मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक'२०२२ - मु. पो. वाटंब्रे

साहित्य संपादक · · स्पर्धा
ओढ्याला पाणी असं, की गाडी घालावी की न घालावी? अशावेळी काठावर बसलेले गावकरीच आधार. “पावणं आमी सांगतो तशी घाला गाडी बिनघोर!” धीर करून गाडी घातली, की काठावरून आरडा सुरू. हांहां, तिकडं नगं, हिकडं मारा, करत गाडी मधे जायची अन नेमकी रूतायची! “तुमाला सांगत हुतो, तरी घोळ केलाच. आता गाडी वडावी लागंल, ६० रुपये हुतील बघा.” हे ऐकल्यावर गाडीवानाचा कपाळावर हात! अखेर काकुळतीला आलेला गाडीवान मुकाट पैसे काढत असे अन् पाचच मिनिटात गाडी पार! पिढ्यानपिढ्या ही वाटमारी गाव करतंच राहिलं. सरकारने पूल बांधायला माल टाकला, की सकाळी गायब! म्हणून लोकांनीच गावाला नाव दिलं वाटंब्रे! आजही ते मिरज पंढरपूर रस्त्यावर सांगोल्याजवळ आहे.

वाचन 55729 प्रतिक्रिया 0