आत

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
8 Jun 2022 - 9:13 pm

आत मी, बाहेर कोण?
जगण्याच्या अवस्था किमान दोन.
कधी पाखरू, कधी मुंगी,
तरी उतरत नाही जगण्याची धुंदी.

वाटेने तुडवले, लाटांनी बुडवले,
पावसाने झोडपले, थंडीने थिजवले.‌
संकटांचा उन्हाळा दरवर्षी आला
निजलेलं माणूसपण जागवून गेला.

ध्यानाच्या समाधीतही चाचपडतो,
अंगावरून हात फिरवत स्वतःला शोधतो.
भर दुपारी सूर्य डोक्यावर घेतला
आतला अंधःकार तरी नाही मिटला.

माणसाचं अंतःकरण म्हणजे सिंहाची गुहा
स्वतःला जिंकलं तरच बाहेर यायची मुभा.
अंतरंगातला देव जसा चंदनाचा गाभा
ज्याला गवसला तो विटेवरी उभा.

कविता

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jun 2022 - 9:12 am | ज्ञानोबाचे पैजार

मिटर मधे बसवताना काही शब्द बहुतेक मागेपुढे झाले असावेत.
पण तरीसुध्दा वाचाविशी वाटली, जो विचार मांडायचा प्रयत्न केला आहे तो प्रयत्न आवडला.
लिहित रहा
पैजारबुवा,

अनुस्वार's picture

9 Jun 2022 - 5:43 pm | अनुस्वार

पुढच्या प्रयत्नात उपयोग होईल.

प्रमोद देर्देकर's picture

9 Jun 2022 - 9:20 am | प्रमोद देर्देकर

स्वतःचा शोध घेण्याची कल्पना सांगणारी कविता खूप आवडली.

अनुस्वार's picture

9 Jun 2022 - 5:52 pm | अनुस्वार

आपल्याला कविता आवडली आनंद झाला.