बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो.
काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला.
सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो.
सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात.
जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे...वगैरे...) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात.
सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!
प्रतिक्रिया
19 Aug 2022 - 3:40 pm | तर्कवादी
मग त्याकरिता भारताच्या गुप्तहेर खात्याने आमिर खान वर नजर ठेवायला हवी होती, किंवा अजूनही गुप्त्तपणे अशी काही कृत्ये त्याने केलीत किंवा कसे त्याचा कसून छडा लावायला हवा. केली असल्यास त्याच्या मुसक्या आवळण्यात याव्यात...भारतद्रोही कृत्ये केली असल्यास त्याला कठोरात कठोर शासनही व्हायलाच हवे.
नुसतंच लालसिंग चढ्ढा च्या बॉयकॉटचे नारे लावून भारद्रोही कृत्ये कशी थोपवणार ? देशविरोधी शक्तींच्या विरोधात नुसताच देशभक्तीचा टिळा लावणार की काही करणार सुद्धा ?
19 Aug 2022 - 5:52 pm | गामा पैलवान
तर्कवादी,
अमीरखानाचं मतपरिवर्तन करून. प्रस्तुत बहिष्कार हे मतपरिवर्तनाचं साधन आहे. आता भारतद्रोही पावलं उचलायच्या आधी अमीर हजारदा विचार करेल.
आ.न.,
-गा.पै.
19 Aug 2022 - 6:09 pm | वामन देशमुख
ही एक फेबु पोस्ट -
मेरे प्रिय देशवासियों!
वैसे हमीद अंसारी को भारत का उपराष्ट्रपति बनाया....
क्या उसके विचार बदले..?
शाहरुख आमिर नसीरुद्दीन शाह को अपार प्रेम देकर फिल्म स्टार बनाया....
क्या उसके विचार बदले...?
मुनव्वर राणा के शेर शायरी को सुन तव्वजो देकर उसे शायर बनाया...
क्या उसके विचार बदले...?
जावेद अख्तर ,सैफ अली खान, शबाना आजमी को सम्मान देकर पदम श्री जेसे और अन्य अवार्ड दिए गए....
क्या उनके विचार बदले..?
यू तो मोहम्मद गौरी को पृथ्वीराज चौहान ने 17 बार माफ किया...
क्या उसके विचार बदले..?
एक बार सोचे जरूर...
19 Aug 2022 - 7:08 pm | तर्कवादी
वा वा क्या बात है !! मानलं गांधीवाद अजूनही जिवंत आहे. अगदी असहकार चळवळीची आठवण झाली.
19 Aug 2022 - 6:04 pm | वामन देशमुख
अंशतः सहमती.
लोकांना बहिष्कार करायचा / बहिष्काराचे आवाहन करायचा अधिकार आहे. पण जर कुणी देशद्रोही कृत्य / देशद्रोहसदृश्य कृत्य करत असेल / आधीही केलेले असेल तर त्यांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?
19 Aug 2022 - 7:06 pm | तर्कवादी
अर्थातच कायद्यानुसार कारवाई करण्याची सगळी जबाबदारी सरकारची किंवा सरकारी यंत्रणांची (मोदी म्हणण्यापेक्षा - सरकारी यंत्रणा म्हणणे अधिक योग्य नाही का ? - सरकारला एक चेहरा - एक नाव नसावे. एक विचारप्रवाह/वैचारिक बैठक असू शकते. असो) मिपाची काहीच जबाबदारी नाहीये. पण सरकारी यंत्रणांनी ज्याच्यावर कोणताही ठपका ठेवला नाहीये अशा व्यक्तीवर जबाबदार मिपाकरांनी अधिक देशद्रोहाचा आरोप अधिक विचारपुर्वक करणे उचित (appropriate) होईल.
याबद्दल मी साशंक आहे. "बहिष्काराचे आवाहन करणे" हा मुलभूत अधिकार असू शकेल काय याचा कायदेशीर दृष्ट्या उहापोह व्हायला हवा.
एखाद्याने एखादा चित्रपट न बघणे ही ज्याची त्याची निवड
तसेच चित्रपटाची समी़क्षा करणे , त्यातील दोष दाखवणे हे पण भाषणस्वातंत्र्याचा एक भागच.
तसेच एखाद्या व्यक्तिवर वस्तुस्थितीच्या आधारे उचित टीका करणे हे पण स्वातंत्र्य आहेच.
पण एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या उद्योगावर, चरितार्थाशी संबंधित साधनावर/ उपक्रमांवर सार्वजनिक बहिष्कार करण्याचे आवाहन करणे, त्यातही त्याकरिता लोकांच्या धार्मिक अस्मितांना चुचकारणे हे घटनेने दिलेल्या मुलभूत स्वातंत्र्याचा भाग होवू शकेल काय याबद्दल मी साशंक आहे. कारण यामध्ये सदर व्यक्तीच्या(ज्याच्या उपक्रमावर / व्यवसायावर बहिष्काराचे आवाहन केले गेले आहे) "स्वातंत्र्याच्या मुलभूत हक्कावर" (राईट टू फ्रीडम) गदा येते कारण यात "व्यवसाय स्वातंत्र्य" आहे. अर्थात मी काही कायदेतज्ञ नाही. पण मिपावर कुणी कायदेतज्ञ असतील तर त्यांनी याबाबत अधिक खुलासा करावा.
19 Aug 2022 - 7:06 pm | डँबिस००७
नुसतंच लालसिंग चढ्ढा च्या बॉयकॉटचे नारे लावून भारद्रोही कृत्ये कशी थोपवणार ? देशविरोधी शक्तींच्या विरोधात नुसताच देशभक्तीचा टिळा लावणार की काही करणार सुद्धा ?
महात्मा गांधीनी आपल्या असहकार चळवळीने (पक्षी बॉयकॉट) ब्रिटीश साम्राज्य हलवल , तरीही तुम्हाला त्याच बॉयकॉट ह्या अस्राच्या ताकदीची कल्पना नसावी ??
19 Aug 2022 - 7:17 pm | तर्कवादी
अगदी अगदी.. आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद !!
19 Aug 2022 - 8:43 pm | गामा पैलवान
तर्क्वदि,
गांधीवादाचा असहकार चळवळीशी असलेला संबंध ती बंद करण्यापुरताच आहे. च महत्त्वाचा.
आ.न.,
-गा.पै.
19 Aug 2022 - 10:09 pm | डँबिस००७
अनूराग कश्यप व तापसी पन्नु चा "दोबारा"च्या निम्मीत्याने प्रमोशनच्या वेळेला एका कार्यक्रमाच दोन्ही कलाकारांनी "बॉयकॉट" ट्रैंडची खिल्ली उडवली होती, ईतकी की आम्हाला व आमच्या सिनेमाला सुद्धा "बॉयकॉट" कराना, प्लिज "बॉयकॉट" चा ट्रैंड चालवाना, वैगेरे !!
आजच दोबारा रिलीज झाला, कोणत्याही
"बॉयकॉट"चा ट्रैंड चालवल्या शिवायच पडला. तो पण असा पडला की सिनेमा झळकलेल्या २१५ चित्रपट गृहातुन एका शो नंतर शो बंद केले गेले.
अति अंहंकारी अश्या ह्या लोकांना जनतेने चांगलीच अद्दल घडवलेली आहे.
https://www.google.ae/amp/s/www.indiatoday.in/amp/movies/bollywood/story...
19 Aug 2022 - 10:23 pm | वामन देशमुख
सातत्याने ग़ुस्ताख़-ए-हिंदू करत राहणारे बॉलिवूड मोडकळीस येत आहे ही चांगली बाब आहे.
19 Aug 2022 - 10:25 pm | गामा पैलवान
शाब्बास, हिंदूंच्या रुस्तुमीची दिलेरीची आणि सफेजंगीची.
-गा.पै.
20 Aug 2022 - 3:19 am | यश राज
मी पण त्या दोघांचा हा इंटरव्ह्यू पाहिला होता. अगदी निर्लज्जपणे बॉयकॉट ट्रेण्डची खिल्ली उडवत होते. पण त्यांच्या या पडेल चित्रपटासाठी कोणत्याही ट्रेण्ड ची गरजच पडणार नाही हे अवघ्या पहिल्या शो मध्येच कळून चुकले.
खऱ्या अर्थाने हे सगळे "तारे(?) जमीन पर" यायला सुरुवात झालीय.
20 Aug 2022 - 10:27 am | सुबोध खरे
तापसी पन्नू चा व्हिडीओ पहिला तर ती कदाचित दारूच्या नशेत असावी असा संशय येतो. ज्या तर्हेने अकारण हसत ती आमच्या सिनेमावर सुद्धा बहिष्कार टाका म्हणून लोकांची खिल्ली उडवते ते पाहून हा नशेचा परिणाम असावा असे वाटते.
परंतु असा माज दाखवल्याबद्दल लोकांनी तिचा नक्षा उतरवला हे अत्यंत उचित झाले असे माझे मत आहे.
आतापर्यंत आम्ही वाटेल ते बोलू आमचे कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही हा या सर्व लोकांचा माज होता.
अगोदर करीना खान आता हि तापसी पन्नू
यानंतर कोणीही नट नटी समाजाची खिल्ली उडवण्याची हिम्मत करणार नाही असे वाटते.
20 Aug 2022 - 9:38 am | धर्मराजमुटके
मस्त विनोदी चित्रफीत
25 Aug 2022 - 11:39 am | तर्कवादी
२०२२ च्या हिंदी चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय कमाईच्या आकडेवारीत लालसिंग चढ्ढा चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार की नाही हे अद्दाप स्पष्ट झालेले नाही.
https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/aamir-khan-laa...
26 Aug 2022 - 1:30 am | डँबिस००७
बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ बाबत याआधी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आपलं मत मांडलं होतं. आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. पण हे ट्वीट करत असताना त्यांनी एक मोठी चूक केली. जितेंद्र आव्हाड यांच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी लगेचच ट्वीट डिलीट केलं.
“भक्तांनी डोक्यावर घेतलेल्या ‘काश्मीर फाईल्स’पेक्षा, त्यांनी बहिष्कार घातलेल्या ‘लालसिंग चढ्ढा’ने जास्त पैसा कमावला. ७.५ दशलक्ष डॉलर्स, म्हणजे साधारण ६००० कोटी रुपये! भक्तांच्या मताला फारशी किंमत राहिलेली नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. हॅशटॅग फेक बॉयकॉट.” असं ट्वीट त्यांनी केलं.
https://www.google.ae/amp/s/www.loksatta.com/manoranjan/jitendra-awhad-t...
आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढा ने परदेशात ६००० कोटी रु कमावले ??
26 Aug 2022 - 4:30 pm | तर्कवादी
७.५ दशलक्ष डॉलर्स हा आकडा खरा आहे. रुपयात करताना गणित चुकले. ते सुमारे ६० कोटी होतात.
9 Nov 2022 - 2:38 pm | चिंतामणी
9 Nov 2022 - 2:38 pm | चिंतामणी
9 Nov 2022 - 2:40 pm | चिंतामणी
9 Nov 2022 - 2:40 pm | चिंतामणी
9 Nov 2022 - 4:58 pm | चिंतामणी
9 Nov 2022 - 5:00 pm | चिंतामणी
2 Sep 2022 - 10:48 pm | Bhakti
लाल सिंग निमित्ताने फोरेस्ट गंप सुंदर सिनेमा पाहिला.Tom चा अभिनय अप्रतिम!
9 Nov 2022 - 2:36 pm | चिंतामणी
सोत्रीजी आक्षेप चित्रपटात काय काय आहे याबद्दल नसून अमीर खानच्या दुटप्पी वागण्यावर आहे. कारणे नक्कीच माहित असणार आहेत याची खात्री आहे.
विरोध उर्मट करीना कपूर खानला आहे. "बघायचा असेल तर बघा. तुम्हाला आमंत्रण नाही दिले" असे मायबाप प्रेक्षकांना म्हणण्याबद्दल आहे हे समजून घ्या.
मूळ चित्रपट सोत्रीजी तुम्ही विसरला असल्याने जास्त कॉमेंट करीत नाही. पण त्यात हिरो कोणाला वाचवतो हे आठवा. थोडासा मेंदूला ताण द्या.
या चित्रपटात हिरो कोणाला वाचवतो हे नक्कीच आठवत असेल. तो अतिरेक्याला वाचवतो. आणि पुढे त्या अतिरक्याचे उदात्तीकरण केले आहे. विरोध त्याला आहे.
9 Nov 2022 - 2:36 pm | चिंतामणी
सोत्रीजी आक्षेप चित्रपटात काय काय आहे याबद्दल नसून अमीर खानच्या दुटप्पी वागण्यावर आहे. कारणे नक्कीच माहित असणार आहेत याची खात्री आहे.
विरोध उर्मट करीना कपूर खानला आहे. "बघायचा असेल तर बघा. तुम्हाला आमंत्रण नाही दिले" असे मायबाप प्रेक्षकांना म्हणण्याबद्दल आहे हे समजून घ्या.
मूळ चित्रपट सोत्रीजी तुम्ही विसरला असल्याने जास्त कॉमेंट करीत नाही. पण त्यात हिरो कोणाला वाचवतो हे आठवा. थोडासा मेंदूला ताण द्या.
या चित्रपटात हिरो कोणाला वाचवतो हे नक्कीच आठवत असेल. तो अतिरेक्याला वाचवतो. आणि पुढे त्या अतिरक्याचे उदात्तीकरण केले आहे. विरोध त्याला आहे.