मला आवडली (न समजार्‍या) इतर भाषेतील गाणी

Trump's picture
Trump in जनातलं, मनातलं
22 Sep 2022 - 10:29 pm

मिपावरील (खफवरील) पुरंदर चर्चेवरुन गाडी कधी आ आंटेवर पोचली आणि मन अगदी जुन्या आठवणीत निघुन गेले. महाराष्ट्रात अगदी न समजार्‍या गाण्यांनी धुमाकुळ माजवला होता, आणि अजुनही आहे. :)

राणु राणु - तेलगु

------
मनमरासा - तामिळ

------
आ आंटे - तेलगु

------
आपडी पोडे - तामिळ

------
सध्या इंग्रजी कळत असले तरी हे गाणे सुध्दा परकीय भाषेतील म्हणुन आवडते.
KEEP AMERICA GREAT (Official Music Video) - Trump 2020 Song by Camille & Haley

------
इंदीला - फ्रेंच

------
ब्राझिल - इंग्रजी

------
I'll Do You Like A Truck - इंग्रजी

==================================================
तुमचीही आवडती गाणी इतर भाषेतील ऐकायला मजा वाटेल.

कलासंगीतआस्वादअनुभवमतशिफारस

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

23 Sep 2022 - 8:42 am | कर्नलतपस्वी

ट्रम्पभौ धाग्या बद्दल अभिनंदन आणी आभार.

माणसाचं मन म्हणजे गारूड्याची पोतडी. धागा वाचून झटकन १९८२-८३ च्या काळात ,चाळीस वर्ष मागे गेले. आयुष्यात काही गोष्टी विसरतच नाहीत.

एक आमचा मिझोरमचा मित्र होता,नाव "लियाना" आडनाव कधीच क्ळले नाही. नारायण धारपांच्या गुढ कथे सारखेच व्यक्तीमत्व. फारसा इतरां बरोबर मिसळत नसे. जेवणात फक्त भात,उकडलेली कोबीची पानं किवां चिकन,मटण,अंडे. मसालेदार पदार्थ आजिबात खात नसे. हुषार पण अंतर्मुख, मेहनती पण कुठलेही नॉन्सेन्स खपवून न घेणारा. परिणामाची पर्वा नाही कुठल्याही टोकाला जाऊ शकायचा. दारू कितीही पीली तरी कधीच चढलेली दिसली नाही. माझ्याशी कशी काय पत्रीका जुळली माहीत नाही. बाकी लोकं "यडा" आहे म्हणून नादी लागायची नाही. मला मात्र खुप आवडायचा. मलातर स्थितप्रज्ञ वाटायचा. फावल्या वेळात गिटार घेऊन इंग्रजी गाणी ऐकत बसायचा. संगीत मलापण आवडायचं. तो नेहमी एक गाणं ऐकायचा,त्याचे शब्द खालील प्रमाणे. इंग्रजीतील उच्चार फारसे कळायचे नाहीत पण संगीत मात्र गारूड करून गेले, आजही त्याची लय, आठवण आली की मनात रूंजी घालते. कदाचित तुम्हालाही आवडेल.लिकं खाली दिली आहे.

आज अंतरजालावर शोधून वाचल्यावर रचना किती सशक्त आहे याचाही प्रत्यय आला.

" Got nine million nine hundred ninety nine thousand nine hundred ninety nine tears to go

And then I don't know if I'll be over you

The sun didn't shine this morning it's been raining the whole day through

Suddenly without warning you found somebody new

That's when the first tear came falling from my eyes

I'm beginning to feel the pain seeing nothing but cloudy skies

Got nine million nine hundred
Well I'll be over you

You're out tonight with your new love I'm far far from your mind

Trying to get over you love could take a whole lifetime

I can't believe you could want anybody else so no one could take my place

At least that's what I keep telling myself as the tears fall down my face

Got nine million nine hundred
I'll be over you
Got nine million nine hundred
Got nine million nine hundred"

9,999,999 Tears" is a 1976 hit single by Dickey Lee. The song was written and originally recorded by American country music artist Razzy Bailey.

https://secondhandsongs.com/performance/455905

मित्राने कुठलेही प्रमोशन घेण्यास नकार दिला व लवकरच सेना सोडून निघून गेला.जाताना मी लखनऊ मधेच होतो आवर्जून भेटून गेला.

उन्मुक्त पक्षी होत,पिंजऱ्यात किती दिवस राहणार.

हम पंछी उन्मुक्त गगन के
पिंजरबद्ध न गा पाएँगे,
कनक-तीलियों से टकराकर
पुलकित पंख टूट जाएंगे।

हम बहता जल पीनेवाले
मर जाएंगे भूखे-प्यासे,
कहीं भली है कटुक निबोरी
कनक-कटोरी की मैदा से,"

हिन्दीचा प्रसिद्ध व माझे आवडते कवी,शिव मंगल सिह,'सुमन' यांची रचना.

माणसाचं मन म्हणजे गारूड्याची पोतडी. धागा वाचून झटकन १९८२-८३ च्या काळात ,चाळीस वर्ष मागे गेले. आयुष्यात काही गोष्टी विसरतच नाहीत.

हो, अगदी बरोबर. कोणती गोष्ट कधी आणि कशी माणसाला आवडेल ते सांगु शकत नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Sep 2022 - 9:23 am | ज्ञानोबाचे पैजार

त्यात अजुन एका गाण्याची भर घालतो

https://youtu.be/s_04SR1nCnA

काही जणांना हे गाणे पहाताना डोळ्याला त्रास होईल, अशांनी डोळे बंद करुन ऐकावे. मला अर्थात बघायला आणि ऐकायला दोन्ही आवडते.

पैजारबुवा,

धन्यवाद. छायाचित्रण जबराच आहे.

वामन देशमुख's picture

23 Sep 2022 - 9:27 am | वामन देशमुख

इंडिलाचं Dernière Danse माझंही आवडतं गाणं आहे.

त्याशिवाय, शहरातील धकाधकीच्या आयुष्यापासून दूर कुठेतरी जावंसं वाटतं, अश्या भावना व्यक्त करणारं "उरू वेलपोता मामा" हे गाणं इथं देतो. एकदाच ऐकलं तरी पुन्हा-पुन्हा ऐकावसं वाटेल.

---

तिसऱ्या व चौथ्या गाण्याचा विडिओ दिसत नाही; शेअरची परवानगी नाही.

तिसऱ्या व चौथ्या गाण्याचा विडिओ दिसत नाही; शेअरची परवानगी नाही.

धन्यवाद. कोणता विडिओ दिसत नाही?

नि३सोलपुरकर's picture

23 Sep 2022 - 9:54 am | नि३सोलपुरकर

वाह वा ,वामन राव . काय गाण सजेस्ट केलय .सुपर्रब .

चौरस्ता बँड ने कोरोनाव्हायरसवर प्रसारित केलेले गाणे ही खुप छान आहे .

भाऊ, दुवा द्या. इतरांनाही आनंद घेता येईल.

नि३सोलपुरकर's picture

26 Sep 2022 - 11:08 am | नि३सोलपुरकर

ट्र्म्प भाऊ,
नमस्कार ,वरिल गाणे ह्या दुवा द्वारे पाहता आणी ऐकता येईल .

https://www.youtube.com/watch?v=v-Qu0S8fje4 .

कुमार१'s picture

23 Sep 2022 - 11:32 am | कुमार१
चौकस२१२'s picture

23 Sep 2022 - 11:51 am | चौकस२१२
Bhakti's picture

23 Sep 2022 - 12:22 pm | Bhakti

विद्या वोक्स (Vidya Vox)
Pallivallu Bhadravalkakam

गीता गोविंदम मधली सगळी गाणी
येंती..

वचिंनदम

अजून (मुद्दाम इंग्लिशमध्ये लिहितेय ,तसे सर्च करता येतात)
-Inkum Inkum
-Jal Jal Jalpatham
-Padi padi leche
-Oh may lovely lalana
-Ramuloo Ramulaa
-Rowdy Baby
*अल्लूचे सगळे गाणे.

सुरिया's picture

23 Sep 2022 - 12:23 pm | सुरिया

एकदम नेत्र्सुखद म्हणता येईल असा डान्स आणि चित्रिकरण. धनुष आणि साईपल्लवी दोघेही नैसर्गिक अभिनयासोबत उत्तम नृत्यासाठीही ओळखले जातात. हे गाणे अगदी नीट पाहिले तर त्यात बर्‍ञाचशा स्टेप्स सलग आहेत आणि त्या तितक्याच अवघड आहेत पण धनुष सहजतेने नाचतो तर साईपल्लवी प्रचंड आनंद घेत एकदम जोशात परफॉर्म करते. एकदम फ्रेश लुक असलेले हे गाणे माझे फेवरिट आहे.

Bhakti's picture

23 Sep 2022 - 12:25 pm | Bhakti

:)+१११

कपिलमुनी's picture

23 Sep 2022 - 12:36 pm | कपिलमुनी
Bhakti's picture

23 Sep 2022 - 1:32 pm | Bhakti

पसूरी -वीणा वाद्यावर!

सुरिया's picture

23 Sep 2022 - 12:50 pm | सुरिया

ह्या गणेशोत्सवात हर हर शंभु सतत कानावर पडत होते. अभिलिप्सा पांडा नावाच्या ओरिसाच्या १८ वर्षाच्या मुलीने म्हणलेले हे गाणं यु ट्युबवर प्रचंड हिट झाले. अभिलिप्सा ४ वर्षाची असल्यापासून संगीत शिकतेय. घरात आजि आजोबापासून संगीताचा वारसा असलेल्या ह्या कराटे ब्लॅक बेल्ट होल्डर मुलीचा गायन करतानाचा कॉन्फीडन्स आणि आवाजातले टेक्श्चर खतरनाक आहे.

बरेचसे स्पॅनिश आणि एखादे वाक्य मधेच इंग्लिशमध्ये असलेले हे गाणे एक अक्षरही कळले नाही तरी ऐकायला आवडते.

गायिका नॅन्सी अजरेम

आणि या गाण्यावर हा त्यांचा लेख

अजून एक, याचे शब्द आवडतातच पण ठेका जास्त आवडतो

पैजारबुवा,

वरच्या यादीत हे गाणे बसत नाही, पण तरी सुध्दा डोक्यात जाम घर करुन बसले आहे.

आपल्या महाग्रुंच्या मुंबई अ‍ॅन्थमला पण थोबाडात मारेल असे हे गाणे आहे

पैजारबुवा,

लॉरी टांगटूंगकर's picture

26 Sep 2022 - 9:19 pm | लॉरी टांगटूंगकर

अजुन एक दोन अ‍ॅड करतो. डोळे आणि कानातून रक्ताच्या चिळकांड्या उडायची शक्यता असल्याने नवख्या लोकांनी टॉवेल वगैरे बांधून या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा
१) सलाम सेठ

२) जावेद भाई

३) एम एस जी यांचे सिस्टम हिल गया.

श्वेता२४'s picture

23 Sep 2022 - 3:32 pm | श्वेता२४

समंथा व नागा चैतन्य यांच्या माजिली या सिनेमातील गाणी तसेस समंथाच्या थेरी या सिनेमातील तीच्या लग्नाचे गाणे खूप आवडते. उच्चार लक्षात राहत नाहीत.

रॅटाटुई सिनेमात शेवटी हे गाणे आहे ते प्रचंड आवडते. (फ्रेंच)

गॉड मस्ट बी क्रेझी भाग २ मध्ये ह्या गाण्याचा एक स्निपेट ऐकला, तो आवडला म्हणून मूळ गाणे शोधले. हे "शोशालोझा" गाणे खाणी मध्ये काम करणाऱ्या आफ्रिकन पुरुषांचे गाणे आहे. एकाच वेळी आशादायक आणि खिन्न वाटते मला हे गाणे ऐकून.

आणि आफ्रिकेबद्दल बोलतोय आहे तर अभूतपूर्व व्होकल्स आणि श्रवण अनुभव असणारे लायनकिंग मधले हे गाणे घ्यायलाच हवे-

एक आवडलेले ऍनिमे शीर्ष गीताचे भारतीय गायकाकडून सादरीकरण-

रामचंद्र's picture

24 Sep 2022 - 9:09 pm | रामचंद्र

'अमे हसीबा' ... काहीसे जुन्या वळणाचे पण गोड उडिया गाणे आहे. शब्दही थोडेफार परिचित वाटतात. खऱ्याखुऱ्या तरुणमंडळींचे गाणे वाटते.
https://youtu.be/x__HoVg9Etk

चाल लावून एखादं गाणं बसवणं या मल्याळी गाण्यात छान दाखवलंय. https://youtu.be/ZzrR2emvpIE
हे एका मल्याळी चित्रपटातल्या विनोदी गाण्यावर बेतलं आहे पण याचे शब्द हे 'डमी' शब्द आहेत, कुठल्याही भाषेतले नाहीत. काही जणांना नक्कीच परिचित असेल. https://youtu.be/ZzrR2emvpIE
करुणरसातले हे उडिया गाणे. यातली प्रत्येक चित्रचौकट पहात रहावी अशीच आहे.
https://youtu.be/pmPq8SaR4bI
जगन्नाथभक्तीचे हे एक प्रसन्न उडिया गाणे
https://youtu.be/GhVM7p_jAns

ramjya's picture

26 Sep 2022 - 8:26 pm | ramjya

neerparvai movie song (para para para....)

तुषार काळभोर's picture

27 Sep 2022 - 8:13 am | तुषार काळभोर

सदासर्वकाळ आवडणारी आणि न समजणार्‍या भाषेतील ही काही गाणी

१. नव्वदीच्या दशकात प्रत्येक शाळकरी मुलाचा आवडता पाश्चात्य गायक -

२. मद्रदेशी अवचित पाहायला मिळालेल्या सुब्रमणियपुरम चित्रपटातील हे एक सुंदर प्रेमगीत.

३. काही वर्षांपूर्वी जगाला वेड लावलेलं गंगनम स्टाईल!

४. सिद्धार्थ आणि जेनेलिया ही नावे माहिती नसताना कॉलेजच्या नवीन दिवसांत आवडलेली ही दोन गाणी (चॅनल व्ही वर त्यावेळी पहिल्यांदाच अ-हिंदी आणि अ-इंग्रजी गाणी वाजली असतील!)
गर्लफ्रेंड -

डेटिंग -

५. त्याच सुमारास व्हीजे गौरवच्या चॅनल व्ही वरील एका शोमध्ये हे गाणं आठवड्यातून तीन-चार वेळा तरी आवडीने पाहायचो.
हिप-हॉपशी माझी ओळख करून देणारं गाणं : शॉन पॉल - गेट बिझी

६. ब्लफमास्टरच्या बुरे-बुरे गाण्यामुळे अशर आणि त्याचं बोरो-बोरो गाणं माहिती झालं.

७. पुढे अशर आणि अनीला मिर्झा यांचं हे चोरी चोरी गाणं प्रचंड आवडलं :

८. मध्येच एक रोमानियन गाणं आवडलं :
Cine e inima mea -
Song by Copilu' De Aur and Laura Vass

९. बॉलिवूड वरून प्रभावित असलेलं त्यांचं अजून एक गाणं :
https://www.youtube.com/watch?v=KAT5uku3hT4 (व्हिडीओ टाकणार्‍याने एम्बेडींग ब्लॉक केलंय.)

तेरे उअलझे उल्झे बाल रेशम क रुमल ओ तेर क्य कहना

तुषार काळभोर's picture

27 Sep 2022 - 8:15 am | तुषार काळभोर

लिवाइस जीन्सच्या जाहिरातीमुळे माहिती झालं.
माकेबा - जेन

मुक्त विहारि's picture

27 Sep 2022 - 8:22 am | मुक्त विहारि

वाखूसा

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Sep 2022 - 8:58 am | ज्ञानोबाचे पैजार

डेझर्ट रोज...

गाण्याच्या सुरवातीला आणि मधे मधे जे इतर भाषेतले शब्द येतात त्याचा अर्थ समजत नसला तरी त्याची चाल फारच आवडते

https://www.youtube.com/watch?v=C3lWwBslWqg

आणि हे वेंगाबॉइज चे ब्राझिल

https://www.youtube.com/watch?v=UQ6LGrr8iEg

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

27 Sep 2022 - 11:40 am | चांदणे संदीप

मराठी आणि हिंदी सोडून इतर भाषेतलं हे पहिलं गाणं मी एका केरळी मित्राकडून घेऊन मनापासून ऐकलेलं, तेव्हा यूट्यूब इतक प्रचलित नव्हत, वर्ष २०११. या गाण्यातली मेलडी अशी आहे की कितीही वेळ ऐकतच रहाव वाटतं.

सं - दी - प

टर्मीनेटर's picture

27 Sep 2022 - 1:49 pm | टर्मीनेटर

.video-container {
position: relative;
width: 100%;
overflow: hidden;
padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */
}

.responsive-iframe {
position: absolute;
top: 0;
left: 0;
bottom: 0;
right: 0;
width: 100%;
height: 100%;
border: none;
}

माझीही थोडीशी भर.
खाली दिलेल्या मला आवडणाऱ्या गाण्यांपैकी काही संस्कृत, स्पॅनीश, हिंदी + पंजाबी / काश्मिरी, अरबी, अरबी + फ्रेंच अशा (हिंदी सोडून) मला न समजणाऱ्या भाषांतील असल्याने त्यांचा समावेश केला आहे.
गोविंद दामोदर माधवेति - पंडित जसराज
Govinda Damodar Madheveti - Pandit Jasraj
भाषा: संस्कृत

देवकी - कर्णामृता
Devaki - Karnamrita
भाषा: संस्कृत

डॉन ओमर - डाले डॉन डाले
Don Omar - Dale Don Dale (Audio)
भाषा:स्पॅनीश

भाषा:स्पॅनीश
लास केचप - द केचप सॉंग
Las Ketchup - The Ketchup Song

Khaled - C'est La Vie
भाषा: अरबी + फ्रेंच

सम्मी मेरी वार | उमेर जस्वाल & कुर्तलेन बलोच
Sammi Meri Waar| Umair Jaswal & Quratulain Balouch
भाषा: हिंदी + पंजाबी

मन अमेदियम | गुल पनरा & आतिफ अस्लम
Man Aamadeh Am| Gul Panrra & Atif Aslam
भाषा: हिंदी + काश्मिरी

हेलवा या बॅलदी | डालीडा
Dalida - Helwa Ya Balady
भाषा: अरबी

सलाम वालेकुम | साद
Saad "Salaam Alaikoum"
भाषा: अरबी (हे गाणं इतर वेळेपेक्षा पब/डिस्को मधे ऐकायला जाम मजा येते)

तुषार काळभोर's picture

27 Sep 2022 - 8:47 pm | तुषार काळभोर

याचं अजून एक आवडतं आणि फेमस गाणं
दी दी

येस्स... १९९१ मधे आलेल्या दी दी ह्या खालेदच्या गाण्याने धुमाकुळ घातला होता.
१९९३ मधे 'श्रीमान आशिक' चित्रपटात ह्या गाण्याची "लडकीयोंसे ना मिलो तुम, लडकीया तो है बलाए" रुपी भ्रष्ट नक्कलही करण्यात आली होती.
पुढे २०१६ मधे आलेल्या 'एअर लिफ्ट' चित्रपटातील "दिल चिज तुझे देदी..." ह्या गाण्यासाठीही दी दी प्रेरणादायी ठरले हे विशेष.
(दोन्ही गाण्यांचे व्हिडीओ एम्बेड करण्याची परवानगी नाही)

पंडीत जसराज यांचं मधुराष्टकम चित्रगुप्त काकांमुळे कळलं!

श्वेता व्यास's picture

27 Sep 2022 - 4:35 pm | श्वेता व्यास

निवांत क्षणी ही अंगाई ऐकायला आवडते.
https://www.youtube.com/watch?v=QiIPbl6WHuQ&ab_channel=RoverN

गवि's picture

28 Sep 2022 - 4:51 am | गवि

Deep forest. Madazulu.

तनमयी's picture

28 Sep 2022 - 3:57 pm | तनमयी
तनमयी's picture

28 Sep 2022 - 4:15 pm | तनमयी
तनमयी's picture

28 Sep 2022 - 4:21 pm | तनमयी

अलाईपयुदे मधले 'स्नेहिदने' म्हणजेच साथियां मधल्या 'चुपके से' चे ओरिजिनल
https://youtu.be/T8mYfvUPKtA

९६ नामक तामिळ पिक्चरमधील 'इरविंगु तिवाय'
https://youtu.be/b3-lyX9O6kY

ऍंड्रीआ बोसेली व सारा ब्राईटमनचे 'टाईम टू से गुडबाय'
https://youtu.be/4L_yCwFD6Jo

निर्मोण (कोंकणी) चित्रपटातले कोंकणी अंगाईगीत,
डोळ मोजि बाई, निद मोजि बाई
https://youtu.be/qko6xqISGg0

महानंदा चित्रपटातले 'माजे राणी माजे मोगा'
https://youtu.be/2YQqSQMTh-U

अलाईपयुदे मधले 'स्नेहिदने' म्हणजेच साथियां मधल्या 'चुपके से' चे ओरिजिनल

हे माहित नव्हते, पण तेलुगु "सखी"मधले "स्नेहीतुडा स्नेहीतुडा रहस्य स्नेहीतुडा" हे मात्र नेहमीच ऐकतो.

https://www.youtube.com/watch?v=EBEbLsCub5w

रसिकांसाठी गाण्याच्या पंक्ती -

स्नेहीतुडा स्नेहीतुडा रहस्य स्नेहीतुडा
चिन्न चिन्न ना कोरीकले अल्लुकुन्ना स्नेहीतुडा
इदै सकलम् सर्वम् इदै वलुपु गेलुपु
श्वास तुदीवरकु वेलिगे वेदम्
वांछलन्नी वरमैन प्राणबंधम्
स्नेहीतुडा स्नेहीतुडा रहस्य स्नेहीतुडा

मदनबाण's picture

30 Sep 2022 - 6:21 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पञ्चमी पञ्चभूतेशी पञ्च-संख्योपचारिणी । शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शम्भुमोहिनी ॥

धन्यवाद सर्वांचे. सगळ्यांनी स्वतःच्या आवडीची गाणी सामाईक केलीत ते पाहुन आनंद झाला. एकमेकांच्या सोबतीने आज लोकांचा आणि माझा आनंद वाढल्याचे पाहुन अतिशय छान वाटले.
ज्यांनी फक्त दुवे किंवा गाण्यांची नावे लिहीली आहेत त्यांनी जर युटुब किंवा तत्सम ठिकाणावरील गाणी जर प्रतिसादामध्येच दृष्यस्वरुपात दिलीत जर इतरांना तो आनंद घेणे सहज सोपे होईल. येथे तांत्रिक माहिती मिळेल.
https://www.misalpav.com/comment/1154503#comment-1154503

मनोज पुणेकर's picture

3 Oct 2022 - 10:38 am | मनोज पुणेकर

कोक स्टुडिओचे मन अमादेअम हे गाणे त्याच्या प्रेझेंटेंशन, ऑर्केस्ट्रा आणि मुख्य म्हणजे गुल पनारामुळे चांगलेच लक्षात राहिले होते, त्यामुळे युट्युबवर बऱ्याचवेळा बघितले गेले. एक दिवस त्याचे ओरिजनल फारसी गाणे पाहा म्हणून युट्युबने सुचवले. गोगोश या इराणी गायिकेचे हे मूळ गाणे आता जास्त आवडते झाले आहे.

https://www.youtube.com/watch?v=HxvUQ1PSqfs

कोक स्टुडिओची आवृत्ती

https://www.youtube.com/watch?v=U_DSCLqgZCo

सिरुसेरि's picture

3 Oct 2022 - 6:00 pm | सिरुसेरि

माहितीपुर्ण धागा . "लिसा लिसा " या गाजलेल्या तामिळ चित्रपटाची माहिती व त्यामधील गाण्यांची लिंक या http://www.misalpav.com/node/49670 या धाग्यामधे दिली आहे . या लिंक खालील प्रमाणे .

चित्रपटाची व चित्रपटातील गाण्यांची लिंक ----

चित्रपट -- https://www.youtube.com/watch?v=LGzLeiynP0E&list=WL&index=31

गाणी -- https://www.youtube.com/watch?v=Bpsqt2yEdr0&list=WL&index=19

https://www.youtube.com/watch?v=5RBmGknjfQw&list=WL&index=17

https://www.youtube.com/watch?v=GlPLnk9ryGU

https://www.youtube.com/watch?v=5LSmS0Xb_ko

पॉल पॉट's picture

3 Oct 2022 - 11:37 pm | पॉल पॉट

१९९७ साली आलेल्या ह्या गाण्याने अक्षरशः धूमाकूळ घातला होता त्या काळात. वर कुणीच कसा ऊल्लेख केला नाही ह्याचं आश्चर्य वाटलं. ७०-८० च्या दशकात जन्मलेल्यांची पहिली पसंती होती हे गाणं.
ती घटना ती वर्णने आणी तो सिनेमा.
https://youtu.be/3gK_2XdjOdY.

'
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार

हे राज कपूर चे गाणे तेलुगू भाषेत आहे का?

कुणाला माहित असल्यास कृपया लिंक द्यावी.

धन्यवाद.

हिंदी गाण्याची लिंक -
https://youtu.be/69pPYkGiEAQ