जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) - अंबाजोगाई.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
26 Apr 2022 - 7:06 pm

नुकत्याच केलेल्या मराठवाडा दौऱ्यात परळी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले 'श्री वैजनाथ' मंदिर, अंबाजोगाई येथील आमची कुलदेवी 'श्री योगेश्वरी' मंदिर, आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी समाधीस्थळ आणि जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) अशा ठिकाणी भेट दिली त्याचा हा थोडक्यात वृत्तांत.

14 एप्रिलला सकाळी 9:30 वाजता घरी नाश्ता केल्यावर डोंबिवली ते परळी असा सुमारे 435 किमीचा प्रवास सुरु झाला. दुपारी दोन-सव्वादोनच्या सुमारास अहमदनगर मधल्या रेस्टोरंटमध्ये जेवण करून पुन्हा प्रवासाला सुरुवात करून संध्याकाळी 7 च्या सुमारास आम्ही परळीला पोचलो.

मंदिर बंद होण्याची नक्की वेळ माहिती नसल्याने मुक्कामासाठी बुक केलेल्या हॉटेल वर जाण्याआधी दर्शन घ्यावे अशा विचाराने पाहिले देवळात गेलो.

1

2

3

वैजनाथाचे दर्शन घेऊन हॉटेलवर पोचल्यावर फ्रेश होऊन जवळच्या रेस्टोरंटमध्ये रात्रीचे जेवण केले.
सकाळी योगेश्वरी मंदिरात अभिषेकाची वेळ 10 वाजताची मिळाली होती. परळी ते अंबाजोगाई असा सुमारे 25 किमी प्रवास करून तिथे साडे नऊ पर्यंत पोचणे आवश्यक असल्याने (आणि दिवसभरात केलेल्या जवळपास 450 किमीच्या प्रवासाने थोडा थकवाही आला होता) सगळेजण साडे दहा - पावणे अकराच्या सुमारास झोपी गेलो.

परळी ते अंबाजोगाई रस्ता चांगला होता त्यामुळे सर्व तयारी झाल्यावर सकाळी साडे आठ वाजता निघूनही सव्वानऊच्या आधीच आम्ही योगेश्वरी मंदिरात पोचलो.

4

5

6

गाभारा.
7

योगेश्वरी देवीचा अभिषेक आणि दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराजवळची अन्य काही प्रेक्षणीय स्थळे पाहायला निघालो.

हत्तीखाना, श्री रेणुकाई मंदिर, श्री मूळ जोगाई मंदिर, श्री आरोग्य मंदिर, बाराखांबी, श्री खोलेश्वर मंदिर, श्री काशी विश्वनाथ, श्री अमृतेश्वर, श्री नृसिंह व दासोपंत समाधी, श्री मुकुंदराज स्वामी समाधीस्थळ आणि नागनाथलिंग अशी अनेक प्राचीन मंदिरे ह्या ठिकाणी पाहता येण्यासारखी आहेत.

ही सर्व ठिकाणे ह्या आधीच्या अंबाजोगाई भेटिंमध्ये पाहून झाली असल्याने हाताशी उपलब्ध असलेल्या कमी वेळात मंदिरा पासून अगदी जवळ (500 मिटर) असलेला 'हत्तीखाना' आणि 'श्री मुकुंदराज स्वामी समाधीस्थळ' 1.5 किमी) ह्या दोन ठिकाणी पुन्हा भेट दिली.

पाचेक मिनिटात श्री मुकुंदराज स्वामी समाधीस्थळी पोचलो.

8

इथे बऱ्याच पायऱ्या उतरल्यावर (मोजल्या नाहीत पण दीड -दोनशे तरी असाव्यात) खाली दारीतल्या समाधीस्थळी आपण पोचतो.

9

10

11

मुकुंदराज स्वामींची समाधी.
12

13

सदर स्थळाबद्दलची माहिती टंकायचा कंटाळा आल्याने त्याबद्दलची माहिती देणाऱ्या बोर्डाचे 2 फोटो खाली देत आहे ते झूम करून माहिती वाचता येईल.

14

15

इथून निघाल्यावर परतीच्या वाटेवर असलेल्या 'जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना)' पाशी पोचलो.

16

ह्या लेण्यांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. तिथे लावलेल्या बोर्डावर जी माहिती लिहिली आहे ती जशीच्या तशी खाली देत आहे, जाणकारांनी माहितीत भर घालावी ही विनंती.

जोगाई सभामंडप लेणी, आंबाजोगाई, जि. बीड.

"जोगाई सभामंडप लेणी (हत्ती खाना) ही योगेश्वरी मंदिराच्या उत्तर पश्चिमेस अर्धा कि.मी. अंतरावर जयंती नदीच्या तीरावर स्थित आहे. ही लेणी चौकोनी आकाराची असुन खडकात खोलवर कोरलेली आहे. पहाडाच्या दक्षिणेस लेणीचे प्रवेशद्वार आहे. लेणीचा मंडप ८.३६ मीटर असुन समोर खुले प्रांगण आहे. लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे दोन भव्य पुतळे आहेत. त्यामुळेच या लेणीस हत्तीखाना लेणी असे नाव पडले.

प्रांगणाच्या मधोमध सुंदर नंदीमंडप कोरलेला असुन त्याचा आकार ९.१४ X ९.१४ मीटर आहे. या मंडपाच्या मध्यभागी नंदीची मुर्ती आहे. येथे मिळालेल्या शिलालेखात शके १०६६ असा उल्लेख असुन या मध्ये राष्ट्रकुट राजा महामंडलेश्वर उदयादित्ययाने सेलु, राडी, जवळगाव आणि कुंभेफळ ही ग्रामे हत्तीखाना लेणीच्या परीक्षणासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. सदरहुं शिलालेख हा तत्कालीन तहसिलदार यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव तहसिल कार्यालयात ठेवण्यात आलेला आहे.

जोगाई सभामंडप लेणी हे स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० नुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे."

17

18

19

20

21

22

खाली सभामंडपात जाण्यासाठी खडकात पायऱ्या खोदून तयार केलेला भुयारी मार्ग.

23

24

25

पायरी मार्गाच्या डाव्या बाजूचे सोंड आणि शेपटी तुटलेल्या चार पैकी पहिल्या हत्तीचे शिल्प.
26

26-a

नंदीमंडपातील तुटफूट झालेला दगडी नंदी.
27

28

29

नंदी मंडपात स्थानिक कॉलेज कुमार घोळक्याने धूम्रपान करत बसले होते, फोटो काढण्यासाठी नाईलाजाने त्यांना तिथून उठण्याची विनंती करावी लागली.

लेणी.
30

31

32

33

34

35

36

लेण्यांच्या बाहेरील दुसरे हत्तीचे शिल्प. हे जरा सुस्थितीत आहे.
37

38

39

दगडात कोरलेला हौद.
40

देखभालीचा अभाव आणि अक्षम्य शासकीय हेळसांड झालेल्या ह्या लेणी परिसराच्या चहूबाजूनी कचरा आणि रिकाम्या बिअरच्या बटल्यांचा खच पडलेला बघायला मिळतो. आतल्या दगडी हौदातल्या पाण्यातही भरपूर कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या टाकलेल्या असून अंधाऱ्या लेण्यांमध्ये वापरलेले कॉन्डोम्स आणि दारूच्या बाटल्या बघायला मिळाल्या.
दुर्दैवाने ही लेणी "राज्य संरक्षित स्मारक" म्हणुन घोषित करण्यात आली असूनही अतिशय दुर्लक्षित राहिली आहेत. त्यांच्या जतन / संवर्धनाकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर आधीच मोडतोड झालेला हा मौल्यवान ऐतिहासिक ठेवा कायमचा नष्ट होण्यास फारसा अवधी लागणार नाही.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Apr 2022 - 8:21 pm | मुक्त विहारि

वाखूसा

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

26 Apr 2022 - 8:26 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान भटकंती आणि फोटो.

धन्यवाद मुविकाका आणि ॲबसेंट माइंडेड 🙏

कंजूस's picture

27 Apr 2022 - 3:36 am | कंजूस

हत्तीखाना लेणी आवडली. वरून खाली दगडात कोरली आहेत वेरुळसारखी. हत्तीचे शिल्प आवडले.
मुकुंदराज स्वामी समाधी पाटीवरची माहिती
१)
श्री मुकुंदराज व जयत्पाल यांचे चरित्र

शके नऊशे पन्नास (९५०) चे सुमारास आंबापुर नामे ग्रामा मध्ये महापराक्रमी जयत्पाल या नावाचा राजा होऊन गेला. त्याला ब्रम्हह्यस्वरुप पाहण्याची अति उत्कंठा झाली. असहा कारणाने तो जो साधु आंबापुर नगरात येईल त्याचे समोपचाराने यथा विधी जयत्पाल राजाने षोडशोपचार युक्त पुजन करुन अति नम्रतेने त्या साधुची विनंती करावी की महाराज कृपा करुन ब्रम्हह्मस्वरूप दर्शन मला द्या. ही राजाची विनंती सफल झाली नाही तर राजा क्रोधमान होऊन त्या साधुस कारागृह वासात पाठवून द्यावे व दिवसात गांवाच्या उत्तर दिशेस तळे खोदण्याचा काम करुन घ्यावा व उत्तर रात्रीस प्रत्यक साधुने घोड्याचा दाणा भरडावा असा क्रम सतत चालु असता साधुजन त्या ग्राम सनींध येण्वास धजेनासे झाले । ही वार्ता जाता जाता श्री क्षेत्र काशी पर्यंत गेली.

त्याकाळी श्री मुकुंदराज काशी क्षेत्रात अनुष्ठान योग अभ्यास करीत असता त्यांस जयत्पाल राजाचे वर्तन ऐकून फारच वाईट वाटले व आपल्या गुरुपाशी जाऊन विनंती केली की गुरुराज दक्षिण प्रांती जयत्पाल राजा साधु संतास फार त्रास देत आहे. करिता ह्या आपल्या दासास तेथे जाऊन सर्व संतास बंदी वासातून मुक्त करीन. ही वार्ता ऐकताच गुरुंनी त्यांस जाण्याची परवानगी व आशीर्वाद दिला. ज्या काळी मुकुंदराज काशी क्षेत्रात होते तेव्हा त्यांनी पुष्कळ ग्रंथ लिहीले. त्यापैकी श्री विवेकसिंधु, परमामृत, पवनविजय अशी छापून तीन पुस्तके पसिद्ध झाली आहे ती पाहण्यासारखी आहेत. नंतर महाराज काशीपुरीहुन महाराज गुरु आज्ञा घेऊन निघाले ते आंबापूर ग्रामा सनीद्य येताच हजारों साधु तळी खोदण्यात गुंतले आहे व राजरक्षक त्यांचे कडून काम करुन घेत आहे हे पाहताच महाराजांनी बालरूप घेऊन नारायण नावांचा गजर करीत प्रवेश करु लागले. त्या दिव्य मुर्ती कडे पाहुन वेशीवर असलेल्या राज रक्षकांनी अनेक प्रकारांनी मुकुंदराजास विनंती केली की महाराज आपल्यासारख्या कोमल बाल तनुला आमचा राजा कारागृह वासात पाठविल, याज करीता आपण नगरात जाऊ नये. मुकुंदराजांनी आपला जाण्याचा आग्रहच दाखविला आणि निघाले ते थेट राजवाड्यात शिरले. इतक्यात जयत्पालाची आणि मुकुंदराजाची गाठ पडताच महाराज मजला कृपा करुन ब्रम्हा दाखवा अशी राजाने विनंती केली तेव्हा मुकुंदराजांनी राजास सांगीतले की तु घोड्यावर सर्व सरंजाम घालून तयार करुन त्यावर स्वार होऊन ये म्हणजे बम्हह्य दाखवितो. त्यांचे आज्ञे प्रमाणे राजाने सेवकांकडून घोडा. सर्व सरंजामानिशी तयार करुन हजर केला. घोडा तयार होऊन येताच

२)

त्यांस मुकुंदराजांनी जयत्पाल राजास सांगीतले की राजा घोड्यावर स्वार हो एका रिकाबीत पाय ठेव व दुसऱ्या रिकाबीत पाय टाकण्यापुर्वी तुला आता ब्रम्हह्यस्वरूप दर्शन करुन देतो. रिकाबींवर पाय ठेव हे मुकुंदराजांचे तोंडचे शब्द ऐकताच राजाने दुसऱ्या रिकाबीत पाय ठेवला व घोड्यावर स्वार होताच मुकुंदराजाने जो एक चाबुकाचा सपाटा राजासह घोड्याला मारला त्या बरोबर राजासह घोडा जो ठाणावर उभा राहीला तो सारखा सात दिवस चौकात उभा होता. घोड्याची किंवा राजाची हालचाल काहीच होत नाही आशा प्रकारे राजाची घोड्यावर सात दिवस सारखी समाधी लागल्यावर आठवे दिवशी समाधी उतरवून मुकुंदराजानी जयत्पालास विचारले की राजा बम्हह्यस्वरुप दर्शन झाले का तेव्हा घोड्यावरुन खाली उतरुन जयत्पाल राजाने मुकुंदराजास साष्टांग नमस्कार घातला आणि मोठ्या नम्रतेने व आदर पुर्वक म्हणाला की महाराज आपल्या कृपेने सर्व हेतु परिपुर्ण झाले आता या दासास जी आज्ञा कराल ती सीरसामान्य आहे. नंतर मुकुंदराजाच्या आज्ञेने जयपाल राजाने सर्व साधुसंतास कारागृह वासातून सोडवून आणिले आणि त्या सर्वांचा मोठा गौरव करुन कृत ते थेट अपराधाची क्षमा मागितली व या सर्वांच्या इच्छित ठिकाणी जाण्याची परवानगी दिली. त्या साधु संतानी मुकुंदराजाचा आभार मानून आप आपल्या इच्छित ठिकाणी तेव्हा गमन करिता नगराचे बाहेर निघाले परंतु जयत्पाल राजा त्याचे मागोमाग घोड्यावर स्वार होऊन पुन्हा दर्शनाची ईच्छा करुन जाऊ लागला. महाराजांनी मागे राजा घोड्यावर येत आहे असे पाहताच धुम ठोकली महाराज पुढे व राजा मागे असे जात असता पुढे जयवंती नदीचा मोठा तटलेला कडा पाहताच महाराजांनी पैरतीरी उडी करीत अनेक के बाल जाऊ डताच करुन कडून

ठोकली व अंतरध्यान पावले मागुन राजांनी त्यांचे मागोमाग घोडा घातला. घोड्यासह डोहात बुडाला त्या ठिकाणाला अद्यापी लोक घोडदंडा असे नावाने संबोधितात व महाराज ज्या ठिकाणी अंतरध्यान पावले त्याच ठिकाणी त्यांचे भक्तांनी त्यांची समाधी बांधली आहे. ते ठिकाण फार रमनीय आहे. डोंगर कोरुन देवळाकृती सभामंडप केला आहे. त्या ठिकाणी जाण्यास वरुन खाली समाधी पर्यंत पक्क्या पायऱ्या बांधल्या आहेत व समाधीच्या नजीकच एक गोड पाण्याचे झरे आहेत व खाली आणखीन डोंगराच्या कडीने उतरत गेल्यास जयवंती नदी आहे व त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर जयत्पाल राजाचे घोडदडा नावाचे फार खोल व भयकारक डोह आहे. पावसाळ्यात हे ठिकाण फारच रमणीय दिसतो त्याचे पलीकडे बुटेनाथ डोंगराचे कपारीत देवस्थान आहे. त्याचे वरच्या सर्व डोंगरात वनस्पती जडीबुटी आपोआप उगवतात. आश्विन मासी दुरदुरचे लोक येवुन जडीबुटी, बल्ली घेऊन जातात ती फार गुणकारी असते अशी प्रसिद्धी आहे. म्हणून. . . .

टर्मीनेटर's picture

27 Apr 2022 - 1:16 pm | टर्मीनेटर

वाह कंकाका 🙏

Bhakti's picture

27 Apr 2022 - 6:58 am | Bhakti

छान भटकंती!
मागच्या वर्षी एक_वात्रट यांनी या लेण्यांची माहिती दिली होती
अंबाजोगाई
त्यातही लेण्यांच्या दुर्दैवी दुर्लक्षाविषयी लिहिले होते.पण लक्षात कोण घेणार....

टर्मीनेटर's picture

27 Apr 2022 - 1:14 pm | टर्मीनेटर

अरेच्या...
बरोब्बर वर्षांपूर्वीचा एक_वात्रट ह्यांचा हा लेख वाचनातून कसाकाय निसटला होता काय माहित!
लिंक साठी धन्यवाद भक्ती.

त्यातही लेण्यांच्या दुर्दैवी दुर्लक्षाविषयी लिहिले होते.पण लक्षात कोण घेणार....

स्थानिकांनाही ह्या ऐतिहासिक वारशाबद्दल इतकी अनास्था कशी ह्याचे आश्चर्य वाटते.

तुषार काळभोर's picture

27 Apr 2022 - 7:06 am | तुषार काळभोर

लेणी साधारण पाताळेश्वर लेणींसारखी दिसताहेत. पण वाईट दुरवस्था झालीय. एकीकडे छान दगडी बांधकामाला सुशोभीकरण करून रंगीबेरंगी करणे, तर दुसरीकडे स्थानिकांचीच इतक्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याविषयी बेपर्वाई...

कंजूसराव, धन्यवाद!!

इमेज ओसीआर app ने पाटीचे text करून.दिले.
vFlat scan

https://play.google.com/store/apps/details?id=com.voyagerx.scanner

टर्मीनेटर's picture

27 Apr 2022 - 1:29 pm | टर्मीनेटर

मला वाटलं गुगल लेन्स वापरून टेक्स्ट कॉपी केले असावेत तुम्ही.
हत्तीखान्या बाहेरच्या बोर्डावरची अक्षरे मी गुगल लेन्सने कॉपी केली आहेत, चांगलं फिचर दिलंय गुगल फोटोज मध्ये, खाली थेट लेन्सचं बटण येते, अक्षरे केवळ कॉपीच नाही तर अन्य भाषांतून अनुवादीतही करता येतात, वेगळ्या app ची गरज भासत नाही!

याचीही सवय ठेवतो.

टर्मीनेटर's picture

27 Apr 2022 - 2:20 pm | टर्मीनेटर

लेन्स मध्ये अक्षरे अनुवादित केल्यास थोडी साफ सफाई करावी लागते पण आहे त्या भाषेत कॉपी फार छान (इमेज क्लिअर असल्यास बिनचूक) करता येतात. हत्तीखान्याचा मूळ बोर्डच थोडा खराब असल्याने लेणी च्या जागी लेगी, बीड च्या जागी बॉड अशी अक्षरे कॉपी झाली होती 😀

कर्नलतपस्वी's picture

30 Apr 2022 - 9:16 pm | कर्नलतपस्वी

गूगल लेन्स भारीच, नेहमी वापरतो. त्याला कसे काय एवढे ज्ञान प्राप्त झाले आहे नवलच आहे.

लेन्सपेक्षा मी दिलेले app चांगले निघाले. जाळीतून दिसणारे लेखन आहे तरीही बरोबर वाचले. फक्त एक शब्द 'ढोवार' चुकला तो सुधारावा लागला - 'डोहात'.

टर्मीनेटर's picture

2 May 2022 - 12:26 pm | टर्मीनेटर

मी vFlat वापरून बघितले. ios वर लेन्स पेक्षा थोडे स्लो वाटले पण चांगले आहे. काही शब्द त्यातही चुकत आहेत पण तेवढं चालायचंच. फोटोतला मजकूर टंकत बसायचे कष्ट वाचतात 😀

कंजूस's picture

7 May 2022 - 10:14 am | कंजूस

आणि त्यातून चांगले text मिळाले की पुढे काहीही करता येते.

टर्मीनेटर's picture

27 Apr 2022 - 1:25 pm | टर्मीनेटर

एकीकडे छान दगडी बांधकामाला सुशोभीकरण करून रंगीबेरंगी करणे, तर दुसरीकडे स्थानिकांचीच इतक्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याविषयी बेपर्वाई...

+१
दगडी बांधकामाला रंग फासणे हे सार्वत्रिक होत चाललंय. योगेश्वरी मंदिरातही आतल्या दगडी खांबाना आणि दगडी छताला (प्रकाश परावर्तीत होण्यासाठी) चमकदार चंदेरी रंग लावला आहे, जे अर्थातच आवडले नाही.
बाकी स्थानीकांची अनास्था आणि बेपर्वाई बद्दल काय बोलणार!

पण केरळवाल्यांनी त्यांच्या देवळांकडे फिरकू दिले नाही. शिवाय पणत्यांच्या उजेडात जेवढा देव दिसेल तेवढाच दुरून पाहायचा. तिकडची आरास आराखडा, शांतता वाखाणण्याजोगी असते.

टर्मीनेटर's picture

27 Apr 2022 - 2:21 pm | टर्मीनेटर

+१

प्रचेतस's picture

27 Apr 2022 - 10:12 am | प्रचेतस

अंबेजोगाईला जायचे आहेच. पाताळेश्वरासरखीच लेणी आहेत अगदी. तुम्ही अगदी मस्त फिरत असता भो. हेवा वाटतो.

मुकुंदराजांच्या चरित्रात उल्लेख आलेला जयत्पाल उर्फ जैत्रपाळ हा यादव घराण्याची संबंधित नसून कलचुरी घराण्याचा मांडलिक राजा होता व त्याची राजधानी आंबे ही होती. हा जैत्रपाळ जैन होता. येथील लेणींतील असलेल्या कमरेवर हात ठेवलेल्या कलचुरी शैलीतील द्वारपालांवरुनही येथे कलचुरी आणि राष्ट्रकूटांचा प्रभाव होता असेच दिसते.

स्वतः मुकुंदराजही आपल्या आरतीत म्हणतात

जैतपाळ भूपतीने केला दर्शना कोंड|
अपरोक्ष बोध वाहे त्यासि घातलें कोड ||

आंबेजोगाई येतील काही शिलालेखांवरुन ह्याचे पूर्वीचे नाम आम्रपूर होते असे दिसते व हे ग्रामनाम योगेश्वरी उर्फ अंबा देवीवरुन पडले नसून फलवाचक (आम्र) आहे असे स्पष्टच दिसते. लीळाचरित्रातही अंबेजोगाईचा उल्लेख 'खोलनाएकाचेया आंबेया' (खोल नायकाचे आंबे) असा येतो. हा खोल नायक म्हणजे सिंघणाचा पराक्रमी सेनापती खोलेश्वर होय. अर्थात आंब्याची योगेश्वरी-योगाईचे आंबे-जोगाईचे आंबे- अंबेजोगाई असे नामकरण नंतर झालेले दिसते.

जेब्बात.... प्रचेतस भाऊ अशाच उत्तम अधिकच्या माहितीची अपेक्षा होती तुमच्याकडून 👍

अंबेजोगाईला जायचे आहेच.

जरूर जाऊन या! तुम्हाला नक्कीच आवडतील अशा अनेक प्राचीन वास्तू आहेत त्या परिसरात.

जेम्स वांड's picture

27 Apr 2022 - 11:28 am | जेम्स वांड

तुमच्या शैलीची सवय झाल्यामुळे थोडे आवरते वाटले पण कव्हर केलेले दिसतेय जवळपास सगळे. लेखन आवडलं हे वेगळं सांगायला नकोच.

आपल्याकडे असलेली १२ ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर ही तर कन्फर्म आहेत, पण परळी वैजनाथ हे थोडं कंटेन्शन मध्ये आहे, १२ ज्योतिर्लिंगात असलेले वैजनाथ धाम हे मूळचे देवघर, झारखंड इथले असल्याचे बहुसंख्य लोक मानतात, आता नेमकं बारा ज्योतिर्लिंगात महाराष्ट्रातील परळी वैजनाथ आहे का देवघरचे बाबा बैजनाथ धाम हे तर मी सांगू शकत नाही पण हर हर महादेव म्हणून खाली बसतो.

टर्मीनेटर's picture

27 Apr 2022 - 1:44 pm | टर्मीनेटर

आता नेमकं बारा ज्योतिर्लिंगात महाराष्ट्रातील परळी वैजनाथ आहे का देवघरचे बाबा बैजनाथ धाम हे तर मी सांगू शकत नाही

माझाही त्या विषयाचा फार अभ्यास नाही, परंतु 'मराठी विश्वाकोशा' नुसार खालील १२ ज्योतिर्लिंगे आहेत.
(१) सोमनाथ – सौराष्ट्रात वेरावळजवळ
(२) मल्लिकार्जुन – आंध्र प्रदेशात श्रीशैलम् पर्वतावर
(३) महाकालेश्वर – उज्जैन
(४) ओंकार वा अमलेश्वर-नर्मदातटाकी ओंकारमांधाता
(५) केदारनाथ – हिमालयात केदारपुरी
(६) भीमाशंकर – डाकिनी क्षेत्र, खेड तालुका, पुणे जिल्हा
(७) विश्वेश्वर-काशी
(८) त्र्यंबकेश्वर – नासिकजवळ त्र्यंबकेश्वर
(९) वैद्यनाथ वा वैजनाथ – परळी, बीड जिल्हा
(१०) नागनाथ – औंढा, परभणी जिल्हा
(११) रामेश्वर – सेतुबंधाजवळ रामेश्वर व
(१२) घृष्णेश्वर – वेरूळ, औरंगाबाद जिल्हा.

तुमच्या शैलीची सवय झाल्यामुळे थोडे आवरते वाटले

खरे आहे!
डिटेल मध्ये लिहिण्यास फार वेळ लागतो, मग मालिका रखडत जाते (कोकण-गोवा मालिकेचा अनुभव ताजा आहे) त्यामुळे वास्तविक ही भटकंती मी फक्त चित्रलेख स्वरूपात मांडणार होतो पण थोडीफार माहिती देण्याचा मोह टाळता आला नाही 😀

परिंदा's picture

27 Apr 2022 - 7:38 pm | परिंदा

काही लोक नागनाथ/नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरातमध्ये द्वारकेजवळचे नागेश्वर याठिकाणी आहे असे मानतात.

द्वादश ज्योतिर्लिंगाच्या श्लोकात "सौराष्ट्रे सोमनाथं च ...... परल्यां वैजनाथं च ...." असा उल्लेख असल्याने वैजनाथ ज्योतिर्लिंग हे परळीचेच असावे.
याच श्लोकात "नागेशं दारुकावने" असा उल्लेख आहे. हे दारुकावन महाराष्ट्रात औढ्या नागनाथला आहे की गुजरातमध्ये द्वारकेजवळ ते माहित नाही.

चौथा कोनाडा's picture

1 May 2022 - 12:58 pm | चौथा कोनाडा

दारुकावन हा शब्द पाहिलयस ते द्वारकेजवळ असू शकेल हे बरोबर वाटते.

पण विकीपेडिया वरील माहिती हे सांगते:
दारूकावन हे नाव दारूवना (देवदार वृक्षांचे जंगल) पासून आले आहे, असे मानले जाते की अल्मोडा येथे अस्तित्वात आहे. देवदार (दारू वृक्ष) केवळ पश्चिम हिमालयात मुबलक प्रमाणात आढळतो.

@ परिंदा,

द्वादश ज्योतिर्लिंगाच्या श्लोकात "सौराष्ट्रे सोमनाथं च ...... परल्यां वैजनाथं च ...." असा उल्लेख असल्याने वैजनाथ ज्योतिर्लिंग हे परळीचेच असावे.

+१

दारुकावन मध्ये 'दारू' शब्द असल्याने बहुतेक ते गुजरातमध्ये नसून महाराष्ट्रातच असावे 😀 😀 😀
(वरील वाक्य केवळ गमतीने लिहिले आहे, श्लोकातले दारूकावन नक्की कुठे आहे ह्याची मला कल्पना नाही. जाणकारांनी माहितीत भर घालावी)

जेम्स वांड's picture

27 Apr 2022 - 11:35 am | जेम्स वांड

.

परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग क्षेत्रांत दिसलं नाही. ही सगळी बारा ज्योतिर्लिंग बुलेटवर हिंडून बघण्याची खूप इच्छा आहे, जी कधीच पूर्ण होणार नाही बहुतेक.

निनाद's picture

28 Apr 2022 - 6:54 am | निनाद

बारा ज्योतिर्लिंग बघण्याची इच्छा आहे आणि भोले बाबा बोलावतील तेव्हा जाणार!!

ही सगळी बारा ज्योतिर्लिंग बुलेटवर हिंडून बघण्याची खूप इच्छा आहे, जी कधीच पूर्ण होणार नाही बहुतेक.

'जी कधीच पूर्ण होणार नाही बहुतेक.' असं का म्हणता? घ्या मनावर! व्यवस्थित ट्रिप प्लॅन करा आणि जाऊन या मस्तपैकी बुलेटवरून.
तुमच्या बुलेट स्वारीसाठी खूप खूप शुभेच्छा!

जेम्स वांड's picture

7 May 2022 - 6:29 am | जेम्स वांड

नोकरी सुचू देईना काही पण तिच्यायला राव, नव्हाळी सरली आता फक्त पाट्या टाकण्याचे आयुष्य उरले बघा :(

निनाद's picture

28 Apr 2022 - 6:53 am | निनाद

भटकंती मस्त केली. चित्रे छान!

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Apr 2022 - 8:46 am | ज्ञानोबाचे पैजार

लेख नेहमी प्रमाणेच भरपुर फोटो आणि माहिती युक्त आहे

प्रतिसादांमधे ही या माहितीत भर घातली गेली आहे.

एकदा जायला पाहिजे या भागात सवड काढून

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

28 Apr 2022 - 10:11 am | चांदणे संदीप

सुरेख फोटो आणि उत्तम वर्णन.
खूप वर्षापूर्वी अंबाजोगाईला जायचा योग आला होता. इथे तुम्ही दिलेली सगळी ठिकाणे तर पाहिलीच पण विशेष म्हणजे बुटेनाथ ठिकाण जे डोंगरात गुहेमध्ये आहे तिथे आम्ही तीन मित्र दुपारच्या रणरणत्या उन्हात चढून गेलो होतो. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ;)

सं - दी - प

निनाद, पैजारबुवा आणि चांदणे संदीप प्रतिसादासाठी आभारी आहे 🙏

बुवा सवड काढून जाऊनच या!

संदीप,

बुटेनाथ ठिकाण जे डोंगरात गुहेमध्ये आहे तिथे आम्ही तीन मित्र दुपारच्या रणरणत्या उन्हात चढून गेलो होतो.

🙏
त्या आठवणी शब्दबद्ध करून आमच्यासारख्या नॉन ट्रेकर्सना वाचायला द्या की राव!