शशक'२०२२ - मु. पो. वाटंब्रे

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
26 May 2022 - 7:48 am

ओढ्याला पाणी असं, की गाडी घालावी की न घालावी? अशावेळी काठावर बसलेले गावकरीच आधार. “पावणं आमी सांगतो तशी घाला गाडी बिनघोर!” धीर करून गाडी घातली, की काठावरून आरडा सुरू. हांहां, तिकडं नगं, हिकडं मारा, करत गाडी मधे जायची अन नेमकी रूतायची!

“तुमाला सांगत हुतो, तरी घोळ केलाच. आता गाडी वडावी लागंल, ६० रुपये हुतील बघा.” हे ऐकल्यावर गाडीवानाचा कपाळावर हात! अखेर काकुळतीला आलेला गाडीवान मुकाट पैसे काढत असे अन् पाचच मिनिटात गाडी पार!

पिढ्यानपिढ्या ही वाटमारी गाव करतंच राहिलं. सरकारने पूल बांधायला माल टाकला, की सकाळी गायब! म्हणून लोकांनीच गावाला नाव दिलं वाटंब्रे! आजही ते मिरज पंढरपूर रस्त्यावर सांगोल्याजवळ आहे.

प्रतिक्रिया

डाम्बिस बोका's picture

26 May 2022 - 9:03 am | डाम्बिस बोका

+१

सर टोबी's picture

26 May 2022 - 9:36 am | सर टोबी

शशकच्या बाबतीत हे वर्ष खासच आहे. काहीतरी अगम्य कारणामुळे शशक म्हटलं की धक्का तंत्र अशी समजूत आणि त्यासाठी कल्पिलेल्या अगम्य गोष्टी ते हा साधा सोपा किस्सा. या वर्षी लेखकांनी खूपच विविध आकारबंध हाताळले आहेत. मजा आली.

सौंदाळा's picture

26 May 2022 - 10:25 am | सौंदाळा

+१

चौथा कोनाडा's picture

26 May 2022 - 11:39 am | चौथा कोनाडा

+१

भारी

विजुभाऊ's picture

26 May 2022 - 2:33 pm | विजुभाऊ

+१

अमरेंद्र बाहुबली's picture

26 May 2022 - 3:00 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
कथा आवडली पण ऊलट क्रम हवा होता.

सरकारने पूल बांधायला माल टाकला, की सकाळी गायब! म्हणून लोकांनीच गावाला नाव दिलं वाटंब्रे! आजही ते मिरज पंढरपूर रस्त्यावर सांगोल्याजवळ आहे.

ओढ्याला पाणी असं, की गाडी घालावी की न घालावी? अशावेळी काठावर बसलेले गावकरीच आधार. “पावणं आमी सांगतो तशी घाला गाडी बिनघोर!” धीर करून गाडी घातली, की काठावरून आरडा सुरू. हांहां, तिकडं नगं, हिकडं मारा, करत गाडी मधे जायची अन नेमकी रूतायची!

“तुमाला सांगत हुतो, तरी घोळ केलाच. आता गाडी वडावी लागंल, ६० रुपये हुतील बघा.”

शशक पाढवायची मुदत भा.प्र.वे 25 तारखेला रात्री संपलीना

Bhakti's picture

26 May 2022 - 5:37 pm | Bhakti

+१

राजाभाउ's picture

26 May 2022 - 7:36 pm | राजाभाउ

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2022 - 8:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वाह...! खासच विषय आवडला.
लै भारी हं.

-दिलीप बिरुटे

सुखी's picture

26 May 2022 - 9:23 pm | सुखी

+१

सुक्या's picture

27 May 2022 - 12:11 am | सुक्या

+१

श्वेता२४'s picture

27 May 2022 - 10:24 am | श्वेता२४

+१

सिरुसेरि's picture

28 May 2022 - 6:30 pm | सिरुसेरि

+१ . मस्त कथा . वाटंब्रे गावाबद्दलची हि कथेतील माहिती वाचुन "एक डाव भुताचा" मधील टगेवाडी गाव आठवले .
मिरज - सांगोला रस्त्यावरील शिरढोण , नाझरे , कवठे महांकाळ , वाटंब्रे , नागज , जुनोनी , कोळे हि गावे या कथेमुळे आठवली .