Nov 2022 - 11:25 am | कुमार१
स ह म त .
21 Nov 2022 - 11:31 am | अनिकेत वैद्य
<< रात्री नऊ ते सकाळी नऊ दूर जाणाऱ्या गाड्या पनवेल/पुणे वरून सोडतात/पर्यंतच चालवतात. >>
नक्की कोणत्या गाड्या?
१९, २० नोवेंबर रोजी मेगाब्लॉक असल्याने बर्याच गाड्या पनवेल, पुणे, दादर पर्यन्तच होत्या.
कायमस्वरुपी पनवेल, पुणे पर्यन्त थंबणार्या/निघणाय्रा गाड्या कोणत्या?
21 Nov 2022 - 1:22 pm | कंजूस
Train shedule पाहू नका.
कुर्ला टर्मिनस आणि छ.शिवाजी मी.टर्मिनसच्या बऱ्याच गाड्या पनवेल/पुणे ला कापल्या आहेत.
पण 12201 कुर्ला - कोशुवेली त्रिवेंद्रम आज कुर्ला येथूनच आहे.
दादरच्या गाड्या पूर्ण चालत आहेत.
अगदी 16345/46 नेत्रावती रात्री ९ ते सकाळी नऊ मध्ये नाही तरी पनवेलला कापली आहे.
तुमच्या गाडीचे आरक्षण मिळते का पाहा. ते नसणार आणि ठळक सूचना येते. उदाहरणार्थ नेत्रावती गाडीचे ठाणेपासून आरक्षण मिळत नाही,पनवेल विचारल्यावर येते.
प्रवासी दुरून येणार आणि पनवेलला उतरवणार म्हणजे कठीणच.
एकूण मुंबईतील गर्दी पनवेलला ढकलण्याची खटपट वाटते आहे. उप्रकडे जाणाऱ्या गाड्या आगामी काळात ठाकुर्ली टर्मिनस/कल्याण वरून सोडण्याचा रेल्वेचा विचार आहे.
टॅक्सीवाल्यांना बरे दिवस येणार. पनवेल ते मुंबई. कारण लोकल ट्रेनने जाणे शक्य नाही. दीड तासाच्या रेल्वे प्रवासाला ट्राफिकमधून पाच तास लागतील.
8 Dec 2022 - 1:37 pm | अनिकेत वैद्य
बातमी मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनसवर वर्षभरात दोन नवीन फलाट; मेल-एक्स्प्रेस सोडण्याची क्षमता वाढणार
सदर बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे,
"एलटीटीत नवीन फलाट बांधण्याचे काम सुरू असल्याने नेत्रावती, मत्स्यगंधा, कामख्या एक्स्प्रेस सध्या पनवेलमधून सोडण्यात येत आहेत. १२ डिसेंबरनंतर या गाड्या पुन्हा एलटीटीमधून सोडण्यात येणार आहेत."
हे कारण असावे.
22 Nov 2022 - 8:26 am | कुमार१
रेल्वे रुळावर टाकण्यात येणारे दगड मेट्रोच्या रुळावर का टाकले जात नाहीत?
https://www.loksatta.com/explained/why-local-train-tracks-have-stones-un...
22 Nov 2022 - 11:02 am | विजय_आंग्रे
शकुंतला रेल्वे
--
शकुंतला रेल्वे
--
हि रेल्वे चालवण्यासाठी २०१६ पर्यंत भारतीय रेल्वेला ब्रिटीशांना रॉयल्टी द्यावी लागत होती.
22 Nov 2022 - 11:25 am | कंजूस
भारतीय रेल्वेही माहिती देत नाहीत.
माथेरान रेल्वे सुरुवातीला खासगीत होती. पण नंतर ती मध्य रेल्वेने घेतली. पण त्याचा उल्लेख करायचं रेल्वे टाळणे.
22 Nov 2022 - 11:54 am | सुरिया
१८६२ ला बैलाद्वारे ओढली जाणारी ट्रामवे म्हणून शुभारंभ झालेल्या प्रोजेक्टची लातूर ते मिरज व्हाया बारसी टाउन अशी बारसी लाईट रेल्वे कंपनीची ३२५ कीमी ची नॅरोगेज लाईन १८९७ पासून १९५४ पर्यंत खाजगीच होती. १९५४ ला ती भारतीय रेल्वेने विकत घेतली.
26 Nov 2022 - 11:35 am | कुमार१
सध्या भारतीय रेल्वेचे एकूण 19 कार्यकारी विभाग (zones) आहेत. त्यामध्ये आता नव्या एकाची भर पडणार आहे तो म्हणजे:
South Coast Railway Zone
त्याचे मुख्यालय विशाखापट्टणम असेल.
27 Nov 2022 - 4:47 pm | कंजूस
विजयवाडा जंक्शन का नाही?
अमरावती आंध्राची नवीन राजधानी इथे बांधत आहेत. म्हणून East coast railway चे दोन भाग करून दक्षिण भागाचे मुख्यालय तिथे काढायला हवे.
27 Nov 2022 - 5:14 pm | कुमार१
गरजेनुसार वळणावर कलणाऱ्या गाड्या
वंदे भारतसाठी निर्मिती होणार :
https://m-economictimes-com.cdn.ampproject.org/v/s/m.economictimes.com/i...
3 Dec 2022 - 11:39 am | कुमार१
रेल्वेची घरपोच पार्सल सेवा : गतीशक्ती एक्सप्रेस कार्गो
रेल्वे व टपाल प्रशासनाने एकत्र येऊन ही सेवा द्यायचे ठरवले आहे. घरी येऊन पार्सल घेणार व प्राप्तकर्त्याच्या घरी पोचवणार .
अशा सेवेची ट्रेन गरज भासल्यास संपूर्ण पार्सल रेल्वे असेल. त्याच्या डब्यांची रचनाही वेगळी केलेली असेल.
जानेवारी 2023 पासून पुणे शहरात चालू होणार.
4 Dec 2022 - 9:17 pm | कुमार१
बातमी
‘युनेस्को’च्या पुरस्कारास पात्र ठरलेली दुसरी वास्तू म्हणजे, मुंबईतील मध्य रेल्वेवरील भायखळा रेल्वे स्थानक होय. रोजचा प्रवास करीत असताना ब्रिटिश काळात उभारलेल्या अशा ऐतिहासिक बांधकामांकडे लक्ष देऊन पाहिले जात नाही; त्यामुळे त्यांचे स्थापत्यसौंदर्य नजरेस पडत नाही. भायखळा स्थानकाचे बांधकाम १८८७मध्ये सुरू करून १८९१मध्ये पूर्ण झाले. याचाच अर्थ असा, की हे स्थानक १२५ वर्षे जुने आणि भारतातील सर्वांत जुने रेल्वे स्थानक आहे
13 Dec 2022 - 8:00 pm | कुमार१
रेल्वे चाहत्यांसाठी रेल्वेचे तीन अक्षरी वर्डल :
https://irfca.org/irfca-wordle/
ज्या स्थानकांचा संकेत तीन अक्षरी असतो तशी स्थानके नेहमीच्या पद्धतीने ६ प्रयत्नात ओळखणे.
16 Dec 2022 - 8:25 am | कुमार१
83 टक्के पूर्ण झाले आहे असे दिसते
https://swarajyamag-com.cdn.ampproject.org/v/s/swarajyamag.com/amp/story...
1 Jan 2023 - 9:59 am | कुमार१
यात्रीगण कृपया ध्यान दें!'
.. रेल्वे स्टेशनवर ऐकू येणारा हा आवाज कोणाचा?
हा गोड आवाज सरला चौधरी यांचा आहे.
त्यांनी ही उद्घोषणा प्रथम १९८२ मध्ये केली.
....
सर्व रेल्वेप्रेमी तसेच सर्व मिपाकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
25 Jan 2023 - 7:53 am | कुमार१
लवकरच या मार्गावरील शताब्दी बंद होऊन त्याऐवजी वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे
तिचा वेग 110 किलोमीटर प्रति तास एवढाच असेल
प्रवासी भाड्यात मात्र 40 ते 50 टक्के वाढ होणार आहे
31 Jan 2023 - 2:16 pm | कुमार१
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन 10 फेब्रुवारीला होणार.
10 Feb 2023 - 11:10 am | अनिकेत वैद्य
माननीय पंतप्रधान ह्यांच्या हस्ते आज (१० फेब्रुवारी २०२३) रोजी मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अश्या दोन वंदे भारत एक्सप्रेसचे उदघाटन होत आहे.
कसारा ते इगतपुरी ह्या थळ घाटात आणि कर्जत ते लोणावळा ह्या भोर घाटात बँकर्स न लावता हि गाडी जाऊ शकते.
सोलापूर ते मुंबई ह्या प्रवासाला ६ तास ३० मिनिटे वेळ लागणार असून प्रवास भाडे साधारण ११०० रु आहे.
पुणे ते मुंबई ह्या प्रवासाला ३ तास २० मिनिटे लागणार असून प्रवास भाडे साधारण ७७० रु. आहे.
सोलापूरहून सकाळी ६:०५ वाजता हि गाडी निघून पुणे येथे सकाळी ९:१५ वाजता येईल.
पुणे येथील ९:२० वाजता निघून दुपारी १२:४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात मुंबई येथून दुपारी ४ वाजता निघून (पुणे ७:१५) सोलापूरला साधारण १०:३० वाजता पोहोचेल.
(मुंबई ते शिर्डी गाडीचे वेळापत्रक आणि प्रवासभाडे ह्याची माहिती मिळाली नाही.)
10 Feb 2023 - 11:28 am | कुमार१
मुंबई येथून सोलापूरला येणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या वेळेत बदल करून दुपारी चार ऐवजी संध्याकाळी सहा वाजता मुंबईहून सोडावी, जेणेकरून सकाळी सोलापूरहून आलेल्या व्यापारी व इतर लोकांना मुंबईतील त्यांची कामे उरकून संध्याकाळी पुन्हा सोलापूरकडे रवाना होता येईल असे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले.
11 Feb 2023 - 5:44 am | कंजूस
दोन शहरांमधील धावणाऱ्या जलद/अतिजलद गाड्या या फक्त व्यापारी पर्यटकांसाठी असतात. (असा समज आहे)खूप खूप सामान नेणाऱ्या प्रवाशांसाठी नसतात.
काल (मुंबईहून पुणे मार्गावर) पहिल्या वंदे भारताचा विडिओ डोंबिवलीत मिळवला. गाडीचा वेग १३०पर्यंत जाऊ शकतो. रूळ तसेच आहेत. मुंबई ते सोलापूर ही सहा तासांत जाणार आहे. दिवसा धावणारी मुंबई ते बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस सात तासांत जाते. पण उद्यानाला स्लीपर कोच आहेत. सामान भरपूर राहाते. कोकण रेल्वेवरच्या गाड्या १२० ने जातातच. त्यात नवीन काही नाही. ते रूळ मार्ग सुरवातीपासूनच १५०चे आहेत.
वंदे भारतचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला एंजिन वेगळे दिसत नाही. कर्जतला मागे बंकर एंजिने लावावी लागतात का हे कळले नाही. ती जोडण्याची दहा मिनीटे वाचतील. लोकल ट्रेनप्रमाणे डबे आहेत.
बऱ्याच गाड्यांप्रमाणे सोळा डबे होते. (सिकंदराबाद गाडीला ? २६ असतात.) परदेशातल्या जलद गाड्यांना चार/सहा/आठच डबे असतात. याने फरक पडतोच.
सिटा फिरवता येण्याच्या सोयीची दुसरी वाईट बाजू म्हणजे (बसच्या सिटा असणाऱ्या डब्यांतही) सीटखाली सामान ठेवता येत नाही. वरती फक्त फळी /रॅक आहे. त्यावर सामान ठेवण्यावरून मुंबई गोवा जनशताब्दी गाडीत भांडणे होतात. रेझर्वैशन असणारे प्रवासी इतर गाड्यांत धक्काबुक्की करून चढत नाहीत कारण प्रत्येकाला सामानासाठी भरपूर जागा असते. गोवा जनशताब्दी गाडीत तसे होत नाही. पहिला आत घुसेल तो वरच्या रॅकवर चार पिशव्या ठेवायला पाहतो. नंतरच्या प्रवाशाला जागाच नसते. भांडणे सुरू. गोव्याचे प्रवासी व्यापारी नसून हौशी सुटी घालविण्यासाठी जाणारे भरपूर सामान घेऊन जाणारे असतात.
थोडक्यात प्रवाशांच्या प्रकाराप्रमाणे गाडीची वेळ आणि प्रकार ठेवणे गरजेचे आहे.
मी तर म्हणेन की लोकल ट्रेनच चालवाव्यात. पण त्यांत टॉयलेट नसतात आणि १६० किमीच्या पुढे अशी गाडी ठेवता येत नाही. मुंबई पुणे थेट लोकल न ठेवण्याचे / जाण्याचे हेसुद्धा कारण आहे.
11 Feb 2023 - 8:50 am | कुमार१
खरंय !
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तर काही लोक एक क्विंटलच्या पोत्यासह, प्रवासी डब्यांमध्ये परवानगी नसलेले अवजड सामान ठेवतात.
अशा गाड्यांमधून लघुपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची एक बॅग ठेवायची देखील चोरी होते
12 Feb 2023 - 3:16 pm | अनिकेत वैद्य
<<कर्जतला मागे बंकर एंजिने लावावी लागतात का हे कळले नाही.>>
कसारा ते इगतपुरी ह्या थळ घाटात आणि कर्जत ते लोणावळा ह्या भोर घाटात बँकर्स न लावता हि गाडी जाऊ शकते.
<<थोडक्यात प्रवाशांच्या प्रकाराप्रमाणे गाडीची वेळ आणि प्रकार ठेवणे गरजेचे आहे.>>
सद्ध्या वन्दे भारतच्या बरोबरीने इतर (पुर्वी चालू असलेल्या) गाड्या आहेतच की.
उलट वन्दे भारत सुरु झाल्याने प्रवासी विभागले जाउन बाकिच्या गाड्यात तिकिटे मिळण्याची शक्यता वाढते.
12 Feb 2023 - 8:02 pm | कंजूस
प्रवासी विभागले जाउन बाकिच्या गाड्यात तिकिटे मिळण्याची शक्यता वाढते.
कसं काय?
त्या गाड्यांचे प्रवासी वेगळे आहेत.
12 Feb 2023 - 8:24 pm | रात्रीचे चांदणे
वेगळे प्रवासी कसे? गाड्या वाढल्यातर प्रवासी नक्कीच विभागले जातील. ज्यांना मुंबई वरून सोलापूरला जायचे असेल आणि ज्यांना भाडे परवडत असेल असे लोक नक्कीच वंदे भारत चा विचार करणार.
11 Feb 2023 - 10:18 am | कुमार१
सतत धावपळ आणि वेगवान जीवनाचा कधीतरी कंटाळा येतो ना मग अशा वेळेस प्रवास करायचा तो या कासवगती गाडीने :
१० किलोमीटर प्रति तास अशा नीचांकी वेगाने धावणारी भारतीय ट्रेन:
Mettupalayam ते उटी
भारतातील सर्वात वेगवान ट्रेनच्या फक्त एक १/१६ वेग असलेली ही पर्यटकांची लाडकी ट्रेन !
12 Feb 2023 - 4:01 pm | कुमार१
रेल्वेमंत्र्यांनी सांगितली 'वंदे भारत'ची यशकथा
13 Feb 2023 - 8:10 am | निनाद
ईशान्य रेल्वेचा (NER) वाराणसी विभाग १२७२ किलोमीटरचा मार्ग आता पूर्णपणे विद्युतीकृत झाला आहे. देशभर चाललेल्या विद्युतीकरण कार्यक्रमामुळे कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
14 Feb 2023 - 10:05 pm | मदनबाण
हल्लीच ही ट्रायल रन पाहण्यात आली आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Honthon Pe Bas | Zaara Yesmin, Parth Samthaan | Seepi Jha, Sameer Khan | Raaj Aashoo |
15 Feb 2023 - 10:34 am | कुमार१
वेगवान चित्रफित आवडली
16 Feb 2023 - 8:20 pm | कुमार१
अजबच! तब्बल नव्वद कंटेनर घेऊन जाणारी मालगाडी बेपत्ता, जाणून घ्या नेमकं काय घडलं
18 Feb 2023 - 5:38 pm | कुमार१
आज ट्रेन तिकीट काढताना वेबसाईट वारंवार गंडत होती म्हणून मोबाईलवरून तिकीट काढले. तिकीट काढताना चित्रात दाखवलेला पर्याय प्रथमच पाहण्यात आला.
आपण तिकिटाच्या रकमेत जर त्यांनी दाखवलेली रक्कम आधीच वाढवून दिली तर मग तिकीट रद्द करायची वेळ आल्यास ९२% रक्कम परत मिळणार असे ते म्हणत आहेत.
चित्रात दाखवलेल्या उदाहरणात तिकिटाला ७८२ रुपये पडले आहेत आणि त्यांच्या त्या योजनेचा लाभ घेतला तर ७२५ परत मिळणार असे ते म्हणत आहेत. मी काही तो लाभ घेतला नाही.
कुणाला अनुभव आहे का ?
18 Feb 2023 - 5:45 pm | कुमार१
तो लाभ घेतला तर ते तिकीट ७८२ + ९१ = ८७३ ला पडेल.
मग तो परतावा ८३% राहील.
काय वाटते अनुभवी लोकांना ?
18 Feb 2023 - 6:52 pm | कंजूस
ट्रेन तिकीट काढताना वेबसाईट वारंवार गंडत होती म्हणून मोबाईलवरून तिकीट काढले
रेल्वेचे रीफंड, रद्दीकरण यांचे नियम पक्के आहेत. किती तास अगोदर,नंतर,कोणते तिकिट वगैरे.
मोबाईलवरून म्हणजे आइआरसिटिसी/ दुसरी कोणती वेबसाईट?
18 Feb 2023 - 7:48 pm | कुमार१
रेल यात्री app
तो चित्रातला पर्याय मला वेबसाईटवरून तिकीट काढताना कधी दिसला नव्हता.
19 Feb 2023 - 6:33 am | कंजूस
म्हणजे शेवटच्या ४८तासांत रद्द केल्यास रेल्वे पन्नास टक्के कापते तसे मात्र करणार असतील.
त्या अगोदर प्रत्येक यात्रीचे रेल्वे कापते (रु८०,/१२०,/१८० )ते कापणार नसतील.
20 Feb 2023 - 9:09 pm | कंजूस
आजच्या हिंदुस्तान टाइम्समध्ये आहे.
21 Feb 2023 - 8:18 pm | कुमार१
भारतातील काही मोजक्या ट्रेन्स अशा आहेत की ज्यांचे निघण्याचे स्थानक एका राज्यात असते , त्यांचा जवळजवळ सर्व प्रवास दुसऱ्या मधल्या राज्यातून होतो आणि पोहोचण्याचे स्थानक तिसऱ्याच राज्यात असते.
याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे लोकनायक एक्सप्रेस (१५११५). तिचा प्रवास असा आहे:
सुरुवात : छपरा, बिहार
सर्वाधिक प्रवास (96.5%) उत्तरप्रदेश मधून
अंत : दिल्ली स्थानक.
रेल्वे शौकिनांनी खणून काढलेल्या माहितीनुसार असा त्रिराज्य प्रवास आणि मधल्या राज्यातून सर्वाधिक प्रवास करणारी ही पहिल्या क्रमांकाची गाडी आहे. ९६.५% पेक्षा अधिक या प्रकारचा प्रवास असणारी गाडी कोणाला सापडल्यास जरूर कळवा
पण लक्षात ठेवा :
मधला प्रवास फक्त एकाच वेगळ्या राज्यातून पाहिजे; एकापेक्षा अधिक नको.
22 Feb 2023 - 10:55 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gudilo Badilo Full VideoSong |DJ Duvvada Jagannadham ||
23 Feb 2023 - 3:24 pm | कुमार१
मुंबईहून दक्षिण राज्यांमध्ये जाणारे जे रेल्वे मार्ग आहेत त्यातल्या प्रमुख मार्गांवरचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. बऱ्याच टप्प्यांमध्ये अधिक सक्षम डबे आणि रूळ देखील टाकले गेलेले आहेत. असे असतानाही गाड्यांचे उशिरा धावणे चालूच आहे. काही गाड्या तर दोन स्थानकांच्या दरम्यान पूर्वीपेक्षा बराच वेळ अधिक घेत आहेत.
उदाहरणार्थ, उद्यान एक्सप्रेस सोलापूर ते पुणे हा प्रवासाचा वेळ सध्या तब्बल पाच तास आहे, जो पूर्वी चार तास वीस मिनिटेच होता.
आज प्रवास करताना हा विषय काही सहप्रवासी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर काढला. त्यांनी दिलेले उत्तर असे,
"हा सर्व मुद्दा स्थानकांवरील प्लॅटफॉर्म उपलब्ध नसण्याशी निगडित आहे. पुण्याहून मुंबई आणि उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या या "राजाच्या गाड्या" आहेत. त्यांनाच नेहमी प्राधान्य मिळते.
दक्षिणेकडून पुण्याला येणाऱ्या गाड्या या 'गरीब बिचाऱ्या' समजल्या जातात. त्यांना मिळेल तेव्हा आणि मिळतो तो प्लॅटफॉर्म कसाबसा दिला जातो.
पुणे सोलापूर सुपरफास्ट इंटरसिटीचा प्रवास आता मनात आणले तर तीन तासात संपवता येईल. परंतु वरील कारणास्तव ते होत नाही.
प्रवासात मधूनमधून एक्सप्रेस गाड्यांची गती अगदी बैलगाडी इतकी केली जाते "!
23 Feb 2023 - 3:30 pm | कुमार१
विद्युतीकरण आणि लोहमार्गांचे दुपदरीकरण या दुहेरी सुधारणा होऊन देखील प्रवाशांच्या वाट्याला संथ प्रवास !
30 Mar 2023 - 11:05 pm | संग्राम
Dedicated Freight Corridor
31 Mar 2023 - 6:49 am | कुमार१
अशी प्रगती व्हावी ही इच्छा.
13 Mar 2023 - 12:39 pm | कंजूस
हल्ली दक्षिणेकडच्या गाड्यांनी सहली झाल्या तेव्हा हे लक्षात आले. त्यांच्या काही खास गाड्या आहेत त्या उशिरा असल्या आणि आपली अगदी वेळेत चालणारी गाडी असली त्यांच दिशेने जाणारी तरी ती थांबवून त्यांना मागून पुढे काढून जाऊ देतात. यामध्ये पंचवीस मिनिटे वाया जातात. अशा तीन गाड्या पुढे काढल्या की दीड तास जातो. मधल्या स्टेशनांत प्रवास करणाऱ्यांना हे फार जाणवतं( चार तासांचा प्रवास साडेसहा तासांचा होतो.) परंतू दूर जाणार असलो तर मात्र आपली गाडी वेळेवर ( वेळापत्रकानुसार) जाते. हा चमत्कार कसा होतो? तर यात चमत्कार नसतोच. मुळात गाडी मागे पडण्याची भानगड धरूनच वेळापत्रकात जादा वेळ बसवलेली असते.
या राजधानी,हमसफर,दूरांतो गाड्यांना कायम हिरवा बावटा असतो. त्यांच्याकडे pantry नसली तर जेवण ठराविक स्टेशनावर आत आणले जाते. तेसुद्धा विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीतूनही फिरवतात. मग ती गाडी उशिरा असेल की हिलाही थांबवितात. शेवटी जेवणाची वेळ सांभाळायला हवी ना?
प्रवासात डोके थंड ठेवणे, धावत्या गाडीच्या बाहेर न काढणे हे नियम पाळले की त्रास होत नाही.
15 Mar 2023 - 10:03 am | सुबोध खरे
रेल्वेच्या डिव्हिजन असतात. तेंव्हा गाडी एका डिव्हिजन मधून दुसऱ्या डिव्हिजन मध्ये जाते तेंव्हा शेवटच्या स्थानात पोचण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जातो म्हणजे शेवटचे स्थानक ३०-३५ किमी असले तरी त्याला एक ते सव्वा तास दिला जातो म्हणजेच ती गाडी अर्धा पाऊण तास उशिराने धावत असली तरी डिव्हिजन संपेपर्यंत ती परत वेळेवर असते आणि गाडी पुढच्या डिव्हिजनच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली जाते तेंव्हा तो वेळेत असते.
अशीच अतिरिक्त वेळ गाडीच्या शेवटच्या स्थानकासाठी दिलेली आहे. यामुळे गाड्या मंदगतीने चालतात परंतु कागदोपत्री सर्व गाड्या वेळेवर चाललेल्या दिसतात.
उदा कोणार्क एक्स्प्रेस या गाडीला बेगमपेट ते सिकंदराबाद या पाच किमी अंतरासाठी २५ मिनिटे दिलेली आहेत.
किंवा अनकापल्ली ते विशाखपटनम या ३३ किमी ला ८० मिनिटे दिलेली आहेत.
आणि खुर्दा रोड ते भुबनेश्वर या शेवटच्या १९ किमी अंतरासाठी ५० मिनिटे वेळ दिलेली आहे.
https://indiarailinfo.com/train/-train-konark-express-11019/945/12282/238
17 Mar 2023 - 6:06 am | कंजूस
शहरे मोठी होत गेल्याने मुख्य शहरापासून पाच, दहा,पंधरा किमिटरवर परिसरातले अगोदरचे स्टेशनही नाव वेगळे असले तरी त्याचेच सावली भावंडं असते.तिथे प्रवाशांची खूप चढ उतार होते. गाडी जवळपास रिकामी होते/ भरते. त्याला वेळ दिलेला असतो. हे खरे कारण. मध्यंतरीच्या रेल्वे मार्गावर जर तो एकेरी असेल तर मात्र अधिक वेळ जमेस धरलेला असतो. तो वाया गेला तरी शेवटी गाडी वेळेवर पोहोचते.
भूवनेश्वरहून येताना रायपूर पर्यंत गाडी वेळेवर आली तरी स्टेशनाअगोदर दोन किमीटर अंतरावर एक तास थांबवून ठेवली. तेव्हा सहप्रवासी बोलले की इकडे बिहार डिविजनच्या गाड्या पुढे काढण्याची पद्धत आहे. तसेच झाले. एक द.बिहारची गाडी पुढे गेली तेव्हा आम्ही सुटलो.
2 Mar 2023 - 6:01 pm | कुमार१
हा एका एक्सप्रेस ट्रेन मधील शताब्दीसम डबा आहे. यातील मोबाईल चार्जिंग चे चित्र पहा
वरच्या प्लग मधून जो मोबाईल चार्ज होत आहे तो एकाने सामानाच्या जागेत ठेवला आहे. त्यापेक्षा एक कल्पना सुचली. स्वीच बोर्डच्या दोन्ही बाजूला पुरेशी जागा आहे. तिथे छानसे कप्पे करून दोन मोबाईल उभ्या स्थितीत चार्ज करता येतील.. तशी सोय सुचवावी असे म्हणतो.
काय वाटते ?