मीर तकी मीरची एक गझल

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जे न देखे रवी...
27 Feb 2022 - 4:53 pm

#मीर_तकी_मीरची_एक_गझल
खूप दिवसापूर्वी एक चित्रपट पहिला होता ‘काली सलवार’ नावाचा . साsदत हसन मंटोच्या ह्याच नावाच्या लघु कथेवर बेतलेला. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी एका पूर्वी कधीही न ऐकलेल्या गझलचे शेर होते. गायकाचा आवाज आणि शब्द अतिशय वजनदार वाटत होते पण अर्थ अजिबात समजत नव्हता. कवीचे नाव ‘मीर तकी मीर’ चित्रपटाच्या श्रेय नामावली मध्ये सापडले. बरीच शोधाशोध करून शेवटी ही पूर्ण गझल सापडली.

मुझ सोज़ बा'द-ए-मर्ग से आगाह कौन है
शम-ए-मज़ार मीर ब-जुज़ आह कौन है .१.
बेकस हूँ मुज़्तरिब हूँ मुसाफ़िर हूँ बे-वतन
दूरी-ए-राह बन मिरे हमराह कौन है .२.
लबरेज़ जिस के हुस्न से मस्जिद है और दैर
ऐसा बुतों के बीच वो अल्लाह कौन है .३.
रखियो क़दम सँभल के कि तू जानता नहीं
मानिंद-ए-नक़्श-ए-पा ये सर-ए-राह कौन है .४.
ऐसा असीर ख़स्ता-जिगर मैं सुना नहीं
हर आह 'मीर' जिस की है जाँ-काह कौन है .५.
• पुस्तक : मीरियात - दीवान नंo- 1, ग़ज़ल नंo- 0576

• शब्दार्थ
सोज़ बा'द-ए-मर्ग – मृत्यू नंतरची (आतून जाळणारी)वेदना,
आगाह – परिचित,ओळखणारा, माहिती असणारा
ब-जुज़ – शिवाय
बेकस- दुर्बल, असहाय्य,
मुज़्तरिब- अस्वस्थ, घुसमटलेला
लबरेज़- माखलेले, लडबडलेले
दैर- देऊळ
मानिंद-ए-नक़्श-ए-पा ये सर-ए-राह – रस्त्यावरील पदचिन्हांची मालिका (इथला अर्थ-रस्त्यावरुन चालताना माझ्यासोबत हि कुणाची पावलं उमटत आहेत.)
असीर ख़स्ता-जिगर - कैदी, घायाळ, जखमी काळीज
आह- उसासा
जाँ-काह – हृदयद्रावक अंतकरण पिळवटून टाकणारी

gazalकविता

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

28 Feb 2022 - 12:00 pm | चौथा कोनाडा

हृदयद्रावक अंतकरण पिळवटून टाकणारी आहे (असे वाटले)

स्वतःला थोडीफार समजावी म्हणून पहिली दोन कडवी (कशीबशी) अनुवादीत / भाषांतरीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

मृत्यूपश्चात जाळती वेदना, जाणणारा कोण आहे,
शम-ए-मज़ार मीर शिवाय कोण आहे .१.

असहाय्य आहे, अस्वस्थ आहे, स्वभुमीहीन आहे
प्रवाहापासून दूर राहा मिरे, तुझा साथीदार कोण आहे .२.

जमलीत का ?
मित्रांनो, उरलेली समजावून द्या प्लिज !

रामचंद्र's picture

28 Feb 2022 - 11:01 pm | रामचंद्र

रिख्ते के तुम ही उस्ताद नहीं हो 'गालिब'
कहते है अगले जमाने में कोई मीर भी था।
इति दस्तुरखुद्द गालिबसाहेब