हा माझा मिसळपाव वरचा पहिलाच लेख तरी जुन्याजाणत्या मिपाकरांनी संभाळून घ्यावे.
नुकताच २३/२४ ला नागाव, कोरलई ला जायचा योग आला.
२३ ल पहाटे ५ वाजता पिंपरी वरुन निघालो ते ८.१५ ला नागाव ल पोहोचलो. कर्पेवाडी येथे अगोदरच बुकिंग करुन ठेवले होते.
९.३० ला न्याहारी करुन चौल, रेवदंडा मार्गे कोरलई किल्ल्यावर गेलो.
कोरलई हा पोर्तुगिजकालीन किल्ला हा लांबच लांब असुन रुंदीला अगदिच थोटका. पायथ्यालाच दीपगृह आहे.
किल्ल्यावर बरेच अवशेष आहेत. काही तोफा आहेत. पोर्तुगीज भाषेतील शिलालेख आहेत.
किल्ल्यावरुन चौफेर दृश्य दिसते. अलीबाग, नागाव, रेवदंडा किनारा, रेवदंडा खाडी पूल, विक्रम पोलाद कारखाना ई.
नंतर काशिद किनार्यावर गेलो. एवढा स्वछ रुपेरी पांढराशुभ्र किनारा प्रथमच पाहिला. काशिद्चे वैशिट्य म्हणजे तिथे लाटा फरच मोठ्या येतात तरीही सुरक्षित असा किनारा आहे. तिथे मस्त डुंबण्याचा आनंद घेतला. पाठिमागेच फणसाडचे वन्यजीव अभयारण्य आहे. रात्री परत कर्पेवाडीला मुक्काम.
दुसर्या दिवशी सकाळ, दुपार नागावच्या किनार्यावर समुद्रस्नान स्वछ, सुन्दर लांब किनारा पण तिथे काशिदची मजा नाहिच.
सुर्यास्तानंतर नागाव सोडले ते रात्री ८ वाजता महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेतले.
११ वाजत घरी पोहोचलो ते परत इथे येण्याचा संकल्प करुनच.
अधिक प्रकाशचित्रांसाठी येथे पहा
http://picasaweb.google.com/borkarsagar/Nagao23Jan10?feat=directlink
प्रतिक्रिया
5 Feb 2010 - 12:30 pm | सहज
फोटो दिसत नाही आहेत.
तुम्ही जे फोटो साठी दुवे दिले आहेत ते चुकले आहेत म्हणजे ते दुवे डायरेक्ट पिकासावर चालतील अन्यत्र चालणार नाहीत.
उदा. दीपस्तंभ फोटो
तुम्ही दुवा दिला आहे - < img src="http://picasaweb.google.com/borkarsagar/Nagao23Jan10#5431259204679219826" alt="" />
तुम्ही सर्वप्रथम मुळ पिकासावर तो फोटो पहा त्या फोटोवर राईट क्लीक करुन प्रॉपर्टीज ऑप्शन बघा त्यात तुम्हाला मुळ चित्राची लिंक दिसेल ती अशी - http ://lh5.ggpht.com/_rZ7FLiqQfvU/S1-1eHn5unI/AAAAAAAAGL0/QeXq1rvi2dw/s640/IMG_0440.jpg
ती वापरा. तुम्हाला वेगळ्या साईज मधे चित्र दाखवायचे असेल तर मात्र थोडा फरक करावा लागेल म्हणजे
http ://lh5.ggpht.com/_rZ7FLiqQfvU/S1-1eHn5unI/AAAAAAAAGL0/QeXq1rvi2dw/s640/IMG_0440.jpg
लाल रंगातील भाग उडवावा लागेल. तसेच जेव्हा इथे चित्र डकवले त्या खिडकीत लांबी रुंदी लिहावी लागेल. न लिहल्यास मुळ आकाराचे चित्र उमटेल.
5 Feb 2010 - 12:47 pm | प्रचेतस
सहजराव, तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
बरेच शोधुनही जे मला सापडले नाही ते तुम्ही सहजच निदर्शनास आणून दिले.
5 Feb 2010 - 12:48 pm | प्रचेतस
सहजराव, तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
बरेच शोधुनही जे मला सापडले नाही ते तुम्ही सहजच निदर्शनास आणून दिलेत.
5 Feb 2010 - 2:49 pm | शुचि
खूप सुंदर छायाचित्रं आहेत. वर्णनही छान.
*********************
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
5 Feb 2010 - 2:59 pm | मानस्
सर्वच छायाचित्रे मस्त आली आहेत.
पुण्याहून कोणत्या मार्गाने गेलात आणि कर्पेवाडीला कुठे राहिलात ते सांगितले तर बरे होईल.
मानस
5 Feb 2010 - 3:21 pm | प्रचेतस
पुण्याहून दृतगती मार्गाने खोपोली-पेण-वडखळ नाका मार्गे अलीबाग मार्गे नागाव.
कर्पेवाडी हे नागाव मधीलच एक फार्म हाउस आहे. अधिक माहितीसाठी http://www.karpewadi.com/ या संकेतस्थळावर भेट द्या.
5 Feb 2010 - 4:00 pm | गणपा
अजुन एका भटक्याची मिपावर भर पडली.
मस्त फोटो आहेत.
आवडले.
5 Feb 2010 - 6:26 pm | मेघवेडा
हेच म्हणतो!
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
5 Feb 2010 - 6:17 pm | मीनल
सर्वात खालचा फोटो आवडला.
मीनल.
5 Feb 2010 - 6:23 pm | सुनील
अतिशय सुंदर फोटो.
कोरलईला गेलात, पोर्तुगीझ भाषेतील शीलालेख पाहिलेत पण "ह्या" जमातीला भेटलात की नाही?
थोडी अधिक माहिती -
http://en.wikipedia.org/wiki/Kristi_language
http://misalpav.com/node/6322
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Apr 2022 - 8:32 pm | चौथा कोनाडा
सुंदर प्रचि आणि सुरेख वर्णन !
सुर्यास्ताचे प्रचि बढीया !
16 Apr 2022 - 7:14 am | कंजूस
जुन्या ऐतिहासिक ठिकाणी ( किल्ले, लेण्या,देवळे) गेल्यावर निरनिराळे फोटो काढताना शिलालेखांचेही फोटो काढायचे असतात हे मी प्रचेतस ( वल्ली) याचेकडून शिकलो.
नागाव, रेवदंडा इथे ( नातेवाईकांकडे) बरेचदा जाणे होते. पण कोरलई राहिलाच आहे. काशिदच्या मागचे फणसाड मात्र पाहिले आहे. [[ नागाव - रेवदंडा - काशिद - कोरलई - मुरुड रस्त्याकडून फणसाडचे प्रवेशद्वार नाही. रेवदंडा पुलापर्यंत अभयारण्य पसरलेले असले तरी. रोहा ते मुरुड व्हाया सुपा या मार्गावर सुपा येथे फणसाडचे प्रवेशद्वार आहे. चौकशीसाठी ठाणे दमाणी इस्टेटजवळ असलेल्या वनखात्यात विचारावे. तिथेच बुकिंगही मिळते. ]]
16 Apr 2022 - 9:10 pm | king_of_net
[ नागाव - रेवदंडा - काशिद - कोरलई - मुरुड रस्त्याकडून फणसाडचे प्रवेशद्वार नाही. >>>
मी गेलो होतो ह्या मार्गे...
17 Apr 2022 - 12:53 pm | चौथा कोनाडा
दोन वर्षांपुर्वी फणसाडला गेलो होतो मित्रमित्र.
फणसाड मुलतः पक्षी अभयारण्य आहे.
माथेरानची आठवण होण्यासारखे ठिकाण.
आत वाहनांना प्रवेश नाही, पायी चालावे लागते.
आम्ही ६.५+६.५ असे १३ किमी पायी चाललो होतो
नंतर एक दोन दिवस पायदुखी एन्जॉय केली होती.
फार तर बैलगाडी (उपलब्ध असेल तर)
निरव निर्मनुष्य वनराजीत पक्षांचे आवाज ऐकत भटकणे हा वेगळाच अनुभव असतो.
पक्षी साधारणपणे वृक्षांच्या शेंड्यावर असल्याने दुर्बिणी असल्याशिवाय दिसत नाहीत.
पक्षी निरिक्षक पर्यटकांचे वेगळे शेड्युल असते. पक्षी निरिक्षण साधारण पणे पहाटे-रात्री असे करावे लागते.
माझ्यासारख्या साधारण पर्यटकाचा फणसाडचा अनुभव अतिशय सुंदर होता !
आता पुढील वेळी तिथं एक रात्र राहून अनुभव घ्यायचा आहे, पाहू कसा योग येतो.
20 Apr 2022 - 9:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वाह ! हे लेखन कसे वाचनातून सुटले. मला वाटले नवीनच लेख आहे. असो, चांगलं लिहायचे हे लेखक तेव्हा.
-दिलीप बिरुटे
20 Apr 2022 - 10:28 am | टर्मीनेटर
असेच म्हणतो!
सगळे फोटोज झकास आहेत.
बाकी नागाव किनाऱ्यावर क्रिकेट खेळायला जाम मजा येते.